✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

ब
बोका-ए-आझम यांनी
Sun, 07/03/2016 - 23:42  ·  लेख
लेख
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो. NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला. Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली. मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला. मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला. फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती! शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो - जे कट्ट्याला आले त्यांना सलाम! जे नाही आले त्यांनाही सलाम! जे वेळ काढून आले त्यांना सलाम! जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम! लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम! या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम! आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
वावर
समाज
राहणी
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
बातमी
अनुभव

प्रतिक्रिया द्या
69054 वाचन

💬 प्रतिसाद (220)

प्रतिक्रिया

पावसाळी अधिवेशनासाठी राजधानी

कंजूस
Mon, 07/04/2016 - 15:08 नवीन
पावसाळी अधिवेशनासाठी राजधानी म्हणून वाशी घोषित करावी असा ठराव मांडतो. ( हिवाळी अधिवेशनासाठी पुणे आहेच पण ते पिंपरीचिंचवड होण्याचा योग दिसतोय.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विपा

आम्ही अधूनमधून चुकचुकत होतो

सतिश गावडे
Mon, 07/04/2016 - 16:34 नवीन
आम्ही अधूनमधून चुकचुकत होतो की रेस्टोरंटचा स्टाफ ज्या पद्धतीने कुजबुज करतोय त्यावरुन हे लोक विपा काकाना सुनावणार काहीतरी आपण सारे गेल्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विपा

तुमची तक्रार केलीय त्या

नूतन सावंत
Mon, 07/04/2016 - 17:52 नवीन
तुमची तक्रार केलीय त्या मॅनेजारने*विंक*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विपा

अरे वा कट्टा दणक्यात झालेला

सूड
Mon, 07/04/2016 - 14:57 नवीन
अरे वा कट्टा दणक्यात झालेला दिसतोय.
  • Log in or register to post comments

भारी भारी भारी महाकट्टा...

विशाखा राऊत
Mon, 07/04/2016 - 15:00 नवीन
भारी भारी भारी महाकट्टा... खुप दिवसांनी सगळ्यांना एकत्र बघितले.. मज्जा केली असेलच
  • Log in or register to post comments

कट्टा आणि खादाडी

सुबोध खरे
Mon, 07/04/2016 - 15:17 नवीन
कट्टा आणि खादाडी पदार्थ कुणी आणले या फंदात न पडता मी खात होतो यात आप्पे सुरळीच्या वड्या बाकरवड्या चिकन टिक्का पनीर मांचुरियन मनचाव सूप नवरतन कुर्मा व्हेज कढई पंजाबी रोटी दाल तडका आणि जीरा राईस आसा भक्कम मेनू होता.शेवटी मलई कुल्फीने उपासाचं पारणं फेडलं.आम्ही काही बारीक मंडळीनी चिकन टिक्का आणि कुलफी दोनदा घेतली. म्हटलं होउ द्या खर्च मिपा आहे बर्प आपलं घरचं
  • Log in or register to post comments

बर्प

धनंजय माने
Mon, 07/04/2016 - 15:20 नवीन
बर्प (हा/ही तृप्तीचा/ची ढेकर काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

कट्टा जबरदस्त झाला ..

हेमन्त वाघे
Mon, 07/04/2016 - 15:26 नवीन
प्रथम बोका भाऊ चे संकल्पनेबद्दल आणि पाटील भाऊचे आयोजनाबद्दल आभार . NMMC हि जबरदस्त जागा होती , आणि फक्त खास सदस्यांबद्दल असलेल्या क्लब चा आम्ही चांगलाच (गैर ) फायदा घेतला ! आणि हा आता माझा दृष्टीकोण – मला खरेच इतकी धमाल येईल असे वाटले नाही . मी विचार केला होता कि जर कंटाळवाणा प्रकार असेल , फक्त आधीच ओळख असलेले लोक बोलत असतील , किंवा काही गंभीर चर्चा असेल ( आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार किंवा समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील का ?) वगैरे तर “कलटी “ मारून सतकायचे असे स्वताशीच ठरले होते . पण गेल्यानन्तर १५ मिनिटात हे मी विसरलो आणि शेवटपर्यंत थांबलो . अनेक जणांशी विविध विषयांवर चर्चा केली , गप्पा मारल्या आणि खरेच धमाल आली ! गेल्या १०-१२ वर्षात एकटेपणा वाढला होता .... अनेकदा समारंभात जाऊन कोणाशीही फारसे न बोलता निघून येण्याची वृत्ती वाढली होती . आपण बरे कि आपले काम बरे . त्यामुळे मी खरोखरच विचार करीत होतो कि जावे कि न जावे .. पण या महा कट्ट्याने सर्व संशय खोटे ठरवले ! तसेच मी गेल्या वर्षी एका प्रसिध्ध आणि जुन्या संस्थलाच्या पावसाळी सहलीला गेलो होतो ; त्याची तुलना करावीशी वाटते . त्या “पावसाळी सहलीत “ जणू मी कोरडाच गेलो आणि कोरडाच आलो. तेथे अनेक जुने सदस्य आपापल्या तच गप्पा मारण्यात व्यग्र होते . ती सहल खरेच उत्तमपणे आयोजित केली होती पण मलाच तिकडे कंटाळा आला. न कोणी माझा फोने घेतला न मी कोणाचा .. आणि या सहलीनंतर न कोणी माझ्याशी संपर्क केला न मी कोणाशी .( नन्तर मला त्या संस्थळ वरून काढून टाकण्यात आले ;) दुसर्या कारणाने !) मिपा कट्ट्याचे माझ्या दृष्टी ने हेच यश आहे कि मी पुढच्या कट्ट्याची आतुरतेने वाट बघत आहे . तर केंव्हा करायचा कट्टा ??
  • Log in or register to post comments

( आधुनिक मराठी साहित्याचा

कविता१९७८
Mon, 07/04/2016 - 15:42 नवीन
( आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार किंवा समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील का ?) असल्या विषयांवर चर्चा असती तर मी मिपा कट्ट्यांना कायमचं बाय बाय केलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

तर केंव्हा करायचा कट्टा ??

मुक्त विहारि
Mon, 07/04/2016 - 15:46 नवीन
तुम्ही म्हणाल तेंव्हा आणि तुम्ही ठरवाल त्या जागेवर. पण कट्टा करायचा असेल तर दसर्‍याआधी केल्यास, मला जमू शकेल. दसर्‍यानंतर फक्त शेती एके शेती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

ओ मुवी....

अनिरुद्ध प्रभू
Mon, 07/04/2016 - 15:48 नवीन
रच्याकाने मुवी रत्नागिरी कट्ट्याचा व्रुतांत कधी टंकताय?.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आज वेळ मिळाला....

मुक्त विहारि
Mon, 07/04/2016 - 17:25 नवीन
ही ह्या लिंक. http://misalpav.com/node/36566
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प्रभू

स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानता?

गॅरी ट्रुमन
Mon, 07/04/2016 - 15:49 नवीन
काही गंभीर चर्चा असेल ( आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार किंवा समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील का ?)
स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानता? बापरे. हे वाचूनच घाबरायला झाले :) . कट्ट्याला असले विषय पूर्ण वर्ज्य असतात :)
तर केंव्हा करायचा कट्टा ??
मोठे कट्टे तर जेव्हा होतील तेव्हा होतीलच. पण आपण नवी मुंबईकर मिनी कट्टे करूच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

वरील विधाने

हेमन्त वाघे
Mon, 07/04/2016 - 17:12 नवीन
वरील विधाने आणि शब्द मूळचे पु . ला. चे आहेत ( खोगीर भरती - लेख - नाटक कसे बसवतात ) हे नम्रपणे नमूद करू इच्छितो !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

काढा धागा! आपण कॅमेरा घेऊन तयार आहोत!

बोका-ए-आझम
Mon, 07/04/2016 - 21:05 नवीन
काय म्हणता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमन्त वाघे

भारी झालेला दिसतोय कट्टा !

नीलमोहर
Mon, 07/04/2016 - 16:19 नवीन
' सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम! आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!' - याशिवाय आपल्या मिपा मालकांना जोरदार सलाम !! टकाला कोणी फटके दिलेले दिसले नाही, त्यामुळे बाकरवडी, आंबाबर्फी कॅन्सल.
  • Log in or register to post comments

टक्या ला फटके दिल्यास

धनंजय माने
Mon, 07/04/2016 - 16:40 नवीन
टक्या ला फटके दिल्यास आंबाबर्फि बाकरवड़ी का.... चला, सुपारी उचलली आहे. (टक्या तुला व्यनि करतो रे ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

तू येच चायला....आम्च्या मागे

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 17:02 नवीन
तू येच चायला....आम्च्या मागे मिपावर्चे एक भारदस्त व्यक्तिमत्व आणि तमाम अनाहिता ग्यांग आहे ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

हे आकाशातल्या बापा, या अजाण

धनंजय माने
Mon, 07/04/2016 - 17:16 नवीन
हे आकाशातल्या बापा, या अजाण बालकास क्षमा कर. हा कुणाच्या जीवावर काय बोलतोय याचं याला समजत नाहीये. (च्यायला टक्या, नीमो ला पाहिजेत फटके दिलेले फोटो, ते आपण सहज मॅनेज करु. नंतर आम्बा बर्फी आणि बाकरवडी ३०-७० ला शेयर करुन घेऊ की! ३० तुझे ७० माझे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ती ऑफर तुमच्यासाठी नाही हो प्यारे जी,

नीलमोहर
Mon, 07/04/2016 - 20:03 नवीन
पण तुमच्यासाठीही सेम ऑफर ठेवता येईल, फटक्यांऐवजी डंडे हा बदल करून आणि भेट म्हणून काका हलवाईंची रसमलाई अ‍ॅड करता येईल. काय म्हणता ? (तुम्ही फोटो मॅनेज करण्याआधी मीच केलेला आहे, आता उद्या जाऊन चितळेंचे गुलाबजाम आणणे आले, धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

भलाई का ज़माना ही नहीं रहा!

धनंजय माने
Mon, 07/04/2016 - 20:30 नवीन
भलाई का ज़माना ही नहीं रहा! मेरकु काय को डंडे होना यारो??? भाई बोलके सलाम करे तो भी मेरेकुच मारते? माँ की किरकिरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

तेच तर,

नीलमोहर
Mon, 07/04/2016 - 20:41 नवीन
भाई म्हणता म्हणून डंडे, बहन म्हणा बरं, नाही कुठल्याही देशाच्या कुठल्याही कोपर्‍यात राखी कुरियर केली तर सांगा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

लेकिन आप तो ड्यू आयडी हो! भाई

धनंजय माने
Mon, 07/04/2016 - 21:13 नवीन
लेकिन आप तो ड्यू आयडी हो! भाई बोलना च बेटर है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

हो?

नीलमोहर
Mon, 07/04/2016 - 22:49 नवीन
केवढी खात्री तुम्हाला माझ्याबद्दल, माझ्यापेक्षाही जास्त. त्या अथांग धाग्यात एक सेल्फीट टाकलाय बघा, खास मला डू वगैरे समजणाऱ्यांना समर्पित, खात्री करून घ्या :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय माने

तुम्ही हम पाँच नावाची झी वरची

धनंजय माने
Mon, 07/04/2016 - 23:30 नवीन
तुम्ही हम पाँच नावाची झी वरची सीरियल नव्हता का बघत? काजल भाई माहिती असेल ना? (अशा रीतीने १५० झालेले आहेत. आम्ही स्वेच्छा निवृत्ति घेतो)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

टकाला कोणी फटके दिलेले दिसले

अजया
Mon, 07/04/2016 - 17:29 नवीन
टकाला कोणी फटके दिलेले दिसले नाही, त्यामुळे बाकरवडी, आंबाबर्फी कॅन्सल.
हे आधी सांगायचे ना निमो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

:(

नीलमोहर
Mon, 07/04/2016 - 19:56 नवीन
हे काय आधी सांगितले होते की हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

रैवारच्या गडबडीत लिहिलं तू

अजया
Mon, 07/04/2016 - 20:04 नवीन
रैवारच्या गडबडीत लिहिलं तू.नाहीतर हाणलं असतं ना एवढं तू म्हणतेस तर ;) आंबाबर्फीसाठी कायपन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

जाऊद्या,

नीलमोहर
Mon, 07/04/2016 - 20:12 नवीन
तुम्हाला तशीच देईन आंबाबर्फी, गोड आहात तुम्ही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

झकास!

पैसा
Mon, 07/04/2016 - 16:34 नवीन
कट्ट्याला यायची खूप इच्छा होती. पण काही कारणांनी जमले नाही. पुढच्या वेळी बघू. माझी आठवण काढल्याबद्दल खूप धन्यवाद! चांगलेच बोलला असाल! =)) वल्ली, अजया आणि टक्कुमक्कुशोनु यांच्याशी फोनवर बोलले. टक्कुमक्कुची चौकशी करायची होती ती करून झाली. फोटो बघून डोळ्याचे पारणे फिटले आहे.
  • Log in or register to post comments

मजा आली, छान वाटले सगळे,

कैलासवासी सोन्याबापु
Mon, 07/04/2016 - 16:45 नवीन
मजा आली, छान वाटले सगळे, मंडळींच्या चेहऱ्यावर असलेला आनंद पाहता नुसते फोटो लोड केले असते तरी वृत्तांत वाचता आला असता जियो आयोजक समिती, जियो मेम्बर मित्रलोक्स अन जियो मिपा
  • Log in or register to post comments

लागोपाठ दुसर्या धाग्यात १००+

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 17:14 नवीन
लागोपाठ दुसर्या धाग्यात १००+ झाल्याबद्दल बोक्याचा सत्कार हे चायनीज (का जपानी?) "इकडे या...इकडे या" करणारे मांजर देउन करण्यात येत आहे...लवकरच त्यांच्या फार्महाउसवर पुढचा कट्टा होवो ही अपेक्षा ;) Image removed.
  • Log in or register to post comments

लवकरच त्यांच्या फार्महाउसवर

सुबोध खरे
Mon, 07/04/2016 - 18:56 नवीन
लवकरच त्यांच्या फार्महाउसवर पुढचा कट्टा होवो ही अपेक्षा +१००
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

धन्यवाद!

बोका-ए-आझम
Mon, 07/04/2016 - 21:06 नवीन
तारीख बोला! कट्टा होईल!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जागा तुम्ची...तारिख तुम्हीच

टवाळ कार्टा
Mon, 07/04/2016 - 21:10 नवीन
जागा तुम्ची...तारिख तुम्हीच ठरवणार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

वा वा

तिमा
Mon, 07/04/2016 - 17:15 नवीन
छान जमवला कट्टा. घरबसल्या सगळ्या मंडळीशी ओळख झाली.
  • Log in or register to post comments

मस्त

उमेश पाटील
Mon, 07/04/2016 - 17:35 नवीन
कट्टा जोरात झालेला दिसतोय. या वेळी राहून गेलं पण पुढच्या कट्ट्याला नक्की भेटू...
  • Log in or register to post comments

मस्त झालाय, आता यापुढचं

५० फक्त
Mon, 07/04/2016 - 17:50 नवीन
मस्त झालाय, आता यापुढचं हिवाळी महाकट्टा आमच्याकडे, हापिसाचंच क्लब हाउस तयार होईल तोवर मग जमवुयात.
  • Log in or register to post comments

एकच नंबर. आम्ही वाट पाहतो

सतिश गावडे
Mon, 07/04/2016 - 19:14 नवीन
एकच नंबर. आम्ही वाट पाहतो हापिसाचंच क्लब हाउस तयार होण्याची ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आणि तयार झालं तरी

प्रचेतस
Mon, 07/04/2016 - 19:17 नवीन
आणि तयार झालं तरी पण्णासरावांच्या तिथं येण्याची. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

तोपर्यंत न येण्याचा बहाणा

किसन शिंदे
Mon, 07/04/2016 - 19:20 नवीन
तोपर्यंत न येण्याचा बहाणा क्रं ११३ तयार होईल. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ब हाणा! ;)

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/04/2016 - 19:49 नवीन
ब हाणा! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

टांगारूपणातून

नाखु
Tue, 07/05/2016 - 09:04 नवीन
बाहेर यायची संधी तरी द्या त्यांना ! "अरे आत्मु इतकया जवळच्या कट्ट्याला तरी येशील ना सुनबाईंना घेऊन्,फार दिवसात तू यांना भेटला नाहीस ते" मिसामा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

खरच महाकट्टा झालाय

अनन्न्या
Mon, 07/04/2016 - 18:32 नवीन
मस्त फोटो! अति पावसामुळे कोकण रेल्वे रद्द झाली नाहीतर मी निघालेच होते.. आता पुढच्यावेळी!
  • Log in or register to post comments

क्या बात ! सहीच झाला की कट्टा

स्रुजा
Mon, 07/04/2016 - 18:54 नवीन
क्या बात ! सहीच झाला की कट्टा ! फोटो आणि ओळख परेड आवडली. विपा काकांची मेंबरशीप क्लबने कॅन्सल तर केली नाही ना? ;) आणि उल्काताई बर्‍याच फोटोस मध्ये दिसतीये की. आमची मिता पण आहे. ओळख परेड मध्ये काही काही नावं मिसिंग आहेत. लीमाऊ ची इरा फार च गोड आहे :)
  • Log in or register to post comments

लीमाऊ ची इरा फार च गोड आहे

सुबोध खरे
Mon, 07/04/2016 - 18:55 नवीन
लीमाऊ ची इरा फार च गोड आहे बाडीस
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

ओ येस!

बोका-ए-आझम
Mon, 07/04/2016 - 20:59 नवीन
भावी मिपाकरांनी पण कट्टा attend केला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अगं मी खूपच उशिरा पोहोचले

उल्का
Tue, 07/05/2016 - 07:36 नवीन
अगं मी खूपच उशिरा पोहोचले तिथे. सगळ्यांचे जेवण होत आले होते. शेवटचा भात आणि कुल्फी फक्त मी खाल्लं. हे इतके पदार्थ मागवले होते हे प्रतिसादात वाचून कळले. =)) इरा तर मला आत्ता फोटोत दिसली. खूपच गोड आहे. म्हणून मी म्हंटलं की मी गेले होते का? कोणाच्या लक्षात पण नाही मी आले होते ते बहुदा. :( पाच तास प्रवास व्यर्थ का? पण नाही हो! शेवटी चहा पिताना खूप धमाल केली आणि घरी येताना सुरंगीताईशी खूप खूप गप्पा मारल्या. गप्पा मारायला मिळाल्या की मला भारी आवडतं. खरोखर महाकट्टा आवडला. मस्तच झाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

अगं मी खूपच उशिरा पोहोचले

उल्का
Tue, 07/05/2016 - 07:36 नवीन
अगं मी खूपच उशिरा पोहोचले तिथे. सगळ्यांचे जेवण होत आले होते. शेवटचा भात आणि कुल्फी फक्त मी खाल्लं. हे इतके पदार्थ मागवले होते हे प्रतिसादात वाचून कळले. =)) इरा तर मला आत्ता फोटोत दिसली. खूपच गोड आहे. म्हणून मी म्हंटलं की मी गेले होते का? कोणाच्या लक्षात पण नाही मी आले होते ते बहुदा. :( पाच तास प्रवास व्यर्थ का? पण नाही हो! शेवटी चहा पिताना खूप धमाल केली आणि घरी येताना सुरंगीताईशी खूप खूप गप्पा मारल्या. गप्पा मारायला मिळाल्या की मला भारी आवडतं. खरोखर महाकट्टा आवडला. मस्तच झाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

मस्त कट्टा झाला .

मीता
Mon, 07/04/2016 - 19:04 नवीन
मस्त कट्टा झाला .
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा