Skip to main content

काथ्याकुट

पाभे की बात १

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 11/05/2026 20:41 या दिवशी प्रकाशित केले.

पाभे की बात १

मितरों,

कालच मी जवळपास एक किलो च्या आसपास सोने घेण्यास भाजीच्या पिशवीसहीत निघालो​ होतो. आपण बाबा पर्यावरण, देश, प्रदूषण इत्यादी बाबतीत फार जागरूक असतो. बिअरच्या बाटल्याही हॉटेलातून घरी घेऊन सकाळी भंगारात देतो. एकदम पर्टीक्यूलर बाबा आपण.

तर तेवढयात पंतप्रधानांनी पेट्रोल वाचवा, सोने घेऊ नका असा उपदेश केला. मग काय, आपण तर पंप्रनांचे एकदम भक्त. सोने घेणे कॅन्सल केले.

तेवढयाच किंमतीची चांदी घेतली अन घरी आलो. भाजी देखील त्याच पिशवीतून आणली.

आपण तर एकदम पर्टीक्यूलर रे बाबा.

भेटूया पुढल्या पाभे की बातेत. 

अवधूत साठे..

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 05/12/2025 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
' अवधूत साठे, ट्रेडिंग ॲकॅडमी' ही सुरेश वाडकर यांनी गायलेली ओळ अल्पावधीतच चांगलीच लोकप्रिय झाली आणि साठे ॲकॅडमी सुद्धा. आज त्यांच्या वरील सेबीने केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. अवधूत साठे ट्रेडिंग ॲकॅडमीवर परवाना न घेता वित्तीय सल्लागार म्हणून संस्था चालवल्याचा आरोप आहे. सामाजिक प्रसार माध्यमांवर अशीही चर्चा सुरू झाली आहे की एका मराठी माणसाने अगदी अल्पावधीतच मिळवलेल्या यशामुळे अमराठी ट्रेडर्स लॉबीने हे कारस्थान रचले आहे जाणकारांनी प्रकाश टाकावा

चालू घडामोडी - घटलेले सरासरी आयुर्मान आणि प्रदूषण

लेखक Pratham यांनी शुक्रवार, 03/09/2021 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
२ दिवसांपूर्वी संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवलानुसार उत्तर भारतातील(दिल्ली, ऊ.प्र.,बिहार,हरयाणा इ) राज्यांतील नागरिकांचे सरासरी आयुर्मान हवा प्रदूषणा मुळे ९ वर्षांनी कमी होत आहे व विविध श्वसनाविषयी आजार होत आहेत. तर महाराष्ट्र, म. प्र.

रोजची आंघोळ करणे

लेखक आंबट चिंच यांनी सोमवार, 07/12/2020 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
खुप दिवसांनी काथ्याकुटा करावासा वाटातोय म्हणुन म्हंटलं धागाच काढावा. मला सांगा तुम्हा सर्वांना रोजची आंघोळ नाही झाली तर काहीतरी चुकल्याचुकल्यासरखं किंवा कसंतरीच वाटंतं का? मला रोजंच पुजाअर्चा करायचीच असतेच असं नाही म्हणजे मी कधी कधी एकदम देवभक्त बनतो आणि चांगलं शुचिर्भुत झाल्यावर मन लावुन पुजा करतो. प्रसन्न वाटतं. तर कधी कधी आठवडाभर करतही नाही. मन का राजा. पण आंघोळ ही रोज केलीच पाहिजे असा माझा अट्टाहास असतो. रोज आपली आन्हिकं वेळच्या वेळी झाली पाहिजे म्हणजे आटोपलं की झालं.

ट्रम्प , ट्विटर , अभिव्यक्ती स्वातंत्र्य , पॉलिटिकल बायस आणि मिसळपाव

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 28/05/2020 13:47 या दिवशी प्रकाशित केले.

संदर्भः

ट्रम्प - नुकतेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ह्यांच्या काही ट्वीट्स वर फॅक्ट चेक मार्क लावला , अर्थात डोनाल्ड् ट्रम्प खोटे बोलत आहेत असे अपरोक्ष पणे सुचवण्याचा प्रयत्न केला. t अर्थातच ह्यावरुन डोनालड ट्रम्प ह्यांनी खालील प्रत्युत्तर दिले आहे : Republicans feel that Social Media Platforms totally silence conservatives voices.

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 02/02/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल.

गलिच्छ नायतर काय?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 07/01/2019 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
रडण्याच्या प्रसंगात डोळ्यात येणारी आंसवं आणि नाकातून येणारं पाणी मोकळ्या हाताच्या तळव्याने पुसणं किंवा स्त्रीयांनी नेसलेल्या साडीच्या मोकळ्या पदराच्या टोकानं नाक आणि डोळे पुसणं किंवा नाकाजवळून जाणार्‍या पदराने नाकातलं पाणी पुसणं अशा प्रकारचे सीन्स टिव्हीवर पहाणं अंमळ गलिच्छ वाटतात. त्या ऐवजी,रुमालाने किंवा टिश्यू पेपरने पुसण्याची क्रिया करणं हे संबंधीत शूट करणार्‍यांना कळत कसं नाही? कां स्वच्छ-अस्वच्छतेची नाहीतरी आमची बोंबाबोंबच! श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया)

आधार कार्ड - अपडेट आणि नेमकी माहिती...

लेखक मोदक यांनी सोमवार, 11/12/2017 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स.. आधार कार्ड काढणे / न काढणे व वेगवेगळ्या ठिकाणी लिंक करणे याची भवती न भवती बरेच दिवस सुरू आहे. ३१ डिसेंबरला आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणे आवश्यक आणि ३१ मार्च पर्यंत मोबाईल सर्विस प्रोव्हायडरला देणे आवश्यक ही बातमी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात ऐकली होती. यानंतर हळूहळू ओला आणि अ‍ॅमेझॉनचेही आधार कार्ड लिंक करा असे मेसेज येऊ लागले. बँक आणि मोबाईलच्या मेसेजला कधीच फाट्यावर मारले आहे.

वाहन खरेदी करतांना

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 31/07/2017 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
वाहन खरेदी करतांना जनरली १ एक्स शोरूम किंमत २ रजिस्ट्रेशन ३ डेपो चार्जेस ४ इन्शुरन्स ह्या सदरांखाली पैसे घेतात १. नुसती एक्स शोरूम पैसे मोजून वाहन खरेदी करता येते का --असे केले तर मुख्य अडचणी आणि मुख्य फायदे काय आहेत ? २ रजिस्ट्रेशन आणि इन्शुरन्स online करतात असे डीलरच म्हणतात मग ते आपणच का करू नये ? --२.a डीलर चा इंश्युरंस आणि आपला इन्शुरन्स ह्यात जवळपास दुपटी चा फरक आढळून आला आहे ३. डेपो चार्जेस ग्राहका कडून वसूल करणे हे नियमात /कायद्यात बसते का ? ते किती असावेत ह्यावर काही नियम / मार्गदर्शक तत्वे आहेत का ? ४.

adv अपर्णा रामतीर्थ आणि स्त्रीमुक्ती

लेखक कोंबडी प्रेमी यांनी शुक्रवार, 21/07/2017 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU हि एक लिंक पाहिली. ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी ....