Skip to main content
लेखक श्रीगुरुजी यांनी रविवार, 04/10/2026 17:23 या दिवशी प्रकाशित केले.

कागदी वाघांची आता भिती वाटत नाही

मुंबईतले म्हणून प्रेम दाटत नाही

सर्वकाळ खुराड्यात झोपून रहातात 

खुराड्यातल्या खुराड्यात फिरताना दिसतात  

चिरकुट चिमणा डरकाळी फोडतो

वाघोबा येणार म्हणून चिवचिवाट करतो

कोथळा फाडू म्हणून, आरडा ओरडा करतात.

कागदी वाघोबाच्या गल्लीत ससे मोकाट फिरतात

खुराड्याच्या राजाचे निघाले दिवाळे

मोहरर्मच्या सणातही रेवड्या नाही मिळाल्या ......

चावता येत नाही म्हणून आता  लापशी खातो

सांगा, शेपूटतुटक्या कागदी वाघाला कोण भितो !

लेखनविषय:

वाचने 71
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

झक्कास मस्त आहे.

रीटायर्ड वाघाला करमत नाही

संज्या शिवाय कोणी दिसतही नाही

 काही केल्या मला गद्दारांचे गणीत   सुटेना

  उरलेच नाहीत म्हणून आता कोणीच फुटेना