Skip to main content

कुत्री पालन ---- भाग १ ---- निवड, कुत्र्यांची काळजी, शिक्षण आणि लॅब्रेडॉरचे अनुभव.....

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 09/02/2016 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
वैधानिक इशारे १.---> कुत्री पाळणे, हे अतिशय घातक व्यसन असल्याने, जबाबदारीने, आर्थिक कुवतीने आणि सामाजिक भान ठेवूनच, ह्या व्यसनाच्या नादी लागावे. २.---> कुत्री एखाद्या लहान मुलासारखीच असतात.त्यांच्या देहबोलीवरून, खाण्या-पिण्यावरून आणि भुंकण्यावरून त्यांच्या आजारपणाचा, त्यांच्या मागणीचा, अंदाज घ्यावा लागतो.त्यांची भाषा फक्त त्यांच्यावर मनापासून प्रेम करणार्‍या व्यक्तीलाच समजू शकते. ३.---> कुत्र्यांना शिकवणे हे अत्यंत वेळखाऊ आणि शांतपणे करायचे तप आहे.विशेषतः त्यांच्या "शी-शू"च्या सवयी बाबतीत.त्यांच्यावर जास्त न रागावता ह्या सवयी लावणे, सुरुवातीला थोडे त्रासदायक ठरेल, पण ह्या सवयी लागतात. ४.---> आली लहर आणि घेतला कुत्रा, असे अजिबात करू नका.कुत्रा पाळणे हे तिन्ही-त्रिकाळ करायची गोष्ट आहे.घरात २४ तास कुणी ना कुणी असेल तर (विशेषतः जेष्ठ लोक) कुत्रा जरूर पाळा.मला तरी ह्या बाबतीत कुत्र्यांचा खूपच उत्तम अनुभव आला आहे.आमच्या सासूबाई आता घर सोडून जावू शकत नाहीत.घरात कुत्री आणल्यापासून, त्यांना ह्या कुत्र्यांची छान सोबत होते. ================================================================== काही सूचना सूचना १ ----> ह्या भागात कृपया "कुत्र्यांची तोंडओळख आणि लॅब्रेडोर" ह्या विषयीच माहितीची देवाण-घेवाण करु या. सूचना २ ----> पुढील भागात आपण "बीगल" ह्या जातीविषयी माहिती घेवू या. सूचना ३ ----> आम्ही जरी श्र्वान-व्यसनी असलो तरी, ह्या व्यसना बाबतीत जाणकारही नाही आणि विशेषज्ञ तर अजिबात नाही.त्यामुळे, मी इथे लिहीत असलेली माहिती. बरीचशी मिळवलेली आणि थोडी-फार स्वानुभवाची आहे.कृपया माझी माहिती चुकीची असल्यास, दुरुस्त करण्यात यावी, ही कळकळीची विनंती. सूचना ४ ----> कूठलाही कुत्रा किंवा कुत्री घेण्यापुर्वी, आपल्या घराजवळ किंवा आपल्याला सहज नेता-आणता येईल इतक्या अंतरावर पशूवैद्यक असावा. सूचना ५ ----> आपल्या घराजवळ एखादे पाळीव श्र्वान असेल तर फार उत्तम.साधारणपणे ज्या कुटुंबात श्र्वान असते ते पाळीव श्र्वानांना आणि त्यांच्या मालकांना नेहमीच मदत करतात आणि दोन्ही घरातली कुत्री एकमेकांबरोबर छान खेळतात. ============================================================== कुत्र्यांची निवड ======> कुत्र्यांची निवड करतांना मी खालील गोष्टींना प्राधान्य देतो. १. कारण अ) सोबत ----> आमच्या सासू बाईंना अजिबात ऐकायला येत नाही.त्यामुळे आमच्या अपरोक्ष, त्यांची काळजी घ्यायला कुणी तरी त्यांच्या बरोबर असावे. ब) संरक्षण ----> बाहेरची कुणी व्यक्ती घरांत आली तर, ती सतत आपल्या जवळ असली पाहिजे.आपल्या इशार्‍या नुसार त्यांनी भुंकायला पाहिजे. २. घराचे आकारमान ----> माझा अनुभव, सुरुवातीला आम्ही हा निकष धान्यात घेतला न्हवता.सुदैवाने आमच्या लॅब्रेडॉर जातीच्या कुत्रीने, आमच्या घराचे आकारमान कमी असले तरी, त्रास दिला नाही.पण प्रत्येक लॅब्रेडॉर तसे नसते.किंबहूना, लॅब्रेडीर, ग्रेट-डेन, डॉबरमन, गोल्डन रीट्रीव्हर, अल्सेशियन जातीच्या कुत्र्यांना किमान गॅलरी असलेले घर उत्तम. पग, बीगल, पामेरियन, ह्या अशा दीड-फुटी कुत्र्यांना कमी जागा असली तरी चालते. ३. आज्ञाधारक पणा ----> प्रशिक्षित कुत्री, मालकाने आज्ञा दिल्याशिवाय, शक्यतो घरात भुंकत नाहीत.तरी पण रॉटवायलर सारखी नाठाळ(?) कुत्री फ्लॅट धारकांनी पाळू नयेत, असे मला वाटते. बंगला असेल तर रॉटवायलर सगळ्यात उत्तम, असे माझे मत. ------------------------------------------------------ श्र्वानांची काळजी =====> १. खाणे-पिणे =====> प्रत्येक श्र्वान हे आपापल्या कुवतीनुसारच खाते.लॅब्रेडॉर, ग्रेट-डेन, रॉटवायलर एका वैठकीत २-४ भाकर्‍या सहज रिचवतात आणि आपण काही खाल्लेच नाही अशा अविर्भावात बसतात. आहार नियमित, वेळच्यावेळी आणि संतुलीत असावा.शक्यतो, कुत्र्यांना भरवायला जावू नये.त्यांची खाण्या-पिण्याची भांडी पण वेळोवेळी बदलावी.कुत्री बर्‍याचदा एककल्ली असल्याने, ठरावीक व्यक्ती आणि ठरावीक भांडे, ह्याची सवय, त्यांना लगेच लागू शकते. पुढे-मागे काही कारणांंमुळे, त्या व्यक्तीला कुत्र्याला अन्न द्यायला न जमल्यास किंवा ते भांडे नसल्यास, कुत्रे इतरांनी दिलेल्या किंवा दुसर्‍या भांड्यातील अन्नाला तोंड लावत नाहीत.(ह्या दोन्ही गोष्टी बघीतलेल्या आहेत.) पे-डीग्रीचे खाद्य सुरुवातीला, ३-४ महिन्यांपर्यंत जरूर द्या.पण पुढे मात्र हळूहळू घरच्या जेवणाची सवय त्यांना लावा. भात-पोळी-भाकरी-अंडी-मासे-मटन आणि कोंबडी आठवडाभर आलटून-पालटून द्या.शक्यतो मैद्याचे पदार्थ जास्त देवू नका. त्यांच्या पाण्याच्या भांड्यात सतत पाणी असेल ह्याची काळजी घ्या. २. जंतू संसर्ग ====> श्र्वानांना जंतू संसर्ग फार लवकर होतो.विशेषतः छोट्या श्र्वानांना.त्यामुळे, वेळच्या वेळी कोमट पाण्याने आणि साबण लावून श्र्वानांना आंघोळ घालणे. आपण आजारी असलो तर, श्र्वानांच्या जवळ फार वेळ जावू नका. ३. कातडीचे रोग ====> तापमान आणि इतर आजारी कुत्र्यांच्या सहवासामुळे (मग भले तो थोडा वेळासाठी तरी का असेना) आपल्या श्र्वानाला पण हे रोग होवू शकतात. कुत्र्यांच्या कातडीरोगावर मलमे उपलब्ध असली तरी, ती मलमे कुत्र्यांच्या अंगावर जास्त वेळ टिकत नाहीत.कुत्रे लगेच ती मलमे चाटायला लागतात. त्यामुळे शक्यतो, आम्ही ही मलमे, कुत्रे झोपल्यावर लावतो.कधी यश मिळते तर कधी मिळत नाही. ४. श्र्वानांना फिरायला नेणे ====> सुरुवातीचे २-३ महिने किंवा श्र्वानांचे लसीकरण पुर्ण होईपर्यंत, श्र्वानांना फिरायला नेवू नये. कारण, एकतर त्यांना अद्याप आपल्या सुचना समजत नसतात, त्यांना रहदारीचा अंदाज येत नसतो आणि रस्त्यावरच्या घाणीला ते कधी तोंड लावतील, ह्याची खात्री नसते. २-३ महिने झाले की, मग प्रत्येक श्र्वानाला. मग तो छोटा असो वा मोठा, त्यांना रोजच्या रोज फिरायला न्यावेच लागते.इथे कुठल्याही प्रकारे अळं-टाळं करून चालत नाही.लॅब्रेडॉर सारख्या मोठ्या श्र्वानांना किमान २-३ किमी आणि ते पण दिवसातून २ वेळा अत्यंत आवश्यक आहे. छोटा श्र्वान असेल तर त्याला पण त्याला झेपेल इतपत फिरवायला हवेच. किंबहूना श्र्वानांना जितका व्यायाम द्याल तितके त्यांचे आरोग्य उत्तम राहील. ५. श्र्वानांना शिकवणे ====> खरेतर श्र्वानांना शिकवणे फार सोपे.संयम आणि अंदाज ह्या गोष्टी असतील तर फारच सोपे. ते लहान असतानांच त्यांना शिकवायला घ्या. सुरुवात, त्यांना शांत बसवण्या पासून करा. इथे थोडी-फार चापटी मारलीत तरी चालते.कारण तसेही जास्तीत-जास्त २ चापट्यांनीच काम होते. एकदा त्यांना बसायची सवय झाली, की मग आपण "खा" म्हटल्याशिवाय, त्यांनी खायला नको, ही सवय लावणे, सोपे जाते. कुत्र्यांना घेवून फिरायला जातांना, ह्या दोन्ही सुचनांचे पालन त्यांनी केलेच पाहिजे. तिसरी सवय म्हणजे, बेल वाजवल्या वर भुंकणे किंवा दरवाजा जवळ येणे. चौथी आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे, श्र्वानांना त्यांच्या शी-शूची जागा ठरवून देणे. सुरुवातीला, त्यांना द्रव पदार्थच जास्त प्रमाणात द्यायला लागतात.साहजीकच त्यांचे "शू"चे प्रमाण आणि वारंवारता जास्त असते.३-४ महिन्यांनी घन आहार चालू झाला की, शूची वारंवारता फार कमी होते. साधारणपणे खायला दिल्यानंतर, एक १०-१५ मिनिटातच त्यांना "शू" होते.अशावेळी त्यांचे खाणे आम्ही बाथरूम मध्येच देतो.एकदा त्यांनी सलग ३-४ खाणी आणि लगेचची "शू" बाथरूम मध्ये केली की, मग ती देवाघरी जाई पर्यंत पुढील प्रत्येक "शू" ती बाथरूम मध्येच करतात. "शू" प्रमाणेच त्यांच्या "शी"च्या वेळा आणि जागा पण ठराविक असतात."शी" करण्यापुर्वी प्रत्येक कुत्री स्वतः भोवती रिंगण घालतात.त्यांनी असा पिंगा घालायला सुरुवात केली, की सरळ त्यांना बाथरूम मध्ये नेतो.४-५ दिवसांत सवय लागते. शेकहँड द्यायला किंवा सलाम करायला शिकवण्यापेक्षा, ह्या ४ मुलभूत सवयी, श्र्वानांनी आत्मसात केल्या की श्र्वानाचे आणि श्र्वान मालकाचे सुखी-समाधानी-आनंदी जीवन सुरु होते. आता आपण श्र्वानांच्या जातींच्या आणि त्या-त्या जातीतल्या श्र्वानांच्या गुणावगुणांच्या माहितीची देवाण-घेवाण करू या. ६. बाळंतपण ----> त्र्यांचे बाळंतपण हा एक आनंदाचा सोहळा असतो आणि त्याच प्रमाणे जबाबदारीचा. आपल्या कुत्रीला दिवस गेले की, एखाद्या बाळंतिणी सारखी तिची काळजी घ्यायला लागते.तिला सकस आणि चौरस आहार, किती वेळा आणि कुठला द्यावा हे पशुवैद्यका कडून जाणून घ्या. दुर्दैवाने, आमच्या पहिल्या कुत्रीची पिल्ले काही कारणांमुळे गर्भाशयातच वारली. आम्हा उभयतांचे अज्ञान, चुकीची औषध-योजना, घरापासून दूर असलेले पशुवैद्यक आणि लॅब्रेडॉरचे आकारमान, ही त्यामागची कारण-मीमांसा. पिल्ले आतल्या आत गेल्यामुळे, तिचे गर्भाशय काढायला लागले.त्याची परिणिती कुत्रीचे वजन वाढण्यात झाली. त्यामुळे तुमची कुत्री जर गर्भवती झाली तर, अनुभवी पशुवैद्यकाला पर्याय नाही. कुत्र्यांच्या बाळंतपणाबाबत जास्त अनुभव नसल्याने, मी इथेच थांबतो. ================================================== श्र्वान क्रमांक १ ======> लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर होतील बहू, असतील बहू, पण माझ्या दृष्टीने सर्वोत्तम कौटुंबिक श्र्वान म्हणजे लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर. मी बघीतलेले ९९% लॅब्रेडॉर आणि गोल्डन रिटिव्हर, अतिशय प्रेमळ, बर्‍यापैकी समजूतदार आणि सहनशील होते आणि आहेत. ह्यांचे दुर्गूण म्हणजे, प्रचंड खादाडपणा, अवाढव्य शरीर, वजन आणि केसगळती. शरीराने बर्‍यापैकी अवाढव्य असल्याने डॉक्टर जवळ नसेल आणि स्वतःची गाडी नसेल तर फार कमी रिक्षावले, ह्यांना न्यायला तयार होतात. आधी ह्यांना जेवायला घालून मग जेवायला बसतात तर थोडी शांत असतात, पण जर तुम्ही आधी खायला बसलात तर तुमच्या ताटात तोंड घालायचा नक्कीच प्रयत्न करतील. तशी ही जात बर्‍यापैकी आळशी.लहानपणी जी काय मस्ती करतील तीच.पण साधारणपणे १-२ वर्षांची झाली की, आपण बरे आणि आपले घर बरे, ह्याच भुमिकेत शिरतात.ह्यांना शिकवायला जास्त त्रास पडत नाही.बाहेर फिरायला काढले की आमच्या लॅबूला तर नंतर-नंतर पट्टा पण लावत न्हवतो. आता इथेच थांबतो.पुढे भेटू या प्रतिसादात. पुढच्या भागात आपण बीगल विषयी माहिती घेवू या.

वाचने 116310
प्रतिक्रिया 170

प्रतिक्रिया

In reply to by पद्मावति

कसलं अल्टीमेट साला इथे मात्र राग येतो. ती ऐकतात म्हणुन काहीही. हेच जर का उलटं केलं तर म्हणजे त्यांनी या माणासाच्या गळ्यात पट्टा बांधुन त्याच्या समोर जिल्बीचे ताट ठेवायचे आणि लाळ टपकली तरी तोंड लाव असे सांगायचेच नाही. वदनी कवळं तर हाईटच आहे काय तरी करायला लावतात.

In reply to by प्रमोद देर्देकर

पाळीव प्राण्याला ह्या अशा मुलभूत गोष्टी शिकवणे भाग आहे. तुमच्याकडे पाहूणे आले असतांना कुत्र्यांनीच कशाला, आपल्या दीडवर्षाच्या मुलाने त्या पाहुण्याच्या ताटात तोंड घातले किंवा पटकन त्यांना एखादी चपराक दिली, तरी आपल्याला खजील व्हायला होते. आपण आपल्या मुलांना जशा शी-शू-जेवतांना न सांडणे-पाहूणे आल्यावर नमस्कार करणे अशी गोष्टी शिकवतो, तसेच हे आहे. काही काही पालक जसे आपल्या २ वर्षाच्या मुलाला लुंगी डान्स करायला लावतात, तसेच काही काही श्र्वान मालक (श्र्वान पालक नाही, श्र्वान पालक ह्या अशा वेड्या-वाकड्या गोष्टी करत नाही.) आपापल्या कुत्र्यां कडून अशा गोष्टी करून घेतो.

ब्रायन ग्राफीन हा लैब्रेडॉर आहे,आणि स्नूपी बीगल. गोल्डन रिट्रीवर ह्या देखण्या जमातीविषयी अजून वाचायला आवडेल.

अत्यंत वाईट अनुभव दिलेत या प्राण्याने . जिवंत असताना नाही .. मरताना . गेल्या जन्मीचं कर्ज असल्या सारखं वर्ष भर सगळे लाड करवून घेतले. मग कोणा हराम्याने विष दिलं . साधा गावठी कुत्रा.. पण शेवटी तो कुत्राच .. लळा लावतोच. कुठल्या जातीचा आहे याने काही फरक पडत नाही . असो . पुन्हा कधी तरी एखादा दणकट जर्मन शेफर्ड किंवा लॅब्रेडॉर सांभाळायची इच्छा आहे (पाळायची म्हणणार नाही . कारण मग एक गुलामीचा वास येतो त्याला ) .

In reply to by अद्द्या

अद्द्या कधी फ्रेंच मास्टीफ सांभाळावे वाटले तर सांग. चिपवाली फिमेल २०१५ शो विनर आहे. तिचे एक कुलदिपक नाममात्र किमतीत देईन. (ते फक्त अस्सल ऑल्डमाँक वाल्यालाच द्यायचेय.)

In reply to by अभ्या..

फ्रेंच मास्टिफ अन नेपोलियन मास्टिफ वेगवेगळे असतात का? नेपोलियन मास्टिफ म्हणजे बहुतेक ते हैरी पॉटर मधील हैग्रिड चे अंगावर वळ्या वळ्या असणारे भू भू असते "fang"

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

हा. गुगल्या सर्च हा. FM हे फ्रेन्च मास्टीफ NM हे नेपोलियन मास्टीफ. एकच तमन्ना आता. कारवानी. उस्मानाबादला हाय एका मित्राकडे.

In reply to by अभ्या..

गोंदवल्याला एका मित्राचा चुलता राहतो त्याच्याकडे अस्सल कारवानी कुत्री होती डॉली लैच भारी जात ! लांब तोंड अन शेलाटे अंग! रानात पाखरू बसु देणार नाही! जमल्यास एकदा रामपुर हाउंड सर्च कर भावा

साली कुत्री आणि मांजरं हरामखोर असतात.ल़ळा लावतात आणि एक दिवस फटकन मरतात ॓_॓!!!!

सीएम्सी मध्ये असताना रात्री सेकंद शिफ़्ट मध्ये होतो तेव्हापासून दुष्मनी आहे या जनावराशी. पाळीव असेल तर उगाच अंगालगत येत राहते आणि त्याचे घाणेरडे केस आपल्या अंगाला चिकटतात. शिवाय श्वान प्रेमी अहो काही करत नाही हो तो म्हणून त्याला आवरण्याऐवजी कौतुक करत राहतात. सकाळी धावायला जावे तर यांचे मलमूत्र विसर्जन मालकाच्या देखत रस्त्यावर चालू असते. एक कहर मालक तर 'चल मोंटी, कर बघू श्श्श्श्श्श्श्ह्श्श्स्श' करायचा. शिवाय त्यांचे ते विष्ठ खाणे, कचरा पसरून ठेवणे, दुचाकिस्वारांच्या अपघातास कारण होणे, चावल्यावर इंजेक्शन घ्यावे लागणे आणि जाहीर संभोग किळस आणतात.

च्यायला जाहिर संभोग करणाऱ्या प्राण्यात काय कुत्रीच आहेत होय फ़क्त ! काहीही राव! वाड़ीवस्तीला लहानपण गेले आमचे, तिथे तर कोंबड्या कुत्री म्हशी गाई मांजरी सगळ्यांचे लाग पाहुन आहोत! आम्ही तर मग जुमानजी मधल्या त्या मिशाळ इंग्रज शिकार्या सारखे डबल बोर घेऊन बाहेर पडायला पाहिजे शिकारीला!! कसंय न मालक "Nature is naked man makes it NUDE" हे वाक्य पोचले अन पचले तर विचार करा थोडा त्यावर! बाकी कारणे ग्राह्य धरली जाऊ शकतात कुत्री द्वेषाला तुमच्या बाकी हे संभोग वाले तर काहीतरीच आहे बळंच

काही फेमस उदाहरणे पण द्या जमल्यास. उदा. जन्जीर कोणत्या ब्रीडचा होता ? द मास्क मधील मायलो .....

In reply to by टिनटिन

जंजीर लैब्राडोर जातीचा कुत्रा होता, ही जात स्निफर (हुंगुन वास काढणार) म्हणुन ओळखली जाते. जमिनिखाली ८ फुटापर्यन्त ही जात अमली पदार्थ, आरडीएक्स, स्फोटक् शोधु शकते(नाकाने). पोलिस खात्यात पहल्यान्दा डोबेरमन ही जात स्निफर डॉग म्हणुन वापरली जायची पण ही जात वन मैन डॉग् म्हणुन ओळखली जाते त्यामुळे व्हायचे काय की त्याचा ट्रेनर बदलला की हे डोबेरमन थोड़े सैरभिर व्हायचे. लैबचे तसे नाही, ते लवकर कुणाबरोबरहि जुळवून घेतात. डोबेरमन, जर्मन शेफर्ड(अल्शेशियन),रोटवीलर , ग्रेट डेन , हे गार्ड डॉग म्हणून ओळखले जातात. गोल्डन रिट्रीवर ही जात शिकारिसाठी वापरली जायची. जेव्हा शिकारी बंदुकिने प्राणी जख्मी करायचा तेव्हा हे कुत्रे त्याचा माग काढत ती शिकार तोंडात अलगद पकडून मालकाला आणून द्यायचा. (जोगळेकर वाचताय ना?)

In reply to by भंकस बाबा

कुत्र्याची किळस वाटू नये अशी जबरदस्ती आहे का ? शिवाय अलम दुनिया शिकारी करत फिरत असते हा समज काढून टाका. - कुत्र्यांचा शिकारी

In reply to by अप्पा जोगळेकर

अजिबात नाही ! किळस वाटू शकते त्यात कोणाची कोणाला कश्यासाठी जबरदस्ती असणार फ़क्त कारणे पटण्यालायक असायला हवी! ती पण तुम्ही स्वतःच दिली आहेत! अन ती अतर्क्य आहेत असे नाही तर त्यातले एक कैच्याकै आहे इतकेच नोंदवले!बाकी तुम्हीच आधीच्या पोस्ट पासुन कुत्र्यांचा कर्दनकाळ अन काय काय स्वाक्षरी केल्यात म्हणुन शिकारीचा रेफेरेंस! तुम्हाला करायचे ते करा पाखरं हुला वा कुत्री मारा आमचे काय जाते!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

दादा, (जोगळेकर वाचताय ना?) हे काय आहे ? शिवाय त्या दुसर्या ताई म्हणतात 'तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कडेच ठेवा' . हे काय आहे ? असो. रजा घेतो.

In reply to by अप्पा जोगळेकर

आल्प्स पर्वतरांगात वाट चुकलेल्या गीर्यारोहकाना वाचवन्यासाठी 'सेंट बर्नाड'ही जात वापरली जाते. त्याला जेंटल जायंट देखिल म्हणतात. हां कुत्रा दिसायला आड़दांड असला तरी स्वभावाने अत्यंत मवाळ असतो. बर्फात फसलेल्या गीर्यारोहकाना हां मदत येइपर्यन्त हां साथ देतो. जिथे पुण्यात आठ डिग्री वर तापमान गेले की गारठायला होते तिथे हां उणे तापमानात अपघातग्रस्तांच्या आजुबाजूला बसतो.

In reply to by भंकस बाबा

हा म्हणजे तोच भक्कम कुत्रा का ज्याच्या गळ्यात एक छोटे रम किंवा ब्रांडी चे पिंप अड़कवलेले असते , त्याला एक तोटी वगैरे जमानिमा असतो, अडकलेल्या गिर्यारोहक लोकांना बर्फात हा कुत्रा हुड़कुन काढतो मग त्यांनी ती तोटी सुरु करून २ घोट ब्रांडी/रम पिऊन शरीर गरम केले की त्यांना वाट दाखवत खाली आणतो म्हणे हा कुत्रा (किंवा आणत असे)

In reply to by भंकस बाबा

जंजीर लैब्राडोर जातीचा कुत्रा होता, ही जात स्निफर (हुंगुन वास काढणार) म्हणुन ओळखली जाते.
मार्च-एप्रिल १९९३ मध्ये मुंबईत राहिलेल्या प्रत्येक मुंबईकराने खरे तर जंजीरविषयी प्रचंड कृतज्ञ राहिले पाहिजे. १२ मार्चच्या स्फोटात ३०० किलो आर.डी.एक्स वापरले गेले होते आणि त्यात २५७ लोक मारले गेले आणि ९०० जखमी झाले.त्यानंतर १५-२० दिवसात जंजीरने मुंब्रा आणि नागला बंदर येथून त्याच्या जवळपास दहापट आर.डी.एक्स शोधून काढण्यात मदत केली होती.किती हजारांचे प्राण वाचविण्यात त्याचा सहभाग होता कुणास ठाऊक.जंजीर हा माणूस असता तर एक काय तर दहा भारतरत्नेही त्याच्यावर ओवाळली तरी कमीच पडली असती. त्या tumultous दिवसांमध्ये मी ठाण्यात राहायला होतो आणि मुंबईकरांना एका प्रकारची अनामिक भिती त्या काळात वाटत होती (बॉम्बफोटांची अजून सवय झाली नव्हती मुंबईला) ती मी पण अगदी जवळून बघितली होती.नोव्हेंबर २००० मध्ये जंजीरचे निधन झाल्याची बातमी आल्यावर फार वाईट वाटले होते.त्याच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. कुत्र्यांचा तिरस्कार करणार्‍यांना नाही कळायचे हे सगळे!!

In reply to by गॅरी ट्रुमन

जंजीरला याची देहि ४ इंचावरून बघितले होते :) दिल्लीला जाताना राजधानी एक्सप्रेस्स मधून घेउन गेलेले आणि आम्च्या डब्ब्याच्या शेजारच्याच डब्ब्यात होता तो

लहानपणी एक गावठी कुत्रे पाळले होते. भाड्याच्या घराबाहेर मोठी जागा होती. तिथेच असायचा नेहमी. काही वर्षाने गेला चटका लावुन .. :( परत एक कुत्रा पाळायची ईच्छा आहे. बहुतेक उतारवयातच मिळेल वेळ असं दिसतंय!

मी घरी प्राणि पाळायचा विचार करत नसलो तरी त्यांचा द्वेष सुद्धा करत नाही.

च्यामारी भूभूंचा विषय चालू आहे आणि अजून कोणालाच 'मार्ली अँड मी' बद्दल लिहावंसं वाटलं नाही???? लाहौलविलाकुव्वत!! https://en.wikipedia.org/wiki/Marley_%26_Me_%28film%29 मी घानाच्या विमानतळावर या चित्रपटाचा काही भाग पाहिला आणि वेडा झालो. नावही कळलं नव्हतं. मग नेटाने नेटावर शोधून काढून टोरेंटवरून डाउनलोड केला. प्रचंड रडलो शेवटाला. आवर्जून बघाच. कुत्र्याचे जे काही अनुभव येऊ शकतात ते सगळे यात आहेत. अत्यंत गोड भूभू! लॅबीच तो शेवटी!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

मस्त.. आणि 'डॉबरमन्स गँग' ला विसरलात का मंडळी? स्वाती

In reply to by भंकस बाबा

आम्ही पॉल वॉकर ला फ़ास्ट एंड फ्यूरियस पेक्षा ८ बिलो साठी जास्त लक्षात ठेवतो :)

In reply to by भंकस बाबा

तसाच, डॉबरमन गँग, पण बरा होता. बॉलीवूड मध्ये असले सिनेमे बनत नाहीत. इथे कुत्र्यांना पण प्रेमपत्रे वगैरे पाठवायला लावतील. आय.एस.जोहरने, फाइव्ह रायफल्स नावाच्या हिंदी सिनेमात माकडे आणि कुत्रा ह्यांना उत्तम भुमिका दिल्या होत्या.

In reply to by मुक्त विहारि

मी टॉम एण्ड हुचेस बघायला रात्रिचा बसलो होतो. हातात खिरीचा वाडगा घेऊन खीर ओरपत सिनेमा पहात होतो. त्यात कुत्रा आहे हे मला माहितच नव्हते व् टॉम हैंक्स काय चीज आहे ते पण! त्यात अचानक झालेल्या कुत्र्याच्या इंट्रीवर दचकुन माझ्या हातून खीर अंगावर सांडलि होती. काय भयानक एंट्री होती राव! असा आडदांड भीतिदायक कुत्रा असू शकतो हेच खरे वाटत नव्हते. वर एक चूक झाली आहे तो कुत्रा फ्रेंच मश्चिफ आहे नेपोलियन नाही.

In reply to by भंकस बाबा

एक नंबर... लय येडा मानूस.... जबरदस्त अ‍ॅक्टिंग रेंज.... स्वगत : मुवि, धागा कुत्र्यांबाबत आहे.(हॉलीवूड पटांचा उल्लेख झाला तरी, आमचा कळफलक आपोआप टाइप करायला लागतो.)

In reply to by मुक्त विहारि

आहे ना.. "हॅलो" म्हणून. गाणं पण छान आहे त्यातलं.. मेरा गाना है बहाना, हॅलो हॅलो क तराना.. "

In reply to by भंकस बाबा

फ्रेंच मश्चिफला घेऊन सिनेमा होता तो, 'turner and hooch' असे नाव होते त्याचे,१९८९ चा सिनेमा आहे हा. वीस वर्षाचा काळ झाल्यामुळे माझी स्मरणशक्ति थोड़ी क्षीण झाली होती.

यंदाच्या २६ जानेवारीच्या परेडमध्ये डॉग स्क्वाडचासुद्धा सहभाग होता. काय मस्त तुरुतुरु चालत होती सगळी कुत्री. अगदी त्यांच्या ह्यांडलर्ससारखीच मार्चिंगच्या तालात.

आपल्याला लयं आवड हाय या प्राण्याची, पण घरच्या लोक्सनी कधी पाळु दिले नाय ! परंतु अश्या एका कुत्र्या बद्धल आठवणी हायेत ज्याच्या जाण्यामुळे साला आपल्याला लयं तर्रास्स्स झाला. कधी फुरसत मंदी वेळ भेटलाच तर लिहीन त्याच्या बद्धल. बाकी रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या आणि रात्रीच्या वेळी नरड्यातले सगळे बळ काढुन भुंकणार्‍या कुत्तरड्यां बद्धल आपल्याला लयं म्हणजे लयं राग हाय च्यामारी ! साला ४ कलाक शांत झोपायचे पण वांदे हाय या शहरामंदी ! सामान्य माणसाचे साला जगणे म्हणजे नरकच हाय आणि झोपणे म्हणजे यातना, आय टेल यू.

आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008


In reply to by मदनबाण

बाकी रस्त्यावर मोकाट फिरणार्‍या आणि रात्रीच्या वेळी नरड्यातले सगळे बळ काढुन भुंकणार्‍या कुत्तरड्यां बद्धल आपल्याला लयं म्हणजे लयं राग हाय च्यामारी
मला अगदी असाच राग गणेशोत्सव, नवरात्र किंवा अमक्यातमक्याच्या जयंतीच्या दिवशी (मशीदीतली बांग ऐकायचा प्रसंग माझ्यावर फारसा आलेला नाही त्यामुळे त्याविषयी माहित नाही) लाऊडस्पीकरवर अहोरात्र कोकलणार्‍यांविषयी वाटतो.कुत्री बिचारी न समजून माणसांना त्रास देतात.पण माणसे मात्र समजून उमजून स्वतःच्या धार्मिक भावना जपणे या गोंडस आवरणाखाली इतर माणसांना त्रास देत असतात.

In reply to by गॅरी ट्रुमन

...या गोंडस आवरणाखाली इतर माणसांना त्रास देत असतात." +१२३४५६७८९० आवाज करणारी जनावरे, मग ती (मग ती भटकी असोत की पाळीव), कारणाशिवाय आरडा-ओरडा करत नाहीत.

In reply to by मुक्त विहारि

लाऊडस्पीकरवर अहोरात्र कोकलणार्‍यांविषयी वाटतो.कुत्री बिचारी न समजून माणसांना त्रास देतात.पण माणसे मात्र समजून उमजून स्वतःच्या धार्मिक भावना जपणे या गोंडस आवरणाखाली इतर माणसांना त्रास देत असतात. सहमत आहे. दणादणा संगीत / भोंगा वाजवायला बंदी असायला हवी. आवाजाची मर्यादा असायला हवी. मध्यंतरी कुठल्या तरी ठिकाणी डॉब्लीच्या आवाजाने एक व्यक्ती मरण पावली होती असं काहीस वाचल्याचे स्मरत. :( कुत्रे नुसते भुंकतही नाहीत, तर चावतात देखील... अधुन मधुन मिडिया मधे या बद्धल बातम्या देखील येत असतात परिस्थीतीत फरक पडत नाही. रात्रभर कुत्र्यांच्या आवाजाची कल्पनाच किती त्रासदायक आहे,तर अनुभव त्याहुन त्रासदायक !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- FIIs pull out $2 bn this year, highest since 2008

In reply to by मदनबाण

भटक्या कुत्र्याच्या त्रासाबद्दल तर विचारायलाच नको. माझ्या आईच्या घरी जाताना रात्री १० च्या आत जावे लागते. जर्रा सुनसान झाले की कुत्र्यांचा जो उच्छाद चालू होतो तो रात्रभर असतो. कुठलाही टूव्हीलरवाला त्यांच्या तावडीतून निसटू शकत नाही. एखादी कार किंवा मोठी गाडी असेल तरच त्याची सुटका. (सध्या नेपाळहून निर्बीजीकरण करणारे पथक मागवलेय मनपाने. काय करणारेत कुणास ठऊक) हे भटक्या कुत्र्याचे तर सोडून द्या. एक असाच मस्तीवाला शेजारी रोज रात्री त्याचे चिल्लर पमेरिअन घेऊन बसायचा. गाडी आली की पट्टा सोडायचा. ते बिचारे जीवाच्या आकांताने गाडीवर यायचे. गाडीवाला गांगरुन धडपडला की हे मालक महाशय खिदळायला मोकळे. दोन तीनदा बघितले. मालकाला सांगून पाह्यले. ऐकेना. एकदा स्कूटर होती माझ्याकडे. घातली बिनधास्त ताणा काढून. मॅटर फिनीश. आधी हॉटेलात असताना भरपूर नाद केला श्वानवंशीयांचा. अगदी प्रोफेशनली. रॉट, पग, डेन, शेफर्ड. घेतले, वाढविले, विकले, डॉगशो केले. सध्या काहीही कौतुक राहिले नाही.

In reply to by अभ्या..

"एक असाच मस्तीवाला शेजारी रोज रात्री त्याचे चिल्लर पमेरिअन घेऊन बसायचा. गाडी आली की पट्टा सोडायचा. ते बिचारे जीवाच्या आकांताने गाडीवर यायचे. गाडीवाला गांगरुन धडपडला की हे मालक महाशय खिदळायला मोकळे." ही अशी माणसे "मानसिक रोगी" ह्या कॅटॅगरीतच मोडायला हवीत. ह्या अशा व्यक्तींमुळेच, श्र्वानांचे संगोपन करणार्‍या श्र्वानपालकांकडे आणि मुख्यतः श्र्वानांकडे बघायचा, बर्‍याच लोकांचा दृष्टीकोन वाईट होतो. "भटक्या कुत्र्याच्या त्रासाबद्दल तर विचारायलाच नको. माझ्या आईच्या घरी जाताना रात्री १० च्या आत जावे लागते. जर्रा सुनसान झाले की कुत्र्यांचा जो उच्छाद चालू होतो तो रात्रभर असतो. कुठलाही टूव्हीलरवाला त्यांच्या तावडीतून निसटू शकत नाही." भटक्या कुत्र्यांचा त्रास तर आम्हाला पण होतो.जावू दे.

एखादा प्राणी पाळणे, त्याला आपल्या आज्ञा पाळायला लावणे हे थोडे क्रुर नाही वाटत? म्हणायला लोक म्हणतात की आमच्या मुलासारखाच आहे. पण मग तुम्हीच त्याला पट्टा लावता ना? घाण करतो म्हणुन घराबाहेर काढता ना? तुम्हाला गावाला जायचे असेल तेव्हा त्याला सोडुन जाता ना? (कदाचित दुसरीकडे सोय लावुन). कुत्रा पाळुन त्याच्याकडुन गुलामी करुन घेता ना? वर काही व्हिडीयो दिसत आहेत. ते कुत्रे म्हणजे चक्क लाचारीचे उदाहरण आहे. गुलाम्गिरी. त्यांना स्वातंत्र्य उपभोगायचे स्वातंत्र्यच नाही. मोठ्या बंगल्यांमध्ये कुत्रांसाठी ती छोटी खुराडी बघितली की दया येते त्या गरीब प्राण्याची . आम्हाला कुत्र्याचा फार लळा असे म्हणुन राग आल्यावर कुत्र्या च्या पेकाटात लाथ घालणारी माणसे बघितली की तिडीक जाते डोक्यात. तुमच्या मुलाच्या पोटात लाथ माराल का अशी? त्यांचे नैसर्गिक खाद्य सोडुन तुम्ही त्याला दूध पोळी खायला लावता. बरोबर आहे का ते? कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालुन तुमच्या सोयीने तुम्ही त्याला फिरवुन आणणार, एरवी तो घरात बंद, बर्‍याच वेळा तर त्याच्या खुराड्यात. कुत्रा पाळणारे लोक कु त्र्यांवर सर्वात जास्त अत्याचार करतात असे स्पष्ट मत आहे.

In reply to by मृत्युन्जय

मार्गीला घरी आणेपर्यंत हेच विचार होते माझे. कुत्रे, पक्षी व इतर प्राण्यांवर अत्याचार करणारे मालक पाहिलेत. मलातर ते पिंजर्‍यातले पक्षी, पट्ट्याला बांधलेले प्राणी पाहिले की मालकांशी भांडण होऊ देत पण सोडूनच देऊ असं भयंकर वाटत राहतं. शोबाजीसाठी प्राणी आणतात, अंगापेक्षा जास्त झालं की टाळंटाळ करतात. हौस म्हणून करणार्‍यांचा उत्साह मावळायला लागतो जेव्हा त्यांना कळतं की 'ही एक राउंड-द-क्लॉक जबाबदारी आहे, कुत्र्याला घेऊन मिरवणे वैगरे हा त्यातला अगदी छोट्टुसा भाग आहे'. तेव्हा प्राण्यांना गुलामासारखं वागवायला सुरुवात होते. अतिशय वाईट विचारसरणी आहे ही. मला कधीही पटली नाही. म्हणून आम्ही प्राणी घरी आणण्याआधी खूप विचार केला. मार्गीसाठी रात्री-बेरात्री उठावं लागतं. तिला खेळावसं वाटलं तेव्हा हातातलं काम टाकून जावं लागतं. अनेक गोष्टी आहेत. अंत पाहणार्‍या असतात. पण आधीच्या दोन मुलांसाठी केलं, आता तिसर्‍यासाठी असं विचार केलाय म्हणून जाच होत नाही. सगळेच असे नसतात हेही आजूबाजुला बघतोय. मला वाटतं, लोक जेन्युइन पालकांकडे (काय सही है, मस्त वाटतो ना!) बघून प्राणी आणतात. सत्य कळले की मग सोडूनही देता येत नाही, सांगताही येत नाही अशी अवस्था होते. बळंबळंच 'आम्ही प्राणीप्रेमी' चं उसनं अवसान आणतात. खरे प्राणी पाळू शकणारे दुर्मिळ असतात. तसंच कोणत्या माणसास कोणता प्राणी सोबती म्हणून फिट होईल हे बघुन घ्यायचं असतं, तेच बहुतेक वेळा होतं नाही. मग छोट्या फ्लॅटमधे लॅब, डॉबरमॅन, ग्रेट डेन सारखी कुत्री पाळायला जातात.

In reply to by मृत्युन्जय

त्यांचे नैसर्गिक खाद्य सोडुन तुम्ही त्याला दूध पोळी खायला लावता. बरोबर आहे का ते? >> ह्या मुद्द्याबद्दल मलाही कुतुहल आहे. इतक्यात वाचल्याप्रमाणे अनेक शतके माणसासोबत राहुन कुत्र्याची पचनशक्तीने माणसाच्या खाद्यपदार्थासोबत विनासायास जुळवून घेतले आहे. कदाचित त्यामुळेच रस्त्यावरची कुत्री शिकार न करता उकिरडे हुंकत, शिळे अन्न धुंडाळत फिरत असावीत. पण याबद्दल अधिक माहिती मिळाल्यास उत्तम. घर शाकाहारी म्हणून कुत्र्याला शुद्ध शाकाहारी ठेवणारे शुद्ध मूर्ख वाटतात. (आय अ‍ॅम सॉरी इफ एनिवन हिअर फाइन्ड्स धिस ऑफेन्सिव) कुत्र्याच्या गळ्यात पट्टा घालुन तुमच्या सोयीने तुम्ही त्याला फिरवुन आणणार, एरवी तो घरात बंद, बर्‍याच वेळा तर त्याच्या खुराड्यात. हे तर आपल्याला आज्याबात पटत नाय. घरात बंद करुन ठेवणे, चोविस तास साखळीत, हा खरंच अत्याचार आहे.

In reply to by संदीप डांगे

घरात बंद करुन ठेवणे, चोविस तास साखळीत, हा खरंच अत्याचार आहे
+१ आमचा टफी घरात अगदी मोकळा असतो. फक्त बाहेर जाताना त्याला पट्टा बांधावा लागतो - त्याच्यासाठी नव्हे तर, इतरांना त्याच्यापासून सुरक्षित वाटावे म्हणून!!!

In reply to by सुनील

त्याच्यासाठी नव्हे तर, इतरांना त्याच्यापासून सुरक्षित वाटावे म्हणून!!! आणि इतर भटकी कुत्री त्याला चावू नयेत म्हणून. घरात कुत्र्यांना ९०% वेळ पुर्ण मोकळे सोडायलाच हवे. कुत्र्याला घरात बांधलेला मालक, हा कुत्र्याला गुलाम म्हणूनच वापरतो. श्र्वान पालक जर कुत्र्याला सवंगडी म्हणून घरात ठेवत असेल आणि कुत्र्याला नक्की काय हवे आहे, हे समजून घेत असेल तर, तो कधीच कुत्र्याला बांधून ठेवणार नाही.

In reply to by मृत्युन्जय

या सगळ्या प्रतिसादात कुत्र्याच्या ऐवजी "कॉर्पोरेटमध्ये काम करणारे कर्मचारी" आणि मालकाऐवजी "टॉप मॅनेजमेन्ट" किंवा "बॉस" हे शब्द घातले तरी तो प्रतिसाद फार चुकीचा ठरणार नाही ना? ह.घ्या.हे.वे.सां.न.ला

In reply to by मृत्युन्जय

एखादा प्राणी पाळणे, त्याला आपल्या आज्ञा पाळायला लावणे हे थोडे क्रुर नाही वाटत? माझ्या मते तरी नाही.आमच्या सासूबाईंना अजिबात ऐकायला येत नाही.बेल वाजली तरी, त्या दार उघडू शकत नाहीत. आमची २ही कुत्री बेल वाजली की त्यांना सावध करतात. कुत्र्याला अनावश्यक कसरती करायला लावणे हे सर्कशी पुरतेच ठेवावे, असे माझे पण मत आहे.खरा श्र्वान प्रेमी असल्या धेडगुजरी आज्ञा कुत्र्यांना शिकवत देखील नाही. ======================== म्हणायला लोक म्हणतात की आमच्या मुलासारखाच आहे. पण मग तुम्हीच त्याला पट्टा लावता ना? आमची आधीची कुत्री, पट्ट्याशिवायच रस्त्यावर फिरायची.पण लोकच तिचे शरीर बघून घाबरायची.एका रिक्षावाल्याने तर ती कडेकडेने फिरत असतांना देखील तिला मारायला सळी काढली. (डोंबोलीतील रिक्षावाले हे वेगळ्या ग्रहावरून आलेले आहेत.असा मला दाट संशय आहे.सौजन्यता तर त्यांना मानवजाती बद्दल पण नाही.) त्या घटनेपासून, आम्ही तिला पट्टा लावायला लागलो. ===================================== घाण करतो म्हणुन घराबाहेर काढता ना? अजिबात नाही.आमची २ही कुत्री घरातच बाथरूम मध्ये शी-शू करतात.त्यांना तशीच सवय लावली आहे, कारण पावसाळ्यात त्यांना फिरायला जमेलच असे नाही.एकदा लागलेली सवय कुत्रीच कशाला माणसे (की ज्याचा मेंदू ह्या पृथ्वीतलावर सगळ्या सजीवात प्रगत समजला जातो) पण सहजासह्जी सोडत नाहीत. तुम्हाला गावाला जायचे असेल तेव्हा त्याला सोडुन जाता ना? (कदाचित दुसरीकडे सोय लावुन). दादा अशी सोय तर आपण आपल्या घरातील व्यक्तींबाबत पण करतो ना? मुलांना पाळण्याघरात ठेवणे, आई-वडीलांना वृद्धाश्रमात ठेवणे, अपंग व्यक्तीला सोबत बघून देणे इ. ================================ कुत्रा पाळुन त्याच्याकडुन गुलामी करुन घेता ना? वर काही व्हिडीयो दिसत आहेत. ते कुत्रे म्हणजे चक्क लाचारीचे उदाहरण आहे. गुलाम्गिरी. त्यांना स्वातंत्र्य उपभोगायचे स्वातंत्र्यच नाही. हे १००% मान्य.ह्या जगातील बरेच प्राणी अद्याप स्वतंत्र आहेत.गेंडा, जिराफ, झेब्रा इ. प्राणी अद्याप तरी पाळीव नाही आहेत. पण जे प्राणी माणसाला उपयुक्त वाटतात त्यांना सवय लावून माणसाने पाळीव केलेच आहे.उदा. घोडा, गाय,बैल,गाढव,हत्ती आणि कुत्रा. ================================================ मोठ्या बंगल्यांमध्ये कुत्रांसाठी ती छोटी खुराडी बघितली की दया येते त्या गरीब प्राण्याची. १००% मान्य. कुत्रा घरात मोकळाच फिरायला हवा.त्याला आपले घर परके वाटता नये.आमची २ही कुत्री घरात मोकळीच असतात.पाहुणे आले की मात्र बांधून ठेवतो. ======================================== आम्हाला कुत्र्याचा फार लळा असे म्हणुन राग आल्यावर कुत्र्या च्या पेकाटात लाथ घालणारी माणसे बघितली की तिडीक जाते डोक्यात. तुमच्या मुलाच्या पोटात लाथ माराल का अशी? खरा श्र्वान पालक आणि मुलांचा पालक देखील, ह्या गोष्टी करत नाही. ================================================ त्यांचे नैसर्गिक खाद्य सोडुन तुम्ही त्याला दूध पोळी खायला लावता. बरोबर आहे का ते? माझी २ही कुत्री आम्ही जे काही खावू ते खात होती.त्यांना आमचेच जेवण हवे असायचे.अर्थात अधून मधून मुद्दाम त्यांच्यासाठी मांसाहार आणावा लागतोच. मांसाहार पण उकडूनच देतो. ==================================== कुत्रा पाळणारे लोक कुत्र्यांवर सर्वात जास्त अत्याचार करतात असे स्पष्ट मत आहे. वरील वाक्यात थोडा बदल करायलाच पाहिजे. कुत्रा पाळणार्‍यांपैकी (काही) लोक कुत्र्यांवर सर्वात जास्त अत्याचार करतात असे माझेही स्पष्ट मत आहे. ================================================ प्रिय मृत्युंजय, वरील प्रतिसादामुळे तुझ्या बर्‍याच शंकांचे निरसन झाले असावे.तरी पण तुला अजूनही कुत्र्यांविषयी किंवा कुत्र्यांच्या पालकांविषयी काही शंका असतील तर जरूर विचार. मी यथा शक्ती त्या शंकांचे निरसन करायचा जरूर प्रयत्न करीन.

mogali हा आमचा गोल्डन रिट्रिवर "मोगली". १३ महिन्याचा हा कुत्रा अतिशय गोड व प्रेमळ आहे.

mogali गोल्डन रिट्रीवर कुत्रा आम्ही पाळला तेंव्हा माझी अजिबात कुत्र्याबरोबर राहण्याची मानसिक तयारी नव्हती. पण आमचा मोगली आता माझा प्रिय मित्र आहे. अतिशय ट्रेनेबल व हुशार आहे. भुंकणे अजिबातच नाही आणि सर्वांशी मैत्री प्रिय आहे.

In reply to by ज्योत्स्ना

अतिशय उत्तम जात. विशेषतः पहिल्यांदाच कुत्र्यांचे संगोपन करत असाल तर.. दोन्ही जाती मस्त देखण्या. बादवे, मोगली एकदम चिकणा दिसतोय.

इमानदार कुत्रे बघितले की "चल रं वाघ्या रडू नको , पाया कुणाच्या पडू नको" हे गाणे नेहमी आठवते .

मला पण कुत्रा मांजर पाळायची भारी हौस आईने मांजर पाळायला परवानगी दिली. परंतु कुत्रा पाळायला नाही.शेवटी सोसायटीतले सगळे कुत्र हे आपलेच आहेत असे समजून त्यांच्यावारच जीव लावला. (आमच्या एरियात असा एकही कुत्रा नाही जो मला ओळखत नाही.) प्रसंगी आख्या सोसायटीशी पंगा घेऊन राडा केला.एके दिवशी चोर घुसले आणि वाच्मान झोपला होता, त्याच कुत्र्यांनी भुंकून सगळ्यांना जागे केले, नंतर जेव्हा पोलीस आले म्हणाले, कुत्र चांगल आहे तुमच, ते वाच्मान एवढा पगार घेत नाही आणि इमानदार पण आहे. २ वेळा कोकस पानेल आणि बॉक्सर पाळायचा अयशस्वी प्रयत्न केला.दोन्ही वेळेला घरातून कुत्रासकट बाहेर हाकलून दिले.तेही बोर्डाच्या परीक्षा सुरु असताना. मी घरी आलो के आई वडील वरच गुरगुर करून भूकायचा. ते सांगायचे कि तू नसताना हे मला हाड्तुड करतात.मला त्रास देतात ,किती हुशार असतात साले हे. सध्या लग्न झाल्यापासून बाजूलाच पण स्वतंत्र घरात राहत असल्याने कुत्रा पाळायची इच्छा पुन्हा जोर धरू लागली आहे.पण आता तो आल्यावर पुन्हा त्याचे आधीसारखे हाल नको म्हणून बायकोच्या मनावर " मी कुत्रा पालनारच" असे बिंबवायला सुरुवात केली आहे. आईने पुन्हा खबरदार सांगितले आहे. आधी बायको देखील मला कुत्र्यासकट घरातून बाहेर काढण्याच्या गोष्टी करत होती. आता ती जरा शांत झाली आहे. तिच्या मनाची देखील कुत्रा पाळण्याची पुरती तयारी झाली कि लगेच आला समजा घरात जोतीप्रसाद. भू भू भू. आणि कुत्रा हे काही खेळणे न्हावे, त्याच्यावर खेळ करून दाखव हे करून दाखव ते करून दाखव अशी बळजबरी करू नये. बाहेर जाताना त्याला याच्या घरी ठेव त्याच्या घरी ठेव असे करू नये, घरातली माणसे आपण सोबत नेतोय न मग यालाही घेऊन जावे. त्याला वाटेल तेव्हा त्याने भून्कावे जोर जोरात भून्कावे , प्रसंगी संशयिताला कडकडून चावावे, ४ लोकांनी त्याला घाबरावे असे माझे वयक्तिक मत आहे.. अवांतर - इन डिफेन्स ऑफ अनिमल्स नावाची एक संस्था मुंबई आणि नवी मुंबईत काम करते, जखमी ,हरवलेले, फ्याशन किंवा स्टेटस म्हणून पाळलेले आणि नंतर रस्त्यावर सोडून दिलेले, अनाथ प्राणी सांभाळण्याचे आणि उपचार करण्याचे काम हि संस्था मोफत करते.असे प्राणी हे लोक दत्तक देतात.