लेखकविदेशयांनी सोमवार, 19/12/2011 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या दूरदर्शनवर
जाहिराती भारंभार -
सिरीयल बघतांना
भाजी करपते फार !
आता नव्या नवरीचे
लक्ष फेसबुकावर -
मित्र जमती पाच हजार
पोळ्या जमेनात चार !पडूनिया खाटेवर
वाचते चारोळ्या चार -
कित्ती अरसिक नवरा
जांभयांनी करि बेजार !
प्रतिक्रिया
छान छान यमक छान जुळ्ले