(बसफुगडी)

नाखु's picture
नाखु in जे न देखे रवी...
2 Jun 2018 - 2:51 pm

फुगडी खेळताना दोन भिडू असतात इथले दोन इथेच आहेत शोधून घ्यावेत ही विनंती

पेर्ना क्र. १
पेर्ना क्र. २

का म्हणून दिवसेंदिवस लेखकच बनत जावे ?

का म्हणून आपणच सारं मिपावर उधळावे ?

थोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी काठी नि छोटासा आरसा दिसेल

तो हातात घेऊन बसलेला एक साधा वाचक दिसेल

एक दिवस तरी साधा वाचक बनून बघावे

खुद्धु खुद्धु म्हणून हसावे

न पटेल तिथे फाट्यावर मारून बसावे

रुसेल त्याचे फुगवे निपटावे

शांत निवांत राहून धागे वाचावे

साधा वाचक जे जे करतो ते ते मनापासून करावे

खदखदून खदखदून हसावे

विरोधकांनी पण तोंडात बोट घालावे

इतके साऱ्या धाग्यावर मौनावे

रमत गमत खफवर फिरावे

हम, तुम झुम करत टिचक्या मारावे

एखादा धागा वाचून प्रतिसादावे न हळूच निसटावे

का फक्त आत्मप्रौढी ने स्वधाग्यातच रमावे

साधा वाचक बनावे अन खुशाल मोकळेढाकळे रहावे
****************

त्रस्त हा वनवास आहे!
काय हाही त्रास आहे ?

काव्य अन अर्थ जोडा
काय कटकट त्रास आहे

छान! सुंदर! कवी म्हणती
मत तुझे मज पास आहे

वीर मोठ्या मनाचा तू
खंत वाचकांस आहे

साहसा , अविचल, सबुरी
आपुला इतिहास आहे

रांधली असतेच भाकरी
पण पिझ्झा फर्मास आहे

अनेकदा मिळतो म्हणे, पण
जन्म वाचकांचा त्रास आहे
मस्त हा अधिकमास आहे!
काय हाही त्रास आहे ?

शुभाशीर्वाद आमचे स्नेही रा रा बिरूटे पंचारिष्ट

prayogअविश्वसनीयआरोग्यदायी पाककृतीकाहीच्या काही कविताफ्री स्टाइलभूछत्रीरतीबाच्या कविताहास्यनाट्यवाङ्मयकविताविडंबनऔषधोपचारराशीमौजमजा

प्रतिक्रिया

खिलजि's picture

2 Jun 2018 - 3:12 pm | खिलजि

झक्कास .. ऐसे कहते हय , सोने पे सुहागा . मस्त . फार आवडली .

काठी मारलीत पण फुटला आरसा

कल्पना वाहिली खरी , आपण चालवला वारसा

मजा आली . असाच सुखद वेळ मिपावर मिळत राहून देत हीच श्री चरणी प्रार्थना ..

सिद्धेश्वर विलास पाटणकर

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Jun 2018 - 3:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

ही तर, आरसा दाखवून, सिद्धी सिद्धी पाठीत काठी मारली आहे ! :)

खिलजि's picture

2 Jun 2018 - 3:23 pm | खिलजि

आज थोडा जास्त वेळ मिपावर काढून मजा आली . सार्थक झाले . कुठेही बाहेर फिरायला जाऊन मन हलकं करण्यापेक्षा , इथे या जागृत मंचावर , एव्हढा वेळ दिला तर ते जास्त उपयुक्त आहे . असं काहीस मत माझं बनत चाललंय . नाखु साहेब पुन्हा एकदा सांगतो , कि आपली कविता मला फार फार आवडली ..

सिद्धेश्वर विलास पाटणकर

श्वेता२४'s picture

2 Jun 2018 - 4:50 pm | श्वेता२४

मजा आली.

टवाळ कार्टा's picture

2 Jun 2018 - 5:04 pm | टवाळ कार्टा

खिक्क

दुर्गविहारी's picture

2 Jun 2018 - 6:19 pm | दुर्गविहारी

हा हा हा !!! प्रेर्ना द्यायला विसरलात का ? ;-)

सतिश गावडे's picture

2 Jun 2018 - 6:29 pm | सतिश गावडे

नाखुंचा डबल डबल धमाका उर्फ तुमचा खेळ होतो पण आमचा जीव जातो ...

यशोधरा's picture

2 Jun 2018 - 6:54 pm | यशोधरा

_/\_

जिंदगी मौत ना बन जाये सम्हालो यारो.
खो रहा चैनो अमन, मुश्कीलोमे है वतन.
सरफरोशी की तमन्ना दिल मे जगा लो यारो.....

अनन्त्_यात्री's picture

2 Jun 2018 - 8:27 pm | अनन्त्_यात्री

वाचता वाचता वाचकाने लेखकाचे पेन घेतले!!

विजुभाऊ's picture

4 Jun 2018 - 9:03 am | विजुभाऊ

आणि लेखकास भोसकले

नाखु's picture

3 Jun 2018 - 10:58 am | नाखु

घेणार्याने घेत जावे हे वचन लक्षात ठेवले आहे.

साहित्य संपादकांस विनंती वरील कवितेत प्रेरणेच्या लिंका जोडून द्याव्यात.मोबाईलवरून देता येत नाही.

चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

कृपया पेर्णेच्या लिंका कळविल्यास काम त्वरित केले जाईल.

नाखु's picture

4 Jun 2018 - 10:07 am | नाखु

दिल्या आहेत

आभारी आहे

एस's picture

4 Jun 2018 - 10:14 am | एस

डन!

बादवे, 'गरम पाण्याचे कुंड' आणि 'कोडाईकॅनॉल' ह्या टॅगना विसरल्याबद्दल अनुभवी विडंबकांचा निषेध. =))

नाखु's picture

4 Jun 2018 - 10:17 am | नाखु

अशा गफलती होतातच.
पुढील वेळी नक्कीच काळजी घेतली जाईल

अंगठेमुकाट नाखु

शाली's picture

4 Jun 2018 - 7:45 am | शाली

:D

ज्ञानोबाचे पैजार's picture

4 Jun 2018 - 9:38 am | ज्ञानोबाचे पैजार

घोड्याला नालबंद करायची सिध्दी नाखु अंकलना प्राप्त आहे.
खिळे मारताना घोड्याला इजा होणार नाही याची काळजी घेत त्यांनी खिळे ठोकलेले आहेत.
(नाल तर ठोकला पण लगामाचे काय ? या आमच्या आगामी काव्य संग्रहातून साभार)
पैजारबुवा,

नाखु's picture

4 Jun 2018 - 10:12 am | नाखु

नोंदणी करीत आहे ,प्रकाशक नसल्यास आपल्या गुरूवर्यांचे घरकुल प्रकाशन आहे याची नोंद घ्यावी ही विनंती

नाखु

अत्रुप्त आत्मा's picture

4 Jun 2018 - 5:09 pm | अत्रुप्त आत्मा

ह्या ह्या ह्या! =)) वि डँबक ना खून अंकल!