✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अ
अत्रे यांनी
Mon, 03/27/2017 - 11:04  ·  लेख
लेख
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
94900 वाचन

💬 प्रतिसाद (592)

प्रतिक्रिया

इथे तर लिहिलंय की

श्रीगुरुजी
Tue, 03/28/2017 - 20:54 नवीन
इथे तर लिहिलंय की "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे दिल्ल्रीत दाखल झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना पुन्हा वेग आला आहे. नारायण राणे यांनी मंगळवारी भाजप नेत्यांशी चर्चा केली असून असून केंद्रात काम करण्याची इच्छा दर्शवल्याची माहितीदेखील विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. ". राणेंना पक्षात घेणे हे भाजपसाठी आत्मघात करण्यासारखे ठरेल. राणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव अत्यंत उपद्रवी, अत्यंत महत्त्वाकांशी व अत्यंत आक्रमक आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठी राणे अत्यंत कासावीस झालेले आहेत. ते भाजपत आले तर ते पहिला सुरूंग फडणविसांच्या खुर्चीखाली लावतील.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

हे पहा -

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 03/28/2017 - 21:24 नवीन
हे पहा - https://youtu.be/07fINMNr-VY
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माफी मागायची ओडून असले बंद

अभ्या..
Mon, 03/27/2017 - 15:20 नवीन
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
तुम्हाला वाटत नसेल पण आहे. भरपूर आहे. सामान्यातून वर आलेलेच लोक आहेत हे. अरेरावीला अरेरावीनेच उत्तर दिलेले कळते अन अशा लढणार्‍या लोकांना सहानूभूतीच नव्हे तर फुल्ल पाठिंबा आहे. अन मोदी लाट बिट कै नै. लढाऊ वृत्तीने अन चांगल्या जनसंपर्काने निवडून आलेले हे लोक आहेत. राष्ट्रवादी अन कॉग्रेसच्या दडपशाही अन पैशाच्या राजकारणाला सेनेने अन सेनेच्याच पध्दतीने स्व. गोपीनाथरावांनी मराठवाड्यात लढा दिलेला आहे. त्या परंपरेतले आहेत. उस्मानाबाद मतदारसंघ हा मोठा आहे, त्यात सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुका पण आहे. आता बार्शीतला सेनेचा आमदार व्हाया कॉग्रेस बीजेपी करत अस्ल्याने बार्शीतला थोडाफार विरोध वगळता सर्वत्र प्रा. रविसरांना फुल्ल पाठिंबा आहे.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
मी त्यांच्याच मतदरसंघातला आहे, आता हे सगळं सांगितल्यावरही तुम्ही विश्वास ठेवणार आहात काय? का परत माणुसकी, संस्कार वगैरे कॅसेट चालू होणारे? तसेच ऐकीव बातम्यावर विसंबून राह्यचे असेल तर बिन्धास्त चघळत बसा..

धन्यवाद. मला फक्त लोकांची

अत्रे
Mon, 03/27/2017 - 15:29 नवीन
धन्यवाद. मला फक्त लोकांची भूमिका जाणून घ्यायची होती. जी कि या वाक्यातून कळाली
अरेरावीला अरेरावीनेच उत्तर दिलेले कळते अन अशा लढणार्‍या लोकांना सहानूभूतीच नव्हे तर फुल्ल पाठिंबा आहे
अरेरावी करणे आणि मारहाण करणे यातला फरक लोकांना कळाला पाहिजे! आणि झाली चूक तर माफी मागा ना! वर उद्दाम मपणे जर ते म्हणू लागले कि मी अमुक - तमुक आहे, घाबरत नाही, तर मग शिक्षा झालीच पाहिजे (होय कि नाही?)
आता हे सगळं सांगितल्यावरही तुम्ही विश्वास ठेवणार आहात काय?
कशावर विश्वास ठेवायचा ते कळले नाही.
↩ प्रतिसाद: अभ्या..

“Is he a terrorist that he

अत्रे
Mon, 03/27/2017 - 15:22 नवीन
“Is he a terrorist that he has been barred from flying by all airlines?” asks Shiv Sena district vice president Kamlakar Chavan
http://www.thehindu.com/news/national/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh/article17671421.ece?homepage=true कोणी चप्पल ने मारहाण करत असेल तर त्याला दहशतवादी का म्हणू नये? कर्मचाऱ्यांना त्याची दहशतच वाटेल ना?

मारहाण ही अयोग्य असली तरी

मराठी_माणूस
Mon, 03/27/2017 - 15:32 नवीन
मारहाण ही अयोग्य असली तरी कोणी त्या थराला का गेले ह्याची काही चौकशी वगैरे होणार की नाही ? त्या बद्दल काचीच समजले नाही . तसेच अजुन सगळे सत्य बाहेर यायच्या आधी बाकिच्या एअर लाइन्संनी असा परस्पर निर्णय कसा घेतला ?

कोणी त्या थराला का गेले

अत्रे
Mon, 03/27/2017 - 15:41 नवीन
कोणी त्या थराला का गेले ह्याची काही चौकशी वगैरे होणार की नाही ?
एखाद्याने बलात्कार केला तर तो का त्या थराला गेला याची लोक शहानिशा करतात का?
तसेच अजुन सगळे सत्य बाहेर यायच्या आधी बाकिच्या एअर लाइन्संनी असा परस्पर निर्णय कसा घेतला ?
त्यांनी (रवी "सर") व्हिडीओ मध्ये स्वत: कबुल केलाय, अजून काय पाहिजे? आणि एअर लाइन्संनी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना, कर्मचाऱ्यावर कोणीही उठून चप्पल मारत असेल तर अशा मानसिक संतुलन ढळणाऱ्या माणसाला विमानात ठेवणे हि सुरक्षेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. (at least until the case is closed)
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

बलात्कार गुन्हा फक्त

अत्रे
Mon, 03/27/2017 - 15:42 नवीन
बलात्कार गुन्हा फक्त उदाहरणादाखल वापरला. गैरसमज नको.
↩ प्रतिसाद: अत्रे

दिलेले उदाहरण इथे बसत नाही.

मराठी_माणूस
Mon, 03/27/2017 - 15:57 नवीन
दिलेले उदाहरण इथे बसत नाही.
↩ प्रतिसाद: अत्रे

उस्मानाबादेतून कोणी आहे का

विशुमित
Mon, 03/27/2017 - 15:45 नवीन
उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? असे विचारून धागा लेखकाला गायकवाड प्रकरणावरून उस्मानाबादच्या लोकांची मानसिकता (मुजोर आहेत का वगैरे) जाणून घायची दिसतंय असे प्रतीत झाले. राच्याकने धागा लेखक पुण्याचे आहेत का? PMPL च्या कंडक्टरला पण चामड्याच्या बुटाने मारायची इच्छा होते पण आम्ही खासदार नाही आहोत ना, ते पण शिवसेनेचे..!!

असे विचारून धागा लेखकाला

अत्रे
Mon, 03/27/2017 - 15:55 नवीन
असे विचारून धागा लेखकाला गायकवाड प्रकरणावरून उस्मानाबादच्या लोकांची मानसिकता (मुजोर आहेत का वगैरे) जाणून घायची दिसतंय असे प्रतीत झाले.
माफ करा. असा हेतू नव्हता. मला वाटत होते कि वृत्त माध्यमांनी उस्मानाबादला जाऊन त्यांना मत देणार्यला लोकांना प्रतिक्रिया विचारायला पाहिजे होती. सकाळी उठून सकाळ ची लोकल एडिशन चेक केली कुठेच काहीच बातमी नाही. म्हणून म्हटलं मिपा वर विचारावं. अनेकदा आपण मतदार नको त्या लोकांना निवडून देतो. अशा वेळी त्यांनी काही दुष्कर्म केले तर त्या बाबतीत त्यांच्या मतदारांची मते काय असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण हेच लोक उद्या जाऊन अशाच लोकांना निवडून आणतील. मतदारांना विचार करायला लावणारे असे प्रश्न वृत्त माध्यमांनी डायरेक्ट विचारले पाहिजेत असे मला वाटते. उस्मानाबादच्या लोकांशी भांडायचे म्हणून धागा काढला नाही.
राच्याकने धागा लेखक पुण्याचे आहेत का?
हा हा, नाही मी औरंगाबादचा.
PMPL च्या कंडक्टरला पण चामड्याच्या बुटाने मारायची इच्छा होते पण आम्ही खासदार नाही आहोत ना, ते पण शिवसेनेचे..!!
लोल
↩ प्रतिसाद: विशुमित

हे अगदी त्या दिवशी मोठ्या

श्रीगुरुजी
Mon, 03/27/2017 - 15:56 नवीन
हे अगदी त्या दिवशी मोठ्या तोंडाने फुशारक्या मारत होते ही माझ्याकडे परतीचे ४ वाजताचे तिकीट आहे आणि मी ४ वाजता विमानातून जाणारच. बघतोच मला कोण अडवतो ते . . . पण जेव्हा प्रत्यक्ष प्रवासाची वेळ आली तेव्हा यांची तंतरली आणि गुपचूप आगगाडी पकडून घरी निघाले. आगगाडीत वार्ताहरांचा ससेमिरा टाळण्यासाठी मध्येच वापीला उतरून खाजगी मोटारीने मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत आल्यानंतर यांचा फोन बंद आहे आणि हे लपून बसले आहेत. माध्यमांसमोर यायचं यांचं धाडस नाही. प्रत्यक्ष महाराष्ट्रात वाघाच्या काळज्याच्या शूर, स्वाभिमानी मावळ्यांना फडतूस वार्ताहरांच्या भीतिने लपून रहायला लागतंय यापेक्षा अजून दुर्दैव ते काय? कोठे गेला तो वाघाचा पंजा? कोठे गेली ती दशदिशा दणाणून सोडणारी वाघाची गगनभेदी डरकाळी? कोठे गेली यांची वाघनखे, भाले, तलवारी, बरच्या, भाले, दांडपट्टे, खंजीर? खरं तर यांनी एअर इंडियावाल्यांच्या पोटात वाघनखे खुपसून त्यांचा कोथळा बाहेर काढायला हवा होता. नंतर त्यांच्या छाताडावर नाचून त्यांचे हात कलम करून गर्दन मारून त्यांचं थडगं महाराष्ट्राच्या भूमीत बांधायला हवं होतं. हे सगळं करायचं सोडून हे लपून बसलेत.

(No subject)

श्रीगुरुजी
Mon, 03/27/2017 - 16:45 नवीन
Image removed.

दुसरी बाजूही विचारात घ्यायला हवी

गामा पैलवान
Mon, 03/27/2017 - 17:22 नवीन
अत्रे, एअर इंडिया ऐन वेळेस विमान बदलते आणि प्रवाशास तक्रारही नोंदवू देत नाही. हा मुद्दा देखील चर्चिला जावा. तसेच रवींद्र गायकवाड शांतपणे आपली बाजू समजावून सांगत असतांना त्यांना अरेरावीने उलट उत्तरं करणाऱ्या व्यवस्थापकांवर कसली कारवाई व्हायला हवी यावरही चर्चा व्हावी. आ.न., -गा.पै.

गापै, हाच मुद्दा सांगण्याचा

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 03/27/2017 - 17:30 नवीन
गापै, हाच मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतोय. एअर इंडियाला सहानुभूती आणि आधीपासूनच असलेला सगळं राग रवी गायकवाडांवर आणि पर्यायाने शिवसेनेवर काढणे पटत नाही.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

एअर इंडियाला सहानुभूती आणि

अभ्या..
Mon, 03/27/2017 - 18:00 नवीन
एअर इंडियाला सहानुभूती आणि आधीपासूनच असलेला सगळं राग रवी गायकवाडांवर आणि पर्यायाने शिवसेनेवर काढणे पटत नाही.
परफेक्ट, अगदी हेच चाललंय सुरुवातीपासून. आणि मूळ प्रकरण काय झाले ते अजूनही पूर्ण्पणे क्लीअर नाही, आक्रमकपणे सरब्त्ती करणार्‍या वृत्तसंस्थांना दिलेल्या बाईटसवरुन अंदाधुंद अंदाज बांधत गेम करायचा प्रयत्न क्लीअरकट दिसतोय. ज्यापध्दतीने भाजपेयांकडून 'आमच्या सोबत गुमान राहा नाहीतर असे करण्यात येईल' अशी दडपशाही चाललीय त्यावरुन सेनेच्या राडेबाजीपेक्षा असली दडपशाही जास्त त्रासदायक होत राहणार हे निश्चित.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

>>> मूळ प्रकरण काय झाले ते

श्रीगुरुजी
Mon, 03/27/2017 - 20:35 नवीन
>>> मूळ प्रकरण काय झाले ते अजूनही पूर्ण्पणे क्लीअर नाही, क्लिअर नसेल तर गायकवाडने क्यामेऱ्यासमोर ज्या फुशारक्या मारल्या, त्यावरच विसंबून राहून प्रतिक्रिया येणार. एकतर गायकवाडने नक्की काय घडले ते पुढे येउन सांगावे, नाहीतर त्याने ज्या फुशारक्या मारल्या त्या खऱ्या धरून त्यानुसारच प्रतिक्रिया येणार. परंतु गायकवाड लपून बसला आहे. त्यामुळेच त्याला व शिवसेनेला टीका ऐकून घेणे भाग आहे. मी यांव केलं, मी त्यांव केलं अशा बढाया मारायच्या, प्रतिक्रिया यायला लागल्या की घाबरून लपायचं आणि आमच्यावर आधी पासून असलेला राग काढला जातोय असा कांगावाही करायचा।
↩ प्रतिसाद: अभ्या..

खासदारांनी फुशारक्या मारल्या

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 03/27/2017 - 21:11 नवीन
खासदारांनी फुशारक्या मारल्या हे तर उघड सत्य आहे. चप्पलने 25 वेळेला मारहाण झाली असेल अजिबात वाटत नाही. खासदारांची झालेली बदनामी हि मुख्यत्वे त्यांच्या बेजबाबदार फुशरक्यांमुळेच झाली आहे. पण म्हणून लगेच हि संधी आहे, घ्या उखळ पांढरे करून अशी अत्यंत अजेंडायुक्त भूमिका समर्थनीय असू शकते का? त्यांनी खरेच मारले कि नाही ह्याच्याशी काहीही देणे घेणे नाही, त्यांनी तसे म्हटले हेच महत्वाचे आहे आणि त्यांच्याविरुद्ध वापरण्यासारखे आहे.आणि कारण स्पष्ट आहे - ते शिवसेनेचे आहेत. उद्या त्यांनी खूप मोठा विकास केल्याच्या फुशारक्या मारल्या तर त्यावेळी त्या परिस्थती जाणून न घेता खऱ्या मानल्या नाही म्हणजे मिळवली. तरी बरं तो विडिओ आहे म्हणून नाहीतर उचलून फेकून दिलंच होतं असेच हे प्रकरण बाहेर आले असते. आणि खासदारांनी लपून बसावं कि गावभर फिरावं हा त्यांचा, त्यांच्या पक्षाच्या आदेशाचा आणि त्यांच्या वकिलांचा प्रश्न आहे. पण विरोधच करायचा असेल तर कुठलेही मुद्दे पुरतात. तो विडिओ शांतपणे पाहावा, कितीवेळा त्यात खासदारांना शिव्या देण्यात आल्या आहेत ते ऐकता येईल. इसको अंदरही मारते है, मुंह फोड देते है किसिको क्या पता चलेगा अशा आशयाची वाक्ये ऐकू येत आहेत. त्यांनी कुठल्याही कारणाने केलेली मारहाण हि निंदनियच आहे आणि शिवाय तो गुन्हाही आहे. कायदेशीर कारवाई पार पडेलच पण लगेच हि संधी सोडायची नाही म्हणून तुटून पडायचं, विमान कंपनीच्या गलथानपणाबद्दल, अरेरावीबद्दल, आणि अपमानास्पद वागणुकीबद्दल काहीही शब्द काढायचा नाही हे वागणं दुटप्पीपणाचं आणि खोट्या मुखवट्याचं आहे असे मला वाटते.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

इसको अंदरही मारते है, मुंह

अभ्या..
Mon, 03/27/2017 - 21:27 नवीन
इसको अंदरही मारते है, मुंह फोड देते है किसिको क्या पता चलेगा अशा आशयाची वाक्ये ऐकू येत आहेत.
आं तिज्यायला. असले भुरटे एअर इंड्यात असले तर मग लै भारी झाले हाणले ते. दिल्लीत हाणले असल्या मुजोरांना. लैच भारी.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

http://zeenews.india.com

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 03/27/2017 - 21:35 नवीन
http://zeenews.india.com/marathi/news/india/mp-ravi-gaikwad-and-air-india-video-clip-dialogue/३५८०८० घ्या तुमी बी बघून घ्या! हे समर्थक, भक्त, भाट शिक्के काही बोलण्याची सोयच ठेवत नाहीत! बेक्कार वाटतं हो!
↩ प्रतिसाद: अभ्या..

>>> पण म्हणून लगेच हि संधी

श्रीगुरुजी
Mon, 03/27/2017 - 23:17 नवीन
>>> पण म्हणून लगेच हि संधी आहे, घ्या उखळ पांढरे करून अशी अत्यंत अजेंडायुक्त भूमिका समर्थनीय असू शकते का? शिवसेना अशी संधी वारंवार देते. विरोधकांना अशी संधी मिळू नये असे वाटत असेल तर सेना नेत्यांनी इतरांविषयी गलिच्छ बरळणे व बढाया मारणे थांबवायला हवे. >>> त्यांनी खरेच मारले कि नाही ह्याच्याशी काहीही देणे घेणे नाही, त्यांनी तसे म्हटले हेच महत्वाचे आहे आणि त्यांच्याविरुद्ध वापरण्यासारखे आहे.आणि कारण स्पष्ट आहे - ते शिवसेनेचे आहेत. उद्या त्यांनी खूप मोठा विकास केल्याच्या फुशारक्या मारल्या तर त्यावेळी त्या परिस्थती जाणून न घेता खऱ्या मानल्या नाही म्हणजे मिळवली. शिवसेना आणि विकास या परस्परविरोधी गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या फुशारक्यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. >>> तरी बरं तो विडिओ आहे म्हणून नाहीतर उचलून फेकून दिलंच होतं असेच हे प्रकरण बाहेर आले असते. आणि खासदारांनी लपून बसावं कि गावभर फिरावं हा त्यांचा, त्यांच्या पक्षाच्या आदेशाचा आणि त्यांच्या वकिलांचा प्रश्न आहे. पण विरोधच करायचा असेल तर कुठलेही मुद्दे पुरतात. त्यांच्या फुशारक्यांमुळेच हे प्रकरण पेटले. लपूनच बसायचं होतं तर 'बघू मला कोण अडवतो' असला पोकळ स्वाभिमान दाखविण्याची गरज नव्हती.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

ओके. तुमची वैयक्तिक मते आहेत

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 03/27/2017 - 23:26 नवीन
ओके. तुमची वैयक्तिक मते आहेत आणि त्याचा आदर आहे. पण त्याने परिस्थिती बदलत नाही. मोठ्या थाटात लावलेला नो फ्लाय कायम ठेवून दाखवावा नाहीतर लोक त्याला विमान कंपन्यांचा पोकळ स्वाभिमान म्हणायचे.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

नो फ्लाय पुढील काही दिवसातच

श्रीगुरुजी
Mon, 03/27/2017 - 23:47 नवीन
नो फ्लाय पुढील काही दिवसातच रद्द होईल असा अंदाज आहे. निदान एका फ्लाईटसाठी तरी खासदारावर बंदी आली हेही नसे थोडके. निदान भविष्यात तरी सेना नेते सभ्य वागतील अशी आशा आहे. अर्थात नो फ्लाय रद्द झाला तर हा शूर मावळ्यांचा विजय आहे अशा सेनेने बढाया मारल्या तर मात्र अवघड आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

संपादक मंडळी इकडेही लक्ष द्या!

शार्दुल_हातोळकर
Mon, 03/27/2017 - 23:53 नवीन
बाकी काही असो, पण लोकनियुक्त संसद सदस्याबद्दल अशी एकेरी आणि आक्षेपार्ह भाषा मिपाच्या नियमात बसते का? (आणि तीही प्रकरणाची सखोल माहिती नसताना) जर बसत नसेल तर असे प्रतिसाद तात्काळ काढुन टाकणे हे संभाव्य वादविवाद टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे !!
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

पण लोकनियुक्त संसद

अप्पा जोगळेकर
Tue, 03/28/2017 - 14:11 नवीन
पण लोकनियुक्त संसद सदस्याबद्दल अशी एकेरी आणि आक्षेपार्ह भाषा इथे कोणी शिवीगाळ केली आहे का ? रविंद्र गायकवाड हा दीड दमडीचा बिनडोक माणूस आहे. तो कोण आहे हे त्याचा मतदारसंघ सोडून आताआतापर्यंत कोणाला माहितसुद्धा नव्हते.
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

तुम्हाला किती लोकसभा सदस्यांची माहिती आहे?

शार्दुल_हातोळकर
Tue, 03/28/2017 - 22:44 नवीन
भारतात ५४५ लोकसभा सदस्य आहेत. तुम्हाला त्यापैकी किती लोकसभा सदस्यांची माहिती आहे? लोकसभा सदस्य त्यांच्या मतदारसंघात माहिती असले म्हणजे पुरेसे आहे. आणि या धाग्यावर वापरलेले "मूर्ख", "दीडदमडीचा", "बिनडोक", वगैरे तुमच्या दृष्टीकोनातून शिवीगाळ नसून भूषणावह शब्द आहेत काय? शिवाय मी माझा आक्षेप अयोग्य भाषेबद्दलच नोंदवला होता, तुम्ही त्याला सोयीस्कररित्या बगल देऊन पुन्हा अयोग्य भाषा वापरली. अत्यंत खेदाने असे म्हणावे लागत आहे की मांडायला योग्य आणि संतुलित मुद्दे नसतील तर भाषा गलिच्छपणाकडे वळते. पण त्याने वस्तुस्थिती बदलत नसते.
↩ प्रतिसाद: अप्पा जोगळेकर

त्यांच्या भाषेच्या

विशुमित
Wed, 03/29/2017 - 12:20 नवीन
त्यांच्या भाषेच्या खजिन्यामध्ये " भिकारी " हा शब्द पण ऍड करा. जाम आवडतो त्यांना हा भूषणावह शब्द.
↩ प्रतिसाद: शार्दुल_हातोळकर

एअर इंडिया ने....

mayu4u
Mon, 03/27/2017 - 18:38 नवीन
... विमानात बिझनेस कल्लास नसल्याची पूर्वसूचना दिली होती, असे वाचल्याचे स्मरते. गायकवाड यांनी स्वत:च्या वागण्याचे समर्थन करण्या ऐवजी क्षमा मागायला हवी होती, असे माझे मत.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

छे छे भलतेच काहीतरी

गॅरी ट्रुमन
Mon, 03/27/2017 - 19:44 नवीन
गायकवाड यांनी स्वत:च्या वागण्याचे समर्थन करण्या ऐवजी क्षमा मागायला हवी होती, असे माझे मत.
क्षमा? छे छे भलतेच काहीतरी. शिवसेनेचा खासदार म्हणजे सद्गुणांचा पुतळा.त्याने काहीही केले तरी ते बरोबरच कसे असते, इतरांमुळेच ही वेळ कशी आली इत्यादी गोष्टी बोलायच्या असतात. आणि कोणाची बिशाद शिवसेनेच्या खासदाराच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करेल???? तसे प्रश्नचिन्ह उभे करणारा प्रत्येक माणूस भाजपेयीच असतो आणि फॅसिस्ट मोदींच्या राज्यात इतर सर्वांची दडपशाही कशी चालते ते दर्शविणारा असतो. काय म्हणता?
↩ प्रतिसाद: mayu4u

लोळ!

mayu4u
गुरुवार, 03/30/2017 - 10:10 नवीन
नुसताच नाही, कल्लोळ!
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

एअर इंडिया ऐन वेळेस विमान बदलते आणि प्रवाशास तक्रारही नोंदवू देत

कुंदन
Mon, 03/27/2017 - 22:41 नवीन
याच न्यायाने सामान्य जनता जर रेल्वे बाबत वागु लागली तर अराजक माजायला वेळ लागेलसे वाटत नाही.
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

http://maharashtratimes

अत्रे
Mon, 03/27/2017 - 19:49 नवीन
http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/sena-mp-ravindra-gaikwad-may-soon-fly-again-rules-may-change/articleshow/57857135.cms
नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि शिवसेनेचे खासदार यांच्यात सुमारे पाऊण तास झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
अरेरे, या सभ्य वेशातील गुंडाला लोकसभेतून हाकलून देण्याचे सोडून हे लोक काय करत आहेत! एअर इंडिया वाल्यानी संपावर जावे.

रोचक

अनुप ढेरे
Mon, 03/27/2017 - 20:14 नवीन
एका धाग्यावर भाजपा समर्थक फडणवीसांना नावं ठेवत आहेत चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आणि दुसरीकडे शिवसेना समर्थक एका खासदाराने सरकारी कर्मचार्‍याला झोडपण्याचं समर्थन करत आहेत. भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.

केजरूके गुलामच्या धर्तीवर नवा शब्द शोधून काढायला हवा आता :)

गॅरी ट्रुमन
Mon, 03/27/2017 - 20:23 नवीन
भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.
बहुतांश वेळी हेच बघायला मिळते. आणि शिवसेनेच्या त्या खासदाराच्या त्या कृत्याचे निर्लज्जपणे समर्थन करणारेच भाजप समर्थकांना मोदीभक्त म्हणतात हा अजून एक मोठा विनोद!! केजरूके गुलामच्या धर्तीवर नवा शब्द शोधून काढायला हवा आता :)
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

मला वैयक्तिकरित्या भक्त

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 03/27/2017 - 20:33 नवीन
मला वैयक्तिकरित्या भक्त मंडळींपेक्षा अंध विरोधकांची जास्त कीव येते. दिसले मोदी, करा विरोध, दिसली शिवसेना, करा विरोध, दिसली काँग्रेस करा विरोध! मग सत्यता काय याच्याशी काहीही देणेघेणे नाही. जे गायकवाडांना शिव्या घालण्यात जराही वेळ दवडत नाहीयेत ते विमान कंपनीबाबत चकार शब्दही काढत नाहीयेत कसे याचे वैषम्य वाटते...असो!
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

काही मुद्दे

गॅरी ट्रुमन
Mon, 03/27/2017 - 21:11 नवीन
जे गायकवाडांना शिव्या घालण्यात जराही वेळ दवडत नाहीयेत ते विमान कंपनीबाबत चकार शब्दही काढत नाहीयेत कसे याचे वैषम्य वाटते...असो!
काही मुद्दे-- १. विमानकंपन्यांचा ढिसाळ कारभार वगैरे पेंग्विनसेना समर्थकांची पश्चातबुद्दी आहे. पेंग्विनसेनेच्या लहानमोठ्या पदाधिकार्‍यांनी याला ठोकला, त्याला थोबडावला अशा घटना गेल्या ५० वर्षात अनेकवेळा घडलेल्या आहेत. यावेळी असे थोबडावणारा खासदार असल्यामुळे आरडाओरडा बराच जास्त झाला. तेव्हा त्याचे काहीतरी रॅशनलायझेशन करायला म्हणून विमानकंपन्यांचा कारभार वगैरे गोष्टी आणल्या जात आहेत हे आम्हाला समजत नाही असे अजिबात नाही. २. बरं विमानकंपन्यांचा कारभार ढिसाळ होता/आहे हे मान्य केले तरी त्याविषयी पेंग्विनसेनेने यापूर्वी कधी आवाज उठवला होता असे फार कधी (किंवा कधीच) ऐकिवात आलेले नव्हते. मग विमानकंपन्यांचा कारभार ढिसाळ आहे त्याविषयी आवाज उठवला पाहिजे हे नेमके आताच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) आठवणे म्हणजे विलक्षणच योगायोग झाला. ३. समजा विमानकंपनीचा कारभार ढिसाळ असेल तरी अशा कारभाराविरूध्द नियमाप्रमाणे तक्रार करायचे मार्ग (तक्रारपुस्तिका वगैरे) असतात. गेलाबाजार ग्राहक न्यायालयाकडेही जाता येतेच. असे सामान्य माणसांनी करून चांगली घसघशीत नुकसानभरपाई पदरात पाडून घेतली आहे अशा बातम्या कधी पेपरात वाचल्या नाहीत का? एक खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून नियमांचे आणि कायद्याचे पावित्र्य जपायची जबाबदारी गायकवाडांवर जास्त होती. सामान्य माणसाचा अशाप्रसंगी तोल सुटणे समजू शकतो पण खासदाराकडून असे होणे अगदी पूर्ण अमान्य. लोकप्रतिनिधी म्हणून अधिक जबाबदारीचे वर्तन गायकवाडांकडून अपेक्षित होते. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे याविरूध्द आवाज उठवायचे सामान्य माणसाकडे असतात त्यापेक्षा अधिक मार्गही उपलब्ध होते (लोकसभेत आवाज उठवणे वगैरे). त्या मार्गांचा वापर त्यांनी करणे नक्कीच अपेक्षित होते. जर खासदाराला "अशी" वागणूक मिळते तर सामान्य माणसाला कशी वागणूक मिळत असेल हा मुद्दा त्यांनी लोकसभेत मांडला असता तर त्याचा नक्कीच अधिक चांगला उपयोग झाला असता. लोकांचेही मोठे समर्थन त्यांना मिळाले असते. परत एकदा-- एक खासदार म्हणून असे जबाबदारीचे वर्तन त्यांनी करावे ही अपेक्षा सामान्य माणसापेक्षा कितीतरी जास्त. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण १९८६ मध्ये काँग्रेसचे इंदूरचे खासदार प्रकाशचंद्र सेठी (आणीबाणीत मंत्रीपदे भूषवून बदनाम झालेले) यांनीही मुंबईला ट्रंक कॉल बराच वेळ मिळाला नव्हता म्हणून टेलिफोन एक्स्चेंजमध्ये जाऊन गोंधळ घातला होता. सेठींनी घातलेला गोंधळ अधिक मोठ्या प्रमाणावर होता (बरोबर बंदूक घेऊन जाणे, टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नासधूस करणे वगैरे). पण १९८० च्या दशकात सरकारी टेलिफोन कंपनीचा कारभार २०१७ मध्ये विमान कंपन्यांच्या कारभारापेक्षा कित्येक पटींनी जास्त भोंगळ होता. तरीही सेठी आणि गायकवाड यांच्या कृत्याची पार्श्वभूमी आणि एकंदरीत स्वरूप सारखेच. आणि दोन कंपन्यांचा भोंगळ कारभार आणि त्याला दोन खासदारांचे उत्तर यांचे गुणोत्तर कदाचित सारखेच येईल!! जर प्रकाशचंद्र सेठींच्या कृत्याची देशभरातून निंदा झाली असेल तर गायकवाडांना वेगळी वागणूक द्यायचे अजिबात कारण नाही. ४. समजा विमानकंपनीचा कारभार ढिसाळ असेल, तसा अनुभव गायकवाडांना आला असेल तरी २०-२५ वेळा चपलेने मारणे ही त्या मानाने कित्येक पटींनी जास्त मोठी प्रतिक्रिया झाली नाही का? त्यातूनच कंपनीचा ढिसाळ कारभार हा मुद्दा मागे पडून गायकवाडांच्या कृत्यावरतीच सगळे लक्ष केंद्रित होणे अगदीच स्वाभाविक आहे.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

प्रतिसाद वाचतोच आहे, पण

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 03/27/2017 - 21:15 नवीन
प्रतिसाद वाचतोच आहे, पण तोपर्यंत तुम्ही मला पेंग्विनसेना समर्थक वगैरे समजत असाल तर... खेदाने नमूद करतो गैरसमज दूर करावा. तुम्हाला मागे कोणीतरी भक्त म्हटले होते तेव्हा तुम्हाला काय फीलिंग आली असेल ते जाणवले.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

गैरसमज

गॅरी ट्रुमन
Mon, 03/27/2017 - 21:21 नवीन
पण तोपर्यंत तुम्ही मला पेंग्विनसेना समर्थक वगैरे समजत असाल तर... खेदाने नमूद करतो गैरसमज दूर करावा.
विमानकंपन्यांचा कारभार हा मुद्दा आणणारे तुम्ही एकटेच नाहीत. बाकी गैरसमज वगैरे अजिबात नाही. तरीही माझ्या प्रतिसादावरून मला तुम्ही पेंग्विनसेना समर्थक आहात असे म्हणायचे आहे असे वाटल्यास तसे नाही. त्याबद्दल दिलगिरी. प्रतिसादातच 'हे जनरल वक्तव्य करत आहे' असे लिहायला हवे होते.
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

१९८4 मध्ये Hanover मधून

श्रीगुरुजी
Mon, 03/27/2017 - 23:54 नवीन
१९८4 मध्ये Hanover मधून मुंबईत येणाऱ्या एका विमानात तत्कालीन मंत्री रामराव आदिक यांनी शिवास रीगलच्या नशेत हवाईसुंदरीशी गैरवर्तन केल्याने त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. अगदी मागील वर्षी मुंबई हून पुण्याला येताना कन्हैयाकुमारचे सहप्रवाशाशी किरकोळ भांडण झाल्यानंतर जेट ने दोन्ही प्रवाशांना बाहेर काढले होते.
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

>>> जे गायकवाडांना शिव्या

श्रीगुरुजी
Mon, 03/27/2017 - 23:00 नवीन
>>> जे गायकवाडांना शिव्या घालण्यात जराही वेळ दवडत नाहीयेत ते विमान कंपनीबाबत चकार शब्दही काढत नाहीयेत कसे याचे वैषम्य वाटते...असो! या विशिष्ट प्रकरणात विमान कंपनीची नक्की काय चूक होती?
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

परत एकदा विनंती आहे, आपण

हतोळकरांचा प्रसाद
Mon, 03/27/2017 - 23:08 नवीन
परत एकदा विनंती आहे, आपण याप्रकरणाची नीट माहिती घ्यावी. मी वरच एक दोन लिंका टाकल्या आहेत त्याही बघून घ्या.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मला वैयक्तिकरित्या भक्त

मोदक
Mon, 03/27/2017 - 23:07 नवीन
मला वैयक्तिकरित्या भक्त मंडळींपेक्षा अंध विरोधकांची जास्त कीव येते. दिसले मोदी, करा विरोध, दिसली शिवसेना, करा विरोध, दिसली काँग्रेस करा विरोध! मग सत्यता काय याच्याशी काहीही देणेघेणे नाही. मलाही पूर्वी कीव येत होती पण दुर्लक्ष केले की "उत्तरे नाहीत म्हणजे आंम्हीच बरोबर" आणि उत्तरे दिली की "बघा बघा हल्ले करत आहेत" अशी सोयीस्कर कोल्हेकुई ऐकून कंटाळा आला मग त्यांच्याच प्रतिसादपद्धतीनुसार प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. आता अंधविरोधकांचे "सोयीस्कर निवृत्ती पर्व" सुरू आहे. :)
↩ प्रतिसाद: हतोळकरांचा प्रसाद

समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून

अभ्या..
Mon, 03/27/2017 - 20:39 नवीन
समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून घ्यायची लाज नाही हो, पण भक्तीला भाटगिरी बनवून राजकारण आणि समाजकारण तज्ञ आणि तथाकथित उच्चशिक्षीत विचारजंती बुरख्यामागे दडवून दाखवली जाते त्याचे जास्त वाईट वाटते.
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

१००% सहमत !!

शार्दुल_हातोळकर
Mon, 03/27/2017 - 23:43 नवीन
आणि वर असे लोक लिहिण्याच्या भरात भाषेची पातळी प्रचंड घसरुन एकेरी उल्लेख करण्यापर्यंत घसरली हे सुद्धा ध्यानात घेत नाहीत. ज्यांंना स्वतःच्या राहत्या मतदारसंघातील स्थितीचेदेखील काडीइतकेही ज्ञान नाही तेही बिनधास्त गलिच्छ आणि आक्षेपार्ह प्रतिक्रिया तज्ञाच्या थाटात लिहित असतात.....
↩ प्रतिसाद: अभ्या..

+11111

विशुमित
Wed, 03/29/2017 - 12:26 नवीन
अय्योय... कसलं जब्राट वाक्य आहे हे "अभ्या" शेठ...!!
↩ प्रतिसाद: अभ्या..

एका धाग्यावर भाजपा समर्थक

मोदक
Mon, 03/27/2017 - 22:59 नवीन
एका धाग्यावर भाजपा समर्थक फडणवीसांना नावं ठेवत आहेत चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आणि दुसरीकडे शिवसेना समर्थक एका खासदाराने सरकारी कर्मचार्‍याला झोडपण्याचं समर्थन करत आहेत. भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे. :)
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

बरं, नक्की काय झालं आहे हे

यशोधरा
Mon, 03/27/2017 - 20:43 नवीन
बरं, नक्की काय झालं आहे हे कोणी वस्तुनिष्ठपणे सांगेल का? मारहाण करणे चुकीचे होते, असे मलाही वाटते. एअर इण्डियाच्या कर्मचार्‍याने चुकीची भाषा वापरली असेल ( असेल म्हणते कारण मला ठाऊक नाही, मी त्या बातम्या पाहिल्या नाहीत) तर तेही अत्यंत चुकीचे आहे पण हातापाईवर उतरण्यापेक्षा त्याची रीतसर तक्रार नोंदवता आली नसती का? एकदा लोकप्रतिनिधी म्हणून वावरायला लागल्यावर वागण्यामध्ये तोठे तारतम्य बाळगावयास नको का?

*थोडे

यशोधरा
Mon, 03/27/2017 - 20:44 नवीन
*थोडे
↩ प्रतिसाद: यशोधरा

बरं, नक्की काय झालं आहे हे

अत्रे
Tue, 03/28/2017 - 13:18 नवीन
बरं, नक्की काय झालं आहे हे कोणी वस्तुनिष्ठपणे सांगेल का?
The MP was flying from Pune to Delhi, and was entitled to free business class travel with our money, as all elected representatives are, but as Air India operated an aircraft which had no business class, Gaikwad had to travel economy — this, after the airline had explained it all to his political staff (read flunkeys who are at the service of our parliamentarians, again at our cost). After landing at Delhi, the MP refused to disembark and demanded an explanation. When the airline manager, a 60-year-old man, boarded the aircraft to explain to him why this had happened, Gaikwad slippered him.
सोर्स
↩ प्रतिसाद: यशोधरा

परत तेच होत आहे, स्वतःला आणि

हतोळकरांचा प्रसाद
Tue, 03/28/2017 - 15:06 नवीन
परत तेच होत आहे, स्वतःला आणि स्वतःच्या मताला योग्य वाटतील त्या बातम्या सांगायच्या, बाकीच्या सोडून द्यायच्या. यशोधारताई, खालील बातम्या दुसरी बाजू दाखवतात, जमल्यास ह्याही वाचा. http://www.loksatta.com/desh-videsh-news/raveendra-gaikwad-shivsena-mp-air-india-sukumar-air-hostess-1440530/ http://m.maharashtratimes.com/india-news/i-dont-think-he-wanted-to-throw-sukumar-down-the-ladder-he-was-trying-to-build-pressure-on-senior-officials-air-hostess/articleshow/57842144.cms https://youtu.be/gPQ55mRtTOA
↩ प्रतिसाद: अत्रे
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा