दिलखेचक! रापचिक! धमाल!
हा कट्टा नुसता कट्टा नव्हता राव! हा तर हट्टाकट्टा होता. मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पिंपरी-चिंचवड, ठाणे, पुणे, डोंबिवली - अशा सर्व ठिकाणांहून भर पावसात केवळ मिपाच्या प्रेमापायी जमलेल्या जवळपास ४० ठार वेड्या लोकांचा तितकाच अत्रंगी मेळावा - म्हणजे आजचा कट्टा!
सगळ्यात आधी आभार विलास पाटील (विपा) आणि सौ. पाटील यांचे. त्यांनी NMSA ची जागा मिळवून दिली आणि रविवारी इनाॅर्बिट माॅलमध्ये गर्दी होईल, जागा मिळणार नाही वगैरे भीती पार मिटवून टाकली. इकडे धाग्याने पण १०० मग २०० आणि मग ३०० असा पल्ला झपाझप पार केला. हा येतोय, ती येतेय असे हुरुप वाढवणारे निरोप मिळत गेले आणि ३ तारीख कधी उजाडली ते समजलंच नाही. कधी नव्हे ते पावसाने मेहरबानी केली आणि मी, प्रासभौ आणि विमे असे तिघेजण साधारण ११.२० च्या सुमारास दादरहून वाशीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
NMSA च्या मोठ्या आणि अवाढव्य restaurant मध्ये मिपाकरांना शोधणं अजिबात अवघड गेलं नाही. जिथला दंगा मोठा, तिथे मिपाकर हा संकेत या कट्ट्यातही पाळण्यात आला आणि शिस्त, शांतता वगैरे गोष्टींना वाशीच्या खाडीत जलसमाधी देऊन कट्टा सुरु झाला.
Restaurant चे managers त्यांच्या परीने आम्हाला शांत बसवायचा आणि जेवणाची order लवकर द्या अशी दटावणी करण्याचा प्रयत्न करत होते पण ३९ वांड कार्ट्यांसमोर आणि एका टवाळ कार्ट्यासमोर त्यांचा काय पाड? त्यामुळे मग आम्ही ओळखपरेड सुरु केली. छान वर्तुळात उभे राहिलो आणि एकमेकांची ओळख करून घेतली. आणि मग सुग्रास जेवणाला न्याय द्यायला सुरुवात केली.
मग फोटोसेशन सुरु झालं. तसे आधीही फोटो काढले होतेच म्हणा पण जेवण झाल्यावर ग्रूप फोटो काढले. तिथेही गप्पा रंगल्या. अनाहिताप्रिय टकाश्रींचे अनाहितांबरोबर फोटो काढून मिपाच्या इतिहासातला एक ऐतिहासिक क्षण साजरा केला गेला.
मग गॅरीभौंचा फोन आला. ते खारहून इथे येण्यासाठी निघाले होते. ते येईपर्यंत काय असा प्रश्न होता. तो चहा पिऊन सोडवण्याचा एकमताने निर्णय झाला आणि आम्ही परत आत घुसलो. चहा पिऊन होईपर्यंत गॅरीभौ आले अाणि त्यांची सर्वांशी भेट झाली आणि मग पांगापांग सुरु झाली. फोननंबरांची देवाणघेवाण झाली आणि पुन्हा अशाच एखाद्या कट्ट्याला भेटू असं एकमेकांना सांगत मिपाकर घरी गेले आणि हा जंगी कट्टा संस्मरणीय रीत्या पार पडला.
फोटो अजयातै इथे पेस्टवतील. तोपर्यंत धीर धरावा अशी णम्र विणंती!
शेवटी मंगेश पाडगावकरांच्या ओळी उधार घेऊन म्हणतो -
जे कट्ट्याला आले त्यांना सलाम!
जे नाही आले त्यांनाही सलाम!
जे वेळ काढून आले त्यांना सलाम!
जे वेळ काढू नाही शकले त्यांनाही सलाम!
लिहिणाऱ्यांना सलाम, वाचणाऱ्यांना सलाम!
या सर्वांना एकत्र आणणा-या मिपाला सलाम!
आणि सर्वात शेवटी या सगळ्याचं अधिष्ठान असणाऱ्या आपल्या मायमराठी मातृभाषेला एक कडक सलाम!
वाचने
69484
प्रतिक्रिया
220
मिसळपाव
प्रतिक्रिया
वा !!! जबरी झकास महा-
कंकाका,
मी (माझीही शॅम्पेन ) , किसन
मालक...गाडी बदला आता.....
In reply to मी (माझीही शॅम्पेन ) , किसन by माझीही शॅम्पेन
हा हा हा साष्टांग दंडवत मालक
In reply to मालक...गाडी बदला आता..... by माम्लेदारचा पन्खा
एक काना विसरलात का?
In reply to हा हा हा साष्टांग दंडवत मालक by माझीही शॅम्पेन
अरे वा !! जोरदार झालाय कट्टा!
तर त्याचं असं झालं की
कट्ट्याला सर्वप्रथम पोचले ते
In reply to तर त्याचं असं झालं की by अजया
बारवी डॅम( बदलापूर ), जांभे
काका ठरवा लवकर. आम्ही आलोच.
In reply to बारवी डॅम( बदलापूर ), जांभे by कंजूस
पैसाताईनं फोनवरून कट्ट्याला
बोका - ए - आझम नी कट्ट्याची
कट्टाक्विन म्हणून तुम्हाला
In reply to बोका - ए - आझम नी कट्ट्याची by कविता१९७८
हो आज सकाळीच डहाणुला
In reply to कट्टाक्विन म्हणून तुम्हाला by कंजूस
अनुमोदन!
In reply to कट्टाक्विन म्हणून तुम्हाला by कंजूस
धन्यवाद
In reply to अनुमोदन! by बोका-ए-आझम
लोकं दुसर्याना न भेटता कसे
In reply to बोका - ए - आझम नी कट्ट्याची by कविता१९७८
त्यान्च्या आयडी वरुन
In reply to लोकं दुसर्याना न भेटता कसे by टवाळ कार्टा
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
In reply to त्यान्च्या आयडी वरुन by कविता१९७८
ऐ ते न ....
In reply to ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ by टवाळ कार्टा
वाशी कट्ट्यावरचा फोटो बघाकी..
In reply to ऐ ते न .... by स्वप्नांची राणी
गप्पा सुरू दिसताहेत..
गप्पा सुरू दिसताहेत..
बहुतेक सगळेच जमलेले आहेत आणि हॉटेलच्या एका अवाढव्य कोपर्यात अस्ताव्यस्तपणे पसरून घोळक्याने गप्पा मारत आहेत, ओळख करून घेताहेत. काऊन्टरवरचा कॅशियर, हॉटेलचा मॅनेजर, काही वेटर्स आणि इतर टेबलावरील लोकांच्या चेहर्यावर या घोळक्याकडे पाहून 'काय उच्छाद मांडलाय' अशी त्रासिक भावना स्पष्ट दिसतेय. =)) "सर..सर, प्लीज बसून घ्या इथे!" सुटाबूटातला मॅनेजर एका टेबलाच्या चेअर मागे पुढे सरकवत त्या मोठ्ठ्याने गोंधळ घालणार्या लोकांना ऑर्डरवजा विनवणी करतोय आणि ही धटिंग लोकं त्याच्या या विनवणीला सायन-पनवेल हायवेच्या फाट्यावर मारताहेत. इथे मॅनेजरचा चेहरा कडू एरंडेल तेल आणि अभयारीष्ट एकत्रच प्यायल्यासारखा.गप्पा सुरूच...
"क्या लोग है यार. सुनतेही नही कुछ बोला तो और ऑर्डरभी देते नही." आता एक वेटर दुसर्या वेटरशी कुजबुजतोय. मग नंतर ते दोघे आणि एक तिसरा असे तिघेही मॅनेजरपाशी जाऊन कुजबुजतात. "एक काम करो. इनमेंसे कोई एक डिसेंट (?) आदमीको पकडके उसके मुंहसे पयले ऑर्डर उगलवावो." =)) चौघांची व्युहरचना तयार होतेय. वाढत्या गोंधळामुळे यांना एकही माणूस डिसेंट वाटत नाही याला मिपाकरांचे दुर्दैव म्हणावे कि सुदैव? =))गप्पा सुरूच...
मधूनच इतकी शांतता कशीये म्हणून हॉटेलमधल्या इतरांनी भुवया उंचावून या कोपर्याकडे पाह्यलं तर ही सगळी गोंधळ घालणारी लोकं अर्धवर्तुळाकार उभीयेत. गोंधळ घालणार्या कौरवांचा हा अर्धवर्तूळाकार चक्रव्युव्ह अभिमन्यू होऊन कोण भेदणार या विवंचनेत उभे राहीलेली मॅनेजर आणि इतर मंडळी. एकेकाचा परिचय होतोय. लोकं परिचय देताहेत तरीहीगप्पा सुरूच...
"मिळाली ब्वॉ कशीबशी ऑर्डर, त्या काकांना धन्यवाद द्यायला हवेयंत" मॅनेजरचा सुटकेचा निश्वास!! "दिलेली ऑर्डर पटापट बनवून सर्व्ह करा रे म्हणजे हा जेवताना निदान आवाज तरी नाही करणार. नाहीतर अजून थोड्या वेळात प्रत्येक टेबलावर जेवणासोबत एक पॅरासेटमॉल द्यावी लागेल." लढाई सुरू करण्याच्या आदेशाबरोबर मॅनेजरचा केविलवाणा आशावाद !!! =)) यथावकाश सगळी लोकं जेवायला बसलीयेत आणि तरीही....गप्पा सुरूच...
क्रमशःएक नम्बर किसन राव :)
In reply to गप्पा सुरू दिसताहेत.. by किसन शिंदे
आमी नाय ज्जा !!!
कट्टा भन्नाट झालेला दिसतोय.
इतका दणकून कट्टा झाला आणि
इतका दणकून कट्टा झाला आणि
अप्रतिम
बोका, अजया, टका, यापैकी
पावसाळी अधिवेशनासाठी राजधानी
In reply to बोका, अजया, टका, यापैकी by विपा
आम्ही अधूनमधून चुकचुकत होतो
In reply to बोका, अजया, टका, यापैकी by विपा
तुमची तक्रार केलीय त्या
In reply to बोका, अजया, टका, यापैकी by विपा
अरे वा कट्टा दणक्यात झालेला
भारी भारी भारी महाकट्टा...
कट्टा आणि खादाडी
बर्प
In reply to कट्टा आणि खादाडी by सुबोध खरे
कट्टा जबरदस्त झाला ..
( आधुनिक मराठी साहित्याचा
In reply to कट्टा जबरदस्त झाला .. by हेमन्त वाघे
( आधुनिक मराठी साहित्याचा ऐतिहासिक विरोध विकासवादी दृस्ठीकोनातून विचार किंवा समाजाला अकरणात्मकतेच्या स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानातेकडे जाताना असल्या कलाविहीन कादंबर्या प्रतीविरोधी ठरतील का ?)असल्या विषयांवर चर्चा असती तर मी मिपा कट्ट्यांना कायमचं बाय बाय केलं असतं.तर केंव्हा करायचा कट्टा ??
In reply to कट्टा जबरदस्त झाला .. by हेमन्त वाघे
ओ मुवी....
In reply to तर केंव्हा करायचा कट्टा ?? by मुक्त विहारि
आज वेळ मिळाला....
In reply to ओ मुवी.... by अनिरुद्ध प्रभू
स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानता?
In reply to कट्टा जबरदस्त झाला .. by हेमन्त वाघे
वरील विधाने
In reply to स्थाणुत्वाकडुन कर्णात्मक गतीमानता? by गॅरी ट्रुमन
काढा धागा! आपण कॅमेरा घेऊन तयार आहोत!
In reply to कट्टा जबरदस्त झाला .. by हेमन्त वाघे
भारी झालेला दिसतोय कट्टा !
टक्या ला फटके दिल्यास
In reply to भारी झालेला दिसतोय कट्टा ! by नीलमोहर
तू येच चायला....आम्च्या मागे
In reply to टक्या ला फटके दिल्यास by धनंजय माने
हे आकाशातल्या बापा, या अजाण
In reply to तू येच चायला....आम्च्या मागे by टवाळ कार्टा
ती ऑफर तुमच्यासाठी नाही हो प्यारे जी,
In reply to हे आकाशातल्या बापा, या अजाण by धनंजय माने
भलाई का ज़माना ही नहीं रहा!
In reply to ती ऑफर तुमच्यासाठी नाही हो प्यारे जी, by नीलमोहर
तेच तर,
In reply to भलाई का ज़माना ही नहीं रहा! by धनंजय माने
लेकिन आप तो ड्यू आयडी हो! भाई
In reply to तेच तर, by नीलमोहर
हो?
In reply to लेकिन आप तो ड्यू आयडी हो! भाई by धनंजय माने
तुम्ही हम पाँच नावाची झी वरची
In reply to हो? by नीलमोहर
टकाला कोणी फटके दिलेले दिसले
In reply to भारी झालेला दिसतोय कट्टा ! by नीलमोहर
:(
In reply to टकाला कोणी फटके दिलेले दिसले by अजया
रैवारच्या गडबडीत लिहिलं तू
In reply to :( by नीलमोहर
जाऊद्या,
In reply to रैवारच्या गडबडीत लिहिलं तू by अजया
झकास!
मजा आली, छान वाटले सगळे,
लागोपाठ दुसर्या धाग्यात १००+
लवकरच त्यांच्या फार्महाउसवर
In reply to लागोपाठ दुसर्या धाग्यात १००+ by टवाळ कार्टा
धन्यवाद!
In reply to लागोपाठ दुसर्या धाग्यात १००+ by टवाळ कार्टा
जागा तुम्ची...तारिख तुम्हीच
In reply to धन्यवाद! by बोका-ए-आझम
वा वा
मस्त
मस्त झालाय, आता यापुढचं
एकच नंबर. आम्ही वाट पाहतो
In reply to मस्त झालाय, आता यापुढचं by ५० फक्त
आणि तयार झालं तरी
In reply to एकच नंबर. आम्ही वाट पाहतो by सतिश गावडे