Skip to main content

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

लेखक अत्रे यांनी सोमवार, 27/03/2017 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-…) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

वाचने 95929
प्रतिक्रिया 592

प्रतिक्रिया

मी सुद्धा सोलापूरकरांना शोधतोय, सैनिकांच कौतुक करणाऱ्या त्या सुधाकर परिचारक विषयी विचारायचं.

या मूर्खाला कोणाही उस्मानाबाद करांचा अजिबात पाठिंबा नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी केवळ मोदींना पंतप्रधान करायचे म्हणून याला निवडून द्यावे लागले होते आणि हि याची पहिली आणि शेवटची टर्म. आणि काहीही झाले तरी नेत्यांचे चेले आणि त्या त्या पक्षाचे वेठबिगार बंद ची घोषणा करतातच, त्याला कोणीही भीक घालत नाही

In reply to by अत्रे

हे असे "मूर्ख" वगैरे विशेषणे वापरुन प्रतिसाद लिहिणे आणि त्यावर दुसऱ्या सभासदाने उघडपणे समाधान व्यक्त करणे इत्यादी मिपाच्या पॉलिसीजमधे मान्य आहे का?

In reply to by शार्दुल_हातोळकर

अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही हरामखोर म्हटले गेले आहे. मग मूर्ख वगैरे एकदम सामान्य गोष्टी आहेत.

In reply to by मोदक

मला इथे लक्षात येताच मी संपादकांच्या निदर्शनास आणुन देण्याचा प्रयत्न केला. पण एकुणच चर्चा ही निकोपच व्हायला हवी. गलिच्छ भाषा वापरणे फार काही अवघड नसते. शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म हाताशी मिळाला म्हणजे काहीही मनाला येईल ते आक्षेपार्ह भाषेत लिहिण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होत नाही!

In reply to by शार्दुल_हातोळकर

भाषेबद्दल जो निर्णय सम्पादक घेतील तो योग्यच असेल. पण लोकांना चपलेने मारणाऱ्या खासदारांना शब्दांचा मार तरी नागरिक म्हणून देता यावा.

In reply to by अत्रे

खाली "अभ्या..." यांनी दिलेल्या प्रतिसादात ते प्रस्तुत संसद सदस्यांच्या मतदारसंघातीलच आहेत हे सांगितले आहे आणि त्यांची मते स्पष्ट नमूद केली आहेत. यावरुन ग्राउंड लेव्हल वर प्रस्तुत संसद सदस्यांबद्दल तिथल्या लोकांचे साधारण मत काय आहे हे प्रतित होते. याउलट इथे वर "लोनली प्लॅनेट" या आयडीने आक्षेपार्ह भाषेत मत नोंदवताच तुम्ही प्रस्तुत आयडीची व्यक्ती उस्मानाबाद मतदारसंघातील आहे किंवा नाही हे न विचारताच "धन्यवाद. ऐकुन बरे वाटले" असे मत नोंदवले. यावरुन हे स्पष्ट दिसते आहे की केवळ उस्मानाबादच्या लोकांचे मत जाणुन घेणे हा तुमचा निस्पृह हेतु नव्हता तर तुमच्या मनात या प्रकरणाबद्दल पुर्वग्रहदुषित एकांगी भूमिका होती. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही त्या विमान प्रकरणाचे प्रत्यक्ष साक्षीदार नसताना आणि अधिकृतरित्या नक्की चुक कोणाची होती/कोणी कोणास भडकवुन प्रकरण या थरास नेले हे कळालेले नसताना, गलिच्छ आणि आक्षेपार्ह भाषेतील प्रतिसादास सहमती दाखवुन मोकळे झालात. उद्या विमान कंपनीच्या लोकांनी चुकीचे वर्तन करुन संसद सदस्याला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडल्याचे अधिकृतरित्या सिद्ध झाल्यास तुम्ही स्वतः इथे मिपावर आक्षेपार्ह भाषेबद्दल बिनशर्त माफी मागणार आहात काय? मिपाचा असा गैरवापर होणे अत्यंत चुकीचे आहे. अर्थात संपादक त्याबद्दल निर्णय घेतीलच!

In reply to by अत्रे

तुम्ही अत्यंत सोयिस्कररित्या मी वरच्या प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नाला बगल देत आहात. त्यापेक्षा स्पष्ट उत्तर द्याल तर बरे होईल.

In reply to by शार्दुल_हातोळकर

ते तर आहेच. असल्यांकडून माफीचीही नाही अन आभाराचीही अपेक्षा नाही. त्यांनी स्वतःच सांगितलेय. शाब्दिक राडा घालायसाठीच आहेत ते फक्त.

In reply to by शार्दुल_हातोळकर

ओके, देतो तर उत्तर. १. अभ्या यांच्या प्रतिसादाला पण मी उत्तर दिले होते, तो प्रतिसाद दुर्लक्षित केला नाही (पुन्हा वाचा). आणि लोन्ली प्लॅनेट यांच्या प्रतिसादात त्यांची म्हटले होते कि "याला निवडून द्यावे लागले" - वाचून मला वाटले कि हे ही तिकडचेच असतील. आणि मला "हे पुन्हा निवडून येणार नाहीत" हे ऐकून आनंद झाला होता - नुसतं "मूर्ख" वाचून नाही. २.
उद्या विमान कंपनीच्या लोकांनी चुकीचे वर्तन करुन संसद सदस्याला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडल्याचे अधिकृतरित्या सिद्ध झाल्यास तुम्ही स्वतः इथे मिपावर आक्षेपार्ह भाषेबद्दल बिनशर्त माफी मागणार आहात काय?
त्याचं कसंय.. मी हे मुळीच मनात नाही कि कोणी शिवीगाळ केली तरी आपल्याला शारीरिक मारहाण करण्याचा अधिकार नसतो. हे तुम्हाला मान्य आहे का - हो कि नाही - हे सांगा. आणि केली मारहाण तर माफी ही मागितलीच पाहिजे. हे तुम्हाला मान्य आहे का - हो कि नाही - हे सांगा. ३. समजा उद्या सिद्ध झाले कि एअर इंडिया वाल्यांनी त्यांना आधी शारीरिक मारहाण केली होती - तर मी स्वतःहून असे नमूद कारेन कि वृत्त माध्यमांनी पूर्ण चित्र दाखवले नाही. पण मी वापरलेले "चप्पलमार" वगैरे शब्द मग मी एअर इंडिया वाल्याना पण वापरेन - पण म्हणून गायकवाड यांना सूट देण्यात काहीच बरोबर नाही. माझा राग यावर आहे कि गायकवाड माफी न मागता नाक वर करून फुशारकी करतात.

In reply to by अत्रे

टायपिंग मिस्टेक - "अधिकार असतो" - असे वाचा. थोडक्यात चप्पलमार माणसाला चप्पलमार म्हणण्याबद्दल माफी कसली मागायची? पण त्यांना शारीरिक मारहाण झाल्याचे सिद्ध झाल्यास एवढे मान्य कारेन की चूक एकट्याची नव्हती.

In reply to by अत्रे

अत्रे साहेब, माझा मुळ आक्षेप अयोग्य आणि एकेरी भाषेबद्दल होता हे मी अगदी स्पष्टपणे मांडलेले आहे. लोनली प्लॅनेट यांच्या प्रतिसादात तुम्हाला लोकनियुक्त संसद सदस्याबद्दलची एकेरी आणि अपमानास्पद भाषा आक्षेपार्ह वाटली नाही का? शिवाय खाली तुम्ही औरंगाबादचे आहात असे नमूद केले आहे आणि उस्मानाबादच्या लोकांना विचारताय म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रस्तुत संसद सदस्यांच्या मतदारसंघाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल तसेच लोकसंपर्काबद्दल अजिबात माहिती नाही हे स्पष्ट दिसते आहे. मग अशा स्थितीत तुम्ही लोनली प्लॅनेट यांच्या संपुर्ण प्रतिसादाशी उपलब्ध माहितीची कुठलीही पडताळणी न करता सहमत कसे काय झालात नव्हे उघड उघड आनंद व्यक्त कसा केलात? शिवाय तुम्ही म्हणताय की माफी न मागता एवढेच मान्य करेन की चुक एकट्याची नव्हती. अत्रे साहेब हे जगजाहीर आहे की टाळी कधी एका हाताने वाजत नसते. त्यासाठी असा स्वतंत्र धागा काढण्याची काही आवश्यकता नव्हती. शिवाय संबंधित आक्षेपार्ह प्रतिसादाला सहमती दर्शविणे म्हणजे त्या लोकसभा मतदारसंघातील त्यांना निवडुन देणाऱ्या १०-१२ लाख लोकांना तुम्ही नक्की काय समजत आहात? (जरा शोधुन पाहा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ उस्मानाबाद, सोलापुर आणि लातुर या तीन जिल्ह्यात विखुरलेला आहे, मग अशा ठिकाणी निवडुन येणे किती अवघड असेल ते)

In reply to by शार्दुल_हातोळकर

तुम्ही आधी माझ्या दोन हो कि नाही प्रश्नाचे (वरती बघा) उत्तर द्या, मग या प्रतिसादाचे उत्तर देतो.

In reply to by अत्रे

माझी मते स्पष्ट आहेत. मारहाण करणे हे कायद्याच्या दृष्टीकोनातुन चुकच. मी त्या गोष्टीचे कुठेही समर्थन केलेले नाही. पण तुम्ही या संपुर्ण प्रकाराची सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. शिवाय विमान कंपनीच्या लोकांच्या वर्तनाबद्दल तुम्ही तुमचे म्हणने मांडलेले नाही. या धाग्यावर देखील काही व्हिडिओ च्या लिंक्स दिल्या गेल्या आहेत तसेच काल मराठी न्युज चॅनेलवर पाहण्यात आले की विमान कंपनीच्या लोकांचे वर्तन कसे चुकीचे होते आणि त्यामुळेच ठिणगी पडुन संसद सदस्यांनी कठोर भुमिका घेतली. तुम्ही याबाबतीत updated नाही आहात काय? शिवाय संसद सदस्यांनी माफी मागावी की नाही हे माझ्या अखत्यारित नाही, तसेच तत्वतः माफी मागायला हवी की नाही ते मा. न्यायालयाच्या निकालानंतरच सामान्य माणसाला ठरविता येईल. पण तुमच्या उघड आणि अयोग्य भाषेच्या समर्थनाबद्दल माफी मागायची की नाही हे तुम्ही नक्कीच ठरवु शकता. शिवाय आपली चुक मान्य करुन माफी मागण्यात कमीपणा कसला? मला वाटते की तुमच्या प्रश्नांची मी अतिशय सुस्पष्ट उत्तरे दिली आहेत. आता माझी तुम्हाला विनंती आहे की मुळ अयोग्य भाषेचा मुद्दा सोडुन अधिकचे प्रतिप्रश्न उपस्थित करुन विषय भरकटवु नये.

In reply to by शार्दुल_हातोळकर

शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म हाताशी मिळाला म्हणजे काहीही मनाला येईल ते आक्षेपार्ह भाषेत लिहिण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होत नाही! हेच आणि असेच लोकांना नोटाबंदी झाल्यापासून सांगत आहे, पण पटतच नाही. बिन्धास्त खोटी माहिती देतात, चुकीच्या लॉजिकचे ट्रक फिरवतात, यांवर आपण उत्तरे दिली की मिपाकरांवर निखालस खोटी टीका करायची आणि ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच.

In reply to by मोदक

ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच.
ख्या ख्या ख्या हे लोकं ऑलिंपिक मधे प्लॅटिनम मेडल मिळवुन देतील एवढ्या पटकन पळतात बरं का रे. वरनं त्यांची एक्सक्युझेस ऐकणं रोचक प्रकार असतो. जनरली प्रत्येक गोष्टीमधलं आपल्यालाचं कळतं अशी वाटणारी माणसं ह्या क्याटेग्रीत बसतात (किंवा पळ काढतात). =))

In reply to by मोदक

अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही हरामखोर म्हटले गेले आहे. मग मूर्ख वगैरे एकदम सामान्य गोष्टी आहेत.
माझ्याबद्दल बोलत असाल तर मी सर्व हिंदी मिडियावाल्यांना हरामखोर म्हटलं आहे,,,,,,,,बाकि कोणाबद्दल बोलत असाल तर i don't know.

Shiv Sena MP Anandrao Adsul raises the issue of airlines banning his party MP Ravindra Gaikwad after the latter brutally thrashed an Air India staff. He also says actor Kapil Sharma too misbehaved with an airline staff earlier. But he was not banned. They why ban an MP?
लिंक वा! काय लॉजिक आहे! चोर तो चोर वर शिरजोर. यांना परत बालवाडीत पाठवायला पाहिजे. असली स्पष्टीकरणे तिथेच शोभतील. सामान्य लोकांपेक्षा खासदारांकडून कडून अधिक अपेक्षा करू नाही शकत का आपण?

In reply to by अत्रे

तुम्ही या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी असे वाटते. खालील लिंक कामाला येते का ते बघा. ताज्या घडामोडी या धाग्यवर बरीच चर्चा झाली आहे ती पण वाचावी. http://www.loksatta.com/desh-videsh-news/raveendra-gaikwad-shivsena-mp-… माध्यमे दाखवतात तेच खरे हेच मानून स्वतःची टोकाची मते मांडण्यात काय हशील? आणि उस्मानाबादमध्ये त्यांना आहेच पाठिंबा! उगाच मोदींसाठी त्यांना निवडून दिले वगैरे कारणे फोल ठरतात. २००९ च्या लोकसभेला मोदी नसताना, भाजपचा छुपा विरोध असताना आणि बार्शीसारखा मोठा भाग (जो काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार होता) नवीन जोडला असताना देखील रवी गायकवाडांचा पराभव हा फक्त ६-७ हजाराच्या फरकाने झाला होता (पद्मसिंह पाटील आणि रवी गायकवाड दोघानांही ४ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती). इथे कायद्याच्या दृष्टीने दोघेही चोर आहेत. तेव्हा चोर ते चोर वगैरे गैरलागू आहे. विमान कंपन्यांचा "नो फ्लाय" हा उद्दामपणा अजिबात खपवून घेतला जाऊ नये. कुठल्या कायद्याने नो फ्लाय लागू करण्यात आलाय? खासदारांना दाद लागू न देणाऱ्या कंपन्या सामान्य माणसांना काय दाद देणार?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

धन्यवाद. लिंक वाचली. दोन प्रश्न १. गायकवाड यांनी चप्पल मारली कि नाही ? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. (त्यांनी स्वतः काबुल केले आहे) २. विमान कंपन्यांचा "नो फ्लाय" हा उद्दामपणा अजिबात खपवून घेतला जाऊ नये. कुठल्या कायद्याने नो फ्लाय लागू करण्यात आलाय? याचे उत्तर खाली मिळेल
12:18 pm: Minister of Civil Aviation Ashok Gajpati Raju responds. "I just want to put things in right perspective. **Around November 2014, there was a lot of discussion on demeanor of the passengers. Any passenger whose demeanor is bad is stopped from travelling now**. An MP is also a passenger, we can't have unequal treatment to people of different classes, we need to keep safety in mind, can't compromise safety of airlines," says the Aviation Minister.
http://www.thehindu.com/news/national/live-updates-from-budget-session-… समजा तुम्ही हॉटेल मध्ये जाऊन वेटर ला चपलेने बडवले तर हॉटेल ने का म्हणून तुम्हाला परत आत घ्यावे? कॉमन सेन्स ची गोष्ट आहे.

In reply to by अत्रे

An MP is also a passenger, we can't have unequal treatment to people of different classes
यापुढे जाऊन जर आमदार,खासदार,मंत्री अशा पदावर असलेल्या व्यक्तीने असा बेजबाबदारपणा केला तर त्याला त्याच बेजबाबदारपणासाठी सामान्य माणसाला असेल त्यापेक्षा अधिक कडक शिक्षा हवी असे मी म्हणेन. तुम्ही जर का लोकप्रतिनिधी असाल तर तुमच्या वर्तनातून लोकांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.जर असे वर्तन लोकप्रतिनिधींचेच असेल तर ते कसे चालेल? बाकी जर का त्या कर्मचार्‍याने रवी गायकवाडांना 'तू एम.पी असशील तर तुझ्या घरचा. नियम म्हणजे नियम' असे म्हटले असेल तर तो कर्मचारी अभिनंदनास पात्र आहे. असल्या बेमुर्वत लोकप्रतिनिधींना चाप लावायचे धाडस दाखविणे ही साधी गोष्ट नाही. या पेंग्विनसेनेची आणि त्यांच्या समर्थकांची नेहमी मजा वाटते. एकीकडे सतत शिवाजी महाराजांचा घोषा लावायचा. पण त्याच शिवाजी महाराजांच्या मावळ्याने 'परवलीचा शब्द माहित नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी असलात तरी गडाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार नाही' असे म्हटले होते अशी गोष्ट आहे. म्हणजे कोणीही-- अगदी स्वतः स्वराज्याचे संस्थापक छत्रपतीही नियमावर नाहीत हा छत्रपतींचा आदर्श होता. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून शिवसेनेचा एम.पी म्हणजे मानवजातीचे कल्याण करायला आकाशातून टपकला आहे अशी धारणा करून घेऊन वर उद्दामपणाचे समर्थन करायचे आणि त्याचवेळी त्याच शिवाजीमहाराजांच्या नावाचाही जप करायचा!! आणि यात काही विसंगती आहे हे पण त्यांच्या गावी नसते. मागे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने असेच काहीतरी झाले म्हणून ट्रॅफिक पोलिसाला थोबडावला होता. तर या खासदाराने एअर इंडियाच्या कर्मचार्‍याला मारहाण केली आहे. सामान्य शिवसैनिक ते खासदार अशी प्रगती झाल्यावर कोणाला थोबडावायचे यातही प्रगती व्हायला नको का? उंचे लोग उंची पसंद!!

In reply to by गॅरी ट्रुमन

ट्रुमन साहेब, मुजोर नेते आणि मुजोर बाबू लोक याना चाप लावण्यासाठी कानाखाली मारली तर त्याला सहानुभूती मिळते हि परिस्थिती आली आहे हे खरे आहे. पण त्याचे असे सरसकटीकरण योग्य नाही. गायकवाड शांतपणे बोलत असताना सुकुमार यांच्याकडून काहीतरी वाक्य गेल्याचे ती हवाई सुंदरी म्हणते आहे. मी माझ्या माहितीनुसार अरेरावी करून तू एमपी असशील तर घरचा आणि मोदींकडे तक्रार करेन हे ते वाक्य असावे असे म्हटले होते. वास्तविक वेबवरलया काही प्रतिक्रियांमध्ये हा टर्निंग पॉईंट म्हणजे गायकवाडांना "आईवरून शिवी" असल्याचे ऐकले आहे. विडिओत ते ऐकूही येतेय असे काही लोकांचे म्हणणे आहे. मी तो व्हिडीओ पाहून काही माहिती मिळतेय का ते पाहायचा प्रयत्न करतो. पण मुद्दा हा आहे कि या प्रकरणातल्या गायकवाडांच्या बाजूच्या बऱ्याच गोष्टी ह्या सरळ सरळ दुर्लक्ष करण्यात येत आहेत त्याचे एकमेव कारण ते शिवसेनेचे आहेत हे भासते. चप्पल ने मारणे हा कायद्याने गुन्हा आहेच आणि त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच आहे. ती प्रक्रिया हि कायद्याने दोन माणसातील भांडण ह्या प्रकारेच हाताळली जायला हवी. विरोधाला विरोध करायचा म्हणून काहीही उदाहरणे देऊन कसे चालेल? वर एक हॉटेलचे उदाहरण पहिले आपण. एका हॉटेल मध्ये जर तिथल्या वेटरने अपशब्द वापरले आणि त्यातून बाचाबाची झाली तर शहरातल्या सर्व हॉटेल्सनी आपल्यावर बंदी टाकावी? मोगलाई आहे का ही? कि सगळे राजकारणी म्हणजे गलिच्छ आणि समाजातील इतर घटक चांगले हे गृहीतच धरून चालायचे? नेत्यांच्या (एकुणात एकूण सगळ्या पक्षांच्या, एकही सोडून नाही) उद्दामपणाची हजारो उदाहरणे सांगता येतील आणि दररोज डोळ्यासमोर दिसतात. पण फक्त शिवसेनेचेच तसे आहे म्हणून त्यांना धारेवर धरण्यात काय अर्थ आहे? शिवाजी महाराजांचे नाव न घेणारा कुठला पक्ष आहे का आता? शिवाय नाव घेऊन ते छत्रपतींचा आदर्श पाळणारा आहे का कुठला पक्ष? त्या गोष्टी त्या त्या नेत्यांचं वैयक्तिक प्रकरण गृहीत धरून कायद्याने का सोडवलं जाऊ नये?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

वास्तविक वेबवरलया काही प्रतिक्रियांमध्ये हा टर्निंग पॉईंट म्हणजे गायकवाडांना "आईवरून शिवी" असल्याचे ऐकले आहे. विडिओत ते ऐकूही येतेय असे काही लोकांचे म्हणणे आहे. .
याची लिंक देता का? फेसबुक वर वाचले का रेडिट? तुमचं (शिवसेना पॉईंट) म्हणणं थोडाफार पटतं. कारण त्यांची प्रतिमाच तशी झालेली आहे. शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा करण्याची हौस असते. यावेळी त्यांचे शिलेदार चांगले कायद्याच्या कचाट्यात अडकले, म्हणून मला (आणि माझ्यासाख्या शांतताप्रिय नागरिकाना ) पर्सनली फार आनंद झाला आहे हे मीही मान्य करतो.

In reply to by अत्रे

शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा करण्याची हौस असते.
बोर्डावर ऑलरेडी एक धागा चालू असताना उस्मानाबादचे सेपरेट नाव घेऊन राडा करायच्या तुमच्या हौसेचे कारण कळले नाही अद्याप.

In reply to by अत्रे

बरं बरं. मग चालूद्या काय होत नसंल तर. . बरं झालं च्यायला तुम्ही सांगितलं ते. लक्षच द्यायला नाय पायजे.. मायची किटकिट

In reply to by गणामास्तर

नायतर काय भेंडी. नामांतर नामांतराच्या नावाने बोंबलणार्‍यांना म्हणा अगोदर उस्मानाबादचं धाराशिव करा. औरंगाबादेचं नंतर पाहता येईल. धाराशिव म्हणणारी लोकं अजून जिवंत आहेत. ते नाव रिस्टोअर केले तर उलट भारी होईल पण त्याला ग्लॅमर नाही ना. शिवसेनावाल्यांच्या डोक्यात हे शिरेल का?

In reply to by अत्रे

याची लिंक देता का? फेसबुक वर वाचले का रेडिट?
हे तुम्ही खोचकपणे विचारात नसाल असे गृहीत धरून उत्तर देतोय. मी काही एपपेरच्या खालच्या प्रतिक्रियांमध्ये आणि फेसबुकच्या कंमेंट्स मधेही वाचले. तूर्तास नक्की आठवत नाही कुठे ते पण म्हणूनच मी म्हणालो कि मी तो व्हिडीओ पाहून काही माहिती मिळतेय का ते पाहायचा प्रयत्न करतो. बाकी कायद्याचे कचाट्यात सापडले वगैरे केस चालून निकाल लागला तर तुमचा आनंद सार्थकी लागेल.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गायकवाड शांतपणे बोलत असताना सुकुमार यांच्याकडून काहीतरी वाक्य गेल्याचे ती हवाई सुंदरी म्हणते आहे. हवाईसुंदरीची कहाणी फक्त लोकसत्ता व मटाच्या आंतरजाल आवृत्तीतच आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत याचा उल्लेख नाही (मटाची छापील आवृत्ती वाचलेली नाही). मटा व लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम सर्वश्रुत आहे. इतर वृत्तसंस्थांनी याची दखल घेतलेली नाही. दोन्ही ठिकाणी दिलेल्या बातमीत तफावत आहे. लोकसत्ताच्या बातमीत म्हटले आहे की गायकवाडांनी फक सँडल काढली होती. परंतु मटाच्या बातमीत म्हटले आहे की त्यांनी कर्मचार्‍याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून दिले होते. दोन्ही बातम्यात हवाईसुंदरीची ओळख लपविण्यात आली आहे. या प्रकरणात ओळख लपविण्याची अजिबात गरज नव्हती. तरीसुद्धा ओळख लपविण्यामागचा हेतू समजत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-dont-think-he-wante… दोघेही आधी शांतपणे बोलत होते पण अचानकपणे काहीतरी खटका उडाला. सुकुमार यांच्या तोंडून कदाचित चुकीचे शब्द निघाले आणि गायकवाड यांचा संताप अनावर झाला.

In reply to by श्रीगुरुजी

एक अनसेन्सॉर्ड व्हिडिओ पाहिला तेव्हा गायकवाडांना उद्देशुन शिवीगाळही ऐकली आहे. जर शिवीगाळ ऐकुन किंवा परत परत तक्रारी करुन एअर इंडियाच्या लोकांनी हा प्रकार केला असेल तर लुंगीवाल्याला फोडला हेचं उत्तम. एअर इंडियाचा स्टाफ लोकांशी क्वचितचं नीट वागतो. बाकी विमानांमधल्या सुविधांबद्दल वेगळे सांगणे न लगे. अश्या परिस्थितीमधे जर का धडा शिकवण्यासाठी हे पाउल उचललं असेल तर उत्तम काम केलं गायकवाडांनी. मी शिवसैनिक अथवा शिवसेना भक्तं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शंभर विडिओ दाखवा हो तुम्ही, काय फरक पडतो? स्वतःच्या तोंडाने फुशारक्या मारल्या ना गायकवाडांनी! मग आता परिस्थिती उलटी सिद्ध झाली तरी आम्ही मानणार नाही. बाकी ते ढिस्क्लेमर टाकल्याने काही होत नाही बरं!

In reply to by गुलाम

हा अग्रलेख ३-४ दिवसांपूर्वीच वाचला होता. स्पष्ट शब्दात टीका न करता घोळवून घोळवून गुळमुळीत शब्द वापरून अग्रलेख लिहिलेला आहे. गायकवाडांविरूद्ध प्रतिक्रिया देणार्‍यांना प्रतिक्रियाखोर असे संबोधले आहे. लोकसत्ता आणि मटा या दोन वृत्तपत्रांचे शिवसेनाप्रेम अगदी सहज लक्षात येते. ही दोन वृत्तपत्रे रोज "सामना"चे अग्रलेख आपल्या आंतरजाल आवृत्तीत छापून "सामना"ची फुकट प्रसिद्धी करत असतात. "सामना"चे अग्रलेख म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेले "केसरी"तील अग्रलेख आहेत किंवा आचार्य अत्र्यांनी लिहिलेले परखड अग्रलेख आहेत अशी यांची समजूत झालेली दिसते. अगदी आजच्या लोकसत्तात सुद्धा तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा; शिवसेनेचा योगी आदित्यनाथांवर निशाणा असा मथळा देऊन "सामना"च्या अग्रलेखात काय छापले आहे हे "लोकसत्ता"त प्रसिद्ध केले आहे. मटाने देखील सामनाचा अग्रलेख छापला आहे. बरं, ते नुसते "सामना"चे अग्रलेख छापून थांबत नाहीत, तर त्याबरोबर "उद्धव ठाकरेंचा मोदींना सणसणीत टोला", "शिवसेनेकडून भाजपला घरचा आहेर", "उद्धव ठाकरेंचा फडणविसांवर जबरदस्त प्रहार", "शिवसेनेचा भाजपवर निशाणा", "शिवसेनेच्या टीकेने भाजप घायाळ", "शिवसेनेचा खोचक सवाल, "उद्धव यांची टोलेबाजी", "शिवसेनेचा भाजपला रोकडा सवाल" असे कौतुकोद्गारही असतात. मराठी माध्यमात या दोन संस्थांनी गेल्या २-३ वर्षांपासून हा नवीनच विचित्र प्रकार सुरू केला आहे. या दोघांचे शिवसेनाप्रेम इतके अनावर झाले आहे की आपल्या प्रतिस्पर्ध्याची फुकट प्रसिद्धी करेपर्यंत यांची मजल गेली आहे. हे दोघे फक्त "सामना"चेच अग्रलेख पुनर्मुद्रीत करतात. "सकाळ", "लोकमत", "पुढारी" इ. वृत्तपत्रांकडे हे दुर्लक्ष करतात. कारण उघड आहे. शिवसेना हा यांच्या हृदयातील मृदु कोपरा आहे.

शिवसेना व भाजप हे सारखेच निर्लज्ज पक्ष आहेत. निर्ल्लज्ज्पणाच्या बाबतीत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही पुढे गेले आहेत. ते चंद्रकांत पाटील (भाजप) म्हणत आहेत की नारायण राणे हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे. समाजातला गाळच सगळा राजकीय पक्षांत गेलेला आहे. चांगली माणसे सापडणे, फार कठीण आहे.

In reply to by तिमा

ते चंद्रकांत पाटील (भाजप) म्हणत आहेत की नारायण राणे हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे. काहीही.. भाजपाला राजकीय आत्महत्या करायची इतकी घाई का करत आहेत ते कळत नाही

In reply to by मोदक

भाजप नारायण राणेंसारखा झगा स्वतःच्या गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही. नारायणे राणे मूळचे शिवसैनिक. शिवसेनेप्रमाणेच त्यांचं उपद्रवमूल्य प्रचंड आहे. अशा उपद्रवीला पक्षात घेऊन स्वत:च्या मार्गात खड्डा करण्याइतके फडणविस मूर्ख नाहीत. मोदी व फडणविस शतप्रतशत भाजप या विशिष्ट दिशेने काम करीत आहे. शिवसेनेची मुजोरी मोडून शिवसेनेला पूर्णपणे निष्प्रभ करून सोडायचे व शिवसेनेवरील किंवा इतर पक्षांवरील अवलंबित्व पूर्णपणे थांबवायचे हा त्यांचा अंतिम उद्देश आहे. परंतु चंद्रकांत पाटील, गडकरी, मुनगंटीवार इ. नेते मात्र इतर पक्षांशी जमवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. कधी गडकरी राज ठाकरेंना भेटतात, मुनगंटीवार मातोश्रीवर जाऊन कचकड्याचा वाघ भेट देतात, चंद्रकांत पाटील शिवसेनेशी जमवून घ्यायचा सल्ला देतात आणि नारायण राणेंना प्रमाणपत्र देतात. परंतु फडणविस मात्र यात न पडता पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

भाजप नारायण राणेंसारखा झगा स्वतःच्या गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही. मुंडेंना हलवतील असेही वाटले नव्हते.

In reply to by मोदक

चंद्रकांत पाटलांची सर्व वाक्ये न घेता फक्त एकच वाक्य घेऊन माध्यमे त्याचा कीस पाडत आहेत. चंद्रकांत पाटील असे म्हणाले होते की, "नारायण राणे शिवसेनेत परत जाणार अशा बातम्या येत आहेत. ते काँग्रेस सोडून भाजपत येणार अशाही बातम्या येत आहेत. परंतु, ते काँग्रेस अजिबात सोडणार नाहीत व ते काँग्रेसमध्येच राहतील असे काँग्रेसचे प्रवक्ते सांगत आहेत. एकंदरीत राणे हे सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व आहे.". यातील फक्त शेवटचे वाक्यच माध्यमांनी उचलले व राणेंना पक्षात घेण्यास भाजप उत्सुक आहे अशा कंड्या पिकवायला सुरूवात केली. जर त्याआधीची सर्व वाक्ये एकत्रित वाचली तर माध्यमांचा मूर्खपणा लक्षात येईल.

In reply to by श्रीगुरुजी

राणेंचा पक्ष सोडण्याचा कुठलाही विचार नसल्याचे निलेश राणेंनी आज स्पष्ट केले आहे. शिवाय माध्यमांनी हा खोडसाळपणा थांबवावा नाहीतर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

इथे तर लिहिलंय की "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे दिल्ल्रीत दाखल झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना पुन्हा वेग आला आहे. नारायण राणे यांनी मंगळवारी भाजप नेत्यांशी चर्चा केली असून असून केंद्रात काम करण्याची इच्छा दर्शवल्याची माहितीदेखील विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. ". राणेंना पक्षात घेणे हे भाजपसाठी आत्मघात करण्यासारखे ठरेल. राणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव अत्यंत उपद्रवी, अत्यंत महत्त्वाकांशी व अत्यंत आक्रमक आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठी राणे अत्यंत कासावीस झालेले आहेत. ते भाजपत आले तर ते पहिला सुरूंग फडणविसांच्या खुर्चीखाली लावतील.

माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
तुम्हाला वाटत नसेल पण आहे. भरपूर आहे. सामान्यातून वर आलेलेच लोक आहेत हे. अरेरावीला अरेरावीनेच उत्तर दिलेले कळते अन अशा लढणार्‍या लोकांना सहानूभूतीच नव्हे तर फुल्ल पाठिंबा आहे. अन मोदी लाट बिट कै नै. लढाऊ वृत्तीने अन चांगल्या जनसंपर्काने निवडून आलेले हे लोक आहेत. राष्ट्रवादी अन कॉग्रेसच्या दडपशाही अन पैशाच्या राजकारणाला सेनेने अन सेनेच्याच पध्दतीने स्व. गोपीनाथरावांनी मराठवाड्यात लढा दिलेला आहे. त्या परंपरेतले आहेत. उस्मानाबाद मतदारसंघ हा मोठा आहे, त्यात सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुका पण आहे. आता बार्शीतला सेनेचा आमदार व्हाया कॉग्रेस बीजेपी करत अस्ल्याने बार्शीतला थोडाफार विरोध वगळता सर्वत्र प्रा. रविसरांना फुल्ल पाठिंबा आहे.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
मी त्यांच्याच मतदरसंघातला आहे, आता हे सगळं सांगितल्यावरही तुम्ही विश्वास ठेवणार आहात काय? का परत माणुसकी, संस्कार वगैरे कॅसेट चालू होणारे? तसेच ऐकीव बातम्यावर विसंबून राह्यचे असेल तर बिन्धास्त चघळत बसा..

In reply to by अभ्या..

धन्यवाद. मला फक्त लोकांची भूमिका जाणून घ्यायची होती. जी कि या वाक्यातून कळाली
अरेरावीला अरेरावीनेच उत्तर दिलेले कळते अन अशा लढणार्‍या लोकांना सहानूभूतीच नव्हे तर फुल्ल पाठिंबा आहे
अरेरावी करणे आणि मारहाण करणे यातला फरक लोकांना कळाला पाहिजे! आणि झाली चूक तर माफी मागा ना! वर उद्दाम मपणे जर ते म्हणू लागले कि मी अमुक - तमुक आहे, घाबरत नाही, तर मग शिक्षा झालीच पाहिजे (होय कि नाही?)
आता हे सगळं सांगितल्यावरही तुम्ही विश्वास ठेवणार आहात काय?
कशावर विश्वास ठेवायचा ते कळले नाही.

“Is he a terrorist that he has been barred from flying by all airlines?” asks Shiv Sena district vice president Kamlakar Chavan
http://www.thehindu.com/news/national/shiv-sena-calls-for-osmanabad-ban… कोणी चप्पल ने मारहाण करत असेल तर त्याला दहशतवादी का म्हणू नये? कर्मचाऱ्यांना त्याची दहशतच वाटेल ना?

मारहाण ही अयोग्य असली तरी कोणी त्या थराला का गेले ह्याची काही चौकशी वगैरे होणार की नाही ? त्या बद्दल काचीच समजले नाही . तसेच अजुन सगळे सत्य बाहेर यायच्या आधी बाकिच्या एअर लाइन्संनी असा परस्पर निर्णय कसा घेतला ?

In reply to by मराठी_माणूस

कोणी त्या थराला का गेले ह्याची काही चौकशी वगैरे होणार की नाही ?
एखाद्याने बलात्कार केला तर तो का त्या थराला गेला याची लोक शहानिशा करतात का?
तसेच अजुन सगळे सत्य बाहेर यायच्या आधी बाकिच्या एअर लाइन्संनी असा परस्पर निर्णय कसा घेतला ?
त्यांनी (रवी "सर") व्हिडीओ मध्ये स्वत: कबुल केलाय, अजून काय पाहिजे? आणि एअर लाइन्संनी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना, कर्मचाऱ्यावर कोणीही उठून चप्पल मारत असेल तर अशा मानसिक संतुलन ढळणाऱ्या माणसाला विमानात ठेवणे हि सुरक्षेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. (at least until the case is closed)

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? असे विचारून धागा लेखकाला गायकवाड प्रकरणावरून उस्मानाबादच्या लोकांची मानसिकता (मुजोर आहेत का वगैरे) जाणून घायची दिसतंय असे प्रतीत झाले. राच्याकने धागा लेखक पुण्याचे आहेत का? PMPL च्या कंडक्टरला पण चामड्याच्या बुटाने मारायची इच्छा होते पण आम्ही खासदार नाही आहोत ना, ते पण शिवसेनेचे..!!

In reply to by विशुमित

असे विचारून धागा लेखकाला गायकवाड प्रकरणावरून उस्मानाबादच्या लोकांची मानसिकता (मुजोर आहेत का वगैरे) जाणून घायची दिसतंय असे प्रतीत झाले.
माफ करा. असा हेतू नव्हता. मला वाटत होते कि वृत्त माध्यमांनी उस्मानाबादला जाऊन त्यांना मत देणार्यला लोकांना प्रतिक्रिया विचारायला पाहिजे होती. सकाळी उठून सकाळ ची लोकल एडिशन चेक केली कुठेच काहीच बातमी नाही. म्हणून म्हटलं मिपा वर विचारावं. अनेकदा आपण मतदार नको त्या लोकांना निवडून देतो. अशा वेळी त्यांनी काही दुष्कर्म केले तर त्या बाबतीत त्यांच्या मतदारांची मते काय असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण हेच लोक उद्या जाऊन अशाच लोकांना निवडून आणतील. मतदारांना विचार करायला लावणारे असे प्रश्न वृत्त माध्यमांनी डायरेक्ट विचारले पाहिजेत असे मला वाटते. उस्मानाबादच्या लोकांशी भांडायचे म्हणून धागा काढला नाही.
राच्याकने धागा लेखक पुण्याचे आहेत का?
हा हा, नाही मी औरंगाबादचा.
PMPL च्या कंडक्टरला पण चामड्याच्या बुटाने मारायची इच्छा होते पण आम्ही खासदार नाही आहोत ना, ते पण शिवसेनेचे..!!
लोल

हे अगदी त्या दिवशी मोठ्या तोंडाने फुशारक्या मारत होते ही माझ्याकडे परतीचे ४ वाजताचे तिकीट आहे आणि मी ४ वाजता विमानातून जाणारच. बघतोच मला कोण अडवतो ते . . . पण जेव्हा प्रत्यक्ष प्रवासाची वेळ आली तेव्हा यांची तंतरली आणि गुपचूप आगगाडी पकडून घरी निघाले. आगगाडीत वार्ताहरांचा ससेमिरा टाळण्यासाठी मध्येच वापीला उतरून खाजगी मोटारीने मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत आल्यानंतर यांचा फोन बंद आहे आणि हे लपून बसले आहेत. माध्यमांसमोर यायचं यांचं धाडस नाही. प्रत्यक्ष महाराष्ट्रात वाघाच्या काळज्याच्या शूर, स्वाभिमानी मावळ्यांना फडतूस वार्ताहरांच्या भीतिने लपून रहायला लागतंय यापेक्षा अजून दुर्दैव ते काय? कोठे गेला तो वाघाचा पंजा? कोठे गेली ती दशदिशा दणाणून सोडणारी वाघाची गगनभेदी डरकाळी? कोठे गेली यांची वाघनखे, भाले, तलवारी, बरच्या, भाले, दांडपट्टे, खंजीर? खरं तर यांनी एअर इंडियावाल्यांच्या पोटात वाघनखे खुपसून त्यांचा कोथळा बाहेर काढायला हवा होता. नंतर त्यांच्या छाताडावर नाचून त्यांचे हात कलम करून गर्दन मारून त्यांचं थडगं महाराष्ट्राच्या भूमीत बांधायला हवं होतं. हे सगळं करायचं सोडून हे लपून बसलेत.


अत्रे, एअर इंडिया ऐन वेळेस विमान बदलते आणि प्रवाशास तक्रारही नोंदवू देत नाही. हा मुद्दा देखील चर्चिला जावा. तसेच रवींद्र गायकवाड शांतपणे आपली बाजू समजावून सांगत असतांना त्यांना अरेरावीने उलट उत्तरं करणाऱ्या व्यवस्थापकांवर कसली कारवाई व्हायला हवी यावरही चर्चा व्हावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गापै, हाच मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतोय. एअर इंडियाला सहानुभूती आणि आधीपासूनच असलेला सगळं राग रवी गायकवाडांवर आणि पर्यायाने शिवसेनेवर काढणे पटत नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

एअर इंडियाला सहानुभूती आणि आधीपासूनच असलेला सगळं राग रवी गायकवाडांवर आणि पर्यायाने शिवसेनेवर काढणे पटत नाही.
परफेक्ट, अगदी हेच चाललंय सुरुवातीपासून. आणि मूळ प्रकरण काय झाले ते अजूनही पूर्ण्पणे क्लीअर नाही, आक्रमकपणे सरब्त्ती करणार्‍या वृत्तसंस्थांना दिलेल्या बाईटसवरुन अंदाधुंद अंदाज बांधत गेम करायचा प्रयत्न क्लीअरकट दिसतोय. ज्यापध्दतीने भाजपेयांकडून 'आमच्या सोबत गुमान राहा नाहीतर असे करण्यात येईल' अशी दडपशाही चाललीय त्यावरुन सेनेच्या राडेबाजीपेक्षा असली दडपशाही जास्त त्रासदायक होत राहणार हे निश्चित.

In reply to by अभ्या..

>>> मूळ प्रकरण काय झाले ते अजूनही पूर्ण्पणे क्लीअर नाही, क्लिअर नसेल तर गायकवाडने क्यामेऱ्यासमोर ज्या फुशारक्या मारल्या, त्यावरच विसंबून राहून प्रतिक्रिया येणार. एकतर गायकवाडने नक्की काय घडले ते पुढे येउन सांगावे, नाहीतर त्याने ज्या फुशारक्या मारल्या त्या खऱ्या धरून त्यानुसारच प्रतिक्रिया येणार. परंतु गायकवाड लपून बसला आहे. त्यामुळेच त्याला व शिवसेनेला टीका ऐकून घेणे भाग आहे. मी यांव केलं, मी त्यांव केलं अशा बढाया मारायच्या, प्रतिक्रिया यायला लागल्या की घाबरून लपायचं आणि आमच्यावर आधी पासून असलेला राग काढला जातोय असा कांगावाही करायचा।

In reply to by श्रीगुरुजी

खासदारांनी फुशारक्या मारल्या हे तर उघड सत्य आहे. चप्पलने 25 वेळेला मारहाण झाली असेल अजिबात वाटत नाही. खासदारांची झालेली बदनामी हि मुख्यत्वे त्यांच्या बेजबाबदार फुशरक्यांमुळेच झाली आहे. पण म्हणून लगेच हि संधी आहे, घ्या उखळ पांढरे करून अशी अत्यंत अजेंडायुक्त भूमिका समर्थनीय असू शकते का? त्यांनी खरेच मारले कि नाही ह्याच्याशी काहीही देणे घेणे नाही, त्यांनी तसे म्हटले हेच महत्वाचे आहे आणि त्यांच्याविरुद्ध वापरण्यासारखे आहे.आणि कारण स्पष्ट आहे - ते शिवसेनेचे आहेत. उद्या त्यांनी खूप मोठा विकास केल्याच्या फुशारक्या मारल्या तर त्यावेळी त्या परिस्थती जाणून न घेता खऱ्या मानल्या नाही म्हणजे मिळवली. तरी बरं तो विडिओ आहे म्हणून नाहीतर उचलून फेकून दिलंच होतं असेच हे प्रकरण बाहेर आले असते. आणि खासदारांनी लपून बसावं कि गावभर फिरावं हा त्यांचा, त्यांच्या पक्षाच्या आदेशाचा आणि त्यांच्या वकिलांचा प्रश्न आहे. पण विरोधच करायचा असेल तर कुठलेही मुद्दे पुरतात. तो विडिओ शांतपणे पाहावा, कितीवेळा त्यात खासदारांना शिव्या देण्यात आल्या आहेत ते ऐकता येईल. इसको अंदरही मारते है, मुंह फोड देते है किसिको क्या पता चलेगा अशा आशयाची वाक्ये ऐकू येत आहेत. त्यांनी कुठल्याही कारणाने केलेली मारहाण हि निंदनियच आहे आणि शिवाय तो गुन्हाही आहे. कायदेशीर कारवाई पार पडेलच पण लगेच हि संधी सोडायची नाही म्हणून तुटून पडायचं, विमान कंपनीच्या गलथानपणाबद्दल, अरेरावीबद्दल, आणि अपमानास्पद वागणुकीबद्दल काहीही शब्द काढायचा नाही हे वागणं दुटप्पीपणाचं आणि खोट्या मुखवट्याचं आहे असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

इसको अंदरही मारते है, मुंह फोड देते है किसिको क्या पता चलेगा अशा आशयाची वाक्ये ऐकू येत आहेत.
आं तिज्यायला. असले भुरटे एअर इंड्यात असले तर मग लै भारी झाले हाणले ते. दिल्लीत हाणले असल्या मुजोरांना. लैच भारी.

In reply to by अभ्या..

http://zeenews.india.com/marathi/news/india/mp-ravi-gaikwad-and-air-ind… घ्या तुमी बी बघून घ्या! हे समर्थक, भक्त, भाट शिक्के काही बोलण्याची सोयच ठेवत नाहीत! बेक्कार वाटतं हो!