अविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४

Primary tabs

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जनातलं, मनातलं
1 Dec 2014 - 12:23 am

अविस्मरणीय दिवस : ३०/११/२०१४

योगायोग, अकस्मात, अनपेक्षित हे शब्द आपण नेहमीच वापरत असतो. पण आजच्या दिवसाचे वर्णन कसे करावे तेच मला सुचत नाही. आजचा दिवस माझ्यासाठी अकल्पित आणि अफ़लातून ठरला आहे.
आज "माझी गझल निराळी" चे समिक्षण दैनिक प्रहारमध्ये प्रकाशित झाले. आजच महाराष्ट्र टाईम्स मध्ये माझी "ऊठ मर्दा ऊठ" ही कविता प्रकाशित झाली, आज दैनिक सकाळमध्ये "शतवर्ष नरा" ही कविता छापून आली आणि....
मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आजचे ठिय्या आंदोलन पोलिसांची एकही लाठी न खाता, बंदुकीची गोळी न खाताच सहजतेने सुखासुखी पार पडले.
इतके सारे अनुकूल योगायोग एकाच दिवशी घडून येणे, हे फ़ारच विलक्षण आहे.
{आजचे ग्रहमान/कुंडली वगैरे कशी होती हे एखाद्या भविष्यवेत्त्याला/जोतिष्याला विचारावे कि काय, अशी मनात जिज्ञासा जागृत झाली आहे. ;) }
एवढे मात्र नक्कीच खरे की,
आजचा ३०/११/२०१४ हा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय दिवस ठरला आहे.

----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------
shetkari
----------------------------------------------------------------

वाङ्मयविचारसमीक्षा

प्रतिक्रिया

विनोद१८'s picture

1 Dec 2014 - 2:44 am | विनोद१८

'राणे ते पावर व्हाया टाइम्स'.....!!!! कसे काय जमले हो ??? डायरेक्ट सेंचुरी.

पुन्हा अभिनंदन

गंगाधर मुटे's picture

4 Dec 2014 - 2:26 pm | गंगाधर मुटे

कसे काय जमले हो ???

कदाचित जोतिष्यकार याचे उत्तर देऊ शकेल. तुम्हाला कुठून उत्तर मिळाले तर मला सांगायला मात्र विसरू नका. :)

शेखर काळे's picture

1 Dec 2014 - 5:25 am | शेखर काळे

मुटेसाहेब .. अनेकवार अभिनंदन आणि शुभेच्छा ..

गंगाधर मुटे's picture

4 Dec 2014 - 2:24 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद.

यशोधरा's picture

1 Dec 2014 - 6:07 am | यशोधरा

शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्या का हो?

गंगाधर मुटे's picture

4 Dec 2014 - 2:31 pm | गंगाधर मुटे

प्रत्येक अवस्थेला आणि व्यवस्थेला एक ना एक दिवस अंत असतोच.
त्वरा करा आणि शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबायच्या आत जेवढा आनंद उपभोगायचा तो भोगून घ्या! नाही तर अकस्मात आत्महत्त्या थांबल्या तर हिरमोड व्हायला नको.!!

यशोधरा's picture

5 Dec 2014 - 7:52 am | यशोधरा

शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबायच्या आत जेवढा आनंद उपभोगायचा >> सिरियसली? स्वतःलाच सांगताय का काय?

शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या सुरुच असताना आणि इतरही अनेकविध शेतीविषयक प्रश्न अजूनही तसेच लोंबळकत असताना, कविता छापून आल्या म्हणून आनंदोत्सव तुम्हीच तर साजरा करत आहात. शेतकर्‍यांचं नशीब वापरत आहात जणू सो कॉल्ड आंदोलनं आणि कविता करायला, तेव्हा आनंद कोण साजरा करतं आहे हे शेतकर्‍यांना समजेल तो त्यांच्यासाठी आणि शेतीसाठी सुदिन म्हणायचा. :)

गंगाधर मुटे's picture

6 Dec 2014 - 12:39 am | गंगाधर मुटे

शेतकरी आत्महत्त्या करतायत म्हणून रात्रंदिवस अश्रू ढाळण्याचे ढोंग करणे सध्यातरी मला जमत नाही.

शेतकरी आत्महत्त्या ह्या भावनीक विषयाशी निगडीत नसून सरकारच्या आर्थिक धोरणांशी निगडीत असल्याने मुळूमुळू रडत बसण्यापेक्षा जमेल त्या मार्गाने शेतकरी विरोधी व्यवस्थेशी दोन हात करणे, हाच माझा धर्म आहे.

.... आणि या प्रयत्नात कोणी आडवा आला त्यालाही तुडवून पुढे जाणे, हाच शेतकरी आत्महत्त्या सोडवणुकीचा मार्ग आहे.

त्यामुळे माझ्या व्यक्तीगत आयुष्यात जर दोन क्षण आनंदाचे आले तर त्याचा उत्सव साजरा करण्यात मला संकोच वाटण्याचेही कारण नाही.

दिनेश सायगल's picture

6 Dec 2014 - 9:19 am | दिनेश सायगल

सवंग जाहिरातबाजी आणि उत्सव यात फरक आहे.

गंगाधर मुटे's picture

6 Dec 2014 - 7:16 pm | गंगाधर मुटे

मिसळपाववर लेख लिहिल्याने सवंग जाहिरातबाजी कशी काय होते ते जरा समजून सांगता काय?

प्रभाकर पेठकर's picture

6 Dec 2014 - 10:50 am | प्रभाकर पेठकर

शेतकरी आत्महत्त्या करतायत म्हणून रात्रंदिवस अश्रू ढाळण्याचे ढोंग करणे सध्यातरी मला जमत नाही.

हं आत्ता कसं बोललात...! फक्त शहरी, सुजाण आणि सुशिक्षित माणसाचंही असंच आहे एव्हढ मात्र शेतकरी नेत्यांना (योग्य असूनही 'तो' शब्द मी टाळला आहे, हं!) दिसत नाही.

त्यामुळे माझ्या व्यक्तीगत आयुष्यात जर दोन क्षण आनंदाचे आले तर त्याचा उत्सव साजरा करण्यात मला संकोच वाटण्याचेही कारण नाही.

अहो अगदी बरोबर. बिगरशेतकरी माणूस सुद्धा आपलं आयुष्य असंच, स्वतःच्या डोंगराएव्ह्ढ्या समस्यांना तोंड देत, आत्महत्या न करता, जगत असतो. त्याच्याही आयुष्यात कांही आनंदाचे क्षण आले तर तो न संकोचता त्याचा उत्सव साजरा करायचा प्रयत्न करीत असतो. त्याला मात्र तुम्ही 'असंवेदनशील' असा शब्द वापरून हिणवता, हे कितपत योग्य आहे?

गंगाधर मुटे's picture

6 Dec 2014 - 7:25 pm | गंगाधर मुटे

शहरी-बिगरशहरी, शेतकरी -बिगरशेतकरी असा भेदाभेद करण्यासारखे काहीही कारण नसल्याने तसा भेदाभेद करण्याचा किंवा तसा विचार मनाला शिवण्याइतके कोतेपणा माझ्याकडे नाही.
तुम्ही वारंवांर ही एकच बाब घोळल्याने मी बदलणार नाही.

समजून घेता येत असेल तर भारत आणि इंडियाशोषक आणि शोषित समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुमचे अनेक गैरसमज दूर होतील.

-------------------------------------------------

संपादित

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2014 - 1:58 pm | प्रभाकर पेठकर

तुमचा हा (आणि असे ह्या आधीचे इतर धागे) धागा तुम्हीच वाचा.

आतापर्यंत लाखोच्या संख्येने शेतकरी आत्महत्या झाल्यातरी मख्ख असणारा समाज दिल्लीत एका मुलीवर बलात्कार होऊन खून झाल्याबरोबर रस्त्यावर उतरतो, मेणबत्त्या पाजळतो, सर्वत्र हाहाकार माजेल इतपत निदर्शने करतो, प्रसारमाध्यमातही रात्रंदिवस एवढ्याच एका मुद्द्याभवती रेंगाळत बसण्याची जणूकाही चढाओढ लागते; तेव्हा त्यामागे सुजाण आणि सुशिक्षित समाजाची संवेदनाशीलता नसते.

शेतकरी आत्महत्यांशी सुजाण आणि सुशिक्षित समाजाचे दूरान्वयानेही स्वार्थ आणि हितसंबंध गुंतलेले नसतात. आज आत्महत्या करण्याची वेळ त्या शेतकर्‍यावर आली, उद्या माझ्यावरही येऊ शकते, अशी भिती उत्पन्न व्हायचेही कारण नसते. त्यामुळे शेतकरी कितीही आत्महत्या करोत, सहा लाख शेतकरी आत्महत्या करोत की साठ लाख शेतकरी आत्महत्या करोत; हळहळण्याचे कारणच संपुष्टात आलेले असते.

एका मुलीच्या हत्त्येवर आकाश-पाताळ एक करणारा सुजाण आणि सुशिक्षित समाज शेतकरी आत्महत्यांवर गप्प का बसतो?

विचार मनाला न शिवण्याची इथे भाषा करताना, तसा धडधडीत कोतेपणा तुम्हीच तुमच्या वरील भाष्यातून केला आहे, हे सोयिस्कररित्या तुम्ही विसरू इच्छित असला तरी मिपा वाचक विसरलेला नाही.

आपल्याच लेखनाचा लिखित पुराव्यावरही कोलांट्याउड्या मारणार्‍याला काय म्हणतात हे मी सांगायला नकोच. दुसर्‍याच्या बुद्धीचा कोतेपणा काढण्याआधी एकदा आरशात निरखून पाहिल्यास तुमचेच अनेक गैरसमज दूर होतील.

उपस्थित मुद्द्यांना उत्तरे न देता, शब्दच्छल करीत, दूसर्‍यांना कमी लेखण्याचे प्रयत्न सफल होत नाहीत आणि तुमच्याकडे मुद्द्यांची उत्तरेच नाहियेत हेच वरचेवर सिद्ध होत आहे.

'बिगरशेतकर्‍यांच्या समस्या समजून घ्या, तुमचे सर्व गैरसमज दूर होतील' असे मी म्हणणार नाही कारण ती कुवत आणि इच्छा तुमच्यात नाही. जिथे शेतकर्‍यांच्या समस्याच तुम्हाला समजल्या नाहीत, आकांडतांडव न करता दूसर्‍याना समजवता आल्या नाहीत, जगात फक्त शेतकर्‍यांनाच नाही तर इतरांनाही समस्या असतात हा विचारच तुमच्या मनांत रुजला नाही तिथे बिगरशेतकर्‍यांच्या समस्या तुम्हाला कशा कळणार?

दहशतवाद्यांनी काश्मिरातून सर्व हिन्दूना विस्थापित केले. अगदी जेवणाच्या ताटावरून उठवून, हात धुवायची संधीही न देता घराबाहेर हाकलून दिले. त्यांची घरेदारे बळकाऊन बसले. तिथेही दहशतवादी आणि सरकारंच दोषी असूनही त्या बिचार्‍या विस्थापित काश्मिरी जनतेने कधी बिगरकाश्मिरी लोकांना, दिल्लीतील मुलीवर बलात्कार आणि खून झाल्यावर आंदोलनं करणार्‍या जनतेला 'असंवेदनशील' हे लेबल लावले नाही. दोषारोप केले नाहीत. तसेच, त्यांच्या विस्थापित अवस्थेवर शेतकर्‍यांनी कधी दोन टिपे गाळल्याचे ऐकीवात नाही. पण शेतकर्‍यांवर जेंव्हा वाईट परिस्थिती उद्भवली तेंव्हा शेतकरी वर्ग वगळता (म्हणजेच बिगर शेतकरी) 'असंवेदनशील' ठरतो. शेतकरी नेत्यांकडून(?) ठरविला जातो. तेंव्हा त्यामागचं नाघडं सत्य लपून राहात नाही. मढ्याच्या टाळूवरचं लोणीही चाटणार्‍या राजकारण्यांची संवेदनशीलता बिगरशेतकरी समाजात नाही ही मोठी भाग्याचीच गोष्ट म्हणावी लागेल.

तुम्ही वारंवांर ही एकच बाब घोळल्याने मी बदलणार नाही.

तुमचा स्वार्थ तुम्हाला बदलू देणार नाही.

गंगाधर मुटे's picture

7 Dec 2014 - 3:10 pm | गंगाधर मुटे

प्रभाकर पेठकर, तुम्ही बेछूट आरोप करत अंदाधूंद सुसाट वेगाने निघालेले आहात. माझा वरील उपप्रतिसाद संपादक मंडळाने संपादीत केल्यावर तुम्हाला आणखीनच स्फुरण चढल्याचे दिसत आहे. तुम्ही काहीही, कसेही अन कितीही लिहिले तरी संपादक मंडळ तुमच्या प्रतिसादांना हात लावत नाहीत मात्र मी लिहिले की काही मिनिटाच्या आतच कात्री चालायला लागते.

त्यामुळे सध्या थोडा विचार करत आहे. :)

प्रभाकर पेठकर's picture

7 Dec 2014 - 9:37 pm | प्रभाकर पेठकर

मुटे साहेब,

'असंवेदनशील समाज', 'बौद्धीक कोतेपणा', मी काय 'वाचून आणि समजून घेतले म्हणजे माझे गैरसमज दूर होतील' वगैरे वगैरे, माझे गैरसमज आहेत हे अधोरेखित करणारे, तुमचे समतोल आरोप वाचल्यावर मला माझी बाजू मांडणे आवश्यक नव्हते का?

तुम्ही काहीही, कसेही अन कितीही लिहिले तरी संपादक मंडळ तुमच्या प्रतिसादांना हात लावत नाहीत

कदाचित संपादक मंडळाला कोण बेछूट आरोप आणि मुद्द्याला सोडून लिखाण करीत आहे हे समजत असेल. मला स्फुरण चढण्याइतका उथळ स्वभावाचा मी नाही. मी लिहीताना तुमच्या लेखनाचा संदर्भ देतच माझे विचार मांडत आहे. तुम्हाला कांही वैयक्तिक रोख वाटून राग आला असेल तर माफी मागतो पण मुद्द्यांना सोडून लिहू नका. बिनबुडाचे शब्द वापरून थेट किंवा सूचित आरोप करू नका, चर्चा निकोप ठेवायचा प्रयत्न करा माझ्या कुठल्याच प्रतिसादात तुम्हाला आक्षेपार्ह कांही सापडणार नाही. शेतकरी आहात, 'जे पेरावे तेच उगवते' हे मी तुम्हाला सांगावे असे नाही.

गंगाधर मुटे's picture

8 Dec 2014 - 2:09 pm | गंगाधर मुटे

'सध्यातरी'मी उपप्रतिसाद लिहिण्याच्या 'अवस्थेत' नाही. :(

कलंत्री's picture

1 Dec 2014 - 10:36 am | कलंत्री

असा दिवस (फिल गुड) आपल्याला वारंवार लाभो.

गंगाधर मुटे's picture

4 Dec 2014 - 2:27 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद.

काळा पहाड's picture

1 Dec 2014 - 11:06 am | काळा पहाड

कुठला शेतकरी पायात बूट घालून फिरतो हो?

रामपुरी's picture

1 Dec 2014 - 11:30 pm | रामपुरी

स्वतःच्या चारचाकीतून (मुंबईत) आंदोलनाला येणार्‍या शेतकर्‍यांना बूट परवडत नसतील का?
अवांतरः या जमलेल्या गर्दीतले सगळे नक्की शेतकरीच असतील का? :) :) राजकीय सभांना लोक कसे गोळा केले जातात हे नव्याने सांगायला हवेच का?

गंगाधर मुटे's picture

4 Dec 2014 - 2:39 pm | गंगाधर मुटे

रामपुरी, एखाद्या विषयावर भाष्य करण्यापूर्वी थोडीफार माहिती गोळा करायला काय हरकत आहे?
तुम्ही त्या संघटनेबद्दल बोलता आहात की ज्या संघटनेविषयी तुम्हाला काहीही माहिती नाहीये.

(३०-३२ वर्षे स्वतःच्या खर्चाने काम करणारे लाखो पाईक या संघटनेला लाभले असेल, यावर तुमचा विश्वास बसूच शकणार नाही, याची मला खात्री आहे. :) )

यमकं जुळवायची म्हटली की तेवढ आलंच की हो. ;)

का नेहमीप्रमाणे ग्राहकच जबाबदार
नाही म्हणजे दूधसंघ आणि त्याचे सभासद ही "संवेदनाहीन्/फुकटी"शहरी माणसं नसतात.
आणि हो रस्त्यावर दूध ओतल्याने नक्की कुणाचा फायदा?
आता तरी नक्की ठरवाच शेतकर्यांची कोण खरी पिळवणूक्/अडवणूक करतयं ते!!

यसवायजी's picture

4 Dec 2014 - 2:39 pm | यसवायजी

ओ क्काक्का.. आता म्या काय केलं?? :(

गंगाधर मुटे's picture

4 Dec 2014 - 2:54 pm | गंगाधर मुटे

काय केलं? तुम्ही कधीतरी नक्कीच शेतकर्‍यांच्या बाजूने एखादा शब्द बोलला असाल.
शेतकर्‍यांच्या बाजूने बोलणे हा पुरातन शास्त्राप्रमाणे व भारतीय राज्यघटनेप्रमाणे भयानक अपराध आहे.

गंगाधर मुटे's picture

4 Dec 2014 - 2:43 pm | गंगाधर मुटे

शहरात सुद्धा खूप चांगली माणसे असतात हो नादखुळा. मात्र त्यात काही अवश्य "संवेदनाहीन आणि फुकटी" सुद्धा असतात. मात्र हे प्रमाण खेड्यांतील "संवेदनाहीन आणि फुकटी" माणसे यांच्याच आसपास असते. फारसा काही फरक नसतोच. ;)

आपण एवढे संवेदनाशील आहात आणी प्रत्येक गंभीर वाक्याला राम्देव बाबासारखा डोळा का मारताय?

नाखु's picture

5 Dec 2014 - 8:31 am | नाखु

तो प्रतिसाद तुम्हाला ब्याडा.
"यारीगे सम्भन्ध अदा अवारिगे उत्तरा कोड्तीनी"

यसवायजी's picture

5 Dec 2014 - 4:29 pm | यसवायजी

(नेनप इट्टीद्द नोडी) संतोष्वाईतू. :)

गंगाधर मुटे's picture

6 Dec 2014 - 12:30 am | गंगाधर मुटे

मस्नो जायलो येरालू काबा काबाखोडी. :)

गंगाधर मुटे's picture

6 Dec 2014 - 12:28 am | गंगाधर मुटे

दुग्धस्टाय नाळबट्टू येर्लू बहासा टाकलुगे तुमतीनी?

बैदू गलपिच्छे नदा प्रस्नू नदा उत्तरू वादतिनी!

गंगाधर मुटे's picture

4 Dec 2014 - 2:51 pm | गंगाधर मुटे

बहुधा तुम्हाला यम म्हणायचे असावे. क शेपटीसारखा चिपकलाय का त्याला? ;)

गंगाधर मुटे's picture

4 Dec 2014 - 2:47 pm | गंगाधर मुटे

पायाच्या संरक्षणासाठी पूर्वीपासून बुटच घालायचा शेतकरी. पूर्वी कातडीचा बुट घालायचा, मध्यल्या काळात टायरचा आणि हल्ली प्लॅस्टीकचा बुट घालतोय शेतकरी.
चपलेने शेतात काम करणे अवघड जाते. :)

योगी९००'s picture

1 Dec 2014 - 5:05 pm | योगी९००

मुटेसाहेब अभिनंदन आणि शुभेच्छा !! अछ्छे दिन आ गये है शायद...!!

असे दिवस वारंवार आपल्या सर्वांच्या नशिबात येओत...!!

गंगाधर मुटे's picture

4 Dec 2014 - 2:54 pm | गंगाधर मुटे

धन्यवाद.

पैसा's picture

7 Dec 2014 - 12:27 pm | पैसा

अभिनंदन आणि शुभेच्छा मुटेसाहेब!

मितभाषी's picture

7 Dec 2014 - 10:31 pm | मितभाषी

मुटेकाका अभिनंदन.

अवांतरः ज्यांनी कधी वावरात पाय ठेवला नाही अशा लोकांना कोलून टाका. मिपाच्या भाषेत फाट्यावर मारा. :)

गंगाधर मुटे's picture

9 Dec 2014 - 2:23 am | गंगाधर मुटे

धन्यवाद मितभाषी. :)

अवांतर : मी शेतकरी माणूस. मला माहित आहे की, निव्व़ळ पिकांची मशागत केल्याने पीक जोमदार येत नाही. चांगल्या उत्पादनासाठी निंदणी, खुरपणी अत्यंत महत्वाची असते. तण खणून काढावेच लागते, तणाकडे दुर्लक्ष करणे शेतकर्‍याला कधीच आवडत नाही. :)
शिवाय मध्येच किडीकिटकांचा प्रादुर्भाव वाढतो. फवारणी करावीच लागते.
रानडुकरे जेरीस आणतात, कधी वासकन अंगावर चाल करून येतात... आम्ही शेतकरी सार्‍यांना पुरून उरतो. ;)