Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by मुक्त विहारि on Mon, 06/01/2015 - 10:35
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे. पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला. मी ६च्या कट्ट्याला १००% आहे. ७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही. पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल. शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
  • Log in or register to post comments
  • 31048 views

प्रतिक्रिया

Submitted by मृत्युन्जय on Mon, 06/01/2015 - 11:20

Permalink

मुंबैला त्यामानाने जवळ पडेल

मुंबैला त्यामानाने जवळ पडेल आणि पुण्यात कुणालाही पटकन सापडेल असे ठिकाण म्हणुन मी ग्रीनपार्कचे नाव सुचवतो. अपेयपान आणि अभक्ष्यभक्षणाची सोय आहे. मोठ्या ग्रुपला सामावुन घेण्यासारखी आसनक्षमता आहे, आठच्या आधी पोचणार असल्यास ते आरक्षण देखील घेतात. सर्व्हिस निवांत आहे. त्यामुळे निवांतपणे बसता येइल ;). दर मात्र रग्गड आहेत हे ध्यानात घ्यावे. ते नको असल्यास म्हात्रे ब्रिज वरचे हार्वेस्ट कॉर्ट अथवा मल्टि स्पाइस देखील बरे ऑप्शन्स आहेत. मल्टि स्पाइस मध्ये अपेयपान आणि अभक्ष्यभक्षणाची सोय आहे की नाही ते माहित नाही. मुख्य म्हणजे कुणालातरी एकाला अधिकार द्या जागा ठरवायचे नाहितर शेवटपर्यंत चिवडा होइल
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Mon, 06/01/2015 - 12:02

In reply to मुंबैला त्यामानाने जवळ पडेल by मृत्युन्जय

Permalink

मल्टीस्पाईस ओके आहे. ठीकठाक,

मल्टीस्पाईस ओके आहे. ठीकठाक, मात्र बसू देतात आणि दंगा केलेला चालतो.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 06/01/2015 - 12:03

In reply to मुंबैला त्यामानाने जवळ पडेल by मृत्युन्जय

Permalink

जागा ठरवायच्या अधिकाराची

जागा ठरवायच्या अधिकाराची वस्त्रे सगा, वल्ली व औरंगजेब यांच्याकडे सुपूर्द करणेत आलेली आहेत
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Mon, 06/01/2015 - 14:01

In reply to जागा ठरवायच्या अधिकाराची by टवाळ कार्टा

Permalink

माझेच नक्की नै रे अजून.

माझेच नक्की नै रे अजून.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on Mon, 06/01/2015 - 16:40

In reply to माझेच नक्की नै रे अजून. by प्रचेतस

Permalink

माझेही नक्की नाही .

माझेही नक्की नाही . कल्लापुरातुन एक लग्नाचे आमंत्रण आले आहे , सहसा मी लग्न बिग्नं अटेंड करत नाही पण मित्रांन्ना भेटायला म्हणुन तिकडे जावे काय असा विचार चालु आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशाखा पाटील on Mon, 06/01/2015 - 11:32

Permalink

लवकर ठरवा!

कट्ट्याचा दिवस, वेळ आणि ठिकाण एक-दोन दिवसांत ठरवावे. त्यानुसार पुढील कार्यक्रम ठरवायचे आहेत. ग्रीनपार्कच्या सर्विस आणि आसनक्षमतेबाबत सहमत. परंतु ते लांब आणि महागडे आहे. एखाद्या बागेत भेटून त्यानंतर जवळपासच्या ठिकाणी जेवायला जायचाही विचार करावा. हाटेलात ग्रुपमध्ये संवाद होत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 06/01/2015 - 12:32

In reply to लवकर ठरवा! by विशाखा पाटील

Permalink

+१

सूचवणीला जोरदार अनुमोदन. शिवाय थाळी जिथे दोन्ही जोर्दार मिळते असे ठिकाण असल्यास वेळ वाचतो असे निरिक्षण आहे.बाकी आयोजक (प्रायोजक नव्हे) जे ठरवतील ते ब्येस असेलच.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 06/01/2015 - 12:44

In reply to +१ by नाखु

Permalink

अनुमोदन!

अनुमोदन!
  • Log in or register to post comments

Submitted by मनिष on Mon, 06/01/2015 - 12:26

Permalink

मी पण येईन - नक्की ठरले की

मी पण येईन - नक्की ठरले की कळवा! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on Mon, 06/01/2015 - 13:36

Permalink

मी पण येणार!!!!

मी पण येणार!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 06/01/2015 - 13:39

Permalink

द मामि याच!

द मामि याच!
  • Log in or register to post comments

Submitted by स्वीत स्वाति on Mon, 06/01/2015 - 14:03

Permalink

मी पण ...

येणार फक्त रविवार ठरवा..
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 06/01/2015 - 14:23

Permalink

दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद

दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद बघून खालील मेंब्रं ६ ला संध्याकाळी अथवा ७ ला दुपारी होणार्या कट्ट्यापैकी एकाला (अथवा दोन्हींना) हजर असतील ६ ला संध्याकाळी आधी गप्पाटप्पा व नंतर पक्षी + तीर्थ + धुम्रचैतन्यकांडी(कोणाला लागलीच तर) असणारा कट्टा होईल ज्यांना या कट्ट्यास उपस्थित रहाणे नै जमणार (कोणत्याही कारणाने) ते ७ ला दुपारच्या कट्ट्यास येउ शकतात ७ ला दुपारी बादशाहीमध्ये सोज्वळ कट्टा असेल...दुपारच्या जेवणानंतर मुंबैवाले घराकडे कूच करतील नेहमीचे कट्टेकरी मुक्त विहारि - कट्ट्याची उत्सवमुर्ती कोणीही असली तरी पहिले नाव हेच्च टवाळ कार्टा अत्रुप्त सतिश गावडे कॅप्टन जॅक स्पॅरो सूड बाबा पाटील (दंबूकवाले) मृत्युन्जय पुण्याचे पेशवे कपिलमुनी नाद खुळा कंजूस gogglya मोदक प्रगो / गिर्जाकाका / औरंगजेब इस्पीकचा एक्का - ७ ला मनिष दमामि अनाहिता ग्यांग विशाखा पाटील अजया - ७ ला यशोधरा स्वीत स्वाति तळ्यात-मळ्यात करणारे अद्द्या - ७ तार्खेला असेल तर . परयत्न केल्या जाइल प्यारे१ - 70 हो-30 नाही शक्यता मंदार कात्रे - टायम भेटल का नाय तेच्यावर डिपेंड हाय प्रतिसाद देउनसुध्धा स्वतःच्या उपस्थितीबद्दल गुप्तता बाळगणारे आणि त्याच्याच बरोबर बाकीचे वल्ली - ??? बॅटमॅन - ??? SYG - ??? खटपट्या - ??? अत्रन्गि पाउस - ??? गणेशा - ??? चलत मुसाफ़िर - ???
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 06/01/2015 - 14:28

In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा

Permalink

बादशाहीमध्ये कट्टा?

बादशाहीमध्ये कट्टा?
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 06/01/2015 - 14:46

In reply to बादशाहीमध्ये कट्टा? by सूड

Permalink

अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो

अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो. चुकुन सुद्धा करु नका. एकतर बादशाही ऑव्हरहाएप्ड आहे आणि दुसरे म्हणजे चुकुन थोडाफार कल्ला केला तर बादशाहीवाले एखाद दोन पाट्या दाखवुन कट्टेकर्‍यांची तोंडे बंद करायचे. व्हेरी बॅड आयडिया फोर कट्टा. त्यापेक्षा दुर्वांकुर ट्रायवावे असा सल्ला देतो.
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 06/01/2015 - 14:53

In reply to अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो by मृत्युन्जय

Permalink

दुर्वांकूर

खूपवेळा झाले आहे तेव्हा नवे थाळी ठिकाण (ऐस्पैस सुचवणे) असेल त्याच परिघात किंवा संभाजी बागेचे आसपास. भेट अर्थात पहिल्यांदा बागेत किंवा पाताळेश्वर येथे मग खादाडी असे.
पाताळेश्वर न पाहिलेले असे किती ? हात वर करा!! वल्लीबरोबर न पाहिलेले किती ? हात वर करा !!
आता वरील हातवाल्यांची बेरीज जास्तीची मेजॅरिटी घोषीत करावी ही विनंती. लपाछपी-शिवणापाणी-रूमाल्पाणी फेम जास्तीची मेजॅरिटी नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 06/01/2015 - 14:54

In reply to अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो by मृत्युन्जय

Permalink

http://www.misalpav.com

http://www.misalpav.com/comment/701554#comment-701554 या टैपचे ठिकाण ठरवा
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 06/01/2015 - 14:29

In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा

Permalink

मल्टिस्पाईस काय वाईट आहे मग?

मल्टिस्पाईस काय वाईट आहे मग?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 06/01/2015 - 14:38

In reply to मल्टिस्पाईस काय वाईट आहे मग? by सूड

Permalink

काहीजणांना सोज्वळ कट्टा

काहीजणांना सोज्वळ कट्टा अश्याच ठिकाणी हवाय जिथे अभक्ष्य-भक्षण व अपेयपानाची सोय नसेल
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 06/01/2015 - 14:55

In reply to काहीजणांना सोज्वळ कट्टा by टवाळ कार्टा

Permalink

वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते

वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते वाच, अगदी सात्विक हवं असेल तर दुर्वांकूर (इथे रविवार असल्याने पुणेकर रीघ लावणार आणि दुर्वांकुरवाले कदाचित आवरायची घाई करायला लावणार), मल्टिस्पाईस माझ्यामाहितीप्रमाणे सात्विक आहे. राजधानी, सुकांता, वाडेश्वर हे ऑप्शन आहेत. बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं असेल तो तुझा कट्टर दुश्मन आहे असं समज!! =))
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 06/01/2015 - 15:35

In reply to वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते by सूड

Permalink

बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं

बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं असेल तो तुझा कट्टर दुश्मन आहे असं समज!! =))
एका प्रसिध्ध आयडीने सुचवलेले...मी नाव नै सांगण्णार :)
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 06/02/2015 - 01:38

In reply to वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते by सूड

Permalink

बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं

बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं असेल तो तुझा कट्टर दुश्मन आहे असं समज!! =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Mon, 06/01/2015 - 14:57

In reply to काहीजणांना सोज्वळ कट्टा by टवाळ कार्टा

Permalink

माझ्या माहिती प्रमाणे

माझ्या माहिती प्रमाणे मल्टीस्पाईस मधे तिर्थपानाची व अभक्ष भक्षणाची सोय नाही. या शिवाय मल्टीस्पाईस मधे रोज सकाळी ७ ते ११ या वेळात अमर्यादीत ब्रेकफास्ट ची सोय आहे. रु १५० रु/- प्रतिमाणशी या दराने. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 06/01/2015 - 15:02

In reply to माझ्या माहिती प्रमाणे by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

सकाळी ७ ते ११ या वेळात

सकाळी ७ ते ११ या वेळात अमर्यादीत ब्रेकफास्ट ची सोय आहे.
+१
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 06/01/2015 - 15:36

In reply to माझ्या माहिती प्रमाणे by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

सकाळी ७ ते ११ या वेळात

सकाळी ७ ते ११ या वेळात अमर्यादीत ब्रेकफास्ट
हा हा हा...७ ते ११ चा कट्टा करायचा का? हाकलून लावतील ते मिपाकरांची खादाडी बघून ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 06/01/2015 - 15:46

In reply to सकाळी ७ ते ११ या वेळात by टवाळ कार्टा

Permalink

७ ते ११ चा कट्टा करायचा का?

७ ते ११ चा कट्टा करायचा का? हाकलून लावतील ते मिपाकरांची खादाडी बघून ;)
आदल्यादिवशी पक्षीतीर्थ केलेले सकाळी सातला जागे होतील का? जमल्यास फोनव.
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Mon, 06/01/2015 - 15:47

In reply to सकाळी ७ ते ११ या वेळात by टवाळ कार्टा

Permalink

ऐडीया वैट्ट नाही आही. मी गेलो

ऐडीया वैट्ट नाही आही. मी गेलो होतो तेव्हा त्यांचा स्प्रेड असा होता: १. ईडली सांबार चटणी २. डोसा ३. समोसा ४. ब्रेड बटर जाम (ग्रिल पण होते) ५. पास्ता ६. उपमा ७. पराठे (बटाटा) ८. चहा / कॉफी बहुधा मेदु वडे पण होते. आठवत नाही. इडली छान होती. सांबार मस्त होते. पराठे बरे होते. पास्ता चांगला होता. समोसे बोर होते. उपमा आवडला होता. डोसे चांगले होते पण बनवायला बराच वेळ लागत होता. चहा ठीक होता. कॉफी नथिंग स्पेशल. ब्रेड बटर काय नेहमीचेच. एकुणात किंमतीच्या मानाने १० /१०. बाकी ठीकठाक. १० पैकी ६/७
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 06/01/2015 - 15:49

In reply to ऐडीया वैट्ट नाही आही. मी गेलो by मृत्युन्जय

Permalink

आम्ही गेलो होतो तेव्हा शिरा,

आम्ही गेलो होतो तेव्हा शिरा, सॅंडविचेस, आणखी एक दोन चांगले पदार्थ होते, नावं आठवत नाहीयेत.
  • Log in or register to post comments

Submitted by यसवायजी on Mon, 06/01/2015 - 19:03

In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा

Permalink

सध्या परिक्षा + अभ्यास यासाठी

सध्या परिक्षा + अभ्यास यासाठी रजा काढली आहे. त्यामुळे कट्ट्याला यायला जमणार नाही. थोडा वेळ भेटायला जमते का ते बघतो. नक्कीच.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रन्गि पाउस on Wed, 06/03/2015 - 00:50

In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा

Permalink

व्य नि

केलाय
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 06/01/2015 - 15:05

Permalink

मल्टीस्पाईस ठरवुन टाका ना मग!

मल्टीस्पाईस ठरवुन टाका ना मग! हे सातच्या कट्टयाबाबत आहे ना?
  • Log in or register to post comments

Submitted by ओल्द मोन्क on Mon, 06/01/2015 - 16:03

Permalink

ठिकाण कळवा..

नक्कीच हजेरी लावणार… लवकरात लवकर ठिकाण कळवा …
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Mon, 06/01/2015 - 16:30

Permalink

मुंबैवाले पोहोचु शकतील का

मुंबैवाले पोहोचु शकतील का ब्रेफाला?
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Mon, 06/01/2015 - 16:35

In reply to मुंबैवाले पोहोचु शकतील का by अजया

Permalink

मुंबैवाले सगळे ६ च्या

मुंबैवाले सगळे ६ च्या कट्ट्यासाठी मुक्कामाच्या तयारीने येत आहेत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 06/02/2015 - 08:41

In reply to मुंबैवाले सगळे ६ च्या by टवाळ कार्टा

Permalink

मुक्काम धन्याकडे का? ;)

मुक्काम धन्याकडे का? ;)
  • Log in or register to post comments

Submitted by सतिश गावडे on Tue, 06/02/2015 - 09:45

In reply to मुक्काम धन्याकडे का? ;) by प्रचेतस

Permalink

तसं असेल तर:

तसं असेल तर: १. आपापली अंथरुणं-पांघरुणं, स्लिपींग बॅग वगैरे घेऊन येणे. २. वस्तीनिमित्त हॉल, सकाळच्या विधींसाठी संडास-बाथरुम* विनामुल्य उपलब्ध करुन दिला जाईल. ३. आंघोळीसाठी गरम पाणी विनंती केल्यास मिळू शकेल. ४. तीर्थप्राशन कटाक्षाने बाहेरच उरकून यावे. ५. रिचार्ज न केलेल्या डिटूएच कनेक्शनबद्दल केलेली शेरेबाजी खपवून घेतली जाणार नाही. ६. नोकियाचा चार्जर आहे का असे विचारू नये. ७. माझ्या बुकशेल्फवरील सहाशे पुस्तकं पाहून "मी हे पुस्तक वाचायला नेऊ का?" अशी विचारणा करु नये. ८. मला सूडच्या घरी सोडून येतो का अशी विनंती करु नये. *रेस्टरुम या शब्दांचा अर्थ विश्रांतीगृह असा घेतला जाऊ नये म्हणून दैनंदिन वापरातील शब्द वापरले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 06/02/2015 - 09:55

In reply to तसं असेल तर: by सतिश गावडे

Permalink

खी खी खी.

खी खी खी. अजून काही सूचना चार जीने चढून दम लागल्यास कुरकुर करू नये. सकाळी उठल्यावर चहा (व नाष्ट्याचीही) अपेक्षा करू नये. हवे असल्यास सिंहगड रोडवर टपरीवर करून यावा.
  • Log in or register to post comments

Submitted by खटपट्या on Tue, 06/02/2015 - 10:40

In reply to तसं असेल तर: by सतिश गावडे

Permalink

अजून काही प्रश्न :

अजून काही प्रश्न : १. अन्घोळीचा साबण ज्याचा त्याने आणायचा आहे की तुमच्या तर्फे पुरवला जाईल ? २. टूथपेस्ट पुरवली जाईल की ज्याची त्याने आणायची आहे ? ३. संडास भारतीय बैठक आहे की कमोड? ४. वाय फाय आहे का ? सद्यातरी एवढेच...
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Tue, 06/02/2015 - 18:51

In reply to अजून काही प्रश्न : by खटपट्या

Permalink

आंघोळीच्या साबणाचे निम्मे

आंघोळीच्या साबणाचे निम्मे पैसे घेतले जातील. टुथपेस्ट पुरवली जाईल मात्र तिघांमधे मिळुन एकचं टुथब्रश पुरवला जैल. वायफायचे वेगळे पैसे पडतील.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Tue, 06/02/2015 - 18:53

In reply to आंघोळीच्या साबणाचे निम्मे by कॅप्टन जॅक स्पॅरो

Permalink

@गावडे

तुमचा एजंट छान आहे..
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Tue, 06/02/2015 - 15:26

In reply to तसं असेल तर: by सतिश गावडे

Permalink

८. मला सूडच्या घरी सोडून येतो

८. मला सूडच्या घरी सोडून येतो का अशी विनंती करु नये.
माझ्याकडे येणार्‍यांनी घरातल्या पसार्‍यावर कमेंटी मारल्यास काळवेळ न बघता त्यांच्या मदतीने तो पसारा आवरण्यास सुरुवात करण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 06/01/2015 - 16:54

Permalink

टक्याचं हे अपत्य अडणार बहुतेक

टक्याचं हे अपत्य अडणार बहुतेक!! =))))
  • Log in or register to post comments

Submitted by कॅप्टन जॅक स्पॅरो on Mon, 06/01/2015 - 19:04

In reply to टक्याचं हे अपत्य अडणार बहुतेक by सूड

Permalink

"कळ"लाव्या सूडुक

"कळ"लाव्या सूडुक (नारायण नारायण)
  • Log in or register to post comments

Submitted by उपास on Mon, 06/01/2015 - 16:58

Permalink

अरेरे..

सहा सातची मुंबई वारी आधीच ठरलेली आहे, आता पुण्यातल्या पुढच्या कट्ट्याची वाट बघणे आले. !
  • Log in or register to post comments

Submitted by शित्रेउमेश on Tue, 06/02/2015 - 08:14

Permalink

मी मिपा चा फक्त वाचक आहे....

मी मिपा चा फक्त वाचक आहे.... आम्हाला का आमंन्त्रण नाही???
  • Log in or register to post comments

Submitted by मुक्त विहारि on Tue, 06/02/2015 - 09:11

In reply to मी मिपा चा फक्त वाचक आहे.... by शित्रेउमेश

Permalink

तुम्हाला व्य.नि. केला आहे.

तुम्हाला व्य.नि. केला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अजया on Tue, 06/02/2015 - 08:35

Permalink

कटट्याचं ठिकाण वेळ बघा आणि

कटट्याचं ठिकाण वेळ बघा आणि जमत असलं तर यायचं.आमंत्रण कशाला पाहिजे?या बिनधास्त.
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 06/02/2015 - 09:08

Permalink

सिंहगड रोडवरच्या पु ल

सिंहगड रोडवरच्या पु ल देशपांडे उद्यानात घ्या की कट्टा! जेवण करायला 'य' हाटिलं हाएत. बुवाचा एखादा मेसवाला आनंदानं जेवायला घालेल. आमच्या भागात गन्धर्व म्हणून चांगलं झालंय pure veg रेस्टॉरेन्ट.
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 06/02/2015 - 10:18

In reply to सिंहगड रोडवरच्या पु ल by प्यारे१

Permalink

जेवण करायला 'य' हाटिलं हाएत.

सिंहगड रस्त्यावर पु ल देशपांडे उद्यानाच्या समोर, बँक ऑफ इंडियाच्या मागे "वन वे फुड्स" नावाचे छोटेसे हॉटेल आहे. त्यांच्या कडे पराठे मस्त मिळतात. बाकीचे पदार्थही छान असतात. त्यांचे रेट ही रिझनेबल आहेत. त्यांना फोन करुन अक्खे हॉटेलच बुक करायचे. (बसायला तेवढीच जागा आहे) https://www.zomato.com/pune/one-way-foods-sinhgad-road/menu#tabtop समिश आहारा साठी सत्कार (तेच मुंबईचे सुप्रसिध्द) चांगले आहे. पण फार गर्दि असते. राजाराम पुला जवळ ब्रम्हा व्हेज. निवांत बसता येईल पण क्वालिटी आणि सर्व्हीस जरा बेताचीच आहे. सवाई ची क्वालीटी बरी आहे. सर्व्हीस चांगली. पण गर्दी असते. किती वेळ बसुन देईल माहीत नाही. लवंगी मिर्ची फारच जास्त कोल्हापुरी आहे आणि नॉनव्हेज प्रेमिंसाठी उत्तम. गर्दी ही तशी कमीच असते. सुमधु कट्टा करण्यासारखे नाही. आनंदी डायनींग हॉल ची फुड क्वालीटी चांगली आहे. थाळी सिस्टीम आहे आणि खाणार्‍याला प्रेमाने वाढतात. शोरबा, पु ल देशपांडे उद्यानापासुन थोडे लांब आहे, पण सर्वच बाबतीत उच्च आहे. नवे आहे त्या मुळे गर्दी थोडी जास्त असते पण फुड क्वालीटी सर्व्हीस चांगली. या पेक्षा मल्टीस्पाईस जवळ पडेल. शोरबाच्याच गल्ली मधे एक दिल्ली का लखनौ चाट वाला आहे. त्याच्या कडले सगळे पदार्थ अप्रतिम असतात. (बसायला जागा फारच थोडीआहे), ओपन एअर) गिरीजा मातोश्री ची क्वालीटी ठीकठाक पण तिकडले वेटर फार उध्दट आहेत. फारवेळ बसु देतील की नाही ही शंका. मल्टीस्पाईसच्या जवळच सुप्रसिध्द शेफ विश्र्णु मनोहर यांचे विश्र्णुजी की रसोई चांगले ऐसपैस आहे. शाकाहरी बुफे पध्दतीने इकडे नागपुरी (का कोणते तरी) जेवण मिळते. कट्टा करायला आदर्श जागा. आगोदर बुक करुन ठेवायला लागेल. जवळाच्या बनियन ट्री मधे माझ्या आठवणी प्रमाणे एक कट्टा झाला आहे. बाकी आठवतील तशी सुचवतो. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Tue, 06/02/2015 - 10:44

In reply to जेवण करायला 'य' हाटिलं हाएत. by ज्ञानोबाचे पैजार

Permalink

विष्णुजीकी रसोई बद्दल + १.

विष्णुजीकी रसोई बद्दल + १. कट्ट्यासाठी आदर्श जागा आहे पण अभक्ष्यभक्षण आणि अपेअयपान नाही.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • पान 5
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com