Skip to main content

अद्भुतरस

!!! हाफ कटींग !!! .....

लेखक सन्दीप१२३३० यांनी गुरुवार, 02/02/2012 00:37 या दिवशी प्रकाशित केले.
बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. कॉलेजचे 'Boring Lecture' करू आम्ही 'Bunk' Canteen मधले खाऊ ते फास्ट -फ़ूड 'Junk' बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. ओफिसमधे Over-Time करू आम्ही काम बॉस ची खिटपीट पण ऐकू , सुबह -शाम.. बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. पंजाबी ढाब्यावर करू "Result Party"....३५ Percent ची आणि महागड्या हॉटेल मध्ये करू पार्टी 'Increment' ची बस्सsss , हवा टपरी वरचा हाफ कटींग सोबत दोस्तांची 'un -Scheduled' Meeting .. Corporate मध्ये होऊ मोठ्या पदावर अधिका
काव्यरस

झुरळे !!

लेखक प्रकाश१११ यांनी बुधवार, 18/01/2012 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
कशी कुणास ठाऊक कोठून उगवते ही झुरळांची जमात कशी कोठे दडून बसते फटीत बाथरूममध्ये .... किचनच्या बेसिन खाली मध्यरात्री कधी उठलो तर दिसतात मस्त मजेने फिरत असतात इतस्तत: दिवां लागताच तुरुतुरु पळतात अदृश्य होऊन जातात भयंकर किळसवाणे वाटते त्याना बघतांना झुरळे असतात बारीक झुरळे असतात ढब्बू डौलदार ...बेढब झुरळे असतात चीनी माणसाच्या मिशी सारखी धीर गंभीर विचारवंत योग्या सारखी ध्यान लावून बसलेली किती नष्ट केली नष्ट झाली असे वाटले तरी ती उगवतात फिनिक्स पक्ष्या सारखी राखेतून उभी राहतात जिद्दीने .....! पायाने ठेचले की फट असा आवाज येतो नि ही मरून जातात मी पाहिलंय मुंग्यांनी त्याचा देह फ
काव्यरस

कधीकाळी झालेल्या कविता

लेखक यकु यांनी शुक्रवार, 23/12/2011 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
कधीकाळी झालेल्या कविता (1) वेळही अशी ती होती उगवती न फटफटलेली पक्षीही तुरळक जागे नुकतेच जरा फडफडले माणसे होऊन जागी चालली खाया वारा या शांत पहाट वेळी ती मला भेटते म्हटली आलीच पहा ती आली येताच तिला ओळखले मी मनात माझ्‍या गुपचूप सांगूच नको मी म्हटले ती बसली अगदी चुपचूप अशी दोघे गुपचूप बसता बोलणे खुंटले अ‍गदी पण बोलून काही ना येता ती कसली भेट म्हणावी सावरुन मी हे वदलो डोळ्यात तुला साठवण्‍या मी रात्र-पहाट ही केली पाहून घेऊ दे आता तुज सुंदर शांत सकाळी ते वस्त्र रंग गुलाबी मुखचंद्र अनावरण करता ह्रदयास हुडहूडी भरली नजरेस तिच्या त्या वरता बोलास काही ना सुचले ते मूक-मूक गल

तीन विरंगुळ्या

लेखक विदेश यांनी सोमवार, 19/12/2011 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दूरदर्शनवर जाहिराती भारंभार - सिरीयल बघतांना भाजी करपते फार ! आता नव्या नवरीचे लक्ष फेसबुकावर - मित्र जमती पाच हजार पोळ्या जमेनात चार ! पडूनिया खाटेवर वाचते चारोळ्या चार - कित्ती अरसिक नवरा जांभयांनी करि बेजार !
काव्यरस

(काय साला त्रास आहे!)

लेखक मेघवेडा यांनी गुरुवार, 15/12/2011 01:27 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : - अर्थात हीच! मिसळलेला काव्यप्रेमी यांनी ह. घ्यावं. मूळ कविता फारच सुंदर आहे. तिला मी दिलेली दाद समजावी. :) भर दुपारी चाललेला गायनाचा तास आहे सांग कैसी काढु डुलकी, ताप हा डोक्यास आहे झोप येता धावली ती बावळी कार्टीं तुझी गं सोड तू छंदास या, हा मद्गळ्यासी फास आहे तान लावोनि भसाडी, रेडक्याला साजिरीशी गंध नाही त्या सुरांचा.. च्यायला!

सुटका

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी मंगळवार, 29/11/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्याची जरा अधिकच फाकलेली किरणं. जणू सुटकेच्या प्रयत्नात. पण ब-याचदा ती समाधानी दिसतात कैदेतल माफक स्वातंत्र्य उपभोगताना उमटत जातात खुणा कधी कधी त्यांच्या बंडाच्या प्रकाशाच्या सावल्या जशा, आणि मग संध्याकाळी घाई घाईने ती गोळा करतात सगळ्या सावल्या आणि बांधून नेतात पुन्हा , नकोच पुरावा त्यांच्या बंडाचा, किंवा साध्या कुजबुजण्याचा सुद्धा. त्या सगळ्या सगळ्या सावल्यांमध्ये माझी सुद्धा सावली दिसते माझ्यातून फाकलेल्या धगधगणा-या, पोळलेल्या, किरणांसकट तेव्हा समजते निरर्थक धडपड, किरणांची नव्हे तर सूर्याची स्वतःपासून सुटण्याची!
काव्यरस

(हल्ली मी घेतच नाही ...(؟)... )

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 18/11/2011 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
फिझा यांची माफी मागुन त्यांच्या लिहिण्याला ही आमची पोच. हल्ली मी काही घेतच नाही ..(؟)... भांजाळला गाल एकदा पाठीवर उमटले वळ ... आणि निघाली कमरेतुनी कळ त्या कळीची दाहकता कुणा कळतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... घेण्याची कारणे होती हजार चढणार प्रेट्रोल,वाढती महागाई वर तुटपुंजा पगार ... विदेशी 'टाकुन', देशी घेतली तरीसुद्धा ..... कळी माझी खुलतच नाही हल्ली मी काही घेतच नाही ... नाही नाही म्हणत परत बळेच भरला ग्लास ... पुढ्यातला चखणा आणि माझं मुस्काट यांची सांगड घालणे मला जमलेच नाही .... पण हल्ली मी घेतल्या वाचुन रहातच नाही ...

सूर्य कुडकुडतोय आभाळात ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी गुरुवार, 10/11/2011 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
[ह्या परदेशात थंडी पडू लागलीय. काल सकाळी सूर्य होता आभाळात. म्हणून सहज ग्यालेरीत जाऊ लागलो नि ह्या भर सूर्य प्रकाशात मी गारठून गेलो. आभाळात एवढा प्रखर सूर्य नि खाली थंडीचा कल्लोळ.मी पटकन शटर बंद केले. नि सूर्याकडे बघून घेतले.अगदी केविलवाणा वाटला सूर्य. त्यावरून सुचले.] पहाटे पहाटे -१० तापमान मी घाबरून गेलो थंडीला नि म्हणालो सूर्याला नको येउस आज खूप थंडी पडलीय गारठून जाशील उगाच कशी होईल सहन तुला ही थंडी भीती वाटते तू असतो नागडा सतत खेळत बसशील अंगणात तुझ्या सोबत कोणी नाही तू अगदी एकटा एकटा कशी नाहीरे भीती वाटत..?
काव्यरस

चारुकेशी

लेखक पेशवा यांनी सोमवार, 07/11/2011 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
कसे सांग पाय थकले, वाटेतच रंग विटले श्वासातच माझ्या उतरले घन काळे हृदय मागते मागते मागते दे रे कान्हा उन्मळून टाकणारी लखलखती ज्वाला आर्त माझी हाक जीभ सोलून नटली हरेक उपकाराबरोबर रात्र-बेरात्र झोपली सोसण्याचे बळ खिळ्यासारखे ठोकताना कान्हा चोरशील का ह्या अस्तित्वाचा काला? हे काही स्वर डोळ्यांमध्ये राहिलेले स्वप्नांचे अनौरस क्षण त्यांच्यामागे वाढवलेले आशिषांच्या भोगतो घडाभर जखमा कान्हा माझ्या झोळीत एक सुदर्शनी शिवी घाला! ---- ह्या चारुकेशी बरोबर वाचा ------
काव्यरस

महागाई.. महागाई ..

लेखक विदेश यांनी बुधवार, 02/11/2011 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
कौतुक सोन्या-चांदीचे गगनी भाव जरी भिडले गुरुपुष्याच्या मुहूर्तावरी दागदागिने बहु घडले ! थेटरातला चालू आहे उघडा काळाबाजार पहिला खेळच पहायचा जडला आहे आजार ! चार चाकी दोन चाकी वाहने उच्चांकात नवी भाव वाढते पेट्रोलचे नको सायकल चैन हवी ! ग्यास रेशन कपडालत्ता गरजा सोडुन भलतिकडे कर्जामधुनी खर्च वाढतो धूमधडाका चोहिकडे !
काव्यरस