कळली तर कळवा
कळली तर कळवा
दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर
जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर
यंदा मुद्दल मागू नकोस, फुकट केळी ने
कामात येईल कधी काळी, गरज पडली जर
भिडाच एकदा निग्रहाने, बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर
स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य
मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर
किती उपडणार आहेस तू, बस इतके ठरव
काव्यरस
मिसळपाव
सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच
आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच
कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात
आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच
आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं
कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच
अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते
एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच
होईल बहुदा पानिपत,