Skip to main content

दीपक कुवैत ह्यांच्या बरोबर होणारा ६-७ जून पुणे कट्टा

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 01/06/2015 10:35 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या (http://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे. पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला. मी ६च्या कट्ट्याला १००% आहे. ७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही. पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल. शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.

वाचने 31170
प्रतिक्रिया 227

प्रतिक्रिया

मुंबैला त्यामानाने जवळ पडेल आणि पुण्यात कुणालाही पटकन सापडेल असे ठिकाण म्हणुन मी ग्रीनपार्कचे नाव सुचवतो. अपेयपान आणि अभक्ष्यभक्षणाची सोय आहे. मोठ्या ग्रुपला सामावुन घेण्यासारखी आसनक्षमता आहे, आठच्या आधी पोचणार असल्यास ते आरक्षण देखील घेतात. सर्व्हिस निवांत आहे. त्यामुळे निवांतपणे बसता येइल ;). दर मात्र रग्गड आहेत हे ध्यानात घ्यावे. ते नको असल्यास म्हात्रे ब्रिज वरचे हार्वेस्ट कॉर्ट अथवा मल्टि स्पाइस देखील बरे ऑप्शन्स आहेत. मल्टि स्पाइस मध्ये अपेयपान आणि अभक्ष्यभक्षणाची सोय आहे की नाही ते माहित नाही. मुख्य म्हणजे कुणालातरी एकाला अधिकार द्या जागा ठरवायचे नाहितर शेवटपर्यंत चिवडा होइल

In reply to by मृत्युन्जय

जागा ठरवायच्या अधिकाराची वस्त्रे सगा, वल्ली व औरंगजेब यांच्याकडे सुपूर्द करणेत आलेली आहेत

In reply to by प्रचेतस

माझेही नक्की नाही . कल्लापुरातुन एक लग्नाचे आमंत्रण आले आहे , सहसा मी लग्न बिग्नं अटेंड करत नाही पण मित्रांन्ना भेटायला म्हणुन तिकडे जावे काय असा विचार चालु आहे.

कट्ट्याचा दिवस, वेळ आणि ठिकाण एक-दोन दिवसांत ठरवावे. त्यानुसार पुढील कार्यक्रम ठरवायचे आहेत. ग्रीनपार्कच्या सर्विस आणि आसनक्षमतेबाबत सहमत. परंतु ते लांब आणि महागडे आहे. एखाद्या बागेत भेटून त्यानंतर जवळपासच्या ठिकाणी जेवायला जायचाही विचार करावा. हाटेलात ग्रुपमध्ये संवाद होत नाही.

In reply to by विशाखा पाटील

सूचवणीला जोरदार अनुमोदन. शिवाय थाळी जिथे दोन्ही जोर्दार मिळते असे ठिकाण असल्यास वेळ वाचतो असे निरिक्षण आहे.बाकी आयोजक (प्रायोजक नव्हे) जे ठरवतील ते ब्येस असेलच.

येणार फक्त रविवार ठरवा..

दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद बघून खालील मेंब्रं ६ ला संध्याकाळी अथवा ७ ला दुपारी होणार्या कट्ट्यापैकी एकाला (अथवा दोन्हींना) हजर असतील ६ ला संध्याकाळी आधी गप्पाटप्पा व नंतर पक्षी + तीर्थ + धुम्रचैतन्यकांडी(कोणाला लागलीच तर) असणारा कट्टा होईल ज्यांना या कट्ट्यास उपस्थित रहाणे नै जमणार (कोणत्याही कारणाने) ते ७ ला दुपारच्या कट्ट्यास येउ शकतात ७ ला दुपारी बादशाहीमध्ये सोज्वळ कट्टा असेल...दुपारच्या जेवणानंतर मुंबैवाले घराकडे कूच करतील नेहमीचे कट्टेकरी मुक्त विहारि - कट्ट्याची उत्सवमुर्ती कोणीही असली तरी पहिले नाव हेच्च टवाळ कार्टा अत्रुप्त सतिश गावडे कॅप्टन जॅक स्पॅरो सूड बाबा पाटील (दंबूकवाले) मृत्युन्जय पुण्याचे पेशवे कपिलमुनी नाद खुळा कंजूस gogglya मोदक प्रगो / गिर्जाकाका / औरंगजेब इस्पीकचा एक्का - ७ ला मनिष दमामि अनाहिता ग्यांग विशाखा पाटील अजया - ७ ला यशोधरा स्वीत स्वाति तळ्यात-मळ्यात करणारे अद्द्या - ७ तार्खेला असेल तर . परयत्न केल्या जाइल प्यारे१ - 70 हो-30 नाही शक्यता मंदार कात्रे - टायम भेटल का नाय तेच्यावर डिपेंड हाय प्रतिसाद देउनसुध्धा स्वतःच्या उपस्थितीबद्दल गुप्तता बाळगणारे आणि त्याच्याच बरोबर बाकीचे वल्ली - ??? बॅटमॅन - ??? SYG - ??? खटपट्या - ??? अत्रन्गि पाउस - ??? गणेशा - ??? चलत मुसाफ़िर - ???

In reply to by सूड

अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो. चुकुन सुद्धा करु नका. एकतर बादशाही ऑव्हरहाएप्ड आहे आणि दुसरे म्हणजे चुकुन थोडाफार कल्ला केला तर बादशाहीवाले एखाद दोन पाट्या दाखवुन कट्टेकर्‍यांची तोंडे बंद करायचे. व्हेरी बॅड आयडिया फोर कट्टा. त्यापेक्षा दुर्वांकुर ट्रायवावे असा सल्ला देतो.

In reply to by मृत्युन्जय

खूपवेळा झाले आहे तेव्हा नवे थाळी ठिकाण (ऐस्पैस सुचवणे) असेल त्याच परिघात किंवा संभाजी बागेचे आसपास. भेट अर्थात पहिल्यांदा बागेत किंवा पाताळेश्वर येथे मग खादाडी असे.
पाताळेश्वर न पाहिलेले असे किती ? हात वर करा!! वल्लीबरोबर न पाहिलेले किती ? हात वर करा !!
आता वरील हातवाल्यांची बेरीज जास्तीची मेजॅरिटी घोषीत करावी ही विनंती. लपाछपी-शिवणापाणी-रूमाल्पाणी फेम जास्तीची मेजॅरिटी नाखु

In reply to by टवाळ कार्टा

वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते वाच, अगदी सात्विक हवं असेल तर दुर्वांकूर (इथे रविवार असल्याने पुणेकर रीघ लावणार आणि दुर्वांकुरवाले कदाचित आवरायची घाई करायला लावणार), मल्टिस्पाईस माझ्यामाहितीप्रमाणे सात्विक आहे. राजधानी, सुकांता, वाडेश्वर हे ऑप्शन आहेत. बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं असेल तो तुझा कट्टर दुश्मन आहे असं समज!! =))

In reply to by सूड

बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं असेल तो तुझा कट्टर दुश्मन आहे असं समज!! =))
एका प्रसिध्ध आयडीने सुचवलेले...मी नाव नै सांगण्णार :)

In reply to by टवाळ कार्टा

माझ्या माहिती प्रमाणे मल्टीस्पाईस मधे तिर्थपानाची व अभक्ष भक्षणाची सोय नाही. या शिवाय मल्टीस्पाईस मधे रोज सकाळी ७ ते ११ या वेळात अमर्यादीत ब्रेकफास्ट ची सोय आहे. रु १५० रु/- प्रतिमाणशी या दराने. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

सकाळी ७ ते ११ या वेळात अमर्यादीत ब्रेकफास्ट
हा हा हा...७ ते ११ चा कट्टा करायचा का? हाकलून लावतील ते मिपाकरांची खादाडी बघून ;)

In reply to by टवाळ कार्टा

७ ते ११ चा कट्टा करायचा का? हाकलून लावतील ते मिपाकरांची खादाडी बघून ;)
आदल्यादिवशी पक्षीतीर्थ केलेले सकाळी सातला जागे होतील का? जमल्यास फोनव.

In reply to by टवाळ कार्टा

ऐडीया वैट्ट नाही आही. मी गेलो होतो तेव्हा त्यांचा स्प्रेड असा होता: १. ईडली सांबार चटणी २. डोसा ३. समोसा ४. ब्रेड बटर जाम (ग्रिल पण होते) ५. पास्ता ६. उपमा ७. पराठे (बटाटा) ८. चहा / कॉफी बहुधा मेदु वडे पण होते. आठवत नाही. इडली छान होती. सांबार मस्त होते. पराठे बरे होते. पास्ता चांगला होता. समोसे बोर होते. उपमा आवडला होता. डोसे चांगले होते पण बनवायला बराच वेळ लागत होता. चहा ठीक होता. कॉफी नथिंग स्पेशल. ब्रेड बटर काय नेहमीचेच. एकुणात किंमतीच्या मानाने १० /१०. बाकी ठीकठाक. १० पैकी ६/७

In reply to by मृत्युन्जय

आम्ही गेलो होतो तेव्हा शिरा, सॅंडविचेस, आणखी एक दोन चांगले पदार्थ होते, नावं आठवत नाहीयेत.

In reply to by टवाळ कार्टा

सध्या परिक्षा + अभ्यास यासाठी रजा काढली आहे. त्यामुळे कट्ट्याला यायला जमणार नाही. थोडा वेळ भेटायला जमते का ते बघतो. नक्कीच.

नक्कीच हजेरी लावणार… लवकरात लवकर ठिकाण कळवा …

In reply to by प्रचेतस

तसं असेल तर: १. आपापली अंथरुणं-पांघरुणं, स्लिपींग बॅग वगैरे घेऊन येणे. २. वस्तीनिमित्त हॉल, सकाळच्या विधींसाठी संडास-बाथरुम* विनामुल्य उपलब्ध करुन दिला जाईल. ३. आंघोळीसाठी गरम पाणी विनंती केल्यास मिळू शकेल. ४. तीर्थप्राशन कटाक्षाने बाहेरच उरकून यावे. ५. रिचार्ज न केलेल्या डिटूएच कनेक्शनबद्दल केलेली शेरेबाजी खपवून घेतली जाणार नाही. ६. नोकियाचा चार्जर आहे का असे विचारू नये. ७. माझ्या बुकशेल्फवरील सहाशे पुस्तकं पाहून "मी हे पुस्तक वाचायला नेऊ का?" अशी विचारणा करु नये. ८. मला सूडच्या घरी सोडून येतो का अशी विनंती करु नये. *रेस्टरुम या शब्दांचा अर्थ विश्रांतीगृह असा घेतला जाऊ नये म्हणून दैनंदिन वापरातील शब्द वापरले आहेत.

In reply to by सतिश गावडे

खी खी खी. अजून काही सूचना चार जीने चढून दम लागल्यास कुरकुर करू नये. सकाळी उठल्यावर चहा (व नाष्ट्याचीही) अपेक्षा करू नये. हवे असल्यास सिंहगड रोडवर टपरीवर करून यावा.

In reply to by सतिश गावडे

अजून काही प्रश्न : १. अन्घोळीचा साबण ज्याचा त्याने आणायचा आहे की तुमच्या तर्फे पुरवला जाईल ? २. टूथपेस्ट पुरवली जाईल की ज्याची त्याने आणायची आहे ? ३. संडास भारतीय बैठक आहे की कमोड? ४. वाय फाय आहे का ? सद्यातरी एवढेच...

In reply to by खटपट्या

आंघोळीच्या साबणाचे निम्मे पैसे घेतले जातील. टुथपेस्ट पुरवली जाईल मात्र तिघांमधे मिळुन एकचं टुथब्रश पुरवला जैल. वायफायचे वेगळे पैसे पडतील.

In reply to by सतिश गावडे

८. मला सूडच्या घरी सोडून येतो का अशी विनंती करु नये.
माझ्याकडे येणार्‍यांनी घरातल्या पसार्‍यावर कमेंटी मारल्यास काळवेळ न बघता त्यांच्या मदतीने तो पसारा आवरण्यास सुरुवात करण्यात येईल.

सहा सातची मुंबई वारी आधीच ठरलेली आहे, आता पुण्यातल्या पुढच्या कट्ट्याची वाट बघणे आले. !

सिंहगड रोडवरच्या पु ल देशपांडे उद्यानात घ्या की कट्टा! जेवण करायला 'य' हाटिलं हाएत. बुवाचा एखादा मेसवाला आनंदानं जेवायला घालेल. आमच्या भागात गन्धर्व म्हणून चांगलं झालंय pure veg रेस्टॉरेन्ट.

In reply to by प्यारे१

सिंहगड रस्त्यावर पु ल देशपांडे उद्यानाच्या समोर, बँक ऑफ इंडियाच्या मागे "वन वे फुड्स" नावाचे छोटेसे हॉटेल आहे. त्यांच्या कडे पराठे मस्त मिळतात. बाकीचे पदार्थही छान असतात. त्यांचे रेट ही रिझनेबल आहेत. त्यांना फोन करुन अक्खे हॉटेलच बुक करायचे. (बसायला तेवढीच जागा आहे) https://www.zomato.com/pune/one-way-foods-sinhgad-road/menu#tabtop समिश आहारा साठी सत्कार (तेच मुंबईचे सुप्रसिध्द) चांगले आहे. पण फार गर्दि असते. राजाराम पुला जवळ ब्रम्हा व्हेज. निवांत बसता येईल पण क्वालिटी आणि सर्व्हीस जरा बेताचीच आहे. सवाई ची क्वालीटी बरी आहे. सर्व्हीस चांगली. पण गर्दी असते. किती वेळ बसुन देईल माहीत नाही. लवंगी मिर्ची फारच जास्त कोल्हापुरी आहे आणि नॉनव्हेज प्रेमिंसाठी उत्तम. गर्दी ही तशी कमीच असते. सुमधु कट्टा करण्यासारखे नाही. आनंदी डायनींग हॉल ची फुड क्वालीटी चांगली आहे. थाळी सिस्टीम आहे आणि खाणार्‍याला प्रेमाने वाढतात. शोरबा, पु ल देशपांडे उद्यानापासुन थोडे लांब आहे, पण सर्वच बाबतीत उच्च आहे. नवे आहे त्या मुळे गर्दी थोडी जास्त असते पण फुड क्वालीटी सर्व्हीस चांगली. या पेक्षा मल्टीस्पाईस जवळ पडेल. शोरबाच्याच गल्ली मधे एक दिल्ली का लखनौ चाट वाला आहे. त्याच्या कडले सगळे पदार्थ अप्रतिम असतात. (बसायला जागा फारच थोडीआहे), ओपन एअर) गिरीजा मातोश्री ची क्वालीटी ठीकठाक पण तिकडले वेटर फार उध्दट आहेत. फारवेळ बसु देतील की नाही ही शंका. मल्टीस्पाईसच्या जवळच सुप्रसिध्द शेफ विश्र्णु मनोहर यांचे विश्र्णुजी की रसोई चांगले ऐसपैस आहे. शाकाहरी बुफे पध्दतीने इकडे नागपुरी (का कोणते तरी) जेवण मिळते. कट्टा करायला आदर्श जागा. आगोदर बुक करुन ठेवायला लागेल. जवळाच्या बनियन ट्री मधे माझ्या आठवणी प्रमाणे एक कट्टा झाला आहे. बाकी आठवतील तशी सुचवतो. पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

विष्णुजीकी रसोई बद्दल + १. कट्ट्यासाठी आदर्श जागा आहे पण अभक्ष्यभक्षण आणि अपेअयपान नाही.

In reply to by अजया

पु़णेकर अज्जुन जागाच शोधत आहेत. ( स्वगत : आयला, ह्यापेक्षा आम्ही डोंबोलीकर बरेच बरे.जागा आणि वेळ ठरलेलीच असते.फक्त उत्सवमुर्तींचे नांव अणि तारीख अ‍ॅडवले की झाले.)

In reply to by मृत्युन्जय

शिवाय पुण्यात जागाही बर्‍याच आहेत ना. म्हणुन... आयला, साधा पक्षी-तीर्थ कट्टा ठरवायला इतका काथ्या-कूट? आता ह्यालाच जर चोखंदळ-पणा, म्हणत असाल तर, म्हणा. कल्याण-डोंबोली भागात जर एखादा पक्षी-तीर्थ कट्टा असेल तर, आमची जागा ठरलेली. ठाण्यात असेल, तरी पण जागा ठरलेली. चार गप्पाच निवांत पणे मारायच्या आहेत, पक्षी-तीर्थ तर बहाणा आहे. काय ते ठरवा, पाहू बिगी-बिगी, इथे आमची तिकीटे पण काढून झाली.

In reply to by यशोधरा

डोंबोलीतल्या कट्ट्याची नांव-नोंदणी पण सुरु झाली. आणि ते पण अनावश्यक काथ्या न कुटता.

In reply to by मुक्त विहारि

हौ. पाहिले की! पयले छूट न येण्याच्या पोस्टी! इथे पहा बरें, सगळे कसे उत्साहाने निरनिराळी ठिकाणे सुचवीत आहेत! ह्याला म्हणायचे उत्साह! =))

In reply to by यशोधरा

अरे देवा!!!!!! असे आहे होय? आता शेवटी मग आम्ही अपुणेकर सिंहगडावरच कट्टा करणार असे दिसत आहे. नाहीतर , हम तो तेरे आशिक है...http://www.misalpav.com/node/31285, ह्या धाग्याला टॅब मध्ये उतरवून, एक एक निवडुंग पालथा घालावा म्हणतो.

In reply to by मृत्युन्जय

आता तिथे पण खाण्याच्या बाबतीत आणि ठिकाणाबाबतीत काथ्या कुट्ट होवू शकतो.पण सिंहगडाच्या माथ्यावर आणि आस-पास १००-१२५च हॉटेल्स असल्याने, एक-दोन दिवसांत ठिकाण ठरेल असे वाटते.(पण पुणेकरांचा चोखंदळ पणा नक्की किती दिवस घेईल, ते पण सांगता येत नाही.)

In reply to by मुक्त विहारि

नाही नाही. त्याबाबत काही कन्फ्युजन नसावे. सगळीकडे एकसारखेच खायला मिळते. आणि आता भक्ष्यभक्षण देखील नसते.

जागा आणि वेळ ठरवा रे लवकर. कित्ती ती चर्चा नुस्ती ! :) विषेशतः रविवारच्या कार्यक्रमामध्ये रस आहे... सहकुटुंब असल्यास अजून उत्तम.

In reply to by यशोधरा

तसे आम्ही कुणालाच नावे ठेवत नाही. पण, एक ठिकाण ठरवायला इतका वेळ? ह्या गोष्टीला काय म्हणावे बरे?