Skip to main content

कथा

बँकॉकचं तिकीट

लेखक मंदार कात्रे यांनी शुक्रवार, 23/10/2026 23:16 या दिवशी प्रकाशित केले.

 

२०२४ च्या पावसाळ्यात दादरच्या जुन्या बाजारात मी एका अँटिक दुकानासमोर थांबलो. काचेच्या कपाटात एक जुना “टू-इन-वन” ठेवला होता. सोनीचा, करड्या रंगाचा, दोन्ही बाजूला स्पीकर, वर कॅसेटची जागा. माझ्या छातीत काहीतरी हललं. दुकानदार म्हणाला, “साहेब, हा तर ऐंशीच्या दशकातला माल आहे. आता कुणी वापरत नाही.” मी हसलो. “कुणी वापरत नाही,” मी मनात म्हणालो, “पण कुणी विसरतही नाही.”