Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367191
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

११११

हा धागा वर काढतो. का? मेरे मनको भाया, मैने धागा वर काढ्या.

In reply to by टवाळ कार्टा

जेवणार्‍या माणसाला बघून, 'काय? जेवताय वाट्टं' असं विचारणार्‍या एका बुद्धीवंताची आठवण आली. ;)

In reply to by प्यारे१

ज्या उद्दीष्टासाठी हा धागा निघाला होता ते अजून पूर्ण झाले नाही. त्यामुळे चालूदे अजून पुढे. अतीआवांतर - पूर्वी बेस्ट बसच्या आतमधे चालकाच्या समोर लीहीलेले असायचे "आपले उद्दीष्ट ३ कीलोमीटर प्रति लीटर" ते उगाच आठवले.

इथे लग्न झालेल्यांपैकी किती जणांना त्यांच्या लग्नाच्या वेळच्या अपेक्षा आठवतात? दुनिया इतकी फास्ट झाली आहे, कालच्या अपेक्षा आज मानेवरचा जू होऊन बसू शकतो, हि सत्य परिस्थिती आहे. जाहिरातबाजीची दुनिया आहे मग अशा गोष्टी खपणारच. मला वाटतं वधू किवा वरापेक्षा आजू बाजूंच्या अपेक्षा लग्न ठरवताना जास्त प्रभावशाली असतात (अरेंज म्यारेज च्या बाबतीत). कारण हजार सल्ल्यांमध्ये गंगारलेली पोरं स्वतःचा आत्मविश्वासाचा किल्ला किती काल लढवणार? महत्वाची गोष्ट हि पटवून द्यायला हवी कि 'हा निर्णय तुझा आहे आणि परिणामही तुझे'.....ज्यांना हे झेपले, ते अपेक्षांवर तडजोड करायला तयार होतील हे नक्की.

In reply to by बॅटमॅन

लीला अपरंपार आहे यावर माझा विश्वास दुणावला. सकाळचे ८.३० झाले आहेत ऐकूयात सुमधूर मराठी गीत छबीदार छबी

यंदा किती करायचे? अता ५००० चं टारगेट ठेवावं म्हणतो मी. काय बोलता.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

त्या निमित्ताने मिपाच्या वेब अप्लिकेशनचे स्ट्रेस टेस्टिंग होऊन जाईल :-) .

In reply to by मोदक

"आयटीमुळे" फक्त वधूंच्या अपेक्षा (कैच्याकै) वाढलेल्या आहेत पण वधूंमधले सनातन बग (इल्लॉजिकल भांडणे वगैरे वगैरे) तसेच्च आहेत

In reply to by टवाळ कार्टा

फक्त आयटी तील नव्हे तर सर्वच क्षेत्रातील भावी वधुंच्या अपेक्षा लै वाढल्यात पण विचार काही वाढले नाहीत ते तशेच राहिलेत.

In reply to by जेपी

मुलींनी विचार वाढवायचे म्हणजे नेमकं काय करायचं, मुलांचे विचार किती वाढलेत तेही सांगावे.

In reply to by नीलमोहर

मी कॉम्प्युटर ईंजिनीअर आहे (डिस्टींगशनसकट) दिसायला बर्यापैकी वगैरे सुसंस्कृत, सडपातळ वगैरे खाणे बनवणे बर्यापैकी (पक्षी माझ्यापुरते) जमते...अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथली मुलगी मिळाली तर जॉब सोडून घर + मुले व्यवस्थित सांभाळेन (आधीचा याबाबतीत काहिच अनुभव नसताना)...जेवण बनवणे जमेल बर्यापैकी हळूहळू कोणी मला डिपेंडंट व्हिजावर तिथेच स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय (अ.ब.क. जाती क्षमस्व)" लग्न करून घेउन जाईल काय?

In reply to by टवाळ कार्टा

"आयटीमुळे" फक्त वधूंच्या अपेक्षा (कैच्याकै) वाढलेल्या आहेत " "अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथली मुलगी मिळाली तर जॉब सोडून घर + मुले व्यवस्थित सांभाळेन (आधीचा याबाबतीत काहिच अनुभव नसताना)...जेवण बनवणे जमेल बर्यापैकी हळूहळू कोणी मला डिपेंडंट व्हिजावर तिथेच स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय (अ.ब.क. जाती क्षमस्व)" दोन्ही आपलेच प्रतिसाद.. आपल्या अपेक्षा कमी आहेत असं वाटतं का आपल्याला ( का वाटतं ), बाकी आपल्या वरील प्रश्नाचं उत्तर, अमेरिका/युरोप्/कॅनडा/ऑस्ट्रेलिया/सिंगापोर इथे स्थायीक असणारी "स्वजातीय्/उच्चजातीय" ( मिपा वाचणारी ) मुलगी योग्यरित्या देऊ शकेल.

In reply to by टवाळ कार्टा

उपरोधिक प्रश्नाला द्यायला हवं तसंच उत्तर दिलं होतं, (आधीच्या प्रश्नांची उत्तरं न देता आपण मुद्दा भरकटवलात तेव्हाच आली समज लक्षात) आता २ मिनट शांतता आपल्यासाठी...

In reply to by नीलमोहर

आपल्या अपेक्षा कमी आहेत असं वाटतं का आपल्याला ( का वाटतं ),
हाच का तुम्चा प्रश्न? हा नसेल तर तुम्चा प्रश्न नेमका कोणता यात माझा काहीतरी घोळ झालाय....तुम्चा नेमका प्रश्न समजला तर सविस्तर उत्तर देता येईल

In reply to by टवाळ कार्टा

समज कमी पडली म्हटलं ते यासाठीच ;) 'मुलींनी विचार वाढवायचे म्हणजे नेमकं काय करायचं, मुलांचे विचार किती वाढलेत तेही सांगावे.' हे माझे प्रश्न होते, यालाच प्रतिसाद म्हणून आपण तो sarcastic प्रश्न विचारलात.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्त्रीयांनी त्यांना काय हवे हे इतक्या सहजपणे सांगितले अस्ते तर मग जगात कस्ले प्रॉब्लेम उर्लेच नस्ते रे =))

In reply to by टवाळ कार्टा

जगामधे तिसर्‍या महायुद्धाची नांदी आधीचं वाजायला लागलेली आहे आपण त्यामधे कशाला तेल ओतताय?

In reply to by नीलमोहर

वोक्के माझ्यामते तो प्रश्न जेपीसाठी होता कारण तुम्ही त्याच्या प्रतिक्रियेवर उपप्रतिक्रिया दिलेली त्यामुळे त्या प्रश्नाचे उत्तर त्यालाच देउदे याला मी तुम्चा धांदरटपणा म्हणेन त्याच प्रमाणे तुम्ही मी जेपीला दिलेली प्रतिक्रिया वाचलेली दिसत नाही त्यामुळे मलासुध्धा तुमच्यासारखेच उत्तर जाणून घ्यायचे आहे याला(सुध्धा) मी तुम्चा धांदरटपणा म्हणेन माझी प्रतिक्रिया ही एक उपरोधीक प्रतिक्रिया असूनसुध्धा तुम्ही यात "आपल्या अपेक्षा कमी आहेत असं वाटतं का आपल्याला ( का वाटतं )" असे विचारलेत....ते सुध्धा माझ्या अपेक्षांबद्दल काहीही माहित नस्ताना याला सुध्धा (परत एकदा) मी तुम्चा धांदरटपणा म्हणेन बरं मला प्रश्न समजा नक्की कोणता ते घोळ झाल्याने मी शांतपणे इथे विचारलेले तर त्यावर "समज कमी पडली म्हटलं ते यासाठीच ;)" अशी खवचट प्रतीक्रिया प्रतिक्रीया लिहिलीत अजून कधी मी तुमच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा केलेली नाहिये पण वरील सर्व बघता...."अनाहितांनो तुम्च्यासाठी आणखी एक मेंबर मिळाला हो" =))

In reply to by टवाळ कार्टा

अजून कधी मी तुमच्याशी कोणत्याही विषयावर चर्चा केलेली नाहिये पण वरील सर्व बघता...."अनाहितांनो तुम्च्यासाठी आणखी एक मेंबर मिळाला हो" =))
विषय कुठलाही असला तरी तो बबन जसा 'वेगळा विदर्भ झालाच पाहिजे' म्हणतो त्यातलाच हा प्रकार बे. विशय काहीही असू, विशिष्ट किल्ले लढवलेच पाहिजेत. =))

In reply to by टवाळ कार्टा

आभारी आहे.

In reply to by नीलमोहर

विषय काय आणि प्रतिसाद कुठे चालले होते याचाही विचार व्हावा ही नम्र विनंती. काही प्रतिसाद पाहून मलाही प्रश्न पडले म्हणून मी ते मांडले, जेणेकरुन दोन्ही बाजूंचे मुद्दे स्पष्ट झाले असते. त्यावर सरळ उत्तरं न देता इथे निव्वळ मुद्दे भरकटवणं सुरु होतं. अनाहितांना बळेच मध्ये आणायचीही गरज नव्हती, आत्ता इथे मी एकटीच आहे. धाग्यात काही भर न घालता केवळ वाद सुरु ठेवण्याची इच्छा, वेळ, एनर्जी, क्षमता काहीच नसल्यामुळे धाग्याला राम राम !!

In reply to by टवाळ कार्टा

टका उगाच अनाहितांना मध्ये आणु नकोस. नीलमोहर स्त्री आहे की पुरुष हे त्यांनी अजुन रीव्हील केलेलं नाही, त्यांचा मुद्दा हा मुलगी किंवा सुज्ञ मुलगा मांडु शकत नाही का? मुलांच्या अपेक्षा काहीच्या काही वाढल्यात असं एखादा वधुपिता किंवा वधु चा भाऊ म्हणला तर त्याला विना चौकशी अनाहितामध्ये धाडशील उद्या.

In reply to by स्रुजा

अगं मुद्दा नीमो अनाहिता आहे की नाही चा नाहिये. मुद्दा धागा ५००० करण्याचा आहे. अश्या बरोबर शंका काढुन धाग्याचं पोटेन्शिअल कमी करु नकोस =)). अश्यानं ५००० कसे व्हायचे मग :P

In reply to by स्रुजा

आपणांस मुद्दा समजलेला नाही (हे पाहून खरेच आश्चर्य वाट्ले)... हा आणि हा प्रतिसाद म्हणजे जे मला म्हणायचे होते त्याचेच लिखित स्वरुप आहे :)

In reply to by टवाळ कार्टा

त्याच मुद्द्यांवर प्रतिवाद आहे माझा पण जाऊ दे, धागाच वाढवायचाय ना मग तुझ्या मुद्दा समजला नाही ला माझ्या कडून "कर निरर्थक आत्मरंजन" ;) पुढील प्रतिसादात दु दु वगैरे बोल्ण्यात येईल. मुविंच्या पंच हजारी धाग्यात माझा आपला खारीचा वाटा ..

In reply to by स्रुजा

मुवि, पंचहजारी सेलेब्रेशनसाठी मोठ्ठा हॉल बुक करा. ऐनवेळेस बुकिंग मिळणे कठीण जाईल =))

In reply to by टवाळ कार्टा

मी बी.ए आहे (ढकलपास). दिसायला यथातथाच आणि जाड आहे. मला काडी इकडची तिकडे करता येत नाही. पाणीसुद्धा हातात लागते. आणि हो, मी घरचे म्हणतील ते ऐकणारी आणि बुगुबुगु मान डोलावणारी पण आहे. तर मला गोरा, (गहु / सावळा / काळा वर्ण क्षमस्व, चष्मावाले त्याहुन क्षमस्व!) हॅण्डसम आणि (अर्थातच) नोकरी करुन रोज घरी स्वयंपाक-पाणी, घरची कामे, माझ्या मातापित्यांची सेवा, मला हातात ताट आणुन देणे वगैरे करणारा मुलगा कुणी देईल काय? गरज पडल्यास घरदार आणि पोर सांभाळायला नोकरी सोडायची तयारी हवी. (एकुलता एक असला तरी माहेर वगैरे विसरुन जावं लागेल हे इच्छुकांनी लक्षात ठेवावे. आमच्यात बायकांना कामं सांगत नाहीत.) (असं दोन्ही बाजु कितीकही लिहु शकतील.. सिस्टीम दोन्ही कडुन चुकतेय. सरसकट एकाच पक्षावर कसं बोलता येईल? आणि हो.. डिपेंडंट व्हिजाबद्दल निरीक्षण चांगलं असलं तरी सरसकट सर्वांनाच ते लागु होत नसतं हे ही नमुद करते. मागेही एकदा स्त्रियांच्या "डिपेंडंट" स्टेटस बद्दल कुजकट शेरे आले होते. अर्थात ते अज्ञानाचेच लक्षण आहे. इतक्या वरवर शेरे मारावेत इतका सोप्पा मुद्दा तो नसतो. पण तो धाग्याचा विषय नसल्याने.. रामराम!)

In reply to by टवाळ कार्टा

नाय रे.. हात फार फुरफुरत आहेत.. खुप दिवसात "मैदान ए जंग" मध्ये उतरलेले पण नाहीये. पण साला वेळ नाहीये.. (तसंही माझं लग्न झालय.. माझ्या सग्गळ्या असतील नसतील त्या अपेक्षा पुर्ण झाल्या असल्याने मी धन्यवाद झालेय. आता दिवस तुझे हे फुलायचे आणि झोपाळ्या वाचुन झुलायचे बाबा..) (ताईचा सल्ला:- जास्त चर्चा करु नकोस.. उगाच लग्नावरचा विश्वास उडुन जायचा हो शाम..)

In reply to by पिलीयन रायडर

खिक्क...आता मैदानेजंग मध्ये नवीन खेळाडू आहेत... =)) बाकी "जास्त चर्चा करु नकोस.. उगाच लग्नावरचा विश्वास उडुन जायचा हो शाम" हा शाम कोण :)

In reply to by टवाळ कार्टा

बोलण्याची पद्धत आहे हो ती शाम.. असु दे असु दे.. शिकशीलच तू आता हळु हळु सगळं ;)

In reply to by टवाळ कार्टा

कट्ट्याचा गेला रे पण प्रश्ण असला कहर विचारलेला की आठवण आली की अजुन हसतोय =)) सूड उगवला हो एका वाक्यात ताईंनी =))