Skip to main content

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.

लेखक बोका-ए-आझम यांनी रविवार, 03/07/2016 23:42 या दिवशी प्रकाशित केले.
दिलखेचक! रापचिक! धमाल! हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा! सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो. NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला. Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली. मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला. मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला. फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती! शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो - जे कट्ट्याला आले त्यांना सलाम! जे नाही आले त्यांनाही सलाम! जे वेळ काढून आले त्यांना सलाम! जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम! लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम! या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम! आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!

वाचने 69484
प्रतिक्रिया 220

प्रतिक्रिया

वा !!! जबरी झकास महा- महाकट्टा ,फोटो सगळे जबराट ! माझी काय चर्च्चा केलीत म्हणे ;) बाकी ट क्या चा आय डी बदलुन द्यावा इतका निरागस वाटतोय फोटोट :प का अनाहिताची भीती वाटत होती म्ह्णुन चेहरा असा आलाय ;) ( मर्तेय मी , पळते मी ).......

कंकाका, आम्हाला एका च आयडी ची हौस आहे. तेवढा सुद्धा ठेवत नाहीत म्हणून दुसरा उसना पासना मागावा लागतो. बरेच लोक थोरथोर असल्याने आम्हाला उदार मनाने देतात. बाकी कट्टा उत्तम झालेला आहे यात संशय नाही. काही ठिकाणी सोनेरी धान्यपेयं दिसली होती ब्वा!

मी (माझीही शॅम्पेन ) , किसन , मामलेदार पंखा , शीबीआय , आणि डॉक्टर आम्ही ठाण्याहून निघालो , माझ्या बरोबर एक माजी संपादक , एक WWF कुस्तीपटू , नेव्हीतील डॉक्टर आणि शीबीआय ऑफिसर असल्याने निर्धास्त होतो , मुलुंड - ऐरोली फाट्यया पर्यन्त व्यवस्थित आलो , मी गाडी चालवणारा अर्जुन आणि मार्ग दाखवणारा किसन अशी उलटी जोडी जमली होती , मध्येच एक खतरनाक रस्त्याने येण्याचा निर्णय झाला आणि आम्ही व्यवस्थित नवी मुंबई दर्शन करून दर मजल करत कसा बसा गंतव्य स्थानापर्यन्त पोहोचलो मध्येच गाडी बरेच वेळा स्पीड ब्रेअकर वर आपटली पण चाकातील हवा कमी असेल अशी स्वतः:ची भाबडी समजूत करून घेतली :) महा कट्टा कसला मस्त पैकी स्नेहसंमेलन चालू होत , अशी यशस्वी स्नेहसंमेलन फक्त ग्रेटर मुंबईकरच भरवू शकतो ह्याची खात्री झालि , वल्ली (प्रचतेस ) , सगा , गणामास्तर त्रिवेणी आणि अजून कोणी कोणी पुण्ययाहून आले होते , बरेच दिवसांनी फुल गॅंग भेटली मिपाची काही नाव बदलाविशी वाटली जस की टका >> शामळू कार्टा >>शाका , कंजूस काका >> चपळ काका , सुरंगी >> सूर-सुरी (फटाक्यातील) , बोका-इ-आझम >> प्रेमळबोका , प्रचतेसला त्याच्या नावावरून बरेच जणांनी पिडला असेल , प्रत्येक वेळेला तो ते वारुणाच नाव आहे असं सांगून सुटका करून घेत होता मक , निदे , विमे , प्रास , कंजूस , त्रिवेणी , पिंगू (पोपटी आठवते आहे ना रे ) , कोमल , वाघे अश्या काही जणांशी थोडक्यात चर्चा झाली , निदेनि बोभाटा.कॉम विषयी बरीच माहिती दिली , प्रत्येक मिपाकरांनी बोभाटा.कॉम ला अवश्य भेट दिली पाहिजे अफलातून उपक्रम आहे एकंदरीत अजय , विपा , बोका आणि इतर आयोजकांनी अफलातून आयोजन केलं होत , आता एखादी पिकनिक किंवा मुंबई आणि पुण्य मधोमध रेसोर्टवर भेटून मस्त गप्पा मारल्या पाहिजेत

तर त्याचं असं झालं की हाम्रिकेत कट्टा,त्यात पण एकजण सात तास ड्राइव्ह करुन आलेले,युकेत कट्टा आणि मिपाच्या मातृभूमीत मात्र कट्टयाचा दुष्काळ :( याने आमची झाली जळजळ.मग बालके टकाशी खरडीखरडीत विषय निघाला आमची मुंबई कट्टा करायचा.पण जागा काही निश्चित करता येईना.मिपाकट्टा म्हणजे कसं ऐसपैस गप्पा मारता आल्या पाहिजेत.सोबत छानशी खादाडी हवी.त्यात ते टकं सारखं कोंबडीवालं हाॅटेलच पाहिजे करत नाचत होतं.आणि मी पूर्णपणे शाकाहारी.टकाने पहिलं नाव सुचवलं हाॅटेलचं ते 'झिंगा'! मला नाव ऐकुन चक्करच यायची बाकी :)मग दुसरे नाव मालवणी रस्सा.ते फिश स्पेशल. परत नाक मुरडले.मग इनाॅर्बिटला कट्टा करु. जे हवे ते खाऊ ठरवुन बोक्याला तसं कळवलं.पण जशी येणाऱ्या मिपाकरांची संख्या धाग्यात वाढायला लागली मला टेन्शन यायला लागलं.माॅलच्या गर्दीत कसं मॅनेज होणार.आणि त्याच वेळी वाशीकर मिपाकर विपा देवासारखे धावुन आले आणि त्यांच्यामुळे NMSA सारखी मस्त निवांत जागा कट्ट्यासाठी मिळाली.त्यांनी सगळे आयोजन करुन ठेवलेच होते. तिथल्या रेस्टाॅरंटचा मोठा भाग कट्टयासाठी आरक्षित होता.त्यामुळे कोणताही व्यत्यय न येता फार छान सोय झाली.विशेषतः बाहेर पाऊस असताना. कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते पिंची अाणि पुणेकर.भर पावसात लवकर निघून दिल्या वेळेला ते हजर होते. नंतर एकेक करत ठाणे,मुंबई, पनवेल,सानपाडा,बोयसर सगळे मिपाकर जमले. शिबिआयने मस्त गरम अप्पे करुन आणले होते.पुणेकरांनी आठवणीने बाकरवडी आणि ठाणे मुलुंड आघाडीने सुरळीच्या वड्या. सर्व तुटून पडतच होते तर आधीच वैतागलेले मॅनेजर साहेब प्लीज बाहेरचे फुड नाॅट अलौड म्हणत आले.खट्टु होऊन सगळे डबे बंद झाले :( मग विपा भाऊंनी मस्त गरम गरम मन्चाव सुपची ट्रिट देऊन आत्मे शांत केले! मग ओळखपरेड सुरु झाली.सगळे गोल करून उभे राहिले.आणि एकेकानं आपापली ओळख दिली.त्यामुळे एक बरे झाले.कोण कोण आलंय नीट कळाले.अगदी शेवटी अदि आणि तिची मैत्रीण आल्या.त्याही दंग्यात मनापासून सामील झाल्या! तोवर नुसता कल्ला आणि नो आॅर्डर वर वाढती लोकसंख्या बघून मॅणेजर साहेब हैराण झालेले.मग देवदूत नं दोन बनून स्वीट टाॅकर काका धावुन आले.त्यांच्या मदतीने मग सर्व मेनू मॅनेजरला सांगितल्या गेला.तो जसजश्या डिश आणत होता, एकेक मिपाकर अॅड होत होते! मग त्याला और पाचका खाना करत आॅर्डर वाढवत नेत होते! जेवण मात्र अगदी छान होते.नंतरची कुल्फी तर मस्तच. कोणा दुष्टाने तीन तुकडे पळवल्याने माझ्या वाटेला एकच तुकडा आला :-/ नंतर मिपाकरांची पांगापांग होण्याआधी ग्रुप फोटो झाला.तोपर्यंत सोनुली पण आली. यानंतर पिंचिकर आणि अर्धे ठाणे रवाना झाले.बाकीचे गॅरी भाऊंची वाट बघत गप्पा मारत बसले.बालके टवाळ कार्टा याच्या बालसुलभ बोबड्या बोलांना ऐकुन मिपाकरणींनी मनोरंजन करुन घेतले.वर त्यांच्या लाडोबासोबत फोटोही काढलाच;) चार वाजता चहाची अनावर तल्लफ आल्याने सर्वजण परत रेस्टॉरंटमध्ये आले.चहा होईस्तोवर गॅरी भाऊ आलेच.एक छोटीशी ओळखपरेड परत होऊन सगळे मार्गस्थ झाले. या कट्टयाचा सर्वात भावलेला भाग म्हणजे जुने नवे मिपाकर आवर्जुन आले.कट्ट्यात कोणत्याही छुप्या चर्चा,कटु विषय आदिला स्थान नव्हते.टकाची गंमत करणे सोडता आलेल्या सगळ्या मैत्रिणी या मिपाकरणी म्हणून आल्या होत्या.अनाहिता कट्टा असे नाही.सगळ्यात मिळुन मिसळुन मस्त गप्पाटप्पा झाल्या. धन्यवाद मिपाकरांनो,धन्यवाद विपा. तुमच्यामुळेच इतका जबरदस्त कट्टा झाला.

In reply to by अजया

कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते पिंची अाणि पुणेकर
नाय नाय,मी पायली होते.त्यानंतर यजमान पतीपत्नी नि त्यानंतर कंजूसकाका.पिंचिकार त्यानंतर.

बारवी डॅम( बदलापूर ), जांभे धरण ( आसनगाव स्टेशन )याठिकाणी जाण्याला बय्राचजणांनी उत्सुकता दाखवली आहे तिकडे जाण्याचे लवकरच ठरवण्यात येईल. भुशी डॅम,कोंडेश्वरवगैरे ठिकाणे बाद केली आहेत.

बोका - ए - आझम नी कट्ट्याची घोषणा केली आणि या कट्ट्याला माझी हजेरी लागणार नाही हे मी ठरवुन टाकलं होत कारण वाशी हा माझ्या साठी अति लांबचा पल्ला कारण बोईसर म्हणजे एकदम एका टोकाला आहे. मुंबई हुन १०० कीमी आणि त्यात वाशी म्हणजे नवी मुंबई ते आणखी दुर. त्यात टका येणार या धडकीनेच मी कट्ट्याला जायचं नाही असं ठरवलं होतं पण एक आठवड्यापपुर्वी ट्रेक च्या दिवशी अजया भेटली आणि तिने सांगितलं की टका हा आयडी व्रात्य असला तरीही प्रत्यक्षात तो तितका व्रात्य नाहीये. मग मी जरा मना वर घेतलं पण इथे ३-४ दिवसा पासुन खुप पाउस असल्याने जाता येईल की नाही याचं टेन्शन आलं कारण अति पावसामुळे मुंबई रेल्वे च्या पश्चिम , मध्य आणि हार्बर अशा तिनी रेल्वे लाईन विस्कळीत झाल्या होत्या. ट्रेन जर मधेच बंद पडली तर पंचाईत व्हायची , त्यातच दर रविवारी मध्या आणि हार्बर रेल्वे लाईन ला मेगा ब्लॉक असतो आणि वेस्टर्नला जम्बो मेगा ब्लॉक . शेवटी कट्ट्याचा दिवस उजाडला. मी रेल्वेच्या पश्चिम लाईनशी कनेक्टेड आहे म्हणुन मी पश्चिम आणि हार्बर लाईन असा पर्याय निवडला. सकाळी ४ वाजता उठुन तयारी करुन ५.१५ ची डहाणुरोड - विरार ट्रेन मधे बसले, विरार ला उतरुन विरार - चर्च्-गेट ट्रेन पकडुन ८ वाजता माहीमला पोहोचले. तिथुन ९.५५ ची हार्बर लाईन हुन अंधेरी पनवेल ट्रेन होती पण ती ४५- मिनीटे उशीरा धावत होती. एकदाची ट्रेन मधे बसले. ११.१५ नंतर अजया आणि स्नेहश्री वाशी स्टेशन बाहेर भेटल्या तोवर पुणेकरणी पोहोचल्याची वर्दी मिळाली होती. गेल्यावर सगळ्यांची भेट घेतली फोटो सेशन झालं तो पर्यंत बाकीचे मिपाकर हळुहळु येउ लागले. बोका भाउ स्वतः आले आणि ओळख परेड सुरु झाली त्यानंतर डॉ. सुबोध खरेही आले त्यांच्याशीही ओळख झाली. जवळपास सगळे एकत्र जमल्यावर सगळ्यांनी आपापली ओळख दिली. गप्पांचा फड जमलेला असतानाही अजया आणि स्वीट टॉकर सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात गुंग होते , दोघांचेही कौतुक कारण इतक्या जणांच्या जेवणाची व्यवस्था करणे म्हणजे खरंच कठीण काम होतं . जेवताना स्वीट टॉकर आणि टॉकरीणबाई, हेमंत वाघे , स्नेहशश्री, अजया यांच्या शी खुप गप्पा मारल्या, खुप माहीती मिळाली. खुप धम्माल केली, सगळ्यांना भेटुन बरे वाटले . मी ही हा पहिलाच कट्टा पाहीलाय जो इतका व्यवस्थित सुनियोजित होता. येताना दुसर्‍या दिवशी येण्याचा विचार होता पण अजयाने ६ वाजता पनवेल ला सोडले मग ६.३० ची पनवेल - डहाणु रोड ट्रेन पकडुन रात्री १० ला घरी पोहोचले आणि अजयाचे आभार कारण दुसर्‍या दिवशी म्हणजे आजच वेस्टर्न रेल्वे च्या ट्रेन्स लेट आहेत आणि आज आले असते तर ऑफीस गाठायला उशीर झाला असता कारण ऑफीस मधे मुंबईहुन येणारे सहकारी आज उशीरा आलेत.

In reply to by कविता१९७८

कट्टाक्विन म्हणून तुम्हाला निवडण्यात यावे असा ठराव मांडतो.सत्कार पुढच्या कट्ट्याला करावा. मी त्या बाजूला प्रवास केला आहे आणि किती अडचणी आहेत ते माहित आहे. टक्याबद्दलचे गैरसमज दूर झाले हे एक कट्ट्याचे यशस्वी फलित म्हणता येईल.

गप्पा सुरू दिसताहेत..

बहुतेक सगळेच जमलेले आहेत आणि हॉटेलच्या एका अवाढव्य कोपर्‍यात अस्ताव्यस्तपणे पसरून घोळक्याने गप्पा मारत आहेत, ओळख करून घेताहेत. काऊन्टरवरचा कॅशियर, हॉटेलचा मॅनेजर, काही वेटर्स आणि इतर टेबलावरील लोकांच्या चेहर्‍यावर या घोळक्याकडे पाहून 'काय उच्छाद मांडलाय' अशी त्रासिक भावना स्पष्ट दिसतेय. =)) "सर..सर, प्लीज बसून घ्या इथे!" सुटाबूटातला मॅनेजर एका टेबलाच्या चेअर मागे पुढे सरकवत त्या मोठ्ठ्याने गोंधळ घालणार्‍या लोकांना ऑर्डरवजा विनवणी करतोय आणि ही धटिंग लोकं त्याच्या या विनवणीला सायन-पनवेल हायवेच्या फाट्यावर मारताहेत. इथे मॅनेजरचा चेहरा कडू एरंडेल तेल आणि अभयारीष्ट एकत्रच प्यायल्यासारखा.

गप्पा सुरूच...

"क्या लोग है यार. सुनतेही नही कुछ बोला तो और ऑर्डरभी देते नही." आता एक वेटर दुसर्‍या वेटरशी कुजबुजतोय. मग नंतर ते दोघे आणि एक तिसरा असे तिघेही मॅनेजरपाशी जाऊन कुजबुजतात. "एक काम करो. इनमेंसे कोई एक डिसेंट (?) आदमीको पकडके उसके मुंहसे पयले ऑर्डर उगलवावो." =)) चौघांची व्युहरचना तयार होतेय. वाढत्या गोंधळामुळे यांना एकही माणूस डिसेंट वाटत नाही याला मिपाकरांचे दुर्दैव म्हणावे कि सुदैव? =))

गप्पा सुरूच...

मधूनच इतकी शांतता कशीये म्हणून हॉटेलमधल्या इतरांनी भुवया उंचावून या कोपर्‍याकडे पाह्यलं तर ही सगळी गोंधळ घालणारी लोकं अर्धवर्तुळाकार उभीयेत. गोंधळ घालणार्‍या कौरवांचा हा अर्धवर्तूळाकार चक्रव्युव्ह अभिमन्यू होऊन कोण भेदणार या विवंचनेत उभे राहीलेली मॅनेजर आणि इतर मंडळी. एकेकाचा परिचय होतोय. लोकं परिचय देताहेत तरीही

गप्पा सुरूच...

"मिळाली ब्वॉ कशीबशी ऑर्डर, त्या काकांना धन्यवाद द्यायला हवेयंत" मॅनेजरचा सुटकेचा निश्वास!! "दिलेली ऑर्डर पटापट बनवून सर्व्ह करा रे म्हणजे हा जेवताना निदान आवाज तरी नाही करणार. नाहीतर अजून थोड्या वेळात प्रत्येक टेबलावर जेवणासोबत एक पॅरासेटमॉल द्यावी लागेल." लढाई सुरू करण्याच्या आदेशाबरोबर मॅनेजरचा केविलवाणा आशावाद !!! =)) यथावकाश सगळी लोकं जेवायला बसलीयेत आणि तरीही....

गप्पा सुरूच...

क्रमशः

लैच भारी मजा केलेली दिसत आहे. सगळ्यात वरुन पाचवा फोटो बराच "भारदस्त" दिसत आहे.

बोका, अजया, टका, यापैकी कोणाशीहि ओळख नसतांना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून सुचवलेले ठिकाण निश्चित केले व इतर मिपाकरांनीही त्याला अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.

In reply to by विपा

पावसाळी अधिवेशनासाठी राजधानी म्हणून वाशी घोषित करावी असा ठराव मांडतो. ( हिवाळी अधिवेशनासाठी पुणे आहेच पण ते पिंपरीचिंचवड होण्याचा योग दिसतोय.)

In reply to by विपा

आम्ही अधूनमधून चुकचुकत होतो की रेस्टोरंटचा स्टाफ ज्या पद्धतीने कुजबुज करतोय त्यावरुन हे लोक विपा काकाना सुनावणार काहीतरी आपण सारे गेल्यावर.

कट्टा आणि खादाडी पदार्थ कुणी आणले या फंदात न पडता मी खात होतो यात आप्पे सुरळीच्या वड्या बाकरवड्या चिकन टिक्का पनीर मांचुरियन मनचाव सूप नवरतन कुर्मा व्हेज कढई पंजाबी रोटी दाल तडका आणि जीरा राईस आसा भक्कम मेनू होता.शेवटी मलई कुल्फीने उपासाचं पारणं फेडलं.आम्ही काही बारीक मंडळीनी चिकन टिक्का आणि कुलफी दोनदा घेतली. म्हटलं होउ द्या खर्च मिपा आहे बर्प आपलं घरचं

प्रथम बोका भाऊ चे संकल्पनेबद्दल आणि पाटील भाऊचे आयोजनाबद्दल आभार . NMMC हि जबरदस्त जागा होती , आणि फक्त खास सदस्यांबद्दल असलेल्या क्लब चा आम्ही चांगलाच (गैर ) फायदा घेतला ! आणि हा आता माझा दृष्टीकोण – मला खरेच इतकी धमाल येईल असे वाटले नाही . मी विचार केला होता कि जर कंटाळवाणा प्रकार असेल , फक्त आधीच ओळख असलेले लोक बोलत असतील , किंवा काही गंभीर चर्चा असेल ( आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार किंवा समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील का ?) वगैरे तर “कलटी “ मारून सतकायचे असे स्वताशीच ठरले होते . पण गेल्यानन्तर १५ मिनिटात हे मी विसरलो आणि शेवटपर्यंत थांबलो . अनेक जणांशी विविध विषयांवर चर्चा केली , गप्पा मारल्या आणि खरेच धमाल आली ! गेल्या १०-१२ वर्षात एकटेपणा वाढला होता .... अनेकदा समारंभात जाऊन कोणाशीही फारसे न बोलता निघून येण्याची वृत्ती वाढली होती . आपण बरे कि आपले काम बरे . त्यामुळे मी खरोखरच विचार करीत होतो कि जावे कि न जावे .. पण या महा कट्ट्याने सर्व संशय खोटे ठरवले ! तसेच मी गेल्या वर्षी एका प्रसिध्ध आणि जुन्या संस्थलाच्या पावसाळी सहलीला गेलो होतो ; त्याची तुलना करावीशी वाटते . त्या “पावसाळी सहलीत “ जणू मी कोरडाच गेलो आणि कोरडाच आलो. तेथे अनेक जुने सदस्य आपापल्या तच गप्पा मारण्यात व्यग्र होते . ती सहल खरेच उत्तमपणे आयोजित केली होती पण मलाच तिकडे कंटाळा आला. न कोणी माझा फोने घेतला न मी कोणाचा .. आणि या सहलीनंतर न कोणी माझ्याशी संपर्क केला न मी कोणाशी .( नन्तर मला त्या संस्थळ वरून काढून टाकण्यात आले ;) दुसर्या कारणाने !) मिपा कट्ट्याचे माझ्या दृष्टी ने हेच यश आहे कि मी पुढच्या कट्ट्याची आतुरतेने वाट बघत आहे . तर केंव्हा करायचा कट्टा ??

In reply to by हेमन्त वाघे

( आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार किंवा समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील का ?) असल्या विषयांवर चर्चा असती तर मी मिपा कट्ट्यांना कायमचं बाय बाय केलं असतं.

In reply to by हेमन्त वाघे

तुम्ही म्हणाल तेंव्हा आणि तुम्ही ठरवाल त्या जागेवर. पण कट्टा करायचा असेल तर दसर्‍याआधी केल्यास, मला जमू शकेल. दसर्‍यानंतर फक्त शेती एके शेती.

In reply to by हेमन्त वाघे

काही गंभीर चर्चा असेल ( आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार किंवा समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील का ?)
स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानता? बापरे. हे वाचूनच घाबरायला झाले :) . कट्ट्याला असले विषय पूर्ण वर्ज्य असतात :)
तर केंव्हा करायचा कट्टा ??
मोठे कट्टे तर जेव्हा होतील तेव्हा होतीलच. पण आपण नवी मुंबईकर मिनी कट्टे करूच.

In reply to by गॅरी ट्रुमन

वरील विधाने आणि शब्द मूळचे पु . ला. चे आहेत ( खोगीर भरती - लेख - नाटक कसे बसवतात ) हे नम्रपणे नमूद करू इच्छितो !

' सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम! आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!' - याशिवाय आपल्या मिपा मालकांना जोरदार सलाम !! टकाला कोणी फटके दिलेले दिसले नाही, त्यामुळे बाकरवडी, आंबाबर्फी कॅन्सल.

In reply to by नीलमोहर

टक्या ला फटके दिल्यास आंबाबर्फि बाकरवड़ी का.... चला, सुपारी उचलली आहे. (टक्या तुला व्यनि करतो रे ;) )

In reply to by धनंजय माने

तू येच चायला....आम्च्या मागे मिपावर्चे एक भारदस्त व्यक्तिमत्व आणि तमाम अनाहिता ग्यांग आहे ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊ

In reply to by टवाळ कार्टा

हे आकाशातल्या बापा, या अजाण बालकास क्षमा कर. हा कुणाच्या जीवावर काय बोलतोय याचं याला समजत नाहीये. (च्यायला टक्या, नीमो ला पाहिजेत फटके दिलेले फोटो, ते आपण सहज मॅनेज करु. नंतर आम्बा बर्फी आणि बाकरवडी ३०-७० ला शेयर करुन घेऊ की! ३० तुझे ७० माझे.)

In reply to by धनंजय माने

पण तुमच्यासाठीही सेम ऑफर ठेवता येईल, फटक्यांऐवजी डंडे हा बदल करून आणि भेट म्हणून काका हलवाईंची रसमलाई अ‍ॅड करता येईल. काय म्हणता ? (तुम्ही फोटो मॅनेज करण्याआधी मीच केलेला आहे, आता उद्या जाऊन चितळेंचे गुलाबजाम आणणे आले, धन्यवाद :)

In reply to by नीलमोहर

भलाई का ज़माना ही नहीं रहा! मेरकु काय को डंडे होना यारो??? भाई बोलके सलाम करे तो भी मेरेकुच मारते? माँ की किरकिरी!

In reply to by धनंजय माने

भाई म्हणता म्हणून डंडे, बहन म्हणा बरं, नाही कुठल्याही देशाच्या कुठल्याही कोपर्‍यात राखी कुरियर केली तर सांगा :)

In reply to by धनंजय माने

केवढी खात्री तुम्हाला माझ्याबद्दल, माझ्यापेक्षाही जास्त. त्या अथांग धाग्यात एक सेल्फीट टाकलाय बघा, खास मला डू वगैरे समजणाऱ्यांना समर्पित, खात्री करून घ्या :)

In reply to by नीलमोहर

तुम्ही हम पाँच नावाची झी वरची सीरियल नव्हता का बघत? काजल भाई माहिती असेल ना? (अशा रीतीने १५० झालेले आहेत. आम्ही स्वेच्छा निवृत्ति घेतो)

In reply to by नीलमोहर

टकाला कोणी फटके दिलेले दिसले नाही, त्यामुळे बाकरवडी, आंबाबर्फी कॅन्सल.
हे आधी सांगायचे ना निमो ;)

कट्ट्याला यायची खूप इच्छा होती. पण काही कारणांनी जमले नाही. पुढच्या वेळी बघू. माझी आठवण काढल्याबद्दल खूप धन्यवाद! चांगलेच बोलला असाल! =)) वल्ली, अजया आणि टक्कुमक्कुशोनु यांच्याशी फोनवर बोलले. टक्कुमक्कुची चौकशी करायची होती ती करून झाली. फोटो बघून डोळ्याचे पारणे फिटले आहे.

मजा आली, छान वाटले सगळे, मंडळींच्या चेहऱ्यावर असलेला आनंद पाहता नुसते फोटो लोड केले असते तरी वृत्तांत वाचता आला असता जियो आयोजक समिती, जियो मेम्बर मित्रलोक्स अन जियो मिपा

लागोपाठ दुसर्या धाग्यात १००+ झाल्याबद्दल बोक्याचा सत्कार हे चायनीज (का जपानी?) "इकडे या...इकडे या" करणारे मांजर देउन करण्यात येत आहे...लवकरच त्यांच्या फार्महाउसवर पुढचा कट्टा होवो ही अपेक्षा ;) manjar

छान जमवला कट्टा. घरबसल्या सगळ्या मंडळीशी ओळख झाली.

कट्टा जोरात झालेला दिसतोय. या वेळी राहून गेलं पण पुढच्या कट्ट्याला नक्की भेटू...

मस्त झालाय, आता यापुढचं हिवाळी महाकट्टा आमच्याकडे, हापिसाचंच क्लब हाउस तयार होईल तोवर मग जमवुयात.