Skip to main content

(बसफुगडी)

लेखक नाखु यांनी शनिवार, 02/06/2018 14:51 या दिवशी प्रकाशित केले.
फुगडी खेळताना दोन भिडू असतात इथले दोन इथेच आहेत शोधून घ्यावेत ही विनंती पेर्ना क्र. १ पेर्ना क्र. २ का म्हणून दिवसेंदिवस लेखकच बनत जावे ? का म्हणून आपणच सारं मिपावर उधळावे ? थोडं जागं होऊन बघा , मोठ्ठी काठी नि छोटासा आरसा दिसेल तो हातात घेऊन बसलेला एक साधा वाचक दिसेल एक दिवस तरी साधा वाचक बनून बघावे खुद्धु खुद्धु म्हणून हसावे न पटेल तिथे फाट्यावर मारून बसावे रुसेल त्याचे फुगवे निपटावे शांत निवांत राहून धागे वाचावे साधा वाचक जे जे करतो ते ते मनापासून करावे खदखदून खदखदून हसावे विरोधकांनी पण तोंडात बोट घालावे इतके साऱ्या धाग्यावर मौनावे रमत गमत खफवर फिरावे हम, तुम झुम करत टिचक्या मारावे एखादा धागा वाचून प्रतिसादावे न हळूच निसटावे का फक्त आत्मप्रौढी ने स्वधाग्यातच रमावे साधा वाचक बनावे अन खुशाल मोकळेढाकळे रहावे **************** त्रस्त हा वनवास आहे! काय हाही त्रास आहे ? काव्य अन अर्थ जोडा काय कटकट त्रास आहे छान! सुंदर! कवी म्हणती मत तुझे मज पास आहे वीर मोठ्या मनाचा तू खंत वाचकांस आहे साहसा , अविचल, सबुरी आपुला इतिहास आहे रांधली असतेच भाकरी पण पिझ्झा फर्मास आहे अनेकदा मिळतो म्हणे, पण जन्म वाचकांचा त्रास आहे मस्त हा अधिकमास आहे! काय हाही त्रास आहे ? शुभाशीर्वाद आमचे स्नेही रा रा बिरूटे पंचारिष्ट

वाचने 13062
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

झक्कास .. ऐसे कहते हय , सोने पे सुहागा . मस्त . फार आवडली . काठी मारलीत पण फुटला आरसा कल्पना वाहिली खरी , आपण चालवला वारसा मजा आली . असाच सुखद वेळ मिपावर मिळत राहून देत हीच श्री चरणी प्रार्थना .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

आज थोडा जास्त वेळ मिपावर काढून मजा आली . सार्थक झाले . कुठेही बाहेर फिरायला जाऊन मन हलकं करण्यापेक्षा , इथे या जागृत मंचावर , एव्हढा वेळ दिला तर ते जास्त उपयुक्त आहे . असं काहीस मत माझं बनत चाललंय . नाखु साहेब पुन्हा एकदा सांगतो , कि आपली कविता मला फार फार आवडली .. सिद्धेश्वर विलास पाटणकर

जिंदगी मौत ना बन जाये सम्हालो यारो. खो रहा चैनो अमन, मुश्कीलोमे है वतन. सरफरोशी की तमन्ना दिल मे जगा लो यारो.....

घेणार्याने घेत जावे हे वचन लक्षात ठेवले आहे. साहित्य संपादकांस विनंती वरील कवितेत प्रेरणेच्या लिंका जोडून द्याव्यात.मोबाईलवरून देता येत नाही. चुकार नाखु वाचकांची पत्रेवाला

In reply to by नाखु

डन! बादवे, 'गरम पाण्याचे कुंड' आणि 'कोडाईकॅनॉल' ह्या टॅगना विसरल्याबद्दल अनुभवी विडंबकांचा निषेध. =))

घोड्याला नालबंद करायची सिध्दी नाखु अंकलना प्राप्त आहे. खिळे मारताना घोड्याला इजा होणार नाही याची काळजी घेत त्यांनी खिळे ठोकलेले आहेत. (नाल तर ठोकला पण लगामाचे काय ? या आमच्या आगामी काव्य संग्रहातून साभार) पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

नोंदणी करीत आहे ,प्रकाशक नसल्यास आपल्या गुरूवर्यांचे घरकुल प्रकाशन आहे याची नोंद घ्यावी ही विनंती नाखु