Skip to main content

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/04/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं. बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते. बाकी इतरही बरेच प्रश्न असतात उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे. ५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या. पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून) २. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे ३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो ४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक . माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती. पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.) अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात . आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता. नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते . गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई. याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल . आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे . अजून एक दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल . बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच धन्यवाद

वाचने 150712
प्रतिक्रिया 358

प्रतिक्रिया

हेल्मेटला आणि बॅग ला रेडियम च्या पट्ट्या लावून घ्या .. सामान २ बाजुला समान वजना मधे विभागून लावा .. वेगामधे वळणावर जर सामान एका बाजुला लावले असेल तर पडण्याची शक्यता असते.. प्रवास मोठा असेल तर कॅरीयर बसवणे सर्वात उत्तम .. १००० किमि पेक्षा मोठा प्रवास असेल तर डबल सीट करू नका ..

माझ्या कडे CBZ इक्सट्रिम आहे. दोन वर्ष झाली जवळ जवळ १२५०० किमी झाले आहे चेन्नई शहरा मध्ये मस्त ४५-४७ आव्र्रेज देते आहे , फक्त इंडिअन ऑंईल कंपनी चे पेट्रोल टाकतो (५०० रु चे पेट्रोल टाकले तर नित्रोजन ऐअर फ्री भरून देतात ) मस्का चालते आणि डिस्क ब्रेअक पण मस्त आहे (डिस्क ब्रेंक आणि रेअर ब्रेअक चा एकत्र वापर करतो ) एकटे जाणार असाल तर मस्त आहे

सोप्पा उपाय म्हणजे नेहमी अधिकृत सर्विस सेंटरमध्ये सर्विसिंग करावे. इंजिन आणि कार्ब्युरेटरची कामे अधिकृत सर्विस सेंटरमधून करावीत. बाकीची कामे रोडसाईड मेकॅनिककडून करून घ्यावीत.

सर्विस सेंटर मध्ये/ मेकानिक लोक बाईकची सर्विसिंग करतात म्हणजे नेमके कायकाय करतात? कुणी स्टेप-बाइ-स्टेप मार्गदर्शन करू शकेल काय?

In reply to by वामन देशमुख

दुचाकीसंदर्भात.. १) सर्वप्रथम गाडी स्वच्छ धुतात. २) गाडी चालू करून विचित्र आवाज, धूर, मर्यादेपेक्षा जास्ती असलेले व्हायब्रेशन, गाडीचे संतुलन, अकारण आवाज करणारे भाग यांची तपासणी होते ३) गाडीचे हेडलाईट (अप्पर व डीपर), हॉर्न, टेललँप, इंडीकेटर, ब्रेकलाईट वगैरे भागांची तपासणी. गरज लागली तर मेकॅनीक एखादी रपेट मारून येतो. (या रपेटीदरम्यान आपण सोबत जायचेच्च जायचे!) ४) फिल्टर साफ करणे - प्रथमने ही कृती स्टेप बाय स्टेप दाखवली आहे ५) इंजीन ऑईल चेक / बदली / टॉप अप. ६) मुद्दा २ व ३ दरम्यान निघालेले पिराब्लेमचे निराकरण ७) क्लच / ब्रेक / गियर केबलचे सेटींग ठीक ठाक करणे ८) शक्य त्या सर्व स्प्रिंगना ऑईल देणे ९) गरज आहे त्या बॉलबेअरींगना ग्रीजींग १०) चेनची देखभाल व गरजेनुसार तिला टाईट करणे ११) इंजीनचे आयडलींग चेक करणे, फाईनट्यून करणे १२) बॅटरी चेक करणे १३) बॅटरीचे चार्जींग चेक करणे व तो प्रॉब्लेम निस्तरणे शक्यतो सर्व्हीसींग सेंटर करत नाही. हवा भरणार्‍याप्रमाणे ते काम (व शॉक अ‍ॅब्सॉर्बरचे काम) बहुतेकवेळा आऊटसोर्स केलेले असते. १४) अत्यंत दुर्लक्षीत कामे उदा शॉक अ‍ॅब्सॉर्बर ऑईल चेक करणे, खुळू खुळू वाजणारे सर्व भाग आपापल्या ठिकाणी फिट्ट बसवणे वगैरे कामे. यानंतर मे़कॅनीक सायेब गाडीची खास "च्येकींग" करतात, उदा. गाडी मेन स्टँडला लावून मागच्या चाकावर भार देवून (टेक ऑफच्या पोझीशनमध्ये!) पुढचे चाक मागच्या चाकाच्या दिशेमध्ये राहते आहे की एका साईडला कलते आहे ते पाहणे मेकॅनीकने उत्साहाच्या भरात ब्रेक "लै टैट" केले आहेत का..? हे चेकवणे. गाडी सुरू करून, इंजिना जवळ डोके नेवून किंवा इंजिनाला कान (अलमोस्ट) चिकटवून इंजीनाच्या आवाजात कसकस जाणवते आहे का हे पहाणे...वगैरे वगैरे.... मुद्दा २ व ३ प्रमाणे पुन्हा डीट्टेल चेकींग. (काही विसरले असल्यास कृपया भर घालावी!)

In reply to by मोदक

तुम्ही लिहिली आहे ती आदर्श कृति जी केली पाहिजे ती आहे सगळे सेर्विस सेंटर्स , बहुतेक कायमच एवढेच करतात १) सर्वप्रथम गाडी स्वच्छ धुतात. -- हे शेवटी करतात २) गाडी चालू करून विचित्र आवाज, धूर, मर्यादेपेक्षा जास्ती असलेले व्हायब्रेशन, गाडीचे संतुलन, अकारण आवाज करणारे भाग यांची तपासणी होते -- हे करतात पण गाडीचे काही खरे नाही असे भासवतात ३) गाडीचे हेडलाईट (अप्पर व डीपर), हॉर्न, टेललँप, इंडीकेटर, ब्रेकलाईट वगैरे भागांची तपासणी. -- हे नक्कीच करतात गरज लागली तर मेकॅनीक एखादी रपेट मारून येतो. (या रपेटीदरम्यान आपण सोबत जायचेच्च जायचे!) ४) फिल्टर साफ करणे - प्रथमने ही कृती स्टेप बाय स्टेप दाखवली आहे -- हे जर तक्रार केली तरच करतात ५) इंजीन ऑईल चेक / बदली / टॉप अप. -- हे मात्र गरज नसली तरी करतात ६) मुद्दा २ व ३ दरम्यान निघालेले पिराब्लेमचे निराकरण -- पास ७) क्लच / ब्रेक / गियर केबलचे सेटींग ठीक ठाक करणे -- हे जर तक्रार केली तरच करतात ८) शक्य त्या सर्व स्प्रिंगना ऑईल देणे -- मला तरी अजून कुणी हे केले आहे म्हणून सागितले नाही ९) गरज आहे त्या बॉलबेअरींगना ग्रीजींग -- ह्याबद्दल कल्पना नाही १०) चेनची देखभाल व गरजेनुसार तिला टाईट करणे -- हे जर तक्रार केली तरच करतात ११) इंजीनचे आयडलींग चेक करणे, फाईनट्यून करणे -- मी एकदा विचारले होते ५००० रु खर्च येयील म्हणून सागितलं १२) बॅटरी चेक करणे -- हे करतात स्टेप ३ मध्ये हे होवून जाते १३) बॅटरीचे चार्जींग चेक करणे व तो प्रॉब्लेम निस्तरणे शक्यतो सर्व्हीसींग सेंटर करत नाही. हवा भरणार्‍याप्रमाणे ते काम (व शॉक अ‍ॅब्सॉर्बरचे काम) बहुतेकवेळा आऊटसोर्स केलेले असते. १४) अत्यंत दुर्लक्षीत कामे उदा शॉक अ‍ॅब्सॉर्बर ऑईल चेक करणे, खुळू खुळू वाजणारे सर्व भाग आपापल्या ठिकाणी फिट्ट बसवणे वगैरे कामे. -- हे फक्त पुढचे हेंड लाईट चे टवळ हलत असेल तर करतात यानंतर मे़कॅनीक सायेब गाडीची खास "च्येकींग" करतात, -- हे मात्र नक्की करतात आणि तुमचे गाडी मारायला टेकली होती ती आम्ही वाचवली आसे दाखवतात उदा. गाडी मेन स्टँडला लावून मागच्या चाकावर भार देवून (टेक ऑफच्या पोझीशनमध्ये!) पुढचे चाक मागच्या चाकाच्या दिशेमध्ये राहते आहे की एका साईडला कलते आहे ते पाहणे मेकॅनीकने उत्साहाच्या भरात ब्रेक "लै टैट" केले आहेत का..? हे चेकवणे. गाडी सुरू करून, इंजिना जवळ डोके नेवून किंवा इंजिनाला कान (अलमोस्ट) चिकटवून इंजीनाच्या आवाजात कसकस जाणवते आहे का हे पहाणे...वगैरे वगैरे.... मी दर दोन महिन्यांनी सर्विसिंग करून घेतो दर वेळी इंजिन ओइल आणि ब्रेअक ओइल संपल आहे म्हणून सागतात आणि नवीन घातलं म्हणून सागतात, आणि दर वेळी नवीन काहीतरी शोधून काढतात आणि जुनी सर्विसिंग जर दुसरीकडे केली असेल तरी त्याने फसवले आणि त्यांच्याकडे केली असेल तर काहीतरी चूक झाली असेल म्हणून सांगतात

In reply to by खबो जाप

जीनचे आयडलींग चेक करणे, फाईनट्यून करणे -- मी एकदा विचारले होते ५००० रु खर्च येयील म्हणून सागितलं
:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O च्यायला माझ्या गाडीच्या ३ वर्षाच्या ट्युनिंग चा खर्च पण येवढा येणार नाही. अहो आयडलिंग आणि ट्युनिंग तुम्ही घरी करु शकता. कार्ब्युरेटर ला सेट स्क्रु दिलेला असतो त्याच्यावरती ह्या अ‍ॅडजस्ट्मेंट करता येतात. असल्या भुरट्या मेक्यानिक पासुन गाडीला लांबच ठेवा.

चला अजरामर झाला हा धागा. आणि वर स्पाची झैरातपण झाली मॅचो म्हणुन. काही म्हणा फक्त आणि फक्त पुरुषांचा धागा झाला. सेम थ्रील, सेम इंटरेस्ट अन गप्पा किती मन लावुन केल्यात.

काही म्हणा फक्त आणि फक्त पुरुषांचा धागा झाला. सेम थ्रील, सेम इंटरेस्ट अन गप्पा किती मन लावुन केल्यात.
बायकांना "नो वेण्त्री" चा बोर्ड लावलेला नव्हता ;) आणि चर्चा फक्त दुचाकीची नाहीये, चारचाकी वर पण आहे असो तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ? ;)

In reply to by स्पा

असो तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ? >>> येस ..येस ... परिपूर्ण सहमत ;)

In reply to by स्पा

+१११११११११११११११११११. या बायकांना बाकी किरकिर केल्याशिवाय चैन कशी ती पडत नै बॉ =)) (मरतंय आता-बॅटमोबील घेऊन सूट बघू लौक्कर)

In reply to by स्पा

तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ?
तुम्ही कशापायी बोलाल? तुम्ही चूपचाप तो धागा वाचून ते प्याक तुमच्या चेहर्‍यावर चोपडले असणार! :P

गाडीच्या चाकात नायट्रोजन भर.... १. रोड वर ग्रीप मस्त मिळते. २. लाँग रूट ला टायर थंड रहातात (जर नुसतीच हवा भरली असेल तर लवकर हवा गरम होऊन तायर फुटतात). ३. टायर झीज कमी होते.

मपल्याकडे पल्सर १५० आहे. एव्हरेज मिळत्ट ५०-५२ च्या रेन्ज मध्ये. अर्थात शहरात चालवत असल्याने स्पीड ४०-६० मध्येच असतो. हायवे ला अ‍ॅव्हरेज कमी होतं. कारण स्पीड आपोआपच ७०-८०-९० ह्या रेन्ज मध्ये असतो. रेग्युलर सर्व्हिसिन्ग (साधारण ३ ते साडेतीन हजार किमी रनिन्ग) करुन घेतो. नेहमी एकाच सर्व्हिस सेन्तर मध्ये. म्हणजे ओळख राहते. उगाच पैशे उकळत नाहीत. ऑइल चेन्ज साधारण ३५०० ते ४००० च्या रेन्ज मध्येच. (कंपनीने चक्क १०००० किमी दिलय?? पण माझा विश्वास नाही) नॉयट्रोजन भरल्याने गाडी चांगली ग्रीप कशी घेते? (तसही साध्या हवेत ७८ टक्के नायट्रोजन असतोच की मग वरच्या २२ टक्क्याने नेमका काय फरक पडतो) त्यावेळी टायरमधे हवेचं प्रेशर किती ठेवायचं?

नॉयट्रोजन भरल्याने गाडी चांगली ग्रीप कशी घेते? (तसही साध्या हवेत ७८ टक्के नायट्रोजन असतोच की मग वरच्या २२ टक्क्याने नेमका काय फरक पडतो) त्यावेळी टायरमधे हवेचं प्रेशर किती ठेवायचं?
असेच बोलतो. पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये हवा भरून देतात , ते नाय्त्रो वाले असतात काय

In reply to by स्पा

पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये हवा भरून देतात , ते नाय्त्रो वाले असतात काय - नाही,त्या हवेतला नायट्रोजन काढुन वेगळ्या टाकित साठवुन वेगळा विकतात. असो, आजकालच्या दुचाकी किंवा चारचाकी, सगळ्याच गाड्यांचा कोणता ना कोणता भाग हा एकत्र सैन्यदलांसाठीचे किंवा रेसिंगच्या क्षेत्रात होणारे आर अँड डि चे देणे आहेत. नायट्रोजन भरणं हा त्यापैकीच एक, अमेरिकेत होणा-या नासकार सारख्या काँक्रिट सरफेस वर होणा-या स्पिड कम ड्रॅग रेस मध्ये याची सुरुवात झाली. अर्थात सामान्य गाड्यांना याने फार फरक पडत नाही, नियमित समजुतीच्या विरुद्ध आश्चर्यकारकरीत्या टायर फुटणे याचा संबंध हवा कमी भरण्याशी जास्त आहे, हवा जास्त भरण्याशी नाही. याबद्दल परत लिहिन,

या सगळ्या चर्चे मधे आमच्या आवडत्या स्प्लेंडर बद्दल कोणीच काही बोलु नये? १५ वर्षां झाली गाडीला दर तीन महिन्यांनी सर्व्हीसिंग करुन घेतो बाकि कोणताही खर्च नाही गाडीला. २०,००० कि.मी नंतर बळेच टायर बदलले होते. शहरात अ‍ॅव्हरेज ५० पर्यंत. पण शहरा बाहेर ५५-५८ पर्यंत सहज जातो. लाँग ड्राइव्हला पण काही त्रास देत नाही. त्या मुळे दुसरी पण सुपर स्प्लेंडरच घेतली आहे. वो भी मक्खन जैसे चलती है. आता हिरो होंडा जाउन नुसते हिरो राहिल्याने काय फरक पडला आहे ते माहित नाही.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आता हिरो होंडा जाउन नुसते हिरो राहिल्याने काय फरक पडला आहे ते माहित नाही. - एक दोन वर्षात दिसतील फरक, पहिला पडला तो, बजाज डिस्कव्हर फॅमिलीने हिरो पॅशन फॅमिलिला ओव्हरटेक केले, सगळ्यात जास्त विकल्या जाणा-या गाडीच्या रेसमध्ये.

In reply to by ५० फक्त

५० राव, या निमित्ताने भारतातल्या दुचाकींच्या सुरुवातीपासून आताच्या अत्याधुनिक बाईकपर्यंत नेणारी एखादी लेखमाला सुरु करा.

दुचाक्यांविषयी भरभरून बोलले (ऊप्स.. बोलल्या) गेले आहे. चारचाकीवर बोला कुनीतरी. पेट्रोल अन् डीझेल च्या मोडेल मध्ये दीड-दोन लाखाचा फरक असतो. तर इंधनावर खरंच तेव्हढी बचत होते का? पुन्यात डीझेल=५२ रुप्रलि अंदाजे अन् पेट्रोल = ७४ रुप्रलि अंदाजे स्विफ्टसारखी गाडी: डीझेल=२०किमी प्रलि= २० किमी प्रती ५२ रु= २.६ रु प्रति किमी पेट्रोलः १७ किमी प्रलि=१७ किमी प्रती ७४ रु= ४.३५ रु प्रति किमी प्रती किमी १.७५ रु ची बचत. तेसुद्धा सरकार अनुदान देतंय म्हणुन. रोज ५०किमी चालवणारा माणुस ९०रु वाचवाणार. म्हणजे २५०० प्रती महिना. दीड लाख अतिरिक्त खर्चून महिना २५०० वाचवायचे? तेपण रोज ५० किमी चालवणे होत असेल तर. शिवाय डीझेल कारचा देखभाल खर्च पेट्रोल कार पेक्षा अधिक असतो, असे ऐकले आहे. डीझेल गाडी प्रदूषण जास्त करते, ते वेगळेच. एकुणात.. डीझेल कार पेट्रोल कारच्या तुलनेत परवडते काय?

In reply to by तुषार काळभोर

एका वेगळ्या धाग्याचा विषय, सध्या एवढेच, सध्या सर्वात स्वस्त सिएनजी,त्यानंतर डिझेल, त्यानंतर पेट्रोल. आणि हो हल्ली मेंटेनन्स्चा खर्च पेट्रोल डिझेलचा सारखाच येतो, फार फरक नाही.

गवी काका या धाग्यापासून काही कारणाने लांब राहिले आहेत नाहीतर त्यांनी मदत केली असती असो आपले ५०, आणि शैलेंद्र काका आहेत :)

In reply to by स्पा

इतका वेळ बाईकवर बसून बसून प्रवास करणार म्हटल्यावर मला मायलेज आणि इंजिनात घालण्याच्या विविध वंगणांपेक्षाही "कैलास जीवन", "हडेन्सा", आदिंचा विचार मनात येतो आहे. A A

In reply to by मोदक

जवळपास हवालदार आहे का त्यावर ठरवावे. जवळ असल्यास आणि १०-१२ सेकंदाच्यापेक्षा जास्त वाट बघायची असल्यास बंद करण्यास हरकत नसावी.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

दुचाकीला १० सेकंद आणि चारचाकीला १५ सेकंद ह्याच्यापेक्षा कमी वेळ असेल तर गाडी बंद करुन किंवा न करुन किमान इंधनबचत तरी होत नाही, कारण बंद असलेले इंजिन सुरु होताना लागणारे जास्तित जास्त इंधन हे या वेळेत शांतपणे चालणा-या इंजिनात जळणा-या इंधनाएवढे किंवा त्यापेक्षा कमी असते. अर्थात गाडीचे स्पार्क प्लग हा या मधला सर्वात मोठा फॅक्टर आहे. स्पार्क प्लगचे क्लिअरन्स हा एक पार्ट वर सर्विसिंगच्या प्रतिसादात राहुन गेला आहे, ज्यांनी जानदार सवारी लुना वापरली आहे त्यांना ह्याचे महत्व माहित असेलच. बाकी, लुना हा शब्द टाइपताना देखील हात थरथरत आहेत, टिएफार प्लस ही निदान माझ्या पिढितल्या कित्येंकांची पहिली गाडी असेल.

ओ ते बाइक ला बाजूला बॉक्स बसवतात ते कोथरूड साइड ला किंवा पुण्यात कुठे मिळेल? लॅपटॉप कॅरी करून करून पाठ दुखायला लागलिये.

In reply to by काळा पहाड

लॅपटॉप कॅरी करून करून पाठ दुखायला लागलिये. सॅकचे स्ट्रॅप्स अ‍ॅडजेस्ट करा. सॅक तुमच्या खांद्यातून निसटली जावू नये आणि ती मागच्या सीटवर / मागच्या व्यक्तीच्या मांडीवर व्यवस्थीत टेकली जावी इतपत सैल ठेवावेत. (तुम्ही मागे बसणारी व्यक्ती असाल तर लॅपटॉप सॅकमध्ये डबल कुशन ची व्यवस्था करा अन्यथा कॅरीयरवर सॅक आदळून आदळून लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते)

In reply to by काळा पहाड

तसा विचार करायचा तर रोज कॅब हायर करून घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास केला तर सर्वात चांगले. धूळ, धूर, वाढते प्रदूषण वगैरे शहराच्या भूषणांशी सामना होत नाही. आपण आपली आवडती गाणी ऐकत आरामात मागे बसून राहू शकतो. आणि सर्वात महत्वाचे लॅपटॉप सॅक बाजूच्या सीटवर आरामात पहूडलेली असते! ;-) (संपूर्ण सल्ला हलका घ्यावा!) ---तुम्ही सॅक वापरता आहातच तर त्यातल्या त्यात सोयीची कशी पडेल या विचाराने स्ट्रॅपचा सल्ला दिला होता हो, मला व्यक्तीशः गाडीला आणखी काही जोडलेले (अगदी हेल्मेट लॉक होल्डर सुद्धा!) आवडत नाही. सॅडल बॅग/बॉक्स लै लांबची गोष्ट आहे. (हे माझे व्यक्तीगत मत आहे)

In reply to by मोदक

बाईकच्या बाजुला साईड बॉक्स किंवा सॅडल बॅग बसवतात त्यांचा विचार लॅपटॉप ठेवण्यासाठी अजिबात करु नका. सुरक्षेच्या कारणास्तव बाकी काही नाही. त्यापेक्षा मोदकने लिहिलंय तसं स्ट्रॅप अ‍ॅडजस्ट करुन बॅग मागं टेकवा सिटाला म्हंजे तुमच्या खांद्यावर किंवा पाठीवर लोड येत नाही. माझ्या रेड मर्क्युरीचं सिट यासाठी एकदम परफेक्ट आहे, समोरचं खाली गेलेलं आणि मागचं वर, बजाजांनी सांगितल्याप्रमाणे 'feel like god' लई भारी.

सर्विसिंग झाली ३६ वर घसरलेला मायलेज आता ४५ पर्यंत आलाय :) म्या जाम खुश है

काहीसे अवांतर. नुकत्याच ठाण्यात झालेल्या एका डिस्प्लेमधे पाहिलेल्या या हार्ले डेव्हिडसन आणि अकिला कशा वाटताहेत ? यांची देखभाल कशी पडत असेल ?? A B C

पूण्यात हापिसाच्या रस्त्यालगत दिसली होती.. हारलेल्या डेविड्सन इतकी भन्नाट नाहीये पण आवडेश झाली. st71 st72

आपल्या दुचाकी वाहना बाबत तज्ञा कडुन सल्ला हवा आहे. Activa Honda & Access 125 या मध्ये वापरण्यास उत्तम पर्याय कोणता या बाबत तज्ञाचे मार्गदर्शन हवे आहे.

In reply to by अनिरुद्ध प

तज्ञ म्हणणार नसाल तर माहीत असलेली माहिती देतो,
  • दोन्ही गाड्या छान आहेत
  • जर तुमची उंची चांगली असेल तर होंडा अ‍ॅव्हीएटरचा विचार करा, या गाडीला होंडा अ‍ॅक्टीवाचेच इंजीन आहे पण सिटींग थोडे वरती आहे, शिवाय पुढचे चाक मोठे आहे त्यामुळे गाडी स्टेबल राहते
    • अ‍ॅक्सेस १२५चे इंजीन आधिक शक्तिशाली आहे, त्यामुळे पिकप चांगला मिळतो.
  • स्पेअरपार्ट व सर्विसींग्चे जाळे होंडाचे चांगले आहे
  • थोडक्यात दोन्हीही चांगल्या गाड्या आहेत, चालवून बघा, तुम्हाला आवडेल ती घ्या

शैलेन्द्र, आपले मनह पुर्वक आभार्,तसेच आपलि विनम्रता स्प्रुहणीय्,माहिती आवड्ली.

बापरे लाजणे तर अप्रतिम.

दुचाकिचा कार्बोरेटर किती दिवसातून साफ करावा? त्याचे फायदे काय? आमचा मेक्यानिक कार्बोरेटर साफ करायला नेहमी नकार देतो व साफ केल्यास सरासरी कमी येइल अस म्हणतो. हे खर आहे का??

बाईकचे जुने टायर्स खराब झाल्यामुळे ट्युबलेस टायर्स बसवायचा विचार आहे. पल्सर असल्याने अ‍ॅलॉय व्हील्स आहेत. एक दोन ठिकाणी चौकशी केली कुणी म्हणे फक्त मागच्या चाकालाच ट्युबलेस टायर बसवावा, पुढच्या चाकाचे फिटींग नीट होत नाही, टिकतही नाही. तर कुणी म्हणे दोन्ही टायर्स उत्तम रिझल्ट देतात. कुणी योग्य मार्गदर्शन करेल काय?

माश्री फोडणीस काका यावर उत्तम मार्गदर्शन करू शकतील परवाच त्यांच्याकडून कोकण दौर्यासाठी जबराट बंजी कॉड आणल्या आहेत. आता त्यावर ब्यागाच काय अक्खा हत्ती सुद्धा बांधून घेऊन जाऊ शकतो :)

In reply to by प्रचेतस

अ‍ॅलॉय व्हील्स आहेत ना? मग फार काऴजी नाही. १७ इंचाचे कुठलेही ट्युबलेस टायर बसतील. पुढच्या चाकासाठी MRF ZFS Tubeless किंवा Michelin PILOT SPORTY Tubeless तर मागच्या चाकासाठी CEAT Vertigo RAGE किंवा SPORT, MRF Zapper C अथवा Zapper VYDE मिळतील. पुढच्या टायरला ट्रेड पॅटर्न फारसा बदलत नाही, त्यामुळे वरील पैकी कोणताही चालेल. (शक्यतो MRF च घ्या.) हा MRF ZFS Tubeless - a आणि हा Michelin PILOT SPORTY Tubeless - s मागील टायरसाठी मात्र ट्रेड पॅटर्न बघून घ्या. तुमच्या चालवण्याची स्टाईल, रस्ते यावर ट्रेड पॅटर्न निवडा. हा CEAT Vertigo SPORT आणि RAGE - a MRF Zapper C - w MRF Zapper VYDE - q आपल्या कडचे रस्ते आणि इतर स्थितींमध्ये भारतीय बनावटीचे टायर्स जास्त उत्तम चालतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे उगाच Michelin, Bridgestone, Pireli असल्या निष्कारण महागड्या ब्रँड्स कडे जाण्यापेक्षा CEAT किंवा MRF कधीही उत्तम.

In reply to by नानबा

धन्स रे प्रथम. आता हा ट्रेड पॅटर्न कसा निवडायचा? म्हणजे कुठले रस्ते / चालवण्याची स्टाईल यावर कुठला पॅटर्न वापरणे जास्त योग्य ठरेल? आता माझा हापिसचा रोजचा रस्ता बर्‍यापैकी चांगला आहे तर काही वेळा भटकायला जाताना खडबडीत रस्त्यांनी जावे लागते. आणि चालवण्याची स्टाईल म्हणशील तर उगाच जोरात बाईक चालवणे, कट मारणे, शार्प टर्न्स घेणे असले प्रकार मी करत नाही.

In reply to by प्रचेतस

चांगल्या आणि थोड्याफार खडबडीत रस्त्यांना Zapper पॅटर्न चांगला असतो. एक तर हा पॅटर्न गाडी चालवण्याच्या दिशेनुसार बनवलेला असल्यामुळे त्याला ग्रीप तर उत्तम मिळतेच, शिवाय त्यात काही लहानसहान गोष्टी (छोटे दगड, खिळे इ.) अडकल्यास गाडीच्या वेगामुळे आपोआप निघून जाण्यास मदत होते. आणि तुम्ही शार्प टर्न्स घेत नसलात तर हा पॅटर्न व्यवस्थित आहे. माझ्या पल्सर २२० ला स्टॉक मध्ये MRF Zapper आहेत. गाडी १६००० किमी च्या आसपास चालूनसुद्धा अजून झिजणे किंवा बदलण्याची वेळ आलेली नाही. म्हणूनच मी MRF टाका असं म्हटलं. काही दिवसांपूर्वी एका मित्राने त्याच्या बाईकला Michelin M45 टाकला. पण त्याला Wet Grip जवळपास शून्य आहे. पावसाळ्यात प्रचंड घसरण्याचे प्रताप झाल्या नंतर पुन्हा MRF वरच आला. त्यामुळे सर्वार्थाने MRF चे टायर्स उत्तम आहेत.

In reply to by नानबा

धन्स रे. सध्याचा MRF Zapper च आहे. ५०,००० किमी आणि जेमतेम ३/४ पंक्चर्स झाली बेट्याला. आता अतीव म्हातारपणामुळे निवृत्त करून टाकतो आणि त्याचीच नवीन पिढी घेईन म्हणतो.

In reply to by प्रचेतस

Zapper जब्राटच आहेत. आणि ट्यूबलेस Zapper तर एकदम ब्येष्ट. पहिले १५००० किमी पर्यंत तर पंक्चरसुद्धा होत नाहीत. फक्त हवेच्या ऐवजी त्यात नायट्रोजन भरा. भन्नाट परफॉरमन्स देतात टायर्स.

In reply to by प्रचेतस

' चालवण्याची स्टाईल म्हणशील तर उगाच जोरात बाईक चालवणे, कट मारणे, शार्प टर्न्स घेणे असले प्रकार मी करत नाही.' अर्थात पल्सरवर मांडी घालुन बसल्यावर हे प्रकार कुणालाच करता येत नसावेत असं वाटतं.

In reply to by ५० फक्त

पल्सरवर मांडी घालुन बसल्यावर हे प्रकार कुणालाच करता येत नसावेत असं वाटतं.
वल्ली पण? एक अगदी बालिश शंका आहे. गिअर्स आणि ब्रेक कसे काय वापरतो ब्वॉ तो?

In reply to by पैसा

मी नाय हो. मी आपला व्यवस्थित गाडी चालवतो. सर्व नियम पाळून.

डिस्कव्हर १०० टी . आज बरोब्बर एक महिना झाला गाडी घेऊन . आयुष्यातली पहिलीच गाडी . त्यामुळे माझ्या घाणेरड्या रायडींग स्किल मध्ये सुद्धा ७४ चा मायलेज देतीये ( विना सर्विसिंग ) . . आज सर्विसिंग ला टाकेन . एक मित्र म्हणाला पहिली सर्विसिंग झाल्यावर मायलेज वाढतो आणि इंजिन पण अजून चांगलं चालायला लागतं . खरंय का ?

खरय रावसाहेब. तुम्हाला चालवताना फरक जाणवेलच.. ऑइल चेन्ज करा पहिल्या सर्व्हिसिन्गला. अधिकृत ठिकाणीच सर्व्हिसीन्ग करुन घ्या. कमीत कमी सगळे फ्री सर्व्हिसीन्ग तरी. मला वेळ नसतो, मी गाडी सोडुन नाही जाउ शकत अशा सबबी सांगौन गाडी डोळ्यादेखतच सर्व्हिसिन्ग करुन घ्या.