Skip to main content

अद्भुतरस

शार्दूलविक्रीडित

लेखक राजघराणं यांनी सोमवार, 04/06/2012 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
(शार्दूल म्हणजे सिंह. शार्दूलविक्रीडित म्हणजे सिंहाचा खेळ. हे मराठीतील एक सुंदर अक्षरगणवृत्त आहे. प्रत्येक ओळीत १९ अक्षरे आणी म स ज त त ग हे गण येतात. अक्षरगणव्रुत्तात एका ओळीत किती अक्षरे येतात आणी त्यांचा र्‍हस्व दीर्घ अक्षरांचा क्रम लघु गुरू ठरलेला असतो. उदा म म्हणजे तिन्ही गुरू अक्षरे. त्यामुळे व्रुत्ताची चाल ठरलेली असते. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे -आम्ही कोण म्हणून काय पुसता ? ही कविता होय. ही चाल लग्नातल्या मंगलाष्टकालाही चालते.) कवितेचे नाव : शार्दूलविक्रीडित वृत्त : शार्दूलविक्रीडित कवितेचा विषय :शार्दूलविक्रीडित. ..सिंहाचा खेळ.

अंगणात बाप, दारात माय,

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 13/05/2012 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
अरे अंगणात बाप अन दारात माय, घरला तुज्या यायला मी खुळा हाय की काय, येड्या, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, घराकडे आलो तर काय काय देशील घराकडे आलो तर काय काय देशील गरम गरम पीठल अन भाकर तू खाशील सोताच्या हातानी भरवणार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, पोटभर खाल्यावर लै झोप येते पोटभर खाल्यावर लै झोप येते दोघांसाठी खोलीत गोधडी घालते खोलीच दार आतुन लावनार हाय, रानात गेला बाप अन बाजारला माय, एकली हाय घरला, आता येतो का नाय, काय हुईल बाजारन जर आली आई काय हुईल बाजारन जर आली आई सांगेन आई ह्यो तुजा जावई, मागन मला घालायाला येनार हाय

झ झ झ झ झोपडीत

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 09/05/2012 13:58 या दिवशी प्रकाशित केले.
झझझझ झोपडीत चचचच चारपाई झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी माका तुझा प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे कुकरू कुकरू हू तुझ्याच सारखा यार पाहिजे यार पाहिजे हा हा यार पाहिजे सूर्य न पाही चंद्र न पाही तुझाच बस दीदार पाहिजे कुकरू कुकरूहू झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो... रडते वेडी प्रेमाचा करुया धिंगाणा, निघुन न जावो सुहानी घडी रोखू नका, करुद्या की प्रेम तरी दिलवाल्यांना कुकरू कुकरू हू टोचू नका भरुद्या की मनात तनाच्या उजाळ्यांना तू तुझ्या घरवाल्यांना समजाव गं मी माझ्या घरवाल्यांना कुकरू कुकरूहू झोपडीत चारपाई माणसाविना, अंबो...

(एक चारोळी)

लेखक कुंदन यांनी मंगळवार, 08/05/2012 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
श्रेय : दोन चारोळ्या - http://www.misalpav.com/node/21589 ओळखीच्या पाणवठ्यावर रात्रभर, पिउन जाई राजकुमार ! दिसतो जरी रुबाबदार, पितो मात्र उधारीवर !!

रात्र

लेखक सोनल कर्णिक वायकुळ यांनी शुक्रवार, 13/04/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
डोळ्यातला चंद्र आणि मनातला अंधार घेऊन सत्याचे भास झेलत स्वप्नांच्या उंबरठ्यावर निद्रेची वाट बघत ताटकळत उभी होती रात्र माझा सुद्धा डोळा लागला नाही ती झोपेपर्यंत.
काव्यरस

मन

लेखक पेशवा यांनी शुक्रवार, 13/04/2012 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
सुख टाळी द्यायला सरसावते आणि त्याच वेळी जपायचे असतात मला हातवरचे फोड चाके लाऊन किल्ली देउन तयार असते माझे मन एका लाँग ड्राईव्ह करता आणि काही केल्या बंद होत नाहीत ह्या खिडक्या ही दारे, घरातले दिवे आणि पत्रासाठीच्या फटीतुन ओतत रहातात थकलेली बिले... उपसत रहातो मी घर थोडे पाय टेकवण्यासाठी मन शोधत रहाते फट माझ्या कर्दळ-कातडी मधे एक उंची वाइन सरकवतो घशात लाच म्हणुन कदाचीत लाचार म्हणुन देखील पण लय संपलेल्या क्षणाशी मन उभे असते सुन्न विकल... निसर्गाने दिलेली नखे घासत, रंगवत. सुखाचे मुखवटे जगोजाग सजवतात भिंती कोपरे आणि वेश्येसारखे माझे मन सरावने चाके लाऊन किल्ली देउन तयार पुन्हा एका लाँग ड्राइव्हसाठी
काव्यरस

चांदण्यांची धार

लेखक पेशवा यांनी मंगळवार, 10/04/2012 04:06 या दिवशी प्रकाशित केले.
शांततेवर लोंबणारा हा दोर कसला? ज्याचा पीळ ओळखीचा आहे भास ओळखीचा आहे माने भोवतालीचा पेड माझा आकांत भोवरा आहे ?
काव्यरस

प्रार्थना

लेखक पेशवा यांनी बुधवार, 04/04/2012 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
प्रार्थनेचे हात जुने होत नाहीत, विटत नाहीत, विरत नाहीत धोकादायक वस्तूंची विल्हेवाट कशी लावतात? चंद्र उगवलेल्या रात्रीत मल्हार ऐकताना पाऊस बनून कोसळावेसे वाटते आहे माझी म्हणावी अशी जमीन उरलेली नाही माझे म्हणावे असे आकाश उरलेले नाही वीजा, ढग, सोसाट्याचा वारा ह्यांचा वरखर्च... रकाने मारलेल्या मन-देहाला झंकारणे झेपणार की नाही?
काव्यरस

बोंबा मारुक ह्यांचो आक्खो आयुष्य जाय...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 02/04/2012 12:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा :- ज्यांना गरज आहे त्यांनी शोधावी. (मालवणी भाषेचा गंध देखील नसल्याने काही शब्दांमधून मालवणीचा बट्ट्याबोळ झाल्यास लेखक जबाबदार नाही. मालवणी माणसे व भाषीक ह्यांच्याविषयी कुठलाही रोष नाही.
काव्यरस

सिमोल्लंघनी ट्रेक

लेखक नरेंद्र गोळे यांनी शनिवार, 31/03/2012 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
दूरदर्शनचे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर, विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव २१ मार्च रोजी प्रतिनिधी, मुंबई सुचेता मुंबई दूरदर्शन केंद्र सह्याद्री वाहिनीतर्फे दरवर्षी देण्यात येणारे हिरकणी सन्मान पुरस्कार जाहीर झाले आहेत. हा पुरस्कार बुधवार, २१ मार्च रोजी संध्याकाळी सहा वाजता दूरदर्शन केंद्राच्या वरळी येथील प्रांगणात आयोजित केला आहे.