✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा

स
स्पा यांनी
Tue, 04/02/2013 - 15:28  ·  लेख
लेख
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं. बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते. बाकी इतरही बरेच प्रश्न असतात उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे. ५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या. पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून) २. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे ३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो ४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक . माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती. पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.) अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात . आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता. नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते . गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई. याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल . आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो परत कोकण दौरा आखलेला आहे . ४/५ दिवसात १२०० किमी . मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं. तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे . अजून एक दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल . बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
149494 वाचन

💬 प्रतिसाद (358)

प्रतिक्रिया

+२

प्रचेतस
Wed, 04/03/2013 - 12:33 नवीन
चलो ताम्हिणी घाट 'दगडांच्या देशा...' प्रोजेक्ट करायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची

५० फक्त
Wed, 04/03/2013 - 14:31 नवीन
मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची यामा घेउन आमच्या रेड मर्क्युरीच्या भेटीला येणार होता, काय झालं त्याचं ? सिसि - १५० विरुद्ध २२० गाडीचं वजन - १०० विरुद्ध १६० कुलिंग सिस्टिअम - नॅचरल विरुद्ध ऑईल स्टार्टिंग मेथड - किक + बटन विरुद्ध फक्त बटन.(म्हंजे बायकोपेक्षा गाडीची अन गाडीपेक्षा इंजिनची आणि इंजिनपेक्षा बॅटरीची काळजी जास्त) सगळ्यात महत्वाचे - बाइकस्वाराचे वजन - यामाहा ४* ते ५* किलो - रेड मर्क्युरी - ९२ किलो. कधी येताय बोला, फ्लेक्स छापुन घेतो अभ्याकडुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एनि टाईम

स्पा
Wed, 04/03/2013 - 14:35 नवीन
=)) एनि टाईम हम तैय्यार हे बस वक्त और जगा बता दो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१ स्पा.....

सौरभ उप्स
Wed, 04/03/2013 - 14:52 नवीन
हम भी तय्यार है, विथ टि.वि.एस. अपाची आर.टि.आर. १६० (नुकतीच रेपैर केलीये तरी दगा देणार नाही अशी खात्री आहे).....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

५० राव, त्यापेक्षा तुम्हीच या

नानबा
Wed, 04/03/2013 - 14:41 नवीन
५० राव, त्यापेक्षा तुम्हीच या की इकडं तुमची रेड मर्क्युरी घेऊन. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

मी पण

अभ्या..
Wed, 04/03/2013 - 14:41 नवीन
पण या डावात मी पण आलो तर पन्नासदादा? ;) माझी कॉलेजच्या वेळची आरेक्स १३५ ओव्हरड्राइव्ह (५गिअर) घेऊन. जरा इंजिनकाम करावे लागेल बाकी काही नाही. १३५ सीसी. ३५ मायलेज, एअरकुल्ड, कीकस्टार्ट आणि रायडर वेट फक्त ६८ केजी. ;) हाय का तयार मग फ्लेक्स फुकटात छापतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

यु आर वेल्कम, बघा पुण्याच्या

५० फक्त
गुरुवार, 04/04/2013 - 10:36 नवीन
यु आर वेल्कम, बघा पुण्याच्या दोन्हीकडुन लोकं येणार म्हंजे पुण्यातच जमायला पाहिजे, चला लवासात जाउ फिरायला, पण पावसात नाही. पावसात तिथले घाट दुचाकी चालवत नेण्याच्या लायकीचे नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मा मिस्पाजी..

मोदक
Wed, 04/03/2013 - 21:33 नवीन
मा मिस्पाजी.. अंधार असला तरी रस्ता ओळखीचा असतो असे कोणत्याही रस्त्याबाबत समजू नये... दुर्दैवाने काही झाले तर ओळखीच्या रस्त्यावर फारतर लगेच मदत मिळू शकते. अन्यथा अडचणी यायच्याच असतील तर अनोळखी रस्त्याइतक्याच तीव्रतेने येवू शकतात. बाईक चालवताना पहिल्या किलोमीटरला आपण जितकी काळजी घेतो तितकीच काळजी मुक्कामी पोहोचल्यावर गाडी स्टँडला लावतानाही घ्यावी! २.भरपूर पाणी पीत राहणे गरजेचे. ८. दर ७० किमी नंतर एक छोटा ब्रेक. भरपूर पाणी पीत राहिलास तर ब्रेक आपोआप घेतले जातील. ;-) सल्ल्यांचा पाऊस पडला आहे म्हणून एक वैयक्तीक मत - सुरक्षीत वाहन चालवणे सर्वांना जमत असले तरी जसे आपण एकाच फॉरमॅटमध्ये चालवत नाही / शिकत नाही त्याचप्रमाणे सर्व सल्ले योग्य असूनही सोयीचे पडतीलच असे नाही.. आपल्याला गाडीवर बसताना, गाडी चालवताना, समोरची गाडी ओव्हरटेक करताना आणि योग्य जजमेंटने ब्रेक लावताना कम्फर्टेबल वाटले पाहिजे. बस्स! माझा वैयक्तीक अनुभव विचारशील तर मला रात्री गाडी चालवणे एकदम कम्फर्टेबल वाटते. हवेतील गारव्यामुळे इंजीन फारसे तापत नाही. रस्त्यावर शिकाऊ पब्लीक फारसे नसते. रस्त्यावर लाईटच्या भाषेचे राज्य असल्याने हॉर्नचा त्रासदायक आवाज नसतो. गाडीचा लाईट व्यवस्थीत असेल तर रोड व्हिजीबलिटी व्यवस्थीत असते.. याउलट ट्रक सारखे धूड घेतलेले व दारू पिलेले ड्रायव्हर, रिफ्लेक्टर नसलेले बंद पडलेले ट्रक / ट्रॅक्टर, सलमान खानचे भाऊबंद, लूटमार करणारे लोक असली तमाम जनतासुद्धा रात्रीच रस्त्यावर असते. त्या त्या परिस्थितीमध्ये असलेली आपली कम्फर्ट लेव्हल महत्त्वाची..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

लॉंग ड्राईव असल्यास त्याबाबत

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 04/04/2013 - 00:47 नवीन
लॉंग ड्राईव असल्यास त्याबाबत काही टिपा .
खोपोलीच्या आजूबाजूचे रस्ते टाळावेत, हे विसरलास काय रे ?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आपण

सुमीत भातखंडे
Wed, 04/03/2013 - 11:27 नवीन
आपण साले बस किंवा एसटी वाले...पण धागा मस्त आहे. सगळेच प्रतिसाद महितीपूर्ण
  • Log in or register to post comments

मस्त सल्ले दिले आहेत

योगी९००
Wed, 04/03/2013 - 13:18 नवीन
मस्त सल्ले दिले आहेत..... डिझायर पेट्रोल विषयी काय मत आहे? कशी आहे ही गाडी?
  • Log in or register to post comments

हेल्मेट आणि बॅग

कपिलमुनी
Wed, 04/03/2013 - 13:57 नवीन
हेल्मेटला आणि बॅग ला रेडियम च्या पट्ट्या लावून घ्या .. सामान २ बाजुला समान वजना मधे विभागून लावा .. वेगामधे वळणावर जर सामान एका बाजुला लावले असेल तर पडण्याची शक्यता असते.. प्रवास मोठा असेल तर कॅरीयर बसवणे सर्वात उत्तम .. १००० किमि पेक्षा मोठा प्रवास असेल तर डबल सीट करू नका ..
  • Log in or register to post comments

माझ्या कडे CBZ इक्सट्रिम आहे.

खबो जाप
Wed, 04/03/2013 - 14:01 नवीन
माझ्या कडे CBZ इक्सट्रिम आहे. दोन वर्ष झाली जवळ जवळ १२५०० किमी झाले आहे चेन्नई शहरा मध्ये मस्त ४५-४७ आव्र्रेज देते आहे , फक्त इंडिअन ऑंईल कंपनी चे पेट्रोल टाकतो (५०० रु चे पेट्रोल टाकले तर नित्रोजन ऐअर फ्री भरून देतात ) मस्का चालते आणि डिस्क ब्रेअक पण मस्त आहे (डिस्क ब्रेंक आणि रेअर ब्रेअक चा एकत्र वापर करतो ) एकटे जाणार असाल तर मस्त आहे
  • Log in or register to post comments

सोप्पा उपाय म्हणजे नेहमी

नितिन थत्ते
Wed, 04/03/2013 - 14:08 नवीन
सोप्पा उपाय म्हणजे नेहमी अधिकृत सर्विस सेंटरमध्ये सर्विसिंग करावे. इंजिन आणि कार्ब्युरेटरची कामे अधिकृत सर्विस सेंटरमधून करावीत. बाकीची कामे रोडसाईड मेकॅनिककडून करून घ्यावीत.
  • Log in or register to post comments

बाईकची सर्विसिंग

वामन देशमुख
Wed, 04/03/2013 - 15:01 नवीन
सर्विस सेंटर मध्ये/ मेकानिक लोक बाईकची सर्विसिंग करतात म्हणजे नेमके कायकाय करतात? कुणी स्टेप-बाइ-स्टेप मार्गदर्शन करू शकेल काय?
  • Log in or register to post comments

दुचाकीसंदर्भात..

मोदक
गुरुवार, 04/04/2013 - 02:27 नवीन
दुचाकीसंदर्भात.. १) सर्वप्रथम गाडी स्वच्छ धुतात. २) गाडी चालू करून विचित्र आवाज, धूर, मर्यादेपेक्षा जास्ती असलेले व्हायब्रेशन, गाडीचे संतुलन, अकारण आवाज करणारे भाग यांची तपासणी होते ३) गाडीचे हेडलाईट (अप्पर व डीपर), हॉर्न, टेललँप, इंडीकेटर, ब्रेकलाईट वगैरे भागांची तपासणी. गरज लागली तर मेकॅनीक एखादी रपेट मारून येतो. (या रपेटीदरम्यान आपण सोबत जायचेच्च जायचे!) ४) फिल्टर साफ करणे - प्रथमने ही कृती स्टेप बाय स्टेप दाखवली आहे ५) इंजीन ऑईल चेक / बदली / टॉप अप. ६) मुद्दा २ व ३ दरम्यान निघालेले पिराब्लेमचे निराकरण ७) क्लच / ब्रेक / गियर केबलचे सेटींग ठीक ठाक करणे ८) शक्य त्या सर्व स्प्रिंगना ऑईल देणे ९) गरज आहे त्या बॉलबेअरींगना ग्रीजींग १०) चेनची देखभाल व गरजेनुसार तिला टाईट करणे ११) इंजीनचे आयडलींग चेक करणे, फाईनट्यून करणे १२) बॅटरी चेक करणे १३) बॅटरीचे चार्जींग चेक करणे व तो प्रॉब्लेम निस्तरणे शक्यतो सर्व्हीसींग सेंटर करत नाही. हवा भरणार्‍याप्रमाणे ते काम (व शॉक अ‍ॅब्सॉर्बरचे काम) बहुतेकवेळा आऊटसोर्स केलेले असते. १४) अत्यंत दुर्लक्षीत कामे उदा शॉक अ‍ॅब्सॉर्बर ऑईल चेक करणे, खुळू खुळू वाजणारे सर्व भाग आपापल्या ठिकाणी फिट्ट बसवणे वगैरे कामे. यानंतर मे़कॅनीक सायेब गाडीची खास "च्येकींग" करतात, उदा. गाडी मेन स्टँडला लावून मागच्या चाकावर भार देवून (टेक ऑफच्या पोझीशनमध्ये!) पुढचे चाक मागच्या चाकाच्या दिशेमध्ये राहते आहे की एका साईडला कलते आहे ते पाहणे मेकॅनीकने उत्साहाच्या भरात ब्रेक "लै टैट" केले आहेत का..? हे चेकवणे. गाडी सुरू करून, इंजिना जवळ डोके नेवून किंवा इंजिनाला कान (अलमोस्ट) चिकटवून इंजीनाच्या आवाजात कसकस जाणवते आहे का हे पहाणे...वगैरे वगैरे.... मुद्दा २ व ३ प्रमाणे पुन्हा डीट्टेल चेकींग. (काही विसरले असल्यास कृपया भर घालावी!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

धन्यवाद!

वामन देशमुख
गुरुवार, 04/04/2013 - 09:56 नवीन
धन्यवाद हो मोदक साहेब, अजूनही काही सांगण्यासारखे असेल तर सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुम्ही लिहिली आहे ती आदर्श

खबो जाप
गुरुवार, 04/04/2013 - 11:09 नवीन
तुम्ही लिहिली आहे ती आदर्श कृति जी केली पाहिजे ती आहे सगळे सेर्विस सेंटर्स , बहुतेक कायमच एवढेच करतात १) सर्वप्रथम गाडी स्वच्छ धुतात. -- हे शेवटी करतात २) गाडी चालू करून विचित्र आवाज, धूर, मर्यादेपेक्षा जास्ती असलेले व्हायब्रेशन, गाडीचे संतुलन, अकारण आवाज करणारे भाग यांची तपासणी होते -- हे करतात पण गाडीचे काही खरे नाही असे भासवतात ३) गाडीचे हेडलाईट (अप्पर व डीपर), हॉर्न, टेललँप, इंडीकेटर, ब्रेकलाईट वगैरे भागांची तपासणी. -- हे नक्कीच करतात गरज लागली तर मेकॅनीक एखादी रपेट मारून येतो. (या रपेटीदरम्यान आपण सोबत जायचेच्च जायचे!) ४) फिल्टर साफ करणे - प्रथमने ही कृती स्टेप बाय स्टेप दाखवली आहे -- हे जर तक्रार केली तरच करतात ५) इंजीन ऑईल चेक / बदली / टॉप अप. -- हे मात्र गरज नसली तरी करतात ६) मुद्दा २ व ३ दरम्यान निघालेले पिराब्लेमचे निराकरण -- पास ७) क्लच / ब्रेक / गियर केबलचे सेटींग ठीक ठाक करणे -- हे जर तक्रार केली तरच करतात ८) शक्य त्या सर्व स्प्रिंगना ऑईल देणे -- मला तरी अजून कुणी हे केले आहे म्हणून सागितले नाही ९) गरज आहे त्या बॉलबेअरींगना ग्रीजींग -- ह्याबद्दल कल्पना नाही १०) चेनची देखभाल व गरजेनुसार तिला टाईट करणे -- हे जर तक्रार केली तरच करतात ११) इंजीनचे आयडलींग चेक करणे, फाईनट्यून करणे -- मी एकदा विचारले होते ५००० रु खर्च येयील म्हणून सागितलं १२) बॅटरी चेक करणे -- हे करतात स्टेप ३ मध्ये हे होवून जाते १३) बॅटरीचे चार्जींग चेक करणे व तो प्रॉब्लेम निस्तरणे शक्यतो सर्व्हीसींग सेंटर करत नाही. हवा भरणार्‍याप्रमाणे ते काम (व शॉक अ‍ॅब्सॉर्बरचे काम) बहुतेकवेळा आऊटसोर्स केलेले असते. १४) अत्यंत दुर्लक्षीत कामे उदा शॉक अ‍ॅब्सॉर्बर ऑईल चेक करणे, खुळू खुळू वाजणारे सर्व भाग आपापल्या ठिकाणी फिट्ट बसवणे वगैरे कामे. -- हे फक्त पुढचे हेंड लाईट चे टवळ हलत असेल तर करतात यानंतर मे़कॅनीक सायेब गाडीची खास "च्येकींग" करतात, -- हे मात्र नक्की करतात आणि तुमचे गाडी मारायला टेकली होती ती आम्ही वाचवली आसे दाखवतात उदा. गाडी मेन स्टँडला लावून मागच्या चाकावर भार देवून (टेक ऑफच्या पोझीशनमध्ये!) पुढचे चाक मागच्या चाकाच्या दिशेमध्ये राहते आहे की एका साईडला कलते आहे ते पाहणे मेकॅनीकने उत्साहाच्या भरात ब्रेक "लै टैट" केले आहेत का..? हे चेकवणे. गाडी सुरू करून, इंजिना जवळ डोके नेवून किंवा इंजिनाला कान (अलमोस्ट) चिकटवून इंजीनाच्या आवाजात कसकस जाणवते आहे का हे पहाणे...वगैरे वगैरे.... मी दर दोन महिन्यांनी सर्विसिंग करून घेतो दर वेळी इंजिन ओइल आणि ब्रेअक ओइल संपल आहे म्हणून सागतात आणि नवीन घातलं म्हणून सागतात, आणि दर वेळी नवीन काहीतरी शोधून काढतात आणि जुनी सर्विसिंग जर दुसरीकडे केली असेल तरी त्याने फसवले आणि त्यांच्याकडे केली असेल तर काहीतरी चूक झाली असेल म्हणून सांगतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

प्रतिसाद

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 04/06/2013 - 14:15 नवीन
जीनचे आयडलींग चेक करणे, फाईनट्यून करणे -- मी एकदा विचारले होते ५००० रु खर्च येयील म्हणून सागितलं
:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O च्यायला माझ्या गाडीच्या ३ वर्षाच्या ट्युनिंग चा खर्च पण येवढा येणार नाही. अहो आयडलिंग आणि ट्युनिंग तुम्ही घरी करु शकता. कार्ब्युरेटर ला सेट स्क्रु दिलेला असतो त्याच्यावरती ह्या अ‍ॅडजस्ट्मेंट करता येतात. असल्या भुरट्या मेक्यानिक पासुन गाडीला लांबच ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खबो जाप

चला अजरामर झाला हा धागा.

स्पंदना
Wed, 04/03/2013 - 16:06 नवीन
चला अजरामर झाला हा धागा. आणि वर स्पाची झैरातपण झाली मॅचो म्हणुन. काही म्हणा फक्त आणि फक्त पुरुषांचा धागा झाला. सेम थ्रील, सेम इंटरेस्ट अन गप्पा किती मन लावुन केल्यात.
  • Log in or register to post comments

काही म्हणा फक्त आणि फक्त

स्पा
Wed, 04/03/2013 - 16:12 नवीन
काही म्हणा फक्त आणि फक्त पुरुषांचा धागा झाला. सेम थ्रील, सेम इंटरेस्ट अन गप्पा किती मन लावुन केल्यात.
बायकांना "नो वेण्त्री" चा बोर्ड लावलेला नव्हता ;) आणि चर्चा फक्त दुचाकीची नाहीये, चारचाकी वर पण आहे असो तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ? ;)
  • Log in or register to post comments

>>>>असो तुमचा "फेस्प्याक"

सौरभ उप्स
Wed, 04/03/2013 - 16:58 नवीन
>>>>असो तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ? ख्या ख्या ख्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

असो तुमचा "फेस्प्याक" च्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 04/03/2013 - 17:38 नवीन
असो तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ? >>> येस ..येस ... परिपूर्ण सहमत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१११११११११११११११११११.

बॅटमॅन
Wed, 04/03/2013 - 17:57 नवीन
+१११११११११११११११११११. या बायकांना बाकी किरकिर केल्याशिवाय चैन कशी ती पडत नै बॉ =)) (मरतंय आता-बॅटमोबील घेऊन सूट बघू लौक्कर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

आणि हो, फेसप्याकबद्दल

बॅटमॅन
Wed, 04/03/2013 - 17:58 नवीन
आणि हो, फेसप्याकबद्दल स्पांडूशी प्रचंड सहमत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तुमचा "फेस्प्याक" च्या

यशोधरा
गुरुवार, 04/04/2013 - 16:25 नवीन
तुमचा "फेस्प्याक" च्या ध्ग्याबद्दल आम्ही काही बोललो काय ? ऑ?
तुम्ही कशापायी बोलाल? तुम्ही चूपचाप तो धागा वाचून ते प्याक तुमच्या चेहर्‍यावर चोपडले असणार! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

एक फुकट सल्ला....

नन्दादीप
Wed, 04/03/2013 - 17:50 नवीन
गाडीच्या चाकात नायट्रोजन भर.... १. रोड वर ग्रीप मस्त मिळते. २. लाँग रूट ला टायर थंड रहातात (जर नुसतीच हवा भरली असेल तर लवकर हवा गरम होऊन तायर फुटतात). ३. टायर झीज कमी होते.
  • Log in or register to post comments

मपल्याकडे पल्सर १५० आहे.

झकासराव
गुरुवार, 04/04/2013 - 08:38 नवीन
मपल्याकडे पल्सर १५० आहे. एव्हरेज मिळत्ट ५०-५२ च्या रेन्ज मध्ये. अर्थात शहरात चालवत असल्याने स्पीड ४०-६० मध्येच असतो. हायवे ला अ‍ॅव्हरेज कमी होतं. कारण स्पीड आपोआपच ७०-८०-९० ह्या रेन्ज मध्ये असतो. रेग्युलर सर्व्हिसिन्ग (साधारण ३ ते साडेतीन हजार किमी रनिन्ग) करुन घेतो. नेहमी एकाच सर्व्हिस सेन्तर मध्ये. म्हणजे ओळख राहते. उगाच पैशे उकळत नाहीत. ऑइल चेन्ज साधारण ३५०० ते ४००० च्या रेन्ज मध्येच. (कंपनीने चक्क १०००० किमी दिलय?? पण माझा विश्वास नाही) नॉयट्रोजन भरल्याने गाडी चांगली ग्रीप कशी घेते? (तसही साध्या हवेत ७८ टक्के नायट्रोजन असतोच की मग वरच्या २२ टक्क्याने नेमका काय फरक पडतो) त्यावेळी टायरमधे हवेचं प्रेशर किती ठेवायचं?
  • Log in or register to post comments

नॉयट्रोजन भरल्याने गाडी

स्पा
गुरुवार, 04/04/2013 - 09:28 नवीन
नॉयट्रोजन भरल्याने गाडी चांगली ग्रीप कशी घेते? (तसही साध्या हवेत ७८ टक्के नायट्रोजन असतोच की मग वरच्या २२ टक्क्याने नेमका काय फरक पडतो) त्यावेळी टायरमधे हवेचं प्रेशर किती ठेवायचं?
असेच बोलतो. पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये हवा भरून देतात , ते नाय्त्रो वाले असतात काय
  • Log in or register to post comments

पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये

५० फक्त
गुरुवार, 04/04/2013 - 10:35 नवीन
पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये हवा भरून देतात , ते नाय्त्रो वाले असतात काय - नाही,त्या हवेतला नायट्रोजन काढुन वेगळ्या टाकित साठवुन वेगळा विकतात. असो, आजकालच्या दुचाकी किंवा चारचाकी, सगळ्याच गाड्यांचा कोणता ना कोणता भाग हा एकत्र सैन्यदलांसाठीचे किंवा रेसिंगच्या क्षेत्रात होणारे आर अँड डि चे देणे आहेत. नायट्रोजन भरणं हा त्यापैकीच एक, अमेरिकेत होणा-या नासकार सारख्या काँक्रिट सरफेस वर होणा-या स्पिड कम ड्रॅग रेस मध्ये याची सुरुवात झाली. अर्थात सामान्य गाड्यांना याने फार फरक पडत नाही, नियमित समजुतीच्या विरुद्ध आश्चर्यकारकरीत्या टायर फुटणे याचा संबंध हवा कमी भरण्याशी जास्त आहे, हवा जास्त भरण्याशी नाही. याबद्दल परत लिहिन,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हिरो होंडा... आपका शानदार हमसफर. Fill it Forget it...

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 04/04/2013 - 10:32 नवीन
या सगळ्या चर्चे मधे आमच्या आवडत्या स्प्लेंडर बद्दल कोणीच काही बोलु नये? १५ वर्षां झाली गाडीला दर तीन महिन्यांनी सर्व्हीसिंग करुन घेतो बाकि कोणताही खर्च नाही गाडीला. २०,००० कि.मी नंतर बळेच टायर बदलले होते. शहरात अ‍ॅव्हरेज ५० पर्यंत. पण शहरा बाहेर ५५-५८ पर्यंत सहज जातो. लाँग ड्राइव्हला पण काही त्रास देत नाही. त्या मुळे दुसरी पण सुपर स्प्लेंडरच घेतली आहे. वो भी मक्खन जैसे चलती है. आता हिरो होंडा जाउन नुसते हिरो राहिल्याने काय फरक पडला आहे ते माहित नाही.
  • Log in or register to post comments

आता हिरो होंडा जाउन नुसते

५० फक्त
गुरुवार, 04/04/2013 - 10:38 नवीन
आता हिरो होंडा जाउन नुसते हिरो राहिल्याने काय फरक पडला आहे ते माहित नाही. - एक दोन वर्षात दिसतील फरक, पहिला पडला तो, बजाज डिस्कव्हर फॅमिलीने हिरो पॅशन फॅमिलिला ओव्हरटेक केले, सगळ्यात जास्त विकल्या जाणा-या गाडीच्या रेसमध्ये.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

५० राव,

प्रचेतस
Fri, 04/05/2013 - 09:15 नवीन
५० राव, या निमित्ताने भारतातल्या दुचाकींच्या सुरुवातीपासून आताच्या अत्याधुनिक बाईकपर्यंत नेणारी एखादी लेखमाला सुरु करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+५० फक्त

स्पा
Fri, 04/05/2013 - 09:17 नवीन
सुभान अल्ला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्लीजे धागा क्र २ काढता का?

यशोधरा
गुरुवार, 04/04/2013 - 11:21 नवीन
प्लीजे धागा क्र २ काढता का? इथे प्रतिसाद सोधायला त्रास होत आहे. धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मस्त लेख...

मुक्त विहारि
गुरुवार, 04/04/2013 - 23:20 नवीन
मस्त लेख...
  • Log in or register to post comments

चारचाकी

तुषार काळभोर
Fri, 04/05/2013 - 15:19 नवीन
दुचाक्यांविषयी भरभरून बोलले (ऊप्स.. बोलल्या) गेले आहे. चारचाकीवर बोला कुनीतरी. पेट्रोल अन् डीझेल च्या मोडेल मध्ये दीड-दोन लाखाचा फरक असतो. तर इंधनावर खरंच तेव्हढी बचत होते का? पुन्यात डीझेल=५२ रुप्रलि अंदाजे अन् पेट्रोल = ७४ रुप्रलि अंदाजे स्विफ्टसारखी गाडी: डीझेल=२०किमी प्रलि= २० किमी प्रती ५२ रु= २.६ रु प्रति किमी पेट्रोलः १७ किमी प्रलि=१७ किमी प्रती ७४ रु= ४.३५ रु प्रति किमी प्रती किमी १.७५ रु ची बचत. तेसुद्धा सरकार अनुदान देतंय म्हणुन. रोज ५०किमी चालवणारा माणुस ९०रु वाचवाणार. म्हणजे २५०० प्रती महिना. दीड लाख अतिरिक्त खर्चून महिना २५०० वाचवायचे? तेपण रोज ५० किमी चालवणे होत असेल तर. शिवाय डीझेल कारचा देखभाल खर्च पेट्रोल कार पेक्षा अधिक असतो, असे ऐकले आहे. डीझेल गाडी प्रदूषण जास्त करते, ते वेगळेच. एकुणात.. डीझेल कार पेट्रोल कारच्या तुलनेत परवडते काय?
  • Log in or register to post comments

एका वेगळ्या धाग्याचा विषय,

५० फक्त
Fri, 04/05/2013 - 17:11 नवीन
एका वेगळ्या धाग्याचा विषय, सध्या एवढेच, सध्या सर्वात स्वस्त सिएनजी,त्यानंतर डिझेल, त्यानंतर पेट्रोल. आणि हो हल्ली मेंटेनन्स्चा खर्च पेट्रोल डिझेलचा सारखाच येतो, फार फरक नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तुषार काळभोर

आमी सि.एन.जि.वाले-२रु.प्रति

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/05/2013 - 18:43 नवीन
आमी सि.एन.जि.वाले-२रु.प्रति कि.मि. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

गवी काका या धाग्यापासून काही

स्पा
Fri, 04/05/2013 - 15:27 नवीन
गवी काका या धाग्यापासून काही कारणाने लांब राहिले आहेत नाहीतर त्यांनी मदत केली असती असो आपले ५०, आणि शैलेंद्र काका आहेत :)
  • Log in or register to post comments

इतका वेळ बाईकवर बसून बसून

गवि
Fri, 04/05/2013 - 15:43 नवीन
इतका वेळ बाईकवर बसून बसून प्रवास करणार म्हटल्यावर मला मायलेज आणि इंजिनात घालण्याच्या विविध वंगणांपेक्षाही "कैलास जीवन", "हडेन्सा", आदिंचा विचार मनात येतो आहे. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

सिग्नल ग्रीन होण्याची वाट

मोदक
Sat, 04/06/2013 - 00:51 नवीन
सिग्नल ग्रीन होण्याची वाट पहात असताना गाडी बंद करावी का..? कधी करू नये..?
  • Log in or register to post comments

चालू करताना सारखी किका

काळा पहाड
Sat, 04/06/2013 - 01:41 नवीन
चालू करताना सारखी किका मारायला लागत असेल तर बंद करू नये. मागचे फार बोंबलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

जवळपास हवालदार आहे का त्यावर ठरवावे

लॉरी टांगटूंगकर
Sat, 04/06/2013 - 10:26 नवीन
जवळपास हवालदार आहे का त्यावर ठरवावे. जवळ असल्यास आणि १०-१२ सेकंदाच्यापेक्षा जास्त वाट बघायची असल्यास बंद करण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

दुचाकीला १० सेकंद आणि

५० फक्त
Sat, 04/06/2013 - 16:11 नवीन
दुचाकीला १० सेकंद आणि चारचाकीला १५ सेकंद ह्याच्यापेक्षा कमी वेळ असेल तर गाडी बंद करुन किंवा न करुन किमान इंधनबचत तरी होत नाही, कारण बंद असलेले इंजिन सुरु होताना लागणारे जास्तित जास्त इंधन हे या वेळेत शांतपणे चालणा-या इंजिनात जळणा-या इंधनाएवढे किंवा त्यापेक्षा कमी असते. अर्थात गाडीचे स्पार्क प्लग हा या मधला सर्वात मोठा फॅक्टर आहे. स्पार्क प्लगचे क्लिअरन्स हा एक पार्ट वर सर्विसिंगच्या प्रतिसादात राहुन गेला आहे, ज्यांनी जानदार सवारी लुना वापरली आहे त्यांना ह्याचे महत्व माहित असेलच. बाकी, लुना हा शब्द टाइपताना देखील हात थरथरत आहेत, टिएफार प्लस ही निदान माझ्या पिढितल्या कित्येंकांची पहिली गाडी असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लॉरी टांगटूंगकर

ओ ते बाइक ला बाजूला बॉक्स

काळा पहाड
Sat, 04/06/2013 - 01:39 नवीन
ओ ते बाइक ला बाजूला बॉक्स बसवतात ते कोथरूड साइड ला किंवा पुण्यात कुठे मिळेल? लॅपटॉप कॅरी करून करून पाठ दुखायला लागलिये.
  • Log in or register to post comments

लॅपटॉप कॅरी करून करून पाठ

मोदक
Sat, 04/06/2013 - 11:00 नवीन
लॅपटॉप कॅरी करून करून पाठ दुखायला लागलिये. सॅकचे स्ट्रॅप्स अ‍ॅडजेस्ट करा. सॅक तुमच्या खांद्यातून निसटली जावू नये आणि ती मागच्या सीटवर / मागच्या व्यक्तीच्या मांडीवर व्यवस्थीत टेकली जावी इतपत सैल ठेवावेत. (तुम्ही मागे बसणारी व्यक्ती असाल तर लॅपटॉप सॅकमध्ये डबल कुशन ची व्यवस्था करा अन्यथा कॅरीयरवर सॅक आदळून आदळून लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

पण त्यापेक्षा एखाद्या सॅडल

काळा पहाड
Sat, 04/06/2013 - 11:12 नवीन
पण त्यापेक्षा एखाद्या सॅडल बॅग/बॉक्स मधे घालून नेला तर जास्त चांगलं नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तसा विचार करायचा तर रोज कॅब

मोदक
Sat, 04/06/2013 - 12:06 नवीन
तसा विचार करायचा तर रोज कॅब हायर करून घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर असा प्रवास केला तर सर्वात चांगले. धूळ, धूर, वाढते प्रदूषण वगैरे शहराच्या भूषणांशी सामना होत नाही. आपण आपली आवडती गाणी ऐकत आरामात मागे बसून राहू शकतो. आणि सर्वात महत्वाचे लॅपटॉप सॅक बाजूच्या सीटवर आरामात पहूडलेली असते! ;-) (संपूर्ण सल्ला हलका घ्यावा!) ---तुम्ही सॅक वापरता आहातच तर त्यातल्या त्यात सोयीची कशी पडेल या विचाराने स्ट्रॅपचा सल्ला दिला होता हो, मला व्यक्तीशः गाडीला आणखी काही जोडलेले (अगदी हेल्मेट लॉक होल्डर सुद्धा!) आवडत नाही. सॅडल बॅग/बॉक्स लै लांबची गोष्ट आहे. (हे माझे व्यक्तीगत मत आहे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

बाईकच्या बाजुला साईड बॉक्स

५० फक्त
Sat, 04/06/2013 - 16:14 नवीन
बाईकच्या बाजुला साईड बॉक्स किंवा सॅडल बॅग बसवतात त्यांचा विचार लॅपटॉप ठेवण्यासाठी अजिबात करु नका. सुरक्षेच्या कारणास्तव बाकी काही नाही. त्यापेक्षा मोदकने लिहिलंय तसं स्ट्रॅप अ‍ॅडजस्ट करुन बॅग मागं टेकवा सिटाला म्हंजे तुमच्या खांद्यावर किंवा पाठीवर लोड येत नाही. माझ्या रेड मर्क्युरीचं सिट यासाठी एकदम परफेक्ट आहे, समोरचं खाली गेलेलं आणि मागचं वर, बजाजांनी सांगितल्याप्रमाणे 'feel like god' लई भारी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा