Skip to main content

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

लेखक अत्रे यांनी सोमवार, 27/03/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

वाचने 95930
प्रतिक्रिया 592

प्रतिक्रिया

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

>>> पण म्हणून लगेच हि संधी आहे, घ्या उखळ पांढरे करून अशी अत्यंत अजेंडायुक्त भूमिका समर्थनीय असू शकते का? शिवसेना अशी संधी वारंवार देते. विरोधकांना अशी संधी मिळू नये असे वाटत असेल तर सेना नेत्यांनी इतरांविषयी गलिच्छ बरळणे व बढाया मारणे थांबवायला हवे. >>> त्यांनी खरेच मारले कि नाही ह्याच्याशी काहीही देणे घेणे नाही, त्यांनी तसे म्हटले हेच महत्वाचे आहे आणि त्यांच्याविरुद्ध वापरण्यासारखे आहे.आणि कारण स्पष्ट आहे - ते शिवसेनेचे आहेत. उद्या त्यांनी खूप मोठा विकास केल्याच्या फुशारक्या मारल्या तर त्यावेळी त्या परिस्थती जाणून न घेता खऱ्या मानल्या नाही म्हणजे मिळवली. शिवसेना आणि विकास या परस्परविरोधी गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या फुशारक्यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. >>> तरी बरं तो विडिओ आहे म्हणून नाहीतर उचलून फेकून दिलंच होतं असेच हे प्रकरण बाहेर आले असते. आणि खासदारांनी लपून बसावं कि गावभर फिरावं हा त्यांचा, त्यांच्या पक्षाच्या आदेशाचा आणि त्यांच्या वकिलांचा प्रश्न आहे. पण विरोधच करायचा असेल तर कुठलेही मुद्दे पुरतात. त्यांच्या फुशारक्यांमुळेच हे प्रकरण पेटले. लपूनच बसायचं होतं तर 'बघू मला कोण अडवतो' असला पोकळ स्वाभिमान दाखविण्याची गरज नव्हती.

In reply to by श्रीगुरुजी

ओके. तुमची वैयक्तिक मते आहेत आणि त्याचा आदर आहे. पण त्याने परिस्थिती बदलत नाही. मोठ्या थाटात लावलेला नो फ्लाय कायम ठेवून दाखवावा नाहीतर लोक त्याला विमान कंपन्यांचा पोकळ स्वाभिमान म्हणायचे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

नो फ्लाय पुढील काही दिवसातच रद्द होईल असा अंदाज आहे. निदान एका फ्लाईटसाठी तरी खासदारावर बंदी आली हेही नसे थोडके. निदान भविष्यात तरी सेना नेते सभ्य वागतील अशी आशा आहे. अर्थात नो फ्लाय रद्द झाला तर हा शूर मावळ्यांचा विजय आहे अशा सेनेने बढाया मारल्या तर मात्र अवघड आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बाकी काही असो, पण लोकनियुक्त संसद सदस्याबद्दल अशी एकेरी आणि आक्षेपार्ह भाषा मिपाच्या नियमात बसते का? (आणि तीही प्रकरणाची सखोल माहिती नसताना) जर बसत नसेल तर असे प्रतिसाद तात्काळ काढुन टाकणे हे संभाव्य वादविवाद टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे !!

In reply to by शार्दुल_हातोळकर

पण लोकनियुक्त संसद सदस्याबद्दल अशी एकेरी आणि आक्षेपार्ह भाषा इथे कोणी शिवीगाळ केली आहे का ? रविंद्र गायकवाड हा दीड दमडीचा बिनडोक माणूस आहे. तो कोण आहे हे त्याचा मतदारसंघ सोडून आताआतापर्यंत कोणाला माहितसुद्धा नव्हते.

In reply to by अप्पा जोगळेकर

भारतात ५४५ लोकसभा सदस्य आहेत. तुम्हाला त्यापैकी किती लोकसभा सदस्यांची माहिती आहे? लोकसभा सदस्य त्यांच्या मतदारसंघात माहिती असले म्हणजे पुरेसे आहे. आणि या धाग्यावर वापरलेले "मूर्ख", "दीडदमडीचा", "बिनडोक", वगैरे तुमच्या दृष्टीकोनातून शिवीगाळ नसून भूषणावह शब्द आहेत काय? शिवाय मी माझा आक्षेप अयोग्य भाषेबद्दलच नोंदवला होता, तुम्ही त्याला सोयीस्कररित्या बगल देऊन पुन्हा अयोग्य भाषा वापरली. अत्यंत खेदाने असे म्हणावे लागत आहे की मांडायला योग्य आणि संतुलित मुद्दे नसतील तर भाषा गलिच्छपणाकडे वळते. पण त्याने वस्तुस्थिती बदलत नसते.

In reply to by शार्दुल_हातोळकर

त्यांच्या भाषेच्या खजिन्यामध्ये " भिकारी " हा शब्द पण ऍड करा. जाम आवडतो त्यांना हा भूषणावह शब्द.

In reply to by गामा पैलवान

... विमानात बिझनेस कल्लास नसल्याची पूर्वसूचना दिली होती, असे वाचल्याचे स्मरते. गायकवाड यांनी स्वत:च्या वागण्याचे समर्थन करण्या ऐवजी क्षमा मागायला हवी होती, असे माझे मत.

In reply to by mayu4u

गायकवाड यांनी स्वत:च्या वागण्याचे समर्थन करण्या ऐवजी क्षमा मागायला हवी होती, असे माझे मत.
क्षमा? छे छे भलतेच काहीतरी. शिवसेनेचा खासदार म्हणजे सद्गुणांचा पुतळा.त्याने काहीही केले तरी ते बरोबरच कसे असते, इतरांमुळेच ही वेळ कशी आली इत्यादी गोष्टी बोलायच्या असतात. आणि कोणाची बिशाद शिवसेनेच्या खासदाराच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करेल???? तसे प्रश्नचिन्ह उभे करणारा प्रत्येक माणूस भाजपेयीच असतो आणि फॅसिस्ट मोदींच्या राज्यात इतर सर्वांची दडपशाही कशी चालते ते दर्शविणारा असतो. काय म्हणता?

In reply to by गामा पैलवान

याच न्यायाने सामान्य जनता जर रेल्वे बाबत वागु लागली तर अराजक माजायला वेळ लागेलसे वाटत नाही.

http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/sena-mp-ravindra-gaik…
नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि शिवसेनेचे खासदार यांच्यात सुमारे पाऊण तास झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
अरेरे, या सभ्य वेशातील गुंडाला लोकसभेतून हाकलून देण्याचे सोडून हे लोक काय करत आहेत! एअर इंडिया वाल्यानी संपावर जावे.

एका धाग्यावर भाजपा समर्थक फडणवीसांना नावं ठेवत आहेत चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आणि दुसरीकडे शिवसेना समर्थक एका खासदाराने सरकारी कर्मचार्‍याला झोडपण्याचं समर्थन करत आहेत. भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.

In reply to by अनुप ढेरे

भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.
बहुतांश वेळी हेच बघायला मिळते. आणि शिवसेनेच्या त्या खासदाराच्या त्या कृत्याचे निर्लज्जपणे समर्थन करणारेच भाजप समर्थकांना मोदीभक्त म्हणतात हा अजून एक मोठा विनोद!! केजरूके गुलामच्या धर्तीवर नवा शब्द शोधून काढायला हवा आता :)

In reply to by गॅरी ट्रुमन

मला वैयक्तिकरित्या भक्त मंडळींपेक्षा अंध विरोधकांची जास्त कीव येते. दिसले मोदी, करा विरोध, दिसली शिवसेना, करा विरोध, दिसली काँग्रेस करा विरोध! मग सत्यता काय याच्याशी काहीही देणेघेणे नाही. जे गायकवाडांना शिव्या घालण्यात जराही वेळ दवडत नाहीयेत ते विमान कंपनीबाबत चकार शब्दही काढत नाहीयेत कसे याचे वैषम्य वाटते...असो!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

जे गायकवाडांना शिव्या घालण्यात जराही वेळ दवडत नाहीयेत ते विमान कंपनीबाबत चकार शब्दही काढत नाहीयेत कसे याचे वैषम्य वाटते...असो!
काही मुद्दे-- १. विमानकंपन्यांचा ढिसाळ कारभार वगैरे पेंग्विनसेना समर्थकांची पश्चातबुद्दी आहे. पेंग्विनसेनेच्या लहानमोठ्या पदाधिकार्‍यांनी याला ठोकला, त्याला थोबडावला अशा घटना गेल्या ५० वर्षात अनेकवेळा घडलेल्या आहेत. यावेळी असे थोबडावणारा खासदार असल्यामुळे आरडाओरडा बराच जास्त झाला. तेव्हा त्याचे काहीतरी रॅशनलायझेशन करायला म्हणून विमानकंपन्यांचा कारभार वगैरे गोष्टी आणल्या जात आहेत हे आम्हाला समजत नाही असे अजिबात नाही. २. बरं विमानकंपन्यांचा कारभार ढिसाळ होता/आहे हे मान्य केले तरी त्याविषयी पेंग्विनसेनेने यापूर्वी कधी आवाज उठवला होता असे फार कधी (किंवा कधीच) ऐकिवात आलेले नव्हते. मग विमानकंपन्यांचा कारभार ढिसाळ आहे त्याविषयी आवाज उठवला पाहिजे हे नेमके आता (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) आठवणे म्हणजे विलक्षणच योगायोग झाला. ३. समजा विमानकंपनीचा कारभार ढिसाळ असेल तरी अशा कारभाराविरूध्द नियमाप्रमाणे तक्रार करायचे मार्ग (तक्रारपुस्तिका वगैरे) असतात. गेलाबाजार ग्राहक न्यायालयाकडेही जाता येतेच. असे सामान्य माणसांनी करून चांगली घसघशीत नुकसानभरपाई पदरात पाडून घेतली आहे अशा बातम्या कधी पेपरात वाचल्या नाहीत का? एक खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून नियमांचे आणि कायद्याचे पावित्र्य जपायची जबाबदारी गायकवाडांवर जास्त होती. सामान्य माणसाचा अशाप्रसंगी तोल सुटणे समजू शकतो पण खासदाराकडून असे होणे अगदी पूर्ण अमान्य. लोकप्रतिनिधी म्हणून अधिक जबाबदारीचे वर्तन गायकवाडांकडून अपेक्षित होते. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे याविरूध्द आवाज उठवायचे सामान्य माणसाकडे असतात त्यापेक्षा अधिक मार्गही उपलब्ध होते (लोकसभेत आवाज उठवणे वगैरे). त्या मार्गांचा वापर त्यांनी करणे नक्कीच अपेक्षित होते. जर खासदाराला "अशी" वागणूक मिळते तर सामान्य माणसाला कशी वागणूक मिळत असेल हा मुद्दा त्यांनी लोकसभेत मांडला असता तर त्याचा नक्कीच अधिक चांगला उपयोग झाला असता. लोकांचेही मोठे समर्थन त्यांना मिळाले असते. परत एकदा-- एक खासदार म्हणून असे जबाबदारीचे वर्तन त्यांनी करावे ही अपेक्षा सामान्य माणसापेक्षा कितीतरी जास्त. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण १९८६ मध्ये काँग्रेसचे इंदूरचे खासदार प्रकाशचंद्र सेठी (आणीबाणीत मंत्रीपदे भूषवून बदनाम झालेले) यांनीही मुंबईला ट्रंक कॉल बराच वेळ मिळाला नव्हता म्हणून टेलिफोन एक्स्चेंजमध्ये जाऊन गोंधळ घातला होता. सेठींनी घातलेला गोंधळ अधिक मोठ्या प्रमाणावर होता (बरोबर बंदूक घेऊन जाणे, टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नासधूस करणे वगैरे). पण १९८० च्या दशकात सरकारी टेलिफोन कंपनीचा कारभार २०१७ मध्ये विमान कंपन्यांच्या कारभारापेक्षा कित्येक पटींनी जास्त भोंगळ होता. तरीही सेठी आणि गायकवाड यांच्या कृत्याची पार्श्वभूमी आणि एकंदरीत स्वरूप सारखेच. आणि दोन कंपन्यांचा भोंगळ कारभार आणि त्याला दोन खासदारांचे उत्तर यांचे गुणोत्तर कदाचित सारखेच येईल!! जर प्रकाशचंद्र सेठींच्या कृत्याची देशभरातून निंदा झाली असेल तर गायकवाडांना वेगळी वागणूक द्यायचे अजिबात कारण नाही. ४. समजा विमानकंपनीचा कारभार ढिसाळ असेल, तसा अनुभव गायकवाडांना आला असेल तरी २०-२५ वेळा चपलेने मारणे ही त्या मानाने कित्येक पटींनी जास्त मोठी प्रतिक्रिया झाली नाही का? त्यातूनच कंपनीचा ढिसाळ कारभार हा मुद्दा मागे पडून गायकवाडांच्या कृत्यावरतीच सगळे लक्ष केंद्रित होणे अगदीच स्वाभाविक आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

प्रतिसाद वाचतोच आहे, पण तोपर्यंत तुम्ही मला पेंग्विनसेना समर्थक वगैरे समजत असाल तर... खेदाने नमूद करतो गैरसमज दूर करावा. तुम्हाला मागे कोणीतरी भक्त म्हटले होते तेव्हा तुम्हाला काय फीलिंग आली असेल ते जाणवले.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पण तोपर्यंत तुम्ही मला पेंग्विनसेना समर्थक वगैरे समजत असाल तर... खेदाने नमूद करतो गैरसमज दूर करावा.
विमानकंपन्यांचा कारभार हा मुद्दा आणणारे तुम्ही एकटेच नाहीत. बाकी गैरसमज वगैरे अजिबात नाही. तरीही माझ्या प्रतिसादावरून मला तुम्ही पेंग्विनसेना समर्थक आहात असे म्हणायचे आहे असे वाटल्यास तसे नाही. त्याबद्दल दिलगिरी. प्रतिसादातच 'हे जनरल वक्तव्य करत आहे' असे लिहायला हवे होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

१९८4 मध्ये Hanover मधून मुंबईत येणाऱ्या एका विमानात तत्कालीन मंत्री रामराव आदिक यांनी शिवास रीगलच्या नशेत हवाईसुंदरीशी गैरवर्तन केल्याने त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. अगदी मागील वर्षी मुंबई हून पुण्याला येताना कन्हैयाकुमारचे सहप्रवाशाशी किरकोळ भांडण झाल्यानंतर जेट ने दोन्ही प्रवाशांना बाहेर काढले होते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

>>> जे गायकवाडांना शिव्या घालण्यात जराही वेळ दवडत नाहीयेत ते विमान कंपनीबाबत चकार शब्दही काढत नाहीयेत कसे याचे वैषम्य वाटते...असो! या विशिष्ट प्रकरणात विमान कंपनीची नक्की काय चूक होती?

In reply to by श्रीगुरुजी

परत एकदा विनंती आहे, आपण याप्रकरणाची नीट माहिती घ्यावी. मी वरच एक दोन लिंका टाकल्या आहेत त्याही बघून घ्या.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मला वैयक्तिकरित्या भक्त मंडळींपेक्षा अंध विरोधकांची जास्त कीव येते. दिसले मोदी, करा विरोध, दिसली शिवसेना, करा विरोध, दिसली काँग्रेस करा विरोध! मग सत्यता काय याच्याशी काहीही देणेघेणे नाही. मलाही पूर्वी कीव येत होती पण दुर्लक्ष केले की "उत्तरे नाहीत म्हणजे आंम्हीच बरोबर" आणि उत्तरे दिली की "बघा बघा हल्ले करत आहेत" अशी सोयीस्कर कोल्हेकुई ऐकून कंटाळा आला मग त्यांच्याच प्रतिसादपद्धतीनुसार प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. आता अंधविरोधकांचे "सोयीस्कर निवृत्ती पर्व" सुरू आहे. :)

In reply to by अनुप ढेरे

समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून घ्यायची लाज नाही हो, पण भक्तीला भाटगिरी बनवून राजकारण आणि समाजकारण तज्ञ आणि तथाकथित उच्चशिक्षीत विचारजंती बुरख्यामागे दडवून दाखवली जाते त्याचे जास्त वाईट वाटते.

In reply to by अभ्या..

आणि वर असे लोक लिहिण्याच्या भरात भाषेची पातळी प्रचंड घसरुन एकेरी उल्लेख करण्यापर्यंत घसरली हे सुद्धा ध्यानात घेत नाहीत. ज्यांंना स्वतःच्या राहत्या मतदारसंघातील स्थितीचेदेखील काडीइतकेही ज्ञान नाही तेही बिनधास्त गलिच्छ आणि आक्षेपार्ह प्रतिक्रिया तज्ञाच्या थाटात लिहित असतात.....

In reply to by अनुप ढेरे

एका धाग्यावर भाजपा समर्थक फडणवीसांना नावं ठेवत आहेत चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आणि दुसरीकडे शिवसेना समर्थक एका खासदाराने सरकारी कर्मचार्‍याला झोडपण्याचं समर्थन करत आहेत. भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे. :)

बरं, नक्की काय झालं आहे हे कोणी वस्तुनिष्ठपणे सांगेल का? मारहाण करणे चुकीचे होते, असे मलाही वाटते. एअर इण्डियाच्या कर्मचार्‍याने चुकीची भाषा वापरली असेल ( असेल म्हणते कारण मला ठाऊक नाही, मी त्या बातम्या पाहिल्या नाहीत) तर तेही अत्यंत चुकीचे आहे पण हातापाईवर उतरण्यापेक्षा त्याची रीतसर तक्रार नोंदवता आली नसती का? एकदा लोकप्रतिनिधी म्हणून वावरायला लागल्यावर वागण्यामध्ये तोठे तारतम्य बाळगावयास नको का?

In reply to by यशोधरा

बरं, नक्की काय झालं आहे हे कोणी वस्तुनिष्ठपणे सांगेल का?
The MP was flying from Pune to Delhi, and was entitled to free business class travel with our money, as all elected representatives are, but as Air India operated an aircraft which had no business class, Gaikwad had to travel economy — this, after the airline had explained it all to his political staff (read flunkeys who are at the service of our parliamentarians, again at our cost). After landing at Delhi, the MP refused to disembark and demanded an explanation. When the airline manager, a 60-year-old man, boarded the aircraft to explain to him why this had happened, Gaikwad slippered him.
सोर्स

In reply to by अत्रे

परत तेच होत आहे, स्वतःला आणि स्वतःच्या मताला योग्य वाटतील त्या बातम्या सांगायच्या, बाकीच्या सोडून द्यायच्या. यशोधारताई, खालील बातम्या दुसरी बाजू दाखवतात, जमल्यास ह्याही वाचा. http://www.loksatta.com/desh-videsh-news/raveendra-gaikwad-shivsena-mp-… http://m.maharashtratimes.com/india-news/i-dont-think-he-wanted-to-thro… https://youtu.be/gPQ55mRtTOA

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

पहिल्या दोन बातम्यांसंदर्भात मी इथे एक दीर्घ प्रतिसाद दिला आहे. एकंदरीत फक्त लोकसत्ता आणि मटामध्येच हवाईसुंदरीची ओळख लपवून हे वृत्त का आले व इतर माध्यमांकडे हवाईसुंदरीचे निवेदन का नाही हे एक गूढच आहे. तूनळीवरील वर दिलेली चित्रफीत सुद्धा अपूर्ण आहे. चित्रफीतीच्या सुरवातीला विमानाच्या दारात पुढच्या बाजूला एअर इंडियाचा कर्माचारी पाठमोरा दिसतोय. त्याच्या मागे गायकवाड महाशय आहेत. त्यांच्या आजूबाजूला दोन सुरक्षारक्षक दिसताहेत. एक हवाईसुंदरी "don't do that" असे दोन वेळा ओरडताना दिसते. गायकवाड महाशय त्या कर्मचार्‍याला खाली शिडीवरून खाली ढकलायचा प्रयत्न करीत होते असे मटामधील वृत्तातल्या अनामिक हवाईसुंदरीने सांगितले आहे. चित्रफितीचा हा भाग म्हणजे तेच ढकलण्याचे दृश्य असावे. "कितने बद्तमीज है ये लोग" असे कोणतरी म्हटल्याचे ऐकू येते. हे वाक्य सुरक्षारक्षकाचे आहे का गायकवाडांच्या तोंडातून आले आहे व ते नक्की कोणाला उद्देशून म्हटले आहे ते स्पष्ट नाही. या चित्रफितीच्या आधीची घटना, म्हणजे गायकवाड महाशय आसनात बसून राहिले होते व तिथूनच हे प्रकरण पेटायला सुरूवात झाली, या चित्रफितीत नाही. इथे कोण कोणाला धक्काबुक्की करीत आहे ते स्पष्ट नाही. परंतु जर गायकवाड महाशय त्या कर्मचार्‍याला विमानाच्या दारातून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडविणे योग्यच आहे. तसे करणे म्हणजे धक्काबुक्की नव्हे. त्यामुळे एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांनी गायकवाडांना अपशब्द वापरले, त्यांना धक्काबुक्की केली या दाव्यात अजिबात तथ्य वाटत नाही. भारतात एखाद्या नगरसेवकाला सुद्धा अपशब्द वापरण्याची, धक्काबुक्की करण्याची हिंमत सर्वसामान्य नागरिकात नसते. खासदाराच्या बाबतीत असे करणे तर दूरच राहिले.

In reply to by श्रीगुरुजी

अगदी तुम्हाला हवे तसे विश्लेषण केलेत श्रीगुरुजी विडीओचे! मी हे विश्लेषण प्रत्येक माणसाच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडतो, ज्याला जे योग्य वाटेल ते खरे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

काहीतरीच काय? चित्रफितीत जे दिसतंय तेच मी सांगितलंय. नक्की कोण कोणाला बद्तमीज म्हणतोय ते या चित्रफितीवरून सांगता येणे अशक्य आहे. त्यामुळे गायकवाडांनाचा कर्मचार्‍यांनी अपशब्द वापरले हा ठाम निष्कर्ष काढता येणार नाही. कदाचित उलटेही असू शकेल. त्या चित्रफितीत सगळेच एकमेकांना रेटारेटी करताहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी गायकवाडांना धक्काबुक्की केली हा ठाम निष्कर्ष सुद्धा काढता येणार नाही. बाकी तुम्हाला चित्रफितीवरून माझ्यापेक्षा काही वेगळे समजले असेल तर ते सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

आणखी काही लोकांचं मत येतंय का बघू, नाहीतर मी मला त्या विडिओत काय दिसतंय ते लिहितोच. तूर्तास जसा ठाम निष्कर्ष सुरक्षारक्षकांच्या धक्काबुक्कीबाबत काढता येत नाहीये तसा त्याच व्हिडिओवरून खासदारांनी ढकलले याबाबीतही काढायला नको, कसे?

विमानात business class नसताना देखील मला इकॉनॉमी क्लास मध्ये का बसवलं ह्या मुद्द्यावर अडून बसण्याची काय गरज होती गायकवाड साहेबांना? विमान कंपनीने तसे आगाऊ कळविले होते त्यांच्या कार्यालयास. त्याहून पुढचा मुद्दा म्हणजे खासदारांना business क्लास चे पास का दिले आहेत? खासदारांनी इकॉनॉमी क्लास ने प्रवास केला तर बिघडलं कुठे? फुकटचे पास मिळाले आहेत म्हणून हा माज आहे ह्या लोकांना. पदरचे पैसे घालून दिल्ली ला जाण्याची वेळ अली तर जातील का हे business क्लास नी दर वेळेला?

हल्ली त्या 'अँगर मॅनेजमेंट',स्ट्रेस मॅनेजमेंटच्या कोर्सेसच्या जाहिराती पेपरात येत असतात. उद्धवने तसे कोर्सेस त्याच्या नेत्यांसाठी बंधनकारक करावेत. निदान महाराष्ट्राबाहेर जायचे असेल तर तसे कोर्सेस केल्यावरच बाहेर पाठवावे असे ह्यांचे मत. बाकी तो कर्मचारी उगीच कारण नसताना खासदारासमोर बरळेल असे बिलकूल वाटत नाही. ते ही शिवसेनासारख्या टग्या पक्षाच्या नेत्यासमोर. २०१४ पासून सेनेची अवस्था 'सहन होत नाही व सांगताही येत नाही' अशी आहे. सत्तेत असलो तरी भाजपाच्या नेत्यांसमोर,सरकारसमोर मान झुकवणार नाही..हे अधून मधून मतदारांना दाखवावे लागणार..असा आधीच अंदाज होता. आता दिल्लीहून मुंबईत येणारी एयर इंडियाची विमाने उतरू दिली जाणार नाहीत.अशा 'ईशारा' उद्धव देइल ? की एयर इंडिया,ईंडिगोच्या ऑफिसमध्ये येऊन काही तरूण धुडगुस घालत काचा फोडून पळून जातील?

पण आपण तक्रार पुस्तिका मागून पण जर मिळत नसेल तर ते हि चूक आहे . ह्यात बिसिनेस आणि इकॉनॉमी क्लास हा मुद्दा गौण आहे . मी पैसे भरलेत तर मलाच बोलायचं वरून मलाच सांगायचं मोदींना सांगेन ?? पीएम फुकट बसलेत का असं काही ऐकायला ??ह्याला मुजोरी म्हणतात . ते काही पोलीस कसे करतात तश्या टाईप ची अश्या लोकांना योग्य धडा शिकवणं आवश्यक असतं. व्यक्तिशः एअर इंडिया ला अशी वेळ आली ह्या बद्दल आनंद झालाय . त्याहून जास्त आनंद माहिती न घेता तोंडसुख घेणाऱ्यांसाठी झालाय . इतिहासातील आणि वर्तमान काळातील भाजप च्या चुका ह्यावरही एक धागा काढेन वेळ मिळाला कि . पण सगळ्यांनी नीट बोला हा तेव्हा ....

In reply to by वरुण मोहिते

आजकाल भाजपाची "दोनो हात घी में और सर कढाई में" अशी अवस्था आहे म्हणुन सेनेला जिथे-तिथे कोंडित पकडायची फॅशन आलेली आहे. गायकवाड हातघाईवर आले हे त्यांचं चुकलंच पण या प्रकरणात एयर इंडिया हि धुतल्या तांदळासारखी नाहि. बातम्यांवरुन असं समजतंय कि गायक्वाडांना बिझ क्लास्चा बोर्डिंग पास इशु झालेला होता. आता एयर इंडियाचा कारभार कसा चालतो याची कल्पना नाहि पण बोर्डिंग पासवर बिझ क्स्लासची सीट आहे म्हणजे विमानात बिझ क्लास असायला हवा. एयर इंडियाने आयत्या वेळेला विमान (ऑल कॅटल क्लास) बदललं का? गायकवाडांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बाबतीत हा प्रकार यापुर्वि २-३दा झालेला आहे; यावर एयर इंडियाचं स्पष्टीकरण कोणी मागितलं काय? अशा प्रकारचं कॅट्ल क्लासला डाउनग्रेडिंग एयर इंडिया सगळ्या फर्स्ट्/बिझ क्लास पॅसेंजर्स्ना करते का?..

In reply to by राजाभाऊ

राजाभाऊ या विमानाला बिझिनेस क्लास नाही हे खासदार साहेबांच्या कार्यालयात दोन दोवास आधीच कळवले होते त्यामुळे ऐनवेळी बदलायचा प्रश्नच नाही सगळ्यात खटकणारी गोष्ट : खासदार साहेब स्वतः:चे हीन कृत्य पराक्रम म्हणुन सांगतात ... टीव्ही कॅमेऱ्यासमोर ...

In reply to by अमर विश्वास

....या विमानाला बिझिनेस क्लास नाही हे खासदार साहेबांच्या कार्यालयात दोन दिवस आधीच कळवले होते.... याबद्दल काही अधिकृत रेफरन्स देऊ शकाल का?

In reply to by वरुण मोहिते

भाजपाच्या चुका दाखवल्याने शिवसेनेच्या चुका क्षमायोग्य आहेत असे कांही तुम्हाला म्हणायचे आहे का..? शिवसेनेची चुक आहे ना..? मग समर्थन कशाला करत बसताय..? भाजपाने पण चुका केल्या, काँग्रेसने पण केल्या, डावे, समाजवादी वगैरे वगैरे.. बाकी लोकांच्या चुका दाखवून शिवसेनेच्या चुका कमी होणार आहेत का..? तुम्ही नक्की काय साध्य करणार..?

In reply to by वरुण मोहिते

पण आपण तक्रार पुस्तिका मागून पण जर मिळत नसेल तर ते हि चूक आहे या नवीन कहाणीतील काही परस्परविरोधी मुद्दे -
Asserting that Air India was trying to misguide everyone as to what actually caused the altercation onboard the aircraft, Shiv Sena MP Ravindra Gaikwad stated that he had never demanded a business class seat, but had instead requested a complaint book to address his grievance about ‘substandard service’. Issuing a fresh statement, the MP said that while travelling in the flight, he noticed “carelessness and substandard” service of Air India and requested for a complaint book, but despite his frequent requests he was not provided the complaint book, instead the staffer misbehaved with him.
एअर इंडिया लोकांना मिसगाईड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दस्तुरखुद्द गायकवाडांनी अत्यंत अभिमानाने कॅमेर्‍यासमोर सांगितले आहे की मी सँडल काढून कर्मचार्‍याला २५ वेळा मारले . . . ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, मी शिवसेनेचा खासदार आहे . . . उशीरा दाढीमिश्या आल्यासारखे हे जे उशीरा शहाणपण सुचले आहे हे त्याच दिवशी सुचले असते त्यांच्यावर आज लपून रहायची वेळ आली नसती. दुसरा मुद्दा म्हणजे तक्रारपुस्तक मिळाले नाही म्हणून विमानातच बसून राहून इतरांचा खोळंबा करणे व नंतर कर्मचार्‍याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न करणे व आपण तसे केले हे अत्यंत अभिमानाने सांगणे हे अत्यंत अयोग्य आहे. विमानात तक्रारपुस्तक मिळाले नसेल तर टर्मिनलवर येऊन तिथल्या एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदविता आली असती. एखाद्या खासदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याएवढे धाडस एअर इंडियाच्या व्यवस्थापक किंवा कर्मचार्‍यांमध्ये असेल असे वाटत नाही. गायकवाडांच्या म्हणण्यानुसर त्यांना वाईट सेवा मिळाल्याबद्दल तक्रार करायची होती. त्यांना नक्की कोणती सेवा वाईट मिळाली याविषयी ते अजिबात बोललेले नाहीत. विमानात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते का, त्यांना वाईट खानपान पुरविण्यात आले होते का, त्यांच्याशी विमानात कर्मचार्‍यांनी गैरवर्तणूक केली होती का, त्यांना खराब आसन देण्यात आले होते का इ. गोष्टींबद्दल ते काहीही बोललेले नाहीत. या सर्व गोष्टींचा खुलासा त्यांनी लगेचच केला असता तर ही वेळ आलीच नसती. त्यांनी कॅमेर्‍यासमोर आत्मप्रौढीने ज्या बढाया मारलेल्या आहेत त्यावरच विसंबून प्रतिक्रिया येणार.
“I was demanding proper facilities not the business class seat. But just to hide their carless attitude and cheating towards lakhs of Air India passengers, they tried to create a picture that I was continuously demanding for business class seat. This is completely baseless,” he said
. कोणत्या प्रॉपर सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या नाहीत, त्यांची नक्की काय फसवणूक झाली इ. गोष्टींबद्दल ते अजूनही सांगत नाहीत.
Gaikwad on Friday submitted a complaint against Air India before the Delhi Police alleging that he was pushed and yelled on. In his complaint, Gaikwad, who allegedly manhandled Air India staffer, said he was made to travel by Air India on economy class even as he had business class ticket.
आपल्याला वाईट सेवा मिळाल्यामुळे आपल्याला तक्रार करायची होती असा त्यांचा दावा होता. परंतु आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला हीच त्यांचे खरे दुखणे दिसते. जनसामान्यांच्या बरोबर इकॉनॉमी क्लासमध्ये मांडीला मांडी लावून बसावे लागल्यामुळे त्यांचा पारा चढलेला दिसतो. एकीकडे म्हणतात आपल्याला वाईट सेवा मिळाली, परंतु नक्की कोणती सेवा वाईट होती त्याविषयी चकार शब्द नाही. तर दुसरीकडे सांगतात की आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला. जर विमानात बिझनेस क्लासची आसने असूनसुद्धा त्यांना मुद्दाम इकॉनॉमीने जायला लावले असत तर त्यांची तक्रार रास्त होती. पण विमानात जर बिझनेस क्लासची आसनेच नसतील तर फक्त यांच्यासाठी इकॉनॉमी क्लासची ५-६ आसने काढून तिथे बिझनेस क्लासची आसने बसवायची होती का? जर त्या विशिष्ट विमानात बिझनेस क्लासच नव्हता त्यांनी त्या विमानाने प्रवास करणे टाळून ज्यात बिझनेस क्लासची व्यवस्था आहे अशा एखाद्या दुसर्‍या विमानातून प्रवास करायला हवा होता. तसे न करता त्यांनी इकॉनॉमीतून प्रवास पूर्ण केला आणि नंतर मला बिझनेस क्लास दिला नाही हो म्हणून कांगावा सुरू केला. एअर इंडीया कितीही वाईट कंपनी असली, त्यांना कितीही वाईट सेवा मिळाली असली तरी एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने पायातील पादत्राणाने एका ६० वर्षीय कर्मचार्‍याला अनेकवेळा मारणे, त्याला शिडीवरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे आणि नंतर आपल्या या घृणास्पद कृत्याबद्दल जराही खेद, खंत न बाळगता अभिमानाने आपल्या कृत्याची प्रौढी मारणे हे अत्यंत संतापजनक व तिरस्करणीय वर्तन आहे. त्यांनी जे केले तो गुन्हाच आहे व या अत्यंत उन्मत्त वर्तनाबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. विमानकंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली बंदी समर्थनीय आहे.

In reply to by श्रीगुरुजी

परत परत लांबलचक प्रतिसादातून एकच गोष्ट प्रतीत करायची आहे, हे सगळं खासदार साहेब स्वतः म्हणाले. अहो तीच तर मेख आहे, खासदार साहेबांचं वक्तृत्व आधीच अमोघ आहे, वरून हिंदी आणि त्यात फुशारक्या! त्यांचं खरंतर चुकलंय तेच, डिंग्या हाकणे! आणि अर्थातच त्याचा फटका त्यांना बसलाच आहे पण म्हणून दुसरी बाजू बघायचीच नाहीये याला मी फारफार तर आकस म्हणू शकेन. थोडक्यात काय खासदारांनी स्वतःच्या तोंडाने असे केल्याचे नाकारले असते तरी फरक काहीच पडला नसता कारण विरोध आणि टीका करण्याचे पक्के ठरलेलेच असावे. पण आश्चर्य याचे वाटते कि शिवसेना अशा अनेक वॅलीड संधी नेहमी देत असते, मग हे ओढून ताणून विरोध कशाला बुआ?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मग खासदार महाशयांनी स्वतःच दुसरी बाजू सांगावी. ती सांगताना हेही सांगावं की मी सँडलबिंडल मारलेली नव्हती व कर्मचार्‍याला ढकलूनही देत नव्हतो. मी रागाच्या भरात चुकून अतिशयोक्ती केली. एकीकडे म्हणतात मला वाईट सेवा मिळाली. पण नक्की कोणती सेवा वाईट होती याविषयी चकार शब्द नाही. त्यांनी एकच पालुपद लावलंय की माझ्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट असताना मला इकॉनॉमीने प्रवास करायला लावला. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही आहे का? आपण कर्मचार्‍याला मारहाण केली हे आपली मर्दुमकी दाखविण्यासाठी एकदा स्वतःच्या तोंडाने सांगितल्यानंतर आता त्यांना काही दुसरे सांगायला तोंडच राहिलेले नाही, हीच खरी मेख आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ते सांगतील कि त्यांना जेव्हा सांगायचं तेव्हा, आताच त्यांना फोडून काढण्याची का झाली असेल बरे?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हरकत नाही. परंतु तोपर्यंत त्यांच्या आधीच्या विधानांवर विसंबूनच प्रतिक्रिया येत राहणार आणि इतर पक्ष व जनता त्यांना फोडून काढत राहणार आणि ते शिवसेनेला महागात जात आहे.

In reply to by वरुण मोहिते

इतिहासातील आणि वर्तमान काळातील भाजप च्या चुका ह्यावरही एक धागा काढेन वेळ मिळाला कि . पण सगळ्यांनी नीट बोला हा तेव्हा .... नक्की लिहा. धाग्याची वाट बघतो.

बादवे मागे एकदा मला मुंबई एयरपोर्टवर वायफाय बद्दल तक्रार करायची होती. तेव्हा विमानतळावर विचारले असता त्यांनी मला एक कम्प्लेंट फॉर्म दिला होता (ज्यात मी माझा इ मेल हि दिला होता). आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही आठवड्यांनी मला त्याच्या कडून ऑफिशिअल रिप्लाय आला (माझ्या मेल वर). खा. गा. यांनी थोडा संयम राखून सामान्य नागरिकांप्रमाणे (जी काही त्यांची होती ती) तक्रार केली असती, तर त्यांनाही माझ्याप्रमाणे उत्तर मिळाले असते. पण कदाचित तसे करणे त्यांच्या इगो मध्ये बसत नसावे म्हणून सगळे रामायण झाले.

In reply to by अत्रे

मागे नारायण राणे ह्यांनी चेन्नई विमानतळावर असाच तमाशा केला होता. जेट एयरवेजच्या कर्मचार्याची बदली करायला लावली होती. तळागाळातून वर आलेल्या नेत्यांचे ईगो जरा मोठे असतात असे ह्यांचे मत. स्वतःची रॉबिन हूड छबी कायम ठेवायच्या नादात मग असे घडते.

कर्मचारी उद्दटपणे बोलला तर एक जबाबदार खासदार, त्याची रीतसर तक्रार करेल. त्याला शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करेल. पण कायदा हातात घेणार नाही. असो. या धाग्यावर मारहाणीला, हिंसाचाराला अप्रत्यक्ष समर्थन देणारी मंडळी पाहून, नुसते राजकीय पक्षांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचेच अधःपतन झाल्याचे जाणवते.

In reply to by तिमा

हाच हाच तर मुद्दा आहे. मारहाणीचे समर्थन देणारे, हिंसाचाराला समर्थन देणारे म्हणायचे आणि सोयीस्करपणे वस्तुस्थितीकड़े दुर्लक्ष करायचे! मुळात वरील कुठल्या प्रतिसादात कोणी समर्थन केलंय हे सरसकटीकरण न करता सांगाल काय? गायकवाड यांनी केलेली मारहाण हा गुन्हा आहे आणि तो कोर्टात सिद्ध व्हायला हवा. एवढ्या एकांगी वार्तांकनानंतर झी वाल्यानी शेवटी दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न तरी केला. शिवसेना खासदारांनी सुमित्रा महाजनांना सोपवलेल्या विडिओमध्ये गायकवाड यांनाच आधी धक्काबुक्की व शिव्या देण्यात आल्याचे दिसत आहे असे वाहिनीवर दाखविले गेले. बाकीच्या सो कॉल्ड कायद्यानेच चालणाऱ्या लोकांना हे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे आहे. खरतर मुखवटाधारी लोकांचे अधा:पतन झाले आहे असे दिसते. स्वतःच्या विचारांशीही लोकांना प्रामाणिक राहायला का आवडत नसेल बुआ?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

वरील कुठल्या प्रतिसादात कोणी समर्थन केलंय हे सरसकटीकरण न करता सांगाल काय?
www.misalpav.com/comment/928987#comment-928987
जर शिवीगाळ ऐकुन किंवा परत परत तक्रारी करुन एअर इंडियाच्या लोकांनी हा प्रकार केला असेल तर लुंगीवाल्याला फोडला हेचं उत्तम.

In reply to by अनुप ढेरे

हां असं जिथल्या तिथं संपवावं, उगाच सरसकटीकरण कशाला? बाकी त्यांच्या वरच्या वाक्यातील पाहिलं अक्षर जर आहे आणि त्याला काही विशेष अर्थ असतो असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

हांगाश्शी, आमीपण हेच म्हणतो. . आता धागेवाले बाबू, धाग्याच्या गाभ्याकडे येऊ चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे झाला, व्यवस्थित झाला. लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे. माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. सहानूभूती नाही तर पाठिंबा प्रचंड आहे. माजुरडेपणाला असेच जागच्या जागी उत्तर द्यावे लागते. नंतर फक्त निरवानिरवी असते ह्या तत्त्वावर आमची श्रध्दा आहे. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे? सध्या तरी मी एकटाच आहे आणि माझ्या निवेदनाने तुम्हाला बरे वाटलेले नाहीये. राहता राह्यला परत निवडून यायचा भाग. ते आधीही आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ह्यावेळी खासदारकीची निवडणूक त्यांची पहिली निवडणूक नव्हती अन येत्यावेळेस तर ते जब्बरदस्त मतांनी येणार. . आता कसं वाटतंय?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

तुम्ही विचारलत की मारण्याचं समर्थन कुणी केलं? तुम्हाला व्यवस्थित तसा प्रतिसाद दाखवला. आता तुम्ही म्हणता की एअर इंडियाने अमुक केलं तर अर्थ वेगळा होतो. तुमचा नक्की मुद्दा काये? की एअर इंडियाने अमुक अमुक तिकिट दिलं नाही म्हणून फोडणं बरोबर? एखाद्या कायदे बनवणार्‍याने कायदा हातात घ्यावा हे दुर्दैवी आहे. त्याचं समर्थन अजूनच दुर्दैवी आहे.

एअर इंडिया वाल्याना बॅन करण्याची सुबुद्धी का झाली याची माहिती इथे कळाली
Shiv Sena has had a strong presence in the Airport unions and not just Gaikwad but even लो level Sena functionaries have managed to get their way simply because they belonged to the party. “See many years ago the Sena had a strong presence in the Airport Unions. If anyone misbehaved with a Shiv Sena worker or functionary, we used to shut down not just the airline operations but the entire airport. I believe when Gaikwad beat up the Air India official he felt that nothing would happen to him as the Sena union would not let the Airline act against him,” said Kiran Pawaskar, an old Sena hand who headed party’s Bharatiya Kamgar Sena for a long while. Pawaskar has now switched sides and joined the NCP. He heads the All India Aviation Employees Association (AIAEA). “What Gaikwad did not know is that the Sena has almost a negligible presence in the Mumbai Airport now, which is why the airline has been able to debar him from flying. While his behaviour was reprehensible, no CMD would dare to debar a Sena functionary, that too an MP, earlier. The Sena would have never allowed it, ” he said.

आणि मिपावरची सगळ्यात मोठी गंमत काय आहे माहिती आहे काय ? एखाद्या धाग्यावरची पुर्ण चर्चा वाचायचीच गरज पडत नाही हल्ली. नुसता आयडी बघीतला की तो काय बोलणार आहे (म्हणजे कुणाची तळी उचलणार आहे) ते अगोदरच माहिती असते. त्यामुळे चर्चा वाचून आपल्या माहितीत नवीन भर पडते असे समजणे म्हणजे चुकीचा गैरसमज आहे. :) अपवाद क्षमस्व !

In reply to by धर्मराजमुटके

म्हणुनच म्हणतो चर्चा निकोप असावी आणि एकांगी व पुर्वग्रहदुषित नसावी. अन्यथा अशा प्रकारच्या चर्चांना काहीही अर्थ नाही.

In reply to by धर्मराजमुटके

धर्मराजमुटके, मी असाच एक सन्माननीय अपवाद आहे. माझी क्षमा अजिबात मागू नका. ;-) आ.न., -गा.पै.

खासदार गायकवाड साहेब जेंव्हा टाचा घासत रेल्वेने प्रवास करत वापीपर्यंत आले तेंव्हा खूपच मजा वाटली. खरे तर या मूर्ख, उद्दाम माणसाला रेल्वेबंदी सुद्धा झाली पाहिजे. बाकी लोक उगाच एअर इंडियाच्या नावे खडे फोडत असतात. चांगली सेवा देतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

म्हणजे तुमचे असे म्हणने आहे का की रेल्वे म्हणजे नरक आहे आणि करोडो लोक दररोज टाचा घासत अशा नरकातुन प्रवास करतात? हा त्या करोडो लोकांचा अपमान नाही का?

In reply to by शार्दुल_हातोळकर

नाय नाय. माझे म्हणणे आहे की रेल्वे म्हणजे स्वर्ग आहे पण खासदार साहेबांना तो नरक वाटतो. त्यांनी स्वतःच तसे सांगितले मला.

In reply to by शार्दुल_हातोळकर

करोडो लोक नाहित , पण लाखो तर नक्कीच करतात. एकदा मुंबईच्या लोकल प्रवासात अनुभव घेउन बघा अर्थात त्यामागची कारणे वेगळी असली तरी ५ वा अन ६ वा ट्रॅक सुरु व्हायला लागलेला वेळ जीवघेणा आहे

In reply to by अप्पा जोगळेकर

खरे तर या मूर्ख, उद्दाम माणसाला रेल्वेबंदी सुद्धा झाली पाहिजे.
असेच म्हणतो एका ऑनलाइन लेखात खालचा पॅरा वाचून फार हसू आले -
One only hopes that the airlines which have blacklisted Gaikwad continue to do so, for at least a year, if not longer. And, as several twitterati have indulged in wishful thinking, if the Indian Railways bans him too, he will really have to put his chappals to the use they are actually meant for — walking!
:D :D