Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 02/02/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544962
प्रतिक्रिया 783

प्रतिक्रिया

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

तुमचा लाल किल्ला आमच्या भारतातच बांधलाना ? हवा असेल तर घेउन जा परत !

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपचा जागा वाटपाबाबत चर्चा झाली आहे. त्यामध्ये आरपीआयला स्थान देण्यात आले नाही. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आम्हाला एकही जागा न सोडल्यास वेगळा विचार करावा लागेल असा इशारा आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना-भाजपा युतीला दिला आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेने दक्षिण तर भाजपने ईशान्य मुंबई जागेचा त्याग करावा, अशी मागणीही आठवलेंनी यावेळी बोलताना केली. आठवले म्हणाले की, शिवसेना भाजपची युती झाली आहे. ती समाधानाची आणि आनंदाची बाब आहे. पण आगामी निवडणुकीत आरपीआयला सोडून जागा जिंकणे अशक्य आहे. कारण आजअखेर आरपीआयच्या मदतीमुळे सेना भाजपाच्या जागा निवडून आल्या आहेत, हे दोन्ही पक्षांनी लक्षात ठेवावे. तसेच आमच्या विषयी कट करास्थान चालू आहे, असंही आठवले म्हणाले.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

आमच्याविषयी चालुय कटकारस्थान आमच्याविषयी चालुय कट कारस्थान... . एकही जागा मिळाली नाही तर बंद पाडू पाकिस्तान . जागा नाही दिली तर कळू वेगळा विचार जागा नाही दिली तर कळू वेगळा विचार. . कारण माझ्या मागे आहेत कार्यकर्ते फक्त चार.. . मा. रामदास आठवलेंना लढवायला जागा मिळालीच पाहिजे. शिवराय भीमराय शिवाय उपाय नाय.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

रामदास आठवले ह्यांच्या पक्षाबद्दल काळजी करण सोडा आणी उत्तर प्रदेश मध्ये सर्वात जुनी म्हणुन भ्रम असलेल्या भ्रष्ट कॉंग्रेसला एकही सिट महागठबंधनने सोडलेली नाही ते बघा !! हळुहळु मोघलासारखीच नामशेष होउन जाईल कॉंग्रेस !!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

मोघलाई संपल्याच दुःख तुम्ही उराशी बाळगुन आहात ना म्हणुन मोघलाई ! शेवटी कॉंग्रेसची जुलमी राजवटीच तुलना ही मोघलाई सारख्या धर्मद्वेष्ट्या जुलमी राजवटी बरोबरच करता येईल!!

कोलकातामधील गौरव दत्त या निवृत्त IPS अधिकाऱ्याने मनगटाची नास कापून आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या नोटमध्ये सरळसरळ ममता बॅनर्जी यांचे नाव लिहून म्हणले आहे की त्यांच्या मृत्यूला ममता बॅनर्जीना जबाबदार धरले जावे. ममतांनी गौरव दत्त यांना १० वर्ष त्रास दिला, २ खोट्या केस मध्ये गुंतवले आणि नंतर ७२ लाखांचे निवृत्तीवेतन अडकवून ठेवले. यावर कुठल्या पुरोगाम्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाहीये, ना कोणी प्लॅकार्ड घेऊन व्हिडीओ व्हायरल केला ना ध्रुव राठी, विनोद दुआ, सागरिका, राजदीप वगैरे पत्रकारांनी कुठला निषेध केला. फेब्रुवारी १९ ला आत्महत्या केली त्याची बातमी इंडिया टुडे मध्ये फेब्रुवारी २३ ला आली. तर टाइम्स ऑफ इंडियाने २० ला "IPS Officer passess away" अशी बातमी दिली. हेच रोहित वेमुलाची आत्महत्या आठवत असेल तर त्याने चिठ्ठीत "माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये" असं लिहूनही स्मृती इराणी आणि मोदींनी प्रत्यक्ष स्वतः रोहित वेमुलाला फाशी घ्यायला लावली असा आरडाओरडा किती महिने चालला.

Modi inagurated National War Memorial !! कित्येक दशकांची नॅशनल वॉर मेमोरियलची मागणी अखेर पुर्ण !! गेल्या ६५ वर्षांत नेहरु गांधी चे मेमोरिअल देशात सर्वत्र बनवले गेले ! विमानतळापासुन वाचनालया पर्यंत सर्व वास्तुना नाव फक्त गांधी परिवारातल्या सदस्यांच किंवा नेहरुच दिल गेल !! श्री मोदीजींच्या अटल निश्चया मुळे जागतीक स्तरावरच अत्याधुनिक नॅशनल वॉर मेमोरिअल आज दिल्लीत साकार झाल!! PM inaugurates National War Memorial, slams previous govts for putting family first

गांधी परिवार होता म्हणून भारताचा विकास झाला , नाहीतर बसले असते अजुन जंगलातील कंदमुळे खात !!! त्यामुळे त्यांचा इतके वर्षे देशाची निरपेक्ष सेवा केल्यावर त्यांचा हक्कच बनतो !!! या देशसेवी , देशप्रेमी कुटुंबावर भ्रष्टाचार चे आरोप करून भाजप सत्तेवर आली पण आता पर्यंन्त एक तरी गुन्हा सिद्ध झाला आहे का ? मग कशाला उगीचच बदनामी केली त्यांची ? इथ महाराष्ट्रात पण तसेच सारख त्या दादा ला ढोस !!! काढू का फाइल ? काढू का फाइल ? अस करीत करित 5 वर्ष बिचाऱ्या दादाला तालुक्यात जेरबंद करून टाकल ! आणि महत्वाचे म्हणजे प्रत्येक शासकिय वस्तु , पुल , विमानतळ , अवार्ड्स ला महान परिवारचे नाव नाही द्यायचे मग क़ाय अंबेडकर , बोस , पटेल , पवार , आठवले , राणे यांची नावे द्यायची ?

In reply to by mayu4u

हल्ल्यासाठी बारा विमाने गेली होती यातील चार विमाने जर प्रतिहल्ल्यापासून संरक्षण (escort/CLOSE SUPPORT) म्हणून गेलीअसे गृहीत धरले तर उरलेली ८ विमाने बॉम्ब घेऊन गेली असावी. या विमानांची एकंदर १०,००० किलो अतिरिक्त वजनाची शस्त्रे/ अस्त्रे घेऊन जाण्याची क्षमता आहे. म्हणजे प्रत्येक विमानाने साधारण १००० किलो (खरं तर २००० पौंडाचा) एक बॉम्ब नव्हे तर कमीत कमी ७-८ बॉम्ब तरी टाकले असतील म्हणजे हे साधारण ५०-६० बॉम्ब तरी टाकले गेले असतील ( हा माझा अंदाज आहे) हा PGM २००० (PRECISION GUIDED MUNITION) म्हणजे अचूक मारा करणारा लेसर गाईडेड बॉम्ब आहे. अधिक माहितीसाठी https://defence.pk/pdf/threads/laser-guided-bombs.107870/

In reply to by सुबोध खरे

https://www.youtube.com/watch?v=z6u-4cL1Czs लेसर बॉम्बची अचूकता दाखवणारा व्हीडीओ आहे. यात मिराज २००० आणि सुखोई ३० दोन्ही विमाने मारा करताना दाखवली आहेत.

In reply to by सुबोध खरे

चकोठी मुझफ्फराबाद हे पाकव्याप्त काश्मीर मध्ये आहेत पण बालाकोट हे पाकव्याप्त काश्मीर मध्ये नसून पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात आहे. म्हणजे घरात घुसून मारल्याचा दावा खरा आहे.

च्यायला ह्या पाकिस्तान मिडीयाच्या दलिंदरीचा नमुना. काय सांगायचं तेही सांगता येत नाही. अशीच कंडीशन करुन ठेवली पाहिजे त्या इम्रान आणि त्याच्या मिडीयाची. जन्मदरिद्री, कर्मदरिद्री, अष्टदरिद्री पाकिस्तानला असंच तोंड दाबून पिसाळल्या कुत्र्यागत हाणलं पाहिजे.

In reply to by यशोधरा

आज नेहमीच्या पोस्टींना सुट्टी. आज सगळ्यांनाच सैन्यदलाचा अभिमान वाटत असणार. मिपाकरांच्या भारतावरच्या प्रेमाची मला बिलकूल शंका नाही. फक्त कोणत्या मार्गाने भारताचे भले करावे याबाबत मतभिन्नता आहे.

In reply to by mayu4u

सैन्याच्या पराक्रमाचा राजकीय फायदा घेवून द्यायचा नाही, असा त्यांचा होरा असावा. पण इथे विरोधक म्हणजे नक्की कोण, हे क्लियर नाही झाले माझे??

In reply to by विशुमित

साध्या-सोप्या गोष्टी पण काही जणांना नाही कळत. काँग्रेस चं अध्यक्षपद मिळू शकेल तुम्हाला.

भारत सरकार, भारतीय वायुसेना व तमाम भारतीय जनतेचे अभिनंदन

गेल्यावेळी भारतीय सैन्याकडून करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे सरकारकडून मागणार्‍या सर्व विरोधकांनी, आज सरकारचे अभिनंदन न करता फक्त वायुसेनेच्या जवानांचे अभिनंदन केले आहे. --

In reply to by प्रसाद_१९८२

भावकी उण्याची वाटेकरी, अन् दुसरं काय !! असेच असते. जाऊ ध्या, आपण सगळ्यांनी सगळ्यांच अभिनंदन करू. काय म्हणताय??

In reply to by प्रसाद_१९८२

चालतय की !!! भाजप च्या टांगा ओढ़त बसण्याची ही वेळ नाही आणि वायुसेना चे अभिनंदन करण्या इतपत शाहणपण युवराज मध्ये आलय हे कमी नाही .

In reply to by ट्रम्प

युवराज आणि इतर सगळेच विरोधक अजून धक्क्यातून सावरायचे आहेत. एकदा सावरले की मग विरोधकांच्या खऱ्या प्रतिक्रिया येऊ लागतील, उदा. - - पाकी मीडियाने सांगितल्याप्रमाणे तिथे फक्त झाडे जळाली, एकही अतिरेकी मेला नाही त्यामुळे हा हल्ला अयशस्वी झाला आहे. - किती अतिरेकी मेले याचा काहीच पुरावा नाही. एकदा ० पासून ते ३०० पर्यंत काहीही सांगितला जातोय, यावर कसा विश्वास ठेवायचा? - यात मोदींनी काहीच केलं नाही. - हा हल्ला निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात आला. - मोदी या हल्ल्याचा राजनैतिक फायद्यासाठी वापर करणार/ करत आहेत. - आमच्या काळातही आम्ही असे अनेक हल्ले घडवून आणले, पण आम्ही जाहिरात नाही केली. यातले काही हल्ले एवढे गुपचूप केले की सैन्याला सुद्धा कळले नाहीत. - LoC असे उल्लंघन करणे हे एखाद्या देशाच्या सार्वभौमतेवर हल्ला आहे, इम्रान खानने बोलून प्रश्न सोडवू अशी साद घालूनही लगेच हा हल्ला करण्याचे कारण काय? - हल्ला झाला तेव्हा मोदी आपल्या XX लाखांच्या किंग साईझ बेड वर एसी चे तापमान १८ करून काश्मिरी रजई घेऊन घोरत होते. - १३ दिवस थांबण्याचं काय कारण होतं? या दिवसात सगळ्या विरोधकांनी आणि जनतेने दबाव आणला म्हणून मोदींना काहीतरी कारवाई करायला लागली. पाकी मीडियाने सांगितल्याप्रमाणे तिथे फक्त झाडे जळाली, एकही अतिरेकी मेला नाही त्यामुळे मुद्दामून फार नुकसान होणार नाही अश्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. - हल्ला करणे ठीक आहे पण त्यानंतर होत असलेला जास्तीचा राष्ट्रवाद हा धोकादायक आहे. यातून अल्पसंख्याकांना चुकीचा संदेश जाऊ शकतो आणि तो त्यांना अतिरेकी बनण्यास प्रवृत्त करू शकतो. - आणि शेवटची पण खतरनाक: निवडणुकीत फायदा मिळावा म्हणून मोदी, शहा, डोवाल, आरएसएस यांनी मुद्दामून पुलवामाचा हल्ला घडवून आणला आणि आता जंगलात बॉम्ब टाकून अतिरेकी तळ उध्वस्त केले म्हणून खोटा प्रचार करत आहेत.

भारतीय वायुसेनेचे अभिनंदन! भारताचे अभिनंदन. भारताचे नेतृत्व आणि मागच्या नेतृत्वाने करून ठेवलेल्या चांगल्या गोष्टींसाठी अभिनंदन !

भारतीय वायुसेनेचे अभिनंदन! भारताचे अभिनंदन. भारताचे नेतृत्त्वाचे अभिनंदन ! उरीच्या , पुलवामाच्या वेळेला काही लोकांनी डायरेक्ट अजित डोव्हाल, पंत प्रधान यांच्या बद्दलच प्रश्न प्रस्थापित केलेले की ते असताना असे हल्ले कसे काय होतात ? त्या सर्वांना आता उत्तर मिळाले असेल !! पलिकडे मायबोलीवर सदा न कदा भाजपा, आर एस एस, मोदी विरुद्द दर दिवशी पान अन पान लिहीणारे हात आज फ्रोजन झालेले आहेत. अड्यावर आज आता पर्यंत एक ओळ सुद्धा उमटलेली नाही ! ;-)

In reply to by डँबिस००७

थोडा धीर धरा. मायबोली काय किंवा मिपा काय, सगळीकडे आडवी जाणारी काळी मांजरे आहेतच.चार आठ दिवस जाऊ द्या, मग कळेल.

In reply to by तेजस आठवले

पडद्यामागचे कलाकार -- आज भारतीय वायू सेनेच्या वैमानिकांच्या कौतुक होत असताना वैमानिकांच्या नेतृत्वाबद्दल कोणतीही शंका न बाळगता त्यांच्या बरोबर त्यांचे हात बळकट करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांबद्दल पण आपण कृतज्ञ राहीले पाहिजे. १) गुप्तचर यंत्रणा-- पुलवामाचा हल्ला झालाच कसा? गुप्तचर यंत्रणा काय झोपल्या होत्या? हे उच्चरवाने विचारणाऱ्या आरामखुर्चीत विचारवंतांनि हे समजून घेतले पाहिजे कि आज झालेल्या हल्ल्यातील( तसेच उडी जवळ झालेल्या हल्ल्यातील) दहशतवाद्यांच्या तळाची अचूक माहिती हि लष्कराला पुरवण्याचे काम याच यंत्रणेने केलेले आहे. या माहितीवरच या हल्ल्याची तयारी आणि प्रत्यक्ष कार्यवाही करता आली. २) आकाशातील तिसरा नेत्र पुरवण्याचे काम करणारे इसरो चे आणि इतर अनेक सरकारी यंत्रणांचे शास्त्रज्ञ. यांनी निर्मिती केलेल्या उपग्रहातून मिळणाऱ्या माहिती नुसार आणि त्यांनी पुरवलेल्या संदेश वहनप्रणालीमुळे वायुदलाच्या काम सोपे झाले. https://en.wikipedia.org/wiki/RISAT-2 https://www.indiatoday.in/science/story/isro-launches-communication-sat… वायुदलाच्या वैमानिकांबरोबर अशा अनेक पडद्या मागच्या कलाकारांना मनापासून मानाचा मुजरा

In reply to by सुबोध खरे

वायुदलाच्या वैमानिकांबरोबर अशा अनेक पडद्या मागच्या कलाकारांना मनापासून मानाचा मुजरा
+++++१११११११

In reply to by सुबोध खरे

निर्णय घेणाऱ्यांपासून ते प्रत्यक्ष कारवाई करणारे तसेच त्यांना पडद्याआडून साथ देणाऱ्या सर्वांना मानाचा मुजरा. आज असल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्यांना खरी श्रद्धांजली वाहिली गेली.

How's the JOSH ? High Sir !!! How's the Jaish !! Dead Sir !!

ये तो सीर्फ झाकी है

चीनची काही प्रतिक्रिया ? चीनचीच जास्त भीती आहे खरं तर. राहून राहून असं वाटतंय की जर्जर झालेल्या पाकिस्तानला उचकावुन आणि मोक्याच्या क्षणाला त्यांची साथ सोडून देऊन चीन योग्य क्षणांची वाट पाहील आणि पाकिस्तानचा खऱ्या अर्थाने घास घेईल.आपल्या हातात फारसे काही पडणार नाही.

माहित नाही भविष्यात पाकिस्तान क़ाय प्रत्युत्तर देईल , पण पंतप्रधान पदाची स्वप्ने बघणाऱ्या सगळ्या रथी महारथी नां हादरा नक्की बसला आहे . कित्तेक जण अजूण त्या धकक्यातून सावरले नसल्या मुळे मीडिया ला चुकवत आहेत

सर्जिकल स्ट्राईक २ च्या मागे २०० तासाची प्लॅनिंग होती !! वेगवेगळ्या विमानतळावरुन एकाच वेळेला अनेक फायटर प्लेन्सनी आकाशात झेप घेतली !! ही विमाने वेगवेगळ्या दिशेने गेली त्यामुळे पाकिस्तानात रडारवर नजर ठेउन असलेल्या डिफेंस टिमला लक्षात येण्याच्या आत १२ मिराज विमानांनी आपल फॉर्मेशन बनवल आणि LOC जवळ पोहोचले ! भारताच्या ह्या विमानांनी आपली जवाबदारी पुर्ण करुन परत असताना पाकिस्तानच्या F-16 नी वाट अडवायचा प्रयत्न केला पण १२ मिराज विमानांचा ताफा बघितल्यावर F-16 परत गेले !!

इथे काहि नमुने आहेत चांगल केल त्याला चांगल तर म्हणत नाहित वर नाक कापुन अवलक्षण करत आहेत दळभद्रि लेकाचे

नगरीनिरंजन,
माझ्या मते जळालेली प्रेतं घटनास्थळावरुन केवळ द्वेषाचे राजकारण करण्यासाठी आपल्या शहरात* वाहून नेणार्‍या व्यक्तीची
द्वेषाचं राजकारण खेळायचंहोतं तर मोदींनी दंगली अवघ्या ७२ तासांत कशा काय आटोक्यात आणल्या? गुजरात दंगलींचा पूर्वेतिहास पाहता दंगली किमान आठवडाभर तरी चालायला हव्या होत्या ना? १९६९ च्या दंगली सप्टेंबर-ऑक्टोबर अशा चालू होत्या. १९८५ च्या दंगली तर चक्क ८ महिने (फेब्रुवारी ते ऑक्टोबर) चालू होत्या. पण ३ दिवसांत आटोक्यात आणणारे मोदी मात्र मुस्लिमद्वेष्टे! तुम्हाला काय वाटतं खरं सांगा, मोदी जर खरोखर मुस्लिमद्वेष्टे असते तर गुजरातच्या २६ च्या २६ लोकसभा जागा भाजपला कशा मिळाल्या असत्या? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गा मा जी.. एकदम बरोबर.. सुप्रीम कोर्ट, SIT, CBI इ सर्वांनी पूर्ण चौकशी करून.. जरी मोदीजींना निर्दोष ठरवले असले तरी यांच्या डोक्यातून 2002 जाणार नाही. ज्या पद्धतशीर पणे मोदिंना विनाकारण बदनाम केले गेले आणि अजूनही करतायेत ते निश्चितच चिंताजनक आहे.. पण याउलट खांग्रेस चे जे जे मान्यवर आज जामिनावर फिरतायेत ते कोणतीही चौकशी होण्याआधीच *निर्दोष * असतात. आणि बरेच मान्यवर चौकशी न होता निर्दोष म्हणून मेले.. नंतर त्यांना भारतरत्न दिले गेले आणि गल्ली ते दिल्ली स्मारके बांधली गेली..

In reply to by बाप्पू

निर्दोष व निरागस ते आहेतच हो, पण प्रेते इकडून तिकडे नेणे गुन्हा नाहीय ना; त्यामुळे त्याचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आहे. प्रेते अहमदाबादला नेली गेली ह्यात दुमत नाही. त्यात मोदी दोषी किंवा निर्दोष असण्याचा प्रश्न कुठे येतो? शिवाय त्यांनाही भारतरत्न मिळणारच आहे. थंड घ्या. द्वेषाचे राजकारण करायला स्वतः हिंसाचाराचे दोषी असावे लागत नाही.

In reply to by नगरीनिरंजन

शिवाय त्यांनाही भारतरत्न मिळणारच आहे फरक ईथेच आहे, भारताचा पहीला भारत रत्न नेहरुंना मिळालेला होता , नव्हे तो त्यांनी स्वतःच स्वतःला दिलेला होता. भारत रत्न पंत प्रधानांकडुन प्रस्तावित होत असतो. नेहरूंना भारत रत्न मिळताना ते स्वतःच भारताचे पहीले पंत प्रधान होते !! श्री मोदीजींना भारत रत्न मिळेलच, शंकाच नाही !! पण तो त्यांच्या पंत प्रधान पदी असताना नाही तर त्यांच्या नंतर येणार्या पंत प्रधानाला द्यावा लागेल.

In reply to by डँबिस००७

>>>भारताचा पहीला भारत रत्न नेहरुंना मिळालेला होता याला काही आधार? कारण माझ्या माहितीत तरी पहिले भारतरत्न १९५४ साली सर्वपल्लि राधाकृष्णन, सी व्ही रामन आणि सी राजगोपालाचारी यांना दिले गेले होते. नेहरुंना भारतरत्न १९५५ साली मिळाले. >>>नव्हे तो त्यांनी स्वतःच स्वतःला दिलेला होता. हे आपले मत कि आपला दावा? दोन्ही परिस्थीतींमधे काही सबळ कारण गरजेचे असावे. खास करून तत्कालिन राष्ट्रपतींचे या विषयी अधिकृत मत उपलब्ध असताना त्याविरोधातल्या मताला मजबूत कारणाची गरज असावी. >>>भारत रत्न पंत प्रधानांकडुन प्रस्तावित होत असतो. याचाही कायदा किंवा नियमाची लिंक दिलीत तर फार बरे होईल. नाही म्हणजे एखाद्या प्रक्रियेची प्रथा आणि प्रक्रियेचा नियम/कायदा या दोन वेगळ्या गोष्टी असतात.

In reply to by थॉर माणूस

म्हणजे भारतरत्न देण्याच्या प्रक्रियेत अजिबात हस्तक्षेप करता येत नाही तर! मग मोदींना भारतरत्न जर मिळालेच तर कोणाला वाईट वाटायला नको आणि त्यांनी हस्तक्षेप करून स्वतःला घेतलं असा आरोपही नको. काय म्हणता?

In reply to by ट्रेड मार्क

हरकत नाही... राष्ट्रपती स्वतः प्रोसीजर ओव्हरराईड करून एखादे नाव सुचवू शकतात. तसे झाल्यास मोदीजींना देखील आत्ता भारतरत्न मिळू शकतो, आणि त्यात नियमांची पायमल्ली सुद्धा होणार नाही. पुर्वी दिलेल्या भारतरत्न पुरस्कारांविषयी खोटी माहिती पसरवण्यापेक्षा चांगले आहे.

In reply to by थॉर माणूस

नेहरुंना भारत रत्न कस मिळाल हे तुम्हाला माहिती असेल तर आम्हाला सांगुन आमच्या गैरसमजुती काढुन टाकाच !! राष्ट्रपतीकडुन वाट वाकडी करुन भारत रत्न घेण्याचा प्रयत्न मोदीजीं करणार नाहीत ह्याची खात्री आम्हाला आहे !! तुमच्या मते, पं नेहरु ईतके भारत रत्न पुरस्काराला योग्य व्यक्तीमत्व ईतर कोणीही नसाव कदाचीत !!

In reply to by थॉर माणूस

भारत रत्न : The Bharat Ratna award was established in the year 1954.The recommendations for the Bharat Ratna are made by the Prime Minister to the President, with a maximum of three nominees being awarded per year. भारत रत्न पुरस्कार हा पंत प्रधानांकडुन प्रस्तावित केला जातो राष्ट्रपतीकडुन नाही , जरी तत्कालीन राष्ट्रपतीकडुन पं नेहरुंना भारत रत्न पुरस्कार प्रस्तावित केला गेला होता तर त्या मागे नेहरुंच प्रेशर होत कारण ते काम राष्ट्रपतीच नव्हतच !!

In reply to by डँबिस००७

थॉर माणसांना असं डायरेक्ट कोणी खोडून काढतं का? तरी बरं त्यांना तुम्ही सरदार पटेलना भारत रत्न द्यायला १९९१ साल का उजाडायला लागलं? स्वातंत्र्यलढ्यातील इतर नेत्यांना भारत रत्न का दिलं नाही किंवा उशिरा दिलं गेलं? असे प्रश्न विचारले नाहीत. बघू आता काय उत्तर देतात.

In reply to by ट्रेड मार्क

त्यांनी काही शंका विचारल्या भंकस यांच्या पोस्ट वर तर ते चुकीचं नव्हतं. कारण भंकस यांच्या पोस्ट मध्ये जे दावे केलेत ते शंकास्पद वाटतात. त्याच्या काही लिंक दिल्या तर बरं होईल, उगाच त्यांना टार्गेट करणं बरोबर नाही. प्रूफ देऊन तोंड बंद करायचं टार्गेट करून नाही. ट्रेड मार्क तुमच्या पोस्ट चांगल्या असतात, तुमच्याकडून हे अपेक्षित नाही.

In reply to by शलभ

कधीकधी या फक्त विरोधासाठी विरोध किंवा फक्त मोदींना विरोध करणाऱ्यांना समजवायचा कंटाळा येतो. तरीही तुम्ही म्हणालात तसं अगदी वस्तुनिष्ठपाने बघायचं झालं तर - थोर माणूस यांच्या प्रतिसादातील मुद्दे/ प्रश्न बघू. पहिले भारतरत्न १९५४ साली सर्वपल्लि राधाकृष्णन, सी व्ही रामन आणि सी राजगोपालाचारी यांना दिले गेले होते. नेहरुंना भारतरत्न १९५५ साली मिळाले. हा मुद्दा बरोबर आहे. नेहरूंनी स्वतःलाच दिला का? तर याचे उत्तर डॅम्बीस००७ यांनी दिलेले आहे. पंतप्रधान कोणाला भारत रत्न द्यायचे याची शिफारस राष्ट्रपतींकडे करतात आणि मग ते दिले जाते. तसेही पारंपारिकरित्या भारतात राष्ट्रपतीपद हे नामधारी आहे. काही पॉवर्स आहेत पण एकूण पंतप्रधानपद हे जास्त पॉवरफुल वाटते. पवार सुद्धा राष्ट्रपती बनण्याऐवजी पंतप्रधान बनायचे प्रयत्न करतात यावरून काय ते समजून जा. नाही म्हणजे एखाद्या प्रक्रियेची प्रथा आणि प्रक्रियेचा नियम/कायदा या दोन वेगळ्या गोष्टी असतात. भारत रत्न देण्यासाठी काही कायदा आहे असं वाटत नाही. त्यात वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत उदा. सुरुवातीच्या काळात मृत्यूनंतर देत नव्हते, पण शास्त्रीजींना १९६६ साली मृत्यूनंतर देण्यात आला. तसेच खेळाडूंना देत नव्हते पण कालांतराने त्यात बदल करून सचिन तेंडुलकरला देण्यात आला. पण निदान या चर्चेपुरता कळीचा मुद्दा हा आहे की नेहरू पंतप्रधान असताना त्यांनीच स्वतःच्या नावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आणि मग नेहरूंना का पुरस्कार देण्यात आला. माझ्या मते त्यांना देण्यातही काही अडचण नसावी फक्त वादाचा मुद्दा हा आहे की त्यांनी स्वतःच स्वतःची शिफारस का करावी? कुठलाही पुरस्कार अथवा सन्मान दुसर्याने आपणहून देणे जास्त महत्वाचे आणि मानाचे असते. आपणच आपल्याला गौरवून घेण्यात काय गंमत आहे? अजून एक म्हणजे नगरीनिरंजन यांनी मोदींना भारत रत्न देण्यासंबंधी खोचक टिपण्णी केली आहे. ज्यांची फारशी नावे पण ऐकली नाहीयेत किंवा ज्यांचे भरीव कार्य पटकन सांगता पण येणार नाही अश्यांना पण हा पुरस्कार दिला आहे. मग समर्थक आणि विरोधक ज्यांचा सतत जप करत आहेत अश्या मोदींना दिला गेला तर का वाईट वाटावे? आणि ते पण देण्याच्या आधीच?

In reply to by नगरीनिरंजन

माझ्या मते जळालेली प्रेतं घटनास्थळावरुन केवळ द्वेषाचे राजकारण करण्यासाठी आपल्या शहरात* वाहून नेणार्‍या व्यक्तीची बाजू घेऊन वर दुसर्‍याला द्वेष करतो असे म्हणणारे खरे दुटप्पी. ज्या कारसेवकांचा त्यात मृत्यू झाला ते काही गोध्र्याचे स्थानिक नव्हते तर त्यातले बहुतांशी अहमदाबाद व आसपासच्या भागातले होते. या मृतांचे नातेवाईक अहमदाबाद मध्येच होते आणि आधीच दंगल पेटलेल्या गोध्र्याला या नातेवाईकांना आणणे कितपत शहाणपणाचे होते? गोध्र्यात आधीच दंगल चालू झाल्याने ही जळालेली प्रेते तिथे ठेवणे पण शक्य नव्हते. मग यांचं काय करायला पाहिजे होतं असं तुम्हाला वाटतं? तशीच घटनास्थळी ठेऊन द्यायची? तसेच हे मृतदेह पहाटे ३.३० ला पश्चिम अहमदाबाद मधील एका सिव्हिल हॉस्पिटल मध्ये आणले गेले. पश्चिम अहमदाबाद मध्ये मुस्लिम लोकसंख्या नगण्य आहे. त्यामुळे सगळे झोपलेले असताना अजिबात गाजावाजा न करता दूरच्या एका सिव्हिल हॉस्पिटल मध्ये मृतदेह आणणे हे योग्य होते. जर मोदींना दंगल भडकवायचीच असती तर दिवस उजेडी गाजवाजा करत हे मृतदेह आणले असते. दुसरी गोष्ट म्हणजे "आपल्या शहरात" याचा अर्थ काय? गुजराथची राजधानी गांधीनगर असून मुख्यमंत्र्यांचे ऑफिस व निवासस्थान गांधीनगरमध्येच आहे. मोदींचे जन्मस्थान वडनगर हे मेहसाणा जिल्ह्यात असून ते अहमदाबादपासून १०० किमी दूर आहे. म्हणजेच अहमदाबाद मोदींचे आपले शहर कसे काय होऊ शकते? याचे स्पष्टीकरण द्याल का? पण प्रेते इकडून तिकडे नेणे गुन्हा नाहीय ना; त्यामुळे त्याचे व्यवस्थित डॉक्युमेंटेशन आहे. असणारच ना? जर मनात काळेबेरे असते तर लपूनछपून केलं असतं. बाकी तुम्हाला मोदी द्वेषाचे राजकारण करतात हे पुराव्यासहित सिद्ध करता येईल का?

In reply to by बाप्पू

वा बाप्पू वा! स्वत: मोदीभक्त म्हणतात तेव्हा जग डोळे मिटून बसलेलं असतं असं नाही. ह्या व्हिडिओत पाहा. गुजरातचा “किस्सा” परत एकदा घडवा म्हणताहेत भक्त लोक. तेही लंडनमधले “शिकलेले”. हे तुम्हाला चिंताजानक वाटणार नाही कारण तुमच्या डोक्यात काय आहे तेही उघड गुपित आहे. https://www.facebook.com/2481865895172491/posts/3044861948872880?sfns=mo

In reply to by नगरीनिरंजन

ह्या व्हिडिओमध्ये असलेली व्यक्ती ही मोदीभक्तच याचा काय पुरावा आहे?

In reply to by ट्रेड मार्क

बरं, तिथल्या देशभक्तांपैकी कोणीही त्या वाक्यावर आश्चर्य किंवा आक्षेप व्यक्त केला नाही म्हणजे लोकांना काय आहे ते माहित आहे इतकाच त्याचा अर्थ. तुम्ही पुरावा मागायची आणि कोणी तो द्यायची गरज नाही.

In reply to by नगरीनिरंजन

दीड मिनिटाच्या व्हिडिओमध्ये त्याने पटकन एक वाक्य म्हणले आणि त्यावर कोणीच काहीच बोलले नाहीये. म्हणजे ना कोणी समर्थन केले ना कोणी विरोध केला. तर तुम्हाला म्हणायचं आहे की कोणी विरोध केला नाही म्हणजे बाकीच्यांना ते मान्य आहे? किती पटकन तुम्ही निष्कर्ष काढून मोकळे झालात. कदाचित रॅपिड फायर सारखं होत असल्याने कोणाला रिऍक्ट करायला वेळ मिळाला नसेल. बाकी गुजराथ मध्ये २००२ पूर्वी सारख्या धार्मिक दंगली व्हायच्या पण २००२ नंतर मात्र एकही झाली नाही हे विचार करण्यासारखं आहे ना? असं होण्याचं काय कारण असावं बरं? बरं २००२ नंतर सगळे मुसलमान गुजराथ मधून पळाले असं पण नाहीये, मग एकदम काय झालं असावं बरं?

In reply to by नगरीनिरंजन

अहो ते फक्त दुसर्‍याला पुरावे मागतात. निव्वळ थापेबाजी आणि खोटेपणाचा ट्रेडमार्क.

In reply to by ट्रेड मार्क

अरे मित्रा ते उर्दू भाषा पाकिस्तानला कधी दिली याचे पुरावे मिळाले की नाही? तैमूरचे गोडवे कुठे गायलेत हे कधी सांगणार आहेस? दुसऱ्यांना पुरावे विचारण्यापूर्वी तुझ्या थापेबाजी आणि खोटेपणाचा ट्रेडमार्क कधी बंद करणार?

In reply to by आजानुकर्ण

मी इथे तुम्हाला काही प्रश्न विचारलेत त्यापैकी एकाचेही उत्तर दिले नाहीयेत. एवढंच नव्हे तर तुमचा एकही प्रतिसाद मुद्देसूद सुद्धा नाहीये आणि तुम्ही मला कसले पुरावे मागताय. तुम्हाला माझे पुराव्यांसकट दिलेले प्रतिसाद हास्यास्पद वाटतात यावरूनच काय ते समजून जा. तुमची आकलनशक्तीच नव्हे तर एखादा विषय घेऊन त्यावर संशोधन करण्याची आणि तो नीट मुद्देसूद मांडण्याची शक्ती जरा कमी आहे हे वारंवार सिद्ध कशाला करताय? उर्दू भाषा उर्दू ही पूर्वीच्या हिंदुस्थानमधील एक भाषा होती. जरी ६ ते १३ व्या शतकादरम्यान ही भाषा संस्कृत आणि प्राकृत पासून डेव्हलप झाली असली तरी नंतर त्यात बरेच पर्शियन आणि अरेबिक शब्द आले. त्यामुळे आता बहुतेक उर्दू शब्द पर्शियन आणि अरेबिक आहेत. अरेबिक प्रभावामुळे ही भाषा मुख्यत्वे हिंदुस्थानातील मुसलमान लोकांनी आपली मानली. नंतर जेव्हा फाळणी झाली तेव्हा खरं तर मुस्लिमांसाठी दुसरा देश पाहिजे अशी मुख्य मागणी होती. पण त्यावेळेसच्या काही महत्वाच्या नेत्यांच्या बोटचेपेपणामुळे फाळणीमध्ये बराच गोंधळ झाला आणि त्यामुळे झालेले परिणाम आपल्या समोर आहेत. उर्दू ही पाकिस्तानची पण राष्ट्रीय भाषा आहे. म्हणजेच पाकिस्तानने ती त्यांची भाषा म्हणून स्वीकारली आहे. परंतु अजूनही भारतात ही वापरली जाते कारण भारतात मुस्लिम लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. माझा प्रश्न आहे की जर फाळणी मुसलमानांसाठी एक वेगळं राष्ट्र हवं म्हणून झाली तर मुस्लिमांसकट ती भाषा पण का दिली नाही? परत एक प्रयोग करून बघा - तुम्हाला आणि तुमच्या नात्यातल्या व ओळखीतल्या किती लोकांना उर्दू भाषा चांगली लिहितावाचता येते? किती हिंदूंना हिंदीइतकीच चांगली उर्दू लिहितावाचता येते? लिहिण्यावाचण्याचं जाऊद्या निदान समजते तरी? हे प्रश्न विचारा. मी काही दिवसांपूर्वी एका प्रतिसादात हिंदी चित्रपटसृष्टीमधील उर्दू आक्रमणाबद्दल लिहिलं होतं. जी उर्दूमिश्रित गाणी असतात त्यातल्या किती शब्दांचा अर्थ किती हिंदू प्रेक्षकांना कळतो? आफरीन, रशक-ए-कमर, बा-दस्तूर, शिद्दत, हयात, मायस्सार, पेहलू असे शब्द किंवा इब्देताये इष्क मे (१९६२), जिहाल-ए-मिस्कीन (१९८५) पासून ते जेहानसीब (२०१४) अशी कितीतरी हिंदी चित्रपटांतील गाणी आहेत ज्यांचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? हे प्रश्न विचारा.

In reply to by ट्रेड मार्क

अरे बाबा, तू दावा केला होतास की तैमूर आणि औरंगजेब यांचे गोडवे गातात, त्याला तू काय पुरावा दिला आहेस? तू खोटे बोलून काहीही प्रश्न विचारशील. त्यांची काय उत्तरं द्यायची? आधी तू जे दावे करतोय ते खरे आहेत ते तर दिसू दे.
परंतु अजूनही भारतात ही वापरली जाते कारण भारतात मुस्लिम लोकसंख्या बऱ्यापैकी आहे. माझा प्रश्न आहे की जर फाळणी मुसलमानांसाठी एक वेगळं राष्ट्र हवं म्हणून झाली तर मुस्लिमांसकट ती भाषा पण का दिली नाही?
आता इथे हसू की रडू? एक भाषा अनेक ठिकाणी वापरता येत नाही ही नवी कुजबूज आहे की काय? बांग्लादेशाची निर्मिती खास बंगाली भाषेसाठी झाली. मग आता बंगाली सोडून द्यायची का? काश्मीरमध्ये मुस्लीम लोकसंख्या बर्‍यापैकी आहे, ते देऊया का?
तुम्हाला आणि तुमच्या नात्यातल्या व ओळखीतल्या किती लोकांना उर्दू भाषा चांगली लिहितावाचता येते? किती हिंदूंना हिंदीइतकीच चांगली उर्दू लिहितावाचता येते? लिहिण्यावाचण्याचं जाऊद्या निदान समजते तरी? हे प्रश्न विचारा.
अरे बाबा, हिंदूंना ऊर्दू यायला पाहिजे हे कोणी सांगितले? बहुतेक हिंदूंना तमिळ येत नाही, तेलुगू येत नाही, मराठी येत नाही, माझ्या ओळखीतल्या एकाही हिंदूला संस्कृत येत नाही. तुला किती चांगली संस्कृत येते रे? भारताच्या राज्यघटनेतील उर्दू ही एक शेड्यूल्ड भाषा आहे. राजकीय स्वार्थासाठी निदान राज्यघटनेचा अपमान करण्याचे देशद्रोही पाप करू नकोस.
उर्दू ही पूर्वीच्या हिंदुस्थानमधील एक भाषा होती. जरी ६ ते १३ व्या शतकादरम्यान ही भाषा संस्कृत आणि प्राकृत पासून डेव्हलप झाली असली तरी नंतर त्यात बरेच पर्शियन आणि अरेबिक शब्द आले. त्यामुळे आता बहुतेक उर्दू शब्द पर्शियन आणि अरेबिक आहेत.
?? मग काय झालं? मराठी भाषेत अनेक शब्द अरबी-फारशी आहेत. तुझा दावा उर्दू भाषा पाकिस्तानला दिली हा होता. ती कधी दिली तेवढे सांग नाहीतर थापेबाजी आणि खोटेपणाचा ट्रेडमार्क बंद कर. अफवा पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणार्‍या तुझ्यासारख्या देशद्रोही लोकांना जसा वेळ मिळेल तसे उत्तर दिले जाईल.
कितीतरी हिंदी चित्रपटांतील गाणी आहेत ज्यांचा अर्थ तुम्ही सांगू शकाल का? हे प्रश्न विचारा
ही गाणी तुला कळत नाही हा तुझ्या आकलनशक्तीच्या मर्यादेचे प्रश्न आहे. तुझ्यासारख्यांसाठी 'सी ए टी कॅट, कॅट माने बिल्ली', 'मी बाबूराव बोलतोय' वगैरे सोपी गाणीही आहेत. ती एेक.

In reply to by आजानुकर्ण

स्वतःला कोण समजतोस? आपली काही ओळख नसताना, मी कोण आहे ते माहित नसताना अरेतुरे का करतोस? आणि मला देशद्रोही म्हणणारा तू कोण? मी उर्दू आपली भाषा नाही म्हणलं, मुघल, टिपू, तैमूर ई वर टीका केली म्हणल्यावर शेपटीवर पाय पडल्यासारखा का केकाटतो आहेस? हिंदूंचा द्वेष करणाऱ्या या मुस्लिम आक्रमकांचे तुला एवढे प्रेम आहे म्हणजेच तू स्वतःच देशद्रोही आहेस हे सिद्ध केलंस. तसंही तुझ्यासारख्यांकडून मुद्देसूद चर्चेची व प्रतिसादांची अपेक्षा नव्हतीच. पण असले प्रतिसाद देऊन स्वतःची लायकी आणि पातळी काय आहे हे दाखवून दिलंस. असो. मला तुझ्याइतकी पातळी सोडून विचार करता येत नाही आणि खुल्या संस्थळावम, संस्थळाच्या एका सभासदांबद्दल तर असे अजिबात लिहिता येत नाही. अगदी इस्लामी आक्रमक तुला प्रचंड आवडत असले तर मी त्यांची वाईट बाजू पुराव्यांसहीत मांडत असताना त्यांची चांगली बाजू तुला का मांडता आली नाही? मी समाजात फूट पाडण्याचा काय प्रयत्न केला हे सिद्ध कर नाहीतर आपले शब्द मागे घे. स्वतःचे प्रतिसाद एकदा तरी नीट वाचून बघावेत. बांगलादेशची निर्मिती खास बंगाली भाषेसाठी झाली हा तुझा दावा सिद्ध कर. काश्मीरमध्ये मुस्लीम लोकसंख्या बर्‍यापैकी आहे, ते देऊया का? अच्छा आता कुठे तुझ्या मनात खरं काय आहे ते बाहेर येतंय. काश्मीरमध्ये मुस्लीम लोकसंख्या बर्‍यापैकी आहे याचे कारण काय आहे? काश्मिरी हिंदूंना तिथून हुसकून लावण्यात आले त्यामुळे मुस्लिमांची संख्या वाढली आहे. अरे बाबा, हिंदूंना ऊर्दू यायला पाहिजे हे कोणी सांगितले? बहुतेक हिंदूंना तमिळ येत नाही, तेलुगू येत नाही, मराठी येत नाही, माझ्या ओळखीतल्या एकाही हिंदूला संस्कृत येत नाही. तुला किती चांगली संस्कृत येते रे? भारताच्या राज्यघटनेतील उर्दू ही एक शेड्यूल्ड भाषा आहे. अरे मूढा, एवढ्या वेळा सांगूनही समजलं नाही? मराठी भाषा मराठी लोकांची आहे, तामिळ भाषा तामिळींची आहे तशी उर्दू कोणाची आहे? मुसलमानांची ना? मग त्यांच्यासाठी जर हिंदुस्थानचा तुकडा करून वेगळे राष्ट्र केले गेले तर लोकांसकट त्यांच्याशी निगडित सगळं दिलं पाहिजे ना? उर्दू ही पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे तशी मराठी, तामिळ, तेलगू कोणत्या राष्ट्राची राष्ट्रभाषा आहे का? जर तुझ्या म्हणण्याप्रमाणे उर्दू पाकिस्तानला दिली नाही तर तो अजूनच मोठा प्रॉब्लेम आहे, कारण आता सध्या लोकांना आपल्या मातृभाषेपेक्षा उर्दू शब्द जास्त माहित आहेत. भारताच्या राज्यघटनेतील उर्दू ही एक शेड्यूल्ड भाषा आहे. अरे बाबा मग तोच तर प्रॉब्लेम आहे ना. संस्कृत ही पण एक भारताच्या राज्यघटनेतील शेड्यूल्ड भाषा आहे. हिंदू संस्कृतीची पारंपरिक भाषा असूनही त्याला महत्व दिले जात नाही, नीट शिकवली जात नाही. मराठी भाषेत अनेक शब्द अरबी-फारशी आहेत. हे मान्य आहे ना? मराठीत पहिल्यापासून अरबी आणि फारसी शब्द होते का? म्हणजेच हे सिद्ध होतंय की या लोकांचे/ भाषांचे आपल्या भाषेवर आक्रमण झाले. राजकीय स्वार्थासाठी निदान राज्यघटनेचा अपमान करण्याचे देशद्रोही पाप करू नकोस. कुठला राजकीय स्वार्थ? इथे राजकारणाची चर्चा चाललीच नाहीये. माझ्या यासंबंधीच्या प्रतिसादात कुठेही भाजप, काँग्रेस वगैरे आलेत का? तुझ्या डोक्यात जर ते असेल तर ते तुझ्याकडे ठेव. माझे इथले प्रतिसाद फक्त मुस्लिम आक्रमकांनी पूर्वीपासून हिंदूंवर कसे अत्याचार केले आणि आता सुद्धा मुस्लिम लोक हिंदूंना (नव्हे इतर सर्व धर्मियांना) कसे वागवत आहेत यावर आहेत. राज्यघटनेचा अपमान मी कुठे केला? पण उर्दू भाषा जी पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे अश्या भाषेला भारतात शेड्यूल्ड भाषेचा दर्जा का दिला गेला हा प्रश्न उरतोच. तैमूरबद्दल म्हणायचं झालं तर मला शाळेत एक धडा होता ज्यात तैमूर किती शूर होता वगैरे होतं. बाकी मी जी पुस्तकं वाचली त्यातही तैमुरचे वर्णन शरीराची एक बाजू अधू असूनही कसा शूर योद्धा होता असेच होते. त्याने हिंदूंवर केलेल्या अत्याचाराचे वर्णन असलेले पुस्तक दाखव. औरंगजेबाचे गोडवे भारतात गायले जात नाहीत? यावरूनच सिद्ध होतंय की किती झापडं लावली आहेस. परत हिटलरचं उदाहरण घेऊ. त्याने ज्यूंवर अत्याचार केले त्यामुळे ज्यू लोकांसमोर त्याचे नाव सुद्धा घेतलेलं चालत नाही. एवढंच नव्हे तर हिटलर ज्या देशाचा होता त्या जर्मनीत सुद्धा हिटलरचं नाव चांगल्या अर्थानं घेतलं जात नाही. पण भारतात मात्र ज्या औरंगजेबाने हिंदूंवर इतके अत्याचार केले त्याच्या नावाने देशाच्या राजधानीत मुख्य रस्ता आहे. महाराष्ट्रात त्याचे नाव असलेले एक शहर आहे तसेच त्याचे थडगे पण खुलताबाद येथे आहे आणि लोक तिथे जाऊन माथा पण टेकून येतात. औरंगजेब किती चांगला होता हे शिकवले जाते. का त्याने हिंदूंवर किती अत्याचार केले हे शिकवले जात नाही? मुस्लिम आक्रमकांनी आपली देवळे नेस्तनाबूत केली, सांस्कृतिक हानी केली हे का शिकवलं जात नाही? ही गाणी तुला कळत नाही हा तुझ्या आकलनशक्तीच्या मर्यादेचे प्रश्न आहे. मी मदरशात शिकलो नसल्याने मला नाही कळत या शब्दांचे अर्थ, तुला कळतात तर सांग ना. एकूण तुझ्या सर्व प्रतिसादांमधून हेच अधोरेखित होतंय की तुला फक्त इतरांना नावं ठेवता येतात. कुठल्याच प्रतिसादात मुद्देसूद प्रतिवाद, उदाहरणे वा पुरावे नाहीयेत कारण एकूण अभ्यास कमी आहे. त्यामुळे मग इतरांना लेबलं लावतोस कारण स्वतःचे अज्ञान झाकायचे आहे. मी काय खोटेपणा केला हे सिद्ध कर नाहीतर गप्प बस. माझ्या सर्व प्रतिसादांमधून मी बरेच मुद्दे मांडलेले आहेत आणि प्रश्नही विचारले आहेत. तू फक्त तैमूर आणि उर्दूला चिकटून बसला आहेस. त्यावरूनच सिद्ध होतंय की तुला प्रतिवाद करता येत नाहीये.

In reply to by आजानुकर्ण

उर्दु ही पाकिस्तानची राज्य भाषा आहे. तिथल्या ३/४ जनतेची भाषा ही सिंधी व पंजाबी आहे. पाकिस्तान मध्ये हिंदु द्वेष हा लहान पणा पासुन शिकवला जातो, संस्काराचाच तो एक भाग आहे. ईथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे. पाकिस्तान निर्माण कोणी केला ? पाकिस्तान निर्माण केला मुस्लिम लिगच्या लोकांनी . जेंव्हा १९४६ -४७ साली निवडणुका झाल्या त्यावेळेला दोन पक्ष होते. काँग्रेस व दुसरा मुस्लिम लीग . मुस्लिम लीगला सपोर्ट करणारे जास्तीत जास्त लोक हे उत्तर प्रदेश, बिहार मधले नवाब व त्यांचे नोकरदार लोक होते. त्यांना देशावर रा ज्य कराय चे डोहाळे लागलेले होते. भारतावर सुशिक्षीत हिदु राज्य करणार आणी अश्या काफिर हिंदुच्या हाताखाली रहायच पचनी पडत नव्हत म्हणुन त्यांनी वेगळ्या देशाची मागणी केली व देशाची फाळणी झाली. मुळात पाकिस्तान बनला सिंध, पंजाब व बलुचीस्तानच्या भाग घेऊन. ह्या बलुचीस्तान हा वेगळा देश होता. सिंधु प्रदेश व पंजा ब मध्ये मुस्लिम जन संख्या विषेश नव्हती व मुस्लिम लीगला जनाधार नव्हता. सिंध मध्ये सिधी तर पंजाब मध्ये पंजाबी बोलली जायची. उर्दुला त्यावेळच्या समाजात स्थान नव्हत. जेंव्हा पाकिस्तान बनला तेंव्हा ईथले उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहार मधले मुसलमान भारत देश सोडुन पाकिस्तानात जाऊन राहीले. मुळात पाकिस्तानच्या हिंदु द्वेषाच मुळ ईथे आहे. ह्या स्थलांतरीत लोकांनी पाकिस्तानात प्रवेशच सरकार स्थापन करायच्या महत्वाकांक्षेने केलेला असल्याने भराभर ह्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व बिहारच्या उर्दु भाषीक लोकांनी सरकारातल्या महत्वाच्या जागा भरल्या व महत्च्वाचे निर्णय घेतले. पाकिस्तानची राज्य भाषा ही उर्दु का झाली हे त्याच महत्वाच कारण आहे. पण पंजाब मधल्या दणकट लोकांचे मनोधर्य खचण्यासाठी पंजाबी व सिंधी भाषेला बँन करण्यात आले. पंजाबी व सिंधी लोकांनी त्याच्या मायबोलीत बोलण मुश्किल झाल.