Skip to main content

शैक्षणिक

माहिती हवी -- बारावीनंतरच्या शैक्षणिक संधी

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 10/12/2015 16:07 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच खात्रीलायक सूत्रांकडून कानी आलेल्या बातमीनुसार, काही शहरांतील अभियांत्रिकी महाविद्यालयांनी आपल्या जाहिरातीसाठी ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापकांची मदत मागितली आहे. ...कारण अभियांत्रिकीच्या शेकडो सीट्स गतवर्षी रिकाम्या राहिल्या आहेत. ...त्याचे कारण गतवर्षीच्या गतवर्षी उत्तीर्ण झालेले हजारो अभियंते अद्यापि बेकार आहेत. ही बातमी ऐकून मला धडकी भरली आहे. ...कारण माझा लेक यावर्षी बारावी, JEE, CET इ. स्टेजेसमधून जात आहे.