वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे.
माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत.
भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले.
शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील?
एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या.
मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते.
ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो.
माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते.
शिक्षण : जेमतेम डिप्लोमा
पगार : २२००/-
नौकरी : खाजगी.
जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू.
इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.)
वाहन : समोरच्या शेजार्याने दिलेली सायकल.
आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी.
लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले.
शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला.
अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे.
दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली.
थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का?
संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य.
डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपल्या अपेक्षा कमी आहेत असं
:)
तुम्हाला नेमकं कसं सांगीतलं
स्त्रीयांनी त्यांना काय हवे
जगामधे तिसर्या महायुद्धाची
वोक्के
अतिनेमके निरीक्षण
असू दे रे...प्रत्येकाचे
अगदी अगदी.
ही ही ही ही!! णको.
ही & हि प्रतिसाद ;)
मधमाश्या रे =))
:)
__/\__
ये धागेपे नया लगते हो =))
एका प्रतिसादावरुन एवढा धुरळा.
नाहीच लिहिलास तरी असेच होईल
टका उगाच अनाहितांना मध्ये
अहो ते फक्त पोटेन्शिअल आहे
अगं मुद्दा नीमो अनाहिता आहे
आपणांस मुद्दा समजलेला नाही
त्याच मुद्द्यांवर प्रतिवाद
मुवि, पंचहजारी सेलेब्रेशनसाठी
हॉल? डायरेक्ट चौपाटीवर करू =)
कीती ती झैरात ??
सोनं असलं तरी जोपर्यंत झैरात
मी बी.ए आहे (ढकलपास).
वेळ आहे का? शे-पाश्शे इथेच
नाय रे..
खिक्क...आता मैदानेजंग मध्ये
बोलण्याची पद्धत आहे हो ती शाम
तुम्हारेकू लग्ता अब्बीतक मई
वो बाकी लोगको मालूम कैसे होना
बाकी माईंचे हे तसा हा शाम
च्यायला उगाचच "बाई मी विकत
किलोला कसा भेटला ते विचारलंत
राम-शाम की जोडी
खी खी खी....कट्ट्याचा
कट्ट्याचा गेला रे पण प्रश्ण
खि खि खि
त्यात काय सूड उगवायचा. आता
आँ...अच्च जालं तल =))
"किलोला कसा" कि "किती किलोचा"
पिरा हात धुवून मागे लाग्णार
त्यातला
खि खि खि
अनुभव म्हणावा का?
@ टका, तुझ्या 'कर्तव्य
:)
मिपाच्या आत्तापर्यंतच्या