Skip to main content

दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 01/06/2015 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे. पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला. मी ६च्या कट्ट्याला १००% आहे. ७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही. पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल. शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.

वाचने 31170
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

In reply to by मुक्त विहारि

ह्या गोष्टीला काय म्हणावे बरे? >> चोखंदळ रसिक वृत्ती, मृत्यून्जयाने सांगितलेच आहे की वरती.

पाताळेश्वर लेणी किंवा संभाजी उद्यान गप्पा मारायला निवांत जागा आहेत. नंतर जेवण्याचेही भरपूर विकल्प जवळच आहेत.

In reply to by प्रचेतस

तुम्ही यणार असाल तरच, मुर्ती बघण्यात रस आहे. आंधळ्याला मेनकेचे न्रुत्य दाखवू नये आणि बहिर्‍याला भीमसेनांचे गाणे ऐकवू नये. (तुमच्या शिवाय अशा ठिकाणी जाणे म्हण्जे, आंधळा + बहिरा) मुवि

In reply to by प्रचेतस

शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश जवळच आहे.
त्रिशुंड शिल्पसमृद्ध? त्रिशुंडाला शिल्पसमृद्ध म्हणणे म्हणजे खाटेत चिरडलेल्या ढेकणाला हुतात्मा म्हणण्यापैकी झालं!! =))

In reply to by बॅटमॅन

पण शिल्पसमृद्ध म्हणजे जरा अति नै का वाटत? भुलेश्वराला शिल्पसमृद्ध म्हणणं मी समजू शकतो. चार फिरंग्यांची शिल्प एक दोन ते व्याल का शरभ येवढं सोडून काय आहे तिथे?

In reply to by सूड

गजान्तलक्ष्मी, किन्नर, गेंडा, नटराज, लिंगोद्भव शिव, मकर, यंत्र, कीचक, द्वारपाल आणि बरेच काही.

In reply to by प्रचेतस

हे असं मिपावर लिहीता ते प्रत्यक्ष स्थळी गेल्यावर पण दाखवत चलावं, तिथे आपण मोजकंच बोलता. मग आमच्यासारख्यांना त्या दगडांमधली शिल्पसमृद्धता कळावी ती कशी?

In reply to by सूड

त्या देवळाचा आकार पाहता, जेवढी अन जशी शिल्पे तिथे आहेत ती उत्तमच आहेत. शिल्पसमृद्ध- वेल, अंमळ अतिशयोक्ती असेलही, पण ढेकूण-हुतात्मा तुलनेइतकीही प्रचंड अतिशयोक्ती नाही.

In reply to by यशोधरा

अद्याप यजमान(?) पुणेकरांनी जागा ठरवलेली नाही.त्यातून जास्त घोळ नको म्हणून २ तारखा ठरवल्या.ज्याला जिथे सोईस्कर, त्याने तिथे यावे म्हणून. इकडे आम्ही तिकीटे पण काढून बसलो. बादवे, (आजकाल पुणे जरा जास्त वाढलेले दिसतं ? की पुण्यातील मिपाकरांची संख्या जास्त आहे? की पुणेकर मिपाकरांत एकी नाही? ह्या विषयावर एखादा परीसंवाद आयोजीत करावा म्हणतो. )

चायला कै तो घोळ घालत गोल गोल परत परत तेच तेच*, दोन शतकी शतकी** काढूनसुध्धा एक ठिकाण ठरवता येत नै...आत्ताच आयोजकांबरोबर बोलणे झाले...काही नवीन माहीती मिळाली -
  • काही कट्टेकर्यांना कुठे खातो याचा त्रास पोटापाण्याच्या उद्योगावर होउ शकतो
  • अपेयपानाबाबत अनाहिता मिपाकरांची प्रतिक्रिया कशी असेल याबाबत साशंकता असल्याने तसेच पिंचिमध्ये मुले-मुली (सग्ळे मिपाकर कट्ट्याला मुले/मुलीच्च अस्तात) एकत्र अपेयपान करु शकतील अशी डिसेंट ठिकाणे कमी/जवळजवळ नाहीत (असल्यास सुचवावीत) त्यामुळे ६ चा कट्टा हा सामिष असेल परंतू अपेयपानाचा बेत आफ्टर-कट्टा असेल (याबाबत इच्छूकांना व्यनी करणेत येईल)
आयोजक सर्वसमावेशक विचारांचे असून्सुध्धा मेंब्रं मात्र पुण्यवंत असल्याकारणाने आयोजकांना ठिकाण ठरवण्यात थोडे बिचकायला झाले असावे अशी शंका घेण्यास वाव आहे तस्मात मी व्हेटो वापरून कट्टा पिंचिजवळ असेल कारण जास्त कट्टेकरी त्या भागातील आहेत असा ठराव पास केलेला आहे...या भागातील उत्तम खाणे (चिकन + मासे + घासफूस) मिळणारे ठिकाण लवकरच जाहिर केले जाईल. *चायला अस्ले घोळ घालत बसून वर त्याला चोखंदळपणा म्हणणे म्हणजे हैट्ट आहे...ठाणे-मुंबैकर बरे...जे पहिले चांग्ले ठिकाण आठवेल कट्टा तिथे...दुसरे चांगले ठिकाण सुचवले गेले तर पुढचा कट्टा तिथे **हा धागासुध्धा शतकी होईल अशी लक्षणे दिसायला लागलेली आहेत ;) स्वगत - मुवि...एकदा आमच्या इथे सुध्धा चक्कर टाका...नंदी पॅलेसला तोडीसतोड जागा दाखवतो (फक्त ते गाणे गाणारा नाहीये)

In reply to by टवाळ कार्टा

कट्टा पिंचिजवळ असेल कारण जास्त कट्टेकरी त्या भागातील आहेत असा ठराव पास केलेला आहे...या भागातील उत्तम खाणे (चिकन + मासे + घासफूस) मिळणारे ठिकाण लवकरच जाहिर केले जाईल. पहिल्यापासून सांगतो आहे ग्रीनपार्क. पिंचि आणि पुणे सगळ्यांना मध्यवर्ती आहे तर तुम्ही ऐकत नाही मग काय करणार. चोखंदळ फार तुम्ही. चायला अस्ले घोळ घालत बसून वर त्याला चोखंदळपणा म्हणणे म्हणजे हैट्ट आहे...ठाणे-मुंबैकर बरे...जे पहिले चांग्ले ठिकाण आठवेल कट्टा तिथे...दुसरे चांगले ठिकाण सुचवले गेले तर पुढचा कट्टा तिथे आधी पुणे ठरलेले असताना घोळ घालुन पिम्चिकडे नेणारे सगळे अपुणेकर आणि पुणेकरांन्या शिव्या. यह बात कुछ हजम नही हुइ. पुणेकर आहेतच चोखंदळ त्याला काय करणार आता,

In reply to by मुक्त विहारि

माझ्यातर्फे फायनल. पण कट्ट्याचा आयोजक नक्की कोण हे कळाले तर ठिकाण फायनल करता येइल त्याच्याबरोबर बोलुन.

In reply to by मृत्युन्जय

पुण्यात सगळेच "आयोजक" आहेत. मला ग्रीन-पार्क, संभाजी पार्क, सारस बाग, सावरकर उद्यान, काहीही चालेल. चार गप्पाच तर हाणायच्या आहेत. एखादी चहाची टपरी किंवा कानिफनाथ उसाचे गुर्‍हाळ पण चालेल. पण ठिकाण ठरवा.

In reply to by मुक्त विहारि

माझ्यातर्फे फायनल. पण कट्ट्याचा आयोजक नक्की कोण हे कळाले तर ठिकाण फायनल करता येइल त्याच्याबरोबर बोलुन.

In reply to by मृत्युन्जय

बा म्रुत्युंजया, आता तूच हो आयोजक आणि ६ ता.चा ग्रीनपार्क हेच कट्ट्याचे ठिकाण नक्की करू या. शुभेच्छा देणारे तसे पण शुभेच्छा देणारच आणि येणारे येणारच.

In reply to by टवाळ कार्टा

हेहेहे! दंतशिल्प कार!!! डोळ्यासमोर चित्र उभे राहिले, अजया हातात पिटुकले छिन्नी हातोडे घेऊन पेशंटच्या (किंवा टक्याच्या?!) दातांवर गणपती, भैरव, चण्डिका, सर्प, गरुड़, शरभ, वगरे कोरतेय... दोन सूळया वर मात्र २ बाजूला जय विजय... =))

ग्रीन पार्क करुन टाका की फायनल. काथ्याचा कुटुन कुटुन चोथा झाला ए आता :( लवकर जाहीर करा ठिकाण अन वेळ .....

किती तो घोळ! ६ चा वेगळा धागा काढा. इथे ७ ची चर्चा होऊ द्या. ७ ला सकाळी कट्टा होणार, हे नक्की आहे ना? ६ ला तीर्थप्राशन केल्यावर त्याचा असर उतरण्याच्या आत ७ ला पुन्हा तीर्थप्राशन करण्याचा विचार आहे की काय?

१. ग्रीन पार्क , बाणेर २. मेझ्झा नाईन हिंजवडी ३. सदानंद . बाणेर ४. राहूल , औंध ( पण जागा छोटी आहे ) ५. कोपाकबाना , जगताप डेअरी ६. निसर्ग , कोथरूड ७. गार्डन कोर्ट , चांदणी चौक ८. अप अँड अ‍ॅबॉव्ह .चांदणी चौक. ९. राजवाडा , बाणेर १० . सर्जा , औंध ११. किवा आयव्ही , बाणेर १२. अँब्रोशिया , चांदणी चौक १३. 7-seas-wine-n-dine , बाणेर.

६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६:०० पासून मेझ्झा नाईन, हिंजवडी इथे सुरू होईल
७ चा कट्टा दुपारच्या जेवणासाठी १२:३० वाजता आनंदी डायनींग हॉल, माणिक बाग इथे असेल


In reply to by टवाळ कार्टा

हिंजवडी अंमळ लांब असल्याने या कट्ट्यास येणे जमणार नाही. पक्षीतीर्थ होऊन सात तारखेच्या कट्ट्याला कोणी शिल्लक उरलंच तर मग माणिकबागेत भेटू..!!

In reply to by सूड

मुवि आणि सगा तुझ्या घराच्या आधीच्या बिल्डिंगमधून कट्ट्याला येणार आहेत त्यामुळे तुझी होणारी अतिरिक्त मेहनत समजून घेतली जाईल :P

In reply to by टवाळ कार्टा

>>मुवि आणि सगा तुझ्या घराच्या आधीच्या बिल्डिंगमधून कट्ट्याला येणार आहेत त्यामुळे तुझी होणारी अतिरिक्त मेहनत समजून घेतली जाईल
कृपया संदर्भासहित स्पष्टीकरण द्या.

In reply to by प्रसाद गोडबोले

अर्रे बरीच खलबते केल्यावर हे बजेटवाले हॉटेल आहे असे सांगितले गेले आहे...म्हणूनच बाकीची महागातली हॉटेले कटाप केल्ती... तु ये तुला फुकट देतो...अस्से म्हणेलच कोणीतरी ;)

In reply to by प्रचेतस

बारबेक्यू नेशन बेश्ट आहेच ! एवढा मोठा ग्रुप आणि हे पक्षी + तीर्थ + डीसेंट अशा कॅतेगरीमुळे हॉटेलची रेंज वाढली आहे. अवांतर : सर्व बारमध्ये जेवण महागच असता :(

In reply to by टवाळ कार्टा

तुला ज्याने कोणी मेझ्झा ९ हे बजेट होटेल म्हणुन सुचवले असेल त्याचा कट्ट्याला 'सत्कार' करावा असे सुचवत आहे ! मद्यपानासाठी निगडी मधील वैशाली बेस्ट ! एकदम अ‍ॅफोर्डेबल रेट आणि बेस्ट अ‍ॅम्बियन्स ! फक्त एकच वाईट आहे की तु बास म्हणे पर्यंत चकणा आणुन देत रहातात आणि मग कचकुन चकणा खल्ल्याने जेवण जात नाही ! बाकी शेजारीच खास कोल्हापुरी होटेल्स आहेत , पन्हाळगड हे बर्‍यापैकी महाग असले तरीही तिथला तांबडा पांढरा कोलापुरीच्या बर्‍यापैकी जवळ जाणार आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

आणि हो , हॉटेल वैशाली बार बाहेर लावलेले प्रियान्का चोप्रा चे ब्लेन्डर्स प्राईड चे पोस्टर मला फार अवडते ;) http://www.pinkvilla.com/files/imagecache/ContentPreview/blenders_29.jp…

In reply to by टवाळ कार्टा

डिसेंट हॉटेलात मद्यपान करावे इतका मी हुच्च राहिलो नाही राव अता , मुंबैत होतो तोवर ठीक होते , अता मी चिंचवड गावात (तेही नदी पलीकडे रहाणारा ) गरीब माणुस आहे . सगळे जण जर हुच्च असतील तर कोपाकबाना वाकड http://www.burrp.com/pune/copacabana-wakad-listing/54325 येथे जाऊ शकतो , तेही बर्‍यापैकी महाग आहे पण अप्रतिम अ‍ॅम्बियन्स आणि मस्त जेवण ! ( आणि माझा स्वार्थ असा की मला इथली थाई प्रॉन्स करी प्रचंड आवडली आहे , ह्या निमित्ताने परत खाता येईल )

In reply to by प्रसाद गोडबोले

मेझ्झा ९ अणि कोपाकबाना अगदी सारखेच आहेत. जणू एकाच मालकाचे असावेत. बाकी मला थाई करी मेझा ९ ची जास्त आवडली होती तर लसान्या कोपाकबानाचा.

In reply to by प्रचेतस

ह्या कट्ट्यालाही घासफुस वाल्यांची मेजॉरीटी असणार असा अंदाज आहे , तुम्ही लेको परत एकदा खादाडी हायजॅक करणार अन आम्हाला पनीरबीनीर खायला लावणार :-\ ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ नाहीतर गणेशा म्हणतो त्या समाधान हॉटेलला , रावेत मधे , जाऊन आलो असतो !!

In reply to by टवाळ कार्टा

अर्रे बरीच खलबते केल्यावर हे बजेटवाले हॉटेल आहे
हे त्या व्यक्तीने त्याच्या बजेटचा हिशोब करुन सांगितल्याची शक्यता नाकारता येत नाही.

In reply to by सूड

फक्त कर्ड राईस - २००+ असा रेट पाहिला, जेवुन निघताना त्या कर्डाचं एखादं लहानस मडक तर नाही ना बांधुन देत घरी न्यायला ?

In reply to by टवाळ कार्टा

असो, तसंही सहाच्या कट्ट्याला मी नसल्याने या चर्चेतून मी रजा घेतो. झालाच सात तारखेचा कट्टा तर कृपया तसे कळवणे, हजेरी लावल्या जाईल. ॥ इत्यलम्॥

In reply to by टवाळ कार्टा

जनहितार्थ,

आनंदी डायनींग हॉल, माणिक बाग कडे जाणार्‍या रस्त्यांचे डीटेलवार वर्णन द्यावे.

तेथे अगोदर गेलेलो नाही. इतरही काही आमच्यासारखे अनभिज्ञ लोक असू शकतील !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ठिकाण ठरवताना दोन दिडशतकी धागे खर्ची पडले असतानासुध्धा असा प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवल्याबद्दल मंडळ तुमचा सत्कार एक GPS cover देउन करत आहे :) अखिल्पुणेकट्टाआयोजक्समिती

In reply to by टवाळ कार्टा

हे ठिकाण पाच वर्ष माणिकबाग एरियात राहूनही मलाही माहिती नाही. कुठे आहे नेमके? मुख्य सिंहगड रस्त्यावर कुठे? ब्रम्हाच्या आसपास? पेट्रोल पंपाजवळ ? खाऊ गल्लीच्या जवळ ?

In reply to by टवाळ कार्टा

भाराभर चर्चा झाली असली तरी त्यात ठरलेल्या जागेचा डिट्टेलवार पत्ता नाही (यात ईशेष आसं कायच नाय, न्हेमीचंच हाय. पन आप्ली येक आठ्वन क्रून दिली) तेव्हा... टवाळगिरी करण्याऐवजी सरळ सरळ उत्तर (पत्ता) दिल्यास सज्जन मिपाकर तुमचा सत्कार करतील, अन्यथा कट्ट्यावर 'सत्कार' करतीलच ! :) ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

बहुधा हे असावे: http://www.justdial.com/Pune/Anandi-Dining-Hall-%3Cnear%3E-Manik-Baug-M… http://www.justdial.com/Pune/Anandi-Dining-Hall-%3Cnear%3E-Manik-Baug-M… जाणकारांनी कृपया कन्फर्म करावे. मी गेली २० वर्षे पुण्यात राहतो आहे. पण आनंदी डायनिंग हॉल बद्दल कधी ऐकलेले नाही. कट्ट्ञाचा मुख्य उद्देश हा भेटणे असला तरी आनंदीची क्वालिटी बरी आहे हे कन्फर्म करण्याइतपत तिथे कोणी जाउन आलेले आहे काय? अन्यथा विष्णुजी की रसोइ चा पर्याय सुचवु इच्छितो. असो. याहुन जास्त कन्फ्युजन टाळण्यासाठी एक अंतिम सूचना कम हजेरी धागा सुरु करावा ही विनंती परत एकदा करतो.

In reply to by मृत्युन्जय

याहुन जास्त कन्फ्युजन टाळण्यासाठी एक अंतिम सूचना कम हजेरी धागा सुरु करावा ही विनंती परत एकदा करतो. सहमत ! त्या भागात अनेक वर्षांत जाणे न झाल्यामुळे मलाही केवळ "आनंदी डायनिंग हॉल, माणिक बाग" यावरून पत्ता वाटेत विचारत विचारतच जावे लागेल. माझ्यासारख्या पुणेकरांच्या आणि पुण्याबाहेरून येणार्‍यांच्या सोईसाठी आयोजकांनी सविस्तर पत्ता देणे आवश्यक आहे. मार्गदर्शक पत्त्याचे एक चांगले उदाहरण इथे सापडेल.

सात साथ है! कट्टा+टका दर्शनोत्सुक नाखु

In reply to by टवाळ कार्टा

नाही गोंधळ पुण्याबाहेरचे घालतात. त्यामुळे हजेरी नीट कळावी या उद्देशाने वेगळा धागा काढावा असे सुचवले. कट्टा आयोजक नक्की कोन आहे ते अजुन कळाले नाही. कोण करते आहे सगळी व्यवस्था?