चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…)
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण
वाचने
95930
प्रतिक्रिया
592
मिसळपाव
प्रतिक्रिया
7 वेळा!
हे काय?
"Don't do anything silly for the stupid man...."
In reply to हे काय? by माईसाहेब कुरसूंदीकर
मला अनुभव आलेला नाही. पण
In reply to "Don't do anything silly for the stupid man...." by गामा पैलवान
मला अनुभव आलेला नाही. पण विमानातल्या सगळ्या लोकांना आलाय. "Don't do anything silly for the stupid man...." असं हवाई सेविका खासदारांना उद्देशून बोलंत होती. कृपया हे चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=gCRj5FQnohE हा स्ट्युपिड मॅन म्हणजे सुकुमारच (वा ज्याने खासदारांवर हल्ला केला तोच) आहे.ही चित्रफीत सुद्धा पाहिलेली आहे. सुकुमारने खासदारावर हल्ला केला असे यातून अजिबात दिसत नाहीत. अनेकजण पाठमोरे दिसतात व हवाईसुंदरी 'डोन्ट डू दॅट, डोन्ट डू दॅट' असे दोन वेळा ओरडताना दिसते. याचा संबंध कर्मचार्याला विमानातून ढकलण्याशी असावा कारण विमानाच्या दारात सुकुमार पुढे दिसतात व त्यांच्या मागे गायकवाड दिसतात व सुरक्षा कर्मचार्याने त्यांचा हात धरलेला दिसतो. सुकुमारने खासदाराला मारहाण केली असे कणभरसुद्धा दिसत नाही. 'कितने बद्तमीज है ये लोग' असे कोणतरी म्हणल्याचे ऐकू येते. हे कोण कोणास म्हणाले हे समजू शकत नाही. संतापलेल्या खासदार महाशयांना शांत करण्यासाठीच हवाईसुंदरी सुकुमारचा स्टुपिड मॅन असा उल्लेख करत असावी. आपल्याच सहकार्याला मूर्ख म्हटल्याने खासदारसाहेबांचा उसळलेला क्रोध कमी होईल असा त्यामागचा हेतू असावा. भारतात एखाद्या पक्ष कार्यकर्त्यावर सुद्धा हात उचलण्याची सर्वसामांन्यात हिम्मत नसते. एखाद्या खासदारावर ६० वर्षीय कर्मचारी हात उचलण्याची शक्यता शून्य आहे.माफी कशाबद्दल मागायची?
यावरून एक गोष्ट आठवली.
In reply to माफी कशाबद्दल मागायची? by गामा पैलवान
यावरून एक गोष्ट आठवली. मोदींनाही माध्यममुखंड गुजरात दंगलींवरून सदैव माफी मागायचा आग्रह करीत. एके दिवशी मेघनाद देसाई चर्चेस आलेले असतांना त्यांनी विचारलं की जर मोदींनी माफी मागितली तर इथे बसलेले किती जण माफ करतील? सगळे नाही म्हणाले. देसाई म्हणतात की नेमकं हेच कारण आहे की मोदी माफी मागंत नाहीत. श्रीगुरुजी, जर खासदारांनी माफी मागितली तर तुम्ही त्यांना अजिबात माफ करणार नाहीत. उलट त्यांच्या माफीचं भांडवल करून गहजब कराल. हे गायकवाड बरोब्बर जाणून आहेत.माफी मागायची नसेल तर मग बसा रेल्वेने जात किंवा मग वेगवेगळ्या नावाने बुकिंग करून बुकिंग कॅन्सल होत असलेले बघत बसा. एकतर ज्या विमानात व्यवसाय वर्गच नव्हता, त्या विमानातून प्रवास पूर्ण झाल्यावर व्यवसाय वर्ग का नाही अशी तक्रार करणे हा मूर्खपणा आहे. दुसरं म्हणजे आपण कर्मचार्याला मारले हे अत्यंत उन्मत्तपणे कॅमेर्यासमोर सांगितल्याने या विशिष्ट व्यक्तीबद्दल जनमत मोठ्या प्रमाणात विरोधात गेले आहे. खासदार शिवसेना या बदनाम पक्षाचे असल्याने जनमताची भावना अजून तीव्र आहे. कॅमेर्यासमोर फुशारक्या मारून गायकवाडांनी स्वतःची बाजू लंगडी करून ठेवली आहे. तिसरं म्हणजे सर्व विमान कंपन्यांनी कायदेशीररित्या यांच्या प्रवासावर बंदी घातली आहे व हे त्याबाबतीत बंदी हटवा अशी विनवणी करण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. यांना बंदी घालण्यामागे विमान कंपन्यांकडे सबळ कारणे आहेत व त्यामुळेच खासदार महाशय बंदीविरूद्ध न्यायालयात गेलेले नाहीत कारण विमान कंपन्यांची कायदेशीर बाजू भक्कम आहे. म्हणूनच शिवसेना सुमित्रा महाजनांनी मध्यस्थी करून बंदी उठवावी यासाठी धडपड करीत आहे. शिवसेनेच्या दुर्दैवाने १-२ वैयक्तिक खासदारांचा अपवाद्द वगळता कोणीही शिवसेनेच्या बाजूने नाही. संसदेत शिवसेनेचे २१ खासदार असताना जेमतेम ७-८ खासदार बंदी उठविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शिवसेनेचे मंत्रीमंडळातील प्रतिनिधी अनंत गीते मूग गिळून गप्प आहेत. शिवसेना रोज सकाळ संध्याकाळ भाजपच्या नावाने शिमगा करीत असते. त्यामुळे भाजप या प्रकरणात पूर्ण तटस्थ राहून गायकवाडांची मजा बघत आहे. अशा परिस्थितीत दोनच उपाय शिल्लक आहेत. एक म्हणजे विमान कंपन्यांनी स्वतःच बंदी उठवायची (ही शक्यता अत्यंत धूसर आहे) किंवा गायकवाडांनी माध्यमांसमोर न येता गुपचूप विमानकंपन्यांशी बोलणी करून वेळ पडल्यास दिलगिरी व्यक्त करून बंदी उठविण्याची विनंती करायची. तसे करायचे नसेल तर मग बसा तोंड लपवून आणि रेल्वेतून प्रवास करत.ज्याला तुम्ही फुशारक्या म्हणता त्यात गायकवाडांनी चपलेने का मारलं त्याचं कारण दिलेलं आहे. पण तुम्हाला ऐकायचं नाहीये. चलचित्र इथे आहे : https://www.youtube.com/watch?v=M8tc68-cHk8ही चित्रफीत मी पाहिलेली आहे. या चित्रफितीतील गायकवाडांच्या वाक्यावाक्यातील माज डोक्यात तिडीक उत्पन्न करतो. कोणत्याही परिस्थितीत मारहाणीचे समर्थन होऊच शकत नाही.चपलेने मारण्याचे सांगण्यापूर्वी मुलाखतकर्ताच म्हणतोय की उसने (म्हणजे सुकुमारने) हात से मारा. म्हणजे गायकवाडांनी मार खाल्ल्यावरच चप्पल उगारलेली आहे.उसने म्हणजे गायकवाडनेच (सुकुमारने नव्हे) हातानेच मारले का असे मुलाखतकर्त्याने विचारल्यावर गायकवाड मोठ्या माजात सांगतात की हाताने नाही चपलेने मारले.आणि हो, जनमत काहीही त्यांच्याविरुद्ध नाहीये. धाराशिवेत लोकांनी व्यवस्थित बंद पाळला (ऐकीव माहिती).बंद पाळणे म्हणजे जनमत बाजूने आहे असा अर्थ नसतो. जनता मारहाणीच्या व तोडफोडीच्या भीतिने अत्यंत नाईलाजाने दुकाने बंद ठेवतात.शिवसेना कुठून उपटली मध्येच?
नुसता शिवसेनेचाच नाही गापै,
In reply to शिवसेना कुठून उपटली मध्येच? by गामा पैलवान
नुसता शिवसेनेचाच नाही गापै,
In reply to नुसता शिवसेनेचाच नाही गापै, by हतोळकरांचा प्रसाद
नुसता शिवसेनेचाच नाही गापै, आता माझं मत असं बनलंय कि याचा त्यांच्या विमानसेवेबद्दलच्या तक्रारीशीही काही संबंध नाही. त्यांनी त्यांची तक्रार शांततेनेच (पण विमान खोळंबवुन चुकीच्या मार्गाने) करायचा प्रयत्न केला. भांडण आणि मारामारी हा कर्मचाऱ्यांच्या शुद्ध अरेरावीतून सुरु झालेला प्रयत्न आहे.कारण काहीही असले तरी कर्मचार्याला मारणे हा गुन्हा आहे. व्यवसायवर्ग नसलेल्या विमानातून प्रवास करून प्रवास पूर्ण झाल्यावर व्यवसाय वर्ग का नाही अशी तक्रार करणे हा मूर्खपणा होता. तक्रारीसाठी विमान खोळंबून ठेवणे व कर्मचार्याला चपलेने मारणे हा मोठा गुन्हा आहे. कर्मचार्याच्या अरेरावीचे कारण पुढे करून हे गुन्हे झाकता येणार नाहीत.तो विडिओ आणि मीडियाला दिलेली स्टेटमेंट्स अनेकवेळा बघितल्यावर उलट माझे मत असे झाले आहे कि खासदारांनी त्यांना फक्त एकाच झापड मारली आहे(अर्थात हाही गुन्हाच आहे). त्यांचे "चप्पलसे २५ मारा" हे उपरोधात्मक वक्त्यव्य स्वतःचा शिवसेनाविरोध कुरवळण्यासाठी वापरण्यात येत आहे, कारण ह्या वाक्याच्या आधीचं उसने क्या बोला कैसे मारा? हातसे, पैरसे, असं विचारानं आणि त्याच वाक्याच्या नंतरचं "बतमीजीसे बात कर रहा था, मारा एक फिर" हे वाक्य सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले. "त्यांनी स्वतःच २५ मारल्याची कबुली दिलीय" याचा वापर करताना (त्यांनी ते स्वतःच्या कृतीबद्दल कबुली दिलीय त्यामुळे त्याला पुरावा लागणार नाही असं लंगडं समर्थन करून) त्यांनी स्वतःच स्वतःबद्दल "चार बार पैर गिरा, आप बुजुर्ग हो बैठके बात करो" हे मात्र सरळ दुर्लक्ष करायचं. एका ६० वर्षाच्या "बुजुर्गला" कपडे फाडून चपलेने मारले असे ओरडून सांगून बुजुर्गपणाचा वापर करून प्रकरणाचे गांभीर्य वाढवताना हे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचे कि खासदार स्वतः ५७ वर्षाचे आहेत.आपण २५ वेळा चपलेने मारले हे त्यांनी स्वतःच माध्यमांसमोर सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी फक्त एकच झापड मारली या तुमच्या मताला शून्य महत्त्व आहे. १ असो वा २५, मारहाण हा गुन्हाच आहे. आपण काही चुकीचं केलंय हे त्यांना मान्यच नाही. उलट आपल्या कृत्याच्या अभिमानाने फुशारक्या मारल्यामुळे सर्वांच्या डोक्यात तिडीक गेली आहे. अशा खासदाराचे इथे समर्थन होत आहे ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.खासदारांच्या बाजूच्या प्रत्येक गोष्टीला पुरावा मागताना त्यांच्या विरोधातल्या गोष्टी मात्र कुठल्याही वर्तमानपत्रात कुठल्याही पुराव्याविना आल्या तरी लगेच विश्वास ठेवायचा. खासदारांनी तिकीट बुक करण्याचा ७ वेळा प्रयत्न केला याला पुरावा काय? त्यांच्या नावाने बुक करण्याचा प्रयत्न कोणी केला याबद्दल काहीही माहिती नसताना त्याबद्दल जणूकाही विमान कंपनीने बरा दणका दिला म्हणून आनंद व्यक्त्य करणे म्हणजे दांभिकता वाटते.बुकिंगबद्दल विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. आग्रह नाही. ७ वेळा वेगवेगळ्या नावाने, स्पेलिंग बदलून बुकिंगचा प्रयत्न केल्याची बातमी अनेक माध्यमातून आली आहे. त्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर नका ठेवू. विमान कंपनीने असल्या माजाला दणका दिला म्हणून खरोखरच आनंद झाला आहे. शिवसेनेच्या फुशारक्या, माज, घाणेरडी भाषा आणि या खासदार महाशयांचा माज अत्यंत डोक्यात जातो. अशांना दणका मिळाल्यामुळे झालेला आनंद व्यक्त करणे म्हणजे दांभिकता नसून खरोखरच आनंद झाला आहे.तुम्ही इअरफोन्स लावून नीट
In reply to नुसता शिवसेनेचाच नाही गापै, by श्रीगुरुजी
मी सर्व चित्रफिती पाहिल्या
In reply to तुम्ही इअरफोन्स लावून नीट by हतोळकरांचा प्रसाद
शिवसेनेच्या फुशारक्या, माज,
In reply to नुसता शिवसेनेचाच नाही गापै, by श्रीगुरुजी
याला कारण म्हणजे शिवसेना अशा
In reply to शिवसेनेच्या फुशारक्या, माज, by हतोळकरांचा प्रसाद
दोन वेगवेगळ्या गोष्टींचा
In reply to याला कारण म्हणजे शिवसेना अशा by अत्रे
आता तुम्ही प्रश्न विचारला
In reply to दोन वेगवेगळ्या गोष्टींचा by हतोळकरांचा प्रसाद
हा देश खूप कायद्यानेच चालला
In reply to दोन वेगवेगळ्या गोष्टींचा by हतोळकरांचा प्रसाद
हा देश खूप कायद्यानेच चालला असल्याच्या थाटात आणि सामान्य लोकांना उगाचच असल्या आंदोलनांनी त्रास होतो वगैरे दांभिकतेत जगण्यात मला रस नाही. त्यांनी काय आंदोलन केले आहे, त्या विषयाची व्याप्ती काय, त्यामागचा फायदा काय आणि पक्षाचा त्यामागचा उद्देश काय ह्या गोष्टी मला समर्थन देताना महत्वाच्या वाटतात, पक्ष नाही.सामान्य लोकांना आंदोलनांनी त्रास होतो ही दांभिकता!!!!!!!!!!!! वा! वाचून धन्य झालो. दोन उदाहरणे सांगतो. पवारांना नोव्हेंबर २०११ मध्ये दिल्लीत एका शीख व्यक्तीने मारले होते. त्यानिमित्त दुसर्या दिवशी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बंदचा आदेश दिला. माझ्या एका मित्राचे औषधांचे दुकान आहे. त्यादिवशी राष्ट्रवादीच्या टोळीच्या मारहाणीच्या व तोडफोडीच्या भीतिने बहुतेकांनी दुकाने बंद ठेवली होती. परंतु औषधांची दुकाने उघडी होती. माझ्या मित्राने देखील त्याचे औषधाचे दुकान उघडे ठेवले होते. साधारण ११ वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीच्या टोळीतील ४०-५० जण दुचाकींवरून घोषणा देत आले. याचे औषधाचे दुकान उघडे बघून त्यांचे टाळके सरकले. दुचाकीवरून १०-१२ जण खाली उतरून दुकानात आले व दुकान बंद ठेवण्यासाठी दमदाटी करू लागले. हे औषधांचे दुकान आहे व शहरातील सर्व औषधांची दुकाने उघडी आहेत असे मित्राने सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु टोळीतील एका गुंडाने राष्ट्रवादीच्या झेंड्याची काठी उलटी करून एका जाहिरात फलकावर मारून तो खाली पाडला. दुसर्याने माझ्या मित्राची गचांडी पकडली. त्यामुळे त्याचा सदरा फाटला व त्याचा चष्मा खाली पडून फुटला. नाईलाजाने निव्वळ भीतिने त्याला दुकान बंद करावे लागले. दुसरे उदाहरण. काही वर्षांपूर्वी पुण्यातील एका महिलेचे वडील मुंबईत अत्यवस्थ असल्याचे समजल्यावर ती एशियाडने मुंबईला निघाली. पिंपरीच्या जवळ रस्ता अडविला होता कारण रिपब्लिकन पक्षाच्या कोणाला तरी अटक झाली होती. त्याचा निषेध म्हणून त्याच्या पित्त्यांनी पुणे-मुंबई रस्ता बंद पाडला होता. तब्बल ३-४ तासांच्या खोळंब्यानंतर हळूहळू वाहतूक सुरू झाली. ती महिला खूप उशीरा मुंबईला पोहोचली तेव्हा वडीलांचे निधन होऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील होऊन गेल्याचे तिला समजले. या गुंडांमुळे आपल्याला वडीलांचे अंत्यदर्शन सुद्धा घेता न आल्याने तिला अतिशय दु:ख झाले व संतापही आला. अर्थात तुमच्या दाव्यानुसार वरील दोन उदाहरणात त्रास वगैरे झालेला नसून ती निव्वळ दांभिकता होती.माझी परत एकदा विनंती आहे,
In reply to हा देश खूप कायद्यानेच चालला by श्रीगुरुजी
मी माझी आंदोलनांच्या बाबतीतली
In reply to माझी परत एकदा विनंती आहे, by हतोळकरांचा प्रसाद
मी माझी आंदोलनांच्या बाबतीतली भूमिका स्पष्टपणे वर मांडली असतानाही तुम्हाला हवा तसा अर्थ काढण्यात यशस्वी झालात. आता परत एकदा भूमिका वाचा म्हणजे पूर्ण अर्थ लागेल. शिवसेना आणि मनसेच्या कोणत्या आंदोलनांनी लोकांना त्रास झाला म्हणून त्यांना वाईट म्हणायचं हे स्पष्ट करावं आणि मग तशीच आंदोलने दुसऱ्या पक्षांनी केली असतील तर त्याच बेसिसवर त्यांना वाईट न म्हणणे म्हणजे दांभिकता!ज्या आंदोलनांनी सर्वसामान्य जनतेला त्रास होतो ती आंदोलने कोणत्याही पक्षांनी केली व कोणत्याही कारणासाठी केली तरी वाईटच आहेत. भाजपने केलेले आंदोलन चांगले व इतरांचे वाईट असे काही नसते. ती आंदोलने सारखीच वाईट आहेत.त्या खो-कथेतील
बळी तो कान पिळी
मलाही उत्सुकता लागली आहे की
In reply to बळी तो कान पिळी by गामा पैलवान
मलाही उत्सुकता लागली आहे की
In reply to मलाही उत्सुकता लागली आहे की by हतोळकरांचा प्रसाद
मलाही उत्सुकता लागली आहे की विमान कंपनीचा हा उद्दामपणा किती दिवस चालतो ते पाहण्याची. आज ना उद्या त्यांना हि बंदी मागे घ्यावीच लागणार आहे. असा उद्दामपणा ते कोणाशीही करू शकतात म्हणूनच शिवसेनेचा सभागृहातूनच ह्या गोष्टीचा निकाल लावण्याचा प्रयत्न चालू आहे.यासाठी कायद्यातही योग्य ती तरतूद करण्याचा प्रयत्न दिसतोय.गायकवाडला स्वतःच्या पक्षातूनच फारसे समर्थन नाही. मग इतर पक्ष काय कप्पाळ समर्थन देणार? इतर सर्व पक्ष गायकवाडची मजा बघत आहेत. गायकवाडची सर्व बाजू लंगडी असल्याने तो काहीही करू शकत नाही. गायकवाडने सरकारी कर्मचार्याला केलेली मारहाण व विमानाला केलेला खोळंबा हा फौजदारी गुन्हा आहे व तो संसदेच्या बाहेर घडलेला आहे. त्यामुळे संसद त्याबाबतीत हस्तक्षेप करू शकत नाही व खासदार शिवसेनेचा असल्याने तसा हस्तक्षेप करण्याची कोणत्याही पक्षाची इच्छा नाही.यूट्यूबवर नुसते या विमान कंपन्यांच्या माजाचे विडिओज शोधून बघा, तिडीक येते डोक्यात.विषयांतरते शिवसेनेचे नेमके कशाला
In reply to मलाही उत्सुकता लागली आहे की by श्रीगुरुजी
लोकसभेच्या कामकाजाचे थेट
In reply to ते शिवसेनेचे नेमके कशाला by हतोळकरांचा प्रसाद
कोणी कोणत्या मुद्द्यावर
In reply to लोकसभेच्या कामकाजाचे थेट by श्रीगुरुजी
शिवसेनेचे बहुसंख्य आमदार,
In reply to कोणी कोणत्या मुद्द्यावर by हतोळकरांचा प्रसाद
राष्ट्रीय स्तरावर चर्चा
In reply to शिवसेनेचे बहुसंख्य आमदार, by श्रीगुरुजी
विषयांतर
In reply to मलाही उत्सुकता लागली आहे की by श्रीगुरुजी
या धाग्याचा विषय गायकवाडांनी
In reply to विषयांतर by हतोळकरांचा प्रसाद
तुम्ही मुळात "कारण" कधी
In reply to या धाग्याचा विषय गायकवाडांनी by श्रीगुरुजी
बरं. ठीक आहे. तुम्ही सांगा
In reply to तुम्ही मुळात "कारण" कधी by हतोळकरांचा प्रसाद
होतं. जो अंगावर चाल करून येत
In reply to बळी तो कान पिळी by गामा पैलवान
होतं. जो अंगावर चाल करून येत असेल त्याला मारहाण करणं समर्थनीय आहे. गायकवाडांनी चारचार वेळा तेच तेच सांगायला लागल्यामुळे आपली समस्या लिहून काढली. सुकुमारला लिहिता वाचता येत नाही काय? बाकी चार लोकांशी काहीच भांडण उद्भवलं नव्हतं. एकट्या सुकुमारने हात उचलला ना? सुकुमारला कोणी अधिकार दिला?सुकुमारने हात उचलला? कधी? चित्रफितीत तर तसे काहीच दिसत नाही. सुकुमारवर हात उचलण्याचा गायकवाडला कोणी अधिकार दिला? मुळात समस्या नसतानासुद्धा गायकवाडला तमाशा करण्याचे काय कारण व अधिकार होता?थोडक्यात काय की बळी तो कान पिळी. आज जनतेला झक मारून एअर इंडियाने जावं लागतं. कोणीही हवाई कर्मचारी प्रवाशाला थोबाडून काढू शकतो. आणि प्रवाशाने फक्त गप्प बसायचं. दाद मागायची सोय नाही.कोणत्या हवाई कर्मचार्याने कोणत्या प्रवाशाला थोबाडले आहे?विजय मल्ल्याने किंगफिशर खड्ड्यात घातली म्हणून तो दोषी ठरला. मात्र ज्या प्रफुल्ल पटेलने एअर इंडिया खड्ड्यात घातली तो आज राजरोसपणे हिंडतो आहे. कारण एअर इंडियाकडे फुकट पैशांचा स्रोत आहे. शेवटी बळी तो कान पिळी हेच खरं, नाहीका?विषयांतरखासदार गायकवाड यांनी मारहाण
माझी संपादक मंडळाला एक
अत्यंत खेदाने नमूद करतो, हा
In reply to माझी संपादक मंडळाला एक by उपेक्षित
प्रसाद भाऊ
In reply to अत्यंत खेदाने नमूद करतो, हा by हतोळकरांचा प्रसाद
मारहाण आणि शिवीगाळ
पैलवान मामा,
In reply to मारहाण आणि शिवीगाळ by गामा पैलवान
शेवटी पत्रकाराला कर्मचाऱ्याने
In reply to पैलवान मामा, by श्रीगुरुजी
सुकूमार्ने स्वतःच सांगीतलय
In reply to शेवटी पत्रकाराला कर्मचाऱ्याने by हतोळकरांचा प्रसाद
*सुकूमारनी
In reply to सुकूमार्ने स्वतःच सांगीतलय by संजय पाटिल
त्यांनी नंतर दिलेल्या
In reply to *सुकूमारनी by संजय पाटिल
खाली संजय पाटील यांनी दिलेली
In reply to शेवटी पत्रकाराला कर्मचाऱ्याने by हतोळकरांचा प्रसाद
गायकवाडांना माझा पाठींबा कशासाठी ?
नेमक्या याच कारणासाठी माझा
In reply to गायकवाडांना माझा पाठींबा कशासाठी ? by गामा पैलवान
नेमक्या याच कारणासाठी माझा रवींद्र गायकवाडांना पाठींबा आहे. गायकवाडांनी तिकीट आगाऊ आरक्षित करूनही एअर इंडियाने त्यांना वेळच्या वेळी सूचन का दिली नाही? गायकवाड दुसऱ्या विमानाने यायला तयार होते. प्रवाशाची गैरसोय करणे कोणत्या तत्त्वांत बसतं? की एअर इंडियाचा तोटा झाल्याखेरीज त्यांना जाग येणार नाहीये?गायकवाड दुसर्या विमानाने जायला तयार होते हे कोणी सांगितलं? तयार होते तर का गेले नाहीत?लायकीप्रमाणे सुकुमारला वागवाल्याबद्दल प्राध्यापकमहाशयांचं पुनश्च अभिनंदन!अगदी याच उद्दाम वृत्तीमुळे बहुसंख्य राजकारण्यांचा जनता तिरस्कार करते. लायकी नसतानासुद्धा विमानाच्या व्यवसायवर्गाची सवलत दिल्यानंतर हे असेच वागणार.आहेच मुळी. मात्र असा अडेलतट्टूपणा केल्याशिवाय एअर इंडियाला जाग येत नाही असा सार्वत्रिक अनुभव आहे.व्यवसाय वर्ग नसलेल्या विमानात व्यवसाय वर्ग का नाही याबद्दल प्रवास संपल्यानंतर तक्रार करणे हा मूर्खपणा होता व त्यानंतर थेट विमानकंपनीच्या अध्यक्षाला बोलाविल्याशिवाय मी उठणार नाही असा हट्ट धरणे हा महामूर्खपणा होता. अशी मागणी करणे म्हणजे संगणक वापरताना विंडोजमध्ये एखादी समस्या आल्यावर थेट बिल गेट्सला भेटण्याचा हट्ट धरण्यासारखे आहे.याच्याशी मात्र असहमत. उन्मत्तपणा सुकुमारने दाखवला आहे. मोदींना ओढायची काय गरज होती? शिवीगाळ करायची काय गरज होती? त्याऐवजी पोलिसांना बोलवायचं होतं.विमानात व्यवसाय वर्ग नाही हे माहित असूनसुद्धा प्रवास पूर्ण करणे व प्रवास पूर्ण झाल्यानंतर तक्रार करणे हाच मूळ उद्दामपणा होता. नंतर थेट सीएमडीला बोलाविण्याचा हट्ट धरणे व इतरांचा खोळंबा करणे हा त्याहून जास्त मोठा उद्दामपणा. सुकुमारने शिवीगाळ केलेली नाही. गायकवाडच मूर्खासारखं वागत होता. मोदींचे नाव घेण्यामागे जे कारण आहे ते मी पूर्वीच सांगितले आहे आणि ते योग्यच होते.या प्रकरणातल्या दोन गोष्टी खटकल्या. १. प्रा. गायकवाडांवर विमानबंदी लादली गेली. परंतु लोकहिताची कामं केल्यावर उलटा प्रसाद मिळणं नवीन नाही.कसली डोंबलाची लोकहिताची कामे? विमान कर्मचार्याला चपलेने मारणे, इतर प्रवाशांचा खोळंबा करणे ही लोकहिताची कामे नसून समाजघातक कामे आहेत.२. सीएमडी विमानात आला नाही. तो आला असता तर गायकवाडांनी त्यालाही बडवला असता. यातून अधिक चांगली निष्पत्ती झाली असती. पण ठीकाय. ड्यूटी म्यानेजर तर ड्यूटी म्यानेजर! तूर्तास दुधाची तहान ताकावर भागवतो.असल्या फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडी येत नसतात. बाकी बडविण्याचे समर्थन वाचून अजिबात आश्चर्य वाटत नाही. हीच विकृती शिवसेनेने आजवर जोपासली आहे.जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे.विमानबंदीस माझा पूर्ण पाठिंबा आहे. विमानातून प्रवास करण्याची यांची लायकी नाही. अशांनी फक्त एस टी च्या लाल डब्यातून प्रवास करावा.जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल.कसली डोंबलाची तक्रार? विमानात व्यवसाय वर्गच नसताना मला व्यवसाय वर्गात का बसविले नाही अशी तक्रार करणे तद्दन मूर्खपणा आहे. अशी तक्रार करणे म्हणजे जैन पावभाजी खाल्ल्यानंतर त्यात कांदा का नव्हता अशी तक्रार करून पावभाजीवाल्याला बडविण्यासारखे आहे. जरी गायकवाडांनी केलेल्या हिंसेस माझं समर्थन नसलं तरी सहानुभूती निश्चितच आहे. तसेच विमानबंदीच्या विरोधात माझा त्यांना पूर्ण पाठींबा आहे. जाताजाता : प्रा.गायकवाडांनी केलेल्या तक्रारीची प्रत दिसली नाही कुठल्याही माध्यमात. कारण उघड आहे. मिळाली तर बरं होईल.दुसरी बाजू
In reply to नेमक्या याच कारणासाठी माझा by श्रीगुरुजी
आजिबात नाही. नाक दाबलं की
In reply to दुसरी बाजू by गामा पैलवान
आजिबात नाही. नाक दाबलं की तोंड उघडतं.इथे गायकवाड पक्षपरंपरेला अनुसरून एअर इंडियाचे नाक दाबायला गेले. त्यांना वाटले की नाक दाबले की तोंड उघडेल. प्रत्यक्षात त्यांच्या स्वतःच्याच ** दाबल्या गेल्या व आता त्यांच्यावरच लपून बसायची वेळ आली आहे. दिल्लीला जाण्यासाठी नावाचे स्पेलिंग बदलून, ठिकाण बदलून, विमान कंपनी बदलून तिकीट काढायचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु सर्व विमानकंपन्यांनी एकजूट दाखवून त्यांची मग्रुरी मोडून काढली आहे.पूर्वसूचना न देता व्यावासाय्वर्ग रद्द करणे हा माझ्या मते उद्दामपणा आहे.विमानात व्यवसायवर्ग नव्हतात तो रद्द कोटून करणार?एअर इंडियाकडे बक्कळ विमानं आहेत. कोणाचाही खोळंबा व्हायला नको.विमानं म्हणजे नाक्यावरच्या रिक्षा नव्हेत. एक गेली तर लगेच दुसरी मिळते असं विमानाचं नसतं. एक विमान एखाद्या प्रवाशाच्या मूर्खपणामुळे खोळंबलं तर लगेच दुसरं विमान उभं करा असं शक्य नसतं. त्यापेक्षा भविष्यात त्या मूर्खाला प्रवासबंदी करून तो परत असा मूर्खपणा करणार नाही याची व्यवस्था करणे सोपे असते.माझं म्हणणं थोडं वेगळं आहे. फालतू माणसाच्या फालतू मागणीसाठी सीएमडीला यायला भाग पाडलं की एअर इंडियाच्या सेवेचा दर्जा आपोआप सुधारेल. बाकी, बडवण्याचं म्हणालात्त तर ती विकृती आहेच. शंकाच नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत आपण आपला दृष्टीकोन पालटला पाहिजे. अशी अपवादात्मक परिस्थिती उद्भवणारच नाही याची काळजी एअर इंडियाने सेवेचा दर्जा उंचावून घेतली पाहिजे.दांडगाई वगैरे करून सेवेचा दर्जा सुधारत नसतो. त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया वापरावी लागते. दांडगाई केली तर दांडगाई करणार्याविरूद्ध जनमत जाते. मुळात ज्या मुद्द्यावरून गायकवाडांनी मारहाण करून दांडगाई केली तो मुद्दाच मूर्खपणाचा होता. मुगायकवाडांनी योग्य त्या कायदेशीर मार्गाने मुद्दा उपस्थित केला असता तर दाद लागू शकली असती. थेट कायदा हातात घेतल्याने जनतेला एअर इंडीयाऐवजी गायकवाडांच्या मग्रूरीचाच संताप आला आहे व त्यांना विमानप्रवास बंदी केल्याचा आनंद झाला आहे.एअर इंडियाची विमानं उडवायची लायकी नाही. त्यांनी फक्त खेळण्यातली विमानं उडववीत. ते तरी त्यांना जमेल का याची शंकाच आहे.जर एअर इंडीयाची विमाने उडविण्याची लायकी नसेल तर गायकवाडांनी एअर इंडियाने प्रवास टाळायला हवा होता. बंदी घालूनसुद्धा सुरवातीचे काही दिवस त्यांनी पुन्हा एकदा एअर इंडियाच्या विमानाचेच बुकिंग करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांच्यात कणभर स्वाभिमान असता (त्यांचा पक्ष जातायेता, दिवसरात्र स्वाभिमानाच्या गफ्फा हाणत असतो), तरी त्यांनी आयुष्यात परत एअर इंडियाच्या विमानात पाऊल ठेवले नसते.विचारमंथन
In reply to आजिबात नाही. नाक दाबलं की by श्रीगुरुजी
सर्वच प्रतिसाद वाचून खूप
In reply to विचारमंथन by गामा पैलवान
एअर इंडिया व इतर भारतीय विमान
क्रांतिकारक सल्ला आहे
In reply to एअर इंडिया व इतर भारतीय विमान by श्रीगुरुजी
गायकवाडांकडे भरपूर वेळ आहे.
In reply to क्रांतिकारक सल्ला आहे by गामा पैलवान
अरबी घोडे
In reply to गायकवाडांकडे भरपूर वेळ आहे. by श्रीगुरुजी
'शिव'हट्ट धरला तर
In reply to एअर इंडिया व इतर भारतीय विमान by श्रीगुरुजी
तवलीन सिंह यांचा या विषयावर
एक विधान मननीय आहे
In reply to तवलीन सिंह यांचा या विषयावर by श्रीगुरुजी
फक्त जनता वर्ग असणार्या
In reply to एक विधान मननीय आहे by गामा पैलवान
वेळच्या वेळी माहिती पुरवणे
In reply to फक्त जनता वर्ग असणार्या by श्रीगुरुजी
एक वर्षापासून या उड्डाणावर
In reply to वेळच्या वेळी माहिती पुरवणे by गामा पैलवान
कधीही विमानप्रवास न केल्याने
काय ठरले मग..?
म्हणजेच, आज ना उद्या एअर
In reply to काय ठरले मग..? by मोदक
म्हणजेच, आज ना उद्या एअर इंडियाला बंदी उठवावी लागणारच आहे, त्यावेळी आतापर्यंत घातलेली बंदी विसरून "एअर इंडीयाचे थोबाड फोडले" असे अग्रलेख नक्की वाचायला मिळतील.त्या अग्रलेखात "वाघाला डिवचलं की तो पंजा मारणारच", "जो शिवसेनेला आडवा गेला, तो संपला", "एअर इंडियाच्या छाताडावर नाचून आम्ही बंदी मागे घ्यायला लावली" अशी टाळीखेचक वाक्ये असतील. बादवे, शूर मर्द मावळा गायकवाड लपून का बसला आहे? पानपताची लढाई जिंकून आल्यासारखा भीमपराक्रम गाजविल्यानंतर तर त्याचे कोपर्याकोपर्यावर सत्कार व्हायला हवेत.लपून का बसला आहे?
In reply to म्हणजेच, आज ना उद्या एअर by श्रीगुरुजी
ख्यॅ ख्यॅ ख्यॅ . . .
In reply to लपून का बसला आहे? by अत्रे
तुम्ही, गायकवाड कोठे आहेत
In reply to म्हणजेच, आज ना उद्या एअर by श्रीगुरुजी
गायकवाड कोठे का जाईनात,
In reply to तुम्ही, गायकवाड कोठे आहेत by हतोळकरांचा प्रसाद
ते आनंद बिनंद सोडा हो, ते
In reply to गायकवाड कोठे का जाईनात, by श्रीगुरुजी
गायकवाडांच्या मुजोरगिरीला
In reply to ते आनंद बिनंद सोडा हो, ते by हतोळकरांचा प्रसाद
ते लपून बसल्यामुळेच लोकांसमोर
In reply to गायकवाडांच्या मुजोरगिरीला by श्रीगुरुजी
याच्यात वैयक्तिक काहीच नाही
In reply to ते लपून बसल्यामुळेच लोकांसमोर by हतोळकरांचा प्रसाद