दिलखेचक! रापचिक! धमाल!
हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा!
सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला.
Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली.
मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला.
मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला.
फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती!
शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो -
जे कट्ट्याला आले त्यांना सलाम!
जे नाही आले त्यांनाही सलाम!
जे वेळ काढून आले त्यांना सलाम!
जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम!
लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम!
या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम!
आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!
वाचने
69579
प्रतिक्रिया
220
मिसळपाव
प्रतिक्रिया
तोपर्यंत न येण्याचा बहाणा
In reply to आणि तयार झालं तरी by प्रचेतस
ब हाणा! ;)
In reply to तोपर्यंत न येण्याचा बहाणा by किसन शिंदे
टांगारूपणातून
In reply to ब हाणा! ;) by अत्रुप्त आत्मा
खरच महाकट्टा झालाय
क्या बात ! सहीच झाला की कट्टा
लीमाऊ ची इरा फार च गोड आहे
In reply to क्या बात ! सहीच झाला की कट्टा by स्रुजा
ओ येस!
In reply to लीमाऊ ची इरा फार च गोड आहे by सुबोध खरे
अगं मी खूपच उशिरा पोहोचले
In reply to क्या बात ! सहीच झाला की कट्टा by स्रुजा
अगं मी खूपच उशिरा पोहोचले
In reply to क्या बात ! सहीच झाला की कट्टा by स्रुजा
मस्त कट्टा झाला .
अपेक्षेपेक्षा फारच जोरात
:)
आवरा !! =)) =))
In reply to :) by नीलमोहर
ठ्ठो !
In reply to आवरा !! =)) =)) by सूड
एकदम ठोSSSSठो . ROFL
In reply to :) by नीलमोहर
अगगागागा =))
In reply to :) by नीलमोहर
आरारा...लै म्हन्जे लैच...तू
In reply to :) by नीलमोहर
टका-टक!
In reply to :) by नीलमोहर
चान चान!
In reply to :) by नीलमोहर
जबरा फोटू.
In reply to :) by नीलमोहर
आयला या कधी आलेल्या कट्ट्याला?
In reply to :) by नीलमोहर
च्यायला, टक्याचे भोंडल्यातला
In reply to :) by नीलमोहर
खतरनाक!
In reply to :) by नीलमोहर
आग्गागागागागा!
In reply to :) by नीलमोहर
हा हा..
In reply to :) by नीलमोहर
हसून हसून फुटले!!!!
In reply to :) by नीलमोहर
=)))))) अरारारा
आमचा उल्लेख झाला हे कळुन बरे
भारीय................यापेक्षा
वारल्या गेलो आहे फोटो पाहून.....
टकाचा शेवटचा फोटो कहर. डांगे
कोणाचं काहीही होवो, कट्ट्याला
उसातून आणलेला शर्ट आहे तो
In reply to कोणाचं काहीही होवो, कट्ट्याला by कंजूस
ओके, म्हणून उसाला इतके कोल्हे
In reply to उसातून आणलेला शर्ट आहे तो by टवाळ कार्टा
मांजरी आहेत त्या...बोक्याच्या
In reply to ओके, म्हणून उसाला इतके कोल्हे by सूड
मस्तच झाला महाकट्टा!!!
एकदम जंक्शन कट्टा !
केलात तर मागच्या वेळी केली
In reply to एकदम जंक्शन कट्टा ! by सस्नेह
ज ह ब ह री!!
ज ह ब ह री!!
ही सान्दय, होऊ अरे उ? आल इस
In reply to ज ह ब ह री!! by चांदणे संदीप
ही
In reply to ही सान्दय, होऊ अरे उ? आल इस by धनंजय माने
में तू फिने. नो सी कॉज़ अस ऑफ़
In reply to ही by चांदणे संदीप
ससुरे तुमको दसीयन बार बोले
In reply to में तू फिने. नो सी कॉज़ अस ऑफ़ by धनंजय माने
वोही वाला गांजा का भाईबा.
In reply to ससुरे तुमको दसीयन बार बोले by कैलासवासी सोन्याबापु
अध्यात्मिक वाटतंय का ?
In reply to वोही वाला गांजा का भाईबा. by धनंजय माने
एकदम ट्रान्स.
In reply to अध्यात्मिक वाटतंय का ? by खटपट्या
मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA
मस्त सविस्तर वृत्तांत.
In reply to मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA by नूतन सावंत
मी
In reply to मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA by नूतन सावंत
अहो दिलाय तुमचा फोटो अजयातैंना!
In reply to मी by अदि
लग्नात येऊन सुद्धा अल्बम
In reply to मी by अदि
लग्नात येऊन सुद्धा अल्बम
In reply to मी by अदि
रुसु नको बाई! राहून गेला एवढया फोटोत तुझा फोटो!
In reply to मी by अदि
कान पकडून आय माय स्वारी बरंका
In reply to मी by अदि
अप्रतिम
चांगला लिहिलाय वृतान्त
=)))
हाहाहा
In reply to =))) by अजया
दोनशे करा आता! जवळ आलंय.
दोनशे करा आता! जवळ आलंय.
स्टार्टर + जेवण रुपये ३००/-
In reply to दोनशे करा आता! जवळ आलंय. by धनंजय माने
चंगळ केलासा की लोकहो!
In reply to स्टार्टर + जेवण रुपये ३००/- by सुबोध खरे
केव्हाही या. NMSA घरचेच आहे.
In reply to चंगळ केलासा की लोकहो! by धनंजय माने
सोनेरी पेय माणशी २०० , ३
In reply to स्टार्टर + जेवण रुपये ३००/- by सुबोध खरे
माला दोन् च मिळाले.... :(
In reply to सोनेरी पेय माणशी २०० , ३ by टवाळ कार्टा
ह्या जागी जेवण करण्यासाठी मेंबर असावं लागतं.
In reply to दोनशे करा आता! जवळ आलंय. by धनंजय माने
विवेक पाटील यांना खरंच
In reply to ह्या जागी जेवण करण्यासाठी मेंबर असावं लागतं. by हेमन्त वाघे
तुम्ही येणार तर.....मी पण येणार !
In reply to विवेक पाटील यांना खरंच by धनंजय माने
सोनेरी पेयासाठी होवू द्या एक
In reply to तुम्ही येणार तर.....मी पण येणार ! by माम्लेदारचा पन्खा