✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

स
स्पा यांनी
Tue, 04/02/2013 - 15:28  ·  लेख
लेख
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं. बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते. बाकी इतरही बरेच प्रश्न असतात उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे. ५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या. पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून) २. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे ३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो ४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक . माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती. पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.) अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात . आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता. नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते . गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई. याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल . आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे . अजून एक दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल . बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
149495 वाचन

💬 प्रतिसाद (358)

प्रतिक्रिया

स्पावड्या, झाली का गाडी झ्याक

नानबा
Fri, 04/26/2013 - 12:21 नवीन
स्पावड्या, झाली का गाडी झ्याक?
  • Log in or register to post comments

हो रे

स्पा
Fri, 04/26/2013 - 13:04 नवीन
सर्विसिंग झाली ३६ वर घसरलेला मायलेज आता ४५ पर्यंत आलाय :) म्या जाम खुश है
  • Log in or register to post comments

हे पहा..

गवि
Fri, 04/26/2013 - 14:23 नवीन
काहीसे अवांतर. नुकत्याच ठाण्यात झालेल्या एका डिस्प्लेमधे पाहिलेल्या या हार्ले डेव्हिडसन आणि अकिला कशा वाटताहेत ? यांची देखभाल कशी पडत असेल ?? Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

फटू दिसत नाहीयेत

स्पा
Fri, 04/26/2013 - 14:26 नवीन
फटू दिसत नाहीयेत :(
  • Log in or register to post comments

दिसले... कडक बाइक्स हैत राव

स्पा
Fri, 04/26/2013 - 14:28 नवीन
दिसले... कडक बाइक्स हैत राव
  • Log in or register to post comments

या पण काही..

कोमल
Fri, 04/26/2013 - 15:09 नवीन
पूण्यात हापिसाच्या रस्त्यालगत दिसली होती.. हारलेल्या डेविड्सन इतकी भन्नाट नाहीये पण आवडेश झाली. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

ह्योसंग आहे ती

मालोजीराव
Wed, 12/11/2013 - 12:41 नवीन
ह्योसंग आहे ती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कोमल

माहिती हवी आहे.

अनिरुद्ध प
Fri, 04/26/2013 - 18:05 नवीन
आपल्या दुचाकी वाहना बाबत तज्ञा कडुन सल्ला हवा आहे. Activa Honda & Access 125 या मध्ये वापरण्यास उत्तम पर्याय कोणता या बाबत तज्ञाचे मार्गदर्शन हवे आहे.
  • Log in or register to post comments

तज्ञ म्हणणार नसाल तर माहीत

शैलेन्द्र
Sat, 04/27/2013 - 16:37 नवीन
तज्ञ म्हणणार नसाल तर माहीत असलेली माहिती देतो,
  • दोन्ही गाड्या छान आहेत
  • जर तुमची उंची चांगली असेल तर होंडा अ‍ॅव्हीएटरचा विचार करा, या गाडीला होंडा अ‍ॅक्टीवाचेच इंजीन आहे पण सिटींग थोडे वरती आहे, शिवाय पुढचे चाक मोठे आहे त्यामुळे गाडी स्टेबल राहते
    • अ‍ॅक्सेस १२५चे इंजीन आधिक शक्तिशाली आहे, त्यामुळे पिकप चांगला मिळतो.
  • स्पेअरपार्ट व सर्विसींग्चे जाळे होंडाचे चांगले आहे
  • थोडक्यात दोन्हीही चांगल्या गाड्या आहेत, चालवून बघा, तुम्हाला आवडेल ती घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

धन्यवाद

अनिरुद्ध प
Mon, 04/29/2013 - 12:54 नवीन
शैलेन्द्र, आपले मनह पुर्वक आभार्,तसेच आपलि विनम्रता स्प्रुहणीय्,माहिती आवड्ली.
  • Log in or register to post comments

क्स्च कस्च..

शैलेन्द्र
Mon, 04/29/2013 - 22:03 नवीन
क्स्च कस्च.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

अप्रतिम

अनिरुद्ध प
Fri, 05/03/2013 - 19:40 नवीन
बापरे लाजणे तर अप्रतिम.
  • Log in or register to post comments

माझा एक प्रश्न

अलबेला सजन
Mon, 05/06/2013 - 11:07 नवीन
दुचाकिचा कार्बोरेटर किती दिवसातून साफ करावा? त्याचे फायदे काय? आमचा मेक्यानिक कार्बोरेटर साफ करायला नेहमी नकार देतो व साफ केल्यास सरासरी कमी येइल अस म्हणतो. हे खर आहे का??
  • Log in or register to post comments

बाईकचे जुने टायर्स खराब

प्रचेतस
Tue, 05/07/2013 - 11:20 नवीन
बाईकचे जुने टायर्स खराब झाल्यामुळे ट्युबलेस टायर्स बसवायचा विचार आहे. पल्सर असल्याने अ‍ॅलॉय व्हील्स आहेत. एक दोन ठिकाणी चौकशी केली कुणी म्हणे फक्त मागच्या चाकालाच ट्युबलेस टायर बसवावा, पुढच्या चाकाचे फिटींग नीट होत नाही, टिकतही नाही. तर कुणी म्हणे दोन्ही टायर्स उत्तम रिझल्ट देतात. कुणी योग्य मार्गदर्शन करेल काय?
  • Log in or register to post comments

माश्री फोडणीस काका

स्पा
Tue, 05/07/2013 - 11:32 नवीन
माश्री फोडणीस काका यावर उत्तम मार्गदर्शन करू शकतील परवाच त्यांच्याकडून कोकण दौर्यासाठी जबराट बंजी कॉड आणल्या आहेत. आता त्यावर ब्यागाच काय अक्खा हत्ती सुद्धा बांधून घेऊन जाऊ शकतो :)
  • Log in or register to post comments

धन्यु. कॉलिंग फडणीस काका.

प्रचेतस
Tue, 05/07/2013 - 11:34 नवीन
धन्यु. कॉलिंग फडणीस काका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

वल्ली नमस्कार. तुमची गाडी

नानबा
Tue, 05/07/2013 - 21:55 नवीन
वल्ली नमस्कार. तुमची गाडी कोणती आहे? आणि मुख्य म्हणजे तिला स्पोक व्हिल्स आहेत की अ‍ॅलॉय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

पल्सर असल्याने अ‍ॅलॉय व्हील्स

प्रचेतस
Tue, 05/07/2013 - 22:04 नवीन
पल्सर असल्याने अ‍ॅलॉय व्हील्स आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

अ‍ॅलॉय व्हील्स आहेत ना? मग

नानबा
Wed, 05/08/2013 - 15:21 नवीन
अ‍ॅलॉय व्हील्स आहेत ना? मग फार काऴजी नाही. १७ इंचाचे कुठलेही ट्युबलेस टायर बसतील. पुढच्या चाकासाठी MRF ZFS Tubeless किंवा Michelin PILOT SPORTY Tubeless तर मागच्या चाकासाठी CEAT Vertigo RAGE किंवा SPORT, MRF Zapper C अथवा Zapper VYDE मिळतील. पुढच्या टायरला ट्रेड पॅटर्न फारसा बदलत नाही, त्यामुळे वरील पैकी कोणताही चालेल. (शक्यतो MRF च घ्या.) हा MRF ZFS Tubeless - Image removed. आणि हा Michelin PILOT SPORTY Tubeless - Image removed. मागील टायरसाठी मात्र ट्रेड पॅटर्न बघून घ्या. तुमच्या चालवण्याची स्टाईल, रस्ते यावर ट्रेड पॅटर्न निवडा. हा CEAT Vertigo SPORT आणि RAGE - Image removed. MRF Zapper C - Image removed. MRF Zapper VYDE - Image removed. आपल्या कडचे रस्ते आणि इतर स्थितींमध्ये भारतीय बनावटीचे टायर्स जास्त उत्तम चालतात हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यामुळे उगाच Michelin, Bridgestone, Pireli असल्या निष्कारण महागड्या ब्रँड्स कडे जाण्यापेक्षा CEAT किंवा MRF कधीही उत्तम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्स रे प्रथम.

प्रचेतस
Wed, 05/08/2013 - 15:29 नवीन
धन्स रे प्रथम. आता हा ट्रेड पॅटर्न कसा निवडायचा? म्हणजे कुठले रस्ते / चालवण्याची स्टाईल यावर कुठला पॅटर्न वापरणे जास्त योग्य ठरेल? आता माझा हापिसचा रोजचा रस्ता बर्‍यापैकी चांगला आहे तर काही वेळा भटकायला जाताना खडबडीत रस्त्यांनी जावे लागते. आणि चालवण्याची स्टाईल म्हणशील तर उगाच जोरात बाईक चालवणे, कट मारणे, शार्प टर्न्स घेणे असले प्रकार मी करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

चांगल्या आणि थोड्याफार खडबडीत

नानबा
Wed, 05/08/2013 - 16:13 नवीन
चांगल्या आणि थोड्याफार खडबडीत रस्त्यांना Zapper पॅटर्न चांगला असतो. एक तर हा पॅटर्न गाडी चालवण्याच्या दिशेनुसार बनवलेला असल्यामुळे त्याला ग्रीप तर उत्तम मिळतेच, शिवाय त्यात काही लहानसहान गोष्टी (छोटे दगड, खिळे इ.) अडकल्यास गाडीच्या वेगामुळे आपोआप निघून जाण्यास मदत होते. आणि तुम्ही शार्प टर्न्स घेत नसलात तर हा पॅटर्न व्यवस्थित आहे. माझ्या पल्सर २२० ला स्टॉक मध्ये MRF Zapper आहेत. गाडी १६००० किमी च्या आसपास चालूनसुद्धा अजून झिजणे किंवा बदलण्याची वेळ आलेली नाही. म्हणूनच मी MRF टाका असं म्हटलं. काही दिवसांपूर्वी एका मित्राने त्याच्या बाईकला Michelin M45 टाकला. पण त्याला Wet Grip जवळपास शून्य आहे. पावसाळ्यात प्रचंड घसरण्याचे प्रताप झाल्या नंतर पुन्हा MRF वरच आला. त्यामुळे सर्वार्थाने MRF चे टायर्स उत्तम आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

धन्स रे.

प्रचेतस
Wed, 05/08/2013 - 16:24 नवीन
धन्स रे. सध्याचा MRF Zapper च आहे. ५०,००० किमी आणि जेमतेम ३/४ पंक्चर्स झाली बेट्याला. आता अतीव म्हातारपणामुळे निवृत्त करून टाकतो आणि त्याचीच नवीन पिढी घेईन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नानबा

Zapper जब्राटच आहेत. आणि

नानबा
Wed, 05/08/2013 - 16:38 नवीन
Zapper जब्राटच आहेत. आणि ट्यूबलेस Zapper तर एकदम ब्येष्ट. पहिले १५००० किमी पर्यंत तर पंक्चरसुद्धा होत नाहीत. फक्त हवेच्या ऐवजी त्यात नायट्रोजन भरा. भन्नाट परफॉरमन्स देतात टायर्स.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

' चालवण्याची स्टाईल म्हणशील

५० फक्त
Fri, 05/17/2013 - 08:32 नवीन
' चालवण्याची स्टाईल म्हणशील तर उगाच जोरात बाईक चालवणे, कट मारणे, शार्प टर्न्स घेणे असले प्रकार मी करत नाही.' अर्थात पल्सरवर मांडी घालुन बसल्यावर हे प्रकार कुणालाच करता येत नसावेत असं वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आँ?

पैसा
Fri, 05/17/2013 - 08:44 नवीन
पल्सरवर मांडी घालुन बसल्यावर हे प्रकार कुणालाच करता येत नसावेत असं वाटतं.
वल्ली पण? एक अगदी बालिश शंका आहे. गिअर्स आणि ब्रेक कसे काय वापरतो ब्वॉ तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मी नाय हो.

प्रचेतस
Fri, 05/17/2013 - 09:06 नवीन
मी नाय हो. मी आपला व्यवस्थित गाडी चालवतो. सर्व नियम पाळून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

माश्री फोडणीस काका ख्याक

बॅटमॅन
Tue, 05/07/2013 - 15:13 नवीन
माश्री फोडणीस काका
ख्याक :D :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

डिस्कव्हर १०० टी . आज

अद्द्या
Fri, 05/17/2013 - 09:02 नवीन
डिस्कव्हर १०० टी . आज बरोब्बर एक महिना झाला गाडी घेऊन . आयुष्यातली पहिलीच गाडी . त्यामुळे माझ्या घाणेरड्या रायडींग स्किल मध्ये सुद्धा ७४ चा मायलेज देतीये ( विना सर्विसिंग ) . . आज सर्विसिंग ला टाकेन . एक मित्र म्हणाला पहिली सर्विसिंग झाल्यावर मायलेज वाढतो आणि इंजिन पण अजून चांगलं चालायला लागतं . खरंय का ?
  • Log in or register to post comments

खरय रावसाहेब.

झकासराव
Fri, 05/17/2013 - 10:13 नवीन
खरय रावसाहेब. तुम्हाला चालवताना फरक जाणवेलच.. ऑइल चेन्ज करा पहिल्या सर्व्हिसिन्गला. अधिकृत ठिकाणीच सर्व्हिसीन्ग करुन घ्या. कमीत कमी सगळे फ्री सर्व्हिसीन्ग तरी. मला वेळ नसतो, मी गाडी सोडुन नाही जाउ शकत अशा सबबी सांगौन गाडी डोळ्यादेखतच सर्व्हिसिन्ग करुन घ्या.
  • Log in or register to post comments

त्यामुळे माझ्या घाणेरड्या

स्पा
Fri, 05/17/2013 - 10:16 नवीन
त्यामुळे माझ्या घाणेरड्या रायडींग स्किल मध्ये सुद्धा ७४ चा मायलेज देतीये
लयच भारी
  • Log in or register to post comments

गाडी डोळ्यादेखतच सर्व्हिसिन्ग

अद्द्या
Fri, 05/17/2013 - 10:50 नवीन
गाडी डोळ्यादेखतच सर्व्हिसिन्ग करुन घ्या.
झकासराव . माझा मित्र आहे बजाज सर्विस सेंटर मध्ये . त्यामुळे बाकी चिंता नाही . (आणि ते हापिस च्या बाजूलाच आहे . त्यामुळे तर अजूनच चिंता मिटली ) ओइल चेंज ते नको म्हणलं तरी करतातच
लयच भारी
:D
  • Log in or register to post comments

रविवारी आंबोली ला गेलो होतो

अद्द्या
Mon, 10/21/2013 - 11:16 नवीन
रविवारी आंबोली ला गेलो होतो . फकस्त ७० किलो मीटर . पण गाडीची घाटात पहिलीच ट्रीप होती एवढी . गाडी १०० सीसी असून पण पल्सर १५० च्या जोडीने आरामात जात होती . जवळपास तेवढाच पिकप . गाडी वजनदार असल्यामुळे स्टेबल होती . (माझं वजन नगण्यच म्हणायला हवं ) मुख्य म्हणजे . गाडी उंच आहे . त्यामुळे पाठ दुखी थोडी कमी असते आणि सस्पेन्शन मस्तच . ड्रीम युगा / प्याशन इत्यादी गाड्यांच्या मागे न लागता बजाज डिस्कव्हर घेतलेली लैच फायद्यात पडतीये बाय दि वे . नवीन डिस्कव्हर tachometer ला नाहीये . तो बसवून मिळू शकतो का बजाज वाल्यांकडून . सध्या तरी फक्त इंजिनचा आवाज आणि बुडाला / मांडीला जाणवणारे वायब्रेशन यावरच गियर बदलतोय . RPM वर लक्ष असेल तर ते बरं पडेल असं वाटतंय .मित्रांची पल्सर / करीज्मा / अपाचे इत्यादी मुळे लागलेली सवय. कोणी बसवून घेतलाय का ? मागच्या सीट वर . "ऐकणेबल" आवाज असला कि इंजिन चा आवाजाकडे थोडं लक्ष कमी होतं :P
  • Log in or register to post comments

बजाज पल्सर १३५एलएस कशी आहे ?

मदनबाण
Mon, 10/21/2013 - 12:15 नवीन
बजाज पल्सर १३५एलएस कशी आहे ?
  • Log in or register to post comments

ताबडतोड पैसा वसूल गाडी...

नानबा
Mon, 10/21/2013 - 12:17 नवीन
पल्सर १३५ चा विचार करत असलात तर डोळे बंद करून घ्या. जब्र्या गाडी आहे. 4 valve engine असल्यामुळे भन्नाट पिकअप, पळायलासुद्धा उत्तम, आणि बजाज असल्याने मेंटेनन्स खर्च कमी. एक नंबर गाडी.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आणि हो,

नानबा
Mon, 10/21/2013 - 12:18 नवीन
या सगळ्यात पल्सरचं DTSi इंजिन असल्याने मायलेजसुद्धा चांगलं मिळतं.
  • Log in or register to post comments

k&N Filter आणी iridium spark plug

कपिलमुनी
Mon, 10/21/2013 - 15:35 नवीन
बुलेट / थंडर बर्ड किंवा इतर दुचाकीला कोणी k&N Filter आणि iridium spark plug बसवला आहे का ? अनुभव / माहिती असल्यास कृपया मार्गदर्शन करावे ..
  • Log in or register to post comments

बुलेटला K&N??

नानबा
Mon, 10/21/2013 - 15:39 नवीन
मारता काय हो लोकांना आवाजाने?? O_O @=
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१

मालोजीराव
Wed, 12/11/2013 - 12:43 नवीन
कार ला कुणी k&N Filter बसवला आहे काय ? पिकअप , मायलेज वाढते असे ऐकून आहे…किती फरक पडतो ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

होय...

खादाड_बोका
Fri, 12/13/2013 - 00:09 नवीन
k&N Filter माझ्या होंडा अकॉर्ड वर बसवीला आहे. आत्ता पर्यंत ३३५००० किलोमीटर धावली आहे. तीनदा फिल्टर साफ केला....परफॉरमन्स वर खुप फरक पडला आहे. मायलेजही वाढले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

दुचाकींचे मायलेज वाढवण्याचा

नानासाहेब नेफळे
Sat, 09/27/2014 - 11:43 नवीन
दुचाकींचे मायलेज वाढवण्याचा एक रामबाण उपाय म्हणजे पिस्टन रिंग्ज दर दोन वर्षांनी बदलने
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

नविन ट्युबलेस टायर घ्यायचा

स्पा
Tue, 12/10/2013 - 19:46 नवीन
नविन ट्युबलेस टायर घ्यायचा आहे, रिम सकट, कितिला मिळेल?
  • Log in or register to post comments

मी ६/७ महिन्यांपूर्वी पल्सरचे

प्रचेतस
Wed, 12/11/2013 - 11:47 नवीन
मी ६/७ महिन्यांपूर्वी पल्सरचे दोन्ही टायर्स बदलले होते. मागचा १८०० आणि पुढचा १५०० ला मिळाला. अ‍ॅलॉय व्हील्स असल्याने रिम बदलायचा प्रश्नच आला नाही. सीएटचे टाकले होते. एमारेफ थोडे महाग आहेत. दोन्ही टायर्स उत्तम रिजल्ट्स देताहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अवेन्ज र

चिप्लुन्कर
Mon, 12/16/2013 - 13:14 नवीन
माझ्या अवेन्जरला मागे आणि पुढे टूबलेस टायर्स बसून घ्यायचे आहेत अलॉय व्हीलसकट . कोणत्या कंपनीचे घ्यावे . (गाडी साधारण ५ ० ० किमि दर महिना आणि ६ महिन्यातून १ दा ठाणे ते चिपळूण असा दौरा आणि २ महिन्यातून १ दा सासवणे इतकीच फिरते .
  • Log in or register to post comments

किती देते?? मला घ्यायची आहे

टवाळ कार्टा
Mon, 12/16/2013 - 16:11 नवीन
किती देते?? मला घ्यायची आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिप्लुन्कर

निदान ४ ०

चिप्लुन्कर
Tue, 12/17/2013 - 09:46 नवीन
ठाणे शहरात निदान ४ ० आणि जेंव्हा मी बाहेर फिरतो त्यावेळी ४ ५ ते ५ ० आरामात मला तरी मिळाले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

किती शीशी आहे १८०/२००/२२०??

टवाळ कार्टा
Tue, 12/17/2013 - 12:06 नवीन
किती शीशी आहे १८०/२००/२२०?? आणि किती वर्षे झालीत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिप्लुन्कर

२ २ ० शी शी आहे

चिप्लुन्कर
Tue, 12/17/2013 - 16:59 नवीन
२ २ ० शी शी आहे आणि २.५ वर्ष झाली आहेत .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ऐला!

लॉरी टांगटूंगकर
Wed, 12/18/2013 - 08:53 नवीन
ऐला! २२० शिशिला ४५-५० लै जास्त वाटतय, मला अ‍ॅक्टीवावर याहून कमी मिळत. एकदा हिंम्मत करुन मोजल. प्रचंड लाजीरवाणे रिझल्ट होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिप्लुन्कर

असो

चिप्लुन्कर
Wed, 12/18/2013 - 10:08 नवीन
मी गाडीची प्रचंड देखभाल करतो आणि एक हाती आहे , असो पण सध्या मला ती ४ ५ + देते आहे ठाण्यात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

डिट्टेल????

टवाळ कार्टा
Wed, 12/18/2013 - 10:56 नवीन
डिट्टेल????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिप्लुन्कर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा