Skip to main content

राष्ट्रोद्धाराची संधी

लेखक नितिन थत्ते यांनी गुरुवार, 24/11/2016 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
८ नोव्हेंबर १६ ला जाहीर झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या इन्व्हॅलिडेशनने देशात अभूतपूर्व चलनकोंडी झाली आहे. पण सध्या ती आपण बाजूस ठेवू. या निर्णयाने ज्यांच्याकडे काळा पैसा ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होता त्यांना तो जाहीर करून त्यावर कर आणि दंड भरावा लागणार आहे. पंतप्रधानांनी काळ्या पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीवर जालीम उपाय केल्याने सर्व राष्ट्रभक्त नागरिक खूष झाले आहेत. यात एक अडचण आहे. काही अर्थतज्ञांच्या मते खर्‍या काळ्या पैशापैकी थोडाच या क्षणी रोख रकमेच्या स्वरूपात असेल. त्यामुळे काही थोडे लोक पकडले गेले तरी सर्व काळा पैसा काही बाहेर पडणार नाही. "चोराच्या हातची लंगोटी" असे समजून सरकार कदाचित तेवढ्यावर समाधान मानणारही असेल. पण आपण एवढ्यावर समाधान मानायची काही गरज नाही. ही एक नामी संधी आपल्याकडे चालून आली आहे. आपण यापूर्वी झालेला भ्रष्टाचारसुद्धा उघडकीस आणून देशसेवा करू शकतो गेल्या पाच वर्षात आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल. घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील. घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्‍यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील. पाल्यांच्या अ‍ॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल. घरात कुठला अ‍ॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल. आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू. आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल. आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल. तर आपण या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देऊन योग्य तो दंड भरून देशसेवा करू शकतो. तसेच आपण ज्यांना रोखीने पैसे दिले त्यांची नावे सरकारला कळवून त्यांच्याकडून पण देशाला कर आणि दंड मिळेल असे करू शकतो. आपल्याला यात थोडा त्रास, आर्थिक नुकसान वगैरे होईल. कदाचित आपले आपल्या स्नेह्यांशी संबंध ताणले जातील पण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी थोडा त्याग तर करावाच लागणार !!! तर मग चला मित्रहो !! कामाला लागा. ९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच.

वाचने 69414
प्रतिक्रिया 193

प्रतिक्रिया

लाल घोडा, शीप, कपास, होमलाईट, रॉयल, स्क्रएटीएम, राजा, टुलिप ???????

आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल. - नाही घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील. - नाही घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्‍यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील. - नाही पाल्यांच्या अ‍ॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल. - नाही घरात कुठला अ‍ॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल. - नाही आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू. - नाही आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल. - नाही आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल. - नाही धन्यवाद.

In reply to by यशोधरा

असं कसं असं कसं!! यातलं काहीतरी केलं पाहिजे ना तुम्ही नाहीतर तुम्ही त्याचे परिमार्जन करून, सरकारच्या निर्णयाने खुश झालेले राष्ट्रभक्त नागरिक होण्याचे पुण्य कसे मिळवणार बरे? आता तुम्हाला असा कोणीतरी माणूस शोधायला लागेल हा... चला चला कामाला लागा! ;)

In reply to by यशोधरा

आपण रिक्षावाल्याकडून कधी बिल घेतलंय?? बघा इथे स्कोप असू शकेल! पण, खरंच रिक्षावाल्यांच्या उत्पन्न कसे मोजले जाते?

In reply to by शब्दबम्बाळ

रोख रक्कम घेणाऱ्या व्यक्तीने ती रक्कम आपल्या खात्यात भरली आणि त्यावर आय कर( जेवढा लागू असेल तेवढा) भरला तर ते उत्पन्न वैध ठरते. ३ लाख रुपया पर्यंतच्या उत्पन्नावर( २५ हजार रुपये महिना) कर नाही. तेंव्हा सामान्य रिक्षावाल्याला साधारणपणे कोणताही कर नाही. परंतु त्याने उत्पन्न दाखवणे (आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे). रिटर्न न भरल्यास "करा"वर व्याज आणि दंड लागतो पण मुळातच कर शून्य असेल तर दंड काय लावणार?

In reply to by यशोधरा

आगगग!!! कोणीही तपासायला येणार नाही अश्या वैयक्तिक प्रश्नांना उत्तरादाखल ठोकून दामटुन नाही म्हणत स्वतःची निस्पृहता वगैरे वटवून घ्यायला काही लागते का?? अर्थातच,

नाही

=)) =))

१. आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल. : आठवत तरी नापहिन्यमहिन्यापुर्वी पार्कींग चा दंड सुद्धा पावती घेऊन भरला होता. खरेतर माझा काही दोष नव्हता. २. घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील. : सर्व चेक पेमेन्ट ३. घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्‍यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील. : नाही ४. पाल्यांच्या अ‍ॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल. : नाही ५. घरात कुठला अ‍ॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल. : नाही ६ आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू. : एफ डीची माहीती सरकारला देतो आणि त्यावर टॅक्स पण भरतो. ७ आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल.: नॉट अ‍ॅप्लिकेबल ८. आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल. : घर विकले होते पण ते पैसे सुद्धा चेक नी घेतले.

"९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच" हे वाक्य विशेष आवडलं! २०१९ च्या निवडणूक पण अँप वरूनच होतील बहुतेक, १२० कोटींच्या देशात ५ लाख लोक मतदान करतील आणि ९०% मते मिळून सरकार निवडून येईल!

In reply to by बोका-ए-आझम

गेल्या काही दिवसात या देशभक्तीचे इतके घोट पाजले गेलेत कि आता काहीच घेऊ वाटेना! :P बाकी ताण वगैरे काही नाही, मजा वाटते हे आकडे वगैरे बघितले कि!!

In reply to by शब्दबम्बाळ

"९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच" पाठिंबा न देऊन जातील कुठे?तो तर द्यावाच लागेल..

मी इथे अनेक धाग्यांवर १२० कोटी पापी लोक असा उल्लेख केला आहे. काहीना म्हातार्याचे डोके फिरले आहे असे वाटले असेल पण मिपाकरांशी खाजगीत चौकात बोलताना मी सामान्य माणूसही करप्ट आहे या ना त्या रूपाने हे माझे म्हणणे मांडले आहे. आता मी नवीन घर घेतले आहे . वीज कनेक्शन्चे चे ७५००० भरले आहेत. त्याचे सर्व बील वीज कंपनीने मला दिले का ? नाही. याचा अर्थ पैसे भरपूर खाल्ले गेले. आपण जरी चेकने केले तरी बिल्डरला ते पैसे अनेक जागी रोख द्यावे लागतात. त्यामुळे थेरोटेकली मी थेट लाच दिली नाही. पण ती दिली गेली हे उघड आहे. आजही माझे म्हणणे मी इथे ठामपणे मांडतो की आयकर खाते हेच सगळ्यात ढोंगी खाते आहे. आमचे सगले लक्ष तुमच्यावर आहे अशी जाहिरात करते व सरसकटपणे ज्याचा रिफंड नाही किंवा मामुली आहे त्याला ओके करते. या ऐवजी त्यानी सर्व लिन्कस जोडून आयकर बील दिले व ते बील चुकीचे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी पॅन धारकावर टाकली तर त्याना पैसे खाता येणार नाहीत. पूर्वी वीज मंडळात , पाण्याच्या बीलात पैसे खाउन अ‍ॅडजेस्ट करण्याचे प्रकार चालत असत. आता मीटरचा फोटो येत असल्याने ते बंद झाले आहे. आयकर रेटर्न ही जबाबदारी कायद्याने पूर्ण बन्द करून " आयकर बील" ही पद्धत चालू केली तर आपण मुकाटपणे जसा आता जी एस टी भरणार आहोत तसा आयकरही भरावा लागेल. अनिल बोकिलाना दोन मागण्यासाठी १६ वर्ष लागली माझ्या मागणीला ११६ लागतील हे भय आहे.

In reply to by चौकटराजा

या ऐवजी त्यानी सर्व लिन्कस जोडून आयकर बील दिले व ते बील चुकीचे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी पॅन धारकावर टाकली तर त्याना पैसे खाता येणार नाहीत.
काका, +११६ नव्हे, -१५५ वर्षं. भारतातला पहिला आयकर (१८६१) याचप्रकारे चालत असे.

तो निसंदीग्ध अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे. आपल्या देशातले सर्वच १२५ करोड लोक प्रामाणिक आहेत. ते कुठलाच लहान सहान भ्रष्टाचार करत नाहीत. ९० % लोकांचा पाठींबा मिळालाच ही सर्व विधाने भाबडी व पुर्ण सत्य नाहीच. इतका भाबडेपणा मात्र सर्व लोकांच्या डोक्यात आहे असे वाटत नाही. मात्र तरी तरी तरी मोदींच्या निर्णयाच्या नियतवर हेतुवरच जो संशय घेतला जातो त्याला केवळ मोदींचा निर्णय म्हणुन जो विरोध केला जातो. तो अत्यंत चुकीचा आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कारण इतक्या धाडसाने आजवर कुठल्याच सरकारने इतका स्वतःच्या करीयरला पार्टीच्या हिताला इतक्या धोक्यात टाकुन इतका मोठा स्टेक लावुन निर्णय घेतलेला नाही. तज्ञांची मतेही एकतर्फी नाहीतच की या निर्णयाने निसंदीग्ध तोटाच होइल इतकीच नाही व या निर्णयाने स्वर्ग अवतरेल इतकीच नाही. दोन्ही कडे व दोन्हीच्या मधल्या स्पेस मध्ये सर्व तज्ञ विभागले गेले आहेत. अशा वेळी एका प्रमाणात या निर्णयाने नक्कीच फायदा होणार आहे हे उघड सत्य आहे. त्याहुन महत्वाच तितकी प्रबळ इच्छाशक्ती मोदींनी दाखवलेली आहे. त्याचे स्वागत व सहकार्य विरोधाच्या मुद्द्यासहीत करण्यास काहीच हरकत नाही नसावी. केवळ विरोधासाठी विरोध केवळ मोदींचा निर्णय म्हणुन प्रत्येकच निर्णयाला विरोध हे मला तरी पटत नाही. विरोधाचे स्वातंत्र्य मान्य करुन.

In reply to by मारवा

कारण इतक्या धाडसाने आजवर कुठल्याच सरकारने इतका स्वतःच्या करीयरला पार्टीच्या हिताला इतक्या धोक्यात टाकुन इतका मोठा स्टेक लावुन निर्णय घेतलेला नाही.
+१... निर्णयाच्या फायद्याबद्दल किंवा अंमलबजावणीबद्दल मतमतांतरे असु शकतात. पण निर्णयाच्या नियतवर शंका घ्यायला जागा नाही.

मार्मिकतेने उडदामाजी काळे गोरे या रीतीने मांडलेला आहे. त्यांचा अजुन एक मुद्दा प्रत्येक बाबीला मोदी वा मोदीविरोध या मर्यादीत परीप्रेक्ष्यातुन पाहणे हे किती चुकीचे आहे हे ही त्यांनी फार योग्य रीतीने दाखवलेले आहे. माझे विचार त्या बाजुने जातात. मोदींचा या निर्णयामागील हेतुत मला काहीच गैर आढळत नाही. त्यांचे धाडस मला कौतुकास्पद वाटते. या निर्णयाला माझा पुर्ण पाठींबा आहे. या निर्णयामुळे नक्कीच प्रामाणिक माणसाला पहील्यांदा या देशात एक आनंद अभिमान वाटत आहे. आपली गिनती जो आजपर्यंत चुत्यात झाली असे समजत होता त्याला कुठेतरी मोठा दिलासा या निर्णयाने मिळालेला आहे. अर्थात यानेच स्वर्ग अवतरेल वा यात सामान्य जनतेला काहीच त्रास होत नाही वा सहन कराच लेकहो कसेही असेही मला वाटत नाही. व ज्या रीतीने अगोदर जनधन नंतर जीएसटी नंतर डिमॉनेटायझेशन हे ज्या क्रमाने केले गेले त्यावरुन मोदीही केवळ इथेच थांबतील व झाले बस आता असे नक्कीच होणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी त्याची हिंट ही स्पष्टपणे दिलेली आहे. त्यामुळे व मागील जनधन जीएसटी डिमॉनीटायझेशन या तीघांची जरी पुण्याई धरली जे प्रत्यक्षात केले गेले तरी मोदींची बाजु योग्य व भक्कम आहे. यावरुनच ते पुढे अजुन पाऊले उचलतील हे पटते.

म मो बोलते झाले अन चाचा लिहिते झाले हेच लै झाले की...

लाच देणे भाग पडले आणि लाच घेतल्याची कोणी पावती देते कां असे सोयीस्कर रित्या म्हणुन सामान्य माणूस स्वतःचा बचाव करू शकतो.जर लाच ( प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ) दिली नसती तर होणारे वा अपेक्षित काम झाले नसते, ह्याला जबाबदार सामान्य माणूस असु शकतो काय ? " देवा, मला मुलगा होऊ दे, मी तुझा नवस फेडीन," अशी लाच मुलाच्या जन्मा अगोदर पासुन परमेश्वराला दिली जाते. शाळेत जाणार्‍या मुलांना,' अभ्यास कर तर पास होशील ' या ऐवजी ' देवाला नमस्कार कर, जरुर पास होशील ' असे सांगितले जाते. तेंव्हा ह्या विषयासंबंधी " कोळसा उगळावा, तेव्हढा काळाच " अशी परिस्थिती आहे असे वाटते.अर्थात यावर काहीच उपाययोजना नाही काय ? तर उपाय असतीलच, फक्त अंमलात आणण्याची इच्छाशक्ति हवी.

थत्ते चाचांनी इतके सगळे लिहिले आहे तर त्यांनी यापैकी काही केले असल्यास इथे जाहीर करावे ही नम्र विनंती. त्यापैकी किती डिक्लेयर करुन त्यांनी कर भरला आहे ते देखील जाहीर केल्यास येथील लोकांना एक आदर्श उदाहरण घालुन दिले जाइल. मी काही काळापुरता ऑफिसचा खोडरबर चुकुन घरी नेला होता. १५ - २० दिवसांनी लक्षात आले तेव्हा परत आणुन दिला. मधल्या काळात ते माझे टॅक्सेबल इन्कम होइल काय आणि मला त्यावर (खोडरबराचे डेप्रिसियेशन, शेल्फ लाइफ वगैरे लक्षात घेता त्याच्या वार्षिक करपात्र रकमेच्या गुणोत्तरात २० दिवसांसाठी किती करपात्र उत्पन्न होइल कोण जाणे) कर भरावा लागेल काय? खोडरबर साधारन ७ - ८ रुपयाचे असेल कदाचित. जर ते करपात्र उत्त्पन्न होणार नसेल अणी मी त्यावर कर भरणार नसेल तर थत्ते चाचा आणि खान्ग्रेस मला देशद्रोही तर जाहीर नाही ना करणार? बाकी ते कर भरण्याचे इतके काय घेउन बसलात थत्ते चाचा. शेवटी तुम्हाला माहिती आहेच ना "इन द लाँग रन वी ऑल आर डेड"

In reply to by मृत्युन्जय

थत्ते चाचांनी इतके सगळे लिहिले आहे तर त्यांनी यापैकी काही केले असल्यास इथे जाहीर करावे ही नम्र विनंती. त्यापैकी किती डिक्लेयर करुन त्यांनी कर भरला आहे ते देखील जाहीर केल्यास येथील लोकांना एक आदर्श उदाहरण घालुन दिले जाइल.
"आधी केले मग सांगितले" असा प्रकार व्हायला हवा उगाच "उंटावरून शेळ्या हाकण्यात" काय अर्थ आहे.

In reply to by साहेब..

मी यातले काहीही केलेले नाही. (म्हणजे जी गैरव्यवहारांची उदाहरणे दिली आहेत तशा प्रकारचे काही केलेले नाही). त्यामुळे डिक्लेअर करून कर/दंड भरण्याचा प्रश्नच येत नाही.

बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक "थत्ते चाचा" असा शब्दप्रयोग करताना दिसले. तो हिणवण्यासाठी आहे का? त्यांचे विचार आपल्या विचारांशी जुळत नाही म्हणून ते 'आपल्यातले' नाहीत हे सिद्ध करायला "चाचा" म्हणण्याचा खटाटोप का? मोगा ला "खान" म्हटले गेले इथे थत्तेंना "चाचा" म्हटले जातेय. बर हे करणारे ट्रॉल आयडी नाहीत! धर्मद्वेष किती खोल पर्यंत गेला आहे हे जरा मनाला वाटलं तर बघा... (आता नेहमीप्रमाणे साळसूदपणाचा आव आणून "आमच्यामते चाचा हा आदरार्थी शब्द आहे वगैरे प्रतिक्रिया पडल्या जातील")

In reply to by यशोधरा

मी तर तुझ्याही आधीपासुन मिपावर आहे... ;) फकस्त ३ महिन्याचा फरक ! मिपाचा पहिला लॉगिन कधी केला गेला ? आयडी कधी निर्माण झाला ? याविषयी माहिती मिळवणे शक्य आहे काय ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Indian Army Amazing Talent Video... :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आलाच प्रतिसाद! :) ते मिपावर नव्हते ना!! "खान" देखील धर्मद्वेष्टी संबोधन नाहीये! जर काडी टाकायची म्हटली तर "भट" देखील नाही. पण ते कशापद्धतीने वापरले जातेय ते पाहून सुज्ञ माणसाला कळू शकते. आपल्याला हे कळत नसेल असे वाटत नाही पण 'सोयीस्कर' पट्टी सगळ्यांकडेच आहे!

In reply to by शब्दबम्बाळ

अहो, थत्तेंना हे संबोधन मिपावर फार पूर्वीपासून वापरले जात आहे आणि त्यासंबंधी त्यांनी कधी निषेध व्यक्त केलेला दिसला नाही. पण आता कोणी त्याला पकडून धाग्याचे काश्मीर करण्याचा प्रयत्न काहीसा विनोदी वाटला म्हणून आमचाही क्षीण विनोदाचा प्रयत्न :) (स्मायल्या पाहिल्या नाही काय ?!) छोट्या छोट्या गोष्टीत इतके काकदृष्टीने पाहणे बरे नाही. वर कोणीतरी म्हटलेच आहे, चिल् माडी.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आणि हो, हा लेख थत्तेकाकांनी (बघा चाचा नाही काका म्हटले आहे ;) ) फार निरागसपणे लिहिला आहे असा समज असल्यास अभ्यास वाढवावा लागेल, असे वाटते.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

फार निरागसपणे लिहिला आहे असा समज असल्यास अभ्यास वाढवावा लागेल,
लेखातील मेख बरोबर ओळखली आहे.:)

In reply to by शब्दबम्बाळ

थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा या उपाध्या श्री. थत्ते यांना फार पुर्वीपासुन आहे. मी जेव्हापासुन त्यांचे प्रतिसाद आणि त्यावर येणारे इतरांचे प्रतिसाद वाचत आहे तेव्हापासुन हे असेच आहे. थत्ते काका / चाचा मिपावर कधीपासुन आहेत हे मला माहिती नाही. मी कधीपासुन आहे हे देखील नीटसे आठवत नाही. पण अ‍ॅक्टिव्ह गेल्या ५ एक वर्षात झालो. थत्ते हे आडनाव हिंदु आहे. आडनावावरुन जात / धर्म ओळखण्याची कला मला फारशी अवगत नाही पण ओळखीत एक थत्ते आहेत त्यामुळे मला हे हिंदु उपनाम आहे हे मला माहिती आहे. थत्ते चाचा धर्म मानतात की नाही आणि मानलाच तर ते हिंदु नसुन मुस्लिम / शीख / बुद्ध यापैक्की काही असल्यास मला माहिती असण्याचे काही कारण नाही. थत्ते चाचांना चाचा म्हणुन संबोधण्यामागे त्यांच्या धर्माचा काही द्वेष करण्याचे काही कारण मला दिसत नाही कारण मुळात त्यांचा धर्म हिंदु सोडुन इतर काही आहे याचा विचारच केला नव्हता (आधी म्हटल्याप्रमाणे हिंदु उपनाम असल्याने ते हिंदु आहेत असा (गैर) समज झाला होता. चाचा हा आदरार्थी शब्दच आहे. इथे तो आदरार्थी अथवा अनादरार्थी असा कुठल्याही प्रकारे न वापरता सवयीनुरुप वापरण्यात आला आहे. तुम्ही लोक खुपच असहिष्णु झाल्यामुळे तुम्हाला जिकडे तिकडे एका विशिष्ट धर्माचा द्वेष दिसु लागला आहे. त्याला आम्हा सामान्य मिपाकरांचा नाइल्लाज आहे. त्यातुन माझा धर्मद्वेष नाही तर तुमची टोकाची असहिष्णुता दिसते. याचा निषेध म्हणुन शतशब्दकथेत मला मिळालेले पुस्तक मी मिपा व्यवस्थापनाला परत करु इच्छितो. जर नीलकांतने एखादा माणुस पुस्तक कलेक्ट करायला पाठवुन दिल्यास मी ताबडतोब ते पाठवुन देइन (मी कुरियचा खर्च का करावा? पुणेकरांना इतका वायफळ खर्च मानवत नाही). मिपावरच्या वाढत्या असहिष्णुतेकडे बघता नीलकांतने ताबडतोब मालकपदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करायचाही विचार होता पण पदरचे पैसे खर्च करुन लोकांसाठी इतकी सुविधा अजुन कोण उपल्ब्ध करुन देणार (आणी काय ग्यारंती की त्यानंतर असहिष्णुता कमी होइल) त्यामुळे विचार मागे घेतला. तळटीपः १. जवाहरलाल नेहरुंना चाचा नेहरु म्हणायचे असे ऐकुन आहे. माझ्या जन्माच्या आधी लिहिल्या गेलेल्या पुस्तकामध्ये हा उल्लेख सापडतो. त्यामुळे निर्माण झालेल्या द्वेषाला मी जबाबदार नाही ( शाळेच्या उत्तरपत्रिकेत कधीतरी मी जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख चाचा नेहरु असा केलेला पुसटसा आठवतो. १९९३ साली झालेल्या दंगली त्याचा तर परिपाक नसावा ना? हे देवा मला माफ कर). २. थत्ते चाचा आपल्यातले आहेत की नाही ते माहित नाही. मात्र "आमच्यातले " नक्की आहेत. आपल्यातले होण्यासाठी तुमचा नक्की काय पात्रता निकष आहे ते माहिती नसल्याने त्याबद्दल टिप्पणी करत नाही. असे दिसते की जात / धर्म / भाषा / वर्ण आणी राजकीय विचार यांतुन कुणाला आपल्यातले म्हणावे आणि कुणाला वगळावे हे ठरवण्याची तुमच्याकडे पद्धत दिसते. तशी काही पद्द्धत आमच्याकडे नसल्याने त्याबद्दल आमचा पास समजावा. जय हिंद. अति अवांतरः जय हिंद म्हणाल्याने माझ्यातला धर्म द्वेष तर नाही ना दिसणार? मी नॉन सेक्युलर तर नाही ना गणला जाणार? जय हिंद च्या ऐवजी जय पाक बोलुन मी माझी धर्मनिरपेक्षता सिद्ध करणे अपेक्शित आहे काय?? तुर्तास वरील प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्याने पुनःश्च जय हिंद.

In reply to by मृत्युन्जय

चाचा हा शुद्ध हिंदी शब्द आहे.त्याचा कोणत्याही धर्माशी काहीही संबंध नाही.कावीळ झाली की जग पिवळे दिसते अशी म्हण आहे.

In reply to by मृत्युन्जय

अवांतरः "थत्ते चाचा" हा शब्दप्रयोग ऐकला की पायरेट्स ऑफ कॅरिबियनमधल्या कप्तान स्पॅरोच्या वेषभूषेत नितीन थत्ते डोळ्यांसमोर येतात.

In reply to by नितिन थत्ते

म्हणजे नितीन थत्ते उर्फ थत्तेचाचा हा ए के हंगल यांच्या ड्युआयडी आहे की काय ? :) नवीन माहितीबद्दल धन्यवाद ;) (असाच विपर्यास करायचा अस्तो ना ? =)) )

In reply to by मृत्युन्जय

अचानक मॅटर कमालीचं सीरीयस झालयं काय कळळ नाही अस इतकं सीरीयस का झालात हो तुम्ही ? वरील चर्चा खेचाताणी नेहमीच्याच लिमीट मधली होती ना? डेसीबल लिमीट नेमकी केव्हा कशाने कुठल्या प्रतिसदाने वाढली मला खरेच समजले नाही. मला वाटलं नेहमीच्या चौकटीत संवादीय मारामारी सुरु होती मग एकदम सीरीयसनेस का आला ?

In reply to by मारवा

काही नाही हो, वरच्या प्रतिसादातली एक काडी पेटून तिचा भडका उडाला वाटतं! माझ्यामुळे तुम्हाला इतका लांब लचक प्रतिसाद लिहायला लागला याबद्दल माफी! (आणि म्हात्रे काकांची पण! :) )वेळ महत्वाचा असतो शेवटी! पण नक्की इतकं काय टोचलं असावं बरे, जरा बाकी धागे फिरून पहा (जे तुम्ही बहुधा पहिलेच असतील) मग सहिष्णुता दिसेल छान छान! बर, 'तुमचं' मिपा खूपच निरागस आहे वाटत पण! म्हणजे इथे कोणी सालस आयडी नाहीत जे "महाराष्ट्रात एक जात आहे जी सगळ्या जातीवादाला कारणीभूत आहे" असे म्हणाले होते किंवा एखाद्या आयडीचे आडनाव साळुंखे आहे आणि त्याचे विचार आपल्याशी जुळत नाहीत म्हणून त्या आयडी ला ब्रिगेडी ठरवले होते. इथे कोणी असे आयडी नाहीत जे दुसर्याने त्याच्या धर्माचा गवगवा सुरु केला कि त्याच्या 'चड्डीला हात घालतात" किंवा "वैचारिक सुंता" करतात. हि हिंदू धर्मातील प्रथा आहे का बरे? कि फक्त एखाद्या भाषेतील कोणता तरी शब्द?? कसा बुवा इतका साळसूदपणा आणता येतो काय माहित! आमच्याकडे खरंच नसते हो अशी इतकी सहिष्णुता! :) असो, खाली काहीतरी चर्चा सुरु आहे वाटत, ती वाचतो...

In reply to by शब्दबम्बाळ

ज्यांना चाचा म्हणतात त्यांना काही प्रॉब्लेम नव्हता आणि जे म्हणतात त्यांनाही नव्हता. आता उगाच मध्ये काडी टाकायची आणि गम्मत बघत बसायची. वर म्हणायचं सुद्धा किती ही असहिष्णुता वाढलीये. यावरून परवाचा एक प्रसंग आठवला - आमच्या एका कायप्पा ग्रुपवर पण नोट बंदीविषयी चर्चा चालली होती. त्यात मी फक्त म्हणलं की आपले सख्खे शेजारी खोट्या नोटा भारतात पाठवतात. तर यावर सेक्युलर प्रतिक्रिया काय असावी? - "ज्यात त्यात कसले धर्म आणता तुम्ही लोक? हे बरोबर नाही". आता यावर काय बोलणार?

In reply to by शब्दबम्बाळ

हुईन्ग! मी तर समजत होतो कि हे थत्तेचाचा "तरुण तुर्क म्हातारे अर्क" मधील प्रमाणे आदरपूर्वक आहे.

नव्वद टक्क्यांच्या वर लोकांनी निर्णयाला पाठिंबा दिलाय, मग घायकुतीला आल्यासारखे हे नव्वद टक्के लोक व्हॉट्सप, फेसबुकवर धडाधड '२८ च्या बंदला पाठिंबा देऊ नका' वाल्या पोस्ट्स का पसरवत असतील...? ;)

In reply to by अनुप ढेरे

हा हा हा, गुड जोक! १०% लोकांच्या बंद ने इतका फरक पडतो? इथे तर १० टक्क्यांना होत असलेल्या त्रासानेही काही फरक पडत नै म्हणे..?

In reply to by संदीप डांगे

२८ तारखेला भारत बंद आहे असे म्हणतात तेंव्हा बघूच कि ९० % ना किती किंमत आहे. शक्ती आणि विध्वंसक वृत्ती (POWER & NUISANCE VALUE) यातील फरक काय आहे ते सांगायची गरज नाही.

हा हा हा. कात्रजच्या घाटात पकडले हो नितिनने 'भक्त'मंडळीना!