Skip to main content

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/04/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं. बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते. बाकी इतरही बरेच प्रश्न असतात उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे. ५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या. पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून) २. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे ३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो ४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक . माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती. पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.) अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात . आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता. नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते . गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई. याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल . आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे . अजून एक दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल . बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच धन्यवाद

वाचने 150725
प्रतिक्रिया 358

प्रतिक्रिया

सर्वात आधी सूरक्षा म्हणुन ( अगदी पॉवर मशीन नसली तरी ) ड्रायव्हिंग सेफ्टी किट घेवुन ये !! बाईक पेक्षा स्वताची काळजी महत्वाची .. गडबडीत असल्याने तुर्तास ईतकेच. पुणे-औ.बाद, पुणे कोल्हापुर, पुणे-नाशीक-सूरत, सहसा सर्वत्र बाईकवर फिरणारा.

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

माझा एक मित्र होता सायकल वरून नांदेड ते दिल्ली पर्यंत गेला, आणि तिथून घरी फोन केला पैसे संपलेत आणि आता पुढे चालवत नाही तेव्हा येवून घेवून जाने काम खल्लास :-)

In reply to by प्यारे१

परत येताना कसा येतोस? >> सेम वे ;) कधी कधी हुक्की आली की रूट बदलतो ...उगा एखाद्या खेड्या-पाड्यात जाऊन काहीतरी शोधत बसायचे. ;) http://misalpav.com/node/23264 , http://misalpav.com/node/20637 असो ...अभी टैम मिलाच है तो ..... स्पा , सर्वात पहिले बाईक , अर्थात ..पॉवर बाईक्स .शहरात थोड्या स्टाईल मारायाला बर्‍या असल्या तरी अ‍ॅव्हरेज च्या बाबतीत, सामान ( खरोखरचे) सोबत देण्याच्या बाबतीत जरा " ढ " आहेत. त्यातल्या त्यात होन्डा ची युनिकॉर्न ओक्के-टोक्के आहे .तु म्हणशील आता बाईक बदलू का ? नाही ...दोस्तीत येक्स्जेंच होत असेल तर काय हरकत नाही ..यामाहा ला बॅग्ज बसणात नाहीत.. उजव्या बाजुला आधी जाळी ( काय म्हणतात त्याला तेच आठवेना, यामाहा च्या शो रूम मध्ये मिळते ) बसवावी लागेल मग त्यावर त्या वर सांगतीलेले हुक्स बसतात ( एका एम.आर. ला पाहिला आहे मी तस्सा ) शिवाय अ‍ॅव्हरेज हा फकत बाईकच्या जडण-घडणीत नसतो..तो आपण चालविण्यावर पण असतो. शिवाय आपण बाईक ला मेन्टेन कसे करतो त्यावर ही...या माझ्या काही हाय वे ड्रायव्हींग च्या टिप्स.. १ ) दर दिड तासाला किमान १५ मिनीटाचा ब्रेक...जरा ईंजिन गार होईपर्यंत २ ) बाईक, मग ती कुठली का असेना , बेस्ट अ‍ॅव्हरेज, कुठल्या स्पीड ला मिळतो हे सांगीतलेले असते, तु कोकण च्या सिंगल रोड वर अ‍ॅव्हरेज स्पीड ३०-३५ ने गेलास तर कसा काय पेट्रोल अ‍ॅव्हरेज मिळणार, अश्या बर्‍याच श्या बाबींवरती डिपेन्ड असते. ३ ) दर चारशे किमी ला ईंजिन ऑईल बदलायचे, अर्थात बाईक टु बाईक वेगळे, मी तीन वर्षे जुनी युनिकॉर्न घेवुन गेलो की चारशे ला बदलतो, माझी जुनी १९९८ ची स्प्लेंडर नेली की मग ३०० लाच बदलतो. ४) निघताना सर्व्हिसिंग मस्ट पुन्हा तुर्तास ईतकेच. अवांतर पण समांतर : मुळात, पुरूषाला बाईक रायडिंग सारखे डांगडिंग प्लेजरबेल दुसरे काहीच नाही, अन्यथा बायकी बाईक्स ची जाहिरात " व्हाय बॉयज शुड हॅव ऑल द प्लेजर " अशी करावी लागली नसती ;)

In reply to by सुहास..

दर दिड तासाला किमान १५ मिनीटाचा ब्रेक...जरा ईंजिन गार होईपर्यंत
पोइन्त नोटेड
२ ) बाईक, मग ती कुठली का असेना , बेस्ट अ‍ॅव्हरेज, कुठल्या स्पीड ला मिळतो हे सांगीतलेले असते, तु कोकण च्या सिंगल रोड वर अ‍ॅव्हरेज स्पीड ३०-३५ ने गेलास तर कसा काय पेट्रोल अ‍ॅव्हरेज मिळणार, अश्या बर्‍याच श्या बाबींवरती डिपेन्ड असते.
३०-३५ कुठे मेल्या .. फार कमी वेळा त्या स्पीड वर असतो ७०-८० वर जास्त वेळ चालवत होतो
३ ) दर चारशे किमी ला ईंजिन ऑईल बदलायचे, अर्थात बाईक टु बाईक वेगळे, मी तीन वर्षे जुनी युनिकॉर्न घेवुन गेलो की चारशे ला बदलतो, माझी जुनी १९९८ ची स्प्लेंडर नेली की मग ३०० लाच बदलतो.
येस मला ओईल बदलायला हवे, पण बाईक मन्युअल वर ३००० किमी लिहलय
४) निघताना सर्व्हिसिंग मस्ट
नोटेड
अवांतर पण समांतर : मुळात, पुरूषाला बाईक रायडिंग सारखे डांगडिंग प्लेजरबेल दुसरे काहीच नाही, अन्यथा बायकी बाईक्स ची जाहिरात " व्हाय बॉयज शुड हॅव ऑल द प्लेजर " अशी करावी लागली नसती
जियो __/\__

In reply to by स्पा

स्पा , अरे साधारण २०००-२५०० किमी नंतर ऑईल बदललं तरी चालतं. त्यात पण ऑईल जर वॅल्वोलिन किंवा शेलचं असेल तर ३००० पर्यंत व्यवस्थित सर्व्हिस देतं.

In reply to by स्पा

सिटी रायडिंग मध्ये २रा ३रा गिअर आणि ४० च्या पेक्षा कमी स्पीड मध्ये अ‍ॅव्हरेज मिळत नाही. तसंच ७०-८० मध्ये नेहमीच चांगलं अ‍ॅव्हरेज मिळतं असं नाही विशेषतः गाडी १०० सीसी असेल तर. टॉप मायलेज हे मध्यम स्पीड ला मिळतं ४०-४५ ते ६०-६५ पर्यंत मॉडेल प्रमाणे ही रेंज थोडी कमी जास्त होते. नवीन गाड्यांमध्ये स्पीडोवर एक हिरवा पट्टा दर्शवलेला असतो. तिथे चांगली इंधन बचत होते. ८० ने गाडी पळवायची आहे आणि मायलेजही सर्वोत्तम पाहिजे असं होणार नाही..

In reply to by सुहास..

अवांतर पण समांतर : मुळात, पुरूषाला बाईक रायडिंग सारखे डांगडिंग प्लेजरबेल दुसरे काहीच नाही, अन्यथा बायकी बाईक्स ची जाहिरात " व्हाय बॉयज शुड हॅव ऑल द प्लेजर " अशी करावी लागली नसती >>>>>>> ह्ये बेष्ट पल्सार ची जाहिरात आठवली "डेफिनेटली मेल " :D

In reply to by अद्द्या

ह्ये बेष्ट पल्सार ची जाहिरात आठवली "डेफिनेटली मेल " >>> बरोब्बर , पण तरीही पल्सर नकोच, हाय - वे ला तर अजीबात ...ह्याच पल्सर चा पाच सहा वर्षात ( अगदी लग्न झालेल्या प्रुरुषासारखा ) खुळखुळा होतो , कदाचित म्हणुनच तिची जाहीरात डेफिनेटली मेल अशी करत असावेत. ;)

In reply to by सुहास..

पल्सर >> तेवढं बजेट नाही नंतर पेट्रोल पण लागतं ना राव ________ ( अगदी लग्न झालेल्या प्रुरुषासारखा ) खुळखुळा होतो , कदाचित म्हणुनच तिची जाहीरात डेफिनेटली मेल अशी करत असावेत. >>>> =)) =)) या बद्दल अनुभव नसल्याने आणि तो येण्याचा येत्या १ - २ वर्षात काही चान्स नसल्याने … आपला पास

In reply to by सुहास..

मी ७ वर्षे पल्सर वापरतो आहे, पण मला कधिही असा प्रोब्लेम आला नाही. माझी गाडी मी कोणालाही वापरायला देत नाही त्या मुळे असेल कदाचीत.

In reply to by सुकामेवा

मी गेली १.५ वर्षे झाली २२० पल्सर वापरतोय. १७५०० किमी झालेत, पण एकदाही काही मोठा सिरीयस आणि खर्चिक त्रास दिलेला नाही. उलट गाडी नवीन असतानाच माझ्या चुकीने धडपडल्यानंतर इंजिन वगळता बरेचसे पार्टस नवीन टाकले होते, आणि तरीही खर्च फक्त ४५०० आला होता.

In reply to by नानबा

भारीच. ती दीड लाखाची एन्फिल्ड ३५० पण इतकंच देते म्हणे. मग पल्सर नक्कीच चांगला पर्याय आहे.

In reply to by स्पा

बुलेट विरुद्ध इतर हा पुरातन वाद आहे, असेच अजुन काही वाद जगाच्या अंतापर्यंत चालु राहतील या वादच नाही. अर्थात बुलेट ही बुलेट असली तरी, हल्ली जरा जास्त झाल्यात रस्त्यावर, आणि बटन स्टार्ट, अ‍ॅल्यु. इ़ंजिन, डाविकडे गिअर, नावाला जागुन खरोखरच आवाज कमी करणारा सायलेन्सर अशी तथाकथित मार्केट डिमांडच्या नावाखाली केलेल्या बदलांनी बुलेटची शान कमी झालेली आहे. पुर्वी बुलेट २०० फुट मागं असली तरी कळायची,आता १० फुट मागं आल्यावर आवाज येतो. इंजिन शक्तीशाली आहे,पण शहरात चालवायला एकदम बेक्कार, ज्या स्पिडनं पेट्रोल भरताना पंपावर आकडे पुढं पळतात त्याच्या दुप्पट स्पिडनं फ्युअल मिटरचा काटा घसरत जातो. हां, मनराव सारखं लेह वगैरे असेल तर ठिक आहे. नाहीतर अवघड आहे, दुसरा प्रश्न व्हायब्रेशनचा, हल्लीच्या आणि एक लेवल मागच्या पिढिला म्हंजे मला देखील,खालच्या गिअरवर आणि कमी स्पिडला एवढं व्हायब्रेट होणारी गाडी चालवणं फार अवघड होतं असा अनुभव आहे. पल्सार तर बुलेट्पेक्षा स्वस्त आणि लवकर येंतेच पण बुलेटच्या किमतीत, अजुन थोडे पैसे घालुन निंजा २५० किंवा सिबिआर २५० येईल. त्या सुद्धा तेवढ्याच जबरदस्त गाड्या आहेत.

In reply to by ५० फक्त

दोन्ही चा क्लास वेगळा बुलेट हायवे क्रुझर अन बाकी रॅट स्पोर्ट्स बाइक्स (हे खिल्ली म्हणुन नाही तर खरेच तेच नाव आहे असे ऐकले आहे)ज्याला थंप आवडतो त्याने आर ई घ्यावी, स्लिक काऊल्स आवडत अस्ल्यास स्पोर्ट्स बाइक , उरता उरला जुन्या रॉयल एन्फिल्ड्स चा प्रश्न तर कितीतरी टाईप चे सायलेंसर आजकाल मिळतात, हॉलो, ग्लास वुल, इन्दौरी, पंजाबी इत्यादी ,डावीकडे गेअर नाहीत हे मान्य पण थंप आणता येतो (तेवढीच दुधाची तहान ताकावर) :)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

ती दीड लाखाची एन्फिल्ड ३५० पण इतकंच देते म्हणे. मग पल्सर नक्कीच चांगला पर्याय आहे.
यार.. तुने चलाईही नही :( तम्माम्म एन्फिल्डवाल्यांच्या भावना दुखावल्याबद्दल आपला जाहीर निषेध..

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बुलेट म्हणजे उगा ती चालवणार्‍यांनी केलेला वरचढपणा आहे. उगं ढबाढबा आवाज आणि जगभरातली कंपनं असतात त्यात. वरून ३.५ लिटर इंजिन ऑईल ओता ते वगळंच. ता. क. - माझा निषेध बुलेटला नसून ती चालवणार्‍या आणि फुकटचा "आम्ही बुलेटवाले" चा टेंभा मिरवणार्‍या चालकांना आहे.

In reply to by नानबा

बुलेट म्हणजे उगा ती चालवणार्‍यांनी केलेला वरचढपणा आहे. उगं ढबाढबा आवाज आणि जगभरातली कंपनं असतात त्यात. वरून ३.५ लिटर इंजिन ऑईल ओता ते वगळंच.
यात यात टेंभा मिरवणार्‍याबद्दल काहीच लिहिला नाहीये ? बुलेट्ला नावे ठेवली आहेत .. ते ३५० सीसीचा , २०० किलो चा धूड १२५ च्या स्पीड ने पळवून पहा ... कुठल्याही घाटात कोणत्याही कारच्या बरोबरीने एन्फिल्ड चालवून पहा .. मग बुलेटची मजा कळेल डोंगर दर्‍या आणि लेह लडाख सारखे राईडस पाठीमागे ३०-३० किलो च्या बॅगा लावून सहज करता येतात ते एन्फिल्ड् वरच !! बुलेटचा असा अहे ना , झेपेल त्यानेच घ्यावी !! बाकीच्यांनी फक्त नावे ठेवावी !!

In reply to by कपिलमुनी

झेपेल त्यानेच घ्यावी !! बाकीच्यांनी फक्त नावे ठेवावी !!
मुनीवर तुम्ही आमच्या पक्षाचे अधिकृत प्रवक्ते आजपासून. :) झेपेल यामध्ये सगळ्या प्रकारे आले. ;)

In reply to by कपिलमुनी

खरंय. बुलेट झेपायला तसलाच अस्ताव्यस्त प्रशस्त देह हवा. आमच्याकडे (सुदैवाने) तो नसल्यामुळे आम्ही असल्या फंदात पडत नाही.
बुलेटचा असा अहे ना , झेपेल त्यानेच घ्यावी !! बाकीच्यांनी फक्त नावे ठेवावी !!
हाच तो, बुलेट चालकांचा "आम्ही बुलेटवाले" चा टेंभा.
कुठल्याही घाटात कोणत्याही कारच्या बरोबरीने एन्फिल्ड चालवून पहा .. मग बुलेटची मजा कळेल
तुमचा व्यवसाय काय हो?

In reply to by बॅटमॅन

मग नायतर काय बे बॅट्या :( आता हाय आमचा टेंभा, मशाल, पलिता, चूड सगळं हाय. म्हणून काय वातींचं कौतुक ऐकत बसावं काय? ;)

In reply to by कपिलमुनी

////////////बुलेटचा असा अहे ना , झेपेल त्यानेच घ्यावी !! बाकीच्यांनी फक्त नाव///////////////// ब्येस्ट!!! मी पण एन्फिल्डर!! मला बी पक्ष प्रवेश द्या!! (क्लासिक ३५० आम्ची)

In reply to by llपुण्याचे पेशवेll

बुलेट दलींदर आहे असं म्हणा हवं तर.. कित्येक जण म्हणतात.. चालवणार्‍यांना शष्प फरक पडत नाही. पण बुलेट आणि पल्सरची तुलना.. पुप्या भाड्या.. आपल्या मैत्रीत खो घालशील हां असलं काही बोलून... अवांतर - मे महिन्यात भूतानला येणार आहे का कुणी.. ८ + १ दिवसाचा ट्रॅक आहे.

In reply to by अर्धवट

बुलेटचा आवाज खुप येतो. गेल्याच आठवड्यात एक बुलेटवाला माझ्या बाईकच्या मागे होता. इतका त्रास व्हायला लागला आवाजाचा की मी सरळ बाजुला होऊन त्याला पुढे जाऊन दिलं, वर मी स्वतः एकदम हळु बाईक चालवत होतो, तो माणुस दिसेनासा झाला तरी कितीतरी वेळ मला तो "फाटफाटफाटफाट" असा आवाज येत होता. नंतर ऑफिसात जाऊन एकाला (ज्याची बुलेट आहे) त्याला म्हणालो की काय आवाज येतो यार, तर तो म्हणतो की "तीच तर मजा आहे". मी चुपचाप डेस्कवर परत आलो. :)

In reply to by अमोल खरे

त्यातही मी एकवेळ आवाज सहन करेन पण सिग्नलवर बुलेटच्या मागं फर्लांगभर जाणवणारे सायलेन्सर मधून येणार्‍या एक्झोस्ट ग्यासचे वायब्रेशन असह्य होतात.

In reply to by अमोल खरे

यु ट्युब ला एक विडो पाहिलेला, बुलेट वाला पठ्ठा बेसमेंट पार्किंग मधे बुलेट स्टार्ट करुन इंजिन रेस करतो फक्त अन आजुबाजुच्या आर १५ , मर्सिडीज अन तत्सम ललना घाबरुन आपापली सेंट्रल लॉकिंग रडगाणी गायला लागतात प्यां प्या करुन!!!! *lol*

In reply to by सुहास..

दर चारशे किमी ला ईंजिन ऑईल बदलायचे परवडत नाय राव..... आम्हि तर ३००० किमी झाल्याशिवाय तेचा कडे डुंकुन पन बघत नाय... :) हे झालं रोजच्या वापरा बाबत..... लांब कुठे हिंडायला जायचं असल तर मग २००० किमी....नंतर आईलचेंज... (शाईन नंतर बुलेट चालवणारा) - मनराव.

In reply to by सुहास..

दर चारशे किमी ला ईंजिन ऑईल बदलायचे, अर्थात बाईक टु बाईक वेगळे, मी तीन वर्षे जुनी युनिकॉर्न घेवुन गेलो की चारशे ला बदलतो, माझी जुनी १९९८ ची स्प्लेंडर नेली की मग ३०० लाच बदलतो.
मी स्वतः युनिकॉर्न वापरतोय ३ वर्ष. ४०० कि.मी. ला ऑईल बदलायची काहीच गरज नाही. साधं ऑईल (SAE 10W30 MA हे स्पेसिफिकेशन असलेलं)साधारण ३००० ते ३२०० कि.मी. पर्यंत बदला. दर ५०० ते ७०० कि.मी. नंतर ऑईल लेव्हल चेक करायची. कमी झालं असेल तर थोडसं टॉप अप करुन घ्यायच मिनी पाऊच मधुन. सिंथेटीक ऑईल असेल तर काही काही ऑईल ४५०० ते ५००० की.मी. पर्यंत बदलायची गरज नसते. पण माझा सल्ला असा आहे की साधचं ऑईल वापरा. जास्त सुट होतं युनिकॉर्न च्या ईंजिन ला.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

+१००, आजकालच्या नविन गाड्यांना ४००-५०० किमीला ऑईल बदलायची गरज नसते, कारण बहुतेक इंजिन्स अ‍ॅल्युनिमियमची असतात हे असावं, नक्की माहित नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी होंडा चा पंखा आहे. हिरो होंडा c d १०० (१९८८) दीड लाख (१,५०,०००) कि मी चालवून भावाच्या कारखान्यात कामगारांना चालवायला दिलेली आहेआजही ५०-५५किमी/लि देते . कायनेटिक होंडा ८०,००० (ऐंशी हजार) कि मी चालवून फुकून टाकली. आणि आता गेली साडेपाच वर्षे होंडा युनिकोर्न वापरीत आहे.४५ किमी मुंबई शहरात देते. ( आश्चर्य म्हणजे त्याची पहिली बैटरी अजून चालू आहे).आजतागायत देखभालीचा खर्च (एकूण साडेपाच वर्षातील) १५०० च्या वर नाही. माझ्या भावाने पण एक जपानी होंडा ९० cc, दोन हिरो होंडा आणि दोन होंडा ऐक्तिव्हा(activa) वापरल्या आहेत. होंडा ची इंजिने बेजोड आहेत.पण त्यांची सर्व्हिसिंग भिकार आहे.भारत भराचा अनुभव गाठीशी आहे (लष्करात असल्याने) पण मी त्या गाड्यानचे सर्विसिंग लोकल मेकानिक कडेच करतो फार तर वर्षात एकदा.fill it shut it and forget it.

In reply to by सुबोध खरे

पण त्यांची सर्व्हिसिंग भिकार आहे.
सहमत. सर्विसिंगला ऑईल नं बदलणं, पेट्रोल काढुन घेणं ईत्यादी प्रकार अनुभवलेले आहेत. एकदा तर चक्क गाडीचा ईंडीकेटर तोडुन दिला होता. त्यांच्या डोक्यावर बसुन बदलुन घेतला होता. त्याच्यानंतर परत तिथे गाडी दिली नाही. मी सुद्धा बाहेरच्या गॅरेज मधेचं देतो युनिकॉर्न ला. माझी सुद्धा पहीलीच बॅटरी आहे अजुन. गाडीचं ईंजिन "मक्खन" आहे. सिटी मधे ४७~५० हायवे ला ५५~५८ पर्यंत आरामात मिळतं अ‍ॅव्हरेज. होंडाच्या गाड्या थोड्या महाग असतात, पण क्वालिटीवाईज पहायला गेला तर पैसे वसुल होतात. (होंडाचा पंखा, ए.सी., कुलर) अनिरुद्ध.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

+१ माझी पण हॉन्डा युनिकॉर्ण आहे मजा येते गाडी चालवायला

आमची टि.वि.एस. अपाची आर टि आर आहे, मागच्या महिन्यात बाईक अचानक सुरूच होत नवती, सुरु झाली कि लगेच बंद पडायची, कार्बोरेटर गेलाय म्हणाला मेक्यानिक ३००० रुपडे खर्च येईल म्हणे.. म्हणून महिनाभर बंदच ठेवली, परवा असच वेळ मिळाला म्हणून दुसर्या मेक्यानिक ला दाखवली तर त्याने एक पोवर सर्किट चेंज केल आणि कार्बोरेटर ची सेट्टीइंग केली काहीतरी, पेट्रोल भेसळीच आहे बदलून बघ म्हणे १०० रुपयात काम झालं खर पण गाडीतलं ३लिटर पेट्रोल काढायला जीवावर आल हो.. आता गाडी सुरु तर झालीये पण अजूनही खात्री वाटत नाहीये...... कार्बोरेटर चेक करायला परत खर्च येईल म्हणे... नक्की कळत नाहीये कार्बोरेटर चेक घेऊ कि गाडी परत बंद पडायची वाट बघु.... कि अजून काही वेगळाच प्रोब्लेम आहे ?

In reply to by सौरभ उप्स

कार्बोरेटर घरच्या घरी साफ करून बघ ना एकदा. नाहीतर एखाद्या चांगल्या मेक्यानिकला दाखवून व्यवस्थित ट्यून करून घे. पण मेक्यानिक मात्र चांगला माहितगार बघा, कारण नाहीतर कार्बोरेटर ट्यून करायच्या नावावर काहीतरी भलतंच करतात आणि मायलेजची पार वाट लागते.

In reply to by नानबा

धन्स प्रथम, पण कर्बोरेटर घरच्याघरी कस साफ करू? कारण त्यातल काही कळत नाही... सध्या एका मेक्यानिक ने ट्युन करून दिली आहे कर्बोरेटर ची सेटिंग, आता गाडी व्यवस्थित चालू आहे सध्यातरी (पण पिक अप कमी झाला आहे आधी पेक्षा) पण समजा लांब न्यायची झाली गाडी तर ती सेटिंग बिघडू शकते का ? परत काही बिघाड झाला तर याच टेन्शन आहे ?

In reply to by सौरभ उप्स

घरच्या घरी कार्बोरेटर साफ कसा करावा हे http://www.instructables.com/id/Cleaning-a-Carburetor-in-8-Easy-Steps/ या लिंकवर वाचता येईल. अगदी फोटोंसह दिलं आहे, ते पाहून कर. कार्बोरेटर चा मुख्य प्रॉब्लेम काढताना आणि पुन्हा जोडताना होतो. एकदा निघाला की आतमध्ये नंतर जोडताना जमणार नाही इतकी गुंतागुंतीची रचना अजिबात नाही. फक्त काढताना कोणता स्क्रू कुठून काढला, आणि आतली रचना नीट लक्षात ठेव. (पहिल्यांदा मी इथेच घोळ घातला होता.) सोबत एका वाटीत थोडं पेट्रोल घे, आणि कार्ब उघडल्यावर आतला फ्लोट बाहेर काढून तो पेट्रोल मध्ये टाकून ठेव. एखाद्या जुन्या टूथब्रश किंवा कोणत्याही लहान ब्रश पेट्रोलमध्ये बुडवून या ब्रशने कार्बोरेटर नीट साफ कर. नंतर पुन्हा फ्लोट, स्प्रींग इ. अंतर्गत भाग नीट लावून पुन्हा कार्बोरेटर जुळव आणि लावून टाक. वर दिलेली लिंक वाचून हे सहज करता येईल. पहिल्यांदा करताना अर्धा तास लागेल. आणि हो, कार्बोरेटर लावून गाडी चालू करून त्याचा आयडल १००० आर.पी.एम. वर सेट कर. झाला कार्बोरेटर साफ आणि ट्यून. :)

In reply to by स्पा

हो, अगदी सहज करता येतो. आपल्या बाईक्स मध्ये एयर फिल्टर रायडर सीटच्या खालच्या बाजूला असतो. एयर फिल्टर साफ करण्यासाठी लागणारी टूल्स आणि इतर सामान - १. ८ मिमि चा स्पॅनर. २. एयर ब्लोअर (नसला तरी हरकत नाही.) ३. रॉकेल ४. पेट्रोल ५. WD40 (एक प्रकारचं ऑईल आहे. कुठल्याही हार्डवेअर दुकानात सहज मिळतं. घेऊन ठेव, प्रचंड कामाची गोष्ट आहे.) एयर फिल्टर साफ करण्याची कृती (फोटो पल्सर चे आहेत, पण कृती सारखीच) - १. बाईक मेन स्टँडला लाव आणि सीटच्या खालचे दोन्ही पॅनल्स काढ. (तुझ्या बाईकला कोणत्या बाजूला फिल्टर आहे बघावा लागेल. बर्‍याच बाइक्समध्ये ज्या बाजूला बॅटरी आहे त्याच्या विरुद्ध बाजूला एयर फिल्टर असतो.) s २.खालच्या फोटोतल्यासारखा एक पार्ट दिसेल, त्याचे बोल्ट्स काढ आणि झाकण उघड. a ३. आतमध्ये असे स्पंज असतील. हा आपला एयर फिल्टर. ते स्पंज बाहेर काढ. q w e ४. पांढर्‍या आणि पिवळ्या स्पंजच्या मध्ये आधारासाठी प्लॅस्टिकची जाळी असते ती बाहेर काढ. r याशिवाय गाडीमध्ये इंजिनाच्या बाजूला एक बारीक जाळी असेल, तीसुद्धा बाहेर काढ. t ५. रॉकेल आणि पेट्रोल वापरून दोन्ही स्पंज स्वच्छ करून घे. y y भरपूर रॉकेल आणि पेट्रोल मार, किंवा सरळ त्यात बुडवून ठेव. आणि ते फाटणार नाहीत इतपत दाब देऊन नीट पिळून त्यातलं रॉकेल आणि पेट्रोल काढून घे. a a a ६. स्पंज व्यवस्थित साफ झाल्यानंतर स्पंजच्या मधली आणि इंजिनाकडची अशा दोन्ही जाळ्यासुद्धा साफ कर. a a ७. आता दोन्ही स्पंजवर इंजिन ऑईलचे काही थेंब टाकून ते नीट अख्ख्या स्पंजवर पसरून घे. तसं कोणतंही तेल चालतं, पण शक्यो इंजिन ऑईल उत्तम कारण एक तर त्याचा चिकटपणा जास्त असल्यामुळे धूळ चिकटण्यास मदत होते, आणि हे ऑईल जास्त तापमानावर जळत नाही. a a ८. आता दोन्ही जाळ्या आपापल्या जागी बसव, आणि असेंब्ली पुन्हा जुळव. a a झाला तुझा एयर फिल्टर साफ. जास्तीत जास्त १० मिनीटं लागतील. :)

In reply to by नानबा

फुल पाककृती सारखी डिटेल मध्ये कृती दिलीस कि :) ५० चा भाचा शोभतोस गुरुदेव या रविवारी नक्की भेटूया :)

In reply to by स्पा

@गुरुदेव या रविवारी नक्की भेटूया >>> http://www.easyfreesmileys.com/smileys/free-confused-smileys-490.gif
सावधानप्रथम फडणीस>>>सावधान
=)) .... =)) .... =)) फिल्टर साफ करायचा रेट डोक्यात ठेऊन जा हो फडणीस...आपलं प्रथम सांगितलेलं बरं ;)

In reply to by स्पा

@तुम्ही फकस्त उभं राहून मार्गदर्शन करा >>> =)) वाचलात हो वाचलात फडणीस,तरी तुंम्हाला द्यायला लागणार्‍या उभ्या फोडणीचे पैसे घ्याच...! =)) ज्ञान तर अजिबात फुकट देऊ नये,असे म्हणतात. :-p

In reply to by अत्रुप्त आत्मा

तरी तुंम्हाला द्यायला लागणार्‍या उभ्या फोडणीचे पैसे घ्याच...!
हे मात्र नक्की वसूल केलं जाईल. :))

In reply to by स्पा

५० चा भाचा शोभतोस तुझ्यामुळे कळलं हो स्पा की हा ५० चा भाचा आहे. बाकी चालू द्या.

In reply to by ५० फक्त

>>सुड, त्यांच्याचमुळं आम्हाला तुमच्या नातेवाईकांबद्दल सुद्धा कळलं होतं, कोण नातेवाईक हो ते? आठवत नाहीय मला.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तुमचे खुप पैसे वाचत असतील ना हो फडणीस साहेब
:)) खरंय. गाडी आणि तिच्या कामात रस असल्यामुळे बर्‍याचशा गोष्टी घरीच करतो.

In reply to by नानबा

मग आमच पण एक काम करा की राव,माझी होंडा ड्रिम युगा मायलेज द्यायच नाही म्हनते,काय करु सांगा ना. कंपनीच्या शोरुम मध्ये प्रॉब्लेम सांगीतला तर त्यांनी ८० च मायलेज काढल् आता बोला, कंपनीने ७२ च ड्रिम मायलेज सांगीतलय ह्यांनी तर त्यापुढे उडी मारलीये http://www.honda2wheelersindia.com/dreamyuga/about.html

In reply to by यशोधरा

तो फोटो त्यांचा स्वताचा नाहीये त्यांनी फक्त फोटो काढले आहेत,फोटोतली व्यक्ती दुसरी आहे. हो की नाही हो फडणीस साहेब

In reply to by नानबा

प्रथमा: मान गये बॉस... अतिशय माहितीपूर्ण आहे हे सगळ, एअर फिल्टर साफ करायची कृती पण जबर्या.....