Skip to main content

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

लेखक स्पा यांनी मंगळवार, 02/04/2013 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं. बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते. बाकी इतरही बरेच प्रश्न असतात उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे. ५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या. पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून) २. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे ३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो ४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक . माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती. पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.) अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात . आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता. नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते . गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई. याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल . आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे . अजून एक दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल . बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच धन्यवाद

वाचने 150725
प्रतिक्रिया 358

प्रतिक्रिया

In reply to by सौरभ उप्स

भेसळीचा त्रास झाला असेल तर काही दिवस थोडी रपेट मारून शेलचा पंप शोधून तिथे पेट्रोल भरा. बाजारभावापेक्षा किंचित जास्त असते किंमत पण ती वसुल करून पैसे वाचतील आणि गाडीचा मेंटेनन्स कमी होईल इतके चांगले मायलेज आणि इंजिन परफॉर्मन्स मिळतो. चारचाकीला हा अनुभव आहे पण दुचाकीला कित्येक जणांनी हा दुजोरा दिलेला आहे. सध्या भेसळीचा त्रास झाला असेल तर एखाद वेळेला शेलचे प्रिमियम पेट्रोल जवळजवळ टाकी फुल होईल इतके टाकून थोडी गाडी पळवा. बरेचदा चांगले इंधन, नवे इंजिन व गियरबॉक्स ऑइल आणि मध्यम ५०-६५ स्पीडची थोडी रपेट यामुळे मशीन चांगले रूळते.. मग रेग्युलर वापरात गाडी चांगली चालते. पण शेलचे पेट्रोल नक्कि वापरून बघा..

In reply to by मैत्र

धन्स मित्र, जून पेट्रोल काढून टाकल आणि नेहमीच्या ठिकाणून भरतो तिथलं एच. पी. वाल्यांच पेट्रोल टाकलय सध्या थोडस, सध्यातरी गाडी व्यवस्थित चालतेय... आता तुम्ही म्हणता तस शेलच पेट्रोल टाकून बघतो नक्की..

In reply to by मैत्र

सहमत. शेलच्या पेट्रोलमुळे चारचाकीला देखील मायलेज मधे २ किमी वाढ आढळून आली आहे. परंतु शेलचे पंप सर्वत्र नसल्याने पुण्यातून टाकी फुल्ल करून निघतो आणि येताना मग भारत पेट्रोलियम चा पंप बघून तिथे भरतो. पुरते तितके पेट्रोल.

चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स कोणी देईल काय ? म्हणजे किती दिवसातून एकदा सर्विसिंग, ऑईल लेवल, हवा, इंजिन देखभाल कोणती इ. ?

In reply to by सस्नेह

आमच्या घरी शीबीजी एक्स्ट्रीम(जुनी लाल शेपूटवाली), डिओ आणि जुनी एन्फील्ड असल्या मायलेज मास्टर गाड्याचे कलेक्शन आहे. आणि घरातील कोणीही कुठलीही नेतो, त्यामुळे प्लास्टीकच्या बाटल्याचे पण कलेक्शन आहे. मेंटेनन्सचे गुत्ते एका मेक्यानिकला कायमचे दिलेले आहे. (तो बिचारा वर्षाचे १००० च्या आसपास पैसे मागतो. स्पेअरपार्टचे वेगळे) कणकवली सावंतवाडी आणि गोवा मी २००३ च्या स्प्लेंडरवर केलेले आहे. ६५ ते ७० मायलेज मिळाले. :) माझा आता हिरो मायेस्ट्रो घ्यायचा इचार आहे. चांगली आहे का? नायतर वेस्पा. :)

In reply to by अभ्या..

माझा आता हिरो मायेस्ट्रो घ्यायचा इचार आहे. चांगली आहे का? नायतर वेस्पा. >>>> नॉन गियर मध्ये सध्या फ़क्त. . सुजुकी एक्सेस ४० - ४५ मायलेज देते . आणि ८५ च्या स्पीड ला हि अतिशय आरामात असते . . मस्त गाडी आहे

In reply to by अद्द्या

नॉन गियर मध्ये सध्या फ़क्त. . सुजुकी एक्सेस >>> नॉन गियर मध्ये माझी पसंती महिन्द्रा वेगो !!

In reply to by अभ्या..

माझा आता हिरो मायेस्ट्रो घ्यायचा इचार आहे. चांगली आहे का? नायतर वेस्पा. >>>> होन्डाच्या युनीकॉर्न च्या मॉडेल च मॅन्युयल पण बघुन घ्या मालक एकदा, बाईक हाय वे ला एकदम मस्का आहे. डिओ आणि जुनी एन्फील्ड असल्या मायलेज मास्टर >> ईन्फिल्ड आणि बुलेट या " बडबड्या " गर्लफ्रेन्ड ला घेवून फिरण्यासाठी परफेक्ट बाईक्स आहेत ;) असो ...बुलेट वरून आठवल . नगरला ऑक्शन मध्ये " डिझेल बुलेट " होती. १९८२ चा मेक, सौजन्य : नगरचा लष्करी तळ , १७,००० कोटेड किमंत ! , मी खिशात ( काही ही झाले तरी घ्यायचीच ) म्हणुन दुप्पट रक्कम घेवुन गेलो होतो...स्साला बाईक असली झक्कास मेन्टेन केलेली की आपण फुल्ल टु फिदा... (ती दोन्ही बाजुला असलेली डिक्की असलेली मिलीटरी ग्रीन कलरची बाईक ! अहाहा !! ) पण पहिल्या ऑक्शच्या फेरीत च बाद झालो ...बाईक दिड लाखाला उचलली एका जालन्याच्या माणसाने, स्साल ऑडीत आलत, जाताना त्या बाईक वर गेल .........

In reply to by सुहास..

सुहासदादा, १०० ते ३५० सीसी च्या सगळ्या वापरुन झाल्या गाड्या. मित्रात कायम फिरत असायच्या. युनीकॉर्न आणि डॅझलर पण चालवल्यात. पण आता डिओच बरी वाटते. मध्ये फूटबोर्डावर काहीही ठेवून आणता येते. चालवायला सोपी जाते. घरात कुणीही चालवू शकते. एवढाच उद्देश आहे म्हणून वेस्पा किंवा मायेस्ट्रो. त्यातल्या त्यात अ‍ॅव्हरेज मिळावे. हायवेवर चालवायला इतर भरपूर आहेत की ऑप्शन. एकदा इन्फील्डवरुन मनरावांचा कित्ता पण गिरवायची इच्छा आहे. बघू जमले तर :)

In reply to by अभ्या..

सुहासदादा >> हैत्त ! वाश्या म्हण मित्रा :) म्हणुनच महिन्द्रा वेगो ला जास्त पसंती आहे, फिचर्स मध्ये त्या बाईक ला मोबाईल चार्जर देखील आहे. स्पीड, अ‍ॅव्हरेज पण ओक्के , शिवाय गाडी रस्ता सोडत नाही :)

In reply to by सुहास..

=)) =)) वाश्या नगं. सुहास ठीक हाय. :) वेगो बी भारी हाय टीव्हीएसची. पण डिओसारखी देखणी स्कूटर फक्त यामाहाची रे. मोबाईल चार्जर बरोबर एक बारका कीबोर्ड पण मिळेल काय. ;) आजकाल जास्त पिंग आणि मेसेज मी गाडीवर असतानाच येतेत. ;)

In reply to by सुहास..

वाश्या दादा ;) अरे चंदिगढ का कुठे म्हणे आर्मीच्या रेसले च्या गाड्या मिळतात , बुलेट ४०/५० हजारात , ऑक्शन वेग्रे प्रकार नसतो , डायरेक्ट उचलायच्या फक्त चालवत नाय तर ट्रेन मध्ये टाकून आणावी लागेल

In reply to by स्पा

अरे स्पा, फक्त चंदिगढ लाच नाही, बर्‍याचशा आर्मी कँटिन्स मध्ये मिळतात. आपल्या जवळपासची ठिकाणं म्हणजे देवळाली आणि खडकी. मी इंदूरला असताना तिकडून जवळ असलेल्या महू मधल्या कँटिनमध्ये पण पाहिल्या होत्या. पण माझ्या मते त्या गाड्या फक्त आर्मी वालेच तिकडून घेऊ शकतात, रिटायर्ट ऑफिसर्स वगैरे. बाहेर आल्या की सिव्हिलियन्स ना विकता येतात म्हणे.

In reply to by अभ्या..

वेस्पा चा पर्याय असताना मायेस्त्रो? हे म्हणजे फुल्ल फॉर्मातला सचिन उपलब्ध असताना त्याला वगळून रोहित शर्माला खेळवण्यातला प्रकार झाला. :)

In reply to by सस्नेह

म्याकेनिक लोक म्हणतात दहा हजार किमि. अंतर पार करुन झाले की ऑइल चेंज करावे. पण, मी पाचहजारला ऑईल चेंज करतो. ऑईल चेंज, कुलन,ऑइल फिल्टर,डिझेल फिल्टर, हे सर्व बदलावे. इंजिन बेल्ट चेक करावे. स्टार्ट करतांना कधी कधी गाडी घुम्मा धरल्यासारखी करते म्हणजे घु घु घु करते आणि स्टार्ट होत नाही तेव्हा स्टार्टर (प्लक सारख असतात ते) बदलावे. चारशे रुपये त्याचे आणि म्याकेनिकचे ५० रुपये ( औरंगाबादचे दर आहेत) चार-पाचशे कि.मि. किंवा अधिकचे अंतर जेव्हा असेल तेव्हा इंजिन गरम होत तर नाही ना ? ते बघावे. सारखी गाडी चालवू नये. सुसाट रस्त्यावरुन सुसाट गाडी चालवण्याचा मोह आवरावा. टायरमधील हवेचे प्रमाण योग्य राखले पाहिजे. ट्यूबलेस टायरला माझी पसंती आहे. -दिलीप बिरुटे -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चार-पाचशे कि.मि. किंवा अधिकचे अंतर जेव्हा असेल तेव्हा इंजिन गरम होत तर नाही ना ? ते बघावे. सारखी गाडी चालवू नये.
गाडीचा थर्मोस्टॅट कधीतरी उडतो. त्यासाठी रेडीएटर फॅनला डायरेक्ट कनेक्शन देवून, कॉक्पीटात एक बटन लावुन घ्यावे.. आणीबाणीत बर पडत, खोळंबा होत नाही.

In reply to by सस्नेह

चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स. प्रत्येक मोठ्या प्रवासाच्या वेळी इंजीन ऑइल, कुलंट, ब्रेक ऑइल, क्ल्च ऑइल नक्की चेक करावे. हवेचा दाब साधी हवा असल्यास ३० नायट्रोजन असल्यास ३१/३२ ठेवावा. उत्तम एवरेज मिळण्यासाठी गाडी ६०-८० या पटटयात चालवावी. एक्स्प्रेस वे वरही शक्यतो १०० क्रॉस करू नये. टायर दर १०००० किमीला मागे पुढे व आत बाहेर करावे. अलाइंमेंट व व्हील बॅलेंसींगही त्याच वेळी करावे. बॅटरीत दर महिन्याला पाणी चेक करावे.. त्याच्या टर्मीनलला ग्रीस लावुन ठेवावे. दर १०००० किमीला एअर फिल्टर बदलावा. दर ३००० किमीला स्वतः साफ करावा. इंजीन कंपार्टमेंट थंड असताना पाण्याने धुवून स्वच्छ करावे, कुठे काही गळती आहे का ते बघावे. गाडी हाफ क्लचवर चालवू नये तसेच कमी रोटेशनला वरच्या गेअरमधे ही चालवु नये. शक्य असेल तितक्या वेळा वजन गाडीच्या मध्यावर ठेवायचा प्रयत्न करावा, मागच्या भागात खूप जास्त वजन ठेवू नये. गाडी कोरडी पुसू नये, धुळ असताना, न झटकता ओल्या कपड्याने पुसु नये. आधी याने ती कार झटकुन घ्यावी मग कपडा पाण्यात बुडवत धुवावी. शक्यतो वॉशींग मीट वापरावे. काचा पुसायला हे मस्त उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर वर उचलुन ठेवावे. गाडीत कधीही खावु नये/खायचे पदार्थ ठेवून बंद करु नये. उंदीर त्रास देतात बरच आहे, काही खास शंका असल्यास अनुभवावर आधारीत सल्ला दिला जाईल :).

In reply to by शैलेन्द्र

उन्हात गाडी उभी केल्यास वाईपर वर उचलुन ठेवावे. याचे नेमके काय कारण आहे..? वाईपर काचेला चिकटून ठेवले असताना काचेवर उन्हाने तापलेल्या रबराचे डाग पडतात की उन्हाने तापलेल्या काचेमुळे वायपरचे रबर खराब होते..?

In reply to by मोदक

उन्हाने तापलेल्या काचेमुळे वायपरचे रबर खराब होते, तसच तिथे बसलेली धुळ गरम रबरात अडकते, काचेवर ओरख्डे उठतात

दैनंदिन जीवनात कामाला येउ शकेल अशी माहिती असलेला धागा. वांझोट्या मतांच्या पिंका टाकण्यापेक्षा हा धागा वाचणे पसंत करीन.

In reply to by मन१

तुमच्याकडे कोणती दुचाकी/चारचाकी आहे, ती महिन्याला किती पेट्रोल्/डिझेल खाते, देखभालीचा खर्च किती येतो ते लिहा की राव. धाग्याचा वापर याचसाठी होतोय. ;)

चारचाकीच्या देखभालीच्या टिप्स कोणी देईल काय ? म्हणजे किती दिवसातून एकदा सर्विसिंग, ऑईल लेवल, हवा, इंजिन देखभाल कोणती इ. ? म्हणजे कस बघा दिवसा आड ऑईल बदलवणे,रोज हवा काढुन परत भरुन चेक करणे,रोज धुणे, जमल्यास दर सहा महिन्यातुन गाडीचे इंजीन चेंज करा,कशी गाडी व्यवस्थीत टिकत नाही बघा.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

म्हणजे कस बघा दिवसा आड ऑईल बदलवणे,रोज हवा काढुन परत भरुन चेक करणे,रोज धुणे, जमल्यास दर सहा महिन्यातुन गाडीचे इंजीन चेंज करा,कशी गाडी व्यवस्थीत टिकत नाही बघा.
माझं उत्तर चोरलं बरं का तुम्ही. बाकी हवा दिवसातून तीन वेळा चेक करायला हवी. दररोज सर्व्हीसिंग मस्ट.

आमच्या हापिसातला येक बरेच वर्षापूर्वी एम ८० वरून पुण्याहून रोमला जाउन आला होता. स्पा. तुझी ती माडर्न बाईक ठव तुझ्याकडेच एम ८० वरून फिरून ये. सामान वाहून न्यायला बाप बाईक आहे ती. फक्त डबल सीट जाउ नको. आपला २२ वर्षे आटमोबाईलात घालविलेला वात्रट चौरा

ऑईल कोनतं वापरतो, त्यावर अन लई डीपेंड करतं. मी कॅस्ट्रॉलचं ४टी(२२२०-२४० रु) टाकलं तर ३०००किमीला बदलतो अन् शेलचं टाकलं तर ६-७००० किमी चालतं.(६००रु) शेलमध्ये ३ टाईपचे ऑईल येतात. (६००, ८७०, १६००रु). गाडीच्या वकुबानुसार जे-ते टाकावं. माझी शीडी१०० एसेस ला ६००चं चालतं. ठराविक ३-४ पंपांवर पेट्रोल टाकतो. (जास्तकरून भारत पेट्रोलियम. ईंडियन ऑईल आन् हिंदूस्तान पेट्रोलियमवर भरोसा नाय.). ५-६ वेळा शेलचं महाग पेट्रोल टाकूनपन पाहिलं. आईशप्पथ फायरिंग येकदम स्मूथ!!! पन शेलचं लागोपाठ वापरलं तर फायदा होतो. म्हणून सारखं सारखं नाय जमत. किंमत जास्त आहे म्ह्नून नाय, तर आमच्या जवळ कुठं शेल भेटत नाय म्हणून. वारज्याला हायवेला एक, अन् जुन्या मुंबई हायवेला अँटिबयोटिक्स जवळ एक असे दोनच माहिती आहेत. हडपसरच्या जवळ असलेले खराडी, मुंढवा अन लोणी-काळभोरचे शेल पंप बंद पडल्यात. (मायलेजः शीडी १००एसेस=७०+, प्लेजर=५०+, स्प्लेंडर+=६५+)

In reply to by तुषार काळभोर

ठराविक ३-४ पंपांवर पेट्रोल टाकतो त्यातही ब्रँड् सांभाळणे जमते का ते बघावे. १) मी पॅशन प्लसमध्ये "क्लब एचपी" (नक्की हेच नाव कां..?) चे पेट्रोल टाकतो. ते ही पंप ठरलेले. बाहेर जायचे असेल तर हिंजवडी साईडचा एक पंप, थेऊर आणि सासवड रोडवर प्रत्येकी एक पंप आहे आणि किकवी (पुण्यापासून ४५ किमीवर सातार्‍याच्या दिशेने एक पंप आहे, हा पंप २६/११ च्या एका हुतात्म्याच्या वारसांना मिळालेला आहे!) अशा ठरावीक पंपावर पेट्रोल भरायचे.. २) शक्यतो गाडीचा वेग अचानकपणे वाढवायचा नाही. आणि विनाकारण समोरच्या वाहनाला चिकटून ब्रेक मरायचा नाही (हार्ड स्टॉप) ३) सुरूवातीचे १० / १५ हजार किमी गाडी अत्यंत सांभाळून चालवलेली आहे. (इंजिन सेटल होईपर्यंत) ४) दोन जणांच्या गाडीवर तिघेजण प्रवास करायचा नाही (तुझ्या आग्रहामुळे - तुझ्याच यामाहावर तू, सूड आणि मी असा प्रवास केला होता - तसला प्रकार करायचा नाही! :-D) माझी पॅशन प्लस पुणे शहरात ६५ ते ६८, कोकणात ५५ ते ६० आणि हायवेला ७५ चे मायलेज देते.

In reply to by मोदक

१) शेलचा कुठलाही - हिंजवडीमध्ये एक आहे त्यामुळे आयटी वाल्या बर्‍याच लोकांना सोयीचा २) शेलव्यतिरिक्त सगळ्यात चांगला अनुभव -- कुलकर्णी पेट्रोल पंप - भारत पेट्रोलियम- लक्ष्मी रस्ता जिथे अलकाच्या चौकाला मिळतो तो. पुण्यातला अत्यंत जुना पंप. ३) कर्वे रोडवर आदित्य हॉटेलजवळ एचपीचा एक पंप आहे. ३-४ ठिकाणी न टाकता केवळ १-२ पंपच कायम ठेवल्यास अधिक फायदा होऊ शकेल. या पंपांवर पेट्रोल टाकून नियमित सर्व्हिसिंग, एकहाती गाडी मध्यम स्पीडला पल्सर १५० पुण्यातल्या गल्लीबोळातही ५५-६० देते. पॅशन प्लस, डिस्कव्हर यासारख्या गाड्या नक्कीच जास्त देतील. मोदकाचे सल्ले अत्यंत नेमके आहेत.. चांगल्या मेकॅनिक कडे किंवा मोठ्या विश्वासार्ह सर्व्हिस सेंटर मध्ये काही काळाने (४-५००० किमि) केमिकल डिकार्ब केल्याने गाडिचा रिस्पॉन्स आणि मायलेज सुधारते. पेट्रोल भर उन्हात / दुपारि वगैरे न भरता थोडी हवा थंड असताना भरावे. प्रसरण पावून मायलेजला किंचित फायदा होतो असे ऐकले होते. खरे खोटे / कितपत शक्य ते माहीत नाही..

In reply to by मैत्र

टाकी कायम फुल्ल ठेवावी. म्हणजे माझ्या गाडीची १०ली ची आहे. ३-४ ली संपलं, की मी परत फुल्ल करतो. (टॉप-अप). जेव्ह्ढं कमी पेट्रोल, तेवढं जास्त हिंदकाळतं अन् उडून जातं. त्यामुळं जमेल तेव्हढी फुल्ल टाकी ठेवायची.

In reply to by तुषार काळभोर

उपाय उत्तम आहे, पण आमच्या कल्याण डोंबिवलीत शिंचे पेट्रोल चोर फार आहेत. त्यामुळे १० लिटर मधलं ८ लिटर जाण्याच्या दु:खा पेक्षा २ लिटर मधलं १.५ लिटर जाण्याचं दु:ख जरा कमी असतं. :))

परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . .
तुझ्या पार्श्वभागाची काळजी वाटतेय म्हणून एक गावठी पण अत्यंत परिणामकारक उपाय सुचवतो. , एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.. कंबर व पाठीचा त्रास बराच कमी होईल. अर्थात तुमच्या नव्या गाड्यांवर हे कसं जमेल ते बघायला हवं.
मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .
हा प्रकार स्वतः करायची इच्चा असल्यास गाडी पाच मिनिट चालवुन मग गाडीतले सगळे ऑईल ड्रेन कर, मग परत थोडे ऑइल टाकुन गाडी चालु कर, पुन्हा शेवटच्या थेंबापर्यन्त निपटून काढ. मग पुर्ण ऑइल भर.. नंतर गाडी न्युत्रलला ठेवून फ्युएल स्क्रु नियंत्रीत कर.

In reply to by शैलेन्द्र

एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.
मला बहुतेक ट्रकची, नाहीतर ट्रॅक्टरची, ट्यूब शोधावी लागेल.

In reply to by प्रभाकर पेठकर

नाही हो काका, उलट तुमच्याकडे इन्बिल्ट मॅकेनिजम असल्याने अशा बाह्य उपायांची तुम्हांला गरजच नाही..

एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.. कंबर व पाठीचा त्रास बराच कमी होईल.
एक नंबर उपाय शैलेन्द्र भौ. करून बघ्ण्ञात येईल. आणि इंजिन ऑईल बदलते वेळी एक इंजिन क्लिनिंग ऑईल मिळतं ते वापर. जुनं ऑईल काढलं की क्लिनिंग ऑईल टाकयचं, ३-४ मिनिटं गाडी न्युट्रल वर चालू ठेवायची, मग बंद करून हे क्लिनिंग ऑईल काढून टाकायचं आणि नेहमीचं इंजिन ऑईल भरायचं. इंजिनाच्या कार्यक्षमतेत जाणवण्याइतका फरक पडतो. करून पहा.

एक जुनी सायकलची ट्युब घे (पंक्चर नको), तिच्यात कमीत कमी हवा भर. आणि तुला सहज बसता येईल अशा पद्धतीने ती सीट्ला बांध, वरून सीट कवर घाल.. मस्त एअर कुशन तयार होते.. कंबर व पाठीचा त्रास बराच कमी होईल. अर्थात तुमच्या नव्या गाड्यांवर हे कसं जमेल ते बघायला हवं. >>> हे लई भारी !

१. प्रवासाला निघायच्या आदल्या दिवशी गाडी सर्विसिंग करुन घेउ नये, ऑइल बदलेलं असेल तर किमान ५० किमी गाडी चालवलेली असावी. २. डिस्क ब्रेक असेल तर त्याच्या ऑइलचा कॅन,छोटाच असतो घेउन ठेवावा.डिस्क ब्रेक ऑईल ही फार वेगळी भानगड असते, इमर्जन्सी मध्ये दुसरं कुठलं ऑइल घालायचा प्रयत्न जीवावर बेतु शकतो. ३. हेड्लाईटचा बल्ब स्पेअर घेउन जा, गाडीची वॉरंटी संपली असेल तर चारी इंडिकेटरला हझार्ड वायरिंग करुन घ्या, चार चाकीचे जसे चारी इंडिकेटर ' झग्गा मग्गा मल्ला बग्गा' लागतात तसं. ४. ज्या भागात जाणार आहेत तिथले तुमच्या गाडीचे सर्विस सेंटरचे फोन नंबर आणि १८००-०००-००० वाले नंबर लिहुन ठेवा. ५. १०० किमी गाडी चालवली की गाडी रस्त्याला पर्पेंडिक्युलर उभी करुन ठेवा, अर्थात रस्त्याच्या बाजुला. इंजिन लवकर गार करण्याची ही एक उत्तम आयडिया आहे. गेल्या १०० किमीचा अ‍ॅवरेज स्पिड गुणिले २०, एवढे सेकंड गाडी बंद ठेवा. ६. शक्यतो पिलियन सिट्वरुन डुगडुगेल किंवा हलु शकेल असं सामान नेउ नका. पाठीवर एक सॅक आणि मागं एक चौकोनी बॅग ही उत्तम.पाठीवरची सॅक मागं सिटला टेकेल एवढी सैल ठेवा, गाडी चालवताना वजन तुमच्या खांद्यावर येउ नये यासाठी. ६. साधारण सुर्यास्ताच्या आधी अर्धा तास हेडलाईट लावुन प्रवास सुरु करा, आपल्याकडं संधीप्रकाशात आंधळॅ होणा-याची कमी नाही. ७. जमल्यास हायवेला किंवा बांधकामाच्या ठिकाणी कामगार जे जॅकेट घालतात ना रेडियमच्या पट्ट्याचं ते घाला. ८. इंधन शक्यतो कोको पंपांवर भरा,यांची माहिती बिपिसिएल, एच्पिसिएल वगैरेंच्या वेबसाईटवर असते. ६. शक्यतो जास्तिची कॅश नेउ नका, अगदी इमर्जन्सीमध्ये पेट्रोलपंपावर सुद्धा कार्ड स्वाईप करुन कॅश घेता येते, अर्थात ही पंपांची एक्स्ट्रा सर्विस आहे. बहुतेक २-२.५ % कमिशन घेतात. ७. दोन्ही टायरमध्ये ट्युब सारख्याच असतील तर एक ट्युब स्पेअर ठेवा बरोबर. ८. गाडीच्या छोट्या मोठ्या तक्रारी स्वता दुरुस्त करणार असाल तर असले प्रयोग आधी घरी करुन बघा.विशेषत: ब-याच स्प्रिंगा असतात गाडीत्,लॉकिंग नट असतात, हे एकदा उडाले की हुडकायला युगं लागु शकतात. लढायला जाताना बंदुकीचं मॅन्युअल नेउन उपयोग नसतो. ९. ७. संध्याकाळी किंवा रात्री, एखाद्या लांबवर प्रवासाला निघालेल्या ट्रकच्या जथ्याबरोबर प्रवास करा. ८. घरच्यांना तुम्ही कुठं कसं जाणार आहात याची कल्पना देउन ठेवा.( फॉलो मनराव)

In reply to by ५० फक्त

संध्याकाळी किंवा रात्री, एखाद्या लांबवर प्रवासाला निघालेल्या ट्रकच्या जथ्याबरोबर प्रवास करा. ब्येष्ट सजेशन, स्वतःच्या रायडींगवर डोळस विश्वास असेल तर ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी वाहने जो व्हॅक्यूम तयार करत जातात त्या व्हॅक्यूम मधून) गाडी न्यावी, हे करताना फक्त मागे बडबड करणारा मित्र नसावा आणि समोरच्या वाहनाच्या टेललँपकडे व्य व स्थी त लक्ष असावे. समोरचे वाहन आणि आपण यातले अंतर कमीजास्त करण्यासाठी एखादा रेफरन्स पाँईंट पकडावा. सळ्यांनी भरलेला ट्रक, उसाने भरलेला ट्रक, वाळूची वाहने असल्या वाहनांच्या नादाला लागू नये. मोठ्या वाहनांच्या मागे गाडी चालवताना शक्यतो चाकामागे चाक अशीच गाडी चालवावी, समोरच्या गाडीने चुकवलेले खड्डे, मेलेले प्राणी वगैरे आपोआप चुकवले जातात. पावसाळ्यात रस्त्यावरच्या पाण्याची पातळी दुचाकीच्या सायलेन्सरच्या वरती असेल तर असे रस्ते ओलांडू नयेत, अगदीच असे रस्ते ओलांडणे गरजेचे असेल तर एखाद्या मोठ्या गाडीची वाट बघावी व त्यांच्या मागच्या चाकामागून असे पाणी भरलेले रस्ते ओलांडावेत. वरील सर्व प्रकार स्वतःच्या जबाबदारीवर, स्वत:च्या व गाडीच्या तब्बेतीनुसार करावेत!

In reply to by मोदक

वल्ली व मोदक - दोघांनीही लिहिलेल्या टिपा मोलाच्या आहेत. बाकी वल्ली यांच्या टिपांचा गोंधळलेला क्रम बघून आणखी एक महत्वाची टिप आठवली - पिऊन गाडी चालवू नका ;-).

In reply to by श्रीरंग_जोशी

वल्ली व मोदक - दोघांनीही लिहिलेल्या टिपा मोलाच्या आहेत. काय राव रंगेश.. वाल्लीशेथ संपादक झाले म्हणून "प्रतिसाद लैच माहितीपूर्ण." ही टीप झाली का..? आणि ती पण मौल्यवान..?? ;-) बाकी वल्ली यांच्या टिपांचा गोंधळलेला क्रम बघून आणखी एक महत्वाची टिप आठवली - पिऊन गाडी चालवू नका किती वाजलेत हो तिकडे..?? :-D (संपूर्ण प्रतिसाद हलका घ्यावा!)

In reply to by मोदक

५० फक्त यांच्या प्रतिसादाच्यावर वल्ली यांचा प्रतिसाद होता. ५० फक्त यांचा प्रतिसाद लांबलचक असल्याने पेज अप केले व नेमके वल्ली यांचे नाव दिसले अन असा घोटाळा झाला. बाकी मी लिहिलेली टिपदेखील मोलाची आहेच ;-).

In reply to by प्रचेतस

मा.श्री.श्रिरंग काका यांस, आपली टिप अर्धवट आहे, 'पिउन गाडी चालवु नये म्हंजे काय ?' दारुबद्दल असेल तर योग्य पण, याउलट कोणतीही गाडी चालवताना व्यवस्थित संपुर्णपणे हायड्रेटेड असणं अगदी मस्ट आहे. विशेषतः रात्री चार चाकी चालवताना कमित कमी एक लिटर पाणि पिउन गाडी चालवायला सुरु करावी. रेडबुल/झिंगाला अशी द्रव्ये इतर वेळी प्यायची सवय असेल तरच गाडी चालवताना प्यावीत, पहिला प्रयोग गाडी चालवताना करु नये. विशेषतः झोप येउ नये म्हणुन बडीशेप खाणे हा एक अनुभवसिद्धा उपाय आहे,

In reply to by ५० फक्त

माझ्या प्रतिसादामधले 'पिऊन' = 'नशा करून' असे होते. मी सुद्धा अनेकदा कॉफी पित पित तासनतास एकट्याने चारचाकी चालवली आहे. त्यामुळे झोप येणे हा किती मोठा धोका असू शकतो हे मी जाणून आहे. च्युइंगम किंवा मिंटच्या गोळ्या चघळत राहणे हाही असाच एक उपाय.

In reply to by मोदक

ट्रक च्या मागोमाग (ट्रकसारखी वाहने जो व्हॅक्यूम तयार करत जातात त्या व्हॅक्यूम मधून) गाडी न्यावी
अतिशय धोकादायक सूचना. याने थोडासे मायलेज वाढते इतकेच. पण रिस्क बघता हे सर्वथा टाळावे हे उत्तम. समोरच्या गाडीमागे व्यवस्थीत अंतर ठेवावे. रात्री जास्त ठेवावे.

In reply to by काळा पहाड

अतिशय धोकादायक सूचना - मान्य आहे म्हणूनच काही गोष्टी क्लियर केल्या आहेत, १) बडबड्या मित्र २) टेललँप ३) रेफरन्स पॉईंट ४) गाडीची आणि आपली तब्बेत व काळजी!

In reply to by मोदक

माझा मुद्दा मोदकने कॅरी केला तो तांत्रिकतेतुन, मी मांडला होता सुरक्षेच्या बाजुने, शक्यतो एका जथ्त्यात जाणारे ट्रकवाल्यांना त्यांच्या युनिटिमुळे हायवेला अडवणे, लुटणे असे प्रकार होत नाहीत. आणि ही शब्दशः प्रचंड लोड घेउन जाणारी (३०-४०-६० टन )वाहनं, सुरुवातीच्या पिकपला उचलायला अवघड असतात पण एकदा मोसम पकडला की यांच्यासारखे हेच. आणि या ड्रायव्हर्सची मॅच्युरिटि जास्त असते, हायवेला नाटकं करतात ते एस्टि,लक्झरी आणि ४०७ लेवलचे लोकं, १६२० + ची लोकं कधीच नाट्कं करत नाहीत, रेसिंग, कट मारणे इत्यादी उद्योगात हे फार कमी दिसतात.

In reply to by ५० फक्त

सहमत आहे. रात्री गाडी चालवताना देखील जर समोरून येणार्‍या वाहनासाठी आपण अपर बंद करून डीपर लावला तर ट्रकवाला समोर असेल तर तो लगेच डीपर लावतो. लक्सरीवाले आणि कारवाले मात्र माजुरडेपणाने अपर लावूनच जातात असा माझाही अनुभव आहे.

In reply to by ५० फक्त

हे सारे सल्ले ब्येष्ट. फार फायदा होतो यातल्या बर्‍याच गोष्टींचा.. (हे सल्ले पाळून प्रचंड फायदा झालेला) प्रथम.

In reply to by स्पा

प्रथमोपचार पेटी जवळ असु द्या. अवांतर = सायकल अथवा कोणतीही ट्युब एयर कुशनिंग साठी वापरा/ नवापरा पण कैलासजिवन ट्युब मात्र जरुर वापरा. कोकण दौ-यास शुभेच्छा. व्रुतांत व फोटो ची वाट बघतोय.

५०, मोदक रावांनी रात्री ड्राईव करणे बाबत मार्गदर्शन केले पण भयानक उन्हात तापलेल्या रस्त्याने तितकेच त्रासदायक असते लॉंग ड्राईव असल्यास त्याबाबत काही टिपा . १. पहाटे 3/४ वाजताच प्रवास सुरु करणे श्रेयस्कर , कारण उजाडे पर्यंत आपण आपल्या शहरातल्याच ओळखीच्या रस्त्याने जात असतो ,सो अंधार असला तरी रस्ता ओळखीचा असतो. उन्ह तापाय्च्या आत आपण बराच अंतर कापलेल असत. २.भरपूर पाणी पीत राहणे गरजेचे. 3. डबल सीट जात असाल तर दर २ तासाने आलटून पालटून गाडी चालवणे श्रेयस्कर. ४. एक रुमाल ओला करून डोक्याला बांधून मग त्यावर हेल्मेट घालणे . ५. जमल्यास तोंडाला रुमाल बांधणे. ६. हेल्मेट ची काच हायवेला खालीच करून ठेवणे, कारण हायवेला छोटे छोटे खडे उडून , माती उडून डोळ्यात जाण्याचे चान्सेस असतात . ७. गळ्यात एक छोटा टॉवेल ओला करून गुंडाळणे. ८. दर ७० किमी नंतर एक छोटा ब्रेक. आता कोणी म्हणेल कि एवढे पालथे धंदे करण्यापेक्षा , चान ट्रेन , एस टी किना गारेगार येशी कार ने जाणं काय वाईट पण .. बाईक ने जाण्यात जे थ्रील असत ,त्याची सर कशालाच येणार नाही :)

In reply to by स्पा

काही चुकीचे समज आहेत १. पहाटे ३-४ वाजता प्रवासाची सुरुवात किमान बाईकवर तरी अजिबात करु नये. विशेषतः हायवेला ट्रक व इतर हेव्ही वाहनांचा हा पिक टाइम असतो, ब-याच शहरांत अशा मोठ्या गाडयांना सकाळी ७ नंतर प्रवेश नसतो, म्हणुन ही लोकं पुढचं शहर पास करण्यासाठी जिवाचं रान करतात नाहीतर तो आख्खा दिवस बसुन काढावा लागतो. आणि जेवढा उन्हाचा त्रास दुचाकीवर होतो त्यापेक्षा जास्त त्रास मोठ्या गाडीला होत असतो, पहाटे आणि संध्याकाळच्या संधिप्रकाशात गाडी चालवणं ही एक कसरत असते, अगदी मधली एक पाच दहा मिनिटं तर संधीप्रकाश आणि गाड्यांचे प्रकाश एक्मेकांना क्रॉस होउन काहीच दिसत नाही अशी अवस्था होउ शकते. अशावेळी ट्रकवाले गाडी अप्परवर टाकतात, आणि दुचाकीस्वार अगदी परफेक्ट त्या लाईट बिमच्या सेंटरला येत असल्याने त्याला समोरचंच काय पण बाजुचं देखील *ट काही दिसत नाही. समोर हेलमेट्ची काच असेल ती सुद्धा स्क्रॅच पडलेली मग तर अजुन आनंद आहे. हायवेला हेलमेटच्या काचा खाली घेणं यापेक्षा संपुर्ण डोळे झाकणारा क्लिअर गॉगल, इलॅस्क्टिकवाला हा जास्त चांगला उपाय आहे, याच्या काचेच्या फ्रेमला फोमची लेअर असते त्यामुळं डोळ्यात धुळ अजिबात जात नाही. हा साधारण स्किइंग करताना घालतात तसला असतो. ओला रुमाल डोक्यावर किंवा गळ्याला बांधण्यानं सर्दीचा त्रास होउ शकतो हे लक्षात घ्या. त्या पेक्षा आजकाल ज्या मेंथॉल पावडर मिळतात त्या वापरा, गारवा राहतो. शक्य असल्यास सेफ्टी शुज वापरा, यांची बॉटम ग्रिप उत्तम असते, बाईकिंगचे वेगळे शुज मिळतात पण ते प्रचंड महाग असतात, फुल सॉक्सच्या ऐवजई अँकलेट वापरा, सॉक्सचं इलॅस्टिक पिंड-यांवर घट्ट बसल्यानं पायाला मुंगा आल्यासारखा त्रास होउ शकतो, पँटी शक्यतो जिन्स टाळा, बॅगी टाईपच्या पण बेल बॉटम नसलेल्या वापरा, बेल बॉटमचा मोठा बॉटम गिअर लिव्हर किंवा ब्रेक पॅडलमध्ये अडकतो. पँट बँड्वाल्यांसारखी सॉक्स किंवा बुटात खुपसुन ठेवणं सग़ळ्यात भारी, बेसिक म्हंजे एक एक व्हेरिएबल क्मई करत आणा.

In reply to by स्पा

चलो ताम्हिणी घाट 'दगडांच्या देशा...' प्रोजेक्ट करायला.

In reply to by प्रचेतस

मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची यामा घेउन आमच्या रेड मर्क्युरीच्या भेटीला येणार होता, काय झालं त्याचं ? सिसि - १५० विरुद्ध २२० गाडीचं वजन - १०० विरुद्ध १६० कुलिंग सिस्टिअम - नॅचरल विरुद्ध ऑईल स्टार्टिंग मेथड - किक + बटन विरुद्ध फक्त बटन.(म्हंजे बायकोपेक्षा गाडीची अन गाडीपेक्षा इंजिनची आणि इंजिनपेक्षा बॅटरीची काळजी जास्त) सगळ्यात महत्वाचे - बाइकस्वाराचे वजन - यामाहा ४* ते ५* किलो - रेड मर्क्युरी - ९२ किलो. कधी येताय बोला, फ्लेक्स छापुन घेतो अभ्याकडुन.

In reply to by स्पा

हम भी तय्यार है, विथ टि.वि.एस. अपाची आर.टि.आर. १६० (नुकतीच रेपैर केलीये तरी दगा देणार नाही अशी खात्री आहे).....

In reply to by ५० फक्त

पण या डावात मी पण आलो तर पन्नासदादा? ;) माझी कॉलेजच्या वेळची आरेक्स १३५ ओव्हरड्राइव्ह (५गिअर) घेऊन. जरा इंजिनकाम करावे लागेल बाकी काही नाही. १३५ सीसी. ३५ मायलेज, एअरकुल्ड, कीकस्टार्ट आणि रायडर वेट फक्त ६८ केजी. ;) हाय का तयार मग फ्लेक्स फुकटात छापतो.

In reply to by अभ्या..

यु आर वेल्कम, बघा पुण्याच्या दोन्हीकडुन लोकं येणार म्हंजे पुण्यातच जमायला पाहिजे, चला लवासात जाउ फिरायला, पण पावसात नाही. पावसात तिथले घाट दुचाकी चालवत नेण्याच्या लायकीचे नाहीत.

In reply to by स्पा

मा मिस्पाजी.. अंधार असला तरी रस्ता ओळखीचा असतो असे कोणत्याही रस्त्याबाबत समजू नये... दुर्दैवाने काही झाले तर ओळखीच्या रस्त्यावर फारतर लगेच मदत मिळू शकते. अन्यथा अडचणी यायच्याच असतील तर अनोळखी रस्त्याइतक्याच तीव्रतेने येवू शकतात. बाईक चालवताना पहिल्या किलोमीटरला आपण जितकी काळजी घेतो तितकीच काळजी मुक्कामी पोहोचल्यावर गाडी स्टँडला लावतानाही घ्यावी! २.भरपूर पाणी पीत राहणे गरजेचे. ८. दर ७० किमी नंतर एक छोटा ब्रेक. भरपूर पाणी पीत राहिलास तर ब्रेक आपोआप घेतले जातील. ;-) सल्ल्यांचा पाऊस पडला आहे म्हणून एक वैयक्तीक मत - सुरक्षीत वाहन चालवणे सर्वांना जमत असले तरी जसे आपण एकाच फॉरमॅटमध्ये चालवत नाही / शिकत नाही त्याचप्रमाणे सर्व सल्ले योग्य असूनही सोयीचे पडतीलच असे नाही.. आपल्याला गाडीवर बसताना, गाडी चालवताना, समोरची गाडी ओव्हरटेक करताना आणि योग्य जजमेंटने ब्रेक लावताना कम्फर्टेबल वाटले पाहिजे. बस्स! माझा वैयक्तीक अनुभव विचारशील तर मला रात्री गाडी चालवणे एकदम कम्फर्टेबल वाटते. हवेतील गारव्यामुळे इंजीन फारसे तापत नाही. रस्त्यावर शिकाऊ पब्लीक फारसे नसते. रस्त्यावर लाईटच्या भाषेचे राज्य असल्याने हॉर्नचा त्रासदायक आवाज नसतो. गाडीचा लाईट व्यवस्थीत असेल तर रोड व्हिजीबलिटी व्यवस्थीत असते.. याउलट ट्रक सारखे धूड घेतलेले व दारू पिलेले ड्रायव्हर, रिफ्लेक्टर नसलेले बंद पडलेले ट्रक / ट्रॅक्टर, सलमान खानचे भाऊबंद, लूटमार करणारे लोक असली तमाम जनतासुद्धा रात्रीच रस्त्यावर असते. त्या त्या परिस्थितीमध्ये असलेली आपली कम्फर्ट लेव्हल महत्त्वाची..

In reply to by स्पा

लॉंग ड्राईव असल्यास त्याबाबत काही टिपा .
खोपोलीच्या आजूबाजूचे रस्ते टाळावेत, हे विसरलास काय रे ?? ;-)

आपण साले बस किंवा एसटी वाले...पण धागा मस्त आहे. सगळेच प्रतिसाद महितीपूर्ण