दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच
हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं.
बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते.
बाकी इतरही बरेच प्रश्न असतात
उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे.
५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या.
पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून)
२. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे
३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो
४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक .
माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती.
पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.)
अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात .
आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता.
नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते .
गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई.
याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल .
आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो
परत कोकण दौरा आखलेला आहे .
४/५ दिवसात १२०० किमी .
मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर
आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं.
तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .
अजून एक
दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D
त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल .
बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच
धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
युनीकोर्न नको
सुहासदादा >>
वाश्या नगं. सुहास ठीक हाय.
वाश्या दादा
अरे स्पा, फक्त चंदिगढ लाच
वेस्पा चा पर्याय असताना
चारचाकी सर्वीसिंग
चार-पाचशे कि.मि. किंवा अधिकचे
चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स
उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर
उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर वर उचलुन ठेवावे.याचे नेमके काय कारण आहे..? वाईपर काचेला चिकटून ठेवले असताना काचेवर उन्हाने तापलेल्या रबराचे डाग पडतात की उन्हाने तापलेल्या काचेमुळे वायपरचे रबर खराब होते..?उन्हाने तापलेल्या काचेमुळे
@ स्पा , लडाख कॅरीयर
धागा आवडला....
तुमच्याकडे कोणती दुचाकी
चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स
चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स कोणी देईल काय ? म्हणजे किती दिवसातून एकदा सर्विसिंग, ऑईल लेवल, हवा, इंजिन देखभाल कोणती इ. ?म्हणजे कस बघा दिवसा आड ऑईल बदलवणे,रोज हवा काढुन परत भरुन चेक करणे,रोज धुणे, जमल्यास दर सहा महिन्यातुन गाडीचे इंजीन चेंज करा,कशी गाडी व्यवस्थीत टिकत नाही बघा.म्हणजे कस बघा दिवसा आड ऑईल
माझा खोडकर सल्ला
एम ८० सारखी गाडी नाही..
आईल
+१
ठराविक ३-४ पंपांवर पेट्रोल टाकतोत्यातही ब्रँड् सांभाळणे जमते का ते बघावे. १) मी पॅशन प्लसमध्ये "क्लब एचपी" (नक्की हेच नाव कां..?) चे पेट्रोल टाकतो. ते ही पंप ठरलेले. बाहेर जायचे असेल तर हिंजवडी साईडचा एक पंप, थेऊर आणि सासवड रोडवर प्रत्येकी एक पंप आहे आणि किकवी (पुण्यापासून ४५ किमीवर सातार्याच्या दिशेने एक पंप आहे, हा पंप २६/११ च्या एका हुतात्म्याच्या वारसांना मिळालेला आहे!) अशा ठरावीक पंपावर पेट्रोल भरायचे.. २) शक्यतो गाडीचा वेग अचानकपणे वाढवायचा नाही. आणि विनाकारण समोरच्या वाहनाला चिकटून ब्रेक मरायचा नाही (हार्ड स्टॉप) ३) सुरूवातीचे १० / १५ हजार किमी गाडी अत्यंत सांभाळून चालवलेली आहे. (इंजिन सेटल होईपर्यंत) ४) दोन जणांच्या गाडीवर तिघेजण प्रवास करायचा नाही (तुझ्या आग्रहामुळे - तुझ्याच यामाहावर तू, सूड आणि मी असा प्रवास केला होता - तसला प्रकार करायचा नाही! :-D) माझी पॅशन प्लस पुणे शहरात ६५ ते ६८, कोकणात ५५ ते ६० आणि हायवेला ७५ चे मायलेज देते.पुण्यातले चांगले पंप
अजून एक
उपाय उत्तम आहे, पण आमच्या
परत कोकण दौरा आखलेला आहे .
उप्स्स...
नाही हो काका, उलट तुमच्याकडे
(No subject)
एक जुनी सायकलची ट्युब घे
एक जुनी सायकलची ट्युब घे
प्रतिसाद लैच माहितीपूर्ण.
१. प्रवासाला निघायच्या आदल्या
संध्याकाळी किंवा रात्री,
संध्याकाळी किंवा रात्री, एखाद्या लांबवर प्रवासाला निघालेल्या ट्रकच्या जथ्याबरोबर प्रवास करा.ब्येष्ट सजेशन, स्वतःच्या रायडींगवर डोळस विश्वास असेल तर ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी वाहने जो व्हॅक्यूम तयार करत जातात त्या व्हॅक्यूम मधून) गाडी न्यावी, हे करताना फक्त मागे बडबड करणारा मित्र नसावा आणि समोरच्या वाहनाच्या टेललँपकडे व्य व स्थी त लक्ष असावे. समोरचे वाहन आणि आपण यातले अंतर कमीजास्त करण्यासाठी एखादा रेफरन्स पाँईंट पकडावा. सळ्यांनी भरलेला ट्रक, उसाने भरलेला ट्रक, वाळूची वाहने असल्या वाहनांच्या नादाला लागू नये. मोठ्या वाहनांच्या मागे गाडी चालवताना शक्यतो चाकामागे चाक अशीच गाडी चालवावी, समोरच्या गाडीने चुकवलेले खड्डे, मेलेले प्राणी वगैरे आपोआप चुकवले जातात. पावसाळ्यात रस्त्यावरच्या पाण्याची पातळी दुचाकीच्या सायलेन्सरच्या वरती असेल तर असे रस्ते ओलांडू नयेत, अगदीच असे रस्ते ओलांडणे गरजेचे असेल तर एखाद्या मोठ्या गाडीची वाट बघावी व त्यांच्या मागच्या चाकामागून असे पाणी भरलेले रस्ते ओलांडावेत. वरील सर्व प्रकार स्वतःच्या जबाबदारीवर, स्वत:च्या व गाडीच्या तब्बेतीनुसार करावेत!उत्तम टिपा
वल्ली व मोदक - दोघांनीही
वल्ली व मोदक - दोघांनीही लिहिलेल्या टिपा मोलाच्या आहेत.काय राव रंगेश.. वाल्लीशेथ संपादक झाले म्हणून "प्रतिसाद लैच माहितीपूर्ण." ही टीप झाली का..? आणि ती पण मौल्यवान..?? ;-)बाकी वल्ली यांच्या टिपांचा गोंधळलेला क्रम बघून आणखी एक महत्वाची टिप आठवली - पिऊन गाडी चालवू नकाकिती वाजलेत हो तिकडे..?? :-D (संपूर्ण प्रतिसाद हलका घ्यावा!);-)
बाकी मी लिहिलेली टिपदेखील
बाकी मी लिहिलेली टिपदेखील मोलाची आहेच .नक्कीच मोलाची आहे.(No subject)
मा.श्री.श्रिरंग काका यांस,
सहमत
ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी
अतिशय धोकादायक सूचना - मान्य
माझा मुद्दा मोदकने कॅरी केला
सहमत आहे. रात्री गाडी
हे सारे सल्ले ब्येष्ट. फार
५०, शैलेंद्र, मोदक वाचनीय
स्पा काका
अजून काही
काही चुकीचे समज आहेत
आपण तर साला ५० रावांच्या
+१