✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

व
वामन देशमुख यांनी
Sat, 02/02/2019 - 06:45  ·  लेख
लेख
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
542106 वाचन

💬 प्रतिसाद (783)

प्रतिक्रिया

आंतरराष्ट्रिय न्यायालयात

डँबिस००७
Wed, 02/20/2019 - 23:31 नवीन
आंतरराष्ट्रिय न्यायालयात भारताला भारतीय पत्रकारांमुळे जोरदार झटका ! पाकिस्तानात अपहरण करुन भारताचा गुत्पहेर असल्याच्या खोट्या आरोपावर जेल मध्ये खितपत पडलेल्या कुलभुषण जाधव ची केस भारत आंतरराष्ट्रिय न्यायालयात लढत आहे !! मुळचा भारतीय नौदलातुन सेवानिवृृृत्त होउन कुलभुषण जाधव ईराण मध्ये आपल्या बिझनेस साठी गेलेला असताना ISI द्वारे त्याचे अपहरण करण्यात आले होते. कुलभुषण जाधववर गुप्तहेर असल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे व कुलभुषण जाधवला फाशीची सजा सुनावलेली आहे !! आंतरराष्ट्रिय न्यायालयात भारताची बाजु कमकुवत करण्याच महान काम करण थापर नावाच्या तद्दन हलकट पत्रकाराने केलेले आहे !! ह्या थापरने लिहीलेल्या लेखाचा तसेच द वायर, द स्क्रोल सारख्या मिडियातील लेखाचा आधार घेत पाकिस्तानचे वकिल, कुलभुषण जाधवला दोषी ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत !! ह्या कामात त्यांना यश येईल न येईल पण एका निर्दोष व्यक्तीला फासावर लटवण्याच काम मात्र करण थापर व त्याच्या सारख्या अर्बन नक्षल पत्रकारांकडुन झालेल आहे !! अर्बन नक्षली करण थापरला श्री मोदीजींनी गेले १० वर्षे वाळीत टाकले होते !! त्याचा राग करण थापरला आहे ! सरकारला दोष देण्यासाठी करण थापर ह्याने ह्या कुलभुषण यादव वर २०१७ मध्ये पहिला लेख लिहीला !! आपल्या लेखात त्याने लिहिले कि कुलभुषण यादव कडे दोन पासपोर्ट पाकिस्तानी लोकांना मिळाले होते. त्यातला एक पासपोर्ट कुलभुषण यादवच्या स्वतःच्या नावाचा तर दुसरा कोणी मुस्लिम माणसाच्या नावावर !! करण थापरने भारतीय पासपोर्ट अधिकार्यांना ह्या दुसर्या पासपोर्ट बद्यल चौकशी करुन खरच तो पासपोर्ट जाधवला दिला होता का हे सांगायला सांगितले होते. पासपोर्ट Office ने करण थापरला माहिती दिली नाही !! हे उघड करत ह्या लेखात करण थापरने सरकारला दोष दिला ! ह्या लेखाचा आधार घेत स्क्रोल सारख्या मिडीयाने भारतीय सरकारलाच दोषी ठरवल !! अश्या लेखाचा फायदा भारत सरकारवर निशाणा साधण्यासाठी पाकीस्तानी लोक नेहेमीच घेत आलेले आहेत !! अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परमावमधी करत एका निर्दोष माणसाला फाशी वर लटकवण्याच काम हे अर्बन नक्षली करत आहेत !!
  • Log in or register to post comments

यादव की जाधव?

अर्वाच्य
गुरुवार, 02/21/2019 - 18:17 नवीन
यादव की जाधव?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

अतिरेकी का सोडले ?

गामा पैलवान
गुरुवार, 02/21/2019 - 18:43 नवीन
अर्वाच्य,
कंदाहारच्या वेळी भाजप सरकार आणि पंतप्रधान वाजपेयीच होते ना? कबूल करा त्यांच्यात हिंमत नव्हती. त्यांच्यात कुवत नव्हती.
अतिरेक्यांना न सोडल्याने जर निरपराध प्रवासी मेले असते तर तुम्हीच गळे काढले असते वाजपेयींच्या नावे. मात्र हे कबूल करायला हरकत नाही की वाजपेयी खुळचट इसम होता. ब्रजेश मिश्र या तद्दन काँग्रेसी अधिकाऱ्यास हे प्रकरण वाजपेयींनी हाताळायला दिलं. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

कसले आले अभिव्यक्ति स्वातंत्र

ट्रम्प
गुरुवार, 02/21/2019 - 19:10 नवीन
कसले आले अभिव्यक्ति स्वातंत्र !!! पंडित नेहरू च्या भाची च्या नात्या तून जवळ चे ते थापर भाऊसाहेब लागतात त्या मुळे काँग्रेस च्या चपला उचलण्याचे काम ईमानइतबारे थापर साहेबांनी आयुष्यभर केले . काँग्रेस च्या काळात दिल्ली दरबारी मुख्य वर्तमान पत्राचे आणि वृतवाहिन्याचे संपादक पडीक असायचे आणि सरकारच्या निर्णयात लुड़बुड सुद्धा करायचे ( उदा : नीरा वाडिया प्रकरण ). अशाप्रकारे बदनाम असलेल्या पत्रकारांच्या टोळ्यानां कवडी ची ही किंमत मोदींनी दिलेली नाही त्यामुळे हे मूर्ख मोदींची वाट बिकट करण्यासाठी देशाचा , जवानाचां बळी देत आहेत . कुलभूषण जाधव आणि पुलवामा प्रकरणी यांची उठवळ पत्रकारिता प्रखरपणे दिसून आली . पुलवामा हल्ल्या चे वार्ताकंन करताना ( TOI आणि एन डी टीवी ) तो हल्लेखोर कीती निरागस होता !!! , कश्मीर चा हल्लेखोर तर त्याला पाकिस्तान जबाबदार कसा क़ाय ? अशी मुक्ताफळे उधळून पाकिस्तान ला मुजोर बनवीले . पाकिस्तान मधील प्रसार माध्यमे एन डी टीवी आणि TOI च्या दाखल्या ने भारतावर प्रतिहल्ले करत होती . भाजप आणि मोदीच्या द्वेषापाई पाकिस्तान ला मदत करतोय एवढि सुद्धा यांना अक्कल नाही .
  • Log in or register to post comments

धाग्यावर न फिरकण्याचे स्वातंत्र्य असले

धर्मराजमुटके
गुरुवार, 02/21/2019 - 19:27 नवीन
धाग्यावर न फिरकण्याचे स्वातंत्र्य असले तरी संपादकांना विनंती आहे की आता राजकीय विषयावरचे धागे पुरे ! काही दिवस मिपावर राजकीय धाग्यांना बंदी करावी. मिपाच्या इतिहासात झाले नव्हते तेव्हढे वाचकांचे / प्रतिसादकांचे ध्रुविकरण ह्या धाग्यांमुळे होत आहे. आपण इथे ह्या छोट्याश्या प्लॅटफॉर्म वर खेळीमेळीने राहू शकत नाही तर एक देश म्हणून राहणे किती अवघड आहे ते लक्षात यावे ! आता मिपावर शाब्दिक मारामार्‍या करणारे रात्री एकत्र बसून श्रमपरिहार करत असतील तर भाग वेगळा !
  • Log in or register to post comments

अवास्तव अपेक्षा... उगाच असे

थॉर माणूस
Wed, 02/27/2019 - 23:58 नवीन
अवास्तव अपेक्षा... उगाच असे काही होईल म्हणून आशा धरून बसू नका. दोन पैकी एक करा, मुक्काम हलवा किंवा फक्त निवडक धाग्यांवर वाचनमात्र यायचा प्रयत्न करा. अवघड आहे, पण इलाज नाही. निदान निवडणूका संपेपर्यंत तरी ही धूळवड संपणार नाही (असे मला २०१४ ला पण वाटलेले, दुर्दैवाने चुकीचे ठरले).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धर्मराजमुटके

मिपावरील आपल्या जेष्ठपणाला

ट्रम्प
गुरुवार, 02/21/2019 - 23:03 नवीन
मिपावरील आपल्या जेष्ठपणाला मान देवून मी नम्रपणे सांगू इच्छितो की राजकीय धाग्या वर फेरफटका मारून आपला वेळ वाया घालवु नये !! राजकीय विषयावरील चर्चा होत असताना थोडीफर चिखलफेक होत असतेच , त्यात भाग घ्यायचा की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे . मिपावर कोणीही कितीही ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी होवू शकणार नाही कारण प्रत्येकाच्या मनातील तसबीरी वेगळ्या आहेत . प्रतिसाद देणारे कमी असले तरी वाचनसंख्ये वरुन धाग्याची रेटिंग समजते , त्यामुळे संपादकानीं अचारसंहिता लावून राजकीय धागे चालू ठेवावे अस मला वाटते .
  • Log in or register to post comments

TRP...

विशुमित
Fri, 02/22/2019 - 11:53 नवीन
अगदी बरोबर...!! प्रचार कसा होणार मग ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

गरजू तुम्ही सुद्धा आहात !!!

ट्रम्प
Fri, 02/22/2019 - 15:43 नवीन
कारण साहेब सामुदायिक विवाह सोहळ्या ( ठगबंधन ) साठी बाशिंग बांधून तयार आहेत = )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विशुमित

तुम्ही व्याख्या सांगणार होतात

विशुमित
Fri, 02/22/2019 - 16:16 नवीन
तुम्ही व्याख्या सांगणार होतात ?? म्हणजे आम्हाला कशी गरज आहे ते सांगितले असते. === अगाध फेक ज्ञानाने तुम्ही तुमच्या साहेबांच्या वाटचालीचा बट्याबोळ कराल. थोडे जपून.!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रम्प

भ्रष्ट काँग्रेसच्या राजवटीत

डँबिस००७
Fri, 02/22/2019 - 14:43 नवीन
भ्रष्ट काँग्रेसच्या राजवटीत आय सी आय सी आय बँकेची सी ई ओ पदी विराजमान असलेल्या चंदा कोचर ह्यानी बर्याच लोकांना / कंपनीना लोन देत स्वतःच्या नवर्याला त्या बदल्यात कमिशन देत होत्या , अस सी बी आय च्या तपासणीत दिसुन आलेल होत. त्या बद्दल चंदा कोचरसाठी सी बी आय ने लुक आऊट / शोध मोहीम सुरु केलेली आहे . भ्रष्ट काँग्रेसच्या राजवटीत काँग्रेसच्या आशिर्वादाने बँका कर्ज वाटत होत्या, कंपन्या कर्ज घेत होत्या ! त्या कर्जावर भ्रष्ट काँग्रेसवाले कमिशन खात होते ! https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/cbi-issues-lookout-circular-against-chanda-kochhar/articleshow/68105068.cms
  • Log in or register to post comments

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/22/2019 - 15:21 नवीन
सेउल शांतता पुरस्कार मिळाल्याबद्दल मोदींचे अभिनंदन
  • Log in or register to post comments

कारावान मॅगझीन नावाच्या

डँबिस००७
Fri, 02/22/2019 - 16:35 नवीन
कारावान मॅगझीन नावाच्या कॉंग्रेसच्या पत्रीकाने पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांच्या जाती विश्लेषण करण्याच घ्रृृृणित काम केलेल आहे ! पुर्ण ४४ शहीद लोकांत ८ सैनिक (२०%) जनरल कॅटेगरीचे होते, तर ईतर मागास वर्गाचे होते !! मागास वर्गिय लोक फक्त मरण्यासाठी !! असा दावा कारावानच्या ह्या लेखाचा लेखक एझाज अश्रफ याने केला आहे !! कॉंग्रेसने देशाला जाती जमातीमध्ये अडकवुन देशात दंगे करवण्याच्या प्रयत्नात असे केलेल आहे !! caravanmagazine.in/caste/urban-upper-castes-driving-hindutva-nationalism-little-representation-pulwama-jawans
  • Log in or register to post comments

चुकीचे काय त्यात ?

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/22/2019 - 17:38 नवीन
पूल पडला की रिजर्व इंजिनियरमुळे पडला , म्हणून मेसेजेस फिरवतात ना ? मग सैन्यात जात कोणती , हे फिरवले तर बिघडले कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

पूल पडला की रिजर्व

डँबिस००७
Fri, 02/22/2019 - 18:04 नवीन
पूल पडला की रिजर्व इंजिनियरमुळे पडला , म्हणून मेसेजेस फिरवणारे आणी आता सैनिकांची जात काढणारे सुद्धा कॉंग्रेजीच देशाला जातीत वाटण्याच काम ह्या भ्रष्ट कॉंग्रेजीनेच केलेल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

हो ना !

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/22/2019 - 18:44 नवीन
मनुस्मृती काँग्रेसनेच लिहिली ना ? त्या आधी जात सिस्टीम नव्हतीच मुळी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

ते

इरसाल
गुरुवार, 02/28/2019 - 17:00 नवीन
ते मनुला जावुन विचारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

मोगा खान

सुबोध खरे
Mon, 02/25/2019 - 10:38 नवीन
मोगा खान एकाने गाय मारली म्हणून मी वासरू मारले अशा तर्हेचा भंपक युक्तिवाद आहे हा. मुळात "पूल पडला की रिजर्व इंजिनियरमुळे पडला" हा वादच चुकीचा आहे आणि तसे पसरवणारे सुद्धा चुकीचे आहेत. आणि तुमचा युक्तिवाद तर अगदीच लंगडा आहे. कारण नागरी जीवनासारखे लष्करात जाती धर्म पंथ यासाठी कोणतेही आरक्षण नाही आणि सर्वाना नियम सारखेच आहेत. तेंव्हा हुतात्मा झालेल्या जवानांची जात काढणे हा अत्यंत नालायकपणाचा प्रकार पत्रकारांनी केला आहे. आणि त्याला तुम्ही समर्थन देत आहात हि अंतर अत्यंत क्षुद्र पातळी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

ह्या कारवान मॅगझीनचा दाखला

डँबिस००७
Fri, 02/22/2019 - 18:31 नवीन
ह्या कारवान मॅगझीनचा दाखला पाकिस्तानने दिलेला आहे !! कॉंग्रेसला देशद्रोही कारवाया करण्यात काय आनंद येतो देव जाणे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

ह्या कारवान मॅगझीनचा दाखला

डँबिस००७
Fri, 02/22/2019 - 18:33 नवीन
ह्या कारवान मॅगझीनचा दाखला पाकिस्तानने दिलेला आहे !! कॉंग्रेसला देशद्रोही कारवाया करण्यात काय आनंद येतो देव जाणे ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

पाकिस्तान विरुदध केलेल्या

डँबिस००७
Fri, 02/22/2019 - 21:05 नवीन
पाकिस्तान विरुदध केलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचीन्ह लावणार्या कॉँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकचे हिरो जनरल हुडा यांनाच नॅशनल टास्क फोर्स चा हेड म्हणुन नियुक्त करुन सर्जिकल स्ट्राईक झाल्याची खुले आम कबुलीच दिलेली आहे !! गेल्या ६५ वर्षांत पाकिस्तान कडुन झालेल्या हल्ल्याचा फक्त तिव्र शब्दात निषेध करुन थकलेल्या भारतीय जनतेला पाकिस्तान विरुद्ध सर्जिकल स्ट्राईक करुन भाजपाने पहिल्यांदा आपण जिवंत असल्याची जाणिव करुन दिली होती !!
  • Log in or register to post comments

अघाद ...!!

विशुमित
Fri, 02/22/2019 - 21:29 नवीन
अघाद ...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 02/22/2019 - 22:13 नवीन
यापूर्वीच्या लढाया काठीवाल्यानी लढल्या का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

लढाया

Chandu
Sat, 02/23/2019 - 00:05 नवीन
लढाया सैन्य लढायचे.आपण वाटाघाटीच्या टेबलावर कमी पडायचो.असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

लढाया

Chandu
Sat, 02/23/2019 - 00:06 नवीन
लढाया सैन्य लढायचे.आपण वाटाघाटीच्या टेबलावर कमी पडायचो.असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

काठीवाल्याने काठी टेकत टेकत

डँबिस००७
Sat, 02/23/2019 - 00:12 नवीन
काठीवाल्याने काठी टेकत टेकत दोन तरुण खांद्याच्या आधाराने ब्रिटीशांना देशाबाहेर हकलल म्हणे मग स्वातंत्र्या नंतर ती काठी काय तळघरात नेउन टाकली ?
  • Log in or register to post comments

छान

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/24/2019 - 12:24 नवीन
Image removed. दिसली का काठी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

सर्जिकल स्ट्राईक २

डँबिस००७
Tue, 02/26/2019 - 21:46 नवीन
सर्जिकल स्ट्राईक २ स्वातंत्र्यानंतर सुद्धा 65 वर्षे कॉंग्रेसवाल्यांना पाकिस्तानच नाव घेउन डायरेक्टली ब्लेम करायचा दम नव्हता ! शेजारील देश , सिमापारसे आ रहा है आतंकवाद वैगेरे बोलुन वेळ मारुन नेत होते ! देशाला अहिंसेच्या कपाटात बंद करुन काठी तळघरात टाकुन हाती आता बंदुक आली आहे !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

Congress makes false claim of

गब्रिएल
Sat, 02/23/2019 - 01:22 नवीन

Congress makes false claim of PM Modi shooting for film at Corbett 3 hours after Pulwama attack

  • Log in or register to post comments

ह्यो मोदीवर खोटा आरोप आनी...

गब्रिएल
Sat, 02/23/2019 - 01:39 नवीन
ह्यो मोदीवर खोटा आरोप आनी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

Congress deletes video where

गब्रिएल
Sat, 02/23/2019 - 01:24 नवीन

Congress deletes video where Rahul Gandhi was seen dancing shortly after the Pulwama attack

  • Log in or register to post comments

ह्ये सोत्ताचे झाकून ठ्येवने =

गब्रिएल
Sat, 02/23/2019 - 01:39 नवीन
ह्ये सोत्ताचे झाकून ठ्येवने =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

रागाने स्पंदना ला मीडिया

ट्रम्प
Sat, 02/23/2019 - 16:08 नवीन
रागाने स्पंदना ला मीडिया प्रमुख म्हणून अपॉइंट करताना तिची बुद्धि बघितली असती तर बरे झाले असते , कारण स्पंदना ने रागाच्या ट्विटर वरुन मोदींवर केलेले सगळे हल्ले रागावरच बूमरैंग सारखे उलटले आहेत . पुलवामा मधील हल्ल्यानंतर रागा गुजरात मध्ये डांस करत असल्याचा विडिवो रागाच्याच ट्विटर प्रसिद्ध करून चूक लक्षात आल्यावर डिलीट करण्यात आला पण तो पर्यंत नेटकऱ्यानीं भरपूर शेअर केला . बर त्या नंतर तरी गप्प बसावे ना !! पण नाही , मोदींना बदनाम करण्यासाठी मोदींची 1 वाजता झालेली जंगल सफारी 5 वाजता झाली असे रागाच्या ट्विटर वरुन प्रसिद्ध केल्यावर नेटकऱ्यानीं न्यूज़चैनेल वर दाखवलेल्या मोदींच्या जंगलसफारी चे फुटेज ट्वीटर उपलोड करून उत्तर देवून तोंडघशी पडले .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गब्रिएल

आनी ह्ये पाकड्याना मदत करनारे

गब्रिएल
Sat, 02/23/2019 - 01:53 नवीन
आनी ह्ये पाकड्याना मदत करनारे नवीन कारनामे...

SHOCKING: Congress Calls Pulwama Bomber 'Homegrown So-called Terrorist', Politicises Attack While Giving Pakistan An Alibi

  • Log in or register to post comments

वरील प्रतिसाद देणारे खफवर

प्रमोद देर्देकर
Sat, 02/23/2019 - 19:52 नवीन
वरील प्रतिसाद देणारे खफवर फिरकले नाहीत म्हणून तेच इकडे चिट्कवतोय. ----------------------- कमाल आहेत ना ? सगळ्यांची देशभक्ती फक्त कश्मीरमध्ये जेव्हा जवान पाक दहशतवादी लोकांकडुन मारले जातात तेव्हाच उफाळून येते. मिपावर सुध्दा रणकंदन सुरू होते पण फक्त शत्रुराष्ट्राने किंवा काश्मिरी दहशतवाद्यांनी निंदनीय कृत्य केल्यावरच आपली राष्ट्रभावना खऱ्या अर्थाने एकवटते हे कसे? सगळीकडून मदतीचा ओघ सुरू होतो फक्त जवानांच्या कुटुंबीयांना . पण दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आजवर ज्या संख्येने आपले जवान शहीद झाले आहेत त्याच्या कैक पट अधिक संख्येने नक्षलवाद्यांनी निमलष्करी वा अन्य जवानांना मारले आहे. आणि एकाच वेळी डझनांनी मारले गेल्याच्या घटना नक्षलग्रस्त भागात अनेक वेळा घडल्या आहेत. पण या सर्व वेळी देशात संतापाची लाट राहोच; पण साधी लहरदेखील कधी उठली नाही. धार्मिक द्वेष दुसरं काय कारण असावं ?
  • Log in or register to post comments

सहमत

गोंधळी
Sun, 02/24/2019 - 12:07 नवीन
एकाच वेळी डझनांनी मारले गेल्याच्या घटना नक्षलग्रस्त भागात अनेक वेळा घडल्या आहेत. पण या सर्व वेळी देशात संतापाची लाट राहोच; पण साधी लहरदेखील कधी उठली नाही. धार्मिक द्वेष दुसरं काय कारण असावं ? सध्या आप्ल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे मोदीना डिफेंड केल जात आहे.
  • Log in or register to post comments

प्रमोद देर्देकर

डँबिस००७
Sun, 02/24/2019 - 13:03 नवीन
प्रमोद देर्देकर पण दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आजवर ज्या संख्येने आपले जवान शहीद झाले आहेत त्याच्या कैक पट अधिक संख्येने नक्षलवाद्यांनी निमलष्करी वा अन्य जवानांना मारले आहे. आणि एकाच वेळी डझनांनी मारले गेल्याच्या घटना नक्षलग्रस्त भागात अनेक वेळा घडल्या आहेत. पण या सर्व वेळी देशात संतापाची लाट राहोच; पण साधी लहरदेखील कधी उठली नाही. धार्मिक द्वेष दुसरं काय कारण असावं ? उगाच धार्मिक द्वेष वैगेरे ईथे आणु नका !! हल्लीच बस्तर मध्ये ७५ निमलष्करी वा अन्य जवानांना मारले होते तेंव्हा कम्युनिस्ट लोकांनी (ज्यात कन्हय्या कुमार सारखे अर्बन नक्षल लोक आहेत ) यांनी जल्लोश केलेला, मिठाया वाटलेल्या होत्या हे तुम्हाला दिसले नाही ? शत्रुराष्ट्राने किंवा काश्मिरी दहशतवाद्यांनी निंदनीय कृत्य केल्यावरच आपली राष्ट्रभावना खऱ्या अर्थाने एकवटते हे कसे? देशात अतिरेकी कारवाया करण्याचे मुख्य काम पाकिस्तानातील अतिरेकी संघटना, आय एस आय वैगेरे करतात, ईथले लोक त्या घटनेला सपोर्ट करणारे असतात. त्यामुळे देशातील जनतेला अश्या अतिरेकी घटनेत पाकिस्तानचा हात आहे हे स्पष्ट दिसत !! त्यामुळे जेंव्हा जेंव्हा भारताच्या सैनिकांचा जीव ह्या पाकिस्तानातील अतिरेक्यांनी घेतलेला आहे त्या त्या वेळेला जनतेच्या भावना उफाळुन येतात. शेवटी मरणारे सैनिक हे जनते मधुनच असतात. आक्रोश व्यक्त करणारे भारतातले मुसलमान सुद्धा असतात
  • Log in or register to post comments

तुम्ही पुनः पुनः पाकी ना का

प्रमोद देर्देकर
Sun, 02/24/2019 - 18:49 नवीन
तुम्ही पुनः पुनः पाकी ना का मध्ये आणता ? आता नक्षल लोकांस पण पाक मदत करतो असं नाही म्हणत असाल तर आपला पास .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

तुम्ही पुनः पुनः पाकी ना का

डँबिस००७
Sun, 02/24/2019 - 21:48 नवीन
तुम्ही पुनः पुनः पाकी ना का मध्ये आणता ? पुन्हा पुन्हा पाकिस्तानला तर तुमच्या लाडक्या कॉंग्रेसनेच आता पर्यंत आणलेल आहे व ट्रेंड सुरु केलेला !! तुम्हाला काय म्हणायचय ? पाकिस्तान साधा सरळ देश आहे, ना कोणाच्या अध्यात ना मध्यात!! नक्षल लोकांना कोणाची मदत आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर खरच आमचा पासच !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

झालं आता कॉंग्रस माझी हे

प्रमोद देर्देकर
Mon, 02/25/2019 - 09:19 नवीन
झालं आता कॉंग्रस माझी हे ठरवून पण टाकलंत ? धन्य आहे . आणि माझे वाचन कमी आहे म्हणून कुतूहल म्हणून विचारलं तर ते बाजूलाच राहिलं . मी आयुष्यात कधीच कौन्रेसला मतदान केलेलं नाही हे समजून घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

हे खरे आहे का ?

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/24/2019 - 17:32 नवीन
पुलवामा अतिरेकी हल्ल्यात 40 जवानांना आपले प्राण गमवावे लागल्यामुळे, भारताने सर्व पातळीवर पाकची कोंडी करायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून नवी दिल्लीत आजपासून सुरु होत असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानच्या दोन नेमबाजपटूंना व्हिसा नाकारत पाकला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताची ही चाल चांगलीच अंगलट आली आहे. पाकिस्तानच्या शिष्टमंडळाने तक्रार केल्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भविष्यात भारतामध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली जाणार नाही असं म्हटलं आहे. याचसोबत विश्वचषकात 25 मी. रॅपिड फायर पिस्तुल स्पर्धेसाठी देण्यात आलेला ऑलिम्पिक कोटाही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने काढून घेतला आहे. जोपर्यंत भारत सरकार स्पर्धेत सहभागी असलेल्या प्रत्येक देशाच्या खेळाडूला प्रवेश देण्याबद्दल आणि ऑलिम्पिक समितीच्या नियमांचं पालन करण्याबाबत लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नसल्याचं ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलंय. व्हिसा नाकारल्यानंतर पाकिस्तानी नेमबाजी संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे तक्रार केली होती. यावर कारवाई करताना स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक देशाच्या खेळाडूच्या हिताच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलं आहे. https://www.ndtv.com/india-news/olympic-body-punishes-india-for-declining-visas-to-pakistani-players-after-pulwama-1997470
  • Log in or register to post comments

पाकिस्तानचे परराष्ट्रिय

डँबिस००७
Sun, 02/24/2019 - 17:50 नवीन
पाकिस्तानचे परराष्ट्रिय मंत्री शाह महमुद कुरैशी यांना जपान च्या टोक्योमध्ये सरकारी काम होत. पण जपानच्या सरकारच्या आदेशावरुन त्यांना आपली जपान यात्रा कँसल करावी लागलेली आहे. जपान सरकार ने त्यांना पुलवामामुळे निर्माण झालेल्या परिस्थिती निवळण्यासाठी काम करा अस सुनावलेल आहे !! https://youtu.be/kbZO9-X2t6Q अफघाणीस्तानने United Nations मध्ये पाकीस्तान विरुद्ध तक्रार नोंदवलेली आहे !! भारता प्रमाणे आम्हालाही पाकिस्तान कडुन त्रास होत आहे अस स विस्तर पत्र त्यांनी UN ला दिलेल आहे !! ये है श्री मोदीजीकी ताकद !!
  • Log in or register to post comments

खतरनाक ताकद...!!

विशुमित
Sun, 02/24/2019 - 17:56 नवीन
खतरनाक ताकद...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

खरतनाक करमणूक

अभ्या..
Sun, 02/24/2019 - 19:17 नवीन
खतरनाक करमणूक करतंय राव हे. तारक मेहता शिरिअल लेखन मार खाईल ह्याच्यापुढं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

कॉमेडीयन परत आला मि पा वर ?

डँबिस००७
Sun, 02/24/2019 - 21:53 नवीन
कॉमेडीयन परत आला मि पा वर ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

कसले कौतुक करताय तुम्ही

ट्रम्प
Sun, 02/24/2019 - 20:29 नवीन
कसले कौतुक करताय तुम्ही मोदींचे ? पाकिस्तान ला वठणी वर फक्त महाराष्ट्रातील सह्याद्रीच आणू शकतो . पाकिस्तान ला क़ाबूत आणने गरजे चे असल्या मुळे जगातील मुख्य देश प्रयत्न करत आहेत ही चांगली गोष्ठ आहे . खर म्हणजे पाकिस्तान च्या लष्कराला सरळ करणे गरजेचे आहे आणि हे काम पूर्वीच झाले असते ज्या वेळी निधड्या छातीचे महाराष्ट्राचे साहेब संरक्षण मंत्री होते !!! पण मैड़म नी केलेल्या पूर्वनियोजित कटामुळे साहेबांना महाराष्ट्रात परत यावे लागले , अन्यथा साहेबांनी त्याच वेळी पाकिस्तान ला सूता सारखे सरळ केले असते . आता त्या वेळी महाराष्ट्रात आल्यावर 1993 मधील त्यांच्या कालावधीत मुंबई मध्ये 12 साखळी बॉम्बस्फोट झाले आणि ती कारक़िरद थोड़ी वादग्रस्त ठरली ही गोष्ठ वेगळी , पण आता ते नंतर कधी तरी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७

अभिनंदन

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/24/2019 - 19:26 नवीन
केंद्र सरकारने दिलासादायक निर्णय घेताना निर्माणाधीन घरांवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांवर आणला आहे, तर सवलतीच्या घरांवरील जीएसटी देखील ८ वरून एका टक्क्यावर आणला आहे. रविवारी जीएसटी परिषदेच्या झालेल्या बैठकीमध्ये या दरकपातीबाबत निर्णय घेण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अरुण जेटली यांनी याबाबत माहिती दिली. https://www.loksatta.com/desh-videsh-news/gst-payable-for-under-construction-flat-will-be-now-5-affordable-housing-will-have-1-gst-rate-says-arun-jaitley-1846913/
  • Log in or register to post comments

GST Council अणि केंद्र

विशुमित
Sun, 02/24/2019 - 19:42 नवीन
GST Council अणि केंद्र सरकारचे हार्दीक आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

हि जिएसटी ची सवलत मोगा भाई

डँबिस००७
Sun, 02/24/2019 - 19:48 नवीन
हि जिएसटी ची सवलत मोगा भाई रिजेक्ट करत आहे कारण ते मोदी भक्त नाहीत !! याचा निषेध म्हणुन घेतलेल्या घरावर मोगाभाई २४% GST भरतील !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Blackcat

का ?

Blackcat (verified= न पडताळणी केलेला)
Sun, 02/24/2019 - 20:09 नवीन
मोघलांना शिव्या घातल्या तरी लाल किल्ल्याचा उपभोग घेताच ना ? ( लाल किल्ला , लाल देऊळ होते , असे पुस्तक कधी निघणार ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डँबिस००७
  • «
  • ‹
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • 14
  • 15
  • 16
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा