Skip to main content

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

लेखक गॅरी शोमन यांनी बुधवार, 23/03/2016 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते "समाज प्रबोधन‘ पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी वैद्य यांनी भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, रुबिना पटेल, तमन्ना शेख उपस्थित होत्या. संदर्भ "http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5525909934268008440&Secti…% भाई वैद्य साहेब मी समाजवादी मंडळींना मतभेद असतील तरी विचारवंत मानत होतो. पुण्यात काही मुस्लीम मंडळींनी चौकात येऊन औवैसी यांच्या विचाराचा निषेध केला. सर्वच मुस्लीम काही औवेसी च्या मताला बांधलेले नाहीत. आपल्याला रा स्व संघ जर चुकीचा वाटत असेल तर त्यावर टीका करायला मोकळीक आहे पण अस राष्ट्र्विरोधी कृत्याच समर्थन करुन टीका करु नका. हा पायंडा चांगला नाही. आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. जिथे जिथे मुस्लीम जास्त झाले तेथुन हिंदुंना पळवौन लावले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा इतिहास पुन्हा लिहीण्याची आवश्यकता नाही. आजही पाकिस्थानातुन हिंदु भारतात येत आहेत. काश्मिरमधला हिंदु संपला आहे. का आम्हाला आत्मीयता वाटेल ? तुम्ही घेतला असेल मक्ता आम्ही नाही. भारतात मुस्लीमांना भय वाटेल असे काही घडत नाही. या उलट जे नरसंहार काश्मीरमधे झालेत त्याची आठवण ठेवा. मुस्लीमांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाज काम करतो आहे. तुम्ही संघाला शिव्या दिल्याने त्यात फरक पडणार नाही. भाई वैद्य साहेब. १) तुम्ही कधी ज्या मुस्लीम महिलेला तोंडी तलाक मिळालेला आहे त्यावर आवाज उठवलाय ? २) तुम्ही कधी मेहेर की रकम तलाक पिडीत महिलेच्या उपजिवीके इतकी असते का यावर विचार केलाय ? ३) तळपत्या उन्हात काळ्या बुरख्यात वावरणार्‍या महिलांना बुरख्या बद्दल काय वाटत हे जाणलय ? ४) सासर्‍याने केलेल्या बलात्काराला एका मुल्ला ने बलात्कारीत सुनेला तिच्या नवर्‍याने तलाक द्यावा व पुन्हा सासर्‍याने निकाह लावावा ही शिक्षा स्वतंत्र भारतात योग्य वाटते ? ५) या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो. यामुळे तलाक पिडीत महीला ताठ मानेने जगु शकत नाहीत. त्यांना कोणी अमिर शोधुन त्याची तिसरी किंवा चवथी बिवी म्हणुन रहावे लागते. या पेक्षा जर भारत माता की जय चा आग्रह झालाच तर तो सौम्य असेल. तुम्ही संघद्वेशाने पछाडलेले मानसीक रोगी आहात. विचारवंत जर कोणी तुम्हाला यापुढे म्हणणार असेल तर ती मोठी चुक असेल. राष्ट्र प्रेम हा संस्कार असतो हे सुध्दा तुम्हाला राष्ट्र सेवा दलात शिकता आल नाही. भारत माता की जय म्हणल्याने राष्ट्र विरोधी कृत्य करताना एखादा क्षण विचार करावा इतकाच संस्कार या घोषणेत आहे. आज अनेक मुस्लीम तरुण देषविघातक कृत्ये करत आहेत त्याचा निषेध भाई तुम्ही कधी केलात का ? भाई वैद्य साहेब तुम्ही संघाच्या विचाराच्या लोकांच्या पाठींब्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कधी काळी उपभोगल आहे त्याची आठवण ठेवा. एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.

वाचने 28991
प्रतिक्रिया 118

प्रतिक्रिया

In reply to by तर्राट जोकर

साहेब इस्लाम या शब्दाचा अर्थच "अल्लाच्या इच्छे"ला शरण( कोणताही प्रतिवाद न करता) जाणे. एकदा आपण शरण गेलात कि बुद्धीवादी चर्चा /प्रतिवाद हा अशक्यच आहे. म्हणूनच कुराण शरियत बद्दल न्यायालयीन किंवा इतर वाद संभवत नाहीत. संभवते फक्त त्या शब्दांचा अर्थ लावणे किंवा शाब्दिक कसरत. आणि हीच कसरत मौलवी करून त्यांना पाहिजे तो अर्थ काढत असतात. आणि आपल्याला पाहिजे तसे फतवे जाहीर करतात. मग तो फतवा आधुनिक काळात कितीही हास्यास्पद अन्यायकारी आणि भयानक असेल तरीही कारण तीच "अल्लाची इच्छा" आहे . उदा. सासर्याने सुनेवर बलात्कार केला तर ती स्त्री आता नवर्याची आई होते म्हणून तिने नवर्याला तलाक देऊन सासर्याशी निकाह केला पाहिजे.असा फतवा दारूल उलूम देवबंद या मोठ्या धार्मिक पाठ्शालेने काढला होता आणि संतापाची गोष्ट हि कि त्याला All India Muslim Personal Law Board ने पाठींबा दिला होता आणि मौलवी मुलायम सिंहानि त्याला पाठींबा दिला होता. यापेक्षा मुस्लिम लांगुलचालन काय असू शकते? https://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_casehttps://en.wikipedia.org/… हि केस मुळातूनच वाचा म्हणजे तुमच्या शंकांचे निरसन होऊ शकेल. हेच All India Muslim Personal Law Board आता सांगत आहे कि आमच्या वैयक्तिक कायद्यात सर्वोच्च न्यायालय ढवळा ढवळ करू शकत नाही. इतका घोर अन्याय एखाद्या स्त्रीवर होत असेल तर न्यायासन किंवा सरकारने गप्प बसावे काय?

In reply to by सुबोध खरे

गल्ली चुकलात का मालक? हा प्रतिसाद दुसर्‍या धाग्यावर द्यायचा होता का? कारण तुमच्या प्रतिसादातले एकही वाक्य माझ्या प्रतिसादाच्या मुद्द्याच्या आसपासही फिरकत नाही. मुद्दा आहे कुराणमधे अमुस्लिमांना मारण्याचे आदेश.

In reply to by तर्राट जोकर

गल्ली हीच आहे साहेब "कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा" हे आपलेच शब्द आहेत ना? नियम जुजबी नसून सर्व आयुष्य आणि समाजव्यापी आहेत आणि ते ठरवणारे अल्लाचे सेवक मौलवी आहेत त्यांचा शब्द म्हणजे अल्ला चा शब्द इस्लाम मध्ये जे आणि जसे सांगितले आहे तसेच्या तसे वागणे हे सर्व मुसलमानांचे आद्य कर्तव्य आहे आणि कुराण मध्ये काफिरांना देहदंड देणे हे सच्च्या मुसलमानाचे आद्य कर्तव्य आहे असे स्पष्ट लिहिलेले आहे. याची बुद्धीवादि चर्चा होऊ शकत नाही एवढेच मला म्हणायचे आहे. गीतेतील शब्द न पाळणारा हिंदू धर्मातून धर्मबाह्य होत नाही आणि त्याला देहदंडाची शिक्षा नाही भारतीय दंड विधान संहितेत पण तसे शरीया मध्ये आहे हा एक फार मोठा फरक आहे. हे जर तुम्हाला समजून घ्यायचेच नसेल तर वाद थांबवू.

In reply to by सुबोध खरे

गल्ली हिच असेल तर. १. मौलवी जे शब्द (फतवे) काढतात ते शंभर टक्के इम्प्लिमेंट होत नाहीत. २. काफर म्हणजे कोण हे स्पष्ट असतांना मुस्लिम राष्ट्रांमधे अमुस्लिमांना जीवंतच ठेवायला नको. ३. कुराणातले शब्द किंवा मौलवींचे (अडचणीचे) फतवे न मानणारे मुस्लिम बहुसंख्येने आहेत. ते धर्मबाह्य झालेले दिसत नाहीत. ४. 'कुराणात दिले आहे काफरांना देहदंड द्या' असे मानणारे आणि शब्दशः फॉलो करणारे मुस्लिम असते तर हे मनुष्यजात केव्हाच संपली असती. तुम्ही जे म्हणताय ते वस्तुस्थितीशी म्याच होत नाही. ह्या किंवा कुठल्याच धाग्यावर कधीच शरियाचे समर्थन मी केलेले नाही हे लक्षात आणून देतो. भारतीय दंड विधान आणि शरिया यातला फरक मला समजुन सांगण्याची गरज तुम्हाला का पडली ह्याचा विचार करत आहे. समजुन घ्यायचे असेल तर हे समजून घ्या की प्रस्तुत चर्चेची प्रतिसाद-रांग बघता कुराणाचा हवाला देऊन होणार्‍या हत्या हा मुद्दा आहे. शरिया वा भादंवि नाही. तो वेगळा धागा आहे त्यावर माझे मत आधीच दिलेले आहे.

In reply to by तर्राट जोकर

1 सर्व फतवे इम्प्लीमेंट होत नाहीत, बरोबर गाढ़वासारखे कोणी रेकले तर त्याला कोणी गायन म्हणनार नाही. आता यातील गंमत पहा, एकहि मुस्लिम उठून बोलत नाही की हां फतवा शुद्ध गाढवपणा आहे. काही महिन्यापूर्वी दारुल उल देवबंदने फतवा जारी केला होता की मुस्लिम मुलींनी वा महिलांनी रिसेप्शनिस्टचे काम करु नए ते इस्लामच्या विरुद्ध आहे. किती जणांनी नोकर्या सोडल्या? शेवटी पोट नेहमी धर्माच्या पुढे येते. पण एकाही मुस्लिम महिलेने पुढे येऊन म्हटले नाही की हा निव्वळ गाढ़वपणा आहे. कारण याला म्हणजे फतव्याला जो विरोध करेल त्याला शिक्षा ठरलेली. आता असच काही आपण हिंदू वा इतर धर्माबद्दल घेऊ, बायकानि रान उठवले असते. माझ्यासारख्या लोकांनी या महिलांना पाठिंबा देखिल दिला असता. ते मंगेसराव व् गचि चे सोडून द्या. आणि यासाठी मला हिंदुत्ववादी संघटनाचा धमकिवजा इशारा देखिल आला नसता

In reply to by तर्राट जोकर

2 मुस्लिम राष्ट्र हे आता उघड करु शकत नाही कारण दुसऱ्या देशातील मुस्लिमाना हे फार भारी पडेल. तालिबानने बुद्धाच्या मूर्ति तोफा लावुन पाडल्या त्याचे पडसाद मियांमारसारख्या बौद्धिस्ट बहुसंख्य देशात कशा उमटत आहेत ते जग पहातच आहे. अहिंसा परमो धर्म मानणारा बौद्ध रोहिंग्याना ठोकताना आपली धर्माची मुळ शिकवण विसरत आहे. त्यामुळे संधि मिळताच हे मुस्लिम धर्मांध हत्याकांड घडवणार. पाकिस्तानात शियाना जसे मारले जाते याला काय जबाबदार पश्चिमी देश आहेत? शिवाय जो मुस्लिमातला एक मोठा वर्ग जो या हत्येचा विरोधी आहे तो देखिल इस्लामविरोधी बनेल

In reply to by तर्राट जोकर

3 मुळातच हां प्रश्न चुकीचा आहे कारण मुस्लिमात धर्मबाह्य ही संकल्पनाच् नाही आहे. प्रश्न आहे फतव्याला विरोध करण्याचा तो कोणी करत नाही. इस्लामच्या शिकवणीनुसार मुस्लिम स्त्रियानी अंगप्रदर्शन करता कामा नये. फ़िल्म इंडस्ट्रीत तर मुस्लिम मुलींची भरमार आहे मग का नाही मौलवी बोम्बा ठोकत की ह्या नट्या आता इस्लामच्या बाहेर आहेत?

In reply to by तर्राट जोकर

कुराण मध्ये लिहीलं असू दे वा नसू दे शेवटी मृत्युचं तांडव होतच आहे, बलात्कार, स्त्रियांना गुलाम म्हणून वागवणे होतच आहे. प्रश्न हा आहे की मुस्लिम समाज सुधारणा स्वीकारायला आणि करायला तयार आहे का? सर्व मुसलमान वाईट नसतात किंवा सर्व मुसलमानांना उगाच वाईट समजले जाते हे नुसते ओरडून काय उपयोग? ही (कु)प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते स्वतःच कारणीभूत आहेत. बाकीच्या लोकांच्या मनातून ही भीती वा समाज घालवण्यासाठी समस्त मुस्लिम समाजाने काय केलं? या पुढे ही काय करणार आहेत? विमानात, बस वा ट्रेन मध्ये २-४ दाढी आणि टोपीवाले दिसले तर नकळत मनात शंकेची पाल चुकचुकतेच आणि हा प्रवास नीट पार पडू दे म्हणून देवाचा धावा सुद्धा होतो. हा लेख वाचण्यासारखा आहे मराठीत टायपायला वेळ नसल्याने काही भाग जसाच्या तसा देत आहे Is Islam a violent religion? The history of Islam is brutal. Prophet Mohammed was a religious leader but also a warlord who imposed his beliefs through military actions. As the military leader of Medina, he was fighting the leader of Mecca for ten years. The Quran contains at least 109 verses that call Muslims to war with nonbelievers for the sake of Islamic rule. “Fighting is prescribed to you” — Quran 2-216

In reply to by ट्रेड मार्क

विमानात, बस वा ट्रेन मध्ये २-४ दाढी आणि टोपीवाले दिसले तर नकळत मनात शंकेची पाल चुकचुकतेच आणि हा प्रवास नीट पार पडू दे म्हणून देवाचा धावा सुद्धा होतो. ह्यालाच इस्लामोफोबिया म्हणतात. बाकी, ब्रुसेल्स, पॅरिस, जर्मनी इत्यादी ठिकाणी हल्ले झाले की अशा लेखांचा पूर येतो. खाली लिन्कवर मागच्या वर्षीच्या आतंकवादी हल्ल्यांची लिस्ट आहे. प्रत्येक महिन्यात अल्मोस्ट प्रत्येक दिवशी आतंकवादी हल्ले झालेले आहेत. ह्यातले बहुसंख्य हल्ले हे मुस्लिमबहुल प्रांतांत, मुस्लिम जनतेवरच झाले आहेत. जर कुराण नॉन-बिलीवर्सना ठार करा असे म्हणत असेल तर बहुसंख्य हल्ल्यांमधे मरणारे बहुसंख्य मुस्लिमच का आहेत हे प्रश्न अशा लेखांमधे कधी दिसलेत का? https://en.wikipedia.org/wiki/List_of_terrorist_incidents,_2015 कुराण फक्त मारामारी करण्याचा आधार बनवला आहे. दादरी प्रकरणात व्यक्तिगत खुन्नस काढण्यासाठी जसं अखलाकच्या घरात गोमांस खाल्लं जातंय असा मंदिराच्या भोंग्यावरुन जाहिर करुन पद्धतशीरपणे गोमातेचा हवाला देऊन हत्या झाली. तसेच हे आहे. असे जीव घेणारे धर्मांध हे धर्मामुळे होतात की त्यांची मानसिकता मुळात तशी असते व फक्त ते त्याला नैतिक अधिष्ठान देण्यासाठी धर्माचा आधार घेतात हा खरा प्रश्न आहे.

In reply to by तर्राट जोकर

दहशतवादी हल्ल्याची तुलना दादरी बरोबर? दादरी आणि मूद्बिद्री ची तुलना करा. बाकी मुसलमान एकमेकांना मारोत नाहीतर काही पण करोत. पण त्याची झळ बाकीच्यांना कशाला? त्यांच्यात वेगवेगळे पंथ आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत पण त्यासाठी हे लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत. आता हिंदू धर्मामध्ये पण वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे देव आहेत, पूजन करायची वेगवेगळी पद्धत आहे. पण हिंदू एकमेकांचा या गोष्टी वरून जीव घेताना दिसत नाही. हिंदूंमध्ये एकमेकांना विरोध असेल, भांडणं असतील पण म्हणून दुसर्याच्या वस्तीवर बॉम्ब टाकून भ्याडासारखे हल्ले करत नाहीत. नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ मुद्दा मिस केलातच. इस्लामोफोबिया होण्यासाठी कारणीभूत मुस्लिमच आहेत. ही भावना काही आपोआप आलेली नाही. मुस्लिमांनी केलेल्या कृती म्हणजे इतर धर्मियांवर, पंथीयांवर केलेले अत्याचार, क्रूरपणा त्याला कारणीभूत आहे. लगेच विदा मागू नका, कारण तुम्हीच तो वर दिलेला आहे. उलट आता मीच तुमच्याकडे विदा मागतो. या सारखी हिंदू लोकांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची यादी द्या. त्याची तुलना करा किती हल्ले झाले त्यात एकूण किती लोक मारले गेले याचा आलेख मांडा. हिंदू Vs मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांची तुलना करा. मग आपण बोलू.

In reply to by ट्रेड मार्क

@उलट आता मीच तुमच्याकडे विदा मागतो. या सारखी हिंदू लोकांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची यादी द्या. त्याची तुलना करा किती हल्ले झाले त्यात एकूण किती लोक मारले गेले याचा आलेख मांडा. हिंदू Vs मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांची तुलना करा. मग आपण बोलू. >> +++१११ . शिवाय मुस्लिमदेशातच हल्ले होत असतील(मुस्लिम मारले जात असतील)तर त्याला बव्हँशी कारणीभूत इस्लामच आहे. मारणारेही मुस्लिम,मारणारेहि मुस्लिम..हि परिस्थितीही कुराणानी करून ठेवलेली आहे. मारणाय्रानच हे नेहमी म्हणणं असतं कि मरणारे हे काफ़िरांसारखे वागतात..ते वर्तनांनी बिगर मुस्लिम झालेले होते..आम्ही मात्र ख्ररेखूर्रे मुस्लिम होतो..म्हणून आम्ही त्यांना मारलं. मग मागे राजकारण काहीही असो.

In reply to by ट्रेड मार्क

नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ मुद्दा मिस केलातच. इस्लामोफोबिया होण्यासाठी कारणीभूत मुस्लिमच आहेत. ही भावना काही आपोआप आलेली नाही. मुस्लिमांनी केलेल्या कृती म्हणजे इतर धर्मियांवर, पंथीयांवर केलेले अत्याचार, क्रूरपणा त्याला कारणीभूत आहे.
संपूर्ण परिच्छेदाला +९९९९९९९.....

In reply to by ट्रेड मार्क

इतरांवर केला जाणारा अत्याचार, क्रूरपणा हा पोथ्यांतून येतो की मुळात मानसिकताच तशी असते हा माझा नेहमीचा प्रश्न. ह्याला उत्तर असेल तर बोला. बाकी तो इस्लामोफोबिया तुमचा तुम्हाला लखलाभ. तुमच्या दुर्बिणी मुस्लिमांवरच फोकस असल्याने इतरत्र काय जळतं ह्याच्याशी कर्तव्य असण्याचं तुम्हाला काय पडलंय. मुस्लिमद्वेष्ट्यांचा आवडता मुद्दा तो एवढाच की मुस्लिमांनी इतर धर्मावर हल्ले केले, हिंदूंनी असे इतर धर्मांवर हल्ले केले नाहीत. हा मुद्दा मी कधीच अमान्य केला नाही, करत नाही किंवा करणार नाही. पण हा एकच एवढा मुद्दा. पुढे काय? हिंदूंच्याही क्रूरपणाच्या अनेक कृती आहेत. पण त्या धर्मातल्या धर्मात आहेत, जातीतल्या जातीत आहेत, वैयक्तिक आहेत. म्हणून क्वालिफाय केल्या जात नाहीत. खालील दुव्यावर गाजलेल्या घटना आहेत. अशाच प्रकारच्या घटना नेहमीच देशाच्या कानाकोपर्‍यात होत आहेत. प्रत्येक घटना देशपातळीवर गाजत नाही कारण प्रत्येक घटनेत राजकिय लाभ उठवण्याचे पोटेन्शियल नसते, अनेक घटना राजकिय ताकतीखाली दाबल्या जातात. https://en.wikipedia.org/wiki/Caste-related_violence_in_India मुळात हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या दहशतवादी हल्ल्यांच्या तुलनाच होणार नाही हे तुम्हीही जाणता आणि मीही. म्हणून तुम्ही तो मुद्दा पुढे करताय. अहो पण तो माझा मुद्दा नाहीच. बरेच लोक इथे माझा मुळ मुद्दा मिस करुन हिंदु-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतरांवर केला जाणारा अत्याचार, क्रूरपणा हा पोथ्यांतून येतो की मुळात मानसिकताच तशी असते हाच माझा मुद्दा. तो जगातल्या कोणत्याही राजवटी च्या, धर्माच्या, देशाच्या, इझमच्या प्रभावाशी लावा. प्रश्न तोच राहिल. मुस्लिमांवर ठेवलेलं बोट उचला म्हणजे सावलीखाली लपलेली इतर हत्याकांडं आणि क्रुरपणा, अत्याचारही दिसतील. जरा सवडीनं शांतपणे वाचावेत. खालच्या दुव्यात अत्याचारांच्या बाबतीत सर्वधर्मसमभाव आहे. https://en.wikipedia.org/wiki/List_of_genocides_by_death_toll https://en.wikipedia.org/wiki/List_of_events_named_massacres आणि हो, मी इतरांकडे बोट दाखवतोय म्हणजे मुस्लिम किती निरागस,बिच्चारे आहेत असा ठरवण्याचा हेतु नसतो. घोड्यासारखी झापडं लावून फक्त मुस्लिमच अत्याचार करतात हा सोयिस्कर पवित्रा लोकांनी सोडावा हा हेतु आहे. इथे तुम्ही चूक मी बरोबर असा खेळ खेळत बसण्यात मला रुची नाही. दृष्टीकोन संकुचित नको व्यापक असावा इतकीच माफक अपेक्षा आहे. संकुचित दृष्टिकोनाने घृणा वाढते. मग आपल्याच लोकांनी केलेले अत्याचार अजिबात चुकीचे वाटत नाहीत. आपणही क्रूर होतो पण आपल्याला कळत नाही. दादरीचे उदाहरण दिले की मुदबिंद्रीने काउंटर अटॅक करायचा ह्या विचारसरणीतून ते स्पष्ट होतं. माझ्यासाठी दादरीही सेम, मुद्बिंद्रीही सेम, मालदाही सेम, गोध्राही सेम आणि गुजरातही. मला अत्याचार आणि क्रुरपना करणारे यांच्यात धर्म, जातीच्या आधारावर फरक करता येत नाही. पण असे करणारे बघितले की चिंता वाटते. मुस्लिम तेवढे क्रूर आणि इतर सगळे शांततेचे भोक्ते, अगदी गांधीजींचे चेले असे जे वातावरण बनवले जाते ते चूक आहे एवढेच म्हणणे आहे. क्रूरता प्रत्येकाच्या ठायी असते, काही लोक शस्त्रांचा आधार घेतात, काही शब्दांचा, काहीजण योग्य वेळ येण्याची वाट बघत क्रुरपणा पाळत बसतात. प्रत्येकाचे दान त्याच्या त्याच्या झोळीत टाकले गेले पाहिजे. मला मुस्लिमप्रेमी समजणारांना माझी भुमिका समजली असेल अशी आशा आहे. अन्यथा असो. लेबलींग अदर्स इज न्यु फॅशन इन टाउन. :-)

In reply to by तर्राट जोकर

म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा नाही हे सिद्ध होतंय. ज्याला कोणाला दुसर्‍याला मारायचे आहे तो कुरानाचा हवाला देउन दुसर्‍याला अमुस्लिम ठरवुन मारतो. ह्यात कुराणाचा नक्की काय दोष? ज्याला दुसर्‍याला मारायचे आहे त्याला कुठलेही कारण पुरते की? मारण्याचे कारण धार्मिक दिले की मारणार्‍याला उदात्त कर्म केले असे वाटते.
नाही सिद्ध होत. वर मी कुराणातील या संदर्भातील ३ श्लोक दिले आहेत. तसे अजून बरेच श्लोक आहेत.
मुस्लिम म्हणजे अल्लाह ला एकमेव देव मानणारा, पाच नमाज पढणारा, मोहमद पैगंबराला प्रेषित मानणारा, कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा असे आहे. बाकी हजार फाटे प्रत्येक धर्म-संप्रदायात असतात.
इथे थोडासा फरक आहे. सुन्नी मोहम्मद पैगंबराला अखेरचा प्रेषित मानतात व शिया अजून प्रेषित येतील असे मानतात. हा मुख्य फरक आहे. सुन्नी बहुसंख्य असल्याने ते शियांची हत्या करीत आहेत. पाकिस्तानात तर शियांना अमुस्लिम जाहीर करा अशीही मागणी होत असते.
मारण्याचे कारण कुराण आहे हे नक्की का? मला तसे वाटत नाही. कारण गीतेतही असे श्लोक आहेत ज्याचा आधार घेउन अमर्याद हिंसा करता येणे शक्य आहे. आपण सर्व करुन नामानिराळे राहून, भगवंताची अशीच इच्छा आहे असे बोलले की झाले. पण हिंदू लोक गीतेचा आधार घेऊन कत्लेआम करत नाहीत.
मुळात कुराणात इतरांना मारा असे म्हटले नसेलही किंवा ते श्लोक पूर्णपणे वेगळ्या संदर्भात लिहिले असतील. परंतु आपल्याला हवा तसा अर्थ लावून हत्या होतात.

In reply to by श्रीगुरुजी

मुळात कुराणात इतरांना मारा असे म्हटले नसेलही किंवा ते श्लोक पूर्णपणे वेगळ्या संदर्भात लिहिले असतील. परंतु आपल्याला हवा तसा अर्थ लावून हत्या होतात. >> हेच म्हणायचे आहे. त्यामुळे 'त्यांच्या कुराणातच तसे लिहिले आहे' असा प्रचार करणे चुकीचे आहे. कारण ते अर्धसत्य आहे. कुराण ज्या काळात लिहिले गेले तेव्हा त्यांना हिंदू, क्रिस्चन असे काही म्हणायचे नसेल. जो पैगंबराच्या विरुद्द जाईल , त्यांचे म्हणणे (जे अल्लाहचे म्हणने मानले जाते) मानणार नाही त्याविरुद्ध युद्ध करा, त्यांना मारा कारण ते तुम्हाला मारणारच असा काही अर्थ असेल. तत्कालिन संस्कृती बघता तेव्हाचे संदर्भ तेव्हाच बघितलेले बरे. आताचे मुस्लिम हवा तसा अर्थ लावून हत्या करतात त्यात कुराणाचा संबंध नाही. ते फक्त त्याचा नैतिक ढाल म्हणून वापर करतात.

In reply to by श्रीगुरुजी

नथुराम गोडसे या माथेफीरुने गीतेचा व वेदांतल्या तत्वज्ञानातचा आधार घेऊन गांधिजींचा खून केला असा आमचा आरोप आहे,करा प्रतीवाद चला.

In reply to by गरिब चिमणा

यावर जास्ती वाद घालत नाही, उगाच उदात्तीकरणाचा आरोप माथ्यावर येईल.. पण एकच नमूद करतो - त्याने गांधींना मारले, पण पिस्तुलात अजून गोळ्या असताना देखील अंदाधुंद गोळीबार करत सुटला नाही. असो.

In reply to by तर्राट जोकर

तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी तारेक फताह यांच्या मुलाखती वाचाव्या अशी नम्र विनंती. http://www.misalpav.com/comment/818966#comment-818966 http://www.misalpav.com/comment/818972#comment-818972

In reply to by गरिब चिमणा

कुराणाचा अर्थ लावायला गेले तर अनेक भयानक प्रश्न निर्माण होतील. एक उदाहरण देतो. इस्लामच्या शिकवणीनुसार मुस्लिमानी केवळ हजची यात्राच नव्हे तर आपले आयुष्य देखिल मेहनत करून कंठावे असे म्हटले आहे. त्यामुळे धार्मिक कारण सोडून इतर गोष्टीसाठी भिक मागणे इस्लाममधे हराम आहे. आता हेच आमचे इस्लामी बंधू जेव्हा भारतीय सरकारने दिलेली सबसीडी रेशन दुकानामार्फत वा गॅस सब्सिडी घेतात तेव्हा एखादा मौलवी त्यांना सांगत नाही की 'लाहोलबिलाकुवत ये इस्लाममें हराम हैं' कसे सांगेल पोटाची आग ही सर्व धर्माच्या वर असते. मुंबईच्या 92 दंग्याविषयी थोडेसे, मुस्लिम समाज हां सरकारी आस्थापन, मोठ्या कंपन्या , स्थिर नोकरी अशा ठिकाणी फार कमी दिसतो, पण गैरेज लाइन , छोटे उद्योग अशा ठिकाणी तो भरपूर असतो. नेमकी हीच बाब दंग्याबाबत मुस्लिम समाजाबरोबर झाली. पहिल्यांदा यांना मजा वाटली पण नंतर कळले की काम नाही तर अन्न नाही, तोपर्यंत उशीर झाला होता. एकजुट झालेला हिंदू पहिल्या खालेल्या माराचा बदला घेऊ लागला, तेव्हा मुस्लिमाना दुहेरी फटका बसला. एकतर काम नाही म्हणुन पैसा नाही आणि चवताळलेले हिंदू फटके मारताहेत. त्यामुळे दंगा नको ही संकल्पना पुढे आली. आणि ज्याला स्लीपर सेल म्हणतात तो प्रकार उदयाला आला. आता आमचे सेक्युलर नेते दहशतवादाला धर्म नसतो हे बोलायला मोकळे झाले.

In reply to by गरिब चिमणा

@दहशतवादी पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत, त्यामुळे रे मुस्लिम नाहीत,पवित्र कुराण मानवतावाद शिकवते .>>> अह्हाह्हा ! आले सांगायला. एका तरी इस्लामिक देश/सँघटनेनी "इसिस गैर इस्लामिक वागते,म्हणून तिला इस्लाम मधून हाकलून देत आहोत!" अशी घोषणा अगर फतवा काढलाय का? निषेधाचे मोर्चे काढलेत का इसिस/लादेन वगैरेन विरुद्ध. कायच्या काय बोलताय उगाच.

In reply to by अत्रुप्त आत्मा

वर त्यांनीच दिलाय तोच परत. पण मी तुमच्याशी सहमत आहे.
एका तरी इस्लामिक देश/सँघटनेनी "इसिस गैर इस्लामिक वागते,म्हणून तिला इस्लाम मधून हाकलून देत आहोत!" अशी घोषणा अगर फतवा काढलाय का? निषेधाचे मोर्चे काढलेत का इसिस/लादेन वगैरेन विरुद्ध.
हे आतापर्यंत कोणीही केलं नाही आणि करणारही नाही. तेवढी हिम्मत नाही या लोकांमध्ये. भ्याडाप्रमाणे लपून हल्ले/ बॉम्बस्फोट करणार. इतर धर्मीय जास्त असतील तिथे नुसते तोंड देखले विरोधाचे नाटक करणार आणि मग जेव्हा संधी मिळेल तेव्हा जिहाद.

In reply to by ट्रेड मार्क

कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा
निदान भारतीय मुसलमान तरी कधि दहशतवादाचे समर्थन करत नाहि... तीव्र विरोधच करतो. जगभरात मुस्लीम वि. इतर अशी काहिशी संघर्ष स्थिती दिसते (किंवा ति तशीच आहे म्हणुन जाहिरात केली जाते) त्यात अनेकांना (इंक्लुडींग मुस्लीम्स) तथ्य वाटते. मुस्लीमांना धर्मबांधवांकरता काहि कणव वाटणं देखील स्वाभावीक आहे. पण एकुणच दहशतवादातला फोलपणा, त्यातुन होणारं नुकसान सर्वच भोगत असतात.... मुस्लीम्स सुद्धा. तेंव्हा प्रॅक्टीकली त्यातला कुणी दहशतवादाचं समर्थन करत असेल असं वाटत नाहि.

In reply to by गरिब चिमणा

गरीब चिमणा जी इसिस हे इस्राईल किंवा अमेरिकेचे पाप नसून तुर्की आणि सौदी अरेबियाचे पाप आहे,जेव्हा तुर्कीने रशियन विमान हद्दीचे कारण दाखवून पाडले तेव्हा ते विमान 17 सेकंदासाठी तुर्की हद्दीत होते, आणि इतक्याश्या कारणावरून जर जेट पाडायला लागले तर तुर्कस्थान चे किती विमान पडायला हवे होते इथे बघा।त्याचे कारण तुर्की ला आपण इसिस चे आश्रय दाते आहोत हे उघड होऊ द्यायचे नव्हते म्हणून त्यांनी रशियाचे टेहळणी विमान पाडले।। आता हि बातमी बघा।https://m.facebook.com/story.php?story_fbid=982115515156894&id=10873460…

In reply to by गरिब चिमणा

इसिस हे ईस्त्राईल आणि अमेरीकेचे पाप आहे >>>>> अरेरे! विवाहाआधी असं नव्हत करायला पाहिजे =)) असो आई कोण आणि बाप कोण?

लेख पटला. पण हे जे कोणी भाइ वैद्य आहेत त्यांच्याकडे हा पोचणार कसा? की भाई वैद्य हे मिपा सदस्य आहेत ? (स्पा यांनी विचारलेला प्रश्न)

मी प्रिंट काढुन रजिस्टर्ड ए डी पोस्टाने भाई वैद्य यांना या धाग्याची प्रत पाठवतो. शेण खाल्लेच आहे तर पुर्णच खातो.

http://www.muslimsatyashodhak.org/ इथे भेट द्या दिली भेट आणि या वेबसाईटवरचे हे वाक्य फारच उद्बोधक आहे. Muslim Satyashodhak Mahila Manch is the main activity of the MSM. Muslim women's problems are multi dimensional. Apart from social,economical and educational poor condition, they have to face the problems generated from Muslim Personal Law. मला सांगा ह्या संदर्भात एक तरी वाक्य ह्या मंचावरुन भाई वैद्य बोलले आहेत का ? कृती बद्दल विचारणे गैर ठरेल कारण समाजवाद म्हणजे सगळे विचारवंत. फक्त विचार मांडायचे आणि कृती करायची नाही. तुम्हाला हेच म्हणायच होत का?

In reply to by गॅरी शोमन

यावर जाता जाता बोलले थोड पण तो मेन फोकस नव्हता. मेन फोकस संघ. पण त्यांच स्वातंत्र्य लढ्यात योगदान नक्कीच आहे. अवांतर- तुम्हाला पुरोगामी चळवळींची धर्मविषयक भूमिका हा सदानंद मोरे यांचा साधना साप्ताहिकातील लेख वाचायला कदाचित आवडेल. https://drive.google.com/open?id=0B2X6bSru0D7IbFkyeDZWNGFHRG8

घाटपांडे यांनी पाठवलेली लिंक आणि तुमची लिंक दोन्ही ही उदबोधक आहेत. दुर्देवाने या दोन्ही ही संघटनांना मुस्लीम समाजात फारशी किंमत नाही. सत्यशोधक समाजाचे एक नेते जेव्हा मृत्यु पावले तेव्हा त्यांच्या दफनाला जागा द्यायला तत्कालीन कमिटीने नकार दिला होता. कित्येक तास त्यांचे शव तसेच पडुन राहिले. पुढे काही समझोता घडला आणि दफनविधी झाला. पण सामान्य मुस्लीमांच्या मनावर ही घटना आणि त्याला मिळालेली प्रसिध्दी याचा खुप परिणाम झाला. आता सध्या तरी तलाक पिडीत वयोवृध महिला याच्या सदस्य आहेत ज्यांचा निकाह लागु शकत नाही आणि जगण्याचे साधनही उपलब्ध नाही.

In reply to by गॅरी शोमन

माझ्यामते कुठलेही सकारात्मक समाजप्रबोधनाचे काम पुर्ण वाया जात नाही. त्याचे ripple effects असतात. पण ते सकारात्मक हवे. मात्र प्रबोधन करायला जायचे आणि ज्यांचे करायचे त्यांनाच शिव्या घालायच्या याने परीणाम उलटे घडू शकतात. सुदैवाने या दोन्ही संघटनांनी तसे केलेले नाही. तुम्ही जे उदाहरण दिले ते मला वाटते हमिद दलवाईंचे आहे. त्यांना सगळ्यात जास्त विरोधाला सामोरे जावे लागले होते. मुस्लीम सत्यशोधक समाजाचे हमिद दलवाईंच्या नंतर नक्की किती सक्रीय काम चालले आहे याची कल्पना नाही. पण हा एक स्वागतार्ह उपक्रम मुस्लिमांसाठी प्रथमच काढला गेला होता असे वाटते. अर्थात त्याची मर्यादा ही महाराष्ट्रातील मराठी मुसलमान समाजापुरतीच राहीली असे वाटते. मुस्लीम राष्ट्रीय मंच हा प्रामुख्याने उत्तर भारतात चालू केला गेला आणि त्याला मानणारे टक्केवारीने अर्थातच कमी असतील पण खूप मुस्लीम नागरीक आहेत. यात अर्थात संघाचा पुढाकार होता. त्यामुळे मध्यंतरी आलेल्या एका विनोदानुसार, "मोहनजींनी श्वास घ्या म्हणले तर, आम्ही स्वतःचे नाक दाबू पण घेणार नाही" अशी वृत्ती असलेल्या डाव्या आणि तथाकथीत पुरोगाम्यांनी त्यांच्या पध्दतीने प्रयत्न केले. इंद्रेश कुमारांना अडकवण्याचे जे काही युपिएच्या काळात प्रयत्न झाले तो त्याचाच एक भाग होता असे म्हणले गेल्याचे आठवते. - अडकवता आले नाही तरी वर्षे वाया घालवून आणि बदनामी तर करता येते! असो.

In reply to by विकास

मुस्लीम सत्यशोधक समाजाविषयीचे तुमचे विधान बरोबर आहे. हमीद दलवाईंच्या पश्चात त्यांच्या पत्नि, मेहरून्निसा दलवाई ह्यांनी संस्थेचे कार्य पुढे चालू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, पण त्यांना समाजाकडून इतका त्रास झाला, की त्या ते नेटाने पुढे सुरू ठेवू शकल्या नाहीत. ह्याविषयी त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सविस्तर कथन केले आहे. अलिकडेच ह्या संस्थेचे एक ज्येष्ठ सभासद, श्री. तांबोळी ह्यांनी, संस्थेच्या कामातून आलेल्या नैराश्याने आत्महत्या केली. थोडक्यात किमान इथेतरी काही रिपल इफेक्ट दिसून आलेला नाही.

In reply to by प्रदीप

मी लिहीले होते: "अलिकडेच ह्या संस्थेचे एक ज्येष्ठ सभासद, श्री. तांबोळी ह्यांनी, संस्थेच्या कामातून आलेल्या नैराश्याने आत्महत्या केली". इथे माझ्या नजरचुकिने चुकिचे नाव पडले आहे, त्याबद्दल दिलगीर आहे. आत्महत्या केलेल्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या त्या जुन्या कार्यकर्त्याचे नाव हुसैन जमादार असे आहे. प्रकाश घाटपांड्यांनी खरडवहीतून ह्याविषयी चौकशी करून, श्री. तांबोळी हे मंडळाचे सध्याचे अध्यक्ष आहेत, ह्याकडे माझे लक्ष वेधले आहे. त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. श्री. जमादारांच्या आत्महत्येविषयीची बातमी येथे वाचावयास मिळेल.

पिज्जा हट मधे जसं प्रत्येक पिज्जापुढे १ लाल मिरची, २ लाल मिरच्या, ३ लाल मिरच्यांचे चित्र काढलेले असते जेणेकरुन कोणता जास्त तिखट (मराठीत -स्पायसी)त्यानुसार मागणी करता येते. तर ईथे येणार्‍या धाग्याच्या कंटेंटनुसार तिथे अश्या लाल मिरच्यांचे चित्र लेखाच्या नावा आधी लावावे. लोकांना लेखाचे पोटेंशियल समजण्यास मदत होईल.

मुस्लीम सत्यशोधक समाजाच्या मुळच्या उद्दीष्टांना भाई वैद्य यांच्या भाषणाने किती बळ मिळाले ? मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. हे वाक्य तर मुस्लीम समाजाला मध्य युगात नेण्यासारखे आहे. यातुन निर्माण होणारी मुस्लीम समाजाची मानसिकता मुस्लीम स्त्रीयांना अजुन बंधने घालायला कारणीभुत ठरेल इतका सामान्य विचार या व्यासपीठावर चढण्यापुर्वी भाई वैद्य यांनी केला की नाही हे समजायला मार्ग नाही.

काही लोकं लंगडी बाजूसुद्धा किती हिरारीने मांडत आहेत,हे पाहून अंमळ गंमत वाटली. : :

100


जोकर साहेब आपण म्हणता तशी विचारसरणी पोथ्यात किंवा धर्म ग्रंथात पण सापडते. उदा. काफिराला इस्लाम स्वीकारायला लावा किंवा मारून टाका हे कुराणात स्पष्टपणे लिहिले आहे. कारण ख्रिस्ती किंवा इस्लाम मध्ये जमेल तितक्या लोकांना आपल्या धर्मात आणा हा धर्माचा "आदेश"च आहे. त्यामुळे अतिशय सज्जन असणारे कॅथोलिकसुद्धा इतरांचे धर्मांतर करून त्यांना आपल्या धर्मात आणणे हे पवित्र कर्तव्य समजतात. भगवद्गीतेत किंवा झेंद अवेस्तात( पारशी धर्मात)किंवा ज्यू लोकांच्या धर्म ग्रंथात दुसर्या धर्माच्या लोकांना सम दाम दंड किंवा भेद या मार्गांनी आपल्या धर्मात आणा असे कुठेही लिहिलेले नाही. यामुळेच हिंदू पारशी आणि ज्यू हे एकत्र सहज आणि गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. पण हेच ख्रिस्ती किंवा मुसलमान धर्माच्या बाबतीत आढळत नाही. त्यातून आपल्याला हव्या असलेल्या विदा मध्ये फक्त १० % लोक मदरसा मध्ये शिकतात पण जेंव्हा १८ कोटी मुसलमान लोकसंख्येच्या शाळेय वयातील मुले पहिली ती जरी १ % असतील तरीही ती १८ लाख होतात. हि मुले फक्त कुराण आणि इस्लाम धर्माचा २०० वर्षे पूर्वी लिहिलेला शिक्षणक्रम शिकतात ज्याचा व्यवहारात काहीच उपयोग होत नाही. तेंव्हा धड नोकरी नाही कि व्यवहार ज्ञान नाही अशा मुलांना दहशतवादि बनवणे किती सोपे आहे हे आपल्या लक्षात येईल. तुम्ही उत्तर ध्रुवावरील पांढर्या अस्वलाच्या उवांवर संशोधन करून अगाध ज्ञान मिळवून पी एच डी मिळवली तरी आपल्या नावाच्या मागे डॉक्टर लावण्याव्यातिरिक्त त्या ज्ञानाचा काहीच उपयोग होत नाही. अशा व्यवहारात काडीचाही उपयोग नसलेल्या ज्ञानाने केवळ उद्विग्नता आणि रिकामेपण येते राहिली गोष्ट धर्मग्रंथात लिहिलेले नसले तरीही जर तुम्हाला तुमच्या जातीचा खोटा अभिमान बाळगायला तुमच्या आईबापानी लहानपणापासून शिकवले ( उदा तू उच्च जातीचा राजपूत आहेस उगाच लुन्ग्यासुन्ग्याशी जवळीक करू नकोस) तर उद्या अशा तरुणाच्या बहिणीने एखाद्या निम्न जातीच्या मुलाशी प्रेम संबंध जुळवले तर त्या मुलाचा किंवा बहिणीचाही वाढ करण्यास तो मुलगा चूक समजत नाही. याच न्यायाने मी असे म्हणेन कि गायीला मत समजले कि गोहत्या हे एक महत्पाप होते मग माथेफिरू तरुणांना त्याविरुद्ध भडकावण्यास कितीसा वेळ लागेल. आधुनिक आणि वैज्ञानिक शिक्षण हे जास्त महत्त्वाचे आहे. महात्मा गांधीजीनी गायीचे महत्त्व अवास्तव वाढवले. स्व. सावरकर यांची विचारसरणी "गाय हा उपयुक्त पशु आहे" अशी स्वीकारली गेली असती तर इतिहास वेगळा झाला असता.दुर्दैवाने त्यांना गांधीजींचा खूनी म्हणण्या इतकी कॉंग्रेस ने नतद्रष्टता दाखविली आणि समाजाचे अपरिमित नुकसान झाले. महात्मा गांधीजीनी दुर्दैवाने सर्व धार्मिक लोकांना खूष ठेवण्याचे धोरण ठेवले त्यामुळे समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन रुजला नाही असे मला वाटते. म्हणजे केवळ पोथ्या किंवा धर्मग्रंथ नव्हे तर लहानपणा पासून मिळालेली शिकवण पण हिंसेला आणि असहिष्णूतेला आमंत्रण देते. यात एक भाग हा आहे कि धर्मग्रंथातील शिकवणीचा प्रतिवाद सहज शक्य नसतो. पण वागणूक बदलणे जास्त सोपे असते. हा विषय फार गहन आहे आणि माझी त्यावर भाष्य करायची लायकीही नाही आणि ज्ञानही नाही तेंव्हा येथेच थांबतो.

देशातील सध्याचे वातावरण दुरुस्त करावयाचे असेल, तर सर्व पुरोगामी पक्षांनी एकत्र यावे. त्यासाठी शरद पवार यांच्याखेरीज दुसरे नाव नाही. केवळ पाण्याचाच दुष्काळ नाही तर सामाजिक समस्यांचा दुष्काळ संपल्याशिवाय राहणार नाही, असे भाई वैद्य यांनी सांगितले. नव्वदीच्या घरात असूनही भाई वैद्य यांची विनोदबुद्धी (की तिरकसबुद्धी?) अजून शाबूत आहे हे वरील वाक्यांवरून दिसून येते. http://www.loksatta.com/pune-news/authoritarian-minded-sharad-pawar-war…