Skip to main content

विज्ञान - नास्तिकवाद आणि मनोविकार

लेखक पॉइंट ब्लँक यांनी सोमवार, 28/03/2016 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल नास्तिक लोक फक्त तेच वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे आहेत आणि जगाचं भलं करयाचा मक्ता केवळ त्यांच्याकडेच आहे असा टेंभा मिरवताना दिसतात. विज्ञानाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे हा रोचक (कि विस्फोटक) प्रश्न असू शकतो. ह्यावर काही संशोधन Case Western Reserve University आणि Babson College येथे करण्यात आले. त्याबद्द्लच्या लेखाची लिंक इथे देत आहे http://phys.org/news/2016-03-conflict-science-religion-lies-brains.html शास्त्रज्ञांची काही महत्वाची मते खालीलप्रमाणे १. Analytic thinking discourages acceptance of spiritual or religious beliefs. But the statistical analysis of data pooled from all eight experiments indicates empathy is more important to religious belief than analytic thinking is for disbelief. म्हणजे धार्मिक लोकांसाठी सहानुभुती जितकी महत्वाची आहे तितका वैज्ञानिक द्रुष्टीकोन नास्तिकांसाठी गरजेचा नाही. 2. Atheists, the researchers found, are most closely aligned with psychopaths—not killers, but the vast majority of psychopaths classified as such due to their lack of empathy for others. तुम्ही नास्तिक असाल तर मनोविकार तज्ञाला भेटा ( तो नास्तिक नाही ह्याची आधी खात्री करून घ्या. :p ) ३. They refer to Baruch Aba Shalev's book 100 years of Nobel Prizes, which found that, from 1901 to 2000, 654 Nobel laureates, or nearly 90 percent, belonged to one of 28 religions. घ्या, नास्तिकवादाने काय जास्त दिवे लावले नाहीत. ४. "Far from always conflicting with science, under the right circumstances religious belief may positively promote scientific creativity and insight," Jack said. "Many of history's most famous scientists were spiritual or religious. Those noted individuals were intellectually sophisticated enough to see that there is no need for religion and science to come into conflict." आता धार्मिक लोकांना कमी लेखायचं थांबवा ५. Although it is simply a distortion of history to pin all conflict on religion," Jack said. "Non-religious political movements, such as fascism and communism, and quasi-scientific movements, such as eugenics, have also done great harm." जगाचं भलं फक्त नास्तिकच करू शकतात ही फक्त बुवाबाजी आहे.

वाचने 29564
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

In reply to by प्रचेतस

अहो जाऊ द्या हो.. तुम्ही पण ना.. त्यांना साधा "सनातन प्रभात" असा अर्थ अपेक्षित आहे. आसो, ते यनावालांच्या किंवा पुरोगाम्यांच्या धाग्यावर कोणी संसदीय भाषेचे उदाहरण म्हणून विचारले तर द्यायला मी हा त्यांचा प्रतिसाद वाखु करत आहे.

In reply to by अत्रुप्त आत्मा

@आत्मबंधः इतकीच ईश्वराची अॅलर्जी आहे तर स्वतःची भटजीगिरी सोडून द्या की! बघू तुमच्यात किती हिंमत आहे? इतरांना माकड, भेकड, शेपूट घालणारे म्हणण्यापूर्वी आपण काय आहोत याचे परीक्षण करा. :) कुणाकडे सत्यनारायण सांगायला जाण्यापूर्वी त्याला मी नास्तिक आहे, कचकटून ईश्वरनिंदा करतो, देवबिव सगळं झूठ आहे, हा फक्त प्लासिबो इफेक्ट आहे वगैरे वगैरै बोलत जा. देवाच्या नावावर पोटे भरून पुन्हा त्याच्याच नावाने बोटे मोडणे हे कितपत योग्य आहे? तुमच्या यजमानांची घोर फसवणूक करत आहात तुम्ही! याचे थोडे तरी भान बाळगा.

In reply to by ह.भ.प. मोरघोडे

ओ मोरघोडे , (संपादित) कशाला उगाच सीरीयस चर्चा अन कॅसेट रीपीट ? इथे सगळ्यांना माहीत आहे सुधारणावादीअंनिसपुरस्कृतसत्यनारायण अन स्वमतांध दांभिकता =)))) इथे येवुन , टेंशन नै लेनेका , बस्स मस्त मस्ती करने का , क्या मामू ;)

In reply to by प्रसाद गोडबोले

दुआयडी आत्म कुंथन! सगळी कडेच शेपूट! अपेक्षितच अर्थात! चालू द्या .. हुंबबबबब हुंबबक्क! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif

In reply to by प्रसाद गोडबोले

सुधारणावादीअंनिसपुरस्कृतसत्यनारायण अन स्वमतांध दांभिकता
वाह!! ह्या एका वाक्यासाठी मस्तानी देणे आले गिर्जाकाका!! ;)

In reply to by ह.भ.प. मोरघोडे

व्यक्तिगत सदरात येत नसावी का असा प्रश्न पडतो ? पण ती या व्यक्तिगत विधानाची : इतरांना माकड, भेकड, शेपूट घालणारे म्हणण्यापूर्वी आपण काय आहोत याचे परीक्षण करा. :) ओघानी आलेली `फलप्राप्ती' असावी असे वाटते. इतकीच ईश्वराची अॅलर्जी आहे तर स्वतःची भटजीगिरी सोडून द्या की! बघू तुमच्यात किती हिंमत आहे? पार वाट लावली ! कुणाकडे सत्यनारायण सांगायला जाण्यापूर्वी त्याला मी नास्तिक आहे, कचकटून ईश्वरनिंदा करतो, देवबिव सगळं झूठ आहे, हा फक्त प्लासिबो इफेक्ट आहे वगैरे वगैरै बोलत जा. अगागा! देवाच्या नावावर पोटे भरून पुन्हा त्याच्याच नावाने बोटे मोडणे हे कितपत योग्य आहे? तुमच्या यजमानांची घोर फसवणूक करत आहात तुम्ही!याचे थोडे तरी भान बाळगा. पुरता बाजार उठवला !

In reply to by विवेक ठाकूर

माकड खोकड आणि बोकड हे तिन्ही दुर्लक्षणीय घटक आहेत! त्यांना आम्ही आत्म कुंथन करू देत असतो! हुंबबबबब हुंन्ब हुंबक! बसा कुंथत! =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

ओ अत्मू महाराज... काय फुल्ल काॅमेडी करता राव. असो, राग नाही तुमच्यावर. उलट जे मनात आहे ते स्पष्ट बोलता याचे विशेष वाटते. फक्त एक गोष्ट खटकते की आपण जो व्यवसाय पत्करलाय त्याच्या professional ethics & moral शी आपण प्रामाणिक असावे अशीच जनरल अपेक्षा असते. त्याचे आपण उघड उघड उल्लंघन करता ही बाब नक्कीच खटकते. असो तुमच्या निष्पाप निरागस शिव्या अगदी एंजाॅय केल्या. अत्मूसची बडबड म्हणजे निखळ भावनाविष्कार... :) रच्याकनेः मी प्रगो नाहीये याची नोंद घ्यावी.

In reply to by अत्रुप्त आत्मा

रच्याकने: मला दू दू दू किंवा हत्ती (मी पण ढोलू आहे) किंवा टनाटनी न म्हटल्याबद्दल बुवडीचा टीव्र णिषेढ...

In reply to by प्रसाद गोडबोले

लय डोक्यावरुन जातंय राव. हे म्हणजे वीज आहे का ह्याचा पुरावा मागायचा तर बटन ऑन करुन दिवा पेटतो हे दाखवायचं सोडुन क्लिष्ट समिकरणं मांडून गणितं झुंजवत बसायची असं झालं.

In reply to by तर्राट जोकर

गोडेल सरांनी बटन ऑन केलय , आता तुमची ट्युब पेटत नाही ह्यात त्यांचा काय दोष ?? =)))) अवांतर : हे गोडेल जरा गोडसे च्या जवळ जाणारे वाटते नै ! ख्यॅ ख्यॅ ख्यॅ !!

In reply to by प्रसाद गोडबोले

म्हणजे आता सुधारित सत्यनारायणाची पुजा घालणे आले, नपेक्षा गोडेल ह्यांना सरळ देवदूत ठरवून मोकळे व्हावे, ते जास्त सोपे, नै का?

In reply to by तर्राट जोकर

आता सुधारित सत्यनारायणाची पुजा घालणे आले
म्हणजे काय ! आम्ही तर फार फार आधीपासुनच सांगत आहोत की सुधारित सत्यनारायणाला पर्याय नाही . गोडेलला देवदुत ठरवले की तुम्हीही टनाटनी ठराल , मात्र सुधारित सत्य नारायण घातला तर पुरोगामित्वाच्या चळवळीचे खंदे शीलेदार ठराल ... चॉईस इज युवर्स !!

काथ्याकुट चालू ठेवा. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी नास्तिक आहे, पण काही लोक अस्तिक असल्याचा दावा करताहेत .मला आत्त्ताच देवाचा फोन आला आहे की ( त्याने फोनवर मी देव बोलतोय असे सांगितले ) "काथ्याकूट असाच जगाच्या अंतापर्यंत चालू ठेवा." यात मी ,माझी नास्तिकता, अस्तिकाचे अस्तित्व, फोन, देव, यात नक्की काय अस्तित्वात असल्याचे सिद्ध होत नाही ते ओळखा पाहू !

such as eugenics, have also done great harm."
नेमके काय नुकसान केले?

In reply to by मार्मिक गोडसे

तुमचा प्रश्न बहुदा फक्त eugenics बद्दल आहे असे मानतो. कारण इतरांनी काय नुकसान केले अशी बाळबोध शंका निरर्थक आहे. खालील लिकं पाहा http://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC1127214/ जिनॉमिक्स आणि पेशीचे कार्य कसे चालते हे अजूनही पुर्णतः माहीत नाही. अशा परिस्थितीत, नैसर्गिक प्रक्रियांमध्ये हस्तक्षेप धोकादाय़ ठरू शकते. हे माझे वैयक्तिक मत आहे. टोनि जॅक ह्यांचे मात काय आहे हे त्यांना पत्र लिहून विचारावे लागेल.

In reply to by पॉइंट ब्लँक

तुमचा प्रश्न बहुदा फक्त eugenics बद्दल आहे असे मानतो.
ड.क्वोटशन मध्ये देऊनही समजत नसेल तर कठीण आहे. eugenics म्हणजे फक्त पेशींच्या कार्यात ढवळाढवळ इतपत मर्यादीत? सोनोग्राफीत गर्भात गंभीर विकृतीचे निदान झाले व डॉक्टरांनी गर्भपाताचा सल्ला दिला तर तो eugenics मध्ये येतो का? नसेल तर का नाही? असेल तर तर असे सल्ले देणारे व पाळणारे सगळे नास्तिक असतात का? असले बट्ट्याबोळ करणारे संशोधन नक्की कोणी केले? ९०% वाल्यांनी की १०% वाल्यांनी? विचारायचे कारण की, Jack said. "Many of history's most famous scientists were spiritual or religious. Those noted individuals were intellectually sophisticated enough to see that there is no need for religion and science to come into conflict."
Theirs and other studies find that, overall, religious belief is associated with greater compassion, greater social inclusiveness and greater motivation to engage in pro-social actions.
मी नास्तिक आहे,परंतू लेखातील एकही मुद्दा मला लागू होत नाही. आणी ते सोशल असणे हा काय प्रकार आहे ?

या मुद्द्यावर तमाम संतपरंपरेचा हमखास विसर पडतो .

देव नाही असे मला तरी वाटते. तरीही परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा ही मूल्ये मी मानतो. माझ्या आइबापाने मला ही मुल्ये शिकवताना देवाचा आधार/भीतीदाखवली नाही.

वास्तववादी विचार ठेवून इतरांबद्दल सहानूभुती बाळगणे चांगले असे मला वाटते. मल काय म्हणायचेय हे केवळ तात्विक चर्चेपेक्षा मला स्वतःच्या उदाहरणाने सांगायला आवडेल मी पुर्णत: नास्तिक आहे. माझी पत्नी अस्तिक आहे. आम्हा दोघांचा एकमेकांच्या विचारांना अजिबात विरोध नाही. कारण "मी ईश्वराचे अस्तित्व मानतच नाही तर ते कुणीतरी 'अरे मान्य कर रे' असे म्हंटल्याने मी ते मानू शकेल असे शक्य नाही" हे माझ्या पत्नीला कळते तसेच "माझी पत्नी ईश्वराचे अस्तित्व मानते , मी ते तिला अमान्य करायला लावू शकत नाही. मी फारतर पुजाअर्चा, व्रतवैकल्य यांना विरोध करुन बंद करायला लावले तर तिला आपण ईश्वराची आराधना करीत नाही म्हणून अपराधीपणा वाटू शकेल, कदाचित ईश्वर पाठीशी राहणार नाही असे वाटून तिचे मानसिक बळ कमी होवू शकेल. खेरीज अशा प्रकारे अशा प्रकारे एका शक्तीचे अस्तित्व मानणे तिला पुजणे ही तिची मानसिक गरज असू शकते" तिला एखाद्या मंदिरात जायचे असेल तर मी विनातक्रार तिला मंदिरापर्यंत घेवून जातो आणि मी मंदिराच्या आत येत नाही याबद्दल तिचीही तक्रार नसते. तात्पर्य : अस्तिक आणि नास्तिक दोघांनीही आपापले घोडे दामटत राहण्यापेक्षा हे समजून घ्यावे की समोरची व्यक्ती ही आपल्यापेक्षा वेगळी आहे, तिची जडणघडण , विचारसरणी वेगळी आहे. जेव्हा गरज वाटेल तेव्हा स्वतःचे (विरोधी) विचार जरुर व्यक्त करावे पण समोरच्याला दुखावण्याचे कारण नाही. समोरच्यावर कुरघोडी करण्याचा हेतू नसावा तर त्यास एका वेगळ्या विचारांची ओळख करुन द्यावी इतकाच असावा.
तुम्ही नास्तिक असाल तर मनोविकार तज्ञाला भेटा
याचा अर्थ प्रत्येक सामान्य माणसाने अस्तिक हे असलेच पाहिजे असे लेखक म्हणू पहात आहे, ते चुकीचे आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आवडीप्रमाणे, इच्छेप्रमाणे, गरजेप्रमाणे स्वतःची गृहीतके, विश्वास बनवावा. --- माझा ताजा धागा

In reply to by मराठी कथालेखक

त्याचं काय आहे ना कि, नास्तिकवादी बर्याचवेळा वि़ज्ञानाचा चुकीचा उपयोग करून धर्म कसा पूर्ण चु़किचा आहे हे सर्वांवर लादण्याचा प्रयत्न करतात. असली छेडछाड ( मराठी त्याला Manipulation असा शब्द आहे) करून विज्ञानाच्या नावावर लोकांची दिशाभुल करणे हे मानसिक विकृती मानायला हरकत नाही. स्वतःला नास्तिक म्हणवून घेतले की ते म्हणतील ती दिशा पुर्व होत नाही. तसे वाटणार्यांनी मनोविकार तज्ञाला भेटणे सर्वांच्याच हिताचे आहे.

संगणक आल्यापासून सर्व गोष्टीत 'द्वैत' वाद बोकाळला असे मला वाटते. म्हणजे एका बाजूला नास्तिक म्हणजे एकदम शास्त्रवादी! डोंबल. शास्त्र काय हे नक्की कळते का? तसेच आस्तिक म्हणजे फक्त धर्म. बोंबलायला धर्म तरी कुणाला नीट कळतो का? मग टोकाला जाऊन कृति होते. पण जग तसे नाहीच. जगात डोके नि हृदय दोन्हींची गरज आहे. बर्‍याच धार्मिक सणात, उत्सव, आनंद, एकत्र भेटणे इ. गोष्टी येतात. त्यात कर्मठ धर्मवाद आणून त्याची मजा घालवू नये. तसेच अति शास्त्रवादी होऊन गणपतीची आरती करणार्‍यांची टिंगल करू नये. मोदक नि प्रसाद खायला काय हरकत आहे? लग्नात सुद्धा धार्मिक कार्याखेरीज इतर बरीच मजा असते, जेवण असते, लोक भेटतात, एकमेकांना भेटी देतात, इथे शास्त्र कुठे आडवे येते? उगाच टीका करण्यासाठी काही तरी शोधायचे. अजिबात देवाला नाकारून दररोज दारू पिऊन चकणा खाण्यात वेळ घालवणे यात तरी काय मोठे शास्त्र आहे? मजेखातर काही काही गोष्टी कराव्या, पण मर्यादेत. त्यात आस्तिक नास्तिकवाद सगळीकडे घुसडू नये. त्यामुळेच शेवटी घटनेने सर्वांना आचार्‍ विचार स्वातंत्र्य दिले, तरी आपले दुसर्‍यांच्या आचार विचारांची टिंगल, त्यांना विरोध. हे काय सभ्यपणाचे लक्षण आहे का? तो अंगी यायला नुसते शाळेत जाऊन भागत नाही. पूर्वी ख्रिश्चन नि मुस्लिम धर्मात, जे स्वतःच्या धर्मात नाहीत त्यांना माणूसच मानायचे नाही, त्यांना मारून टाकले तरी चालेल अश्या समजुती होत्या. आता जसे शास्त्र प्रगत झाले, शारिरीक बल वाढले, तसे मनाचेहि बल वाढायला पाहिजे, ज्या योगे असले कर्मठ विचार बाजूस सारून, सर्वांनी एकत्र गुण्यागोविंदाने जगावे.

कधी कधी असं वाटतं की, दुसर्‍याला खाली दाखवायला म्हणुन जे अद्वातद्वा बोलले जाते त्याने लोकांचे भान सुटत आहे. विनाकारण काड्या करण्यात मजा मिळत आहे दुसर्‍याच्या भक्ती, शक्ती, युक्ती स्थानांची हेटाळणी करुन कोत्या मनोवृत्तीने आसुरी आनंद घेतला जात आहे कदाचित असल्या वागण्याने स्वतःचे, कुटुंबाचे मनस्वास्थ्यावर परिणाम करुन घेणे होत आहे कदाचित स्वतःमधे असलेली कुठली तरी कमी, मनोरुग्णपणा , हैवानियत, खाज, अभाव ह्याचा राग आंतर्जालावर काढुन समाधान मिळवण्याचा प्रयत्न चालु आहे.

In reply to by इरसाल

+१००

In reply to by इरसाल

हं...हे योग्य बोललात , पण दोन्ही बाजूनी हे मनावर घ्यायला हवं.
दुसर्‍याच्या भक्ती, शक्ती, युक्ती स्थानांची हेटाळणी करुन कोत्या मनोवृत्तीने आसुरी आनंद घेतला जात आहे
कुणी कुणाची हेटाळणी करु नये हे खरेच. पण व्यक्त होणे म्हणजे हेटाळणी नव्हे. एखादा अत्यंत श्रद्धाळू व्यक्ती आपल्या श्रद्देखातर एखादा भक्तीपर लेख लिहतो, कथा लिहतो, कुणी चित्रपटही बनवतो. अनेकदा अशा साहित्यात नास्तिक कसे चुकतात, आणि शेवटी ते कसे अस्तिक बनतात असलं काहीतरी दाखवलेलं असतं (नुकताच मी देऊळबंद नामक सुमार चित्रपट पाहिला, माझ्या अस्तिक आणी श्रध्दाळू पत्निलाही तो अजिबात आवडला/पटला नाही) तसेच जसा भाविकांना त्यांच्या श्रद्धांचा प्रसार करण्याचा अधिकार आहे तसाच नास्तिकांनाही त्यांच्या निरिश्वरवादाचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. कुणाची कुत्सितपणे टिंगल-टवाळी न करता जर एखादा नास्तिक स्वतःचे विचार योग्य रितीने व्यक्त करत असेल तर त्यास मनोरुग्ण म्हणणे योग्य नाही. आणि अस्तिक व्हा अथवा नास्तिक अंतिमतः मनःशांती मिळणे, स्वतःचे जीवन सुखासमाधानाने जगणे आणि दुसर्‍याला न दुखवणे हे सगळ्यात महत्वाचे, नाही का ? ----------- माझा नवीन धागा

In reply to by इरसाल

कदाचित स्वतःमधे असलेली कुठली तरी कमी, मनोरुग्णपणा , हैवानियत, खाज, अभाव ह्याचा राग आंतर्जालावर काढुन समाधान मिळवण्याचा प्रयत्न चालु आहे. माझ्या पुरते बोलाल तर हो 11% सहमत. थोड़ी खाज, हैवानियत मनोरुग्णपना याचे मिश्रण असते बाबा माझ्या पर्तिसादात. दुसर्याच्या भक्ती, शक्ती, युक्ती स्थानांची हेटाळणी करुन कोत्या मनोवृत्तीने आसुरी आनंद घेतला जात आह हे ही बरेच प्रतिसादाकांबाबत 1000% सत्य. खेदाने म्हनेन मिपावर ईंटोलरन्स वाढला आहे ज्याचा कशाशी संबंध आहे याची मला अजिबात कल्पना नाही.

कीव चलती हय पवन...... कीव झुमै हय गग्गन....... कीव मच्लत्ता हय मन्न्.............. ना तुम ज्यानै ना हम... :P

देवाचे अस्तित्व सिध्द करताना जो कोणी इतरांची ( संतांची) उदाहरणे /दाखले/उतारे देइल तो हुकलेला समजावा. देव त्याला भेटला नाही भेटणार नाही... लक्षात घ्या आधी कृष्ण दिसला मग मीरा भजने गाउ लागली त्यातच तल्लीन राहु लागली इतकी लोक तिला वेडी समजू लागले... असं नाही की आधी वेड लागलं नंतर कृष्ण दर्शन झालं :)

अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, शिक्षण, आयुर्मान, आरोग्य, इतरांविषयी सहानुभूती, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक शांतता, भ्रष्टाचाराचा अभाव या आणि इतर अनेक गोष्टी जास्त चांगल्या असतात. सर्वाधिक धार्मिक देशांत गरीबी, अज्ञान, समाजातलं खुनांचं प्रमाण, स्त्री-पुरुष असमानता वगैरे अनेक वाईट गोष्टी अधिक असतात. http://www.city-data.com/forum/religion-spirituality/1571809-non-religi… तुम्हाला ऑनसाइट असाइनमेंट मिळणार असेल तर कुठच्या देशांत जाल? स्वीडन, नॉर्वे, न्यूझीलंड, डेन्मार्क, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ऑस्ट्रिया, जर्मनी, फ्रान्स, जपान, चीन की होंडुरास, र्वांडा, अफगाणिस्तान, टांझानिया, युगांडा, नायगर, एरिट्रिया, इथियोपिया, बुरुंडी... वगैरे वगैरे पहिल्या गटातल्या देशांत नास्तिकांची संख्या प्रचंड आहे, दुसऱ्या गटातल्या देशांत आस्तिक ९८% आहेत.

In reply to by sagarpdy

नास्तिकता हा अर्थात परिणाम असू शकेल. कोरिलेशन असलेल्या बाबींमध्ये कुठचं कारण आणि कुठचा परिणाम हे सांगणं कठीण असतं. माझा अंदाज असा आहे की जसजशी सुबत्ता, शिक्षण, आयुर्मान वाढतं तसतशी मानवी जीवनात येणाऱ्या संकटांना तोंड देण्याची शक्ती वाढत जाते, आणि ईश्वरावर अवलंबून राहाण्याची गरज कमी होत जाते. आणि ईश्वरावर अवलंबून राहाण्याची प्रवृत्ती कमी झाल्यामुळे प्रयत्नशीलता वाढत असेल कदाचित. आणि हे सुष्टचक्र चालू राहिल्यामुळे श्रीमंत, सुशिक्षित देशांत नास्तिकतेचं प्रमाण वाढताना दिसत असावं. मुख्य मुद्दा एवढाच आहे की 'आस्तिकता कमी झाली तर माणसाला देवाची भीती उरणार नाही, आणि तो प्रचंड पापं करेल, समाज ढासळेल' वगैरे युक्तिवाद केले जातात. ती भीती निराधार आहे.

In reply to by राजेश घासकडवी

प्रतिसाद आवडला. खरे तर 'आस्तिकतेच्या नावाखाली प्रचंड पापं केल्या जात आहेत' ह्या विधानाला आधार देणारं बरंच आहे.

In reply to by राजेश घासकडवी

मुख्य मुद्दा एवढाच आहे की 'आस्तिकता कमी झाली तर माणसाला देवाची भीती उरणार नाही, आणि तो प्रचंड पापं करेल, समाज ढासळेल' वगैरे युक्तिवाद केले जातात. ती भीती निराधार आहे.
+१०० सर्व प्रकारची सुबत्ता, स्थैर्य जर अ‍ॅट द कॉस्ट ऑफ (सो कॉल्ड) आस्तीकता येत असेल तर अशी आस्तीकता लवकर संपावी म्हणुन अनुष्ठानं करायला पाहिजे :ड

In reply to by राजेश घासकडवी

कुरुंदकरांचा (स्वतः समाजवादी) एक लेख वाचनात आला होता. यात समाजवादी सत्ता हुकुमशाही वृत्तीच्या दिसतात याबद्दल उहापोह केला होता. त्यांच्या मते समाजवाद म्हणजे संपत्तीचे समान विभाजन - याचाच अर्थ समाजवादी सत्ता यशस्वी (लोकोपयोगी) होण्यासाठी मुळात संपत्ती असली पाहिजे, परिणामी गरीब देशात समाजवादी सत्ता येणे धोकादायक असू शकते. [हा माझ्या अल्पमतीने काढलेला निष्कर्ष, येथे समाजवाद चूक कि बरोबर हि चर्चा करायची नसून एक तर्कविचार पद्धती दाखवावी एवढाच उद्देश आहे] मांडत असलेला मुद्दा : एखादी कल्पना वाईट नसून ती कोणत्या परिस्थितीत व कशा प्रकारे राबवली जाते हे महत्त्वाचे असते. याच मुद्द्याला धरून - आपण म्हणता त्याप्रमाणे नास्तिकता वाईट नाही, पण अल्पशिक्षित, गरीब देशातील नास्तिक समाज व सुबत्ता असलेल्या देशातील नास्तिक समाज यात अशी सरळ तुलना करणे चूक होईल. आणि तथाकथित "पापे" होण्याचे प्रमाण वाढूही शकेल (शक्यता). हा मुद्दा खोडण्यासाठी तुलनेने अप्रगत, नास्तिक आणि तरीही "पुण्य"वान समाज असल्याचा काही विदा आहे का ?

In reply to by sagarpdy

हा मुद्दा खोडण्यासाठी तुलनेने अप्रगत, नास्तिक आणि तरीही "पुण्य"वान समाज असल्याचा काही विदा आहे का ?
दुर्दैवाने देशपातळीवर तरी माझ्या माहितीत असा विदा नाही. माझ्या एका मित्राने फेसबुकवर लिहिलं होतं की नास्तिक्य ही भरल्यापोटी करण्याची गोष्ट आहे. त्यात तथ्य आहे. कारण गरीब, हलाखीत जगणारे लोक खरोखरच अनेक संकटांना तोंड देतात. आणि हातातले सर्व उपाय संपले की देवाचा धावा करतात. हा मनुष्यस्वभावच आहे. जर मी गरीब असेन, अप्रगत देशात राहात असेन तर माझ्या हातात फार उपायच नसतात. मूल आजारी पडलं आणि जवळ हॉस्पिटल नाही किंवा मला डॉक्टर परवडत नाही तर मी अज्ञात शक्तीचा आधार घेणारच. त्यामुळे देशाचं जीडीपी, सुशिक्षितता, आरोग्य जसजसं सुधारत जातं तसतसे देशातले लोक देवधर्मावर कमी अवलंबून राहातात. हा अमेरिकेतल्या राज्यांसाठीचा विदा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स (उत्पन्न, आरोग्य आणि सुशिक्षितता या तिन्हींवर आधारित निर्देशक) विरुद्ध धार्मिकता hdi vs. religiosity हा जगातल्या देशांसाठीचा विदा. क्ष अक्षावर वेगवेगळे देश आहेत, आणि य अक्षावर त्या त्या देशातल्या लोकांसाठीचं धार्मिकतेचं महत्त्व आणि ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. world hdi and religiosity

In reply to by राजेश घासकडवी

रा.घा. सर मुद्दा आवडला. पण तुम्हांला अशी खात्री आहे का की भारतासारखा आस्तिकवादी देश जरी उच्च उत्पन्न गटातील देशांच्या पंक्तित जाऊन बसला तर येथील आस्तिकताही हळूहळू नास्तिकतेत परावर्तित होईल? असं होण्याला कितपत बळकटी आहे? याबाबत काही सांगू शकता?

In reply to by राजेश घासकडवी

या विदामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी कि "धर्माचे महत्त्व" (नास्तिकता नाही - नक्कीच विवादास्पद) आणि "सुबत्ता" यांच्यातील संबंध - निरीक्षण म्हणून तरी - दिसतो. आता धर्माचे महत्त्व कमी होणे उदा. बीफ बंदी नसणे, समान नागरी कायदा इ., धर्म-जातीवर आधारित भेद सार्वजनिक जीवनात न करणे - पण तरीही देवाच्या अस्तित्त्वावर बऱ्यापैकी समाजाने विश्वास ठेवणे, याचा परिणाम म्हणून प्रगती हा तर्क पटण्याजोगा आहे.

In reply to by राजेश घासकडवी

अधार्मिक देशांमध्ये सुबत्ता, शिक्षण, आयुर्मान, आरोग्य, इतरांविषयी सहानुभूती, स्त्री-पुरुष समानता, सामाजिक शांतता, भ्रष्टाचाराचा अभाव या आणि इतर अनेक गोष्टी जास्त चांगल्या असतात.
तुम्ही दिलेल्या लिंक मध्ये कुठेही योग्य स्टॅटिसटिकल अ‍ॅनालिसिस केलेले नाही. लावलेले कट ऑफ अंदाधुंद आहेत. त्यात लिहलेले आकडे कुठून आले ह्याचा विश्वासार्हता फार कमी आहे. संदर्भ दिलेले नाहीत. आणि सगळ्यात महत्वाचं हा पियर रीव्ह्युड जरनल मधील निष्कर्ष नाही. त्यामुळे त्याला ग्राह्य मानन्यात कुठलाही शहाणपना नाही.
तुम्हाला ऑनसाइट असाइनमेंट मिळणार असेल तर कुठच्या देशांत जाल?
ऑनसाइट असाइनमेंट तुमच्यासाठी महत्वाची असेल, म्हणून ती इतरांसाठी असावी अस मानु नये. प्रश्न दुय्यम असला तरी उत्तर देतोच - जिथं माझ्या आवडीचं काम मिळेल तिथं. One cane face "Hostile Work Environment" in any organization irrespective of the country it comes from.

In reply to by पॉइंट ब्लँक

लावलेले कट ऑफ अंदाधुंद आहेत.
त्यांनी कटऑफ लावलेले नाहीत. त्यांनी रॅंकिंग दिलेलं आहे. पहिल्या पंचवीस देशांत अमुक इतके देश नास्तिक आधिक्याचे आहेत एवढंच म्हटलेलं आहे.
त्यात लिहलेले आकडे कुठून आले ह्याचा विश्वासार्हता फार कमी आहे.
https://www.gfmag.com/global-data/economic-data/richest-countries-in-th… इथे Sources Beyond GDP - Report by the Commission on the Measurement of Economic Performance and Social Progress The World Bank Country Profiles Global Finance Magazine Beyond GDP - Report by the Commission on the Measurement of Economic Performance and Social Progress IMF Fiscal Monitor, October 2014 International Monetary Fund: Homepage International Monetary Fund (IMF) World Economic Outlook (WEO) database, October 2014 International Monetary Fund, World Economic Outlook Database, October 2014 New York Times: "The Rise and Fall of the G.D.P."- are there better ways to measure a country's wealth and happiness? Principles of Economics, by N. Gregory Mankiw (South-Western, Div. of Thomson Learning, 2003) The measurement of Gross domestic product The World Bank: Classification of Countries The World Bank: Homepage WEO Database October 2014-IMF WEO Press Briefing October 2014-IMF World Bank Homepage World Bank – Poverty Indicators World Bank's classification of countries by income group World Economic Outlook of the International Monetary Fund, October 2014 असं म्हटलेलं आहे. त्यांवर विश्वास ठेवायचा नसेल तर तसं सांगा.
आणि सगळ्यात महत्वाचं हा पियर रीव्ह्युड जरनल मधील निष्कर्ष नाही. त्यामुळे त्याला ग्राह्य मानन्यात कुठलाही शहाणपना नाही.
वादळ आलं की शहामृग वाळूत डोकं खुपसून बसतं. आणि मग त्याला 'वादळ नाहीच्चे' असं म्हणता येतं. मी लिहिलेल्या पहिल्या गटातले देश चांगले की दुसऱ्या गटातले देश चांगले याला तुम्ही कुठच्याही पीअर रीव्ह्यूड रिपोर्टच्या आधारे द्या उत्तर.

पुन्हा तेच दळण , गिरणी तीच फक्त डबे बदलले.

आणि हो बुवांकडून ट्णाट्णी शब्दाची खरी खुरी व्याख्या वाचायला आवडेल म्हणजे आम्ही ट्णाट्णी आहोत का नाहीत ते कळेल. रच्याकने : गावडे मास्तर का फिरकले नाहीत या धाग्यावर तेच कळेना (कुठ पूजेत अडकायची शक्यता नाही पण पूजेच्या नादी तर नाही......) शंका बालक नाखु

In reply to by नाखु

टनाटनी हे सनातनी ह्या शद्बाच खिल्ली उडविण्याच्या दृष्टींनी केलेलं विडंबन आहे. सनातनी ह्या शब्दाचा निसर्गनियमित व नैतिक असा अर्थ गृहीत धरून जे लोक स्वतः मात्र त्या पडद्याखाली विषमता स्त्री/पुरुष शोषक मूल्यांचाहि उल्लेख सनातन मूल्य किंवा एखादा धर्म म्हणून करतात त्यांना दिलेली हि शाब्दिक चपराक आहे. तुम्ही ह्यातले आहात,असे मला वाटत नाही. तुम्हाला वाटते का?,ते पहा. धन्यवाद.

In reply to by अत्रुप्त आत्मा

सनातनी ह्या शब्दाचा निसर्गनियमित व नैतिक असा अर्थ गृहीत धरून जे लोक स्वतः मात्र त्या पडद्याखाली विषमता स्त्री/पुरुष शोषक मूल्यांचाहि उल्लेख सनातन मूल्य किंवा एखादा धर्म म्हणून करतात
१) सत्यनारायण स्कंदपुराणे रेवाखंडे की काय असे काही जण गृहीत धरतात २) सत्यनारायण हे सरळ सरळ धार्मिक दहशतवाद माजवुन सर्वसामान्यांचे शोषण करण्याचे साधन आहे असे खरेपुरोगामी म्हणतात. ३) आणि तरीही काही लोकं "मी स्वतःहुन सत्यनारायण करुन घ्या अशी जाहिरात केली नाही, लोकांनी माझ्याकडे विनंती करुन सत्यनारायण करवुन घेतला म्हणुन माझा सत्यनारायण शोषण करणारा नाही " असे म्हणतात . आता ह्या हिशेबाने खरे सनातनी कोण आहे हे सर्वांनाच ठावुक आहे की हो !!

In reply to by प्रसाद गोडबोले

@ "मी स्वतःहुन सत्यनारायण करुन घ्या अशी जाहिरात केली नाही, लोकांनी माझ्याकडे विनंती करुन सत्यनारायण करवुन घेतला म्हणुन माझा सत्यनारायण शोषण करणारा नाही " असे म्हणतात . >> हा अत्यन्त खोटारडा आरोप माझ्यावर केलेला आहे. मी असं कुठे म्हणालेलो आहे ? ते दाखवा आता.

In reply to by अत्रुप्त आत्मा

परतेक हिंदु भटजीने रोज त्रिकाळ संध्या करणे अपेक्षित आहे. पण आपण तर http://www.misalpav.com/comment/770334#comment-770334 येथे संध्येची अधिष्ठात्री देवता गायत्री माँ हिच्याविषयी काढलेल्या गैर उद्गारांना ख्या ख्या करत मान्यता दिलेली आहे. कृपया स्पष्ट कराल का की एक हिंदु भटजी देवीदेवतांचा असा घृणास्पद अपमान करुन पुन्हा भटजीगिरी करुन पैसे कमवायला कसा रिकामा होतो? येथे जे उद्गार काढले आहेत ते कुठल्या बुद्धीवादात मोडतात? आपल्या कौटुंबिक परंपरेनुसार व प्राप्त संस्कारांनुसार प्रतिसादकर्ता अपोद्गार काढतो व तुम्ही बिनदिक्कत ख्या ख्या का करता?

In reply to by एकांतप्रेमी

कृपया उत्तर द्या की संध्येच्या अधिष्ठात्री देवतेचा असा बिनडोक अपमान करुन आपण पुन्हा भटजीगिरी करायला कसे धजावता?

In reply to by अत्रुप्त आत्मा

मग तिथे निषेध व्यक्त न करता ख्या ख्या का करत बषला? हा हिंदू भटजीच्या बेसिक नियमांचे उल्लंघन नाही का? प्रत्येक हिंदु भटजीने आदरपूर्वक माँ गायत्रीची उपासना केलीच पाहिजे. संध्या करत नसेल तर तो भटजी नाहीच. मग तुम्ही धार्मिक कृत्ये कोणत्या अधिकाराने करता?

In reply to by प्रचेतस

बुवांच्या मदतीला धावून जाण्याअगोदर त्यांना नीट हिंदु भटजीसारखे वर्तन करायला सांगा. अंतरी नास्तिकता बाळगून भोळसट हिंदु भाविकांना फसवण्याची परवानगी आपण देऊ नये ही विनंती. त्याऐवजी दुसरा व्यवसाय करा म्हणावे इतकीच जर ईश्वराची अॅलर्जी असेल तर...

In reply to by एकांतप्रेमी

माझ्या प्रश्नाचे उत्त्तर टाळण्याचा तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. बाकी ही बुवांना केलेली मदत वाटत असेल तर ह्याच धाग्यावरील मी बुवांना दिलेले प्रतिसाद पाहावेत.

In reply to by प्रचेतस

गायत्री हा छंद आहे आणि हा मंत्र सूर्याला उद्देशून आहे. हे तर कुणालाही माहित्ये. आपल्यालाच माहित्ये असा ग्रह करून घेऊ नये. त्याऐवजी हिंदु देवतांच्या नावाने गरळ ओकणार्यांना समज द्यावी ही विनंती... गायत्री छंदः 8×3 अशी छंद रचना आहै. मूळ रचना विश्वामित्रांची आहे.

In reply to by प्रचेतस

नका हो इतकी कळकळ करू. पोट दुखेल. त्याऐवजी आजून काही चिखलफेक करणे सोपे जाईल त्यांना आणि तुम्हालाही. :)

In reply to by अत्रुप्त आत्मा

http://www.misalpav.com/comment/718079#comment-718079
कुठे केली जाहिरात या गुरुजींनी? कोणाच्या घराघरांमधे "य्या य्या ..मी तर सुधारणावादी गुर्जी..माझ्याकडून पूजा करुन घ्या..आणि द्या मला खर्ची..(पक्षी :- खर्चा-पानी!) ...अशी जाहिरात केली..
http://www.misalpav.com/comment/763152#comment-763152
मी करवून घेतो तो सत्यनारायण त्या पारम्पारिक स्वरूपाचा नाहीच
वगैरे वगैरे ...

In reply to by प्रसाद गोडबोले

@मी करवून घेतो तो सत्यनारायण त्या पारम्पारिक स्वरूपाचा नाहीच >> ह्यातच सर्व काही आले. मी शोषक स्वरूपाच कामच करत नाही. म्हणूनच तुम्ही जाणीवपूर्वक आरोप केला,हे आपोआप स्पष्ट झालं.

In reply to by अत्रुप्त आत्मा

तुम्हाला एखादा धार्मिक विधी करायला बोलवणारा भाविक हिंदु हा तुम्ही मनोभावे आस्तिक असालच याच उद्देशाणे बोलवतो. त्याला जर समजले की तुम्ही आंतरजालावर माँ गायत्रीची अआशी अपमान करत ख्या ख्या करत पिरता तर तो तुम्हाला बोलवेल का घरात तरी? त्याला सांगा मी नास्तिक आहे, हिंदु देवीदेवतांचे अपमाण करत फिरतो, त्यांचा कुठे अपमान झाला तर णिषेध करायच्या एवजी ख्या ख्यि करत बसतो तर तो तुम्हाला हातात नारळ देवून घराबाहेर काढेल. एकतर इथे आपण हिंदु भटजी आसल्यिची जाहीरात करुन पुजेची सुपारी मिळवायची आणि पुन्हा इथेच या देवीदेवतांविषयी गलिच्छ टिका एंजाॅय करत सुटायची. धिक्कार असो त्या चित्रगुप्य आयडीचा आनी तुमचाही. .

In reply to by एकांतप्रेमी

अजून एक सांगा. प्रत्येक हिंदु धर्मविधीपूर्वी देवीदेवतांचे रीतसर आवाहन केले जाते. ते आवाहन आपण कोणत्या अधिकाराने करता? कारण जर ईश्वरी शक्तीच नसेल तर त्याचे आवाहन आपण काय म्हणून करता हे जाणून घ्यायचे आहे. तसेच प्रत्येक हिंदु धर्मविधीपूर्वी रीतसर न्यास करुन दैवी शक्तीचे आवाहन पुजार्याच्या अंगोपांगात केले जाते. ते न्यासविधी आपण अंतरी नास्तिकता बाळगून कसे करता हे पण जाणून घ्यायला फार आवडेल. तसेच प्रत्येक हिंदु धर्मविधीपूर्वी रीतसर प्रत्येक देविदेवतेला आवाहन करुन तिची षोडशोपचार पूजा केली जाते. तो पूजावीधी आपण नास्तिकता बाळगून कसे करता याचे आश्चर्य वाटते. कारण ईश्वरच नसेल तर त्याची षोडशोपचार पूजा हा आस्तिकांची फसवणूक करणारा ठरत नाही का? कृपया शंकानिरसन करावे.