मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कळली तर कळवा

गंगाधर मुटे ·

तुडतुडी 16/10/2015 - 15:32
जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर
म्हणजे ? नक्की काय म्हणायचंय ? आयत्या बिळात नागोबा म्हण कधी ऐकली नाही का . साप कधीही वारूळ स्वतः तयार करत नाही . जबरदस्तीनेच घुसत असतो

In reply to by तुडतुडी

गंगाधर मुटे 19/10/2015 - 19:35
जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर नक्की जे म्हणायचंय, ते वरील ओळीतच आले आहे. त्यामुळे वेगळे स्पष्टीकरण द्यायची आवश्यकता नाही. शिवाय तुम्हाला जे कळले नाही त्याविषयी विचारले असते तर काही सांगताही आले असते.तुम्ही काही न विचारता स्वतःचे जे मत आहे तेच ठाम व अंतिम समजून ठाम विधान केलेले आहे. ख्ररं तर कोणत्याही कविवर त्याच्या कवितेचा अर्थ उलगडून दाखवण्याची वेळ येऊच नये. तो इतर कुणीतरी उलगडून दाखवला पाहिजे, असे मला वाटते.

दुष्काळाच्या ज्वाळांमध्ये, जपून ठेव नर
गोठवलेल्या बर्फाखाली, अप्सरांचे घर

जबरदस्तीने घुसतो काय, साप कधी सांग
तूच आपल्याच बिळावरती, झाकण नीट धर

यंदा मुद्दल मागू नकोस, फुकट केळी ने
कामात येईल कधी काळी, गरज पडली जर

भिडाच एकदा निग्रहाने, बाकी बघू मग
कोण लोळणार खाली आणि, कोण चढेल वर

स्मशानातल्या मसन्याउदास, कुठे काय वर्ज्य
मेल्यावरती मर नाहीतर, जिवंतपणी मर

किती उपडणार आहेस तू, बस इतके ठरव

चुलीमध्ये घाल

गंगाधर मुटे ·

विवेकपटाईत 24/09/2015 - 20:57
साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल नेह्मिच पराजित अश्रूंना बाजारात भाव असतो, आपण राणा प्रताप यांचे गुणगान करतो अपराजित बाजीरावला कोण विचारतो...

In reply to by विवेकपटाईत

गंगाधर मुटे 26/09/2015 - 18:04
खरे आहे विवेक पटाईत सर. शेतकरी पराजित आहे म्हणून त्याच्या अश्रूंना चांगला भाव मिळतो. मात्र शेतमालास भाव म्हटले की भुवया उंचावतात.

मेघ भरजरी आठवणींचे, दाटून आले काल
नयनामधे आली त्सुनामी, वाहून गेले गाल

जाता जाता हळू घातली भुवई उचलून साद
या चिमणीच्या चोचीसाठी दाणा घेऊन याल?

बोल बोबडे मर्दुमकीचे बोलून झाले फार
असेल जर का तुझ्यात हिंमत, हाती घे तू मशाल

कर्ज काढुनी कशास शेती कसतोस मित्रा सांग
येडपटांचा येडा धंदा कुत्रं खाईना हाल

साहित्याचा खेळ गारुडी तेजीत आला फार
पराजितांचे अश्रू विकुनी झालेत मालामाल

रंगल्या रात्री अश्या

भैड्या ·

In reply to by एस

मांत्रिक 13/09/2015 - 22:26
भौ! कृपया अमूर्त चित्रसृष्टीकडे लक्ष द्यावे. जे पकडायचा प्रयत्न करून देखील सापडत नाही असे काहीतरी आहे. त्या अमूर्ताचा शोध हाच कवितेचा प्लस पाॅईंट आहे.

कळाली... मला कविता कळाली... अस वाटायच्या आतच लांब पळाली! (विको वज्रदंती लावल्यावर कळेल काय? :-/)

भैड्या 17/09/2015 - 17:59
या भक्क्कळ कमेंटा वाचुन आमाला भरतं आलेलं हाये. डोळ्यातील चार टिपुस धाग्यावर शिंपडुन वरच्यांच्या आभारप्रदर्शनाचा ठराव पास खरतो. असावा लोभ भैडु.

In reply to by भैड्या

नाव आडनाव 18/09/2015 - 15:34
कायंच कळलं नाय, पण मस्तं. भक्क्कळ - व्वा. सरकार नवा शब्द दिला तुम्ही माय मराठीला. पण, तो "क्क्क" कसा वाचायचा आणि उच्चारायचा ?

In reply to by नाव आडनाव

भैड्या 18/09/2015 - 19:54
आधी चुळ भरा बघू.. मग घसा घराघरा खाक्रा. आता वर बघा (तिकडे नैवो).. परत खाली बघा. जोर लावुन वरडा " हे क्क्काय आहे?????" बघा जमलं की नाही.

रंगल्या रात्री अश्या गोलघुमट टक्कल जश्या तो विजेचा खांब तरर्राट उभा असा या सडकेच्या तोंडावरती देऊन टाक भसाभसा दुरून पहा ते कुत्रे सांडांच्या खांद्यावरचे लावलाय लळा तु त्यास आज असा कसा? बुंगाट ढेकर देऊन ऊठ त्या पानावरुन घेऊन जा घागरी अनं हलव तो हापसा आम्ही सुर्याची लेकरे कोवळ्या ऊन्हात निपजितो अन घेऊन या घागरी आज सकाळीच हापसितो दे दे मला तो बंजरखंड मशेरी त्यावर मी भाजितो आज सकाळी टकलावर हात मी फिरवितो

पुन्हा एकदा दमामि म्हणे …

दमामि ·

जेपी 09/06/2015 - 15:24
आधी होता .............. ..............केले त्याशी, त्याचा तांब्या सुटेणा, मुळ स्वभाव जाईना. (रिकाम्या जागा वकुबाप्रमाणे भराव्या)

अंदाज लावतो मी,ही जिलबी काय आहे? तांब्या परी चयाचा, पीsssठातं गेम आहे! ;-) एका हाती न कोणी,टाके कडि जराशी कढईत नीट येता,तळण्यात सेमं आहे मामी तुझिच खोडी, ना काढिलि कधी मी आत्मु स येथ कसला? , किलो चा भाव आहे? ;-) सोडुन दे 'अता' तू, 'बाजार' फारं झाला! मार्केट यार्ड मधला, मी 'कसंला' हमाल आहे! :P

मृत्युन्जय 09/06/2015 - 19:23
मृत्युंजयास नाय हो. अनाहितांनी पक्के ओळखले आहे म्हणे आयडी कोणाचा आहे ते. तिथे खुस्फुस चालली होती की अनाहितेचाच डु आयडी आहे म्हणुन.

In reply to by सस्नेह

विंग्रजीतल्या गाय (guy) च्या डोक्यावर दृश्य शिंगे नसतात =)) ... पण वाच्यार्थाने शिंगे येऊ शकतात ;)

सनईचौघडा 10/06/2015 - 14:33
आमच्या गुर्जींना वंदन करुन. असेल लेखणी समर्थ तर जिल्बीची रास आहे, तांब्याची करु नको खेचाखेची "मिळेल तो मला" हा फक्त भास आहे, टका ऐस नाही तर दमा मि ऐस स्वयंपिडीत होण्याची एवढी का आंस आहे? भाय म्हणता (अनहितांमागे) लपतो आहेस हा कोणता वनवास आहे ?

In reply to by सनईचौघडा

दमामि 10/06/2015 - 18:25
गुर्जीना वंदन करून, "मोद" झाला वाचुनी , "दर्दी" तुम्ही तर खास आहे, पण(क)मंडलू वा जिलबी , मजला न तो हव्यास आहे... नसे स्वयंपीडित मी, न समर्थ माझी लेखणी अन जगाचा भ्रम उगा , वनवास सर्वां त्रास आहे

सनईचौघडा 11/06/2015 - 10:10
आम्हा न वाटे कधी जीवन वनवास अथवा त्रास , जैसी दृष्टी तैसेची हे जग नको हा आंधळा विश्वास , घ्या दिक्षांत अता गुरुजींचा रांगेत* उभे राहुनी संपेल वनवास का त्रास मग जगा जीवन स्वच्छंदी, *(रांगेत आधी मी (पम्या) आणि मग टक्या आहे).

चर्चा उगा कशाला? (मी) भलताच "शाय" आहे विल्लू म्हणून गेला, नावात काय आहे …. कोणी म्हणे टका तर गिरिजा कुणास वाटे समजे सगाच कोणी, सूडात पाय आहे … चिमण्यास येई शंका, कोठून धूर येतो मृत्युंजयास वाटे बैलात गाय आहे… आत्मुस फक्त पडली चिंता दहा दिसांची जेपी करून गेला टेम्पोत "बाय" आहे…. नियमात नाही त्यांच्या तरी लावतात फास डुआयडिंवरी हा उलटाच न्याय आहे …. चुकलात यार तुम्ही , अंदाज फार झाले पूर्वी कधी न झाला (मी ) अज्ञात "भाय" आहे …

एक केवळ बाप तो

गंगाधर मुटे ·

एक केवळ बाप तो

तापणारा तापतो अन मजवरी संतापतो
मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो

तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी
ओढताना ओढणीला सूर्यही मग धापतो

अंतरात्म्याचा दुरावा वाढला जर फ़ार तर
अंतराला अंतराच्या अंतराने कापतो

वाचणारा वाचतो पण; का? कशाला? जाणतो?
वाढवाया आत्मगौरव छापणारा छापतो?

आसवांच्या आसवांना धीर द्याया धावतो
निर्भयाला अभय ज्याचे एक केवळ बाप तो

वैश्विक खाज नाही

गंगाधर मुटे ·

विवेकपटाईत 19/04/2015 - 09:56
खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे? शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही विचार करावा लागेल. बाकी पप्पू शेतकर्यांची रैली करतो आहे. हरवलेला वोट बॅंक शोधतो आहे.

hitesh 20/04/2015 - 05:07
छान. मोदी सगळी जमीन अदानी अंबानीना अदा करेल असे वाटते... मग काय खाणार ?

वेल्लाभट 20/04/2015 - 17:29
काही शेर आवडले... शालेय पुस्तकांनी..... छान जमलंय पण हिंदी/उर्दू शब्द खटकले. मराठी काव्यात हिंदी किंवा उर्दू शब्दांची सरमिसळ मला व्यक्तिशः आवडत नाही.

गंगाधर मुटे 21/04/2015 - 16:03
प्रतिसादाबदल सर्वांचा आभारी आहे. @ वेल्लाभटजी, आपण रिवाज या शब्दाबद्दल बोलताय का? हा शब्द आमच्याकडे मराठीमध्ये पूर्णपणे एकजीव झाला आहे.

In reply to by गंगाधर मुटे

बहुदा ते "अनाज" ह्या शब्दाबाबत बोलत असावेत. रिवाज हा शब्द तसा रुळलेला आहे पण मलाही अनाज हा शब्द खटकला. बाकी गझल नेहेमीप्रमाणेच उत्तम!

In reply to by कानडाऊ योगेशु

गंगाधर मुटे 21/04/2015 - 23:44
आमच्या बोलीभाषेवर हिंदीचा प्रभाव असल्याने मराठी शब्द नेमकेपणाने ओळखने आम्हाला कठीण जाते. त्यामुळे असे होते. अनाज हा मराठी शब्द नाही, हे आता कळले. खाज, बकाल, रिवाज हे शब्दसुद्धा शुद्ध मराठी आहेत की नाही, हे मला ठरवणे कठीण आहे.

शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही

निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही

त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही

खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही

गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही

शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला

नाटक वाटू नये

गंगाधर मुटे ·

नाटक वाटू नये

थुंकली थुंकी पुन्हा पुन्हा, उगीच चाटू नये
नाटक सुद्धा असेच वठव की, नाटक वाटू नये

लाख उमटू दे देहावरती, आपुलकीची चरे
पण इवलेसे काळीज माझे, तितुके फाटू नये

नकोस दाखवू दिव्य धबधबे, अत्तरवर्णी झरे
मी मागत नाही फार परंतु; पाझर आटू नये

वरून सांत्वन, आतून चिमटा; नाद तुझा वेगळा
जाणीव इतकी तरी असू दे, मैतर बाटू नये

सपाट टक्कल चमचमी माझे, लोभसवाणे जरी
संधी मिळाली म्हणून त्यावर, पोळी लाटू नये

एक जिलबी पाडायचीच

वेल्लाभट ·

In reply to by स्पा

@ ओके, कधीपासून होतयं असं?>> =)) तुझ्यासारखि हलकट माणसं चावायला लागली, तेंव्हापासून! =)) ... बाकी वेल ल्ला भटा,चांगली पडली जिलबी .. पटा पटा! :-D

तिमा 27/03/2015 - 18:15
त्या फोटोत जिलब्यांच्या मागे मठ्ठा ठेवला आहे की रबडी ? आम्हाला काहीही असलं तरी चालेल, पण त्यांतल्या त्यांत रबडी असेल तर फारच मजा येईल!

In reply to by वेल्लाभट

दही लावा तुम्ही. बनवू मठ्ठा. मग मते मिळ्तील मिपाकरांची...एक गठ्ठा ;) -------- तांब्या पास केलाय.. पाडा रे पुढे.. =))

In reply to by अन्या दातार

तांब्याविण गुर्जी म्हणजे अंड्याविणु भुर्जी मठ्ठ्याविण राखु कैसी मिपाकरांची मर्जी ;) =)) ह घ्या

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बॅटमॅन 31/03/2015 - 17:38
अगायायायायायायायायायायायायायायाया =)) =)) =)) =)) =)) टोर्टूगातला खास प्रथमधारीय सोमरस प्राशुनी कविता पाडली काय हो? लयच भारी. _/\_

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

@तांब्याविण गुर्जी म्हणजे अंड्याविणु भुर्जी मठ्ठ्याविण राखु कैसी मिपाकरांची मर्जी>>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/smiley.gif तांब्या माझाची आहे,कधी ठेवितो तयासी दूर परि अंतर्मनी तो रुजला,काढितो कधी तो धूर http://www.sherv.net/cm/emoticons/memes/troll-face-meme-smiley-emoticon.gif

तांब्याधारी जो जो त्यासी, विहीत नित्य कर्म जिलब्या पाडणे हाची होई, आगळा न धर्म रोज ताजे पीठ शोधणे, हाची एक नेम अचरटांचा गोतावळा, सुखे करो काम पैजारबुवा,

In reply to by सूड

आपणा सर्वांचे लाडके संगीतप्रेमी, जिलबीप्रेमी श्री. वेल्लाभट ह्यांचा काका हलवाईकडच्या सुद्द साजुक तुपातल्या पावशेर जिलब्या, अर्धा ग्लास मठ्ठा व पुस्प्गुच् देउन करण्यात येत आहे.

जेपी 01/04/2015 - 15:18
हाफशेंच्युरी निमीत्त श्री.वेल्लाभट आणी श्री.चिमणराव यांचा सत्कार एक एक तांब्या देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक -जेपी आणी तमाम कार्यकर्ते

नाखु 01/04/2015 - 15:19
सत्काराला येणे येताना किमान तांब्याची प्रतिकृती म्हणून मड़क आणू नये ! जिलबी कशीही अस्ली तरी माश्यांस़कट पुड्यात बांधू नये. चिट्(कव)णीस अखिलमिपाजिल्बीप्रतिसादक्आस्वादक्वाट्प केंद्र संचालीत शेंच्युरी/हाफशेंच्युरी सत्कार मंडळ

नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं... आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं... यमक जुळतं का बघावं म्हटलं... तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी a सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच होईल बहुदा पानिपत,

लग्नाचे बंध होती पुरुषाचे भोग आता

ज्ञानोबाचे पैजार ·

काही नाही. सर्व पुरुषांनी आता नील स्ट्राउस चे "रुल्स ऑफ द गेम" आणि रॉस जेफ्रीचे इथे नाव न सांगता येणारे पुस्तक (व्यनि करावा) वाचुन अंमलबजावणी करायची वेळ आली आहे.

आमच्या मित्राने एक बाजू मोठ्या कळकळीने मांडली. त्याच्या भावनांशी बर्‍याच अंशी सहमत होताना नाण्याची दुसरी बाजूही समोर यावी असे वाटले.

लेखणीने लढाईस सज्ज व्हावे!

गंगाधर मुटे ·

विटेकर 08/01/2015 - 14:31
सोडून शेतकीचे आवेशपूर्ण गाणे! स्वीकारतोच आता शहरी काव्य-लेणे!! गाऊन दाखवीन असे सुरेल गाणे ! आता दिसेल तुम्हा साक्षात चांदणे !! नकोच खप्प मर्जी तुमच्या संपादकाची! पुरवीन आस आता गाऊन गाणी तुमची!! लागे न माळ आता शहरी प्रतिसादकाची ! मिळ्वीन पूर्ण खात्री माला आता कौतुकाची !! पुरेत हे प्रहार शिणलो प्रतिवाद करता! आता हवेत हार -साठी कवन करता !! मुटे कुल-सुताची ही स्वीकार मुक्त कविता! आवडेल नक्की तुजला थांबतो नक्की आता !! ओ मुटे , ह. घ्या , भांडायला येऊ नका !

In reply to by विटेकर

अन्या दातार 08/01/2015 - 16:04
तुमची कविता मी 'गे माय भू तुझे मी' च्या चालीवर म्हणून बघितली. ठिक बसतीये मीटरमध्ये :)

In reply to by काळा पहाड

सतिश गावडे 08/01/2015 - 19:16
अल्ताफ राजाच्या "तुम तो ठेहरे परदेसी" गाण्यातील "अब याद आ रहा हैं वो माहे जनवरी था" या चालीवरही परफेक्ट जमतंय.

In reply to by सूड

आदूबाळ 08/01/2015 - 20:17
याचा अर्थ "हे राष्ट्र देवतांचे" हे "या गो दांड्यावरना" या चालीतही म्हणता येईल! विटूकाका आणि इतरांची क्रिएटिविटी जबरदस्त आहे!

In reply to by वैभव जाधव

गंगाधर मुटे 08/01/2015 - 20:40
@वैभव जाधव, "ये दिल मुझे बता दे, तू किस पे आगया है" या गीतात थोड्याफार मात्रा कमी जास्त आहेत पण या ओळींची जवळीक आनंदकद या वृत्ताशी आहे. :)

मला वाटतय , मुटे सरांच्या मागील धाग्यातील प्रतिसादातील ज्ञानयज्ञामुळे पब्लिक इथे प्रतिसाद द्यायचं टाळतय , दुष्ट कुठले :-\ ह्यानिमिताने शेतकर्‍यांच्या कवितांना किमान ३० प्रतिसादांचे पॅकेज द्यावे असे मी संपादक मंडळाला आवाहन करीत आहे :D

एस 08/01/2015 - 20:15
नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने
ह्या ओळी आवडल्या. पण कदाचित जिथे अशी अनुकूल परिस्थिती नाही तिथेही नव्या ज्ञानाच्या जोपासनेसाठी मशागत करणे हेही लेखणीचेच काम म्हटले पाहिजे. कविता छान आहे. पुलेशु.

आता तयार व्हावे लढण्यास लेखणीने
रक्षण अबोलतेचे करण्यास लेखणीने

अभ्यास चिंतनाला शास्त्रात घोळवावे
कसदार शब्दशेती फुलण्यास लेखणीने

वास्तव चितारण्याची अवगत कला करावी
भक्कम नवीन पाया रचण्यास लेखणीने

नवज्ञान निर्मितेला जेथे उभार तेथे
आशय हळूच न्यावा भिजण्यास लेखणीने

भाकड-वृथा कथांच्या कक्षेपल्याड जावे
अभिजात सृजनाला पुजण्यास लेखणीने

लटकी-पुचाट वाणी शिरजोर होत आहे
यावे रणात गच्ची धरण्यास लेखणीने