दुचाकी /चारचाकिंच्या काळजी /देखभाल संदर्भात चर्चेचा धागा
मिपावर याबाबतीत बराच उत्खनन करूनही हाती काही न लागल्याने ह्या नवीन चर्चेचा प्रपंच
हल्ली दुचाकी / चारचाकी जीवनाचा अविभाज्य घटकच झालेला आहे. अशावेळी गाड्यांच्या बाबतीत बर्याचदा टेक्निकल माहिती नसल्याने , जराही काही खुट्ट झालं कि लागलीच म्याक्यानिक कडे धाव घ्यावी लागते. तो सांगेल ती पूर्व दिशा या न्यायाने मुकाट बिल भरावं लागतं.
बर्याचदा प्रॉब्लेम साधाच असतो , घरीही आपण तो सोडवू शकतो, पण आपल्याला (म्हणजे निदान मला तरी ) गाडीतलं काहीच कळत नसल्याने, उगाच आपण हात लावला आणि गाडी अजूनच बिघडली तर असे वाटते.
बाकी इतरही बरेच प्रश्न असतात
उदाहरणार्थ मागे एकदा मुंबई -दापोली आणि इतर परिसर असा साधारण ६५० किमीचा २ दिवसांचा दौरा मी बाईक वरून केला, पण एरवी शहरात ४५ चा मायलेज देणाऱ्या आमच्या यामाने हायवेवर फक्त ३६ चा मायलेज दिला. बाकी गाडी व्यवस्थित होती, पण मग एवढा कमी मायलेज का ब्वा?मग यावर व्यनित चर्चा झडली,कि कारण काय असावे.
५० फक्त , वल्ली, मनराव ( हो तेच ते पुणे-लदाख वाले) यांनी व्यवस्थित चिकित्सा केली. 3/४ शक्यता निघाल्या.
पहिली म्हणजे मी टायर मध्ये हवेचे प्रेशर कमी ठेवले होते ( जास्त प्रेशर ने तयार पंक्चर होऊ नये म्हणून)
२. कोकणातले रस्ते घाटाचे असल्याने मायलेज पडले असावे
३. त्वरण कमी जास्त केल्याने मायलेज वर परिणाम होतो
४. एअर फिल्टर साफ न केल्याने इंजिन वर ताण आला असावा . एक ना अनेक .
माझ्यासाठी हि सर्व माहिती नवीनच होती.
पण आता माझा जो पुढचा प्लान असेल त्यावेळी मी या गोष्टींची नक्की काळजी घेईन . (तेंव्हाही ५० राव हि चर्चा ओफ्लैन न ठेवता बोर्डावर लिही असे म्हणाले होते, पण तेंव्हा राहून गेलं.)
अजून एक मुद्दा म्हणजे समजा आपल्याला नवीन कार /दुचाकी घ्यायची असेल तर इथे त्यावर चर्चा होऊ शकेल. कुठल्या मिपाकरांकडे सदर मॉडेल असेल तर त्याचे फायदे /तोटे कळू शकतात .
आंतरजालावर गाड्यांबद्दल खूप छान छान साईट उपलब्ध असतात, त्या इथे शेर करू शकता.
नवीन launch होणार्या गाड्यांबद्दल टेक्निकल चर्चा होऊ शकते .
गाड्यांच व्याकरण खूप कठीण असत (माझ्यासाठी तरी ) उदा. ग्राउंड क्लीअरंस. टोर्कू , इंजिन पावर, बी एच पी , कर्ब वेट ई ई.
याबद्दलही माहिती मिळून जरा ज्ञान वाढेल .
आता चर्चेला सुरुवात करताना माझाच पहिला प्रश्न (जिलबी ) टाकतो
परत कोकण दौरा आखलेला आहे .
४/५ दिवसात १२०० किमी .
मायलेज वाढावं म्हणून एका मित्राने सांगितलं इंजिन ट्यून कर
आता हे इंजिन ट्यून कर म्हणजे नक्की काय करू हे काही त्याला सांगता आलं नाही , आणि मला तर अजिबातच काही माहिती नाही . पण त्याने म्हणे इंजिन च फ्युएल कंझंपशन कमी करता येतं.
तर हे काय असत याबाबत माहिती हवी आहे .
अजून एक
दोन मोठ्या ब्यागा बाईक ला बांधायच्या आहेत, त्या कशा बांधायच्या हेही माहित नाही :D
त्याबद्दलही माहिती दिल्यास बरे होईल .
बाकी चर्चेत ५० राव, मनराव, वल्ली, मोदक, शैलेंद्र , गवी, छोटा डॉन भर घालतीलच
धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+२
मा. मिस्पाजी, तुम्ही तुमची
एनि टाईम
+१ स्पा.....
५० राव, त्यापेक्षा तुम्हीच या
मी पण
यु आर वेल्कम, बघा पुण्याच्या
मा मिस्पाजी..
अंधार असला तरी रस्ता ओळखीचा असतोअसे कोणत्याही रस्त्याबाबत समजू नये... दुर्दैवाने काही झाले तर ओळखीच्या रस्त्यावर फारतर लगेच मदत मिळू शकते. अन्यथा अडचणी यायच्याच असतील तर अनोळखी रस्त्याइतक्याच तीव्रतेने येवू शकतात. बाईक चालवताना पहिल्या किलोमीटरला आपण जितकी काळजी घेतो तितकीच काळजी मुक्कामी पोहोचल्यावर गाडी स्टँडला लावतानाही घ्यावी!२.भरपूर पाणी पीत राहणे गरजेचे. ८. दर ७० किमी नंतर एक छोटा ब्रेक.भरपूर पाणी पीत राहिलास तर ब्रेक आपोआप घेतले जातील. ;-) सल्ल्यांचा पाऊस पडला आहे म्हणून एक वैयक्तीक मत - सुरक्षीत वाहन चालवणे सर्वांना जमत असले तरी जसे आपण एकाच फॉरमॅटमध्ये चालवत नाही / शिकत नाही त्याचप्रमाणे सर्व सल्ले योग्य असूनही सोयीचे पडतीलच असे नाही.. आपल्याला गाडीवर बसताना, गाडी चालवताना, समोरची गाडी ओव्हरटेक करताना आणि योग्य जजमेंटने ब्रेक लावताना कम्फर्टेबल वाटले पाहिजे. बस्स! माझा वैयक्तीक अनुभव विचारशील तर मला रात्री गाडी चालवणे एकदम कम्फर्टेबल वाटते. हवेतील गारव्यामुळे इंजीन फारसे तापत नाही. रस्त्यावर शिकाऊ पब्लीक फारसे नसते. रस्त्यावर लाईटच्या भाषेचे राज्य असल्याने हॉर्नचा त्रासदायक आवाज नसतो. गाडीचा लाईट व्यवस्थीत असेल तर रोड व्हिजीबलिटी व्यवस्थीत असते.. याउलट ट्रक सारखे धूड घेतलेले व दारू पिलेले ड्रायव्हर, रिफ्लेक्टर नसलेले बंद पडलेले ट्रक / ट्रॅक्टर, सलमान खानचे भाऊबंद, लूटमार करणारे लोक असली तमाम जनतासुद्धा रात्रीच रस्त्यावर असते. त्या त्या परिस्थितीमध्ये असलेली आपली कम्फर्ट लेव्हल महत्त्वाची..लॉंग ड्राईव असल्यास त्याबाबत
आपण
मस्त सल्ले दिले आहेत
हेल्मेट आणि बॅग
माझ्या कडे CBZ इक्सट्रिम आहे.
सोप्पा उपाय म्हणजे नेहमी
बाईकची सर्विसिंग
दुचाकीसंदर्भात..
धन्यवाद!
तुम्ही लिहिली आहे ती आदर्श
प्रतिसाद
चला अजरामर झाला हा धागा.
काही म्हणा फक्त आणि फक्त
>>>>असो तुमचा "फेस्प्याक"
असो तुमचा "फेस्प्याक" च्या
+१११११११११११११११११११.
आणि हो, फेसप्याकबद्दल
तुमचा "फेस्प्याक" च्या
एक फुकट सल्ला....
मपल्याकडे पल्सर १५० आहे.
नॉयट्रोजन भरल्याने गाडी
पेट्रोल पाप्वर जे फ्री मध्ये
हिरो होंडा... आपका शानदार हमसफर. Fill it Forget it...
आता हिरो होंडा जाउन नुसते
५० राव,
+५० फक्त
प्लीजे धागा क्र २ काढता का?
मस्त लेख...
चारचाकी
एका वेगळ्या धाग्याचा विषय,
आमी सि.एन.जि.वाले-२रु.प्रति
गवी काका या धाग्यापासून काही
इतका वेळ बाईकवर बसून बसून
सिग्नल ग्रीन होण्याची वाट
चालू करताना सारखी किका
जवळपास हवालदार आहे का त्यावर ठरवावे
दुचाकीला १० सेकंद आणि
ओ ते बाइक ला बाजूला बॉक्स
लॅपटॉप कॅरी करून करून पाठ
लॅपटॉप कॅरी करून करून पाठ दुखायला लागलिये.सॅकचे स्ट्रॅप्स अॅडजेस्ट करा. सॅक तुमच्या खांद्यातून निसटली जावू नये आणि ती मागच्या सीटवर / मागच्या व्यक्तीच्या मांडीवर व्यवस्थीत टेकली जावी इतपत सैल ठेवावेत. (तुम्ही मागे बसणारी व्यक्ती असाल तर लॅपटॉप सॅकमध्ये डबल कुशन ची व्यवस्था करा अन्यथा कॅरीयरवर सॅक आदळून आदळून लॅपटॉप खराब होण्याची शक्यता असते)पण त्यापेक्षा एखाद्या सॅडल
तसा विचार करायचा तर रोज कॅब
बाईकच्या बाजुला साईड बॉक्स