वैधानिक इशारे
१.---> कुत्री पाळणे, हे अतिशय घातक व्यसन असल्याने, जबाबदारीने, आर्थिक कुवतीने आणि सामाजिक भान ठेवूनच, ह्या व्यसनाच्या नादी लागावे.
२.---> कुत्री एखाद्या लहान मुलासारखीच असतात.त्यांच्या देहबोलीवरून, खाण्या-पिण्यावरून आणि भुंकण्यावरून त्यांच्या आजारपणाचा, त्यांच्या मागणीचा, अंदाज घ्यावा लागतो.त्यांची भाषा फक्त त्यांच्यावर मनापासून प्रेम करणार्या व्यक्तीलाच समजू शकते.
३.---> कुत्र्यांना शिकवणे हे अत्यंत वेळखाऊ आणि शांतपणे करायचे तप आहे.विशेषतः त्यांच्या "शी-शू"च्या सवयी बाबतीत.त्यांच्यावर जास्त न रागावता ह्या सवयी लावणे, सुरुवातीला थोडे त्रासदायक ठरेल, पण ह्या सवयी लागतात.
४.---> आली लहर आणि घेतला कुत्रा, असे अजिबात करू नका.कुत्रा पाळणे हे तिन्ही-त्रिकाळ करायची गोष्ट आहे.घरात २४ तास कुणी ना कुणी असेल तर (विशेषतः जेष्ठ लोक) कुत्रा जरूर पाळा.मला तरी ह्या बाबतीत कुत्र्यांचा खूपच उत्तम अनुभव आला आहे.आमच्या सासूबाई आता घर सोडून जावू शकत नाहीत.घरात कुत्री आणल्यापासून, त्यांना ह्या कुत्र्यांची छान सोबत होते.
==================================================================
काही सूचना
सूचना १ ----> ह्या भागात कृपया "कुत्र्यांची तोंडओळख आणि लॅब्रेडोर" ह्या विषयीच माहितीची देवाण-घेवाण करु या.
सूचना २ ----> पुढील भागात आपण "बीगल" ह्या जातीविषयी माहिती घेवू या.
सूचना ३ ----> आम्ही जरी श्र्वान-व्यसनी असलो तरी, ह्या व्यसना बाबतीत जाणकारही नाही आणि विशेषज्ञ तर अजिबात नाही.त्यामुळे, मी इथे लिहीत असलेली माहिती. बरीचशी मिळवलेली आणि थोडी-फार स्वानुभवाची आहे.कृपया माझी माहिती चुकीची असल्यास, दुरुस्त करण्यात यावी, ही कळकळीची विनंती.
सूचना ४ ----> कूठलाही कुत्रा किंवा कुत्री घेण्यापुर्वी, आपल्या घराजवळ किंवा आपल्याला सहज नेता-आणता येईल इतक्या अंतरावर पशूवैद्यक असावा.
सूचना ५ ----> आपल्या घराजवळ एखादे पाळीव श्र्वान असेल तर फार उत्तम.साधारणपणे ज्या कुटुंबात श्र्वान असते ते पाळीव श्र्वानांना आणि त्यांच्या मालकांना नेहमीच मदत करतात आणि दोन्ही घरातली कुत्री एकमेकांबरोबर छान खेळतात.
==============================================================
कुत्र्यांची निवड ======>
कुत्र्यांची निवड करतांना मी खालील गोष्टींना प्राधान्य देतो.
१. कारण
अ) सोबत ----> आमच्या सासू बाईंना अजिबात ऐकायला येत नाही.त्यामुळे आमच्या अपरोक्ष, त्यांची काळजी घ्यायला कुणी तरी त्यांच्या बरोबर असावे.
ब) संरक्षण ----> बाहेरची कुणी व्यक्ती घरांत आली तर, ती सतत आपल्या जवळ असली पाहिजे.आपल्या इशार्या नुसार त्यांनी भुंकायला पाहिजे.
२. घराचे आकारमान ---->
माझा अनुभव, सुरुवातीला आम्ही हा निकष धान्यात घेतला न्हवता.सुदैवाने आमच्या लॅब्रेडॉर जातीच्या कुत्रीने, आमच्या घराचे आकारमान कमी असले तरी, त्रास दिला नाही.पण प्रत्येक लॅब्रेडॉर तसे नसते.किंबहूना, लॅब्रेडीर, ग्रेट-डेन, डॉबरमन, गोल्डन रीट्रीव्हर, अल्सेशियन जातीच्या कुत्र्यांना किमान गॅलरी असलेले घर उत्तम.
पग, बीगल, पामेरियन, ह्या अशा दीड-फुटी कुत्र्यांना कमी जागा असली तरी चालते.
३. आज्ञाधारक पणा ---->
प्रशिक्षित कुत्री, मालकाने आज्ञा दिल्याशिवाय, शक्यतो घरात भुंकत नाहीत.तरी पण रॉटवायलर सारखी नाठाळ(?) कुत्री फ्लॅट धारकांनी पाळू नयेत, असे मला वाटते.
बंगला असेल तर रॉटवायलर सगळ्यात उत्तम, असे माझे मत.
------------------------------------------------------
श्र्वानांची काळजी =====>
१. खाणे-पिणे =====>
प्रत्येक श्र्वान हे आपापल्या कुवतीनुसारच खाते.लॅब्रेडॉर, ग्रेट-डेन, रॉटवायलर एका वैठकीत २-४ भाकर्या सहज रिचवतात आणि आपण काही खाल्लेच नाही अशा अविर्भावात बसतात.
आहार नियमित, वेळच्यावेळी आणि संतुलीत असावा.शक्यतो, कुत्र्यांना भरवायला जावू नये.त्यांची खाण्या-पिण्याची भांडी पण वेळोवेळी बदलावी.कुत्री बर्याचदा एककल्ली असल्याने, ठरावीक व्यक्ती आणि ठरावीक भांडे, ह्याची सवय, त्यांना लगेच लागू शकते.
पुढे-मागे काही कारणांंमुळे, त्या व्यक्तीला कुत्र्याला अन्न द्यायला न जमल्यास किंवा ते भांडे नसल्यास, कुत्रे इतरांनी दिलेल्या किंवा दुसर्या भांड्यातील अन्नाला तोंड लावत नाहीत.(ह्या दोन्ही गोष्टी बघीतलेल्या आहेत.)
पे-डीग्रीचे खाद्य सुरुवातीला, ३-४ महिन्यांपर्यंत जरूर द्या.पण पुढे मात्र हळूहळू घरच्या जेवणाची सवय त्यांना लावा.
भात-पोळी-भाकरी-अंडी-मासे-मटन आणि कोंबडी आठवडाभर आलटून-पालटून द्या.शक्यतो मैद्याचे पदार्थ जास्त देवू नका.
त्यांच्या पाण्याच्या भांड्यात सतत पाणी असेल ह्याची काळजी घ्या.
२. जंतू संसर्ग ====>
श्र्वानांना जंतू संसर्ग फार लवकर होतो.विशेषतः छोट्या श्र्वानांना.त्यामुळे, वेळच्या वेळी कोमट पाण्याने आणि साबण लावून श्र्वानांना आंघोळ घालणे.
आपण आजारी असलो तर, श्र्वानांच्या जवळ फार वेळ जावू नका.
३. कातडीचे रोग ====>
तापमान आणि इतर आजारी कुत्र्यांच्या सहवासामुळे (मग भले तो थोडा वेळासाठी तरी का असेना) आपल्या श्र्वानाला पण हे रोग होवू शकतात.
कुत्र्यांच्या कातडीरोगावर मलमे उपलब्ध असली तरी, ती मलमे कुत्र्यांच्या अंगावर जास्त वेळ टिकत नाहीत.कुत्रे लगेच ती मलमे चाटायला लागतात.
त्यामुळे शक्यतो, आम्ही ही मलमे, कुत्रे झोपल्यावर लावतो.कधी यश मिळते तर कधी मिळत नाही.
४. श्र्वानांना फिरायला नेणे ====>
सुरुवातीचे २-३ महिने किंवा श्र्वानांचे लसीकरण पुर्ण होईपर्यंत, श्र्वानांना फिरायला नेवू नये.
कारण, एकतर त्यांना अद्याप आपल्या सुचना समजत नसतात, त्यांना रहदारीचा अंदाज येत नसतो आणि रस्त्यावरच्या घाणीला ते कधी तोंड लावतील, ह्याची खात्री नसते.
२-३ महिने झाले की, मग प्रत्येक श्र्वानाला. मग तो छोटा असो वा मोठा, त्यांना रोजच्या रोज फिरायला न्यावेच लागते.इथे कुठल्याही प्रकारे अळं-टाळं करून चालत नाही.लॅब्रेडॉर सारख्या मोठ्या श्र्वानांना किमान २-३ किमी आणि ते पण दिवसातून २ वेळा अत्यंत आवश्यक आहे.
छोटा श्र्वान असेल तर त्याला पण त्याला झेपेल इतपत फिरवायला हवेच.
किंबहूना श्र्वानांना जितका व्यायाम द्याल तितके त्यांचे आरोग्य उत्तम राहील.
५. श्र्वानांना शिकवणे ====>
खरेतर श्र्वानांना शिकवणे फार सोपे.संयम आणि अंदाज ह्या गोष्टी असतील तर फारच सोपे.
ते लहान असतानांच त्यांना शिकवायला घ्या.
सुरुवात, त्यांना शांत बसवण्या पासून करा.
इथे थोडी-फार चापटी मारलीत तरी चालते.कारण तसेही जास्तीत-जास्त २ चापट्यांनीच काम होते.
एकदा त्यांना बसायची सवय झाली, की मग आपण "खा" म्हटल्याशिवाय, त्यांनी खायला नको, ही सवय लावणे, सोपे जाते.
कुत्र्यांना घेवून फिरायला जातांना, ह्या दोन्ही सुचनांचे पालन त्यांनी केलेच पाहिजे.
तिसरी सवय म्हणजे, बेल वाजवल्या वर भुंकणे किंवा दरवाजा जवळ येणे.
चौथी आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे, श्र्वानांना त्यांच्या शी-शूची जागा ठरवून देणे.
सुरुवातीला, त्यांना द्रव पदार्थच जास्त प्रमाणात द्यायला लागतात.साहजीकच त्यांचे "शू"चे प्रमाण आणि वारंवारता जास्त असते.३-४ महिन्यांनी घन आहार चालू झाला की, शूची वारंवारता फार कमी होते.
साधारणपणे खायला दिल्यानंतर, एक १०-१५ मिनिटातच त्यांना "शू" होते.अशावेळी त्यांचे खाणे आम्ही बाथरूम मध्येच देतो.एकदा त्यांनी सलग ३-४ खाणी आणि लगेचची "शू" बाथरूम मध्ये केली की, मग ती देवाघरी जाई पर्यंत पुढील प्रत्येक "शू" ती बाथरूम मध्येच करतात.
"शू" प्रमाणेच त्यांच्या "शी"च्या वेळा आणि जागा पण ठराविक असतात."शी" करण्यापुर्वी प्रत्येक कुत्री स्वतः भोवती रिंगण घालतात.त्यांनी असा पिंगा घालायला सुरुवात केली, की सरळ त्यांना बाथरूम मध्ये नेतो.४-५ दिवसांत सवय लागते.
शेकहँड द्यायला किंवा सलाम करायला शिकवण्यापेक्षा, ह्या ४ मुलभूत सवयी, श्र्वानांनी आत्मसात केल्या की श्र्वानाचे आणि श्र्वान मालकाचे सुखी-समाधानी-आनंदी जीवन सुरु होते.
आता आपण श्र्वानांच्या जातींच्या आणि त्या-त्या जातीतल्या श्र्वानांच्या गुणावगुणांच्या माहितीची देवाण-घेवाण करू या.
६. बाळंतपण ---->
त्र्यांचे बाळंतपण हा एक आनंदाचा सोहळा असतो आणि त्याच प्रमाणे जबाबदारीचा.
आपल्या कुत्रीला दिवस गेले की, एखाद्या बाळंतिणी सारखी तिची काळजी घ्यायला लागते.तिला सकस आणि चौरस आहार, किती वेळा आणि कुठला द्यावा हे पशुवैद्यका कडून जाणून घ्या.
दुर्दैवाने, आमच्या पहिल्या कुत्रीची पिल्ले काही कारणांमुळे गर्भाशयातच वारली.
आम्हा उभयतांचे अज्ञान, चुकीची औषध-योजना, घरापासून दूर असलेले पशुवैद्यक आणि लॅब्रेडॉरचे आकारमान, ही त्यामागची कारण-मीमांसा.
पिल्ले आतल्या आत गेल्यामुळे, तिचे गर्भाशय काढायला लागले.त्याची परिणिती कुत्रीचे वजन वाढण्यात झाली.
त्यामुळे तुमची कुत्री जर गर्भवती झाली तर, अनुभवी पशुवैद्यकाला पर्याय नाही.
कुत्र्यांच्या बाळंतपणाबाबत जास्त अनुभव नसल्याने, मी इथेच थांबतो.
==================================================
श्र्वान क्रमांक १ ======> लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर
होतील बहू, असतील बहू, पण माझ्या दृष्टीने सर्वोत्तम कौटुंबिक श्र्वान म्हणजे लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर.
मी बघीतलेले ९९% लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर, अतिशय प्रेमळ, बर्यापैकी समजूतदार आणि सहनशील होते आणि आहेत.
ह्यांचे दुर्गूण म्हणजे, प्रचंड खादाडपणा, अवाढव्य शरीर, वजन आणि केसगळती.
शरीराने बर्यापैकी अवाढव्य असल्याने डॉक्टर जवळ नसेल आणि स्वतःची गाडी नसेल तर फार कमी रिक्षावले, ह्यांना न्यायला तयार होतात.
आधी ह्यांना जेवायला घालून मग जेवायला बसतात तर थोडी शांत असतात, पण जर तुम्ही आधी खायला बसलात तर तुमच्या ताटात तोंड घालायचा नक्कीच प्रयत्न करतील.
तशी ही जात बर्यापैकी आळशी.लहानपणी जी काय मस्ती करतील तीच.पण साधारणपणे १-२ वर्षांची झाली की, आपण बरे आणि आपले घर बरे, ह्याच भुमिकेत शिरतात.ह्यांना शिकवायला जास्त त्रास पडत नाही.बाहेर फिरायला काढले की आमच्या लॅबूला तर नंतर-नंतर पट्टा पण लावत न्हवतो.
आता इथेच थांबतो.पुढे भेटू या प्रतिसादात.
पुढच्या भागात आपण बीगल विषयी माहिती घेवू या.
वाचने
116897
प्रतिक्रिया
170
मिसळपाव
प्रतिक्रिया
दादा,
In reply to अजिबात नाही ! किळस वाटू शकते by कैलासवासी सोन्याबापु
आप्पा तुमच्यासाठी,
In reply to कुत्र्याची किळस वाटू नये अशी by अप्पा जोगळेकर
सेंट बर्नार्ड
In reply to आप्पा तुमच्यासाठी, by भंकस बाबा
जंजीर
In reply to जंजीर विषयी, by भंकस बाबा
__/\__ जंजीरला सलाम!
In reply to जंजीर by गॅरी ट्रुमन
जंजीरला याची देहि ४ इंचावरून
In reply to जंजीर by गॅरी ट्रुमन
द मास्क मधील मायलो .....
In reply to फेमस by टिनटिन
ओ टिनटिन, तुमचा तो जगप्रसिद्ध
In reply to फेमस by टिनटिन
स्नोवी आहे तो, वायर्ड फॉक्स
In reply to ओ टिनटिन, तुमचा तो जगप्रसिद्ध by बिपिन कार्यकर्ते
लहानपणी एक गावठी कुत्रे पाळले
पु ले शु
"जोगळेकर वाचताय ना?"
In reply to पु ले शु by मी-सौरभ
"जोगळेकर वाचताय ना?"
असे लिहायचे राहिले का? (काडी!!) :))मार्ली अँड मी
हो रे..
In reply to मार्ली अँड मी by बिपिन कार्यकर्ते
वर दाखवलेला नेपोलियन मश्चिफ चा एक शिनेमा
८ बिलो
In reply to वर दाखवलेला नेपोलियन मश्चिफ चा एक शिनेमा by भंकस बाबा
एट बिलो ...मस्त सिनेमा...
In reply to वर दाखवलेला नेपोलियन मश्चिफ चा एक शिनेमा by भंकस बाबा
मला आठवत,
In reply to एट बिलो ...मस्त सिनेमा... by मुक्त विहारि
टॉम हँक्स ....
In reply to मला आठवत, by भंकस बाबा
एक
In reply to एट बिलो ...मस्त सिनेमा... by मुक्त विहारि
एक चूक झाली आहे
In reply to वर दाखवलेला नेपोलियन मश्चिफ चा एक शिनेमा by भंकस बाबा
कॅट्स एंड डॉग्स
यंदाच्या २६ जानेवारीच्या
आपल्याला लयं आवड हाय या
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008
असाच राग
In reply to आपल्याला लयं आवड हाय या by मदनबाण
माणसे मात्र समजून उमजून स्वतःच्या धार्मिक भावना जपणे.....
In reply to असाच राग by गॅरी ट्रुमन
लाऊडस्पीकरवर अहोरात्र
In reply to माणसे मात्र समजून उमजून स्वतःच्या धार्मिक भावना जपणे..... by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008भटक्या कुत्र्याच्या
In reply to लाऊडस्पीकरवर अहोरात्र by मदनबाण
काय बोलणार?
In reply to भटक्या कुत्र्याच्या by अभ्या..
यातून काही अजून मुद्दे मिळतात
https://www.facebook.com
In reply to यातून काही अजून मुद्दे मिळतात by सुचिकांत
तुमच्या पोस्ट मधे खूप चांगली
In reply to https://www.facebook.com by सुचिकांत
आभार संदीप सर.
In reply to तुमच्या पोस्ट मधे खूप चांगली by संदीप डांगे
एखादा प्राणी पाळणे, त्याला
मार्गीला घरी आणेपर्यंत हेच
In reply to एखादा प्राणी पाळणे, त्याला by मृत्युन्जय
त्यांचे नैसर्गिक खाद्य सोडुन
In reply to एखादा प्राणी पाळणे, त्याला by मृत्युन्जय
पट्टा
In reply to त्यांचे नैसर्गिक खाद्य सोडुन by संदीप डांगे
बाहेर जाताना त्याला पट्टा बांधावा लागतो....
In reply to पट्टा by सुनील
थोडा आचरटपणा
In reply to एखादा प्राणी पाळणे, त्याला by मृत्युन्जय
संवाद साधायचा प्रयत्न करत आहे....
In reply to एखादा प्राणी पाळणे, त्याला by मृत्युन्जय
आमचा गोल्डन रिट्रिवर
वा काय राजबिंडा दिसतोय !
In reply to आमचा गोल्डन रिट्रिवर by ज्योत्स्ना
फोटो आणि मोगली दोन्ही सुंदर.
In reply to आमचा गोल्डन रिट्रिवर by ज्योत्स्ना
इमेज फार मोठी आलि आहे. मला
गोल्डन रिट्रीवर कुत्रा आम्ही
फारच देखणा!
In reply to गोल्डन रिट्रीवर कुत्रा आम्ही by ज्योत्स्ना
रीट्रीवर (गोल्डन आणि लॅब्रॅडॉर)
In reply to गोल्डन रिट्रीवर कुत्रा आम्ही by ज्योत्स्ना
मोगली एकदम गोड दिसतोय
In reply to गोल्डन रिट्रीवर कुत्रा आम्ही by ज्योत्स्ना
इमानदार
मला पण कुत्रा मांजर पाळायची
रेस्क्यू म्हणून एक संस्था
In reply to मला पण कुत्रा मांजर पाळायची by सतिश पाटील
प्रश्न खरा असा नाही
बरं झालं या विषयावर लेखमालिका सुरू केलीत ते
Werewolf muzzle for your dog
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008लॉर्ड ऑफ ब्याक सीट
टफीचे डोळे मस्त तजेलदार आहेत....
In reply to लॉर्ड ऑफ ब्याक सीट by सुनील
थोडे अधिक ...
In reply to टफीचे डोळे मस्त तजेलदार आहेत.... by मुक्त विहारि
दात घासु देतात का कुत्रे?
दात घासु देतात का कुत्रे?
In reply to दात घासु देतात का कुत्रे? by अजया
होय
In reply to दात घासु देतात का कुत्रे? by अजया
हे माहीतच नव्हतं ! रच्याकने
In reply to होय by सुनील
ही माहिती कोणीच सांगितली
मी तर आमच्या फट्या ला पप्पी
मी जेनी असे अं अ कुलकर्णी
लॅब्रेडॉरच्या मनमिळावू बद्दलचा आज घडलेला एक किस्सा...
कुत्र्याचे लसीकरण आणि
हो, हे हवंच होतं. कुणीतरी मदत
In reply to कुत्र्याचे लसीकरण आणि by अजया
लसीकरण आणि डिवर्मिंग
In reply to कुत्र्याचे लसीकरण आणि by अजया
डिवर्मिंगच्या गोळ्या कुत्र्याच्या घशात घालणे हा एक अनुभवच असतो!!
In reply to लसीकरण आणि डिवर्मिंग by सुनील
कुत्र्यांना गोड, चॉकलेट्स देऊ
In reply to डिवर्मिंगच्या गोळ्या कुत्र्याच्या घशात घालणे हा एक अनुभवच असतो!! by मुक्त विहारि
कुत्र्यांना गोड पदार्थ शक्यतो देवू नयेत...
In reply to कुत्र्यांना गोड, चॉकलेट्स देऊ by यशोधरा
अनुभव
In reply to डिवर्मिंगच्या गोळ्या कुत्र्याच्या घशात घालणे हा एक अनुभवच असतो!! by मुक्त विहारि
डिवर्मिंगच्या गोळ्या कुत्र्याच्या घशात घालणे हा एक अनुभवच असतो!!
In reply to लसीकरण आणि डिवर्मिंग by सुनील
ह्म्मम्म
आईला खात्री होती कि कुत्र्याचं सगळं तिलाच करायला लागणार.....
In reply to ह्म्मम्म by अर्धवटराव
किस्सा टाकतो. >> अजिबात नको :
In reply to आईला खात्री होती कि कुत्र्याचं सगळं तिलाच करायला लागणार..... by मुक्त विहारि
"अजिबात नको :("
In reply to किस्सा टाकतो. >> अजिबात नको : by यशोधरा
It is
It is
शीर्षक कस तरी वाटत. कुत्री