Skip to main content

तुमच्या पैकी किती जण इंग्लिश medium किंवा convent चे आहेत??

लेखक अपरिचित मी यांनी शुक्रवार, 13/05/2016 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??

वाचने 24263
प्रतिक्रिया 135

प्रतिक्रिया

हे सांगणारा मी पहिला.... आहाहाहाहा!!!!!!!!!!!!! किती दिवसांनी पहिला प्रतिसाद दिला...

मराठी माध्यम. १० वी पर्यंत. पुढे कॉलेजात इंग्रजी. असो इतकंच विचारलंत, इतकंच सांगतो. शंभरीवाला धागा होण्याच्या जस्ट जवळ पोचलात. :)

मराठी माध्यम. जिल्हा परिषद प्रशाला. आवं, आत्ता जी मंडळी चाळीशी आणि पुढे असतील ती सर्व जवळ जवळ सरकारी आणि मराठी माध्यमातलीच, अपवाद असतीलही. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मयबी झेडपी शालेके मराटी माद्यममेच पढ्या. लेकिन उससे मेरा भोत लुस्कान हुव्या.

In reply to by बोका-ए-आझम

पहिली ते चौथी झेडपी. पाचवी ते बारावी ना. म. जोशी ला. आता अकरावी-बारावी नामजोशीतून वेगळे काढले आहे.

शतकोत्तर धाग्यासाठी शुभेच्छा ... तो तिकडे दुसरा एक धागा तसाच आहे तो पण बघून येतो ...

मी पदवीपर्यंत मराठी माध्यमात शिकलो, पदव्युत्तर इन्ग्लिशमध्ये. अवांतर/जाहीरातः सहा मानवी आणि तीन संगणकी भाषा जाणतो.

बारावीपर्यंत मायबोली, नंतर MY बोली.... अडलं नाही पण इंग्रजी पुस्तके वाचू शकलो नाही पेपर वाचण्याइतपतच प्रगती राहिली. अपत्यांनी मराठी न सोडता इंग्रजीत प्राविण्य मिळवावे असे नक्कीच वाटते.(आणि अल्पस्वल्प प्रयत्नही चालू आहेत) या धाग्यावर श्री रा रा धन्या,बॅट्या आणि वल्ली-चौरा प्रतिसाद अपेक्षीत. जिवन शिक्षण मंदीर शाळा विद्यार्थी नाखु

कॉन्व्हेन्ट आणि इंग्रजी माध्यम समानार्थी शब्द म्हणून रुळलेत. यातील कुठल्याही प्रकारातून शिक्षण झालेले नसल्याने इथे लावलेल्या सापळ्यात अडकण्याची भीती नाही. (डिग्री दाखवा, लीविंग सर्टिफिकेट दाखवा, रोल नंबर, ओळखणारे विद्यार्थी, गुरुजी, बाई (तिथे काय म्हंतात) यांच्या साक्षी आणा... आणि शेवट पोलिसांकडून या वर्गातून त्या वर्गात टेक्नोवरात !!)

पाचवीपासून पुढे संपूर्ण इंग्लिश. पदवीसुद्धा इंग्लिश भाषेतील. पण मराठी वाचनाचं काही फार अडलं नाही. ;) कुठचं माध्यम आणि काय याचा तुम्ही कसं वाचता/लिहिता याच्याशी फार संबंध नसावा..

पदव्युत्तर पर्यंत इंग्रजी माध्यम, बोलीभाषा मराठीच, शाळेत फक्त सातवीपर्यंत मराठी, त्यानंतर संस्कृत त्यामुळे मराठीतून लिहितांना थोडं अवघड जातं, लहानपणापासून मराठी वाचन आहे म्हणून बरंय. मात्र काही 'मऱ्हाटी' माध्यमातील लोकांपेक्षा मराठी पुष्कळ चांगलंय असं म्हणता येईल :)

१ ली ते ४.५ वी - मराठी, जिल्हापरिषदेची शाळा ४.५ वी ते ७ वी - मराठी, जिल्हापरिषदेची शाळा ८ वी ते १० वी- मराठी, विद्याप्रसारक मंडळाची शाळा ११ ते १२ वी - महाराष्ट्रीयन इंग्रजी, (सायन्स असल्यामुळे शिक्षक वाचायचे इंगलिश सम्जवायचे मराठीत) पदवी - महाराष्ट्रीयन इंग्रजी, (सायन्स असल्यामुळे शिक्षक वाचायचे इंगलिश सम्जवायचे मराठीत) पदव्युत्तर - महाराष्ट्रीयन इंग्रजी, (सायन्स असल्यामुळे शिक्षक वाचायचे इंगलिश सम्जवायचे मराठीत) आता ठरवा व्हाट इज माय माध्यम ऑफ शिक्षण ? मराठी - लिवाबोस इंग्रजी - लिवाबोस अहिराणी - लिवाबोस हिंदी- लिवाबोस गुजराती - वाबोस हरियाणवी - वास पंजाबी - स

मराठी माध्यम तुम्ही मुंबई सारख्या बहुभाषिक शहरात असलात आणि इन्ग्रजी माध्यमातून शिक्लात तर मराठीत मागे पडालच! अर्थात प्रत्येक नियमाला अपवाद असतात. पण वरील विधान ९५% खरे आहे.

आमचे शिक्षक acceleration ला असिलरेशन म्हणायचे. Engineering ला असताना एक जण 'बाय द मी' म्हणाले होते. आम्ही अडाणी (ते नाही नॉर्मल) च राहिलो.

पहाडगंजच्या शाळेत हिंदी माध्यमातून शिकलो, घरी कधी मराठीत तर कधी हिंदीत (हिंदी हि अशी कि त्यात उर्दू, पंजाबी हरियानवी शब्दांचा घोळ) विचार करायचो . आंग्ल भाषेची वैर असल्यामुळे आपले काही भविष्य नाही, पण तरीही सरकारी नौकरी साठी आंग्ल भाषेत काय ते म्हणतात आशुलीपी शिकलो. (आमचे खट्टर सर म्हणायचे was शब्दाचा अर्थ माहित नसला तरी चालेल. जे तोंडातून निघाले ते डोळे बंद करून टिपायचे. डोक्याचा वापर बिलकुल करायचा नाही, अर्थात जनकपुरी आणि टिळक नगर हून अनेक चार्टर बसेस त्यांच्या मुळे चालतात १९७० ते २००० पर्यंत १००० वर आशुलीपिक आणि २००० हून वर बाबू सरकारला पुरवले असतील, पण सकाळी ५ वाजता क्लास घायचे). काय लिहिले आहे, ते कळो न कळो पण आंग्ल भाषेतल्या आशुलीपित प्राविण्य मिळविले. मोठ्या कार्यालयात सर्वोच्च स्तराच्या अधिकाऱ्या बरोबर काम करताना विदेशी लोकांसोबत हि बोलावे लागत होते. च्यायला मी चक्क हिंदीत बोलायचो. (माझे बास दाक्षिणात्य असले तरी म्हणायचे हे ....लोक आपल्या सोबत काही आपल्या भाषेत बोलत नाही, तू हि चक्क हिंदीत बोलत जा गरज असेल तर झक मारून समजतील , किंवा हिंदी शिकतील....). मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांसोबत काम करून हि मी कधी आंग्ल भाषेचा वापर केला नाही. एक नमूद करायचे आहे, मुंबईकर मराठी माणसांसोबत मराठीत बोलायचो तरी बहुतेक वेळा उत्तर मोडक्या तोडक्या हिंदीत यायचे, कधी कधी आवर्जून सांगावे लागायचे, बाबा अशी हिंदी बोलण्यापेक्षा मराठीत बोला, मला समजते. असो.

In reply to by विवेकपटाईत

दो दुनी चार पाहिल्यापासून दिल्लीतले ट्यूशन टीचर असेच येतात डोळ्यांसमोर!

In reply to by विवेकपटाईत

शॉर्टहँडसाठी आशुलिपी हा शब्द भन्नाट आवडल्या गेला आहे.

3 री पर्यंत झेडपी..नुकसान ना फायदा मास्तर शिकवायचे नैत मी शिकायचो नै.. पुढे सरकरी शाळा पदवी पर्यंत .. टोटल मराठी माध्यम तरीही इंग्रजी विषय तेवढा इंग्रजीत होता आणी 10 वी ला टॉप कियेला है अंग्रेजीत..

सातवीपात्तूर मऱ्हाटी. मंग आटवीपास्नं धाव्वीपरेंत ईज्ञान आन घणित विंगर्जीतनं. फुडं समदं विंग्रजी. आंतर्जालावर सुर्वातीस विंग्रजीतनं पर्तिसाद देयाचो. येके दिशी डोस्क्यास शाट लागला. म्हनलं काय म्होटी लागून गेलीये इंग्रजी? म्हराटीत काय कमीये? तिच्यातंच लिवू तिच्यायला फुल्ल पर्तिसाद. मग लागली अक्कल चालाया मऱ्हाटीत. -गा.पै.

आम्हाला अकरावी बारावीला रसायनशास्त्र शिकवणारे प्राध्यापक "ऑक्झॅलिक अ‍ॅसिड" चा उल्लेख विचित्र करत असत. आम्हाला ते "ओसाड ओसाड" ऐकू येत असे.

In reply to by सतिश गावडे

आणि ईथेन-मीथेन चा असा काही उच्चार करायचे कि आम्ही मजेत ईथुन - मीथुन म्हणायचो.

मला वाटत कुठल्या माध्यमात शिकलो यापेक्षा पाठ्य पुस्तकाबाहेर काहीतरी वाचायची गोडी लावणारे, भाषेतलं, शब्दातल सौंदर्य उलगडून दाखवणारे शिक्षक असले की भाषा सहज येते. तसे शिक्षक मिळाले म्हणून खूप नशीबवान समजते स्वत:ला :)

In reply to by रातराणी

पाठ्य पुस्तकाबाहेर काहीतरी वाचायची गोडी लावणारे, भाषेतलं, शब्दातल सौंदर्य उलगडून दाखवणारे शिक्षक असले की भाषा सहज येते
हे काम चांगली पुस्तकं करतात.

आमच्या घरातली सध्याची पीढ़ी (पहिली ते पाचवी) जी इंग्रजी शाळेमध्ये जातात त्याना बरेच मराठी शब्द समजत नाहीत किंवा बोलताना आठवत नाहीत. मग मधेच हिंदी किंवा इंग्लिश शब्द वापरतात. टेंशन येत असल मराठी ऐकून.

In reply to by मन्याटण्या

तुम्ही त्यांच्याशी जास्तीत जास्त शुध्द मरठीत बोलायचा प्रयत्न करा. घरात मराठी वर्तमानपत्र येत असेल तर ते त्यांच्याकडून वाचून घ्या. जे शब्द त्यांना कळत नाहीते ते समजावून सांगा. अवांतर - माझा मित्र त्याच्या मुलाला अजिबात मराठी कळत नाही (लीहीता, वाचता, बोलता येत नाही) हे अभिमानाने सांगत होता. संतापून त्याला चार गोष्टी सुनावल्यावर बरेच दीवस बोलत नव्हता माझ्याशी...

आता पर्यंत ४५ प्रतिसाद आलेले दिसतात (त्यात पुन्हा प्रतिसाद आणि अवांतरही आहेत) आणि आता पर्यंत *संपूर्ण शालेय शिक्षण केवळ इंग्रजीत झालेली १ व्यक्ती आणि बर्‍याऐकी आधीपासून म्हणजे ५ वी पासून इंग्रजीत शिक्षण १ व्यक्ति =२ या शालेय शिक्षण इंग्रजीतून या सदरात मोजता येतील असे वाटते * शालेय शिक्षण कानडी आणि हिंदीतून झालेली प्रत्येकी १ व्यक्ती =२ (धागा लेखाचा विषय वेगळा असला तरी दखल घेण्यास हरकत नसावी) म्हणजे आतापर्यंतच्या प्रतिसादातील चार व्यक्ति अमराठी शाळेतून शिक्षण झालेल्या असे म्हणता येईल.

माझे शिक्षण ७ वी पर्यंत पूर्ण मराठी माध्यमात, ८ वी ते १० वी सेमी इंग्लिश माध्यमात (गणित आणि सायन्स इंग्लिशमधून आणि इतर विषय मराठीतून) आणि ११ वी पासून पूर्ण इंग्लिश माध्यमात झाले. तरीही माझे शिक्षण पहिल्यापासून इंग्लिश माध्यमातच व्हायला हवे होते असे फार वाटते. इंग्लिशवर चांगली कमांड यायला जी वर्षे खर्ची पडली त्या काळात जर्मन किंवा फ्रेंच अशी कुठलीतरी दुसरी भाषा कामापुरती तरी शिकता आली असती त्या काळात आणि त्याचा शिक्षण/ करिअरसाठी काहीतरी उपयोग झाला असता :)

In reply to by गॅरी ट्रुमन

वसंत गोवारीकरांची मुलाखत आठवतेय. "मी मराठी माध्यमातून शिकलो. भारत स्वतंत्र झाला असला तरी इंग्रजांबद्दल राग असलेले दिवस होते ते. त्यामुळे इंग्रजी विषय सुध्दा इयत्ता आठवीत सुरू झाला. पण त्यामुळे इंग्रजी शिकणे काही अवघड गेले नाही. सर्व जगभर हिंडलो पण शाळेत इंग्रजी माध्यम नसल्याची खंत वाटली नाही. इंग्रजी चांगले येण्यासाठी अगदी लहानपपणापासून इतिहास भूगोल सुध्दा इंग्रजीतून शिकायची आवश्यकता नाही." तुलनात्मक दृष्टयामराठी भाषेपेक्षा इंग्रजी शिकणे सोपे आहे. लिहिणे वाचणे सोपे आहे. ऐकणेही थोड्या प्रयत्नाने जमू शकते. फक्त बोलण्याला सराव व धीटपणा लागतो व तिथेच साधारणत: घोडे पेंड खाते.

In reply to by शाम भागवत

कसे ते सांगाल का? (अज्ञानी) मुवि

In reply to by मुक्त विहारि

कसं ते सांगाल काय ? -दिलीप बिरुटे

In reply to by मुक्त विहारि

भाषा शास्त्रज्ञांनाच्या मते चिनी भाषा ही सर्वात अवघड. ३५२ मुळाक्षरे व त्यांचे उच्चार व लिपी. मराठीत व्यंजने व स्वर यांची संख्या त्यामानाने खूपच कमी म्हणजे अंदाजे १/६ इतकी. इंग्रजीत फक्त २६ मुळाक्षरे. प्रत्यय लावणे सोपे. मराठीच्या मानाने व्याकरण सोपे. तुलनात्मक हा शब्द या अर्थाने वापरला होता. जेणेकरून इंग्रजी भाषेची भिती कमी होईल व अगदी बालवयापासून इंग्रजी आवश्यक आहे असे वाटणे बरोबर की चूक यावरपण चर्चा होऊ शकेल. अगदी याच हेतूने गोवारीकरांचे उदाहरण दिले होते. थोडक्यात इंग्रजी जरूर शिकावी त्यात प्रभूत्व जरूर मिळवावे. पण हा सर्व प्रकार करणे अवघड आहे हा न्यूनगंड कमी व्हावा इतकाच उद्देश होता.

In reply to by शाम भागवत

भाषा शास्त्रज्ञांवर नका हो ढकलू.. भाषाशास्त्र असली मिथके मानत नाही.

In reply to by पिशी अबोली

मी नक्की हे कुठे वाचले हे नाही सांगता येणार. भाषा शास्त्रज्ञांचा केलेला उल्लेख चूकीचा असूही शकेल. पण मांडलेला मुद्दा चूकीचा असेल तर मात्र जरूर सांगा. बरोबर काय आहे हे शिकायला आवडेल.

In reply to by शाम भागवत

कोणतीही मानवी भाषा शिकण्यास सोपी/कठीण नसते. तसं असतं तर चिनी मुलांना बोलण्यास इंग्रजी मुलांपेक्षा जास्त वेळ लागला नसता का? ज्या भाषेचे तुम्हाला एक्स्पोजर मिळते, ती तुम्ही सहजपणे शिकू शकता. राहिला मुद्दा स्वर-व्यंजनांचा. इंग्रजीत पाचच स्वर आणि मराठीत अनेक याला काही अर्थ नाही. तुम्ही भाषा आणि लिपी यांना एक समजत आहात. आपल्या लिपींना भाषाशास्त्रामधे फारसं महत्व नाही. भाषाशास्त्रीय पद्धतीने लिहिताना International Phonetic Alphabet वापरले जाते. एका ध्वनीला एक प्रतीक अशी त्याची मांडणी आहे. कोणतीही मानवी भाषा या तक्त्यामधे मांडलेल्या चिन्हांच्या पलीकडे जाऊ शकत नाही. आपल्या लिपीत दिसणार्‍या एका चिन्हाला खरं तर अनेक प्रकारे उच्चारलं जातं, जे या आयपीएचा वापर करून फोनेटिकली दाखवता येऊ शकतं. इंग्रजी सोपी वाटण्याचं कारण सरळ आहे, तिचं एक्स्पोजर जगभरातच जास्त आहे. त्याला भाषाशास्त्रीय कारण काही नाही..

In reply to by पिशी अबोली

स्वर-व्यंजनांच्या ऐवजी तुम्ही एकूण 'मुळाक्षरे' असा शब्द वापरला आहे. पण उत्तर त्यालाही हेच राहतं..

In reply to by पिशी अबोली

मुद्दे लक्षात आले. आता फक्त एकच मुद्दा राहिला. एखाद्या भाषेचे व्याकरण सोपे किंवा अवघड असेल तर त्याप्रमाणात भाषा शिकणे सोपे किंवा अवघड असते का?

In reply to by शाम भागवत

'एखाद्या भाषेचे व्याकरण' ही लिपीसारखीच भाषेच्या आधारावर उभारलेली कृत्रिम रचना असते. वस्तुतः सामान्य मानवी भाषेचे नियम सारख्याच तत्वांवर आधारलेले असतात. त्यामुळे रचित व्याकरणांच्या अनुषंगाने भाषेचे सोपी/अवघड असे वर्गीकरणही कृत्रिम आहे. आपण भाषा शिकतो ती काही त्याच्या व्याकरणापासून नाही(इथे शाळेतील स्कोरिंगसाठी भाषा शिकवण्याची पद्धत ग्राह्य धरलेली नाही. त्या पद्धतीने 'भाषा' नाही, तर तिचं हे कृत्रिम व्याकरण समजतं फक्त). आपण आपल्या भाषेच्या नियमांच्या आधारावर दुसर्‍या भाषेच्या नियमांना अंतर्भूत करत शिकतो. इथे नियम 'देवः, देवौ, देवा:' सारखे रचलेले नियम म्हणायचे नाही आहेत मला. या नियमांची आपल्याला कदाचित जाणीवही नसते, पण तरीही आपण त्या नियमांनी बद्ध अशी भाषा वापरतो. मग ती कोणतीही का असेना..

In reply to by पिशी अबोली

पिशी अबोली, हे विधान रोचक वाटलं :
>> या नियमांची आपल्याला कदाचित जाणीवही नसते, पण तरीही आपण त्या नियमांनी बद्ध अशी भाषा वापरतो.
म्हणजेच आपण हे नियम पार आत्मसात करून टाकतो. असं असेल तर व्याकरणास कृत्रिम का म्हणावं बरं? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी 'व्याकरण' या संकल्पनेला कृत्रिम म्हणत नाहीये. एखाद्या स्पेसिफिक भाषेच्या व्याकरणाला कृत्रिम रचना म्हणतेय. म्हणजे, विभक्ती ही संकल्पना माहीत नसूनही बहुतांश लोक ती वापरतातच की. पण 'मराठीमधे या या विभक्ती असतात' हे विधान म्हणजे युनिवर्सल ग्रामर मधील विभक्तीच्या अमूर्त संकल्पनेला कृत्रिम रूप दिल्यासारखं आहे. सात विभक्ती आणि त्यांना दिलेली नावं ही झाली ती नियमांच्या रूपात मांडलेली कृत्रिम रचना. पण ती रचना न शिकताही आपण, किंवा कुणीही कुठल्याही भाषेचे भाषक त्या विभक्ती त्यांच्या त्यांच्या भाषेत व्यक्त करू शकतात.
म्हणजेच आपण हे नियम पार आत्मसात करून टाकतो.
मुळात आपण व्याकरणाकडे उलट्या दिशेने पाहतो. भाषेला व्याकरण बांधतं असा आपला समज असतो. पण खरं तर, भाषा व्याकरणाला बांधते. एका प्रकारची अनेक उदाहरणं बघून त्यातून एक सर्वसामान्य नियम तयार होतो. अशा अनेक नियमांनी एखादं पारंपारिक व्याकरण बनतं. पण एकूण मानवी भाषेचे सर्वत्र एकसारखे चालणारे असेही नियम आहेत. त्याच्या फीचर वॅल्यू भाषेप्रमाणे कमी-जास्त, किंवा +/- होत राहतात. भाषाशास्त्रामधे अभ्यास केल्या जाणार्‍या व्याकरणाचा अतिशय वरवरचा आणि ढोबळ अर्थ हा आहे. या नियमांची जाणीव नसूनपण आपण ते वापरत असतो. श्वसनसंस्थेबद्दल माहिती नसून श्वास घेऊ, तसंच..

In reply to by पिशी अबोली

पिशी अबोली, मला वाटतं की कृत्रिमच्या जागी मूर्त हा शब्द अधिक चपखल बसावा. व्याकरण सहजगतीने पाळता येत असलं तरी शब्दांत व्यक्त करतांना लिपीप्रमाणे मूर्त स्वरूपात आणावं लागतं. अर्थात, इथे माझी दिशा नेमकी संज्ञा वापरण्याकडे आहे. :-) आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी व्याकरणाची भाषाशास्त्रीय संकल्पना जी सांगितली, तिला 'मूर्त' व्याकरण म्हणणं prefer करेन. कारण अमूर्त universal grammar चं ते केवळ व्यक्त होणं आहे. पण पारंपारिक व्याकरण मात्र inductively तयार केलेल्या नियमांसाठी एक पूर्ण वेगळी शब्द-संकल्पना व्यवस्था तयार करतं. या व्यवस्थेला मूर्त म्हणण्यापेक्षा कृत्रिम म्हणणं मलातरी जास्त योग्य वाटतं.

In reply to by शाम भागवत

इंग्रजी ही भाषा मराठीपेक्षा कितीतरी जास्त फोफावलेली आहे. मातृभाषा इंग्रजी नसणारे कोट्यावधी लोक ती भाषा शिकू इच्छितात. इंग्रजी शिकवणे हा भरपूर मागणी असणारा व्यवसाय आहे त्यामुळे अनेक क्षेत्रातले बुद्धीवान लोक आपापल्या परीने डोके लढवून ही भाषा सोपी करून कशी शिकवता येईल याचे प्रयोग करत आहेत. गेले शतक दोन शतके असे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे ती भाषा शिकवणे सोपे झालेले आहे. एक म्हणजे भरपूर साहित्य उपलब्ध आहे जसे पुस्तके, चित्रफिती आणि ध्वनीफिती याबरोबरच दुसरे म्हणजे इंग्रजी भाषेतल्या कुठल्या संकल्पना शिकवायला अवघड आहेत आणि त्या सोप्या कशा करता येतील यावर मोठे विचारमंथन झालेले आहे. शिकणार्‍याची मातृभाषा कोणती यावर त्याला/तिला इंग्रजीतल्या कुठल्या गोष्टी अवघड जातील ते अवलंबून आहे. पण त्यावरही भरपूर संशोधन केले गेले आहे. स्पेलिंगे आणि उच्चार कशी शिकावीत, क्रियापदे, आणि त्यांची रुपे कशी शिकावीत, ए, अ‍ॅन, दी ही आर्टिकल्स कशी वापरावीत, ह्या सगळ्या बाबी उत्क्रांत होत होत आता चांगल्याच प्रगत झालेल्या आहेत. कुठल्याही भाषेबाबत असे होऊ शकले असते जर पुरेशी मागणी असती तर. हे सगळे मराठीबाबत झालेले नाही आणि होत नाही. घरात वा आपण रहातो तिथे मराठी बोलले जात नसेल तर अन्य कुणाला ती भाषा शिकणे अवघड आहे कारण मराठी भाषा शिकण्याकरता चांगले साहित्य उपलब्ध नाही कारण अशा प्रकारच्या कौशल्याला बाजारात मागणी नाही. त्यामुळे इंग्रजी शिकणे तुलनेने सोपे आहे.

In reply to by हुप्प्या

कैच्याकै...एक मागणी हा फॅक्टर सोडला तर मराठि हि इंग्रजीच्या तोडिसतोड आहे....कुठल्याहि बाबतीत

In reply to by टवाळ कार्टा

इंग्रजी ही नि:संशय जास्त समृद्ध आहे. एक तर ती जास्त जुनी भाषा आहे. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात बोलली जात असल्यामुळे त्यातील साहित्य विपुल आहे. ते निर्माण करणारे प्रतिभावंतही जास्त आहेत. भाषा ही अशा साहित्यिकांद्वारे समृद्ध होत असते. नवे शब्द, नवे वाक्प्रचार, नव्या म्हणी, नव्या परिभाषा अशा अनेक नव्या गोष्टी अशा प्रतिभावंत लोकांमुळे भाषेत निर्माण होतात. उदा. शेक्सपियरने अनेक नवे शब्द जन्माला घातले आहेत. पूर्वग्रह बाजूला ठेवून अशी तुलना करून बघा की इंग्रजी लिहिणारे किती साहित्यिक आज जगात आहेत आणि मराठी लिहिणारे किती? ह्या तफावतीमुळे मराठी इंग्रजीपेक्षा खूपच मागे आहे. एक तटस्थ परीक्षक म्हणून असे म्हणेन की इंग्रजी हिमालय असेल तर मराठी पुण्याची पर्वती म्हणता येईल.

In reply to by हुप्प्या

मला मराठीबद्दल आदर आहे, अभिमान आहे. अगदी मराठी भाषिक मुलांचे शालेय शिक्षण मराठीतूनच व्हावे या मतासाठी आग्रही आहे. तरीही मराठी ही इंग्रजीच्या तोडीची भाषा आहे हे मुळीच पटत नाही. हुप्प्या यांच्या प्रतिसादाशी मी पुर्ण सहमत आहे. प्रगत तंत्रज्ञान किंवा विज्ञान विषयक काही वाचावयाचे झाल्यास मराठीच्या मर्यादा प्रकर्षाने जाणवू लागतात.

In reply to by सतिश गावडे

अर्र्र्र्र्र्र सगासर...तुम्को मै क्या बोल्या वो नै सम्झ्या मला म्हणायचे होते कि quantity बघता इंग्रजीत निश्चितच जास्त साहित्य आहे कारण इंग्रजी जाणणारे लोक जास्त आहेत...पण साहित्यप्रकारांतले वैविध्य हे दोन्ही भाषांत जवळपास सारखेच आहे...तंत्रज्ञान युरोप्+अमेरिकेत शोधले गेले म्हणून ते इंग्रजीत आहे...पण तेच जर इथे शोधले गेले असते तर ते मराठित असते

In reply to by टवाळ कार्टा

मुद्दा कळला. >>पण तेच जर इथे शोधले गेले असते तर ते मराठित असते आहे की. :)

In reply to by टवाळ कार्टा

इंग्रजी भाषेतील वैविध्य अफाट आहे. मराठी भाषा त्याच्या पासंगालाही पुरणार नाही. उदा. प्रवासवर्णन. जगभरातील वेगवेगळ्या भागात जाऊन त्याविषयी प्रवासवर्णन ह्या प्रकारचे साहित्य हे इंग्रजीत प्रचंड आहे. अगदी १००-२०० वर्षापूर्वीचीही पुस्तके आहेत. उदा. रिचर्ड बर्टनने इजिप्त, नाईल नदी, सौदी अरेबिया अशा कितीतरी भागात जाऊन प्रवासवर्णन लिहिले आहे. कित्येकदा भारत वा महाराष्ट्रातील जागांची वर्णने ही इंग्रजी पुस्तकात जास्त खोलात जाऊन केलेली आढळतात. १९०० साली "ए फरगॉटन एम्पायर" ह्या नावाचे विजयनगरच्या साम्राज्याचे वर्णन एका इंग्रज लेखकाने पुस्तकरुपाने प्रकाशित केले आहे. जिम कॉर्बेटचे शिकारीच्या निमित्ताने केलेले प्रवासवर्णन हे अजून एक. हे सगळे मूळ इंग्रजीत होते. मराठीत गोडसे भटजींचे प्रवासवर्णन, मुंबईचे वर्णन अशी मोजकीच प्रवासवर्णने आहेत. आधुनिक काळातली पु. ल. देशपांडे, अत्रे, ग. दि. माडगूळकर, मीना प्रभू अशी काही नावे आठवतात. पण त्या मानाने ही संख्या खूप कमी आहे. अफ्रिका, दक्षिण अमेरिका, दोन्ही ध्रुव, अशियातील (इंग्रजांना) अपरिचित भाग इथे जाऊन इंग्रजी लेखकांनी आपले अनुभव लिहिले आहेत. मराठी भाषेत अशा प्रकाराची वानवा आहे. तीच गोष्ट इतिहासाची. तीच गोष्ट तत्त्वज्ञानाची, तीच गोष्ट भाषाशास्त्राची. माझे असे आव्हान आहे की कुठलाही विषय निवडा आणि त्यात मराठी आणि इंग्रजीतले वैविध्य सारखेच आहे हे सिद्ध करा!

In reply to by हुप्प्या

इंग्रजी भाषेतील वैविध्य अफाट आहे. मराठी भाषा त्याच्या पासंगालाही पुरणार नाही......अफ्रिका, दक्षिण अमेरिका, दोन्ही ध्रुव, अशियातील (इंग्रजांना) अपरिचित भाग इथे जाऊन इंग्रजी लेखकांनी आपले अनुभव लिहिले आहेत. मराठी भाषेत अशा प्रकाराची वानवा आहे....तीच गोष्ट इतिहासाची. तीच गोष्ट तत्त्वज्ञानाची, तीच गोष्ट भाषाशास्त्राची.
छ्या हुप्प्याराव. तुम्हाला मराठी बाणा अजिबात दिसत नाही. हा उपहास आहे हे वेगळे सांगायलाच नको. (मराठी बाणे वगैरे गोष्टींना फाट्यावर मारणारा) ट्रुमन

In reply to by गॅरी ट्रुमन

जरी मी इंग्रजीचे श्रेष्ठत्व मान्य करत असलो तरी माझे मराठीविषयीचे ममत्व कमी होत नाही. म्हणजे ओबामाचे व्हाईट हाऊस (किंवा प्रणव मुखर्जी रहातात ते राष्ट्रपती भवन) कितीही भव्य, दिव्य, सुंदर असले तरी आपले घर ते आपले घर! इंग्रजी कितीही थोर असली तरी ती एक परकी भाषाच रहाणार. ती (माझ्यासाठी) मराठीचे स्थान घेऊ शकत नाही.

In reply to by सतिश गावडे

माफ करा पण मर्यादा मराठी भाषेच्या नसुन मराठी भाषेत उपलब्ध असलेल्या साहित्याच्या आहेत. "लेखन"हे भाषेचे केवळ एक माध्यम आहे. एक भाषा म्हणुन मराठी नक्कीच इतर कुठल्याही भाषेएवढीच किंबहुना बर्‍याच भाषांपेक्षा जास्त समृद्ध आहे. इंग्रजी भाषेतुन अधिक प्रमाणावर लोक साहित्य निर्मिती करत आहेत किंवा काही प्रकरचे लेखन आजवर केवळ इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे या कारणासाठी मराठी भाषा इंग्रजी पेक्षा कनिष्ठ ठरत नाही. अभिव्यक्तीच्या संदर्भात मराठी भाषा इंग्रजी इतकीच समृद्धी आहे आणि एक परकीय भाषा म्हणुन बर्‍याच गोष्टी इंग्रजीमध्ये मला तरी तितक्या परिणामकारकरित्या मांडता येत नाहित त्यामुळे माझ्यापुरती तरी मराठी जास्त समृद्ध देखील आहे.

In reply to by माहितगार

चित्राचा वापर अनाठायी झाला आहे असे वाटते. हुप्प्या यांचा "जास्त जुनी" हा भाग वगळता प्रतिसाद पटतो.

In reply to by सतिश गावडे

त्यांना संदर्भ तर शोधून पाहूद्यात, मिळेलही कदाचित.

In reply to by माहितगार

मराठी भाषेतील साहित्य म्हणायचे तर ते १२ व्या आणि १३ व्या शतकापासून आढळते. त्याआधीचे शिलालेख जे काही लोकांच्या मते मराठीत आहेत तर काहींच्या मते प्राकृतमधे आहेत असे सापडलेले आहेत. इंग्रजीचे काय? इंग्रजीतले जुन्यात जुने साहित्य हे ८ व्या शतकात आढळले आहे. ७ व्या शतकातील इंग्रजीचे साहित्यही आढळलेले आहे असे काही लोकांचे मत आहे. त्यामुळे इंग्रजी साहित्याचे वय हे मराठीपेक्षा ५०० वर्षांनी जास्त आहे. आता बोलीभाषा नक्की कधी बोलली जात होती, इंग्रजी कशाला म्हणायचे, प्राकृत आणि मराठी ह्यातील सीमारेषा कुठली हे सगळे प्रश्न सोडवणे अवघड आहेत. पण प्रस्तुत पुराव्यावरून तरी इंग्रजी ही मराठीच्या आधी बोलली जात होती असे वाटते. विकीवरती ही माहिती मिळाली आहे. तुम्हाला वेगळी माहिती असल्यास त्याचे संदर्भ द्या.

In reply to by माहितगार

ओ माहीतगार साहेब, राग येणार नसेल तर एक सांगतो, हे चित्र बदला राव. कसले बोगस केलेय. ग्राफीक्स भंगार, टेक्स्ट नॉन रीडेबल, कलरपण इतका भडक निवडलाय. का आवडते तुम्हाला हे चित्र? अगदी प्रेमाने जिथे तिथे टाकता. वाटल्यास एखादे छोटेसे ग्राफीक्स करुन देउ का मी?

In reply to by अभ्या..

या चित्राला घाबरून/वैतागून/नॉशियाटिक होऊन लोक संदर्भ देतील अशी ऐड्या असावी. तू चिकनं ग्राफिक बनवून दिलंस आणि लोकांनी वा वा म्हटलं पण संदर्भ दिला नाही तर काय उपयोग?

In reply to by हुप्प्या

इंग्रजी ही नि:संशय जास्त समृद्ध आहे ? अहो कसं शक्य आहे एक तर पुण्यामध्ये जास्त मराठी बोलली जाते, इथेच सगळे संपते. झालच तर मिपा पण मराठीत आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

...आणि ११ वी पासून पूर्ण इंग्लिश माध्यमात झाले. तरीही माझे शिक्षण पहिल्यापासून इंग्लिश माध्यमातच व्हायला हवे होते असे फार वाटते. इंग्लिशवर चांगली कमांड यायला जी वर्षे खर्ची पडली त्या काळात जर्मन किंवा फ्रेंच अशी कुठलीतरी दुसरी भाषा कामापुरती तरी शिकता आली असती त्या काळात आणि त्याचा शिक्षण/ करिअरसाठी काहीतरी उपयोग झाला असता :)
:) या पेक्षा मातृभाषाच इंग्रजी असतीतर ? (ह. घ्या, उपहासा बद्दल क्षमस्व)

In reply to by माहितगार

या पेक्षा मातृभाषाच इंग्रजी असतीतर ?
इंग्रजी मातृभाषा असती तर काय फरक पडला असता? इतरांचे माहित नाही पण माझ्यात अजिबात काहीही फरक पडला नसता.

In reply to by गॅरी ट्रुमन

मारवा यांनी एक धागा काढलेला ज्यान अनेक सूक्ष्म विनोद होते. त्यात एक होता 7. What do you get when you cross a joke with a rhetorical question? त्याचं उत्तर पण त्यांनी दिलेलं इथे- http://www.misalpav.com/comment/745394#comment-745394 त्याखाली मी लिहिलेलं की काही कळलं नाही. पण बहुतेक आता मला म्हणता येइल की कळलं म्हणून.

In reply to by असंका

पण बहुतेक आता मला म्हणता येइल की कळलं म्हणून.
म्हणा की मग. हू केअर्स?

In reply to by गॅरी ट्रुमन

इंग्रजी मातृभाषा असती तर काय फरक पडला असता? इतरांचे माहित नाही पण माझ्यात अजिबात काहीही फरक पडला नसता.
आमची एक धागा जाहीरात: इंग्रजाळण्यासाठी जागतीक ई-निवीदा

०१ली ते ०७वी पूर्ण मराठी ०८वी ते १०वी सेमीइंग्लिश (म्हणजे सायंस व मॅथ्स) नंतर बारावी,पदवी(अभियांत्रिकी) व पदव्युत्तर(कॉमर्स) पूर्ण इंग्रजी. पण इंग्रजीची कधी अडचण भासली नाही.कारण सुदैवाने घरचं चांगलं वातावरण आणि चांगले शिक्षक. एकदाच फक्त राष्ट्रवाद म्हणजे राष्ट्राराष्ट्रातील वाद असे सांग़णार्‍या इतिहासाच्या शिक्षिकेशी पाला पडला. बाकी आजवरचं सगळं लिखाण मराठीतच. आजही नोकरी ऑफिशियली इंग्रजीत असली तरी प्रत्यक्ष संवाद मराठीतच चालतात.पण प्रॅक्टीकल विचार केला तर आज इंग्रजी येणे आवश्यक आहे.

१० वी पर्यंत शुद्ध मराठी माध्यम. अभियांत्रिकी पदविका+ पदवी मिंग्रजी, हिंग्रजी, इंग्रजी अश्या त्रैभाषिक वातावरणात शिकलो.

मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं....
सहमत..स्टॅमिना बद्दल सोडून- ते जरा थट्टा केल्यासारखं वाटू शकतं.
पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही
मी या गोष्टीवर विचार केला नाही. करायची इच्छा कधी झालीच नाही. केला तरी असा निष्कर्ष काढता येइल असं वाटत नाही. पण एक धागा काढून प्रत्यक्ष माहिती मिळवण्याच्या आपल्या इच्छेचा आणि प्रयत्नांचा आदर वाटतो.
म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच...
कुठे चाललोय आपण काही कळेना.
म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे
... खरी रीअ‍ॅक्शन- "ऑ ?" तोंडदेखली रीअ‍ॅक्शन- "अरे वा! नशिबवान आहात! हार्दिक अभिनंदन.."
पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...
चांगलं सांभाळून घेतलंत. ओके. मी पण अनेकदा थक्क झालोय. मुजरा करत नाही कारण कल्पना आपली आहे आणि मी इथे डल्ला मारल्यासारखे होइल.
पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
आता खरं धर्मसंकट सुरु झालंय. म्हणजे ज्या ज्या कुणी इथे उत्तर देणं अपेक्षित आहे, त्या सगळ्यांची अशी खात्री पटलेली असायला हवी की त्यांना किंवा त्यांच्या लेखनशैलीला पाहून आपण थक्क झाला आहात आणि वरून जो मुजरा देत आहात तो त्यांच्यासाठीच आहे!! अवघड आहे.

माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून दिलेल्या स्पष्टीकरणा बद्दल आभार! मुजरा नाही म्हणणार..जरा अतीच होईल.. भा.पो.माझ्या तुमच्या पर्यंत.. राहिला प्रश्न प्रतिक्रियांचा... तर तो फक्त english माध्यमात शिकलेल्या व्यक्तिंनी देणे अपेक्षीत होते.. तरीही या निमित्ताने सगळे एकमेकांशी संवाद साधत असतील तर माझी त्यास काहीच हरकत नाही.. उलट आनंदच आहे... माहीतगारांनी दिलेल्या माहितीस धन्यवाद!! तुमचं परीक्षण खूप आवडलं!!!! :)

In reply to by अपरिचित मी

माझ्या लेखाची ओळन् ओळ वाचून दिलेल्या स्पष्टीकरणा बद्दल आभार!
कसचं कसचं... ;)

मी मराठी माध्यमातुन शाळा शिकलो..पण मुलाना convent school म्धे शिकवायचे वा प्रवेश मिळाला नाहि तर नुमवी..आदी मराठी माध्यमाच्या शळेतुन असे ठरवले..सुदैवाने मुला मुलीना convent school शाळेत प्रवेश मिळाला. मुली पुण्याच्या सेंट हेलेना.व मुलगा बिशप शाळेत शिकला.. आता मुले परदेशी असतात.. मात्र मुलीला सांगीतले आहे नातवाला harvard school of business मधुन मास्टर कर म्हणुन..

सातवीपर्यंत पालिकेच्या शाळेत शिक्षण झाले. पुढे दहावीपर्यंत शहरातल्या नामवंत मराठी शाळेत शिकलो. कला शाखेत प्रवेश घेतल्यामुळे पुढील संपूर्ण शिक्षणही मराठीतूनच झाले.

एखादा दुसरा विषय सोडला तर पूर्ण शिक्क्षण मराठीतून पदवी पर्यन्त. मराठी माध्यमाबद्द्ल आग्रही. पण त्याची कारणे सांस्कृतिक. हिंदी भाषेबद्द्ल पुरेसा आदर. मात्र...... मात्र ,,,इथेच घोडे पेंड खाते. .....वापरायला सर्वात आवडते इंग्रजी. स्पेलिंग हा एक मोठाच दोष त्या भाषेत आहे. श्लेष हाही दोष आहे पण हा दोष बहुदा सर्वच भाषांमधे आहे. जोडून काढता येते म्हणून रोमन लिपीबद्द्ल तसेच मोडी बद्द्ल सन्मानाची जागा. पण देवनागरी सर्वात क्लास !

पिशी अबोली, तुमचा इथला संदेश वाचला. युनिव्हर्सल ग्रामर म्हणजे नक्की काय? जरा विस्ताराने ही संकल्पना सांगणार का? विकीवरचा लेख वाचला पण डोक्यावरून गेला. वेगळा धागा उघडलात तर सोन्याहून पिवळं. आता तुमच्या विधानाकडे वळतो :
>> पारंपारिक व्याकरण मात्र inductively तयार केलेल्या नियमांसाठी एक पूर्ण वेगळी शब्द-संकल्पना व्यवस्था >> तयार करतं. या व्यवस्थेला मूर्त म्हणण्यापेक्षा कृत्रिम म्हणणं मलातरी जास्त योग्य वाटतं.
inductively म्हणजे काय? व्याकरण हे आपोआप उत्क्रांत होत असतं ना? कोणी एका माणसाने बनवलेलं नाही. मग ते कृत्रिम कसं? आ.न., -गा.पै.

In reply to by पिशी अबोली

आम्हाला रेडी टु ईट रेशीपी मिळते ना पण... खवउपा करण्याची वेगळी गरज पडणार नाही...

पहिली ते दहावी शुद्ध मराठी माध्यम. अकरावीपासून पुढे पदवीपर्यंत मिंग्रजी, इंग्रजी आणि हिंग्रजी. पदव्युत्तर काळात मात्र इंग्रजीच.

पहिली ते दहावी, अकरावी-बारावी मिंग्रजी. पदवीला पहिल्यावर्षी इंग्रजीतून गप्प बसायचो!* ;) नंतर गाडी सुमाट सुटली ती अमेरिकन अ‍ॅक्सेंट्पाशी येऊनच थांबली आहे सध्या! (*कल्पना श्रेय डॉ.अनिल अवचट) (हाडाचा मराठी)चतुरंग

चांगले शिक्षण घेण्यासाठी, ज्या भाषेच्या माध्यमातून शिकायचे ती भाषा उत्तम प्रकारे अवगत असणे जरूरीचे आहे असे वाटते. सध्याच्या काळात गणित आणि शास्त्र (जीव, भौतिक, रसायन इ.) साठी इंग्रजी येणे अनिवार्य आहे. पण बाकीचे विषय मातृभाषेतून शिकायला काय हरकत आहे ? माझे १०वी पर्यंतचे शिक्षण संपूर्ण मराठीत . ११ वी ते पोस्ट ग्रॅज्युएशन .. संपूर्ण इंग्रजी .

सौ खरे कॅनव्हेंट शिक्षित आहेत, पण बहुतेक मिपावर थेट लिहित नाहींत, माईसाहेबांसारखंच प्रकरण.

In reply to by नमकिन

त्यात काय एवढे, मीपण हाय. कॉलेज ला मराठी मिडीयम असले तरी मी एकटाच इंग्लिश थिअरी पेपर दिलेला. काय विशेष नसते. इंग्लिश माझं पण कच्चे आहे, मराठी बरे आहे.

चौथीपर्यंत मराठी माध्यम. पाचवीपासून इंग्रजी. इंग्रजीत शिक्षण सुरू झाल्यापासून जो त्रास होतोय त्याच्या बद्दल एक लेख मी मिपावर प्रकाशित केला होता.

मास्तर कृपेने आम्ही इंजिनेरींग सुद्धा मराठीत घोळलेल्या कुठल्याशा भाषेत शिकलोय, बाकी झेडपी व नंतर कभापावि मधे मराठी जमेल तशी या माध्यमामधुन १० वी पर्यंत कसेबसे पोहोचलो

खुद्द कॉन्वेंट अन त्यातही प्रॉपर सेंट फ्रांसिसचा :P पण संस्कृत प्रचुर मराठीत संभाषणास प्रत्यव्याय नाही !त्याचं काय न 5 तास शाळेत पाठवतो आम्ही म्हणून आमच्या आई बापाने उरलेल्या 19 तासात आम्हाला असेच मोकाट सोडले नाही उत्तम जेवण जेवायची कला शिकवली, खड्या आवाजात रामरक्षा शिकवली, ती पुर्ण आरोहअवरोहासकट नीट जमेपर्यन्त घोटून घेतली नंतर योग्य वयात हातात पुस्तके दिली चांगल्या लेखांची अन लेखकांची ओळख करुन दिली त्यामुळे हिंदी मराठी उत्तम झाली आमची. माझ्या स्वतःच्या उदाहरणावरुन तरी मी हेच म्हणतो कॉन्वेंट/मराठी/हिंदी माध्यमाने फरक पडत नाही पोरे 19 तास आपल्या हाती असतात वेळेचा सदुपयोग करणे शिकवले की इंग्लिश पण उत्तम होते अन मातृभाषेशी असलेली नाळ सुद्धा घट्ट होते.

In reply to by नाईकांचा बहिर्जी

सहमत. घरात काय नि कसे बोलले जाते ह्यावर सगळे अवलंबुन आहे. जन्मभर मराठीत शिकुन अत्यंत भिकार मराठी असणारे अनेक लोक परिचयात आहेत. मी पहिली ते सातवी - मराठी आठवी - दहावी - सेमी इंग्लिश पुढे सर्व शिक्षण इंग्रजीत..

जन्मस्थान नागपूर आहे. आई सर्वात मोठी. म्हणून वर्षांतून एक चक्कर नागपूर चा व्हायचाच. तिथे वास्तव्या दरम्यान आसपास आढळणारं वाचण्यासारखं सगळं साहित्य मराठीत असे. अगदी वर्तमानपत्रां पासून मामे-मावस भावांच्या शाळेच्या पुस्तकां पर्यत. मराठी वाचायची सवय तिथूनच जडली. पुढे वसंतरावांच्या नाट्य गीतांमुळे, माणिक वर्मांच्या भावगीतांमुळे मराठी भलतीच आवडू लागली. पुढे लाइब्ररीतील मटा मधे पानभरुन लेख दिसला-अभी तो मैं जवान हूं...लेख आवडला...त्या दरम्यान त्यांत प्रकाश जाेशींचं सदर येत असे...त्यासाठी मटा घेटला. तर पंधरा दिवसांत गोविंद तळवळकरांनी आपलंसं करुन टाकलं...मराठी किती सोपी आहे...हे त्यांनीच ठसवलं मनांत...एकूण शिक्षण हिंदी मीडियम... http://www.aisiakshare.com/node/5039

तुलनात्मक दृष्टयामराठी भाषेपेक्षा इंग्रजी शिकणे सोपे आहे. लिहिणे वाचणे सोपे आहे. ऐकणेही थोड्या प्रयत्नाने जमू शकते. फक्त बोलण्याला सराव व धीटपणा लागतो व तिथेच साधारणत: घोडे पेंड खाते.
गोड गैरसमज आहे ,इंग्रजी भाषा मुळातच अवघड आहे,भारतीय भाषा व इंग्रजी यांच्यात साम्य कमी असल्याने इंग्रजी शिकणे अवघड पडते. इंग्रजी शिकायला व ती फाडफाड बोलायला मुळातच माणुस हुशार लागतो.सिंम्पल टेन्सच्या पलिकडे बहुतेकांची झेप जात नाही याचे कारण इंग्लिशमधले modality ,conditionals,would should could या ऑक्झीलरी वर्बचा अनियमीत वापर बहुतेकांच्या डोक्यात शिरत नाही.तो शिरायचा असल्यास मुळातच माणुस हुशार हवा .कॉन्व्हेंटला घातल्याने आपली मुले फाडफाड इंग्लिश बोलतील या गैरसमजातून बाहेर यायला हवे.

१ली ते १० वी - मराठी ११ - १२ - पदविका - अभियांत्रिकी पदवी / व्यवस्थापन पदव्यूत्तर - इंग्रजी आणखी एक पदव्युत्तर - मराठी विद्यावाचस्पती ( पूर्ण व्हायची आहे ) - इंग्रजी मराठीत शिकल्याने शष्प देखील फरक पडला नाही. मात्र इंग्रजी वाचन / चित्रपट पाहणे खूप कमी आहे

मेंदूच्या विद्युत-रासायनिक संकेतभाषेत शिकलो. आमच्या ब्रोकाज एरियात मराठी व इतर भाषा थोड्या कालांशाने साठवल्या गेल्याने डॉमिनंट वा प्रमुख भाषा ही मराठी म्हणता येईल. बाकी धेडगुजरीपणाचं म्हणाल तर त्याला आमच्या मेंदूचा वेर्निकेज एरिया जबाबदार आहे बुवा. ;-)