Skip to main content

माहिती हवी -- बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 10/12/2015 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार, काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे. ...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत. ...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत. ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे. ...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे. आणि ही बातमी ऐकल्यावर मला त्याच्यासाठी इतर अपारंपारिक शैक्षणिक संधी शोधणे आवश्यक वाटत आहे. मिपाकरांना विनंती, कृपया बारावी(सायन्स) नंतर (अभियांत्रिकी वगळता) उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या करिअर, व्यावसायिक शिक्षण शाखांविषयी कुणाला माहिती असल्यास द्यावी. (मुलाचा बारावीला A ग्रुप आहे.) तसेच मागे एकदा यासारख्या विषयावर धागा निघाल्याचे आठवते. कुणाकडे त्याची लिंक असल्यास द्यावी.

वाचने 38147
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

स्नेहांकिता ताई, आधी त्याचा ओढा कुठल्या बाजुला आहे ते पहा. माझ्या बहिणीला दहावीला ६५% टक्के मार्क पडले. सर्वांचे मत पडले कि सायन्स तुला झेपणार नाही. पण तिने हट्टाने सायन्सच घेतले. ( गो. जो. रत्नागीरी) १२ वीला ५५% टक्के मार्क पडले. सीइटी वगैरे ला तर विचारयलाच नको. परत तिने हट्टाने BSC ला आडमिशन घेतली. BSC Chemistry with Distinction मध्ये पास झाली. त्यापुर्वीच कॅम्पस इंटर्व्यू मधून फिनोलेक्स रत्नागीरी मध्ये सिलेक्ट झाली. आज तिसर्‍या वर्षी 40k/pm घेते गावातल्या गावात राहुन.

In reply to by पीके

सहमत! फक्त अभियांत्रिकी किंवा वैद्ध्यकिय एवढिच क्षेत्रे आहेत असे नाही.

In reply to by सस्नेह

माझ्या बहिणीचे उदाहरण मला पण अभिमानाने देऊ वाटते. माझी बहिण (सक्खी नाही) सोलापुरातच नॉर्मल १२ वी सायन्स करुन बीएचएस्सी पुण्याचा एस एन डी टी मध्ये केली. विषय एफ एस क्यु सी. म्हण्जे फूड सायन्स अ‍ॅन्ड क्वालिटी कंट्रोल. तिची आई अन्न औशध प्रशासन खात्यात. त्यानंतर एमेस्सी एसपीला. शासनाच्या एका प्रयोग शाळेत लगेच निवड झाली. नंतर ते सोडून तळवलकर मध्ये डायटिस्ट, कोकाकोला अशा पायर्‍या चढत एका मोठ्या कंपनीत विराजमान आहे. सतत चे परदेश दौरे करत असताना सुध्दा तिच्या नवरोबाची अन छोट्या मुलाची खूप साथ मिळते तिला. वेग़ळ्या पधदतीचे शिक्षण घेऊन पण आपला त्यातील रस वाढवून, संधींचा योग्य उपयोग करुन खूप छान करीअर करता येते हे शुअर.

In reply to by अभ्या..

खरंच कौतुकास्पद ! फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल बद्दल नवीनच समजले. पुणे सोडून इतरत्र कुठे आहे का हा कोर्स ?

In reply to by सस्नेह

जिथे होम सायन्स शिकवले जाते तिथे असते. सोलापुरात सिध्देश्वर गर्ल्स कॉलेजला आहे. बहुतेक मुलीच असतात ह्याला. मात्र एसएनडीटीची मजा और असते असे तिचे म्हणने पडले. आताची बीएचएससी ची कथा मला माहीत नाही. चेक करावे.

In reply to by सस्नेह

थेट तसा नाही, पण एन. सी. एलला असेल तर चेक करून सांगतो. सी एस आय आर पण चेकवा. यू डी सी टी ज्याला हल्ली आय सी टी म्हणतात असं दिस्तंय. तिथे बी. टेकचे अनेक पर्याय आहेत त्यात अन्न तन्त्रज्ञान शाखा आहे. आपले मुकेस् भाय अंबानीपण तिथलेच आहेत म्हणे. हल्ली मेरिट बरंच जास्त चाललंय. जळगांवला एक शाखा निघाली होती. अजून आहे का पहावे लागेल.

In reply to by खेडूत

Food Technology specialization हे जबरदस्तच आहे. मुकेसभाय मला वाटतं पाॅलिमर किंवा पेट्रोकेमिकल्स शाखेतले होते. Food Technology साठी B.Sc. in Biotechnology हाही एक चांगला पर्याय आहे.

In reply to by सस्नेह

मि पण १२ वि पास(२०१४) विद्यार्थी आहे मला गतवर्षि व या वर्षी पण शाषकिय आयुर्वेदिक वैद्यकीय कॉलेज ला प्रवेश मिळत होता पण वडिलधरयाची इच्छा आहे की मि mbbs ला जावे पण खुप कष्ट करुण पण माझे mbbs ५ मार्कानि गेले. मला १४३/२०० मार्क होते cet मधे. आपन एक सुद्न्य पालक आहात. मूलांकडुन जास्त अपेक्षा ठेवत नाही.

चांगल्या इंजिनिअरिंग काॅलेजांबद्दल बोललं जातंय.सध्या कोणती काॅलेज चांगली समजली जातात ?(आय आय टी सोडून)

एक काम करा प्लीज तुम्ही जरा बाजुला व्हा तुमच्या मुलाशी बोलु द्या ना जरा सर्वांना तुम्ही टंका वाटल्यास करीयर त्याला करायच आहे त्याच्या जीवनाचा महत्वाचा प्रश्न आहे आणि तो आता आवश्यक तितका प्रौढ आहे. तुमची आईची माया मान्य आहे पण थोड त्याला संवाद साधु द्या तो काय विचार करतो, त्याला स्वतःला काय वाटतं थोड येउ द्या दोन चार काकांशी ओळख झाली या निमीत्ताने बोलला थोडं तर चांगलच आहे ना ? त्याला माहीतीय ना आई इथे मिसळपाव वर असते ते ? मग त्याची थोडी ओळख होऊ द्या तुम्ही थोडं अंतरावरुन मार्गदर्शन करा त्याला पुढे करा तुम्ही थोडं बाजुला व्हा बरं लेट हिम फेस हीज लाइफ प्लीज थोड जास्त बोललो असेल तर सॉरी.

In reply to by मारवा

+१०० बारावीच्या मुलाला काय कळतंय? हा प्रश्न चुकीचा आहे. दहावीत मला डॉक्टर व्हायचे होते हे नक्की होते. माझ्या भावाला इंजिनियर व्हायचे नक्की होते. माझ्या मुलाला सिव्हील इन्जीनियारीन्ग्च करायचे आहे( सिव्हील्च्या दुसर्या वर्षाला आहे). मुलांची आकलनशक्ती आपण समजतो त्यापेक्षा किती तरी जास्त आहे, असते. म्हणून मारवा साहेबांच्या म्हणण्याला बाडीस

In reply to by मारवा

मारवाजी, तो माझ्या समोर बसला आहे, हे सगळं वाचतो आहे आणि सांगतो आहे की मला वेल पेईंग आणि फुल-डे बिझी नसणारा, फॅमिली फ्रेंडस एंजाॅयमेंट करता येण्यासारखा जाॅब हवा असे सगळ्या काका अन मावशांना सांग ! अॅस्ट्राॅनाॅमी, स्पेस रिसर्च यात काम करायला आवडेल असे म्हणतो. आता बोला !

In reply to by सस्नेह

मला वेल पेईंग आणि फुल-डे बिझी नसणारा, फॅमिली फ्रेंडस एंजाॅयमेंट करता येण्यासारखा जाॅब हवा
हैला! माझंही डिट्टो हेच स्वप्न आहे!

In reply to by आदूबाळ

आजकालच्या सगळ्या यंग जनरेशनचं हेच स्वप्नं आहे. तेही फ्रॉम द फस्ट डे अ‍ॅट द फस्ट जॉब!

In reply to by सस्नेह

स्नेहा ताई मग एरोनॉटिक्स मध्ये का जात नाही? एरोनॉटिकल ईंजिनीअरिंग हा एक चांगला पर्याय आहे. फिजिक्स मध्ये गती पण आहे म्हणतेस तर. विशाखापट्टणम , बँगलोर मध्ये या ईंजिनीअरिंग चा पर्याय आहे. दिल्ली, चंदीगढ मध्ये पण आहे.

In reply to by सस्नेह

माझ्या माहितीप्रमाणे एस्त्रोनोमी किंवा स्पेस रिसर्च किंवा अस्ट्रोफिजिक्स या क्षेत्रांमध्ये अभ्यास, संशोधन, मूलभूत तत्वे समजून घेऊन किचकट गणिते सोडविणे वगैरे मोठ्या प्रमाणावर असणार. किंबहुना ही क्षेत्रे अशी आहेत जिथे निरंतर अभ्यास आणि कष्ट असतील. कामाच्या ठराविक वेळा नसतील. आणि अगदी आतून येणारी उर्मी जिथे असते तिथे कामाच्या वेळा सहसा बघितल्या जात नाहीत. शिवाय या क्षेत्रात प्रवेश मिळवणे आणि यशस्वी होणे तसे सोपे नाही. त्यामुळे आवड असली तरी करीअर म्हणून या क्षेत्रात काम करणे कितपत फिजीबल असेल हे तपासून बघणे गरजेचे आहे असे मला वाटते. त्याला जयंत नारळीकर यांचे 'माझे चार नगरातील वास्तव्य' हे पुस्तक अवश्य वाचायला द्या. त्यातून त्याला या क्षेत्रातील कामाची तोंडओळख नक्कीच होईल.

In reply to by सस्नेह

मोकळा वेळ, कामाचे कमी तास, चांगला पगार - यासाठी प्राध्यापक, शासकीय अधिकारी (एमपीएससी साठी सुरुवातीला कष्ट असतील), बेंकेत प्रोबेशनरी ऑफिसर (बदलीची तयारी असायला पाहिजे), माझ्या आधीच्या प्रतिसादात सुचवल्याप्रमाणे युजर एक्सापीरीयांस डिझायनर (जबाबदारी वाढली की काम वाढते, कलेची आवड महत्वाची, नवनवीन ट्रेंड्सचा अभ्यास महत्वाचा, संवाद्कौशल्ये, गरजा समजून घेऊन डिझाईन करणे, एनेलिसिस करता येणे महत्वाचे), आयटी क़्वालिटी ओडिटर, ट्रेनिंग स्पेशालीस्ट (सोफ़्ट स्किल्स, क्रोस कल्चर वगैरे), ट्रन्सलेटर (चीनी, फ्रेंच, जपानी), मार्केटिंग कम्युनिकेशन्स (डिजिटल मार्केटिंग, लिखाण उत्तम हवे, अचूक भाषाज्ञान महत्वाचे, माफक टेक्निकल ज्ञान आवश्यक) इत्यादी क्षेत्रे आकर्षक आहेत. अर्थातच या सगळ्या क्षेत्रांमध्ये अत्युच्च पातळीवरचे यश मिळवणे शक्य आहे. त्यासाठी कष्ट आणि इनोवेशन हवे, नवनवीन शिकण्याची तयारी हवी. चिकाटी ऑफ कोर्स हवीच हवी. शिवाय यापैकी बर्याच क्षेत्रांमध्ये स्वतंत्र व्यवसायाच्या संधी भरपूर आहेत. अमाप कष्ट ही पहिली अट!

In reply to by सस्नेह

वर दिलेल्या पर्यायांपैकी बर्याच क्षेत्रांसाठी अभियांत्रिकॆचॆ पदवी चालू/उपयुक्त ठरू शकेल. उदा. शासकीय अधिकारी, प्राध्यापक, प्रोबेशनरी ऑफिसर, आयटी क्वालिटी ओडिटर, मार्केटिंग कम्युनिकेशन्स वगैरे. चांगला अभ्यास करून अभियांत्रिकी चांगल्या कोलेजातुन केल्यास ही क्षेत्रे अधिक सोपी जातील. बाकी युजर एक्स्पीरियंस डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन साठी पदवी पातळीचे शिक्षण घेऊन सुरुवात करणे श्रेयस्कर. तेच भाषाधिष्ठित अभ्यासक्रमांसाठॆ पण लागू पडते. मी आधीच्या प्रतिसादात सुचवल्याप्रमाणे डिझाईन साठी एन आय डी (अहमदाबाद) उत्तम!

In reply to by समीरसूर

विस्तृत माहितीसाठी धन्यवाद, समीरसूरजी. याचा नक्कीच उपयोग होईल.

In reply to by सस्नेह

अभियांत्रिकीविषयी माझं मत - गणित आणि टेक्निकल विषयांची खूप आवड + पात्रता परीक्षेत चांगले गुण + उत्तम दर्जाचे महाविद्यालय + आपल्या शाखेचे मूलभूत ज्ञान आणि त्याचा भक्कम पाया + विषय समजून घेऊन केलेला उत्तम अभ्यास + चांगले गुण + उत्तम संवादकौशल्य = उत्तम करीअर! अभियांत्रिकीची नावड + गणिताची धडकी + डोकं फोडलं तरी बेसिक तत्वे डोक्यात शिरणार नाहीत याची हमी + जे मिळेल ते महाविद्यालय + जी मिळेल ती शाखा + वर्गात टाकलेल्या पाट्या + दरवर्षीच्या एटीकेट्या + कसेबसे (भुकेच्या वेळी वडापाव घाई-घाईने खावा तसे) चार वर्षात उरकलेले अभियांत्रिकीचे शिक्षण = भरपूर वणवण, सगळीकडून नकारघंटा, निराशा, स्ट्रगल, स्थिर होण्यास विलंब, नोकरीत लवकर येणारा कंटाळा, गमावलेला आत्मविश्वास, इत्यादी इत्यादी (जोपर्यंत अभियांत्रिकीशी संबंधित नोकरीचा त्याग करत नाही तोपर्यंत). मग आधीच आवडीचे क्षेत्र घेऊन वर्षे, कष्ट, मनाचा त्रास वाचवणे अधिक योग्य नाही का?

ही यादी आहे भारतातल्या स्कुल्स ची: https://en.wikipedia.org/wiki/List_of_aerospace_engineering_schools#Ind…
वेल पेईंग आणि फुल-डे बिझी नसणारा, फॅमिली फ्रेंडस एंजाॅयमेंट करता येण्यासारखा जाॅब हवा
सुरुवातीच्या काळात हे थोडं अवघड असतं. एकदा एक एक टप्पा पार करत गेलं की आपोआप स्थैर्य येतं आणि या गोष्टी शक्य होतात. बरोबरच्या लोकांचं पण थोडं असंच होतं. स्थैर्य येईपर्यंत स्ट्रगल असतो, तो पर्यंत थोडं बिझी राहावं लागतं, मेहनत करावी लागते पण नंतर पुन्हा तुमच्या छंदाशी, मित्रांशी कनेकट होता येतं. पुर्वी हे स्थैर्य ४०शीत यायचं आता ३०शी त येतं. कारण सपोर्ट सिस्टीम पण तेवढी तगडी झाली आहे. मात्र तो पर्यंत हे डोक्यातुन काढुन टाकणे योग्य. खास करुन या टप्प्यावर तर हा विचार करुच नये. तो स्थैर्य आल्यानंतरच्याच गोष्टी करत असणार आहे, मान्य आहे पण तिथपर्यंतचा रस्ता "अपहील बॅटल" असु शकतं हे मात्र आवर्जुन सांगण्याजोगी गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याला खुप सार्‍या शुभेच्छा !!

In reply to by स्रुजा

वेल पेईंग आणि फुल-डे बिझी नसणारा, फॅमिली फ्रेंडस एंजाॅयमेंट करता येण्यासारखा जाॅब हवा
असा जॉब कोणत्याही क्षेत्रात सुरुवातीलाच मिळणे अवघड आहे. आधी तुम्हाला भरपुर मेहनत करुन एक स्पेसिफिक स्किल मधे पारंगत व्हायला लागेल. मग ते स्किल वापरुन हवा तसा जॉब मिळवता येईल किंवा स्वतःचे स्वतः फ्रिलान्स किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर काम मिळवुन उरलेला वेळ काव्य, शास्त्र, विनोदासाठी वापरता येईल. पण त्याला अजुन खूप म्हणजे खूपच वेळ आहे.

१२वी नंतर भौतिकशास्त्रात B. Sc. करून मग अॅस्ट्राॅनाॅमी मध्ये सैद्धांतिक खगोलशास्त्र (Theoretical Astronomy) हे specialization घेवून मास्टर्स करता येईल. दुसरा पर्याय म्हणजे Instrumental/ Experimental Astronomy - या साठी मात्र अभियांत्रिकी (इलेक्ट्रिकल वा इलेक्ट्रोनिक्स) करायला लागेल आणि JEST (Joint Entrance Screening Test) देऊन मग अॅस्ट्राॅनाॅमीमध्ये P.Hd. पर्यंत शिकता येतं. अॅस्ट्राॅनाॅमी मधील काही शाखा Astrochemistry : A branch of astronomy and chemistry dealing with the chemical composition and evolution of the universe and its parts Astrogeology : The science dealing with the structure and composition of planets and other bodies in the solar system. Astrometeorology : The study of the theoretical effects of astronomical bodies and forces on the earth’s atmosphere. Astrometry : The branch of astronomy that deals with the measurement of the positions and motions of the celestial bodies. Astrobiology : The study of life beyond the earth’s atmosphere as on the planets. Astrophysics : The branch of astronomy that deals with the physical properties of celestial bodies and with the interaction between matter and radiation in the interior of celestial bodies and in interstellar space. यात शिक्षण देणाऱ्या महाराष्ट्र व जवळील भागातल्या काही संस्था - TIFR Mumbai, IUCAA Pune, Swami Ramanand Teerth University Nanded, Physical Research Laboratory Ahmedabad. तसेच काही ऑनलाईन कोर्सेस पण आहेत जे सध्या बेसिक पक्कं होण्यासाठी आणि आवड अजून विकसित करण्यासाठी मदत करतील - या लिंक मध्ये पण थोडी माहिती आहे तुम्ही राहता तिथे starwatchers चा ग्रुप आहे का बघा, त्यात त्याला सभासद करून द्या. अजून घेतला नसल्यास आणि शक्य असल्यास एखादा बर्यापैकी टेलीस्कोप घ्या. मी काही दिवसांपूर्वी हा घेतला - Orion StarMax 90mm TableTop Maksutov-Cassegrain Telescope या लिंक मध्ये हा नुसता टेलिस्कोप आहे पण याबरोबर जास्तीच्या काही accessories घेतल्या तर खूपच छान अवकाश निरीक्षण करता येतं. मी संपूर्ण Kit $४०० (approx. रुपये २६०००) ला घेतलं. यात संगणकीकृत पण मिळतात. ज्यात जवळपास ३०००० objects चा डेटा फीड केलेला असतो. नुसता चालू करायचा आणि काय बघायचंय ते द्यायचं की आपोआप टेलिस्कोप तिकडे सेट होतो. पण ते महाग असतात आणि त्याला batteries खूप लागतात. माझ्या अंदाजाने ८ AA batteries वर साधारतः ३ तास चालतो. नाहीतर मग adapter मिळतो पण तारे बघायला आपण शहराबाहेर जातो तिथे वीज असेलच याची खात्री नसते. माझ्या मुलीला पण अॅस्ट्राॅनाॅमीमध्ये करीअर करायचंय म्हणून थोडी माहिती मी पण गोळा करतोय. अजून तुम्हाला काही प्रश्न असल्यास विचारा, मला माहित असल्यास सांगीन नाहीतर काहीतरी खटपट करून माहिती मिळवता येईल.

माझ्या माहितीतल्या एकाने Indian Institute of Space Science and Technology,Thiruvananthpuram इथुन Bachelor of Technology (B.Tech.), Avionics केलय (२०१२ पास आउट). त्यानंतर ईस्रो मधे Summer Internship, मग Tata Institute of Fundamental Research ट्रेनिंग आणि मग २ वर्ष ईस्रो मधेच नोकरी केली. सद्ध्या San Jose State University मधुन मास्टर्स करतोय. अजुन माहिती पहिजे असेल तर मी त्याला ईमेल करुन तुमच्यशी कनेक्ट करु शकीन.

ट्रेड मार्क आणि अभिषेक पटवर्धन तुमच्याकडून अतिशय मौलिक आणि स्पेसिफिक माहिती दुव्यांसहित मिळाली आहे. खूप धन्यवाद. तुम्ही सुचवल्याप्रमाणे मुलाशी बोलून आणखी तपशील विचारेन .

काकू . तुमचे प्रतिसाद पाहता त्याला फिजिक्स मध्ये इंटरेस्ट असेल असं वाटतं . ७०-७५ हे वाईट अजिबात नाहीत. आणि तो "जाता जाता " तेवढे मिळवत असेल . आणि अजून खच्चून मेहनत करायची तयारी असेल तर aeronautics इंजिनियरिंग करता येईल का विचारून पहा . त्यासाठी काय परीक्षा लागतात त्याचा मला अंदाज नाही . नेत वर माहिती मिळेलच किंवा इथले लोक हि सांगतील . पण नेहमी पेक्षा वेगळा फील्ड आहे . आणि सध्या अश्या लोकांची गरज आहे. कम्प्युटर मध्ये आवड असेल तर नेहमीचा cs आहेच . पण तिथून पुढे नेट्वर्किंग , वर्च्युअल मशिन्स , नेटवर्क सेक्युरिटी इत्यादी विषय घेऊन तो बराच काही शिकू शकतो . आणि सेक्युरिटी एक्स्पर्ट कायम लागतात .

भारत सरकार (MHRD) ने National Institutional Ranking Framework (www.nirfindia.org) सुरू केले आहे. यात एप्रिल-२०१६ मधे भारतातील कॉलेजेस चे पहिले रँकिंग प्रसिध्द होणार आहे. यात खुप मोठा भर faculty वर आहे. त्यातुन चांगली कॉलेजेस कळतील (असा आमचा तरी आशावाद आहे). --- कानडा

ईंजिनिअरींग ब्रँच निवडतांना शक्यतो मुलभूत ब्रँच निवडा : मेकॅनिकल, ईलेक्ट्रीकल आणि सिव्हील. आणि ईंजिनिअरींग करायला घाबरू नका. ईंजिनिअर पदवीधारकांची संख्या प्रचंड असली तरी ईंजिनिअर्स खूप कमी आहेत. --- कानडा

+100

आवड असेल तर User Experience Design या क्षेत्राचा नक्की विचार करावा. यात जगभर खूप चांगला स्कोप आहे. तंत्रज्ञान आणि डिजाईन अशी दुहेरी आवड असेल तर हे क्षेत्र छान आहे. या विषयावर मी लिहिलेला लेख इथे वाचता येईल: http://misalpav.com/node/27069 मूळ लेख (लोकसत्ता- करिअर वृत्तांत पुरवणी, १० फेब्रुवारी २०१४). (http://www.loksatta.com/career-vrutant-news/usage-of-technology-367435/?...) हा लेख वाचून महाराष्ट्रातल्या बऱ्याच विद्यार्थी/पालकांचे इमेल्स आले होते. अधिक माहिती हवी असेल तर मला निसंकोचपणे निरोप पाठवा.

In reply to by कल्पक

आपले दोन्ही लेख वाचले. त्याबाबत काही माहिती द्याल का ? १. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बारावीनंतर कोणती शिक्षणशाखा निवडावी लागेल ? व बॅचलर्स, मास्टर्स यापैकी कोणते क्वालिफ़िकेशन आवश्यक आहे ? २. नोकरीची संधी कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमधे आहे ? उदा. जाहिरात, आयटी इ. ३. अभियांत्रिकीशी या क्षेत्राचा संबंध आहे का व कसा ? ४. आपण याच क्षेत्रात काम करता का ? असल्यास तुमचा अनुभव ऐकायला आवडेल.

In reply to by सस्नेह

१. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी बारावीनंतर कोणती शिक्षणशाखा निवडावी लागेल ? व बॅचलर्स, मास्टर्स यापैकी कोणते क्वालिफ़िकेशन आवश्यक आहे ? बारावी नंतर डिजाईन/फाईन आर्ट मधील डिग्री असेल तर उत्तम. अनेक लोक इंजिनिअरिंग करून सुद्धा मास्टर्सला डिजाईन घेतात (पण त्यातले बहुतांशी लोक बळजबरी इंजिनिअरिंग केल्यावर मनाचा कल ओळखून असं करतात) आणि या क्षेत्रात येतात. आयआयटी मधील इंडस्ट्रीअल डिजाईन सेंटर इथे बॅचलर्स, मास्टर्स असे कोर्स आहेत. त्याची माहिती इथे पाहता येईल (http://www.idc.iitb.ac.in/academics/Bdes-program.html) मास्टर्सला Interaction Design हे specialization घेऊन User Experience Design शिकता येतं त्याची माहिती इथे पाहता येईल (http://www.idc.iitb.ac.in/academics/interaction-design.html). मास्टर्स केले तर उत्तमच आहे. मला स्वतःला मास्टर्स साठी आयआयटीत प्रवेश मिळू शकला नाही पण त्यामुळे काही अडलं नाही. NID ही सुद्धा चांगली संस्था आहे (http://www.nid.edu/education/master-design/interaction-design/p-overview) २. नोकरीची संधी कोणत्या प्रकारच्या कंपन्यांमधे आहे ? उदा. जाहिरात, आयटी इ. नोकरीच्या संधी आयटी कंपन्या (शिवाय प्रत्येक प्रकारच्या संस्थांमध्ये आयटी विभाग असतो), सोफ्टवेअर उत्पादन कंपन्या, बहुराष्ट्रीय बँका, कोणत्याही प्रकारच्या उत्पादन कंपन्या, बहुराष्ट्रीय इन्सुरन्स कंपन्या, मोबईल फोन तयार करणाऱ्या कंपन्या अशा बऱ्याच क्षेत्रात आहेत. अमेरिकेत User Experience Design हे १० सगळ्यात जास्त मागणी असणाऱ्या कौशल्यांपैकी एक आहे. इथे टूथब्रश तयार करणाऱ्या कंपनी पासून नासा पर्यंत सगळीकडे User Experience Design करणारे लोक लागतात. भारतात इस्रो मध्ये सुद्धा असे लोक लागतात. थोडक्यात ज्याठिकाणी तंत्रज्ञान लागते तिथे असे लोक लागतात. एका निष्कर्षानुसार आयटी किवा सोफ्टवेअर कंपनी मध्ये developer लोकांच्या १०% तरी User Experience Design चे लोक असावेत ज्यामुळे उत्पादन user friendly होईल. मी एका बहुराष्ट्रीय आयटी कंपनीत अमेरिकेत काम करतो. आमच्या कंपनीत अंदाजे ३ लाख लोक जगातल्या ४० देशात असणाऱ्या १२०० ग्राहक कंपन्यांसाठी काम करतात आणि आमच्या कंपनीत User Experience Design चे काम करणारे जेमतेम १००० लोक आहेत. यावरून तुम्हाला कौशल्याच्या मागणीची कल्पना येईल. आम्हाला अनेकदा असे लोक लागतात पण पटकन मिळत नाहीत. ३. अभियांत्रिकीशी या क्षेत्राचा संबंध आहे का व कसा ? थोडासा दुरून संबंध आहे. User Experience Designer ने तयार केलेले डिजाईन implement करणारे लोक बरेचदा अभियांत्रिकीशी संबंधित असतात. त्यामुळे अभियांत्रिकी केलेला User Experience Designer असेल तर त्याला दोन्ही बाजूचं ज्ञान असतं. पण डिजाईन शिक्षण सगळ्यात उपयोगी आहे. ४. आपण याच क्षेत्रात काम करता का ? असल्यास तुमचा अनुभव ऐकायला आवडेल. हो, मी गेली १० वर्ष याच क्षेत्रात काम करतोय. माझे वडील डॉक्टर असून सुद्धा त्यांनी आवडीप्रमाणे शिक्षण घेण्याचं स्वातंत्र्य दिलं. लहानपणापासून चित्रकलेची आवड होती. त्यामुळे फाईन आर्ट मधील applied art (कमर्शीअल आर्ट) मध्ये डिग्री मिळवली. त्यानंतर जाहिरात संस्थेमध्ये काही वर्षं काम करून आयटी क्षेत्रात आलो. आयआयटी मध्ये मास्टर्स साठी प्रवेश मिळू शकला नाही पण आयआयटी मधील इंडस्ट्रीअल डिजाईन सेंटर मध्ये दोन वर्ष research associate म्हणून User Experience Design शी संबंधित संशोधन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळाली. त्या दरम्यान User Experience Design चा छोटा कोर्स सुद्धा तिथून करता आला. या विषयावर ५ शोधनिबंध लिहून ते आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रकाशित करता आले. नंतर आयटी कंपनीत नोकरी करताना चार वर्षांपूर्वी अमेरिकेत यायची संधी मिळाली. Stanford University चा सुद्धा एक छोटा दूरस्थ कोर्स करता आला. आता अमेरिकेतल्या Fortune 500 कंपन्यांसाठी User Experience Design चे काम करतोय. अनेक तरुणांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन आणि मार्गदर्शन सुद्धा करतो. या क्षेत्रात सर्जनशील कामाचं समाधान सुद्धा मिळतं आणि पैसे सुद्धा चांगले मिळतात. शिवाय हे क्षेत्र खूप Niche असल्यामुळे येणारी २० वर्ष यात कुशल लोकांना जगभर खूप मागणी असणार आहे.

क्रिएटिव्ह फील्डची आवड असेल तर डिझाईन क्षेत्रात अनेक संधी आहेत. यात अनेक पदवी, पदविका, पदव्युत्तर अभ्यासक्रम येतात, सहसा १२वी नंतर कोणत्याही कोर्सला प्रवेश घेता येतो, हवे ते स्पेशलायझेशन निवडता येते. उदा: ग्राफिक डिझाईन, अ‍ॅनिमेशन डिझाईन, प्रॉडक्ट डिझाईन, फिल्म & व्हिडीओ डिझाईन, टेक्स्टाईल डिझाईन, युझर एक्सपीरीयंस ui/ ux design इ. ui/ ux design सध्या खूप डिमांडमध्ये आहे, त्यात करियरला पूर्ण स्कोप आहे, पगारही जोरदार असतात. आवड असेल तर आर्किटेक्चरल ३डी व्हिज्युलायझेशन/ ३डी मॉडेलिंग हेही एक भरपूर संधी असलेले फील्ड आहे. वरीलपैकी कोणताही कोर्स केल्यावर सर्व्हिस/ व्यवसाय्/ फ्रिलांस काम इ.अनेक पर्याय उपलब्ध असतात. १. http://www.nid.edu/education/bachelor-design २. http://www.mitid.edu.in/ ३. http://sid.edu.in/ ४. http://www.shiksha.com/getListingDetail/119842/course/course-Diploma-In…, C-DAC-National Multimedia Resource Centre (NMRC): DACA - Diploma-In-Advanced-Computer-Arts वरील साईट्स चेक कराल, mit, symbiosis, C-DAC या पुण्यातील संस्थांमध्ये अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, याशिवायही इतर बर्‍याच छोट्या मोठ्या संस्थांमधून हे कोर्सेस शिकवले जातात. स्नेहा ताई, मुलाने अ‍ॅप्टिट्यूड टेस्ट (कल चाचणी) दिलीय का कधी, त्यातूनही कोणत्या फील्डची आवड, कल, क्षमता आहे ते कळू शकतं.

In reply to by नीलमोहर

अ‍ॅप्टिट्यूड टेस्टबद्दल कोणाचे काय काय अनुभव आहेत? खरोखर कल वगैरे सुस्पष्टपणे कळतो का? त्याला कितपत महत्त्व द्यावं? जे त्या मुलामुलीला / आईबापांना सोळा वर्षात दिसतं / कळतं त्यावरून घेतलेला निर्णय दोन तासांच्या टेस्टच्या निकालांवरून बदलणं योग्य आहे का?

In reply to by आदूबाळ

अनुभव नाही त्यामुळे जास्त माहिती नाही. अशा अनेक फ्री टेस्ट ऑनलाईन उपलब्ध असतात, एखादी करून बघावी म्हणजे साधारण कल कुठे आहे त्याचा अंदाज येऊ शकेल. अशा टेस्ट्ने नुकसान काही होणार नाही, त्याचा supplementary म्हणून वापर करावा. टेस्टच्या निकालांवरून आपला निर्णय बदलणं अर्थातच बरोबर नाही, मात्र त्याचा योग्य निर्णय घेण्यात उपयोग होऊ शकेल असं वाटतं.

In reply to by कल्पक

कल्पक राव तुमचे प्रतिसाद व माहीती आवडली. तुमचा तंत्रज्ञानाची उपयोगशील रचना हा लेख सुंदर होता. ह्या फिल्डची लोकांना खरेच माहीती नाही. आपण लिहित राहिलात तर आवडेल वाचायला.

In reply to by कल्पक

तुम्ही सुद्धा User Experience Design मध्ये काम करता का? - आपण हे मला विचारलेत असं समजून उत्तर देत आहे. मी UI Design मध्ये नाही, ग्राफिक आर्टिस्ट म्हणून खाजगी कंपनीत काम करत आहे. मलाही Ux/UI Design बाबत अजून जाणून घ्यायची इच्छा आहे तरी आपण नक्की याविषयी अजून लिहावे.

सर्व प्रतिसाद वाचले खूप मार्गदर्शक आहेत. जर दहावी नंतर सहजासहजी डीप्लोमाला अ‍ॅडमिशन मिळत असेल तर ते घ्यावे की बारावी सायन्सला जावे?

In reply to by खटपट्या

डिप्लोमानंतर इंजीनीयरींग डीग्री (थेट दुस-या वर्षाला प्रवेश) बद्द्ल dte च्या साईटवर पुर्ण माहीती मिळेल. http://dse15.dtemaharashtra.org/dse15/index.php/hp_controller/eligibili… काही लक्षात घेण्यासारखे मुद्दे. १. डिप्लोमा केल्यानंतर इंजीनीयरींग डीग्री करायची असेल तर डिप्लोमाच्या शेवटच्या वर्षाला निदान ८५ टक्के मार्क्स पाडावेत म्हणजे चांगल्या इंजीनीयरींग कॉलेजमधे प्रवेश मिळेल.चांगल्या इंजीनीयरींग कॉलेज मधे शिक्षण घेणे उत्तम. (चांगले = जिथे शिकवणारा स्टाफ चांगला आहे, फॅसिलिटीज चागल्या आहेत, कँपस सिलेक्शनला चांगल्या कंपन्या येतात या अर्थाने) २. डिप्लोमा केल्यानंतर डायरेक्ट इंजीनीयरींगच्या दुस-या वर्षाला प्रवेश मिळतो. दुस-या वर्षी इंजीनीयरींगच्या जागा कमी असतात. चांगल्या कॉलेजमधे प्रवेश मिळण्यासाठी दुस-या वर्षी पण खूप हाय मेरीट असते. तरी पण आता इंजीनीयरींग कॉलेज भरपूर असल्यामुळे कुठे ना कुठे प्रवेश मिळतो. पण चांगले कॉलेज असणे उत्तम. ३. बारावीच्या तुलनेत डिप्लोमाचे मॅथेमॅटीक्स बेसिक लेव्हलचे आहे. इंजीनीयरींगच्या दुस-या वर्षी इंजी. मॅथेमॅटीक्स अवघड जाऊ शकते. विद्यार्थ्याला खूप मेहनत करावी लागेल किंवा खासगी क्लास लावावा लागेल. ३. ज्यांना लगेच नोकरीची आवश्यकता आहे त्यांनी डिप्लोमाला जाणे श्रेयस्कर. चांगल्या कॉलेजमधे शिकलेल्या आणि शैक्षणिक प्रगती उत्तम असणा-या विद्यार्थ्याला नोकरी मिळू शकते. त्यानंतर नोकरी करून बरीच मुले AMIE किंवा पार्ट टाईम डीग्री करतात. ४. बारावी सायन्सनंतर इंजीनीयरींग तसेच इतर करीयरचे भरपूर ऑप्शन आहेत. डिप्लोमा केल्यानंतर डीग्रीसाठी तीच साईड घ्यावी लागते. मेकॅनिकल डिप्लोमा वाल्याला आय्.टी. ला जाता येणार नाही किंवा आय्.टी. वाल्याला दुसरीकदे शिफ्ट मारता येत नाही. ५. पहिल्या वर्षीच्या इंजीनीयरींगच्या जागा हल्ली भरपूर आहेत. पण चांगल्या इंजीनीयरींग कॉलेजमधे प्रवेश मिळण्यासाठी बारावीला (सीइटी+बारावी) चांगले मार्कस आवश्यक आहेत. जाणकार अजून भर टाकतीलच. महत्त्वाचे : विद्यार्थी कष्टाळू असेल तर बारावीनंतर इंजीनीयरींग केले काय किंवा डिप्लोमानंतर केले काय, त्याच्यासाठी काही फरक पडत नाही.

In reply to by बबन ताम्बे

माहीतीबद्दल धन्यवाद बरीचशी माहीती आधी माहीत होती. व्यनी केलाय...

In reply to by बबन ताम्बे

डिप्लोमा केल्यानंतर डीग्रीसाठी तीच साईड घ्यावी लागते. मेकॅनिकल डिप्लोमा वाल्याला आय्.टी. ला जाता येणार नाही किंवा आय्.टी. वाल्याला दुसरीकदे शिफ्ट मारता येत नाही.
हे आता लागु नाही. डिप्लोमा ला कुठलीही ब्रँच असेल तरी डिग्रीला कुठल्याही ब्रँच ला अ‍ॅड्मिशन घेता येते. --- कानडा

In reply to by कानडा

डिप्लोमा ला कुठलीही ब्रँच असेल तरी डिग्रीला कुठल्याही ब्रँच ला अ‍ॅड्मिशन घेता येते हे माहीत नव्हते.

आणि अतीशय उपयुक्त माहिती. नेहमीच्या ईंजीनियर आणि मेडिकल वाटा सोडूनहि करीयरचे एवढे मार्ग उपलब्ध असतात हे नव्याने कळले. थॅक्स टू मिपा आणि मिपाकर्स.....जीयो.

मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं फार मनात होतं पण काही कारणाने राहून गेलं...

"वेल पेईंग आणि फुल-डे बिझी नसणारा, फॅमिली फ्रेंडस एंजाॅयमेंट करता येण्यासारखा जाॅब हवा" User Experience Design क्षेत्रात सुरुवातीला कष्ट करावे लागतात पण एका टप्प्यानंतर बरीच स्थिरता मिळते आणि कुटुंब-छंद यांच्यासाठी वेळ देता येतो (विशेषतः अमेरिकेत तर नक्की). आयटी क्षेत्रातल्या डेवलपर किवा टेस्टर पेक्षा नक्कीच कमी कष्ट करावे लागतात. User Experience Designer चं काम खूप niche असल्यामुळे आणि हे काम करणारे खूपच कमी लोक असल्यामुळे हे काम करणाऱ्या माणसाला बरंच महत्व आणि स्वातंत्र्य असतं. मी कोलोराडो मधून कॅलिफोर्नियाला नोकरी बदलून गेलो तर माझ्या ग्राहक कंपनीला कोलोराडो मध्ये replacement मिळाला नाही आणि न्यूजर्सीतून User Experience Designer आणावा लागला. आम्हाला अमेरिकेतल्या विविध ग्राहक कंपन्यांसाठी अनेकदा User Experience Designer लागतात पण अनेक आठवडे शोधून मिळत नाहीत.