कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....
लेखनप्रकार
वैधानिक इशारे
१.---> कुत्री पाळणे, हे अतिशय घातक व्यसन असल्याने, जबाबदारीने, आर्थिक कुवतीने आणि सामाजिक भान ठेवूनच, ह्या व्यसनाच्या नादी लागावे.
२.---> कुत्री एखाद्या लहान मुलासारखीच असतात.त्यांच्या देहबोलीवरून, खाण्या-पिण्यावरून आणि भुंकण्यावरून त्यांच्या आजारपणाचा, त्यांच्या मागणीचा, अंदाज घ्यावा लागतो.त्यांची भाषा फक्त त्यांच्यावर मनापासून प्रेम करणार्या व्यक्तीलाच समजू शकते.
३.---> कुत्र्यांना शिकवणे हे अत्यंत वेळखाऊ आणि शांतपणे करायचे तप आहे.विशेषतः त्यांच्या "शी-शू"च्या सवयी बाबतीत.त्यांच्यावर जास्त न रागावता ह्या सवयी लावणे, सुरुवातीला थोडे त्रासदायक ठरेल, पण ह्या सवयी लागतात.
४.---> आली लहर आणि घेतला कुत्रा, असे अजिबात करू नका.कुत्रा पाळणे हे तिन्ही-त्रिकाळ करायची गोष्ट आहे.घरात २४ तास कुणी ना कुणी असेल तर (विशेषतः जेष्ठ लोक) कुत्रा जरूर पाळा.मला तरी ह्या बाबतीत कुत्र्यांचा खूपच उत्तम अनुभव आला आहे.आमच्या सासूबाई आता घर सोडून जावू शकत नाहीत.घरात कुत्री आणल्यापासून, त्यांना ह्या कुत्र्यांची छान सोबत होते.
==================================================================
काही सूचना
सूचना १ ----> ह्या भागात कृपया "कुत्र्यांची तोंडओळख आणि लॅब्रेडोर" ह्या विषयीच माहितीची देवाण-घेवाण करु या.
सूचना २ ----> पुढील भागात आपण "बीगल" ह्या जातीविषयी माहिती घेवू या.
सूचना ३ ----> आम्ही जरी श्र्वान-व्यसनी असलो तरी, ह्या व्यसना बाबतीत जाणकारही नाही आणि विशेषज्ञ तर अजिबात नाही.त्यामुळे, मी इथे लिहीत असलेली माहिती. बरीचशी मिळवलेली आणि थोडी-फार स्वानुभवाची आहे.कृपया माझी माहिती चुकीची असल्यास, दुरुस्त करण्यात यावी, ही कळकळीची विनंती.
सूचना ४ ----> कूठलाही कुत्रा किंवा कुत्री घेण्यापुर्वी, आपल्या घराजवळ किंवा आपल्याला सहज नेता-आणता येईल इतक्या अंतरावर पशूवैद्यक असावा.
सूचना ५ ----> आपल्या घराजवळ एखादे पाळीव श्र्वान असेल तर फार उत्तम.साधारणपणे ज्या कुटुंबात श्र्वान असते ते पाळीव श्र्वानांना आणि त्यांच्या मालकांना नेहमीच मदत करतात आणि दोन्ही घरातली कुत्री एकमेकांबरोबर छान खेळतात.
==============================================================
कुत्र्यांची निवड ======>
कुत्र्यांची निवड करतांना मी खालील गोष्टींना प्राधान्य देतो.
१. कारण
अ) सोबत ----> आमच्या सासू बाईंना अजिबात ऐकायला येत नाही.त्यामुळे आमच्या अपरोक्ष, त्यांची काळजी घ्यायला कुणी तरी त्यांच्या बरोबर असावे.
ब) संरक्षण ----> बाहेरची कुणी व्यक्ती घरांत आली तर, ती सतत आपल्या जवळ असली पाहिजे.आपल्या इशार्या नुसार त्यांनी भुंकायला पाहिजे.
२. घराचे आकारमान ---->
माझा अनुभव, सुरुवातीला आम्ही हा निकष धान्यात घेतला न्हवता.सुदैवाने आमच्या लॅब्रेडॉर जातीच्या कुत्रीने, आमच्या घराचे आकारमान कमी असले तरी, त्रास दिला नाही.पण प्रत्येक लॅब्रेडॉर तसे नसते.किंबहूना, लॅब्रेडीर, ग्रेट-डेन, डॉबरमन, गोल्डन रीट्रीव्हर, अल्सेशियन जातीच्या कुत्र्यांना किमान गॅलरी असलेले घर उत्तम.
पग, बीगल, पामेरियन, ह्या अशा दीड-फुटी कुत्र्यांना कमी जागा असली तरी चालते.
३. आज्ञाधारक पणा ---->
प्रशिक्षित कुत्री, मालकाने आज्ञा दिल्याशिवाय, शक्यतो घरात भुंकत नाहीत.तरी पण रॉटवायलर सारखी नाठाळ(?) कुत्री फ्लॅट धारकांनी पाळू नयेत, असे मला वाटते.
बंगला असेल तर रॉटवायलर सगळ्यात उत्तम, असे माझे मत.
------------------------------------------------------
श्र्वानांची काळजी =====>
१. खाणे-पिणे =====>
प्रत्येक श्र्वान हे आपापल्या कुवतीनुसारच खाते.लॅब्रेडॉर, ग्रेट-डेन, रॉटवायलर एका वैठकीत २-४ भाकर्या सहज रिचवतात आणि आपण काही खाल्लेच नाही अशा अविर्भावात बसतात.
आहार नियमित, वेळच्यावेळी आणि संतुलीत असावा.शक्यतो, कुत्र्यांना भरवायला जावू नये.त्यांची खाण्या-पिण्याची भांडी पण वेळोवेळी बदलावी.कुत्री बर्याचदा एककल्ली असल्याने, ठरावीक व्यक्ती आणि ठरावीक भांडे, ह्याची सवय, त्यांना लगेच लागू शकते.
पुढे-मागे काही कारणांंमुळे, त्या व्यक्तीला कुत्र्याला अन्न द्यायला न जमल्यास किंवा ते भांडे नसल्यास, कुत्रे इतरांनी दिलेल्या किंवा दुसर्या भांड्यातील अन्नाला तोंड लावत नाहीत.(ह्या दोन्ही गोष्टी बघीतलेल्या आहेत.)
पे-डीग्रीचे खाद्य सुरुवातीला, ३-४ महिन्यांपर्यंत जरूर द्या.पण पुढे मात्र हळूहळू घरच्या जेवणाची सवय त्यांना लावा.
भात-पोळी-भाकरी-अंडी-मासे-मटन आणि कोंबडी आठवडाभर आलटून-पालटून द्या.शक्यतो मैद्याचे पदार्थ जास्त देवू नका.
त्यांच्या पाण्याच्या भांड्यात सतत पाणी असेल ह्याची काळजी घ्या.
२. जंतू संसर्ग ====>
श्र्वानांना जंतू संसर्ग फार लवकर होतो.विशेषतः छोट्या श्र्वानांना.त्यामुळे, वेळच्या वेळी कोमट पाण्याने आणि साबण लावून श्र्वानांना आंघोळ घालणे.
आपण आजारी असलो तर, श्र्वानांच्या जवळ फार वेळ जावू नका.
३. कातडीचे रोग ====>
तापमान आणि इतर आजारी कुत्र्यांच्या सहवासामुळे (मग भले तो थोडा वेळासाठी तरी का असेना) आपल्या श्र्वानाला पण हे रोग होवू शकतात.
कुत्र्यांच्या कातडीरोगावर मलमे उपलब्ध असली तरी, ती मलमे कुत्र्यांच्या अंगावर जास्त वेळ टिकत नाहीत.कुत्रे लगेच ती मलमे चाटायला लागतात.
त्यामुळे शक्यतो, आम्ही ही मलमे, कुत्रे झोपल्यावर लावतो.कधी यश मिळते तर कधी मिळत नाही.
४. श्र्वानांना फिरायला नेणे ====>
सुरुवातीचे २-३ महिने किंवा श्र्वानांचे लसीकरण पुर्ण होईपर्यंत, श्र्वानांना फिरायला नेवू नये.
कारण, एकतर त्यांना अद्याप आपल्या सुचना समजत नसतात, त्यांना रहदारीचा अंदाज येत नसतो आणि रस्त्यावरच्या घाणीला ते कधी तोंड लावतील, ह्याची खात्री नसते.
२-३ महिने झाले की, मग प्रत्येक श्र्वानाला. मग तो छोटा असो वा मोठा, त्यांना रोजच्या रोज फिरायला न्यावेच लागते.इथे कुठल्याही प्रकारे अळं-टाळं करून चालत नाही.लॅब्रेडॉर सारख्या मोठ्या श्र्वानांना किमान २-३ किमी आणि ते पण दिवसातून २ वेळा अत्यंत आवश्यक आहे.
छोटा श्र्वान असेल तर त्याला पण त्याला झेपेल इतपत फिरवायला हवेच.
किंबहूना श्र्वानांना जितका व्यायाम द्याल तितके त्यांचे आरोग्य उत्तम राहील.
५. श्र्वानांना शिकवणे ====>
खरेतर श्र्वानांना शिकवणे फार सोपे.संयम आणि अंदाज ह्या गोष्टी असतील तर फारच सोपे.
ते लहान असतानांच त्यांना शिकवायला घ्या.
सुरुवात, त्यांना शांत बसवण्या पासून करा.
इथे थोडी-फार चापटी मारलीत तरी चालते.कारण तसेही जास्तीत-जास्त २ चापट्यांनीच काम होते.
एकदा त्यांना बसायची सवय झाली, की मग आपण "खा" म्हटल्याशिवाय, त्यांनी खायला नको, ही सवय लावणे, सोपे जाते.
कुत्र्यांना घेवून फिरायला जातांना, ह्या दोन्ही सुचनांचे पालन त्यांनी केलेच पाहिजे.
तिसरी सवय म्हणजे, बेल वाजवल्या वर भुंकणे किंवा दरवाजा जवळ येणे.
चौथी आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे, श्र्वानांना त्यांच्या शी-शूची जागा ठरवून देणे.
सुरुवातीला, त्यांना द्रव पदार्थच जास्त प्रमाणात द्यायला लागतात.साहजीकच त्यांचे "शू"चे प्रमाण आणि वारंवारता जास्त असते.३-४ महिन्यांनी घन आहार चालू झाला की, शूची वारंवारता फार कमी होते.
साधारणपणे खायला दिल्यानंतर, एक १०-१५ मिनिटातच त्यांना "शू" होते.अशावेळी त्यांचे खाणे आम्ही बाथरूम मध्येच देतो.एकदा त्यांनी सलग ३-४ खाणी आणि लगेचची "शू" बाथरूम मध्ये केली की, मग ती देवाघरी जाई पर्यंत पुढील प्रत्येक "शू" ती बाथरूम मध्येच करतात.
"शू" प्रमाणेच त्यांच्या "शी"च्या वेळा आणि जागा पण ठराविक असतात."शी" करण्यापुर्वी प्रत्येक कुत्री स्वतः भोवती रिंगण घालतात.त्यांनी असा पिंगा घालायला सुरुवात केली, की सरळ त्यांना बाथरूम मध्ये नेतो.४-५ दिवसांत सवय लागते.
शेकहँड द्यायला किंवा सलाम करायला शिकवण्यापेक्षा, ह्या ४ मुलभूत सवयी, श्र्वानांनी आत्मसात केल्या की श्र्वानाचे आणि श्र्वान मालकाचे सुखी-समाधानी-आनंदी जीवन सुरु होते.
आता आपण श्र्वानांच्या जातींच्या आणि त्या-त्या जातीतल्या श्र्वानांच्या गुणावगुणांच्या माहितीची देवाण-घेवाण करू या.
६. बाळंतपण ---->
त्र्यांचे बाळंतपण हा एक आनंदाचा सोहळा असतो आणि त्याच प्रमाणे जबाबदारीचा.
आपल्या कुत्रीला दिवस गेले की, एखाद्या बाळंतिणी सारखी तिची काळजी घ्यायला लागते.तिला सकस आणि चौरस आहार, किती वेळा आणि कुठला द्यावा हे पशुवैद्यका कडून जाणून घ्या.
दुर्दैवाने, आमच्या पहिल्या कुत्रीची पिल्ले काही कारणांमुळे गर्भाशयातच वारली.
आम्हा उभयतांचे अज्ञान, चुकीची औषध-योजना, घरापासून दूर असलेले पशुवैद्यक आणि लॅब्रेडॉरचे आकारमान, ही त्यामागची कारण-मीमांसा.
पिल्ले आतल्या आत गेल्यामुळे, तिचे गर्भाशय काढायला लागले.त्याची परिणिती कुत्रीचे वजन वाढण्यात झाली.
त्यामुळे तुमची कुत्री जर गर्भवती झाली तर, अनुभवी पशुवैद्यकाला पर्याय नाही.
कुत्र्यांच्या बाळंतपणाबाबत जास्त अनुभव नसल्याने, मी इथेच थांबतो.
==================================================
श्र्वान क्रमांक १ ======> लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर
होतील बहू, असतील बहू, पण माझ्या दृष्टीने सर्वोत्तम कौटुंबिक श्र्वान म्हणजे लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर.
मी बघीतलेले ९९% लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर, अतिशय प्रेमळ, बर्यापैकी समजूतदार आणि सहनशील होते आणि आहेत.
ह्यांचे दुर्गूण म्हणजे, प्रचंड खादाडपणा, अवाढव्य शरीर, वजन आणि केसगळती.
शरीराने बर्यापैकी अवाढव्य असल्याने डॉक्टर जवळ नसेल आणि स्वतःची गाडी नसेल तर फार कमी रिक्षावले, ह्यांना न्यायला तयार होतात.
आधी ह्यांना जेवायला घालून मग जेवायला बसतात तर थोडी शांत असतात, पण जर तुम्ही आधी खायला बसलात तर तुमच्या ताटात तोंड घालायचा नक्कीच प्रयत्न करतील.
तशी ही जात बर्यापैकी आळशी.लहानपणी जी काय मस्ती करतील तीच.पण साधारणपणे १-२ वर्षांची झाली की, आपण बरे आणि आपले घर बरे, ह्याच भुमिकेत शिरतात.ह्यांना शिकवायला जास्त त्रास पडत नाही.बाहेर फिरायला काढले की आमच्या लॅबूला तर नंतर-नंतर पट्टा पण लावत न्हवतो.
आता इथेच थांबतो.पुढे भेटू या प्रतिसादात.
पुढच्या भागात आपण बीगल विषयी माहिती घेवू या.
वाचने
116229
वाचनखूण
प्रतिक्रिया
170
वा वा! मस्त धागा!
मुवि, तुम्ही मनकवडे आहात काहो
In reply to मुवि, तुम्ही मनकवडे आहात काहो by संदीप डांगे
कुत्र्यांच्या मालकांसाठी काही पुस्तके आणि वेब साईट्स
In reply to मुवि, तुम्ही मनकवडे आहात काहो by संदीप डांगे
शु चं गणित फक्त तुम्ही म्हणताय तसं शिकवायला लागेल.
In reply to शु चं गणित फक्त तुम्ही म्हणताय तसं शिकवायला लागेल. by मुक्त विहारि
पुस्तके आणि इतर दुव्यांसाठी
In reply to पुस्तके आणि इतर दुव्यांसाठी by संदीप डांगे
मार्गी' चा काही ऋणानुबंध असावा.
In reply to मार्गी' चा काही ऋणानुबंध असावा. by मुक्त विहारि
हॅरी पॉटर मधले एक वाक्य आहे..
In reply to हॅरी पॉटर मधले एक वाक्य आहे.. by उगा काहितरीच
'हाचिको' जपानी पिक्चर-स्टोरी
In reply to मार्गी' चा काही ऋणानुबंध असावा. by मुक्त विहारि
छडीच आपला जादूगार निवडते >>
In reply to शु चं गणित फक्त तुम्ही म्हणताय तसं शिकवायला लागेल. by मुक्त विहारि
:)
In reply to मुवि, तुम्ही मनकवडे आहात काहो by संदीप डांगे
शी घराबाहेर जाऊन करते.
In reply to शी घराबाहेर जाऊन करते. by अप्पा जोगळेकर
अहो अप्पा, घराबाहेर म्हणजे
उगाच वाचले!! जखमेवरची खपली
In reply to उगाच वाचले!! जखमेवरची खपली by कैलासवासी सोन्याबापु
अमरावतीच्या घरी काका कड़े एक लैब्राडोर आहे...
In reply to अमरावतीच्या घरी काका कड़े एक लैब्राडोर आहे... by मुक्त विहारि
आमचे ध्यान, वय ६ महीने
In reply to आमचे ध्यान, वय ६ महीने by कैलासवासी सोन्याबापु
भावना पोचल्या!
In reply to भावना पोचल्या! by अन्नू
अवं सर
In reply to आमचे ध्यान, वय ६ महीने by कैलासवासी सोन्याबापु
चर्चा लॅबची सुरु आहे पण आम्हाला मोह आवरला नाही
छान माहीती
In reply to छान माहीती by अन्नू
आमच्याकडे असलेली कुत्री.....
छान
आणि हो
मस्त
In reply to मस्त by गॅरी ट्रुमन
कुत्र्यांची काळजी घ्यायला लागणारा वेळ नसल्यामुळे...
अगदी कामाच्या वेळी आलेला
कुत्रा का पाळू नये
In reply to कुत्रा का पाळू नये by कपिलमुनी
६
In reply to ६ by कपिलमुनी
मला वाटते..
In reply to मला वाटते.. by ब़जरबट्टू
हा धागा
In reply to कुत्रा का पाळू नये by कपिलमुनी
चांगलं लेखन माहितीपूर्ण धागा.
चांगला विषय. अशी एकत्रितपणे
मुवी.. उत्तम लेख.. थोडे फोटो
In reply to मुवी.. उत्तम लेख.. थोडे फोटो by मोदक
थोडे फोटो टाका.
उत्तम लेख.
In reply to उत्तम लेख. by कंजूस
आई ग्गं! लॅबू कसला गोडुला आहे
भूभूचा धागा आणि प्रकाश
In reply to भूभूचा धागा आणि प्रकाश by बिपिन कार्यकर्ते
भूभू आले की
In reply to भूभू आले की by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्राडॉ... जुन्या धाग्यांच्या
In reply to प्राडॉ... जुन्या धाग्यांच्या by बिपिन कार्यकर्ते
हेच
छान धागा
In reply to छान धागा by पैसा
मुलांसारखेच,
मुके प्राणी नेहमीच जिव्हाळ्याचा विषय....
मीही तेच म्हणतोय मु.वी. साहेब
In reply to मीही तेच म्हणतोय मु.वी. साहेब by प्रमोद देर्देकर
आमचा संगणक फोटो डकवायला मदत करत नाही....
सच्चा सोबती नावाचं एक पुस्तक
छान लेख.
मस्त
In reply to मस्त by राजेंद्र मेहेंदळे
कुत्र्याची काळजी घ्यायला घरी सतत कुणी असेल तर....
In reply to कुत्र्याची काळजी घ्यायला घरी सतत कुणी असेल तर.... by मुक्त विहारि
हा बीगलच आहे का?
In reply to हा बीगलच आहे का? by मोदक
होय...
In reply to हा बीगलच आहे का? by मोदक
क्लिप बद्दल धन्यवाद....
मस्तं लेखमाला.
आमची लोला
In reply to आमची लोला by मीता
मस्त आहे लोला. एक सल्ला
In reply to आमची लोला by मीता
भेट म्हणून द्यायचं असेल तर द्या
In reply to भेट म्हणून द्यायचं असेल तर द्या by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोला नाही देणार ..तशीच दुसरी
In reply to आमची लोला by मीता
झिप्री लोला छान दिसतेय!
In reply to आमची लोला by मीता
लोला आवडली....
awww.....क्यूट!!
अत्यंत हिडीस जनावर आहे हे
In reply to अत्यंत हिडीस जनावर आहे हे by अप्पा जोगळेकर
आप्पा : प्रतिसाद द्यायची
In reply to आप्पा : प्रतिसाद द्यायची by मीता
ओके. Sorry शक्तिमान.
In reply to आप्पा : प्रतिसाद द्यायची by मीता
मी तरी शक्यतो लेखनस्वातंत्र्य मानतो....
In reply to अत्यंत हिडीस जनावर आहे हे by अप्पा जोगळेकर
अत्यंत हिडीस जनावर आहे....
In reply to अत्यंत हिडीस जनावर आहे.... by मुक्त विहारि
अनंतवेळा सहमत
In reply to अत्यंत हिडीस जनावर आहे.... by मुक्त विहारि
कुत्राच कशाला कुठलाही प्राणी
In reply to अत्यंत हिडीस जनावर आहे हे by अप्पा जोगळेकर
मत देताय तर स्पष्टीकरण पण द्या,
In reply to अत्यंत हिडीस जनावर आहे हे by अप्पा जोगळेकर
खास आपा तुमच्यासाठी :)
In reply to खास आपा तुमच्यासाठी :) by अन्नू
आई गं.... कसली गोड बाळे आहेत!
In reply to आई गं.... कसली गोड बाळे आहेत! by पद्मावति
हे घ्या वदनी कवळ...
In reply to हे घ्या वदनी कवळ... by बिपिन कार्यकर्ते
ही ही ही ....हे अल्टिमेट आहे
In reply to ही ही ही ....हे अल्टिमेट आहे by पद्मावति
कसलं अल्टीमेट साला इथे मात्र
In reply to कसलं अल्टीमेट साला इथे मात्र by प्रमोद देर्देकर
बर्र
In reply to कसलं अल्टीमेट साला इथे मात्र by प्रमोद देर्देकर
ती ऐकतात म्हणुन काहीही.
छान आहे गं लोला! भोंडल्याचं
काही प्रसिद्ध श्वान...
अत्यंत वाईट अनुभव दिलेत या
बाकी लेख मला आवर्जून वाचेनच .
In reply to बाकी लेख मला आवर्जून वाचेनच . by अद्द्या
अद्द्या कधी फ्रेंच मास्टीफ
In reply to अद्द्या कधी फ्रेंच मास्टीफ by अभ्या..
अभ्या भाऊ!
In reply to अभ्या भाऊ! by कैलासवासी सोन्याबापु
हा. गुगल्या सर्च हा. हे
In reply to हा. गुगल्या सर्च हा. हे by अभ्या..
गोंदवल्याला एका मित्राचा
साली कुत्री आणि मांजरं
सीएम्सी मध्ये असताना रात्री
च्यायला जाहिर संभोग करणाऱ्या
In reply to च्यायला जाहिर संभोग करणाऱ्या by कैलासवासी सोन्याबापु
हेच म्हणनार होतो. ते उघड्यावर
फेमस
In reply to फेमस by टिनटिन
जंजीर विषयी,
In reply to जंजीर विषयी, by भंकस बाबा
कुत्र्याची किळस वाटू नये अशी
In reply to कुत्र्याची किळस वाटू नये अशी by अप्पा जोगळेकर
अजिबात नाही ! किळस वाटू शकते