Skip to main content
लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 28/09/2026 23:15 या दिवशी प्रकाशित केले.

मिसळपाव खायला जमले कावळे 
सोबत होते पाव्हणे रावळे

 

तिखटजाळ होती तर्री
कावळ्यांची उडाली खूप भंबेरी

 

कावळे ओरडले काव काव 
अजून पाहिजे आम्हाला पाव

 

एक कावळा होता हेकट
म्हणाला अजून करा मिसळ तिखट

 

मिसळीने कावळ्यांचे भाजले तोंड
जिभेवर आले मोठे फोड

 

तिखटाने घाबरले कावळे सारे
मिसळीपेक्षा पिंड बरे

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 33
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

हा हा हा !!! मस्त लिहिले आहे. 

तरीही या कवितेत कांदा लिंबाचा उल्लेख नसल्याचा जाहीर निषेध! 😜


कांदा लिंबू यांशिवाय मिसळपावला चव नाही!