तैलप: स्तुतीवंदना
जय देव जय देव जय झुरळ देवा,
खुर्ची मिळवून दे, करीन तुझी सेवा
तुमच्या चरणाचे आम्ही आहोत दास
तुमच्या कृपेची लागलीये आस जय देव जय देव . . .
अमू-नरूला तुमची किती भीति,
तुमचे गुण गाई आमची ही जेंझी
सातासमुद्रापार तुमची ही ख्याती,
होऊ दे पामरास सत्ताप्राप्ती जय देव जय देव . . .
स्वतःच्या पक्षाची करून माती,
रागौठा सुसुममता लोटांगण घालती
अभिआषु सौरभ नेहाचे चरण चुंबिती
त्यांचे भविष्य तुमच्याच हाती जय देव जय देव .
.
मिसळपाव