Skip to main content

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/04/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं. बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते. बाकी इतरही बरेच प्रश्न असतात उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे. ५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या. पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून) २. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे ३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो ४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक . माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती. पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.) अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात . आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता. नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते . गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई. याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल . आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे . अजून एक दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल . बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच धन्यवाद

वाचने 150712
प्रतिक्रिया 358

प्रतिक्रिया

गाडी डोळ्यादेखतच सर्व्हिसिन्ग करुन घ्या.
झकासराव . माझा मित्र आहे बजाज सर्विस सेंटर मध्ये . त्यामुळे बाकी चिंता नाही . (आणि ते हापिस च्या बाजूलाच आहे . त्यामुळे तर अजूनच चिंता मिटली ) ओइल चेंज ते नको म्हणलं तरी करतातच
लयच भारी
:D

रविवारी आंबोली ला गेलो होतो . फकस्त ७० किलो मीटर . पण गाडीची घाटात पहिलीच ट्रीप होती एवढी . गाडी १०० सीसी असून पण पल्सर १५० च्या जोडीने आरामात जात होती . जवळपास तेवढाच पिकप . गाडी वजनदार असल्यामुळे स्टेबल होती . (माझं वजन नगण्यच म्हणायला हवं ) मुख्य म्हणजे . गाडी उंच आहे . त्यामुळे पाठ दुखी थोडी कमी असते आणि सस्पेन्शन मस्तच . ड्रीम युगा / प्याशन इत्यादी गाड्यांच्या मागे न लागता बजाज डिस्कव्हर घेतलेली लैच फायद्यात पडतीये बाय दि वे . नवीन डिस्कव्हर tachometer ला नाहीये . तो बसवून मिळू शकतो का बजाज वाल्यांकडून . सध्या तरी फक्त इंजिनचा आवाज आणि बुडाला / मांडीला जाणवणारे वायब्रेशन यावरच गियर बदलतोय . RPM वर लक्ष असेल तर ते बरं पडेल असं वाटतंय .मित्रांची पल्सर / करीज्मा / अपाचे इत्यादी मुळे लागलेली सवय. कोणी बसवून घेतलाय का ? मागच्या सीट वर . "ऐकणेबल" आवाज असला कि इंजिन चा आवाजाकडे थोडं लक्ष कमी होतं :P

In reply to by मदनबाण

पल्सर १३५ चा विचार करत असलात तर डोळे बंद करून घ्या. जब्र्या गाडी आहे. 4 valve engine असल्यामुळे भन्नाट पिकअप, पळायलासुद्धा उत्तम, आणि बजाज असल्याने मेंटेनन्स खर्च कमी. एक नंबर गाडी.. :)

या सगळ्यात पल्सरचं DTSi इंजिन असल्याने मायलेजसुद्धा चांगलं मिळतं.

बुलेट / थंडर बर्ड किंवा इतर दुचाकीला कोणी k&N Filter आणि iridium spark plug बसवला आहे का ? अनुभव / माहिती असल्यास कृपया मार्गदर्शन करावे ..

In reply to by कपिलमुनी

कार ला कुणी k&N Filter बसवला आहे काय ? पिकअप , मायलेज वाढते असे ऐकून आहे…किती फरक पडतो ?

In reply to by मालोजीराव

k&N Filter माझ्या होंडा अकॉर्ड वर बसवीला आहे. आत्ता पर्यंत ३३५००० किलोमीटर धावली आहे. तीनदा फिल्टर साफ केला....परफॉरमन्स वर खुप फरक पडला आहे. मायलेजही वाढले आहे.

In reply to by मालोजीराव

दुचाकींचे मायलेज वाढवण्याचा एक रामबाण उपाय म्हणजे पिस्टन रिंग्ज दर दोन वर्षांनी बदलने

In reply to by स्पा

मी ६/७ महिन्यांपूर्वी पल्सरचे दोन्ही टायर्स बदलले होते. मागचा १८०० आणि पुढचा १५०० ला मिळाला. अ‍ॅलॉय व्हील्स असल्याने रिम बदलायचा प्रश्नच आला नाही. सीएटचे टाकले होते. एमारेफ थोडे महाग आहेत. दोन्ही टायर्स उत्तम रिजल्ट्स देताहेत.

माझ्या अवेन्जरला मागे आणि पुढे टूबलेस टायर्स बसून घ्यायचे आहेत अलॉय व्हीलसकट . कोणत्या कंपनीचे घ्यावे . (गाडी साधारण ५ ० ० किमि दर महिना आणि ६ महिन्यातून १ दा ठाणे ते चिपळूण असा दौरा आणि २ महिन्यातून १ दा सासवणे इतकीच फिरते .

In reply to by चिप्लुन्कर

ऐला! २२० शिशिला ४५-५० लै जास्त वाटतय, मला अ‍ॅक्टीवावर याहून कमी मिळत. एकदा हिंम्मत करुन मोजल. प्रचंड लाजीरवाणे रिझल्ट होते.

In reply to by लॉरी टांगटूंगकर

मी गाडीची प्रचंड देखभाल करतो आणि एक हाती आहे , असो पण सध्या मला ती ४ ५ + देते आहे ठाण्यात .

In reply to by चिप्लुन्कर

+११ टाकतो फुंकुन.

३०० :D

पॅशन प्लसचे चेनकीट ४०००० ला एक्स्पायर होते तसे झाले आहे आणि ते बदलण्याचा सल्ला मेकॅनीककडून मिळाला आहे. तर मग, १) गाडी तशीही कामाला सोडायची आहेच तर ४०००० किमी च्या दरम्यान एक्पायर होणारे बाकीचे महत्वाचे पार्ट्स उदा. क्लचप्लेट आणि बॅटरी बदलावेत की "चालेल तो पर्यंत" चालवावेत? त्यांचे आयुष्य संपत आले आहे हे गाडी चालवताना जाणवत आहे. २) (टचवूड!!!) गाडी ४०००० किमीमध्ये एकदाही पंक्चर झाली नाहीये. ट्युब आणि टायरचा लाईफ स्पॅन किती असतो..? ३) क्लच केबल ७ / ८ महिने आणि अ‍ॅक्सेलरेटर केबल ४ वर्षे बदलली नाहीये. एका मोठ्या प्रवासाला निघायचे असल्यास हे पण बदलून निघावे की सेट झालेल्या मेकॅनीक्समध्ये बदल करू नये..?

ट्युब आणि टायरचा लाईफ स्पॅन किती असतो..?>>> ३०-३५ हजार ला बदलावी म्हणतात. आपण फक्त शहरात चालवत असेल तर नक्कीच अजुन काही किमी चालते. अर्थात, ४० हजार म्हणजे टायर बरेच गोटा झाले असतील / होण्याच्या मार्गावर असतील. बदलुन घ्या. क्लच केबल ७ / ८ महिने आणि अ‍ॅक्सेलरेटर केबल ४ वर्षे बदलली नाहीये. एका मोठ्या प्रवासाला निघायचे असल्यास हे पण बदलून निघावे की सेट झालेल्या मेकॅनीक्समध्ये बदल करू नये..?>> क्लच केबल चालेल अजुन. पण अ‍ॅक्सलरेटर केबल घ्या बदलुन. बॅटरी साधारण तीन वर्षे चालते. हळुहळु त्याच लाइफ कमी झाल्याच लक्षात येतच. सेल्फ स्टार्ट असेल तर बसत नाही. गाडी बंद असताना आणि गाडीची चावी लावलेली असताना इन्डिकेटर वै न लागणे अशी लक्षण दिसतील. बदलली तर चांगलच आहे. क्लच प्लेट इतक्यातच खराब व्हायची नाही. तरिही शंका असल्यास भरवश्याच्या मॅकॅनिकला राइड घेवुन काय वाटते ते विचारायच. स्वतच जजमेन्ट चढावर येतच. गाडी चढावर जास्त कुथणे, इनिशियल पिक अप कमी वाटणे ह्यातुन जजमेन्ट घ्या.

In reply to by झकासराव

टायर चालतील अजून ५ / १० किमी. क्लच केबल चालेल अजुन. पण अ‍ॅक्सलरेटर केबल घ्या बदलुन दोन्ही केबल बदलून घेईन. बॅटरी साधारण तीन वर्षे चालते. हळुहळु त्याच लाइफ कमी झाल्याच लक्षात येतच. डॉ खरेंनी सुचवलेला पर्याय जास्त सोपा वाटत आहे. क्लच प्लेट ओके आहे.. बघू.. धन्यवाद!!

माझ्याकडे आता पल्सर १५० आहे. ती विकुन एखादी हाय एन्ड बाइक घ्यावी असा विचार आहे..काही options असे आहेत. १)करिझ्मा ZMR 2)YAMAHA R15 3)PULSAR 220 4)HONDA CBR 250 याबाबतीत कोणी मार्गदर्शन करु शकेल का??

In reply to by स्पा

आपल्या तब्येतीला सुट होइल अशी गाडी पहिजे हो साहेब...आहे ती पल्सरच लहान दिसतेय. बहुतेक करिझ्माच चांगला option आहे... :) continental GT खुपच लहान वाटतेय....

मी माझ्या हीरो होंडाचा टायर सव्वा लाख किमी चालवला होता.त्यानंतर तो बदलला. (गाडी दीड लाख किमीच्या वर चालवून भावाच्या फॅक्टरीत कामगाराना वापरायला दिली आहे) आपण जर टायर मध्ये १० % हवा कमी ठेवाल तर आपला पेट्रोलचा खर्च १० टक्क्याने वाढतो आणि टायरचे आयुष्य २५ टक्क्याने कमी होते.(सोर्स PCRA) तयार चे खवले(ट्रेड्स)दोन मिमी असेपर्यंत आपण ते वापरू शकता. त्यानंतर सुद्धा आपण जर टायरमध्ये हवा कमी भरून चालवू शकता पण आपल्या दुचाकीची रस्त्यावर पकड किती आहे हे आपल्याला समजण्यासाठी अनुभव असणे आवश्यक आहे. पावसाळ्यात तयरमधील हवा दहा ते पंधरा टक्के कमी ठेवा म्हणजे रस्त्यावर पकड सुधारेल. मी हीरो होंडाची कोणतीही केबल तुटेपर्यंत बदलली नाही. सध्या माझ्याकडे होंडा युनिकॉर्न आहे तिची एकही केबल बदललेली नाही तिची बॅटरी सुद्धा अजून व्यवस्थित चालू आहे.(साडेसहा वर्षानंतर).तिचे टायर उत्तम स्थितीत आहेत ३२००० किमी नंतर. सरासरी ४५ देते. पहिल्या बटणात(किक मारत नाही) चालू होते. मी स्पार्क प्लग खराब होईपर्यंत बदलत नाही. नवीन स्पार्क प्लग ने फारसा फरक पडत नाही. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे टायर मधील ट्युब चांगल्या कंपनीचीच घ्यावी कारण गाडी वेगात चालवल्यावर टायर आणि ट्युब मध्ये घर्षण होऊन ट्युब गरम होते आणि फुटते आणि हमरस्त्यावर अपघात होतो. आपल्या ब्रेक चे लायनर मात्र दर दहा हजार किमी नंतर तपासून घ्यावेत. वेळेत ब्रेक न लागल्याने जेवढे अपघात होतात त्याच्या मानाने केबल तुटून किंवा इंजिन गरम होऊन होत नाहीत. जाता जाता -- माझी हीरो होंडा शेवटची पाच वर्षे (गाडीची तेरा ते अठरा वर्षे) बिना बॅटरी चालवीत असे. तिला १००० मायक्रो फेरॅड चा कॅपॅसिटर बॅटरीच्या जागी बसविला होता. त्यामुळे इंजिन चालू केले की हॉर्न वाजत असे आणि साईड इंडीकेटर चालत असत. (इंजिन बंद असताना हॉर्न वाजत नसे). बॅटरीचा खर्च त्यात पाणि घालणे बॅटरीची चोरी होणे इ त्रास पुर्ण नव्हता. आता नवी युनिकॉर्न मूळ बॅटरी सकट आली त्यामुळे सध्या तरी प्रश्न नाही. विद्युत अभियन्त्यानी हा पर्याय तपासून पहावा (उत्तम काम करतो.हे डोके माझे नसून माझा भाउ जो विद्युत अभियंता आहे त्याचे आहे)

येथे मला नक्की मदत मिळेल अशी आशा असल्याने हा धागा वर काढत आहे .. आमच्या चारचाकीच्या बोनेट मध्ये मोठ मोठे उंदीर ,घुशी जाउन बसतात .वायर्स कुरतुडून ठेवतात .खूप घाण हि करतात ..२ दिवसांपूर्वी वायर्स कुरतडल्यामुळे ..गाडी सर्विस ला द्यावी लागली ..मागे हि एकवेळेस हा त्रास झाल होता ..त्यावेळी anti -roat coating लावून घेतले होते पण याचा उपयोग काही दिवस च होतो ..त्यानंतर पुन्हा जैसे थे ..आणि आता तर ते कोटिंग हि बंद झाले आहे ..यावर कुणाकडे काही उपाय असल्यास सांगावे ..कालच गाडी परत आणली आणि आज मी बोनेट उघडून पाहिले तर २ मोठमोठ्या घुशी तेथे न ठाण मांडून बसल्या होत्या ...बर गाडी दुसरीकडे लावायची हि सोय नाही सगळीकडे घुशी आहेतच ....

In reply to by आरोही

तंबाखुच्या तीव्र वासाने उंदीर आणि घुशी आत जात नाहीत.. हां! पण नंतर पुडया सोडु मात्र नका....कृ.ह.घ्या.

In reply to by सुहासदवन

हा उपाय हि कुणीतरी सांगितला आहे पण यामुळे आग वैगेरे लागण्याची काही भीती नाहीये ना ???आणि जर mortine rat killer च्या वड्या ठेवल्या तर काही फरक पडेल काय ???

In reply to by आरोही

दोन गोष्टी करा.. १) पूर्वी घरातल्या गॅसच्या नळ्यांना घालायला स्टीलचे कव्हर मिळायचे ते घेवुन या, बॅटरी टर्मीनलपासून इंजीनकडे जाणार्‍या सगळ्या मोठ्या वायरवर ते कव्हर लावा(वायर त्या कव्हरमधुन ओवा).. किंवा हल्ली ज्या मेटल कोटींगच्या गॅस वायर मिळतात त्याही वापरल्या तरी चालतील.. २) इंजीन कंपार्टमेंटमधे जिथे शक्य होईल तिथे काटेरी ब्रश बांधा.. हे ब्रश पुर्ण मेटलचे असतील याची खबरदारी घ्या..याने घुशींना फिरता येत नाही व त्या जागा सोडतात. गाडीच्या आसपासचा परिसर अत्यंत स्वच्छ ठेवा व इंजीन कंपार्टमेंटमधे ऑइल वगैरे शक्यतो सांडु देवु नका..

हा धागा परत वर उचलत आहे कारण... मला सेकंडहँड अ‍ॅव्हेंजर २२० घ्यायची आहे (शक्यतो २०११ नंतरची)...पण गाडीची तपासणी कशी करायची ते नीटसे माहित नाही कोणाच्या ओळखीत भरोशाचा मेकॅनिक असेल (ठाण्याजवळ) तर मला व्यनी करा

१.बाईक ला पेंट करायचा साधारण किती खर्च येतो ? २. माझी बाईक किक स्टार्ट आहे, मला बटन स्टार्ट करायची आहे तर करता येईल काय?

In reply to by स्पा

पेंट च्या खर्चा विषयी अंदाज नाही. सेल्फ स्टार्ट साठी जास्तीत जास्त ४५०० रुपये लागतील. शक्यतो यामाहा चं किंवा अ‍ॅरोहेड चं सेल्फ स्टार्ट किट (क्रँक मोटर, लाईन फ्युज बॉक्स, स्टार्टर बॉक्स, आणि केबल) घ्या. (बॅटरी बदलायला लागली नाही तर, नाहीतर बॅटरीचे पैसे वाढतील).

प्रश्न १ आणी २ चे उत्तर एकच आहे हि विकून टाका आणी दुसरी घ्या. ताजमहाल दुरुस्त होत नाही( झाला तरी बेंगरूळ दिसेल)

In reply to by सुबोध खरे

अ‍ॅक्च्युली गरज नाही त्याची ... कंपनी सर्विस सेंटरला विचारले तरी ते करुन देतील

यामाहा service center च्या अनुभवांसाठी वेगळा धागा काढावा लागेल, बेक्कार लुटतात. सो आपले नेहमीचे मॅकेनिकच बरे. गाडी विकणे शक्यच नाही. जेमतेम 3 वर्षच झालीयेत. आणि मी ती कधिच विकायची वेळ येउ नये म्हणुन मेन्टेन करतोय

In reply to by स्पा

कुठल्याच अधिकृत सर्व्हिस सेंटर मधे चांगली सर्व्हीस मिळत नाही. कॅस्ट्रॉल सर्व्हिस स्टेशन मधे गाड्या खुप छान सर्व्हिसिंग करुन मिळतात.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅस्ट्रॉल बाईक झोन आहे, पुण्याला इंजिनियरींग कॉलेज समोर ठुबे कॅस्ट्रॉल, तो अति उत्तम आहे, ह्या आगोदर माझ्याकडे माझी सीबीझी- एक्स होती तेव्हा तिथेच सर्विस करुन घ्यायचो, उत्तम स्टाफ मस्त सर्विस!!! , तेच वनाज जवळचे कॅस्ट्रॉल अतिशय भिकारडी सर्विस देतो!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

निगडी ला बजाज ऑटो समोर कॅस्ट्रॉल बाईक पॉईंट आहे. त्याच्याकडे गाडी दिली की एकदम मक्खन करुन देतो. पुढे ३-४ महिने अजिबात त्रास नाही. बाकी गाडी दर ३ महिन्यानी सर्व्हिसिंग करुन घेत असल्यानी झक्कास आहे. युनिकॉर्न....

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

पुढे ३-४ महिने अजिबात त्रास नाही.
जर गाडी दर ३-४ महिन्यांनदर्त्रास महिन्यांनी त्रास देत असेल तर गडबड है

In reply to by टवाळ कार्टा

जर गाडी दर ३-४ महिन्यांनदर्त्रास महिन्यांनी त्रास देत असेल तर गडबड है
गाडी त्रास देत नाही. पण यंत्र आहे शेवटी ते, नीट देखभाल केली तर व्यवस्थित चालत पण आणि त्याचं आयुष्य सुद्धा वाढतं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

मी युनिकॉर्न आहे म्हणुन लिहिले...युनिकॉर्न सारखी स्मूथ ईंजिन असणारी बाईक आणखी कोणतीच नाही/नव्हती...कदाचित नसेलही

माझ्याकडे आधी टीव्हीएस विक्टर जीएल होती (व्हिली साठी भारतातली सर्वोत्तम बाईक), मग सीबीझेड एक्स्ट्रीम, सद्ध्या रॉयल एन्फिल्ड क्लासिक ३५०, एकुण फिरायचा अनुभव, ७०,००० किमी विक्टर, १,३१,००० किमी सीबीझेड अन १५०० किमी रॉयल एन्फिल्ड, मला फार काही टेक्निकल नॉलेज नाही पण फिर फिर फिरुन थोडे बहुत संकलित केले आहे, मला इथे अजुन काही शिकायला मिळेल अशी आशा, अन माझा अनुभव कोणाला कामी आला तर आनंद होईल :)