८ नोव्हेंबर १६ ला जाहीर झालेल्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांच्या इन्व्हॅलिडेशनने देशात अभूतपूर्व चलनकोंडी झाली आहे. पण सध्या ती आपण बाजूस ठेवू. या निर्णयाने ज्यांच्याकडे काळा पैसा ५०० किंवा १००० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात होता त्यांना तो जाहीर करून त्यावर कर आणि दंड भरावा लागणार आहे.
पंतप्रधानांनी काळ्या पैशाच्या आणि भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीवर जालीम उपाय केल्याने सर्व राष्ट्रभक्त नागरिक खूष झाले आहेत.
यात एक अडचण आहे. काही अर्थतज्ञांच्या मते खर्या काळ्या पैशापैकी थोडाच या क्षणी रोख रकमेच्या स्वरूपात असेल. त्यामुळे काही थोडे लोक पकडले गेले तरी सर्व काळा पैसा काही बाहेर पडणार नाही. "चोराच्या हातची लंगोटी" असे समजून सरकार कदाचित तेवढ्यावर समाधान मानणारही असेल.
पण आपण एवढ्यावर समाधान मानायची काही गरज नाही. ही एक नामी संधी आपल्याकडे चालून आली आहे. आपण यापूर्वी झालेला भ्रष्टाचारसुद्धा उघडकीस आणून देशसेवा करू शकतो
गेल्या पाच वर्षात
आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल.
घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील.
घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील.
पाल्यांच्या अॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल.
घरात कुठला अॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल.
आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू.
आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल.
आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल.
तर आपण या व्यवहारांची माहिती आयकर विभागाला देऊन योग्य तो दंड भरून देशसेवा करू शकतो. तसेच आपण ज्यांना रोखीने पैसे दिले त्यांची नावे सरकारला कळवून त्यांच्याकडून पण देशाला कर आणि दंड मिळेल असे करू शकतो.
आपल्याला यात थोडा त्रास, आर्थिक नुकसान वगैरे होईल. कदाचित आपले आपल्या स्नेह्यांशी संबंध ताणले जातील पण देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी थोडा त्याग तर करावाच लागणार !!!
तर मग चला मित्रहो !! कामाला लागा.
९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच.
प्रतिक्रिया
आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल. - नाही
घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील. - नाही
घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील. - नाही
पाल्यांच्या अॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल. - नाही
घरात कुठला अॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल. - नाही
आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू. - नाही
आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल. - नाही
आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल. - नाही
धन्यवाद.
असं कसं असं कसं!!
यातलं काहीतरी केलं पाहिजे ना तुम्ही नाहीतर तुम्ही त्याचे परिमार्जन करून, सरकारच्या निर्णयाने खुश झालेले राष्ट्रभक्त नागरिक होण्याचे पुण्य कसे मिळवणार बरे?
आता तुम्हाला असा कोणीतरी माणूस शोधायला लागेल हा... चला चला कामाला लागा! ;)
आम्ही आधीपासूनच पुण्यवंत राष्ट्रभक्त आहोत.
आपण रिक्षावाल्याकडून कधी बिल घेतलंय?? बघा इथे स्कोप असू शकेल!
पण, खरंच रिक्षावाल्यांच्या उत्पन्न कसे मोजले जाते?
थत्तेचाचांनी तो मुद्दा न लिहिल्याने गैरलागू.
रोख रक्कम घेणाऱ्या व्यक्तीने ती रक्कम आपल्या खात्यात भरली आणि त्यावर आय कर( जेवढा लागू असेल तेवढा) भरला तर ते उत्पन्न वैध ठरते.
३ लाख रुपया पर्यंतच्या उत्पन्नावर( २५ हजार रुपये महिना) कर नाही. तेंव्हा सामान्य रिक्षावाल्याला साधारणपणे कोणताही कर नाही. परंतु त्याने उत्पन्न दाखवणे (आयकर रिटर्न भरणे आवश्यक आहे). रिटर्न न भरल्यास "करा"वर व्याज आणि दंड लागतो पण मुळातच कर शून्य असेल तर दंड काय लावणार?
यशोताईं शी सहमत.
माझे देखील असेच आहे.
तात्पर्य देशसेवा आधीच करुन झाली आहे.
आगगग!!! कोणीही तपासायला येणार नाही अश्या वैयक्तिक प्रश्नांना उत्तरादाखल ठोकून दामटुन नाही म्हणत स्वतःची निस्पृहता वगैरे वटवून घ्यायला काही लागते का??
अर्थातच, नाही
=)) =))
नाही हो भूभू, अगदी खर्रीखर्री उत्तरे दिलीयत की हो.
यशोधरा - ताई
आमचं पण नाही असंच उत्तर आहे सर्वच्या सर्व प्रश्नांना.
म्हणजे एक तर १००/१०० किंवा ०/१००
क्या बात डॉक :)
अरेरे थत्ते चचा किव येते तुमची
१. आपण कोणत्या ना कोणत्या कारणाने "नाइलाजाने" कुठे लाच दिली असेल. : आठवत तरी नापहिन्यमहिन्यापुर्वी पार्कींग चा दंड सुद्धा पावती घेऊन भरला होता. खरेतर माझा काही दोष नव्हता.
२. घर खरेदी करताना बिल्डरला कॅशमध्ये बिनपावतीचे १०-२० लाख रुपये दिले असतील. : सर्व चेक पेमेन्ट
३. घरदुरुस्ती करण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकार्यांना मंजूरीसाठी ५० हजार रुपये दिले असतील. : नाही
४. पाल्यांच्या अॅडमिशनसाठी शिक्षणसंस्थेला बिनपावतीची देणगी दिली असेल. : नाही
५. घरात कुठला अॅप्लायन्स घेतला असेल आणि त्यावेळी टॅक्स वाचवण्यासाठी बिल घेतले नसेल. : नाही
६ आपल्या सर्व फिक्स डिपॉझिट्सची त्यावरील व्याजाची माहिती सरकारला देत नसू. : एफ डीची माहीती सरकारला देतो आणि त्यावर टॅक्स पण भरतो.
७ आपण डॉक्टर, सीए, वकील, व्यापारी, विमा एजंट, इंटिरिअर डेकोरेटर, कॉण्ट्रॅक्टर किंवा इतर व्यावसायिक असू आणि आपण केलेल्या व्यवसायाचे सर्व उत्पन्न जाहीर केले नसेल.: नॉट अॅप्लिकेबल
८. आपले जुने घर विकले असेल त्यावेळी कॅपिटल गेन्स टॅक्स वाचवण्यासाठी काही रक्कम रोखीने घेतली असेल. : घर विकले होते पण ते पैसे सुद्धा चेक नी घेतले.
ज्यांनी केलंय त्यांच्यासाठी आहे ना धागा?
"९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच"
हे वाक्य विशेष आवडलं! २०१९ च्या निवडणूक पण अँप वरूनच होतील बहुतेक, १२० कोटींच्या देशात ५ लाख लोक मतदान करतील आणि ९०% मते मिळून सरकार निवडून येईल!
का उगाचच ताण घेताय? चार घोट मारा (कशाचे ते तुम्ही ठरवा) आणि जगाला पौड फाट्यावर मारा.
गेल्या काही दिवसात या देशभक्तीचे इतके घोट पाजले गेलेत कि आता काहीच घेऊ वाटेना! :P
बाकी ताण वगैरे काही नाही, मजा वाटते हे आकडे वगैरे बघितले कि!!
वा !!
"९० टक्क्यांहून अधिक जनतेचा पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेला पाठिंबा असल्याने हे सर्वजण या मोहिमेत सहभागी होतीलच"
पाठिंबा न देऊन जातील कुठे?तो तर द्यावाच लागेल..
@पाठिंबा न देऊन जातील कुठे?तो तर द्यावाच लागेल..››› ह्हा ह्हा हा!
काही मिपाकरांकडे भरभरुन ब्लॅकमनी आहे.
मी स्वत: पाहिलय..=))
कदाचित तीच असेल. तिलाही अशी दडवून ठेवायचे तिचे आई-वडील!
असं झालं तर...!
मी इथे अनेक धाग्यांवर १२० कोटी पापी लोक असा उल्लेख केला आहे. काहीना म्हातार्याचे डोके फिरले आहे असे वाटले असेल पण मिपाकरांशी खाजगीत चौकात बोलताना मी सामान्य माणूसही करप्ट आहे या ना त्या रूपाने हे माझे म्हणणे मांडले आहे. आता मी नवीन घर घेतले आहे . वीज कनेक्शन्चे चे ७५००० भरले आहेत. त्याचे सर्व बील वीज कंपनीने मला दिले का ? नाही. याचा अर्थ पैसे भरपूर खाल्ले गेले. आपण जरी चेकने केले तरी बिल्डरला ते पैसे अनेक जागी रोख द्यावे लागतात. त्यामुळे थेरोटेकली मी थेट लाच दिली नाही. पण ती दिली गेली हे उघड आहे.
आजही माझे म्हणणे मी इथे ठामपणे मांडतो की आयकर खाते हेच सगळ्यात ढोंगी खाते आहे. आमचे सगले लक्ष तुमच्यावर आहे अशी जाहिरात करते व सरसकटपणे ज्याचा रिफंड नाही किंवा मामुली आहे त्याला ओके करते. या ऐवजी त्यानी सर्व लिन्कस जोडून आयकर बील दिले व ते बील चुकीचे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी पॅन धारकावर टाकली तर त्याना पैसे खाता येणार नाहीत. पूर्वी वीज मंडळात , पाण्याच्या बीलात पैसे खाउन अॅडजेस्ट करण्याचे प्रकार चालत असत. आता मीटरचा फोटो येत असल्याने ते बंद झाले आहे. आयकर रेटर्न ही जबाबदारी कायद्याने पूर्ण बन्द करून " आयकर बील" ही पद्धत चालू केली तर आपण मुकाटपणे जसा आता जी एस टी भरणार आहोत तसा आयकरही भरावा लागेल. अनिल बोकिलाना दोन मागण्यासाठी १६ वर्ष लागली माझ्या मागणीला ११६ लागतील हे भय आहे.
या ऐवजी त्यानी सर्व लिन्कस जोडून आयकर बील दिले व ते बील चुकीचे आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी पॅन धारकावर टाकली तर त्याना पैसे खाता येणार नाहीत.काका, +११६ नव्हे, -१५५ वर्षं. भारतातला पहिला आयकर (१८६१) याचप्रकारे चालत असे.
तो निसंदीग्ध अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे. आपल्या देशातले सर्वच १२५ करोड लोक प्रामाणिक आहेत. ते कुठलाच लहान सहान भ्रष्टाचार करत नाहीत. ९० % लोकांचा पाठींबा मिळालाच ही सर्व विधाने भाबडी व पुर्ण सत्य नाहीच. इतका भाबडेपणा मात्र सर्व लोकांच्या डोक्यात आहे असे वाटत नाही. मात्र तरी तरी तरी
मोदींच्या निर्णयाच्या नियतवर हेतुवरच जो संशय घेतला जातो त्याला केवळ मोदींचा निर्णय म्हणुन जो विरोध केला जातो. तो अत्यंत चुकीचा आहे असे माझे स्पष्ट मत आहे. कारण इतक्या धाडसाने आजवर कुठल्याच सरकारने इतका स्वतःच्या करीयरला पार्टीच्या हिताला इतक्या धोक्यात टाकुन इतका मोठा स्टेक लावुन निर्णय घेतलेला नाही.
तज्ञांची मतेही एकतर्फी नाहीतच की या निर्णयाने निसंदीग्ध तोटाच होइल इतकीच नाही व या निर्णयाने स्वर्ग अवतरेल इतकीच नाही. दोन्ही कडे व दोन्हीच्या मधल्या स्पेस मध्ये सर्व तज्ञ विभागले गेले आहेत. अशा वेळी एका प्रमाणात या निर्णयाने नक्कीच फायदा होणार आहे हे उघड सत्य आहे. त्याहुन महत्वाच तितकी प्रबळ इच्छाशक्ती मोदींनी दाखवलेली आहे. त्याचे स्वागत व सहकार्य विरोधाच्या मुद्द्यासहीत करण्यास काहीच हरकत नाही नसावी.
केवळ विरोधासाठी विरोध केवळ मोदींचा निर्णय म्हणुन प्रत्येकच निर्णयाला विरोध हे मला तरी पटत नाही.
विरोधाचे स्वातंत्र्य मान्य करुन.
कारण इतक्या धाडसाने आजवर कुठल्याच सरकारने इतका स्वतःच्या करीयरला पार्टीच्या हिताला इतक्या धोक्यात टाकुन इतका मोठा स्टेक लावुन निर्णय घेतलेला नाही.+१... निर्णयाच्या फायद्याबद्दल किंवा अंमलबजावणीबद्दल मतमतांतरे असु शकतात. पण निर्णयाच्या नियतवर शंका घ्यायला जागा नाही.
मार्मिकतेने उडदामाजी काळे गोरे या रीतीने मांडलेला आहे.
त्यांचा अजुन एक मुद्दा प्रत्येक बाबीला मोदी वा मोदीविरोध या मर्यादीत परीप्रेक्ष्यातुन पाहणे हे किती चुकीचे आहे हे ही त्यांनी फार योग्य रीतीने दाखवलेले आहे.
माझे विचार त्या बाजुने जातात.
मोदींचा या निर्णयामागील हेतुत मला काहीच गैर आढळत नाही. त्यांचे धाडस मला कौतुकास्पद वाटते. या निर्णयाला माझा पुर्ण पाठींबा आहे. या निर्णयामुळे नक्कीच प्रामाणिक माणसाला पहील्यांदा या देशात एक आनंद अभिमान वाटत आहे. आपली गिनती जो आजपर्यंत चुत्यात झाली असे समजत होता त्याला कुठेतरी मोठा दिलासा या निर्णयाने मिळालेला आहे.
अर्थात यानेच स्वर्ग अवतरेल वा यात सामान्य जनतेला काहीच त्रास होत नाही वा सहन कराच लेकहो कसेही असेही मला वाटत नाही. व ज्या रीतीने अगोदर जनधन नंतर जीएसटी नंतर डिमॉनेटायझेशन हे ज्या क्रमाने केले गेले त्यावरुन मोदीही केवळ इथेच थांबतील व झाले बस आता असे नक्कीच होणार नाही हे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी त्याची हिंट ही स्पष्टपणे दिलेली आहे. त्यामुळे व मागील जनधन जीएसटी डिमॉनीटायझेशन या तीघांची जरी पुण्याई धरली जे प्रत्यक्षात केले गेले तरी मोदींची बाजु योग्य व भक्कम आहे. यावरुनच ते पुढे अजुन पाऊले उचलतील हे पटते.
म मो बोलते झाले अन चाचा लिहिते झाले हेच लै झाले की...
चच्चा के थयो ? इनकम टॅक्सवालो नोटिस दियो के ? ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मनमा इमोशन जागे रे... ;) :- Dilwaleलाच देणे भाग पडले आणि लाच घेतल्याची कोणी पावती देते कां असे सोयीस्कर रित्या म्हणुन सामान्य माणूस स्वतःचा बचाव करू शकतो.जर लाच ( प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ) दिली नसती तर होणारे वा अपेक्षित काम झाले नसते, ह्याला जबाबदार सामान्य माणूस असु शकतो काय ? " देवा, मला मुलगा होऊ दे, मी तुझा नवस फेडीन," अशी लाच मुलाच्या जन्मा अगोदर पासुन परमेश्वराला दिली जाते. शाळेत जाणार्या मुलांना,' अभ्यास कर तर पास होशील ' या ऐवजी ' देवाला नमस्कार कर, जरुर पास होशील ' असे सांगितले जाते. तेंव्हा ह्या विषयासंबंधी " कोळसा उगळावा, तेव्हढा काळाच " अशी परिस्थिती आहे असे वाटते.अर्थात यावर काहीच उपाययोजना नाही काय ? तर उपाय असतीलच, फक्त अंमलात आणण्याची इच्छाशक्ति हवी.
थत्ते चाचांनी इतके सगळे लिहिले आहे तर त्यांनी यापैकी काही केले असल्यास इथे जाहीर करावे ही नम्र विनंती. त्यापैकी किती डिक्लेयर करुन त्यांनी कर भरला आहे ते देखील जाहीर केल्यास येथील लोकांना एक आदर्श उदाहरण घालुन दिले जाइल.
मी काही काळापुरता ऑफिसचा खोडरबर चुकुन घरी नेला होता. १५ - २० दिवसांनी लक्षात आले तेव्हा परत आणुन दिला. मधल्या काळात ते माझे टॅक्सेबल इन्कम होइल काय आणि मला त्यावर (खोडरबराचे डेप्रिसियेशन, शेल्फ लाइफ वगैरे लक्षात घेता त्याच्या वार्षिक करपात्र रकमेच्या गुणोत्तरात २० दिवसांसाठी किती करपात्र उत्पन्न होइल कोण जाणे) कर भरावा लागेल काय? खोडरबर साधारन ७ - ८ रुपयाचे असेल कदाचित. जर ते करपात्र उत्त्पन्न होणार नसेल अणी मी त्यावर कर भरणार नसेल तर थत्ते चाचा आणि खान्ग्रेस मला देशद्रोही तर जाहीर नाही ना करणार?
बाकी ते कर भरण्याचे इतके काय घेउन बसलात थत्ते चाचा. शेवटी तुम्हाला माहिती आहेच ना "इन द लाँग रन वी ऑल आर डेड"
थत्ते चाचांनी इतके सगळे लिहिले आहे तर त्यांनी यापैकी काही केले असल्यास इथे जाहीर करावे ही नम्र विनंती. त्यापैकी किती डिक्लेयर करुन त्यांनी कर भरला आहे ते देखील जाहीर केल्यास येथील लोकांना एक आदर्श उदाहरण घालुन दिले जाइल."आधी केले मग सांगितले" असा प्रकार व्हायला हवा उगाच "उंटावरून शेळ्या हाकण्यात" काय अर्थ आहे.
मी यातले काहीही केलेले नाही. (म्हणजे जी गैरव्यवहारांची उदाहरणे दिली आहेत तशा प्रकारचे काही केलेले नाही). त्यामुळे डिक्लेअर करून कर/दंड भरण्याचा प्रश्नच येत नाही.
बाकी जाऊदे पण इथे बरेच लोक "थत्ते चाचा" असा शब्दप्रयोग करताना दिसले. तो हिणवण्यासाठी आहे का?
त्यांचे विचार आपल्या विचारांशी जुळत नाही म्हणून ते 'आपल्यातले' नाहीत हे सिद्ध करायला "चाचा" म्हणण्याचा खटाटोप का?
मोगा ला "खान" म्हटले गेले इथे थत्तेंना "चाचा" म्हटले जातेय. बर हे करणारे ट्रॉल आयडी नाहीत!
धर्मद्वेष किती खोल पर्यंत गेला आहे हे जरा मनाला वाटलं तर बघा...
(आता नेहमीप्रमाणे साळसूदपणाचा आव आणून "आमच्यामते चाचा हा आदरार्थी शब्द आहे वगैरे प्रतिक्रिया पडल्या जातील")
चिल माडी......
चाचा ही उपाधी हे लोक मिपावर यायच्या आधीपासून आहे. :)
हे लोक म्हणजे मृत्युंजय नाहीत. ते माझ्या आधीपासून मिपावर असावेत.
मी पण तुमच्या आधीपसून मिपावर आहे हां.
मी तर तुझ्याही आधीपासुन मिपावर आहे... ;) फकस्त ३ महिन्याचा फरक !
मिपाचा पहिला लॉगिन कधी केला गेला ? आयडी कधी निर्माण झाला ? याविषयी माहिती मिळवणे शक्य आहे काय ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Indian Army Amazing Talent Video... :)
बाकी माहीत नाही. http://www.misalpav.com/comment/11749#comment-11749 हा तुझा मिपावरचा पहिला प्रतिसाद दिसतो आहे.
म्हणजे नेहरूचाचा हे पण धर्मद्वेष्टी संबोधन आहे/होते की काय ? ;) =))
आलाच प्रतिसाद! :)
ते मिपावर नव्हते ना!!
"खान" देखील धर्मद्वेष्टी संबोधन नाहीये!
जर काडी टाकायची म्हटली तर "भट" देखील नाही. पण ते कशापद्धतीने वापरले जातेय ते पाहून सुज्ञ माणसाला कळू शकते.
आपल्याला हे कळत नसेल असे वाटत नाही पण 'सोयीस्कर' पट्टी सगळ्यांकडेच आहे!
अहो, थत्तेंना हे संबोधन मिपावर फार पूर्वीपासून वापरले जात आहे आणि त्यासंबंधी त्यांनी कधी निषेध व्यक्त केलेला दिसला नाही. पण आता कोणी त्याला पकडून धाग्याचे काश्मीर करण्याचा प्रयत्न काहीसा विनोदी वाटला म्हणून आमचाही क्षीण विनोदाचा प्रयत्न :) (स्मायल्या पाहिल्या नाही काय ?!)
छोट्या छोट्या गोष्टीत इतके काकदृष्टीने पाहणे बरे नाही. वर कोणीतरी म्हटलेच आहे, चिल् माडी.
आणि हो, हा लेख थत्तेकाकांनी (बघा चाचा नाही काका म्हटले आहे ;) ) फार निरागसपणे लिहिला आहे असा समज असल्यास अभ्यास वाढवावा लागेल, असे वाटते.
फार निरागसपणे लिहिला आहे असा समज असल्यास अभ्यास वाढवावा लागेल,लेखातील मेख बरोबर ओळखली आहे.:)
थत्ते चाचा आणि थत्ते चिच्चा या उपाध्या श्री. थत्ते यांना फार पुर्वीपासुन आहे. मी जेव्हापासुन त्यांचे प्रतिसाद आणि त्यावर येणारे इतरांचे प्रतिसाद वाचत आहे तेव्हापासुन हे असेच आहे. थत्ते काका / चाचा मिपावर कधीपासुन आहेत हे मला माहिती नाही. मी कधीपासुन आहे हे देखील नीटसे आठवत नाही. पण अॅक्टिव्ह गेल्या ५ एक वर्षात झालो.
थत्ते हे आडनाव हिंदु आहे. आडनावावरुन जात / धर्म ओळखण्याची कला मला फारशी अवगत नाही पण ओळखीत एक थत्ते आहेत त्यामुळे मला हे हिंदु उपनाम आहे हे मला माहिती आहे. थत्ते चाचा धर्म मानतात की नाही आणि मानलाच तर ते हिंदु नसुन मुस्लिम / शीख / बुद्ध यापैक्की काही असल्यास मला माहिती असण्याचे काही कारण नाही.
थत्ते चाचांना चाचा म्हणुन संबोधण्यामागे त्यांच्या धर्माचा काही द्वेष करण्याचे काही कारण मला दिसत नाही कारण मुळात त्यांचा धर्म हिंदु सोडुन इतर काही आहे याचा विचारच केला नव्हता (आधी म्हटल्याप्रमाणे हिंदु उपनाम असल्याने ते हिंदु आहेत असा (गैर) समज झाला होता.
चाचा हा आदरार्थी शब्दच आहे. इथे तो आदरार्थी अथवा अनादरार्थी असा कुठल्याही प्रकारे न वापरता सवयीनुरुप वापरण्यात आला आहे.
तुम्ही लोक खुपच असहिष्णु झाल्यामुळे तुम्हाला जिकडे तिकडे एका विशिष्ट धर्माचा द्वेष दिसु लागला आहे. त्याला आम्हा सामान्य मिपाकरांचा नाइल्लाज आहे. त्यातुन माझा धर्मद्वेष नाही तर तुमची टोकाची असहिष्णुता दिसते. याचा निषेध म्हणुन शतशब्दकथेत मला मिळालेले पुस्तक मी मिपा व्यवस्थापनाला परत करु इच्छितो. जर नीलकांतने एखादा माणुस पुस्तक कलेक्ट करायला पाठवुन दिल्यास मी ताबडतोब ते पाठवुन देइन (मी कुरियचा खर्च का करावा? पुणेकरांना इतका वायफळ खर्च मानवत नाही). मिपावरच्या वाढत्या असहिष्णुतेकडे बघता नीलकांतने ताबडतोब मालकपदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करायचाही विचार होता पण पदरचे पैसे खर्च करुन लोकांसाठी इतकी सुविधा अजुन कोण उपल्ब्ध करुन देणार (आणी काय ग्यारंती की त्यानंतर असहिष्णुता कमी होइल) त्यामुळे विचार मागे घेतला.
तळटीपः
१. जवाहरलाल नेहरुंना चाचा नेहरु म्हणायचे असे ऐकुन आहे. माझ्या जन्माच्या आधी लिहिल्या गेलेल्या पुस्तकामध्ये हा उल्लेख सापडतो. त्यामुळे निर्माण झालेल्या द्वेषाला मी जबाबदार नाही ( शाळेच्या उत्तरपत्रिकेत कधीतरी मी जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख चाचा नेहरु असा केलेला पुसटसा आठवतो. १९९३ साली झालेल्या दंगली त्याचा तर परिपाक नसावा ना? हे देवा मला माफ कर).
२. थत्ते चाचा आपल्यातले आहेत की नाही ते माहित नाही. मात्र "आमच्यातले " नक्की आहेत. आपल्यातले होण्यासाठी तुमचा नक्की काय पात्रता निकष आहे ते माहिती नसल्याने त्याबद्दल टिप्पणी करत नाही. असे दिसते की जात / धर्म / भाषा / वर्ण आणी राजकीय विचार यांतुन कुणाला आपल्यातले म्हणावे आणि कुणाला वगळावे हे ठरवण्याची तुमच्याकडे पद्धत दिसते. तशी काही पद्द्धत आमच्याकडे नसल्याने त्याबद्दल आमचा पास समजावा.
जय हिंद.
अति अवांतरः जय हिंद म्हणाल्याने माझ्यातला धर्म द्वेष तर नाही ना दिसणार? मी नॉन सेक्युलर तर नाही ना गणला जाणार? जय हिंद च्या ऐवजी जय पाक बोलुन मी माझी धर्मनिरपेक्षता सिद्ध करणे अपेक्शित आहे काय??
तुर्तास वरील प्रश्नाचे उत्तर माहिती नसल्याने पुनःश्च जय हिंद.
चाचा हा शुद्ध हिंदी शब्द आहे.त्याचा कोणत्याही धर्माशी काहीही संबंध नाही.कावीळ झाली की जग पिवळे दिसते अशी म्हण आहे.
=))
कोणती ?