Skip to main content

विज्ञान - नास्तिकवाद आणि मनोविकार

लेखक पॉइंट ब्लँक यांनी सोमवार, 28/03/2016 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल नास्तिक लोक फक्त तेच वैज्ञानिक दृष्टीकोन असणारे आहेत आणि जगाचं भलं करयाचा मक्ता केवळ त्यांच्याकडेच आहे असा टेंभा मिरवताना दिसतात. विज्ञानाला त्याबद्दल काय म्हणायचं आहे हा रोचक (कि विस्फोटक) प्रश्न असू शकतो. ह्यावर काही संशोधन Case Western Reserve University आणि Babson College येथे करण्यात आले. त्याबद्द्लच्या लेखाची लिंक इथे देत आहे http://phys.org/news/2016-03-conflict-science-religion-lies-brains.html शास्त्रज्ञांची काही महत्वाची मते खालीलप्रमाणे १. Analytic thinking discourages acceptance of spiritual or religious beliefs. But the statistical analysis of data pooled from all eight experiments indicates empathy is more important to religious belief than analytic thinking is for disbelief. म्हणजे धार्मिक लोकांसाठी सहानुभुती जितकी महत्वाची आहे तितका वैज्ञानिक द्रुष्टीकोन नास्तिकांसाठी गरजेचा नाही. 2. Atheists, the researchers found, are most closely aligned with psychopaths—not killers, but the vast majority of psychopaths classified as such due to their lack of empathy for others. तुम्ही नास्तिक असाल तर मनोविकार तज्ञाला भेटा ( तो नास्तिक नाही ह्याची आधी खात्री करून घ्या. :p ) ३. They refer to Baruch Aba Shalev's book 100 years of Nobel Prizes, which found that, from 1901 to 2000, 654 Nobel laureates, or nearly 90 percent, belonged to one of 28 religions. घ्या, नास्तिकवादाने काय जास्त दिवे लावले नाहीत. ४. "Far from always conflicting with science, under the right circumstances religious belief may positively promote scientific creativity and insight," Jack said. "Many of history's most famous scientists were spiritual or religious. Those noted individuals were intellectually sophisticated enough to see that there is no need for religion and science to come into conflict." आता धार्मिक लोकांना कमी लेखायचं थांबवा ५. Although it is simply a distortion of history to pin all conflict on religion," Jack said. "Non-religious political movements, such as fascism and communism, and quasi-scientific movements, such as eugenics, have also done great harm." जगाचं भलं फक्त नास्तिकच करू शकतात ही फक्त बुवाबाजी आहे.

वाचने 29564
प्रतिक्रिया 146

प्रतिक्रिया

ओके

In reply to by स्पा

http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif http://freesmileyface.net/smiley/laughing/lol-053.gif

धार्मिक लोकांसाठी सहानुभुती जितकी महत्वाची आहे तितका वैज्ञानिक द्रुष्टीकोन नास्तिकांसाठी गरजेचा नाही.
सहमत। काही वेळा नास्तिकता ही फक्त कट्टर धर्मिकतेला प्रतिक्रिया म्हणून असू शकते। पण धार्मिक लोकांपेक्षा नास्तिकांसाठी सहानुभूती "कमी" महत्वाची आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढलाय का? किंबहुना देव मदतीला येणार नसल्याने आपणच दुसऱ्याची मदत केली पाहिजे असा नास्तिक लोक जास्त विचार करत असतील का?

In reply to by अत्रे

आपणच दुसऱ्याची मदत केली पाहिजे
'दुसऱ्याची' मदत आणि 'दुसऱ्याला' मदत यातील फरक कृपया 'दुसऱ्याची मारणे' आणि 'दुसऱ्याला मारणे' या आधारे समजून घ्यावा, ही विनंती. बाकी चालूऊऊऊऊऊऊऊ द्या.

पण धार्मिक लोकांपेक्षा नास्तिकांसाठी सहानुभूती "कमी" महत्वाची आहे, असा निष्कर्ष त्यांनी काढलाय का?
हो. त्यांना इतरांबद्दल फारशी सहानुभुती नसते हा निष्कर्ष त्यांनी काढला आहे आणि म्हणूनच त्यांची तुलना मनोविकार असलेल्या लोकांशी केली आहे.

In reply to by पॉइंट ब्लँक

ते ठीक आहे, पण याचे कारण/मेकॅनिझम काय? नास्तिकतेचा सहानुभूतीशी संबंध कसा जोडायचा। देव नसणे या गृहितीकाशी सुरुवात करून असहानुभूती कडे कसे पोहोचायचे? किंवा याच्या उलट।

In reply to by अत्रे

कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल की प्रत्येक धर्मात ईश्वरी कृपा होण्यासाठी परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा अशी तत्वे सांगितली आहेत. त्यामुळे गहन ईश्वरी अनुभव घेऊ इच्छिणा-या प्रत्येक आस्तिकाला हे यम-नियम पालन करावेच लागतात. असे बंधन नास्तिकावर नाहीये. त्यामुळे त्याचा निसर्गतः कल जर वर नमूद सद्गुणांकडे असेल तरच तो तसे वागेल, नाहीतर देव नाही, आत्मा परमात्मा काही नाही, मी एक स्वतंत्र biological entity आहे, मग इतरांचा विचार कशाला करा? असा विचार बाळगला जाऊ शकतो...

In reply to by बंकू

हम्म। पटतंय थोडं पण धार्मिकांची सहानुभूती स्वधर्मीयांसाठीच राखीव असावी असे वाटते। उदा. ISIS फिलॉसॉफी। नास्तिकाकडे गृप्रिझम नसल्यामुळे त्यांची सहानुभूती (असल्यास) सर्वासाठी असावी।

In reply to by बंकू

मग इतरांचा विचार कशाला करा? असा विचार बाळगला जाऊ शकतो...
नास्तिकेतर इतरांचा विचार अधिक करतात आणि नास्तिक इतरांचा विचार कमी करतात ?, काही विदा आहे आपल्याकडे ?

In reply to by माहितगार

डोळ्यावर पट्टी बांधून उचल जीभ आणि लाव टाळूला हे आपण नेमके कुठून शिकला आहात कारण माझ्या माहितीतल्या हिंदू धर्मात उचल जिभ लाव टाळूला वर्तन टाळण्यास सुचवले जाते: मी म्हणतो तुम्ही उचलली जीभ लावली टाळूला का करताहात?

In reply to by माहितगार

संदर्भ आणि विदा देण्याची जबाबदारी दावा करणार्‍यांची असते. तुम्ही पण एक प्रकारे दावाच करत आहात की नाही... नीट विचार करा?

In reply to by बंकू

तुम्ही पण एक प्रकारे दावाच करत आहात की नाही... नीट विचार करा?
मी संदर्भ आणि विदा मागतो आहे. १ नास्तीक लोक परफेक्टली हिंदू असू शकतात या बाबतीत स्वतःचा हिंदू धर्माचा अभ्यास वाढवून यावे नाही तर मी आपणास अभ्यासासाठी पुरेसे संदर्भ देऊ शकतो २) इतरांचा विचार करणार्‍या नास्तिकांमध्ये अनेक हिंदूत्ववादींचा आणि देशप्रेमींचा समावेश आहे, नास्तिक असून देशप्रेमी आणि हिंदूत्ववादी असलेल्या लोकांचा तुमच्याकडून नकळत अवमान होत आहे. तेव्हा अद्वातद्वा विधाने करण्यापुर्वी विदा देणे ही तुमची स्वतःची जबाबदारी बनते.

In reply to by माहितगार

मागासाहेब माझ्या विधानातील शकतो आणि शकते ही क्रीयापदे नीट समजून घ्या... मग तुम्हाला समजेल की मी कुठलेच संख्याशास्त्रीय विधान केलेले नाहीये... मी फक्त एक सामान्य निरीक्षण नोंदवले आहे...

In reply to by बंकू

कारण/ मेकॅनिझम असे असू शकेल की प्रत्येक धर्मात ईश्वरी कृपा होण्यासाठी परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा अशी तत्वे सांगितली आहेत. त्यामुळे गहन ईश्वरी अनुभव घेऊ इच्छिणा-या प्रत्येक आस्तिकाला हे यम-नियम पालन करावेच लागतात. असे बंधन नास्तिकावर नाहीये. त्यामुळे त्याचा निसर्गतः कल जर वर नमूद सद्गुणांकडे असेल तरच तो तसे वागेल, नाहीतर देव नाही, आत्मा परमात्मा काही नाही, मी एक स्वतंत्र biological entity आहे, मग इतरांचा विचार कशाला करा? असा विचार बाळगला जाऊ शकतो... प्लीज या शकणेचा अर्थ समजून घ्या... मी कुठेही संख्याशास्त्रीय विधान केलेले नाहीये... एक सामान्य निरीक्षण नोंदवलेय..

In reply to by बंकू

एक सामान्य निरीक्षण नोंदवलेय..
आपण व्यक्तिगत किंवा काही लोकांनी मिळून बनवलेल्या या विधानाची वस्तुनिष्ठता साशंकीत आहे. आपले विधान मुलतः सापेक्षता आणि पुर्वग्रहांवर आधारीत आहे. माझ निरीक्षणच नव्हे तर खरा व्यक्तिगत अनुभव एकाच मार्च महिन्यात तीन स्वतंत्र ऑफीसमध्ये तीन वेगवेगळ्या धर्माच्या धर्मग्रंथाचे पठण (कि सोंग) करणार्‍या आस्तीक स्त्रीयांनी अत्यंतीक लोचटपणा करत टेबलखालून पैसे घेतले आहेत. किमान अशा दोन अत्यंत आस्तीक स्त्रीयांना ओळखतो की ज्यांनी स्वतःच्या नसलेल्या प्रॉपर्टी हजम केल्या आहेत. हे झाले व्यक्तिगत अनुभव आणि व्यक्तिगत निरीक्षणे. व्यवस्थीत समाजशास्त्रीय नोंदी झालेले हिंदू धर्मातील देवदेवतांना मानणारे असे काही (जाती)समूहही होते आणि आहेत जेथे चोरी अथवा डाका टाकण्या आधी चोरी/डाक्यात यशप्राप्तीसाठी दैवताची प्रार्थना केली जाते. दुसर्‍याच्या पत्नीचे हरण करणारा कोणताही रावण आस्तीकही असू शकतो. तुम्ही म्हणाल हिंदू धर्मातीलच उदाहरण का देता अगदी इराक मधील याझिदी स्त्रीयांचे हरण करणारेही त्यांच्या धर्माच्या आस्तीकतेचा हवाला देऊन हरण करतात, दुसर्‍या धर्मांकडे बोट दाखवल्या नंतर स्व धर्माकडे वापस येऊन जालंधरपत्नी वृंदेवर ओढवलेल्या प्रसंग आणि आस्तीकांच्या कोलांटउड्या कशा पवित्र करुन घेतल्या जातात ते सांगा -तरीही मी तुळशी पावित्र्याचा समर्थक आहे तुळशी पुजनाचा विरोधक नाही, तुळशी विवाहाच्या प्रथे बद्दल मात्र साशंक आहे-. किंवा गतजन्मीच्या शापांमुळे आपल्या स्वतःच्या पुत्रांना नदीत सोडणारी गंगा सुद्धा अस्तीक असते अथवा नसते. सर्वच धर्मसंस्थांच्या इतिहासाकडे वापस या त्या त्या धर्मांनी पाळलेल्या विषमता विषयक प्रथा मग हिंदू असूदेत का ख्रिश्चन अथवा बौद्ध धर्मीय या आस्तीकांनी पाळलेल्या विषमता नव्हत्या का? आणि या विषमता परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा या सर्वांना प्रत्यक्ष जिवनात तिलांजली देण्याची असंख्य उदाहरणे इतिहासात ऑन रेकॉर्ड आहेत संदर्भ हवे असतील तर देतो. आता तुम्ही म्हणाल की मी अपवादांवरुन नियम सिद्ध करतो आहे तर ते कदाचित बरोबर असेल पण नास्तीकांच्या बाबतही तुम्हाला अपवादावरुनच नियम सिद्ध करावा लागेल, हिंदू धर्मातील सांख्य तत्वज्ञान असो अथवा बौद्ध तत्वज्ञान असो हे इश्वरी अस्तीत्वावर अवलंबून नाही तरीही त्या तत्वज्ञानांचे बहुसंख्य भक्त समुह परोपकार, करुणा, सहानुभूती, जनसेवा यांची काळजी घेतानाही दिसतात. तसा इश्वर-निरीशवर वादाचा अर्थशास्त्राशी संबंध असावयास नको पण कम्युनिस्टांनी लावला कम्युनिस्टांच्या अर्थशास्त्रीय मर्यादा असतील पण इश्वर आणि धर्म दोन्ही नाकारत समता मागताना समतेच्या मुल्याच्या आग्रहा मागे कष्टकरी मानवा विषयी आत्मीयताच असते आणि या आत्मीयतेसाठी त्यांना इश्वर आणि धर्माची गरज भासत नाही. रशिया अथवा चीन किंवा इतर कम्युनीस्ट काळात त्या त्या देशातील सर्वसामान्य जनतेची समाजाची सर्वसाधारण मुल्य व्यवस्था घसरली असे दिसत नाही. (मी कम्युनीझमचा समर्थक नाही) बेसीकली मुल्य व्यवस्थेचे आणि संकेत नियम आणि कायद्यांचे सामाजीकरण हा समाजशास्त्रातील अनेक पैलू असलेला अभ्यास आहे आणि अनेक पैलूतील धर्मसंस्था कदाचित एक पैलू असू शकेल पण एकमेव पैलूच असेल असे सांगता येत नाही. या विषयावर अधिक अभ्यासासाठी Socialization आणि Legal socialization या दोन लेखांचे आपणास दुवे देतो त्यातील लिगल सोशलायझेशन या लेखावर माझ्या परीने माझे लेखन चालू असते. आता आपण आमेरीका (युएसए) कडे येऊ आमेरीकेतील अंदाजे २२ टक्के लोक इश्वर मानतात पण कोणताही धर्म मानत नाहीत १५ टक्के लोक इश्वर मानतात पण सर्व धर्म त्यांच्या साठी सारखे आहेत अथेईस्ट आणि अ‍ॅग्नॉस्टीक मिळून नास्तीकांची संख्या ७ टक्के आहे, सर्व धर्मांना एकसारखे मानणारे धर्म न मानणारे आणि निरीश्वर वादी यांची एकुण संख्या ४४ टक्क्यांच्या आसपास जाइल, म्हणुन आमेरीकेत भारताच्या तुलनेत जास्त गुन्हेगारी आहे आणि सर्व नास्तीक गुन्हेगार आहेत असे नसावे. तुम्ही आमची मुल्यव्यवस्था आमेरीकनांपेक्षा श्रेष्ठवर याल त्या साठी आपण नास्तीकतेच्या कड्डक व्याख्या अभ्यासू आस्तीकतेच्या स्ट्रीक्ट व्याख्येत केवळ त्यात्या धर्मातील त्या त्या पंथाचेच लोक आस्तीक असतात बाकीचे उर्वरीत सर्व जग नास्तीक असते, ज्युडायिक धर्मीयांना मुर्तीपुजा करणारे नास्तीक असतात आणि मुर्तीपुजा करणार्‍यांना मुर्ती पुजा न करणारे नास्तीक असतात, इस्लामीसाठी ख्रिश्नन नास्तीक असतात ख्रिश्चनांसाठी इस्लामी नास्तीक असततात - हे कड्डक व्याख्येने झाले म्हणजे उर्वरीत ९९.९९ टक्के लोक एकमेकांच्या व्याख्ये नुसार नास्तीक असतात. आपण ०.१ टक्क्याचा अपवाद देऊ पण बाकी सर्वांची नास्तीकतेची व्याख्या स्विकारुन गाळणी लावली तर जगातील ९९.९९ टक्के लोक नास्तीक असतात आणि त्यांची मुल्यव्यवस्था घसरलेली असते. हा मुद्दा समजला तर बघा नाही तर सावकाशीने वेगळा धागा टाकून एक्सप्लेन करेन. मुख्य मुद्दा तुमच्या सापेक्ष व्यक्तिगत/मर्यादीत पुर्वग्रहीत विधानातून बहुसंख्य नास्तीकांचे सरसकट नकारात्मक चित्रण होते आहे एवढेच नव्हे त्यांना मनोविकाराच्या लेव्हलवर घेऊन जात आहात ते वस्तुनिष्ठतेच्या निकषांवर कितपत टिकते याबाबत मी साशंक आहे. आता तुम्ही म्हणाल मी निरीश्वरवाद्यांच्या बाजूनेच बोलणारा आहे म्हणून हे सर्व लिहितो आहे तर तेही वस्तुस्थितीस आधारुन असणार नाही. संत मिराबाईंना मनोविकारांच्या लेव्हलवर नेले जातानाही मनोविकाराचा मुद्दा मी अगदी हिरहिरीने खोडला आहे ह्याची साक्ष स्वतः माननीय बिरुटेसरच देऊ शकतीलच. पण त्या शिवाय मी लिहिलेल्या विवीध धागा लेखाची खालील यादी पहा. * गुढी उभारनी * इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न * बगाड परंपरा आणि परंपरेतील वगळण्याजोगे अमानुष अंश * संत एकनाथांचा प्रतिमा आणि मुर्ती पुजन विषयक दृष्टीकोण * राजराजेश्वरी,राजरा, मेसाई, मेसको, मायराणी देवींची माहिती हवी * मुर्तीपुजेचे स्वॉट अ‍ॅनालिसीस * मंदिर काढण्याचा गंभीर प्रस्ताव * अभिषेक प्रकारांची माहिती हवी * गीतरामायणाचे छंदवृत्त, अलंकार, गायक, राग, आणि इतर माहिती * आषाढीच्या निमीत्ताने पुंडलीकाच्या शोधात पुन्हा एकदा ... * समर्थ रामदास लिखीत धवल गीताच्या अनुवादात साहाय्य हवे, आणि सुद्धा धवळे/धवले आडनावांची माहिती हवी * संत एकनाथांचा नैवेद्य - काही शब्दार्थ/पदार्थ माहितकरून हवेत * विवेकसिंधु, मुकुंदराज, आणि राजा जैतपाळाचे तळे * गीताई , गीतेचे अनुवाद आणि जादुचीकांडी आणि गीतारहस्या बद्दलही एक धागा लेख आहे. * थिऑसॉफी, आणि थिऑसॉफिकल सोसायटी बद्दल माहिती हवी * महाराष्ट्री प्राकृतातील जैन, महानुभावपंथीय आणि यादवकालीन साहित्याविषयी माहिती हवी * धर्मांवरील टिका: (त्या अजूनही आहेत) * संस्कृती आणि धर्म यातील गल्लत ** इतर धर्मावरील टिका * थिबॉ मीन" मयन्मारचा (ब्रह्मदेश) शेवटच्या सम्राट आणि राजघराण्याचा शेवट का अभ्यासावा ? * ज्युडायिक परंपरेतील चातुर्यकथा, व्यक्तिपूजा आणि छळगंड * :) शिर्क ? चंद्र, पृथ्वी एक टिका प्रतिसाद **मध्यंतरात व्यक्तिगत टिकेने भरकटलेल्या चर्चेच्या अनुषंगाने अवांतर ** बेफाम बोलण्यात पह्यला माझा नंबर ** कठोर (पण सभ्य) टिका कशी करावी ?/ करतो ?/ करतात ?

In reply to by माहितगार

तुमच्या मारुतीच्या शेपटीशी स्पर्धा करणार्या प्रतिसादाचा मी फॅन आहे

In reply to by माहितगार

तुमच्या मारुतीच्या शेपटीशी स्पर्धा करणार्या प्रतिसादाचा मी फॅन आहे

म्हणजे - मला xyz अनुभव आले त्यावरुन देव नाही हे माझे ठाम मत बनले. त्यामुळे मी नास्तिक आहे. असं म्हणत असेल तर चालेल. पण नास्तिकतावादी कधीकधी सुरूवातच उलटी करतात. मी नास्तिक आहे आणि त्यामुळे हे अनुभव हे असेच असले पाहिजेत असं त्यांचं म्हणणं असतं. याला बाकी काहीही म्हटलं तरी वैज्ञानिक दृष्टिकोन नक्कीच म्हणत नाहीत.

In reply to by गरिब चिमणा

नास्तिक रुड असतात
पण लेखातील ठळक वाक्ये वाचून आस्तिक नास्तिकांबद्दल रुड असतात का, हादेखील प्रश्न पडतो।

In reply to by गरिब चिमणा

नास्तिक रुड असतात पण सगळेच रुड असतात असे न्हवे.
उलट नास्तिक जास्तं मृदु असतात असं वाटायला लागलं आहे. मिपावर यनावाला किंवा दाभोळकर हे अत्यंत नम्रपणे त्यांची मतं मांडत असतात/असायचे. त्यांचा विरोध करणारेच खूप आक्षेपार्ह भाषा वापरताना दिसतात.

In reply to by अनुप ढेरे

गुपचुप चटका द्यायचा आणि भाजलेला माणुस ओरडायला लागला की मग "बघा हा कसा ओरडतोय" असा कांगावा करायचा. आधी दुसर्‍यांच्या वैयक्तीक गोष्टीत टिप्पणी करायला जायचेच कशाला?

विज्ञानाने आणि वैज्ञानिकांनी अनेक कोडी सोडवुन जनतेवर अनंत उपकार केले आहेत या मताचा मी आहे. पण याचा अर्थ सर्वच कोडी सुटली असे नाही. एका सेल पासुन दुसरी सेल निर्माण होते हे सायन्स आहे. दुसरी निर्माण होणारी सेल आधीच्याय सेल चे गुणधर्म घेऊन येते. पण मनुष्य जन्माची कहाणी पाहिली तर त्या विघटन किंवा जी काय प्रक्रिया म्हणाल त्यातुन अनेक प्रकारच्या वेगवेगळे गुण असलेल्या सेल्स तयार होतात. या चमत्काराचा जनम कोण हा प्रश्न कधी पडलाय ? माणुस ऑक्सीजन मुळे जगतो म्हणुन ऑक्सीजन तयार झाला की ऑक्सीजन आहे म्हणुन मानव निर्माण झाला याचे मुलभुत ज्ञान कोणाकडे होते ? फार कशाला, ज्याला पर्जन्य शास्त्र म्हणुन मान्यता आणि सरकारी अनुदान आहेत ते एक साधे मॉडेल जे शास्त्रावर आधारीत असुन अनेक वेळा फसते त्या मानवाच्या बुध्दीची मर्यादा आहे आणि मग कोणीतरी एक नियंता ज्याल ईश्वर म्हणा नाही तर आकाशातला देव म्हणातशी काहीशी शक्ती याच्या मागे आहे हे मानणे जर विज्ञान नसेल तर विज्ञान म्हणजे नेमके काय आहे ?

In reply to by गॅरी शोमन

बाकी सगळे ठिक आहे. होतं काय की एकदा अशी अवर्णनीय शक्ती इत्यादी मानली की पुढचा प्रवास पटपट होऊन देवभोळा समाज निर्माण होण्यास वेळ लागत नाही. त्यामुळे अशी काही शक्ती अस्तित्वात आहे जिच्या निर्णयामुळे निसर्गात काही घडतं असं मानणं देवभोळेपणा आहे. अनेक प्राचीन प्रश्न आता प्रश्न उरले नाहीत, त्याची उत्तरं मिळाल्यावर त्यामगचे दैवतीकरण नष्ट झाले. कोनती तरी शक्ती मानणे हे सर्व प्रश्न सुटेपर्यंत चालूच राहणार. क्षितिजाचा आरंभ शोधण्यासारखे देवाचे अस्तित्व शोधणे आहे.

आस्तिक लोकं जास्त सहानुभूती असलेले असतील तर त्यांनी नास्तिकांशी सहानुभूतीने वागले पाहिजे असं वाटतं।

चित्रपट तर बनवलाय आणि तो चालूसुद्धा आहे,पण त्याला निर्माता/दिग्दर्शकच नाही असं कसं होईल?

प्रतिसादाच्या प्रतीक्षेत. ....मला नास्तिकते मधे जीवनाचे नेमके अधिष्ठान सापडवताना संपूर्ण गोंधळ उडतो म्हणून जीवनात महत प्रयासाने आस्तिक भाव टिकवून आहे. म्हणून लेखकाने वर व्यक्त केलेल्या मतांशी नाइलाजानेच पण सहमत होंणे मला क्रमप्राप्त आहे. त्या तुलनेत आस्तिकता सर्व गोष्टी सोप्या करते.

In reply to by भाऊंचे भाऊ

तुमच्या मताशी सहमत्त आहे. पण लेखकाच्या मतांशी फारसा नाही. माझे व्यक्तिगत अनुभव मला नास्तिक होऊ देत नाहीत म्हणून मी आस्तिक आहे. तर्कावर मी नास्तिकतावाद केव्हाच स्वीकारला आहे.

+1

अश्रद्ध माणसाला श्रद्धेचा आधार मिळत नाही व कधी कधी विज्ञानाचाही आधार मिळत नाही. कारण प्रत्येक वेळी विज्ञान तुमच्या दैनंदिन आयुष्यातील सर्व प्रश्न सोडवण्यास मदत करेलच वा ती मदत व्यवहार्य असेलच असे नाही. अशा वेळी कुत्ता न घर का न घाटका अशी अवस्था होते.

तजो, >> होतं काय की एकदा अशी अवर्णनीय शक्ती इत्यादी मानली की पुढचा प्रवास पटपट होऊन देवभोळा समाज >> निर्माण होण्यास वेळ लागत नाही. यासंबंधी काही विदा मिळेल का? अन्यथा हे विधान केवळ गृहीतक म्हणून धरावे लागेल. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

देव आहे ह्याचा विदा मिळेल काय? अन्यथा हे देव मानणे केवळ गृहितक म्हणून धरावे लागेल. काय म्हणता? हजारो डॉक्टर्स, इंजिनीअर्स, उच्चशिक्षित इत्यादी लोक देवळांबाहेर, मशिदींबाहेर, चर्चेसबाहेर रांग लावून असतात. विज्ञानाद्वारे मिळालेले ज्ञान शिकून सवरुन, त्यावरच पोटापाण्याचा व्यवसायकरणार्‍या लोकांना जर खुळचट कल्पना टाकून द्याव्याशा वाटत नसतील तर तुम्हाला अजुन ह्यापेक्षा मोठा विदा काय हवाय?

In reply to by तर्राट जोकर

तजो, देव ज्याम किचकट संकल्पना वाटत्येय. तिच्या आधी आपण जरा सोपी संकल्पना बघूया. इलेक्ट्रॉन नक्की अस्तित्वात असतो का? ज्याअर्थी बटण दाबल्यावर दिवा लागतो, त्याअर्थी इलेक्ट्रॉन नावाचं काहीतरी अस्तित्वात असावं. तर ते नेमकं कुठे असतं? आ.न., -गा.पै.

In reply to by तर्राट जोकर

देव आहे ह्याचा विदा मिळेल काय?
https://en.wikipedia.org/wiki/G%C3%B6del%27s_ontological_proof हे न कळाल्यास आपण सुधारित सत्यनारायणाची पुजा घालावी म्हणजे आपल्याला पुरोगामी सत्यनारायण पावेल =))))

In reply to by अत्रुप्त आत्मा

बुवा, एक खरा पुरोगामी माणुस जिथे आपला अभ्यास नसतो तिथे "मला माहीत नाही / माझा अभ्यास नाही" असे म्हणतो , उगाच टनाटनि , माकड अन मतिमंद वगैरे वगैरे वापरुन आपले सुधारित पुरोगामित्व का हायलाईट करता ... हे घ्या प्रूफ : अजुन जरासा अभ्यास करु : a हे कळायला कोणालाच सोप्पे नाही पण , अभ्यास केल्यास अवघड ही नाही , हे पहा अजुन जरा जास्त स्पष्टीकरण http://math.stackexchange.com/questions/248548/g%C3%B6dels-ontological-… The modal operator □◻ refers to necessity; its dual, ◊◊, refers to possibility. (A sentence is necessarily true iff it isn't possible for it to be false, and vice versa.) P(φ)P(φ) means that φφ is a positive (in the sense of "good") property; I'll just transcribe it as "φφ is good". I'll write out the argument colloquially, with the loss of precision that implies. In particular, the words "possible" and "necessary" are vague, and you need to understand modal logic somewhat to follow their precise usage in this argument. Axiom 11: If φφ is good, and φφ forces ψψ (that is, it's necessarily true that anything with property φφ has property ψψ), then ψψ is also good. Axiom 22: For every property φφ, exactly one of φφ and ¬φ¬φ is good. (If ¬φ¬φ is good, we may as well say that φφ is bad.) Theorem 11 (Good Things Happen): If φφ is good, then it's possible that something exists with property φφ. Proof of Theorem 11: Suppose φφ were good, but necessarily nothing had property φφ. Then property φφ would, vacuously, force every other property; in particular φφ would force ¬φ¬φ. By Axiom 11, this would mean that ¬φ¬φ was also good; but this would then contradict Axiom 22. Definition 11: We call a thing godlike when it has every good property. Axiom 33: Being godlike is good. Theorem 22 (No Atheism): It's possible that something godlike exists. Proof of Theorem 22: This follows directly from Theorem 11 applied to Axiom 33. Definition 22: We call property φφ the essence of a thing xx when (1) xx has property φφ, and (2) property φφ forces every property of xx. Axiom 44: If φφ is good, then φφ is necessarily good. Theorem 33 (God Has No Hair): If a thing is godlike, then being godlike is its essence. Proof of Theorem 33: First note that if xx is godlike, it has all good properties (by definition) and no bad properties (by Axiom 22). So any property that a godlike thing has is good, and is therefore necessarily good (by Axiom 44), and is therefore necessarily possessed by anything godlike. Definition 33: We call a thing indispensable when something with its essence (if it has an essence) must exist. Axiom 55: Being indispensable is good. Theorem 44 (Yes, Virginia): Something godlike necessarily exists. Proof of Theorem 44: If something is godlike, it has every good property by definition. In particular, it's indispensable, since that's a good property (by Axiom 55); so by definition something with its essence, which is just "being godlike" (by Theorem 33), must exist. In other words, if something godlike exists, then it's necessary for something godlike to exist. But by Theorem 22, it's possible that something godlike exists; so it's possible that it's necessary for something godlike to exist; and so it is, in fact, necessary for something godlike to exist.

QED.

आता थोडा अभ्यास करु आणि मग निवांत चर्चा करु काय म्हणता ????

In reply to by प्रसाद गोडबोले

@बुवा, एक खरा पुरोगामी माणुस जिथे आपला अभ्यास नसतो तिथे "मला माहीत नाही / माझा अभ्यास नाही" असे म्हणतो , उगाच टनाटनि , माकड अन मतिमंद वगैरे वगैरे वापरुन आपले सुधारित पुरोगामित्व का हायलाईट करता ... हे घ्या प्रूफ : अजुन जरासा अभ्यास करु : >> मला हरवण्यापेक्षा तिकडे हे कथित आत्मकुंठित पुराव्यांचं बाड घेऊन अंनिस कडे जा ना.. त्यांनी असल्या शक्ती असल्या तर त्याविरोधात आव्हान टाकलंय तुम्हा टना टन फ्राय वाल्यांना ! सिद्ध करून दाखवा ..त्यांना. ज्जा!!! आता शेपूट घालून टनाटनी पणाचा मूळ भ्याडभेकडपणा नका दाखवू.. बघू जाता का अता!

In reply to by अत्रुप्त आत्मा

थोडक्यात तुम्हची अभ्यास करायची इच्छा नाही ...कदाचित कुवतच नाही ! असो. अंनिसचा संबंधच येत नाही कारण ह्यात अंधश्रध्दा असे काहीच नाही , हे मॅथेमॅटिकल लोजिक दिलेले प्रूफ आहे, काही अ‍ॅझम्शम्स आहेत , काही देफिनीशन्स आहेत आणि त्यावरुन काढलेली काही अनुमाने आहेत ! काय शक्ती बिक्ती बरळताय ? साधे सोपे गणितीय/ तर्कशास्त्रीय प्रुफ आहे . तुम्हाला वाचता तरी येते का इंग्रजी ?

In reply to by प्रसाद गोडबोले

Definition 11: We call a thing godlike when it has every good property. त्याने एकदम स्पायडरमॅनसारखी उडी मारली. Axiom 33: Being godlike is good. स्पायडरमॅनसारखी उडी मारणे शक्य आहे. Theorem 22 (No Atheism): It's possible that something godlike exists. म्हणजे स्पायडरमॅन प्रत्यक्षात आहे. क्या मै सही समझ राहा हु? इंग्रजी इतकीच येते दादा आमाला. काय चुकत असंल तर सांगा मर्‍हाटीत.

In reply to by तर्राट जोकर

तजो, गूड प्रोग्रेस.
Theorem 22 (No Atheism): It's possible that something godlike exists. म्हणजे स्पायडरमॅन प्रत्यक्षात आहे.
हा अनुवाद चुकला आहे , अनुवाद असा हवा - "म्हणजे स्पायडरमॅनसारखी गोष्ट प्रत्यक्षात असणे शक्य आहे."

In reply to by प्रसाद गोडबोले

अहो ते तर पहिल्या वाक्यातच सिद्ध झाले ना की स्पायडरमॅनसारखी उडी मारली. म्हणजे स्पायडरमॅनसारखी उडी हे वक्त्याचे विधान. स्पायडरमॅन्सारखी म्हटल्यावर स्पायडरमॅन अस्तित्वात असणे आवश्यक आहे ना? वक्त्याने त्याच्या कल्पनेतला स्पायडरमॅन वापरला, ज्याच्याकडॅ अचाट शक्ती आहेत असे त्याची संकल्पना आहे. शेवटी स्पायडरमॅन म्हणा की देव म्हणा माणसाच्या मनाचेच खेळ आहेत की नाही? आता दुसरे वाक्य बघा. तो सिंहासारखा रुबाबात चालत होता. म्हणजे सिंहासारखे चालणे हे रुबाबात चालणे असे मानले जाते म्हणजे सिंह अस्तित्वात आहे व तो चालतही असतो. ह्या उदाहरनातला सिंह व त्याचे चालणे मला प्रत्यक्षात दाखवणे शक्य आहे. देव किंवा स्पायडरमॅन कसा दाखवनार? अ‍ॅम आय ऑन ट्रॅक?

In reply to by तर्राट जोकर

येस! स्पायडरमॅन हे माणुस आणि ह्या दोन गुंणांची समष्टी आहे , स्पायडर दाखवता येतो , माणुस दाखवता येतो अन त्याची उडी ही दाखवता येते ! आणि दोघांची उडी एकत्र पहायची असेल तर तुम्हाला थेटर मध्ये जाऊन पहाता येतात थ्रीडी गॉगल लावला तर अगदी थ्री डी !! वरील प्रुफ मधील ही डेफीनीशन पहा Definition 11: We call a thing godlike when it has every good property. आता जगात अनेक गुड प्रॉपर्टीज आहेत ( येथे गूड म्हणजे अ‍ॅब्सेन्स ऑफ बॅड नव्हे ) , त्या चांगल्या गुड प्रॉपर्टीज दाखवता येतात , ह्या सार्‍या गुड पृपर्टीज ची समष्टी करता आली तर देवही देसतो मात्र त्यासाठी मंदीरात जाऊन , श्रध्देचा गॉगल लाऊन पहाण्याची तयारी हवी ! आता तुम्ही म्हणाल की सिंव्ह पहायला कोठे श्रध्दा बिध्दा लागते तर त्याला उत्तर असे - सिंव्ह हा काही भौतिक प्रॉपर्टीज ची समष्टी आहे , म्हणुन तो डोळ्याने दिसतओ , पण देव ही अशा प्रॉपर्टीज ची समष्टी आहे की ज्या दिसत नाहीत पण अनुभवता येतात उदा. बुद्धिर्ज्ञानमसम्मोहः क्षमा सत्यं दमः शम वगैरे वगैरे , त्या पहायचा नाहीत , अनुभवायच्या गोष्टी आहेत ! 'होवुन जायच्या' गोष्टी आहेत !

ज्ञानदेव म्हणे नयनाची ज्योती । या नावें रूपें तुम्ही जाणा ॥


In reply to by प्रसाद गोडबोले

अनुभवता येतात >> अनुभव सर्वमान्य नाही ना. तिकडेच तर समस्या आहे. सिंह बघायला सग्ळ्यांना जमतं (आंधळे सोडुन). गुलाबाचा सुगंध दिसत नाही पण अनुभवता येतो, वारा दिसत नाही पण केस उडवुन जातो. असे अनेक गुणधर्म असलेल्या समष्टी आहेत ज्यांचे अनुभव सर्वसामान्य आहेत. पण देवाचे अस्तित्व मान्य करावे लागते. गुलाबाचा सुगंध मान्य करावा लागत नाही, तो असतोच. त्यातही इथे प्रत्येकाचा देव वेगळा. असला असताच देव तर सगळ्यांचा कॉमन असता हा माझा लहानपणापासुनचा प्रश्न. मुस्लिम म्हणतात अल्ला एकमेव, क्रिस्चन म्हणतात गॉड एकमेव, स्गळ्यांचे असे सग्ळे सग्ळे देव एकमेव असुन स्गळे एकमेवरितीने जगावर नियंत्रण टेह्वतात. युद्ध जिंकणारे म्हणतात देव आमच्याबाजूने होता. देवाचा नवस फेडणारे म्हणतात देवाने आमचे ऐकले. हे अनुभवास येतं असं आपण म्हणता. ते सर्व स्थितीत सर्वांसाठी समान असावे की नको. आता पावसात भिजल्यावर मन रोमांटिक होतं हा अनुभवच आहे. पण प्रत्येक पावसात भिजणार्‍याला तो येत नाही.ह्याचा अर्थ मन रोमांटिक होणं सत्य असलं तरी ते मन:स्थितीवर अवलंबून आहे. तस्मात देवाचं अस्तित्व मन:स्थितीवर अवलंबून आहे का? बाकी ते मथेमटिकल लॉजिक आपल्या डोक्यावरुन जाते. आपल्याला दोन आणि दोन चार इतकंच गणित येतं. एका डझनात बारा केळी येतात हे कळतं. देव अस्तित्वात आहे तर तो समजुन घेणं इतकं किचकट का असावं इतकाच आमचा सवाल.

In reply to by तर्राट जोकर

असला असताच देव तर सगळ्यांचा कॉमन असता हा माझा लहानपणापासुनचा प्रश्न
मलाही असाच प्रश्न लहानपणापासून छळतोय.
युद्ध जिंकणारे म्हणतात देव आमच्याबाजूने होता. देवाचा नवस फेडणारे म्हणतात देवाने आमचे ऐकले. हे अनुभवास येतं असं आपण म्हणता. ते सर्व स्थितीत सर्वांसाठी समान असावे की नको.
माझा देव तुझ्या देवापेक्षा स्ट्राँग असे खेळता आले नसते ना.

In reply to by मार्मिक गोडसे

हायला हे म्हणजे लोबाशेव्हस्कि किंवा रिमान च्या भूमितीसारखं झालं आम्ही आपली युक्लीडची भूमिती शिकलो. दोन बिंदू जोडून एकच सरळ रेषा काढता येते. लोबाशेव्हस्कि म्हणतो दोन बिंदु जोडून एक पेक्षा जास्त सरळ रेषा काढता येते. रिमान म्हणतो दोन बिंदु जोडून एकही सरळ रेषा निघणार नाही. या लफड्या पायी आम्ही ३४ वर्षापूर्वी गणितापासून सन्यास घेतला. हे समजा, ते गृहीत धरा हे स्थिर आहे आणि ते अस्थिर आहे बाबा, आपली डॉक्टरकीच बरी.

In reply to by सुबोध खरे

हे समजा, ते गृहीत धरा हे स्थिर आहे आणि ते अस्थिर आहे >> अगदी अगदी. इथेच तर लबाडी आहे. दिवसाला रात्र समजा आणि चंद्राला सुर्य समजा असं म्हटलं की काय सिद्ध होतं देवजाणे ;-)

In reply to by तर्राट जोकर

अनुभव सर्वमान्य नाही ना.
अनुभव सर्वमान्यच आहेच ! साधु दिसती वेगळाले ! परी ते अंतरी मिळाले !! आजवर जितके काही थोडे फार संत साहित्य वाचले आहे त्यावरुन तरी सर्वांचा अनुभव सर्वमान्य च आहे असे दिसते ( आणि स्वानुभवालाही येते आहे !! ) पण आधी साधना हवी ! काहीच अभ्यास न करता टनाटनी म्हणणार्‍या काहीही समजाऊन सांगणे आणि त्याला ते समजणे अशक्यच आहे !! सर्व आत्मा ऐसे बोलता | अंगी बाणेना सर्वार्था | साधनेविण ज्ञान वार्ता | बोलोचि नये || श्रीराम || दसर्‍याचे सोने वाटले | तेणे काय हातासि आले | किं रायविनोदे आणले | सुखासन || श्रीराम || तसे शब्दी ब्रह्मज्ञान | बोलता नव्हे समाधान | म्हणोनिया आधी साधन | केले पाहिजे || श्रीराम || मी नुकतेच लिहुन काढलेला समर्थांचा अंतर्भाव हा छोटेखानी ग्रंथ नक्की वाचा जर खरेच समजुन घ्यायची इच्छा असेल तर ! http://www.misalpav.com/node/35193 ह्या ग्रंथात बरीचशी उत्तरे मिळतील !!
देव अस्तित्वात आहे तर तो समजुन घेणं इतकं किचकट का असावं इतकाच आमचा सवाल.
ह्याचेही उत्तर आहे त्या ग्रंथात !! शब्दी जेविता तृप्ती जाली | हे तो वार्ता नाही ऐकिली | पाक निष्पत्ती पाहिजे केली | साक्षेपे स्वये || श्रीराम || काहीतरी येक कारण | कैसे घडे प्रेत्नेविण | मां हे ब्रह्मज्ञान परमकठीण | साधनेविण केवी || श्रीराम || असो. ह्याही पेक्षा अजुन खोलात जाऊन अभ्यास करायचा असल्यास हे पहा : http://www.misalpav.com/node/30521 नाहीं तेंचि काय नेणों असें । दिसें तेंचि कैसें नेणों दिसे । असें तेंचि नेणों आपैसे । तें कीं होइहे ॥ ६४ ॥ निदेपरौते निदैजणें । जागृति गिळोनि जागणें । केलें तैसें जुंफणें । ज्ञानदेवो म्हणे ॥ ६५ ॥ शुभेच्छा :)

In reply to by प्रसाद गोडबोले

माफ करा पण तुम्ही संत काय बोलत आहेत हे वेगळ्याच संदर्भात मांडत आहात हे खेदाने म्हणावे लागत आहे. तुम्हाला देव आहे का याचा विदा द्यायचा होता, तुम्ही आधी कसलेसे अगडबंब तर्कगणित दिले, मग तुम्ही पोथ्या-ग्रंथात अमुक लिहिले तमुक लिहिले असे सांगत आहात. नंतर ब्रह्मज्ञान. ब्रहमज्ञान इत्यादी म्हटले की सोयिस्कर पळ काढता येतो. त्याने सिद्ध काहीच होत नाही. गा पै यांनी मला विचारले की एकदा कोणतीतरी शक्ती आहे असे मानले की देवभोळा समाज निर्माण होण्यास वेळ लागत नाही हे विधान सिद्ध करा. त्यावर मंदिरात, चर्चेस, मशिदी इथे लागणार्‍या रांगा ह्याचा पुरावा आहे असे मी सांगितले. तुमच्या वरील प्रतिसादातील तर्काप्रमाणे ह्या रांगांमधे उभे असलेल्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले असले पाहिजे किंवा जो अनुभव अनुभव तुम्ही म्हणताय ते तरी आलेले पाहिजेत. पण असं काही ही नाही. हे सगळे आपआपल्या सामाजिक संस्काराने झुकलेले आहेत. तुम्ही हिंदू आहात म्हणून गनपती, शंकर, विष्णू इत्यादी देव प्रत्यक्षात आहेत, ज्ञानेश्वर, रामदास, तुकाराम खरेच बोललेत असे मानता, मुस्लिम असता तर अल्लाहशिवाय कोण नाही असे म्हटले असते. क्रिश्चन घरात जन्माला आला असता तर जिजस ग्रेट वाटले असते. ह्या सगळ्यात तुम्ही म्हणताय ते ब्रह्मज्ञान काय फक्त हिंदूंसाठी ठेवले असेल काय परमदयाळू इश्वराने? ह्यात तर्कात काहीच चूकत नाही?
ब्रह्मज्ञान आणि देवाचे अस्तित्व हे दोन प्रचंड वेगळे आणि असंबंधित विषय आहेत.
ब्रह्मज्ञान प्राप्त झालेले देवळाच्या रांगांत उभे राहत नाहीत, त्यांचीच देवळे होतात. जगातल्या सर्व माहात्मा पदास पोचलेल्या संतांच्या प्रतिपादनात एक समान सूत्र आहे. पण ते अध्यात्माचे आहे. देवाच्या अस्तित्वाचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. दोन वेगळ्या गोष्टी एकत्र करुन तुमचा मुद्दा सिद्ध होत नाही असे वाटते. बाकी साधनेचे महत्त्व तर अबाधित आहे. इथे साधं जालावर लिहण्याची शक्ती आणि स्वातंत्र्य मिळायलाही काहीतरी साधना केली गेलीच आहे प्रत्येकाकडनं. कुश्ती खेळणार्‍यापासून संगितातल्या महारथींपर्यंत, प्रत्येकाने साधना केली आहे. या जगात केली जाणारी प्रत्येक साधना माझ्यामते अध्यत्मिकच असते. त्यात देवाच्या अस्तित्वाचा संबंध कुठून आला?

In reply to by तर्राट जोकर

असो. यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वतः !! हे भगवंताचे वचन आहे , ते खोटे कसे होणार ! तरीही शुभेच्छा :)

In reply to by प्रसाद गोडबोले

अगदी मान्य. म्हणूनच तर म्हटलं की लाखोंच्या संख्येने देवाच्या नावाने रांगा लावणार्‍यांनी देवाचे स्वरुप अजिबात जाणलेले नसते किंवा ते त्या मार्गावरही नसतात. तसेच जाण न पावता ओव्या अभंग श्लोक घोकणार्‍यांनाही ते कितपत कळले हे समजतेच. असो. तुम्हालाही साधनेसाठी शुभेच्छा. ;-)

In reply to by प्रसाद गोडबोले

वरील उदा न वाचन्या न कळण्या इतका अज्ञानी आहेच, पण त्यांनी तुमची उदा देऊन केलेली भ्याड लबाडी यत्किंचितहि लपत नाही.. त्यापेक्षा तुमचा स्वतः चा अपेक्षित भ्याड आणि भेकड शेपूटघालू पणा बघा ! पडलं उघड तुमचं पितळ! अट्टल टनाटनी आहात .... कसोटीच्या क्षणी कचकून शेपूट! (माहीतच होतं अर्थात! http://www.freesmileys.org/smileys/smiley-laughing013.gif टनाटनी स्पेशल गुण आहे तो! ) बसा आता आत्म कुंथन करत! http://www.freesmileys.org/smileys/smiley-taunt002.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

कसली भ्याड लबाडी अन कसले काय ? मथेमॅटिकल लॉजिक अणि फॉर्मल लॉजिक हा खुप मोठ्ठा अभ्यासाचा गहन विषय आहे ! आमच्यावर विश्वास बसत नसेल तर ब्यॅटाला विचारा ! आमच्या इन्स्टिटुट मधील कित्येक विद्यार्थी हौसेने अभ्यास करीत ह्या विषयाचा ! ( आम्ही संख्याशास्त्र - अर्थशास्त्र हा विषय निवडला ) जर बॅचलर ला गणित हा विषय निवडला असता तर अजुन डिट्टेल मधे प्रूफ दिले असते तुम्हाला ! काय पितळ उघडे पडणे अन काय टनाटनी अन काय शेपुट घालणे ? उगाचच बरळत आहात ! कसं आहे की गणित , लॉजिक , तत्वज्ञान हे विषय सनातनी सत्यनारायणाचा सुधारणावादी पुरोगामी सत्यनारायण करण्या इतके सोप्पे नाही. तरीही प्रयत्न करा हे समजुन घेण्याचा https://en.wikipedia.org/wiki/Mathematical_logic#Formal_logic

In reply to by प्रसाद गोडबोले

गिर्जा ज्या शाळेच्या दिल्ली शाखेत शिकला त्याच शाळेच्या कोलकाता शाखेत आम्ही शिकलो आहोत, सबब गिर्जा बोल रहा है वो सही बोल रहा है यात कै सौंशय नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

टनाटनी म्हणजे नेमके काय? टनाटनी हे सनातनी शब्दाचे विडंबन असेल तर सनातनी म्हणजे नेमके काय? सनातनी म्हणजे जुन्या आचारविचारांचे पालन करणे हे असेल तर सनातनी म्हणजे वैदिक धर्मावर श्रद्धा असणे का वैदिक धर्म लयास गेलेल्या भक्तीपंथावर श्रद्धा असणे? का सत्यनारायण, नारायण नागबळी अशा कर्मकाण्डाचे पालन करणे? सत्यनारायण हे सनातनी असेल तर आपण सनातनी ठरणार नाहीत का? किंवा सत्यनारायण हे सनातनी नसेल तर नक्की काय आहे? ते जर कर्मकआण्द असेल तर आपण ते करीत असल्याने आपल्यावर त्याचा दोष येणार नाही काय?