आधीच्या (https://www.misalpav.com/node/31263) धाग्यावर थोडा फार काथ्या कुटून झालाच आहे.
पण अद्याप नक्की ठिकाण आणि वेळ समजली नाही, म्हणुन हा वेगळा धागा काढला.
मी ६च्या कट्ट्याला १००% आहे.
७ ता.ला संध्याकाळी डोंबोलीत काम असल्याने, ७च्या कट्ट्याला येवू शकणार नाही.
पुण्यात आम्ही तसे २-४ दिवसांचेच पाहुणे असल्याने, आम्हाला पुण्यातील कुठलेही ठिकाण चालेल.
शक्यतो, कुणाच्या घरांत असेल तर फार उत्तम.
वाचने
31634
प्रतिक्रिया
227
मिसळपाव
प्रतिक्रिया
मुंबैला त्यामानाने जवळ पडेल
मुंबैला त्यामानाने जवळ पडेल आणि पुण्यात कुणालाही पटकन सापडेल असे ठिकाण म्हणुन मी ग्रीनपार्कचे नाव सुचवतो. अपेयपान आणि अभक्ष्यभक्षणाची सोय आहे. मोठ्या ग्रुपला सामावुन घेण्यासारखी आसनक्षमता आहे, आठच्या आधी पोचणार असल्यास ते आरक्षण देखील घेतात. सर्व्हिस निवांत आहे. त्यामुळे निवांतपणे बसता येइल ;).
दर मात्र रग्गड आहेत हे ध्यानात घ्यावे.
ते नको असल्यास म्हात्रे ब्रिज वरचे हार्वेस्ट कॉर्ट अथवा मल्टि स्पाइस देखील बरे ऑप्शन्स आहेत. मल्टि स्पाइस मध्ये अपेयपान आणि अभक्ष्यभक्षणाची सोय आहे की नाही ते माहित नाही.
मुख्य म्हणजे कुणालातरी एकाला अधिकार द्या जागा ठरवायचे नाहितर शेवटपर्यंत चिवडा होइल
मल्टीस्पाईस ओके आहे. ठीकठाक,
In reply to मुंबैला त्यामानाने जवळ पडेल by मृत्युन्जय
मल्टीस्पाईस ओके आहे. ठीकठाक, मात्र बसू देतात आणि दंगा केलेला चालतो.
जागा ठरवायच्या अधिकाराची
In reply to मुंबैला त्यामानाने जवळ पडेल by मृत्युन्जय
जागा ठरवायच्या अधिकाराची वस्त्रे सगा, वल्ली व औरंगजेब यांच्याकडे सुपूर्द करणेत आलेली आहेत
माझेच नक्की नै रे अजून.
In reply to जागा ठरवायच्या अधिकाराची by टवाळ कार्टा
माझेच नक्की नै रे अजून.
माझेही नक्की नाही .
In reply to माझेच नक्की नै रे अजून. by प्रचेतस
माझेही नक्की नाही .
कल्लापुरातुन एक लग्नाचे आमंत्रण आले आहे , सहसा मी लग्न बिग्नं अटेंड करत नाही पण मित्रांन्ना भेटायला म्हणुन तिकडे जावे काय असा विचार चालु आहे.
लवकर ठरवा!
कट्ट्याचा दिवस, वेळ आणि ठिकाण एक-दोन दिवसांत ठरवावे. त्यानुसार पुढील कार्यक्रम ठरवायचे आहेत.
ग्रीनपार्कच्या सर्विस आणि आसनक्षमतेबाबत सहमत. परंतु ते लांब आणि महागडे आहे.
एखाद्या बागेत भेटून त्यानंतर जवळपासच्या ठिकाणी जेवायला जायचाही विचार करावा. हाटेलात ग्रुपमध्ये संवाद होत नाही.
+१
In reply to लवकर ठरवा! by विशाखा पाटील
सूचवणीला जोरदार अनुमोदन.
शिवाय थाळी जिथे दोन्ही जोर्दार मिळते असे ठिकाण असल्यास वेळ वाचतो असे निरिक्षण आहे.बाकी आयोजक (प्रायोजक नव्हे) जे ठरवतील ते ब्येस असेलच.
अनुमोदन!
In reply to +१ by नाखु
अनुमोदन!
मी पण येईन - नक्की ठरले की
मी पण येईन - नक्की ठरले की कळवा! :-)
मी पण येणार!!!!
मी पण येणार!!!!
द मामि याच!
द मामि याच!
मी पण ...
येणार फक्त रविवार ठरवा..
दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद
दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद बघून खालील मेंब्रं ६ ला संध्याकाळी अथवा ७ ला दुपारी होणार्या कट्ट्यापैकी एकाला (अथवा दोन्हींना) हजर असतील
६ ला संध्याकाळी आधी गप्पाटप्पा व नंतर पक्षी + तीर्थ + धुम्रचैतन्यकांडी(कोणाला लागलीच तर) असणारा कट्टा होईल
ज्यांना या कट्ट्यास उपस्थित रहाणे नै जमणार (कोणत्याही कारणाने) ते ७ ला दुपारच्या कट्ट्यास येउ शकतात
७ ला दुपारी बादशाहीमध्ये सोज्वळ कट्टा असेल...दुपारच्या जेवणानंतर मुंबैवाले घराकडे कूच करतील
नेहमीचे कट्टेकरी
मुक्त विहारि - कट्ट्याची उत्सवमुर्ती कोणीही असली तरी पहिले नाव हेच्च
टवाळ कार्टा
अत्रुप्त
सतिश गावडे
कॅप्टन जॅक स्पॅरो
सूड
बाबा पाटील (दंबूकवाले)
मृत्युन्जय
पुण्याचे पेशवे
कपिलमुनी
नाद खुळा
कंजूस
gogglya
मोदक
प्रगो / गिर्जाकाका / औरंगजेब
इस्पीकचा एक्का - ७ ला
मनिष
दमामि
अनाहिता ग्यांग
विशाखा पाटील
अजया - ७ ला
यशोधरा
स्वीत स्वाति
तळ्यात-मळ्यात करणारे
अद्द्या - ७ तार्खेला असेल तर . परयत्न केल्या जाइल
प्यारे१ - 70 हो-30 नाही शक्यता
मंदार कात्रे - टायम भेटल का नाय तेच्यावर डिपेंड हाय
प्रतिसाद देउनसुध्धा स्वतःच्या उपस्थितीबद्दल गुप्तता बाळगणारे आणि त्याच्याच बरोबर बाकीचे
वल्ली - ???
बॅटमॅन - ???
SYG - ???
खटपट्या - ???
अत्रन्गि पाउस - ???
गणेशा - ???
चलत मुसाफ़िर - ???
बादशाहीमध्ये कट्टा?
In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा
बादशाहीमध्ये कट्टा?
अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो
In reply to बादशाहीमध्ये कट्टा? by सूड
अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो. चुकुन सुद्धा करु नका. एकतर बादशाही ऑव्हरहाएप्ड आहे आणि दुसरे म्हणजे चुकुन थोडाफार कल्ला केला तर बादशाहीवाले एखाद दोन पाट्या दाखवुन कट्टेकर्यांची तोंडे बंद करायचे. व्हेरी बॅड आयडिया फोर कट्टा. त्यापेक्षा दुर्वांकुर ट्रायवावे असा सल्ला देतो.
दुर्वांकूर
In reply to अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो by मृत्युन्जय
खूपवेळा झाले आहे तेव्हा नवे थाळी ठिकाण (ऐस्पैस सुचवणे) असेल त्याच परिघात किंवा संभाजी बागेचे आसपास. भेट अर्थात पहिल्यांदा बागेत किंवा पाताळेश्वर येथे मग खादाडी असे.
आता वरील हातवाल्यांची बेरीज जास्तीची मेजॅरिटी घोषीत करावी ही विनंती.
लपाछपी-शिवणापाणी-रूमाल्पाणी फेम
जास्तीची मेजॅरिटी नाखु
http://www.misalpav.com
In reply to अगदी हेच्च्च्च्च लिहिणार होतो by मृत्युन्जय
https://www.misalpav.com/comment/701554#comment-701554
या टैपचे ठिकाण ठरवा
मल्टिस्पाईस काय वाईट आहे मग?
In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा
मल्टिस्पाईस काय वाईट आहे मग?
काहीजणांना सोज्वळ कट्टा
In reply to मल्टिस्पाईस काय वाईट आहे मग? by सूड
काहीजणांना सोज्वळ कट्टा अश्याच ठिकाणी हवाय जिथे अभक्ष्य-भक्षण व अपेयपानाची सोय नसेल
वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते
In reply to काहीजणांना सोज्वळ कट्टा by टवाळ कार्टा
वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते वाच, अगदी सात्विक हवं असेल तर दुर्वांकूर (इथे रविवार असल्याने पुणेकर रीघ लावणार आणि दुर्वांकुरवाले कदाचित आवरायची घाई करायला लावणार), मल्टिस्पाईस माझ्यामाहितीप्रमाणे सात्विक आहे. राजधानी, सुकांता, वाडेश्वर हे ऑप्शन आहेत. बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं असेल तो तुझा कट्टर दुश्मन आहे असं समज!! =))
बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं
In reply to वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते by सूड
एका प्रसिध्ध आयडीने सुचवलेले...मी नाव नै सांगण्णार :)
बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं
In reply to वर मृत्यूंजयाने लिहीलंय ते by सूड
बादशाही ज्या कोणी तुला सुचवलं असेल तो तुझा कट्टर दुश्मन आहे असं समज!! =))=))माझ्या माहिती प्रमाणे
In reply to काहीजणांना सोज्वळ कट्टा by टवाळ कार्टा
माझ्या माहिती प्रमाणे मल्टीस्पाईस मधे तिर्थपानाची व अभक्ष भक्षणाची सोय नाही.
या शिवाय मल्टीस्पाईस मधे रोज सकाळी ७ ते ११ या वेळात अमर्यादीत ब्रेकफास्ट ची सोय आहे. रु १५० रु/- प्रतिमाणशी या दराने.
पैजारबुवा,
सकाळी ७ ते ११ या वेळात
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by ज्ञानोबाचे पैजार
+१
सकाळी ७ ते ११ या वेळात
In reply to माझ्या माहिती प्रमाणे by ज्ञानोबाचे पैजार
हा हा हा...७ ते ११ चा कट्टा करायचा का? हाकलून लावतील ते मिपाकरांची खादाडी बघून ;)
७ ते ११ चा कट्टा करायचा का?
In reply to सकाळी ७ ते ११ या वेळात by टवाळ कार्टा
आदल्यादिवशी पक्षीतीर्थ केलेले सकाळी सातला जागे होतील का? जमल्यास फोनव.
ऐडीया वैट्ट नाही आही. मी गेलो
In reply to सकाळी ७ ते ११ या वेळात by टवाळ कार्टा
ऐडीया वैट्ट नाही आही. मी गेलो होतो तेव्हा त्यांचा स्प्रेड असा होता:
१. ईडली सांबार चटणी
२. डोसा
३. समोसा
४. ब्रेड बटर जाम (ग्रिल पण होते)
५. पास्ता
६. उपमा
७. पराठे (बटाटा)
८. चहा / कॉफी
बहुधा मेदु वडे पण होते. आठवत नाही.
इडली छान होती. सांबार मस्त होते. पराठे बरे होते. पास्ता चांगला होता. समोसे बोर होते. उपमा आवडला होता. डोसे चांगले होते पण बनवायला बराच वेळ लागत होता. चहा ठीक होता. कॉफी नथिंग स्पेशल. ब्रेड बटर काय नेहमीचेच. एकुणात किंमतीच्या मानाने १० /१०. बाकी ठीकठाक. १० पैकी ६/७
आम्ही गेलो होतो तेव्हा शिरा,
In reply to ऐडीया वैट्ट नाही आही. मी गेलो by मृत्युन्जय
आम्ही गेलो होतो तेव्हा शिरा, सॅंडविचेस, आणखी एक दोन चांगले पदार्थ होते, नावं आठवत नाहीयेत.
सध्या परिक्षा + अभ्यास यासाठी
In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा
सध्या परिक्षा + अभ्यास यासाठी रजा काढली आहे. त्यामुळे कट्ट्याला यायला जमणार नाही. थोडा वेळ भेटायला जमते का ते बघतो. नक्कीच.
व्य नि
In reply to दोन्ही धाग्यांवरचे प्रतिसाद by टवाळ कार्टा
केलाय
मल्टीस्पाईस ठरवुन टाका ना मग!
मल्टीस्पाईस ठरवुन टाका ना मग! हे सातच्या कट्टयाबाबत आहे ना?
ठिकाण कळवा..
नक्कीच हजेरी लावणार… लवकरात लवकर ठिकाण कळवा …
मुंबैवाले पोहोचु शकतील का
मुंबैवाले पोहोचु शकतील का ब्रेफाला?
मुंबैवाले सगळे ६ च्या
In reply to मुंबैवाले पोहोचु शकतील का by अजया
मुंबैवाले सगळे ६ च्या कट्ट्यासाठी मुक्कामाच्या तयारीने येत आहेत ;)
मुक्काम धन्याकडे का? ;)
In reply to मुंबैवाले सगळे ६ च्या by टवाळ कार्टा
मुक्काम धन्याकडे का? ;)
तसं असेल तर:
In reply to मुक्काम धन्याकडे का? ;) by प्रचेतस
तसं असेल तर:
१. आपापली अंथरुणं-पांघरुणं, स्लिपींग बॅग वगैरे घेऊन येणे.
२. वस्तीनिमित्त हॉल, सकाळच्या विधींसाठी संडास-बाथरुम* विनामुल्य उपलब्ध करुन दिला जाईल.
३. आंघोळीसाठी गरम पाणी विनंती केल्यास मिळू शकेल.
४. तीर्थप्राशन कटाक्षाने बाहेरच उरकून यावे.
५. रिचार्ज न केलेल्या डिटूएच कनेक्शनबद्दल केलेली शेरेबाजी खपवून घेतली जाणार नाही.
६. नोकियाचा चार्जर आहे का असे विचारू नये.
७. माझ्या बुकशेल्फवरील सहाशे पुस्तकं पाहून "मी हे पुस्तक वाचायला नेऊ का?" अशी विचारणा करु नये.
८. मला सूडच्या घरी सोडून येतो का अशी विनंती करु नये.
*रेस्टरुम या शब्दांचा अर्थ विश्रांतीगृह असा घेतला जाऊ नये म्हणून दैनंदिन वापरातील शब्द वापरले आहेत.
खी खी खी.
In reply to तसं असेल तर: by सतिश गावडे
खी खी खी.
अजून काही सूचना
चार जीने चढून दम लागल्यास कुरकुर करू नये.
सकाळी उठल्यावर चहा (व नाष्ट्याचीही) अपेक्षा करू नये. हवे असल्यास सिंहगड रोडवर टपरीवर करून यावा.
अजून काही प्रश्न :
In reply to तसं असेल तर: by सतिश गावडे
अजून काही प्रश्न :
१. अन्घोळीचा साबण ज्याचा त्याने आणायचा आहे की तुमच्या तर्फे पुरवला जाईल ?
२. टूथपेस्ट पुरवली जाईल की ज्याची त्याने आणायची आहे ?
३. संडास भारतीय बैठक आहे की कमोड?
४. वाय फाय आहे का ?
सद्यातरी एवढेच...
आंघोळीच्या साबणाचे निम्मे
In reply to अजून काही प्रश्न : by खटपट्या
आंघोळीच्या साबणाचे निम्मे पैसे घेतले जातील. टुथपेस्ट पुरवली जाईल मात्र तिघांमधे मिळुन एकचं टुथब्रश पुरवला जैल. वायफायचे वेगळे पैसे पडतील.
@गावडे
In reply to आंघोळीच्या साबणाचे निम्मे by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुमचा एजंट छान आहे..
८. मला सूडच्या घरी सोडून येतो
In reply to तसं असेल तर: by सतिश गावडे
माझ्याकडे येणार्यांनी घरातल्या पसार्यावर कमेंटी मारल्यास काळवेळ न बघता त्यांच्या मदतीने तो पसारा आवरण्यास सुरुवात करण्यात येईल.
टक्याचं हे अपत्य अडणार बहुतेक
टक्याचं हे अपत्य अडणार बहुतेक!! =))))
"कळ"लाव्या सूडुक
In reply to टक्याचं हे अपत्य अडणार बहुतेक by सूड
"कळ"लाव्या सूडुक
(नारायण नारायण)
अरेरे..
सहा सातची मुंबई वारी आधीच ठरलेली आहे, आता पुण्यातल्या पुढच्या कट्ट्याची वाट बघणे आले. !
मी मिपा चा फक्त वाचक आहे....
मी मिपा चा फक्त वाचक आहे.... आम्हाला का आमंन्त्रण नाही???
तुम्हाला व्य.नि. केला आहे.
In reply to मी मिपा चा फक्त वाचक आहे.... by शित्रेउमेश
तुम्हाला व्य.नि. केला आहे.
कटट्याचं ठिकाण वेळ बघा आणि
कटट्याचं ठिकाण वेळ बघा आणि जमत असलं तर यायचं.आमंत्रण कशाला पाहिजे?या बिनधास्त.
सिंहगड रोडवरच्या पु ल
सिंहगड रोडवरच्या पु ल देशपांडे उद्यानात घ्या की कट्टा!
जेवण करायला 'य' हाटिलं हाएत.
बुवाचा एखादा मेसवाला आनंदानं जेवायला घालेल.
आमच्या भागात गन्धर्व म्हणून चांगलं झालंय pure veg रेस्टॉरेन्ट.
जेवण करायला 'य' हाटिलं हाएत.
In reply to सिंहगड रोडवरच्या पु ल by प्यारे१
सिंहगड रस्त्यावर पु ल देशपांडे उद्यानाच्या समोर, बँक ऑफ इंडियाच्या मागे "वन वे फुड्स" नावाचे छोटेसे हॉटेल आहे. त्यांच्या कडे पराठे मस्त मिळतात. बाकीचे पदार्थही छान असतात. त्यांचे रेट ही रिझनेबल आहेत. त्यांना फोन करुन अक्खे हॉटेलच बुक करायचे. (बसायला तेवढीच जागा आहे)
https://www.zomato.com/pune/one-way-foods-sinhgad-road/menu#tabtop
समिश आहारा साठी सत्कार (तेच मुंबईचे सुप्रसिध्द) चांगले आहे. पण फार गर्दि असते.
राजाराम पुला जवळ ब्रम्हा व्हेज. निवांत बसता येईल पण क्वालिटी आणि सर्व्हीस जरा बेताचीच आहे.
सवाई ची क्वालीटी बरी आहे. सर्व्हीस चांगली. पण गर्दी असते. किती वेळ बसुन देईल माहीत नाही.
लवंगी मिर्ची फारच जास्त कोल्हापुरी आहे आणि नॉनव्हेज प्रेमिंसाठी उत्तम. गर्दी ही तशी कमीच असते.
सुमधु कट्टा करण्यासारखे नाही.
आनंदी डायनींग हॉल ची फुड क्वालीटी चांगली आहे. थाळी सिस्टीम आहे आणि खाणार्याला प्रेमाने वाढतात.
शोरबा, पु ल देशपांडे उद्यानापासुन थोडे लांब आहे, पण सर्वच बाबतीत उच्च आहे. नवे आहे त्या मुळे गर्दी थोडी जास्त असते पण फुड क्वालीटी सर्व्हीस चांगली. या पेक्षा मल्टीस्पाईस जवळ पडेल.
शोरबाच्याच गल्ली मधे एक दिल्ली का लखनौ चाट वाला आहे. त्याच्या कडले सगळे पदार्थ अप्रतिम असतात. (बसायला जागा फारच थोडीआहे), ओपन एअर)
गिरीजा मातोश्री ची क्वालीटी ठीकठाक पण तिकडले वेटर फार उध्दट आहेत. फारवेळ बसु देतील की नाही ही शंका.
मल्टीस्पाईसच्या जवळच सुप्रसिध्द शेफ विश्र्णु मनोहर यांचे विश्र्णुजी की रसोई चांगले ऐसपैस आहे. शाकाहरी बुफे पध्दतीने इकडे नागपुरी (का कोणते तरी) जेवण मिळते. कट्टा करायला आदर्श जागा. आगोदर बुक करुन ठेवायला लागेल.
जवळाच्या बनियन ट्री मधे माझ्या आठवणी प्रमाणे एक कट्टा झाला आहे.
बाकी आठवतील तशी सुचवतो.
पैजारबुवा,
विष्णुजीकी रसोई बद्दल + १.
In reply to जेवण करायला 'य' हाटिलं हाएत. by ज्ञानोबाचे पैजार
विष्णुजीकी रसोई बद्दल + १. कट्ट्यासाठी आदर्श जागा आहे पण अभक्ष्यभक्षण आणि अपेअयपान नाही.
शेवटी कुठे आणि कधी भेटायचं
शेवटी कुठे आणि कधी भेटायचं ठरलंय? काही ठोस ठरलंय का?
यशोशी बाडिस!
यशोशी बाडिस!
अजया ताईंशी बाडीस...
In reply to यशोशी बाडिस! by अजया
पु़णेकर अज्जुन जागाच शोधत आहेत.
( स्वगत : आयला, ह्यापेक्षा आम्ही डोंबोलीकर बरेच बरे.जागा आणि वेळ ठरलेलीच असते.फक्त उत्सवमुर्तींचे नांव अणि तारीख अॅडवले की झाले.)
पुणेकर चोखंदळ आहेत. शिवाय
In reply to अजया ताईंशी बाडीस... by मुक्त विहारि
पुणेकर चोखंदळ आहेत. शिवाय पुण्यात जागाही बर्याच आहेत ना. म्हणुन... ;)
तुझ्याशी बाडिसच बाडिस रे
In reply to पुणेकर चोखंदळ आहेत. शिवाय by मृत्युन्जय
तुझ्याशी बाडिसच बाडिस रे मृत्यून्जया!
पुणेकर चोखंदळ आहेत.
In reply to पुणेकर चोखंदळ आहेत. शिवाय by मृत्युन्जय
शिवाय पुण्यात जागाही बर्याच आहेत ना. म्हणुन...
आयला,
साधा पक्षी-तीर्थ कट्टा ठरवायला इतका काथ्या-कूट?
आता ह्यालाच जर चोखंदळ-पणा, म्हणत असाल तर, म्हणा.
कल्याण-डोंबोली भागात जर एखादा पक्षी-तीर्थ कट्टा असेल तर, आमची जागा ठरलेली.
ठाण्यात असेल, तरी पण जागा ठरलेली.
चार गप्पाच निवांत पणे मारायच्या आहेत, पक्षी-तीर्थ तर बहाणा आहे.
काय ते ठरवा, पाहू बिगी-बिगी, इथे आमची तिकीटे पण काढून झाली.
आमची जागा ठरलेली
In reply to पुणेकर चोखंदळ आहेत. by मुक्त विहारि
सारखा सारखा त्याच झाडावर !
पुणे धाग्याची लोकप्रियता किती
In reply to अजया ताईंशी बाडीस... by मुक्त विहारि
पुणे धाग्याची लोकप्रियता किती! डोंबोली धाग्याची किती?
पुणे धाग्याची लोकप्रियता किती! डोंबोली धाग्याची किती?
In reply to पुणे धाग्याची लोकप्रियता किती by यशोधरा
डोंबोलीतल्या कट्ट्याची नांव-नोंदणी पण सुरु झाली.
आणि ते पण अनावश्यक काथ्या न कुटता.
हौ. पाहिले की! पयले छूट न
In reply to पुणे धाग्याची लोकप्रियता किती! डोंबोली धाग्याची किती? by मुक्त विहारि
हौ. पाहिले की! पयले छूट न येण्याच्या पोस्टी! इथे पहा बरें, सगळे कसे उत्साहाने निरनिराळी ठिकाणे सुचवीत आहेत! ह्याला म्हणायचे उत्साह! =))
सहमत. सहमत
In reply to हौ. पाहिले की! पयले छूट न by यशोधरा
सहमत. सहमत
ह्याला म्हणायचे उत्साह!!!!!!
In reply to हौ. पाहिले की! पयले छूट न by यशोधरा
अरे देवा!!!!!!
असे आहे होय?
आता शेवटी मग आम्ही अपुणेकर सिंहगडावरच कट्टा करणार असे दिसत आहे.
नाहीतर , हम तो तेरे आशिक है...https://www.misalpav.com/node/31285, ह्या धाग्याला टॅब मध्ये उतरवून, एक एक निवडुंग पालथा घालावा म्हणतो.
ये आयडिया अच्छा है. मी गाइड
In reply to ह्याला म्हणायचे उत्साह!!!!!! by मुक्त विहारि
ये आयडिया अच्छा है. मी गाइड म्हणुन काम करेन ;)
मग तर सिंहगडावरच कट्टा करू या....
In reply to ये आयडिया अच्छा है. मी गाइड by मृत्युन्जय
आता तिथे पण खाण्याच्या बाबतीत आणि ठिकाणाबाबतीत काथ्या कुट्ट होवू शकतो.पण सिंहगडाच्या माथ्यावर आणि आस-पास १००-१२५च हॉटेल्स असल्याने, एक-दोन दिवसांत ठिकाण ठरेल असे वाटते.(पण पुणेकरांचा चोखंदळ पणा नक्की किती दिवस घेईल, ते पण सांगता येत नाही.)
कालच सिंहगडावर जाणं झालं.
In reply to मग तर सिंहगडावरच कट्टा करू या.... by मुक्त विहारि
कालच सिंहगडावर जाणं झालं. पुर्वीचा गड राहिला नाही अता.
नाही नाही. त्याबाबत काही
In reply to मग तर सिंहगडावरच कट्टा करू या.... by मुक्त विहारि
नाही नाही. त्याबाबत काही कन्फ्युजन नसावे. सगळीकडे एकसारखेच खायला मिळते. आणि आता भक्ष्यभक्षण देखील नसते.
जागा आणि वेळ ठरवा रे लवकर.
जागा आणि वेळ ठरवा रे लवकर. कित्ती ती चर्चा नुस्ती ! :)
विषेशतः रविवारच्या कार्यक्रमामध्ये रस आहे... सहकुटुंब असल्यास अजून उत्तम.
इ.ए.काकांशी बाडिस!
इ.ए.काकांशी बाडिस!
मी पण! तसं पाहिलं तर पुण्याला
In reply to इ.ए.काकांशी बाडिस! by अजया
मी पण! तसं पाहिलं तर पुण्याला डायरेक वा इन्डायरेक नावं न ठेवणार्या सर्वांशी मी बाडिस! =))
आम्ही पुण्याला नावे ठेवत नाही....
In reply to मी पण! तसं पाहिलं तर पुण्याला by यशोधरा
तसे आम्ही कुणालाच नावे ठेवत नाही.
पण, एक ठिकाण ठरवायला इतका वेळ? ह्या गोष्टीला काय म्हणावे बरे?
ह्या गोष्टीला काय म्हणावे बरे
In reply to आम्ही पुण्याला नावे ठेवत नाही.... by मुक्त विहारि
ह्या गोष्टीला काय म्हणावे बरे? >> चोखंदळ रसिक वृत्ती, मृत्यून्जयाने सांगितलेच आहे की वरती.
पाताळेश्वर लेणी किंवा संभाजी
पाताळेश्वर लेणी किंवा संभाजी उद्यान गप्पा मारायला निवांत जागा आहेत. नंतर जेवण्याचेही भरपूर विकल्प जवळच आहेत.
काही वेगळे पाहायचे असेल तर
In reply to पाताळेश्वर लेणी किंवा संभाजी by प्रचेतस
काही वेगळे पाहायचे असेल तर शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश जवळच आहे.
शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश जवळच आहे....
In reply to काही वेगळे पाहायचे असेल तर by प्रचेतस
तुम्ही यणार असाल तरच, मुर्ती बघण्यात रस आहे.
आंधळ्याला मेनकेचे न्रुत्य दाखवू नये आणि बहिर्याला भीमसेनांचे गाणे ऐकवू नये.
(तुमच्या शिवाय अशा ठिकाणी जाणे म्हण्जे, आंधळा + बहिरा) मुवि
शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश
In reply to काही वेगळे पाहायचे असेल तर by प्रचेतस
त्रिशुंड शिल्पसमृद्ध? त्रिशुंडाला शिल्पसमृद्ध म्हणणे म्हणजे खाटेत चिरडलेल्या ढेकणाला हुतात्मा म्हणण्यापैकी झालं!! =))
इतकेही वाईट नाहीये ते. उगा
In reply to शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश by सूड
इतकेही वाईट नाहीये ते. उगा उपमा पापिलवार असली म्हणून कुठेही वापरता काय बे.
पण शिल्पसमृद्ध म्हणजे जरा अति
In reply to इतकेही वाईट नाहीये ते. उगा by बॅटमॅन
पण शिल्पसमृद्ध म्हणजे जरा अति नै का वाटत? भुलेश्वराला शिल्पसमृद्ध म्हणणं मी समजू शकतो. चार फिरंग्यांची शिल्प एक दोन ते व्याल का शरभ येवढं सोडून काय आहे तिथे?
गजान्तलक्ष्मी, किन्नर, गेंडा,
In reply to पण शिल्पसमृद्ध म्हणजे जरा अति by सूड
गजान्तलक्ष्मी, किन्नर, गेंडा, नटराज, लिंगोद्भव शिव, मकर, यंत्र, कीचक, द्वारपाल आणि बरेच काही.
हे असं मिपावर लिहीता ते
In reply to गजान्तलक्ष्मी, किन्नर, गेंडा, by प्रचेतस
हे असं मिपावर लिहीता ते प्रत्यक्ष स्थळी गेल्यावर पण दाखवत चलावं, तिथे आपण मोजकंच बोलता. मग आमच्यासारख्यांना त्या दगडांमधली शिल्पसमृद्धता कळावी ती कशी?
दगडांना लिहायचे राहीले कै? ;)
In reply to हे असं मिपावर लिहीता ते by सूड
दगडांना लिहायचे राहीले कै? ;)
तू येऊन लिहीशील हे माहीत होतं
In reply to दगडांना लिहायचे राहीले कै? ;) by टवाळ कार्टा
तू येऊन लिहीशील हे माहीत होतं, म्हणून लिहीलं नाही.
त्या देवळाचा आकार पाहता,
In reply to पण शिल्पसमृद्ध म्हणजे जरा अति by सूड
त्या देवळाचा आकार पाहता, जेवढी अन जशी शिल्पे तिथे आहेत ती उत्तमच आहेत. शिल्पसमृद्ध- वेल, अंमळ अतिशयोक्ती असेलही, पण ढेकूण-हुतात्मा तुलनेइतकीही प्रचंड अतिशयोक्ती नाही.
सूडची अतिशयोक्ती ही सुध्धा
In reply to त्या देवळाचा आकार पाहता, by बॅटमॅन
सूडची अतिशयोक्ती ही सुध्धा अतिशयोक्ती बनून येत असेल ;)
खाटेत चिरडलेल्या ढेकणाला
In reply to शिल्पसमृद्ध त्रिशुंड गणेश by सूड
=)) =))
हे ६ तारखेबद्दल आहे की सात
हे ६ तारखेबद्दल आहे की सात?पाताळेश्वर पाहाण्याची इच्छा आहे.
आधी ठिकाण तर ठरू दे....
In reply to हे ६ तारखेबद्दल आहे की सात by अजया
तारीख नंतर ठरवू.
घ्या! अपुणेकरांचाच घोळ अधिक!!
In reply to आधी ठिकाण तर ठरू दे.... by मुक्त विहारि
घ्या! अपुणेकरांचाच घोळ अधिक!! =))
आता काय करणार?
In reply to घ्या! अपुणेकरांचाच घोळ अधिक!! by यशोधरा
अद्याप यजमान(?) पुणेकरांनी जागा ठरवलेली नाही.त्यातून जास्त घोळ नको म्हणून २ तारखा ठरवल्या.ज्याला जिथे सोईस्कर, त्याने तिथे यावे म्हणून.
इकडे आम्ही तिकीटे पण काढून बसलो.
बादवे,
(आजकाल पुणे जरा जास्त वाढलेले दिसतं ? की पुण्यातील मिपाकरांची संख्या जास्त आहे? की पुणेकर मिपाकरांत एकी नाही? ह्या विषयावर एखादा परीसंवाद आयोजीत करावा म्हणतो. )
पाताळेश्वर
In reply to हे ६ तारखेबद्दल आहे की सात by अजया
पाताळेश्वर पाहाण्याची इच्छा आहे. +१
मी पण येणार .
थांबा....थोडा धीर धरा...
In reply to पाताळेश्वर by चिमी
वल्लींनी पाताळेश्वराचे नांव सुचवलेले आहे.
अद्याप त्यावर इतर पुणेकरांनी शिक्का-मोर्तब केलेले नाही.
चायला कै तो घोळ घालत गोल गोल
चायला कै तो घोळ घालत गोल गोल परत परत तेच तेच*, दोन शतकी शतकी** काढूनसुध्धा एक ठिकाण ठरवता येत नै...आत्ताच आयोजकांबरोबर बोलणे झाले...काही नवीन माहीती मिळाली -
आयोजक सर्वसमावेशक विचारांचे असून्सुध्धा मेंब्रं मात्र पुण्यवंत असल्याकारणाने आयोजकांना ठिकाण ठरवण्यात थोडे बिचकायला झाले असावे अशी शंका घेण्यास वाव आहे तस्मात मी व्हेटो वापरून कट्टा पिंचिजवळ असेल कारण जास्त कट्टेकरी त्या भागातील आहेत असा ठराव पास केलेला आहे...या भागातील उत्तम खाणे (चिकन + मासे + घासफूस) मिळणारे ठिकाण लवकरच जाहिर केले जाईल.
*चायला अस्ले घोळ घालत बसून वर त्याला चोखंदळपणा म्हणणे म्हणजे हैट्ट आहे...ठाणे-मुंबैकर बरे...जे पहिले चांग्ले ठिकाण आठवेल कट्टा तिथे...दुसरे चांगले ठिकाण सुचवले गेले तर पुढचा कट्टा तिथे
**हा धागासुध्धा शतकी होईल अशी लक्षणे दिसायला लागलेली आहेत ;)
स्वगत - मुवि...एकदा आमच्या इथे सुध्धा चक्कर टाका...नंदी पॅलेसला तोडीसतोड जागा दाखवतो (फक्त ते गाणे गाणारा नाहीये)
नंदी पॅलेसला तोडीसतोड जागा दाखवतो...
In reply to चायला कै तो घोळ घालत गोल गोल by टवाळ कार्टा
मंजूर...
हम आयेंगा
कट्टा पिंचिजवळ असेल कारण
In reply to चायला कै तो घोळ घालत गोल गोल by टवाळ कार्टा
कट्टा पिंचिजवळ असेल कारण जास्त कट्टेकरी त्या भागातील आहेत असा ठराव पास केलेला आहे...या भागातील उत्तम खाणे (चिकन + मासे + घासफूस) मिळणारे ठिकाण लवकरच जाहिर केले जाईल.
पहिल्यापासून सांगतो आहे ग्रीनपार्क. पिंचि आणि पुणे सगळ्यांना मध्यवर्ती आहे तर तुम्ही ऐकत नाही मग काय करणार. चोखंदळ फार तुम्ही.
चायला अस्ले घोळ घालत बसून वर त्याला चोखंदळपणा म्हणणे म्हणजे हैट्ट आहे...ठाणे-मुंबैकर बरे...जे पहिले चांग्ले ठिकाण आठवेल कट्टा तिथे...दुसरे चांगले ठिकाण सुचवले गेले तर पुढचा कट्टा तिथे
आधी पुणे ठरलेले असताना घोळ घालुन पिम्चिकडे नेणारे सगळे अपुणेकर आणि पुणेकरांन्या शिव्या. यह बात कुछ हजम नही हुइ.
पुणेकर आहेतच चोखंदळ त्याला काय करणार आता,
मग ग्रीनपार्क नक्की ना?
In reply to कट्टा पिंचिजवळ असेल कारण by मृत्युन्जय
का,
आता परत ह्याचावर काथ्या-कूट?
माझ्यातर्फे फायनल. पण
In reply to मग ग्रीनपार्क नक्की ना? by मुक्त विहारि
माझ्यातर्फे फायनल. पण कट्ट्याचा आयोजक नक्की कोण हे कळाले तर ठिकाण फायनल करता येइल त्याच्याबरोबर बोलुन.
कट्ट्याचा आयोजक नक्की कोण???????
In reply to माझ्यातर्फे फायनल. पण by मृत्युन्जय
पुण्यात सगळेच "आयोजक" आहेत.
मला ग्रीन-पार्क, संभाजी पार्क, सारस बाग, सावरकर उद्यान, काहीही चालेल.
चार गप्पाच तर हाणायच्या आहेत.
एखादी चहाची टपरी किंवा कानिफनाथ उसाचे गुर्हाळ पण चालेल.
पण ठिकाण ठरवा.
माझ्यातर्फे फायनल. पण
In reply to मग ग्रीनपार्क नक्की ना? by मुक्त विहारि
माझ्यातर्फे फायनल. पण कट्ट्याचा आयोजक नक्की कोण हे कळाले तर ठिकाण फायनल करता येइल त्याच्याबरोबर बोलुन.
बस्स झाला घोळ...
In reply to माझ्यातर्फे फायनल. पण by मृत्युन्जय
बा म्रुत्युंजया, आता तूच हो आयोजक आणि ६ ता.चा ग्रीनपार्क हेच कट्ट्याचे ठिकाण नक्की करू या.
शुभेच्छा देणारे तसे पण शुभेच्छा देणारच आणि येणारे येणारच.
६ बद्दल सुरु आहे की ७? =))
६ बद्दल सुरु आहे की ७?
=))
शांत दंतशिल्पकार टै शांत..
In reply to ६ बद्दल सुरु आहे की ७? =)) by अजया
शांत दंतशिल्पकार टै शांत...आधी ६ चा घोळ निस्तरू दे
हेहेहे! दंतशिल्प कार!!!
In reply to शांत दंतशिल्पकार टै शांत.. by टवाळ कार्टा
हेहेहे! दंतशिल्प कार!!!
डोळ्यासमोर चित्र उभे राहिले, अजया हातात पिटुकले छिन्नी हातोडे घेऊन पेशंटच्या (किंवा टक्याच्या?!) दातांवर गणपती, भैरव, चण्डिका, सर्प, गरुड़, शरभ, वगरे कोरतेय... दोन सूळया वर मात्र २ बाजूला जय विजय... =))
ग्रीन पार्क +१
ग्रीन पार्क करुन टाका की फायनल. काथ्याचा कुटुन कुटुन चोथा झाला ए आता :( लवकर जाहीर करा ठिकाण अन वेळ .....
किती तो घोळ! ६ चा वेगळा धागा
किती तो घोळ! ६ चा वेगळा धागा काढा. इथे ७ ची चर्चा होऊ द्या. ७ ला सकाळी कट्टा होणार, हे नक्की आहे ना? ६ ला तीर्थप्राशन केल्यावर त्याचा असर उतरण्याच्या आत ७ ला पुन्हा तीर्थप्राशन करण्याचा विचार आहे की काय?
डिसेंट+ अपेयपान + घासफुस + पक्षी
१. ग्रीन पार्क , बाणेर
२. मेझ्झा नाईन हिंजवडी
३. सदानंद . बाणेर
४. राहूल , औंध ( पण जागा छोटी आहे )
५. कोपाकबाना , जगताप डेअरी
६. निसर्ग , कोथरूड
७. गार्डन कोर्ट , चांदणी चौक
८. अप अँड अॅबॉव्ह .चांदणी चौक.
९. राजवाडा , बाणेर
१० . सर्जा , औंध
११. किवा आयव्ही , बाणेर
१२. अँब्रोशिया , चांदणी चौक
१३. 7-seas-wine-n-dine , बाणेर.
प्लॅन A मेझ्झा नाईन हिंजवडी
प्लॅन Aमेझ्झा नाईन हिंजवडीप्लॅन Bग्रीन पार्क , बाणेर६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६
६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६:०० पासून मेझ्झा नाईन, हिंजवडी इथे सुरू होईल
७ चा कट्टा दुपारच्या जेवणासाठी १२:३० वाजता आनंदी डायनींग हॉल, माणिक बाग इथे असेल
हुस्शा झाले फायनाल.
In reply to ६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६ by टवाळ कार्टा
हुस्शा झाले फायनाल.
हिंजवडी अंमळ लांब असल्याने या
In reply to ६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६ by टवाळ कार्टा
हिंजवडी अंमळ लांब असल्याने या कट्ट्यास येणे जमणार नाही. पक्षीतीर्थ होऊन सात तारखेच्या कट्ट्याला कोणी शिल्लक उरलंच तर मग माणिकबागेत भेटू..!!
मुवि आणि सगा तुझ्या घराच्या
In reply to हिंजवडी अंमळ लांब असल्याने या by सूड
मुवि आणि सगा तुझ्या घराच्या आधीच्या बिल्डिंगमधून कट्ट्याला येणार आहेत त्यामुळे तुझी होणारी अतिरिक्त मेहनत समजून घेतली जाईल :P
>>मुवि आणि सगा तुझ्या घराच्या
In reply to मुवि आणि सगा तुझ्या घराच्या by टवाळ कार्टा
कृपया संदर्भासहित स्पष्टीकरण द्या.
मेझ्झा ९ आम्हाला परवडत
In reply to ६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६ by टवाळ कार्टा
मेझ्झा ९ आम्हाला परवडत नसल्याने आम्ही कटाप !
माणिक बाग चे माहीत नाही !
अर्रे बरीच खलबते केल्यावर हे
In reply to मेझ्झा ९ आम्हाला परवडत by प्रसाद गोडबोले
अर्रे बरीच खलबते केल्यावर हे बजेटवाले हॉटेल आहे असे सांगितले गेले आहे...म्हणूनच बाकीची महागातली हॉटेले कटाप केल्ती...
तु ये तुला फुकट देतो...अस्से म्हणेलच कोणीतरी ;)
मेझ्झा ९ जाम महागडे अहे
In reply to अर्रे बरीच खलबते केल्यावर हे by टवाळ कार्टा
मेझ्झा ९ जाम महागडे अहे त्यापेक्षा बारबेक्यू नेशन परवडते.
बारबेक्यू नेशन
In reply to मेझ्झा ९ जाम महागडे अहे by प्रचेतस
बारबेक्यू नेशन बेश्ट आहेच !
एवढा मोठा ग्रुप आणि हे पक्षी + तीर्थ + डीसेंट अशा कॅतेगरीमुळे हॉटेलची रेंज वाढली आहे.
अवांतर : सर्व बारमध्ये जेवण महागच असता :(
यापुढे पुण्यातले कट्टे म्हटले
In reply to बारबेक्यू नेशन by कपिलमुनी
यापुढे पुण्यातले कट्टे म्हटले की असे घोळात घोळ असणार हे धरूनच चालावे लागेल बहुतेक
तुला ज्याने कोणी मेझ्झा ९ हे
In reply to अर्रे बरीच खलबते केल्यावर हे by टवाळ कार्टा
तुला ज्याने कोणी मेझ्झा ९ हे बजेट होटेल म्हणुन सुचवले असेल त्याचा कट्ट्याला 'सत्कार' करावा असे सुचवत आहे !
मद्यपानासाठी निगडी मधील वैशाली बेस्ट ! एकदम अॅफोर्डेबल रेट आणि बेस्ट अॅम्बियन्स ! फक्त एकच वाईट आहे की तु बास म्हणे पर्यंत चकणा आणुन देत रहातात आणि मग कचकुन चकणा खल्ल्याने जेवण जात नाही !
बाकी शेजारीच खास कोल्हापुरी होटेल्स आहेत , पन्हाळगड हे बर्यापैकी महाग असले तरीही तिथला तांबडा पांढरा कोलापुरीच्या बर्यापैकी जवळ जाणार आहे .
आणि हो , हॉटेल वैशाली बार
In reply to तुला ज्याने कोणी मेझ्झा ९ हे by प्रसाद गोडबोले
आणि हो , हॉटेल वैशाली बार बाहेर लावलेले प्रियान्का चोप्रा चे ब्लेन्डर्स प्राईड चे पोस्टर मला फार अवडते ;)
https://www.pinkvilla.com/files/imagecache/ContentPreview/blenders_29.j…
प्रगो - तु पुढाकार घेवून
In reply to आणि हो , हॉटेल वैशाली बार by प्रसाद गोडबोले
प्रगो - तु पुढाकार घेवून हॉटेल ठरव.
६ च्या कट्ट्याला अनाहिता
In reply to प्रगो - तु पुढाकार घेवून by मोदक
६ च्या कट्ट्याला अनाहिता येणार त्यामुळे तीर्थ असेल तर डीसेंट असावेच्च
डिसेंट हॉटेलात मद्यपान करावे
In reply to ६ च्या कट्ट्याला अनाहिता by टवाळ कार्टा
डिसेंट हॉटेलात मद्यपान करावे इतका मी हुच्च राहिलो नाही राव अता , मुंबैत होतो तोवर ठीक होते , अता मी चिंचवड गावात (तेही नदी पलीकडे रहाणारा ) गरीब माणुस आहे .
सगळे जण जर हुच्च असतील तर कोपाकबाना वाकड https://www.burrp.com/pune/copacabana-wakad-listing/54325 येथे जाऊ शकतो , तेही बर्यापैकी महाग आहे पण अप्रतिम अॅम्बियन्स आणि मस्त जेवण !
( आणि माझा स्वार्थ असा की मला इथली थाई प्रॉन्स करी प्रचंड आवडली आहे , ह्या निमित्ताने परत खाता येईल )
मेझ्झा ९ अणि कोपाकबाना अगदी
In reply to डिसेंट हॉटेलात मद्यपान करावे by प्रसाद गोडबोले
मेझ्झा ९ अणि कोपाकबाना अगदी सारखेच आहेत. जणू एकाच मालकाचे असावेत. बाकी मला थाई करी मेझा ९ ची जास्त आवडली होती तर लसान्या कोपाकबानाचा.
ह्या कट्ट्यालाही घासफुस
In reply to मेझ्झा ९ अणि कोपाकबाना अगदी by प्रचेतस
ह्या कट्ट्यालाही घासफुस वाल्यांची मेजॉरीटी असणार असा अंदाज आहे ,
तुम्ही लेको परत एकदा खादाडी हायजॅक करणार अन आम्हाला पनीरबीनीर खायला लावणार :-\ ल्ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊउ
नाहीतर गणेशा म्हणतो त्या समाधान हॉटेलला , रावेत मधे , जाऊन आलो असतो !!
अर्रे बरीच खलबते केल्यावर हे
In reply to अर्रे बरीच खलबते केल्यावर हे by टवाळ कार्टा
हे त्या व्यक्तीने त्याच्या बजेटचा हिशोब करुन सांगितल्याची शक्यता नाकारता येत नाही.
मी
In reply to अर्रे बरीच खलबते केल्यावर हे by सूड
फक्त कर्ड राईस - २००+ असा रेट पाहिला, जेवुन निघताना त्या कर्डाचं एखादं लहानस मडक तर नाही ना बांधुन देत घरी न्यायला ?
३००-४०० प्रत्येकी असे बजेट
In reply to अर्रे बरीच खलबते केल्यावर हे by सूड
३००-४०० प्रत्येकी असे बजेट विचारात घेतले होते
असो, तसंही सहाच्या कट्ट्याला
In reply to ३००-४०० प्रत्येकी असे बजेट by टवाळ कार्टा
असो, तसंही सहाच्या कट्ट्याला मी नसल्याने या चर्चेतून मी रजा घेतो. झालाच सात तारखेचा कट्टा तर कृपया तसे कळवणे, हजेरी लावल्या जाईल.
॥ इत्यलम्॥
७ ला वर दिलेल्या ठिकाणी आम्ही
In reply to असो, तसंही सहाच्या कट्ट्याला by सूड
७ ला वर दिलेल्या ठिकाणी आम्ही जमूच...तु ये तुला फुकट (नाही) देणार :)
करेक्ट. मेझ्झा ९ ग्रीनपार्क
In reply to मेझ्झा ९ आम्हाला परवडत by प्रसाद गोडबोले
करेक्ट. मेझ्झा ९ ग्रीनपार्क पेक्षा महाग आहे आणि लांब देखील.
जनहितार्थ,आनंदी डायनींग हॉल,
In reply to ६ ला कट्टा संध्याकाळी ५:३०-६ by टवाळ कार्टा
जनहितार्थ,
आनंदी डायनींग हॉल, माणिक बाग कडे जाणार्या रस्त्यांचे डीटेलवार वर्णन द्यावे.
तेथे अगोदर गेलेलो नाही. इतरही काही आमच्यासारखे अनभिज्ञ लोक असू शकतील !
ठिकाण ठरवताना दोन दिडशतकी
In reply to जनहितार्थ,आनंदी डायनींग हॉल, by डॉ सुहास म्हात्रे
ठिकाण ठरवताना दोन दिडशतकी धागे खर्ची पडले असतानासुध्धा असा प्रश्न विचारण्याचे धाडस दाखवल्याबद्दल मंडळ तुमचा सत्कार एक GPS cover देउन करत आहे :)
अखिल्पुणेकट्टाआयोजक्समिती
हे ठिकाण पाच वर्ष माणिकबाग
In reply to ठिकाण ठरवताना दोन दिडशतकी by टवाळ कार्टा
हे ठिकाण पाच वर्ष माणिकबाग एरियात राहूनही मलाही माहिती नाही.
कुठे आहे नेमके? मुख्य सिंहगड रस्त्यावर कुठे? ब्रम्हाच्या आसपास? पेट्रोल पंपाजवळ ? खाऊ गल्लीच्या जवळ ?
टवाळगिरी करण्याऐवजी सरळ सरळ
In reply to ठिकाण ठरवताना दोन दिडशतकी by टवाळ कार्टा
भाराभर चर्चा झाली असली तरी त्यात ठरलेल्या जागेचा डिट्टेलवार पत्ता नाही (यात ईशेष आसं कायच नाय, न्हेमीचंच हाय. पन आप्ली येक आठ्वन क्रून दिली) तेव्हा...
टवाळगिरी करण्याऐवजी सरळ सरळ उत्तर (पत्ता) दिल्यास सज्जन मिपाकर तुमचा सत्कार करतील, अन्यथा कट्ट्यावर 'सत्कार' करतीलच ! :) ;)
बहुधा हे असावे:
In reply to जनहितार्थ,आनंदी डायनींग हॉल, by डॉ सुहास म्हात्रे
बहुधा हे असावे:
https://www.justdial.com/Pune/Anandi-Dining-Hall-%3Cnear%3E-Manik-Baug-…
https://www.justdial.com/Pune/Anandi-Dining-Hall-%3Cnear%3E-Manik-Baug-…
जाणकारांनी कृपया कन्फर्म करावे. मी गेली २० वर्षे पुण्यात राहतो आहे. पण आनंदी डायनिंग हॉल बद्दल कधी ऐकलेले नाही. कट्ट्ञाचा मुख्य उद्देश हा भेटणे असला तरी आनंदीची क्वालिटी बरी आहे हे कन्फर्म करण्याइतपत तिथे कोणी जाउन आलेले आहे काय? अन्यथा विष्णुजी की रसोइ चा पर्याय सुचवु इच्छितो.
असो. याहुन जास्त कन्फ्युजन टाळण्यासाठी एक अंतिम सूचना कम हजेरी धागा सुरु करावा ही विनंती परत एकदा करतो.
सहमत ! त्या भागात अनेक
In reply to बहुधा हे असावे: by मृत्युन्जय
याहुन जास्त कन्फ्युजन टाळण्यासाठी एक अंतिम सूचना कम हजेरी धागा सुरु करावा ही विनंती परत एकदा करतो.सहमत !
त्या भागात अनेक वर्षांत जाणे न झाल्यामुळे मलाही केवळ "आनंदी डायनिंग हॉल, माणिक बाग" यावरून पत्ता वाटेत विचारत विचारतच जावे लागेल. माझ्यासारख्या पुणेकरांच्या आणि पुण्याबाहेरून येणार्यांच्या सोईसाठी आयोजकांनी सविस्तर पत्ता देणे आवश्यक आहे.
मार्गदर्शक पत्त्याचे एक चांगले उदाहरण इथे सापडेल.
७ तारीख
मी आहे
इस बार जरूर आना.....
In reply to ७ तारीख by बाबा पाटील
हम मिलेंगे....
हम
सात साथ है!
कट्टा+टका दर्शनोत्सुक
नाखु
हजेरी धागा वेगळा सुरु करावा
हजेरी धागा वेगळा सुरु करावा काय?
पुणेकर हजेरीमध्ये पण घोळ
In reply to हजेरी धागा वेगळा सुरु करावा by मृत्युन्जय
पुणेकर हजेरीमध्ये पण घोळ घालतात???
नाही गोंधळ पुण्याबाहेरचे
In reply to पुणेकर हजेरीमध्ये पण घोळ by टवाळ कार्टा
नाही गोंधळ पुण्याबाहेरचे घालतात. त्यामुळे हजेरी नीट कळावी या उद्देशाने वेगळा धागा काढावा असे सुचवले.
कट्टा आयोजक नक्की कोन आहे ते अजुन कळाले नाही. कोण करते आहे सगळी व्यवस्था?
कट्टा आयोजक नक्की कोन आहे ते
In reply to नाही गोंधळ पुण्याबाहेरचे by मृत्युन्जय
तेही पुण्याबाहेरचेच हो!! घोळ बघून लक्षात यायला हवं होतं. ;)
मेरे मनकी बात!
In reply to कट्टा आयोजक नक्की कोन आहे ते by सूड
मेरे मनकी बात!
मग चालायचच.
In reply to कट्टा आयोजक नक्की कोन आहे ते by सूड
मग चालायचच.
जे
In reply to मग चालायचच. by मृत्युन्जय
आयोजक आहेत तेच सारखी एक नवी पुडी सोडून देतात असे रोचक निरिक्षण आहे.
तेव्ह्ढीच खमंग चर्चा.
टिव्हीवरील उखाळ्या-पाखाळ्या कारेक्र्माची
याद आलेला नाखुस
मेझ्झा ९ मेनू
मेनू कार्ड
रिक्वायरमेंट
हे क्रायटेरिया आहेत. हॉटेल सुचवा वरती १३ हॉटेलची यादी आहे ती सर्व साधार्ण एकाच रेंज मधे आहेत.
यात ३००-४०० प्रत्येकी अशी
In reply to रिक्वायरमेंट by कपिलमुनी
यात ३००-४०० प्रत्येकी अशी रेंज असलेलीच सुचवा
कुठलंही ठरवा राव.
In reply to यात ३००-४०० प्रत्येकी अशी by टवाळ कार्टा
कुठलंही ठरवा राव.
घरी असलो तर आम्ही येऊच.
बाकी ह्या लिस्टमध्ये नसलेले अजून एक हाटेल आहे. मॉडेल कॉलनीत. दिल्ली डाउन टाऊन. पूर्वाश्रमीचे दिल्ली किचन. ऑथेन्टिक नॉर्थ इंडियन. व्हेज नॉनव्हेज फक्त तीर्थक्षेत्र नाही इतकेच. जास्तीत जास्त २५० ते ३०० रू. बिल होईल प्रत्येकी.
तीर्थ वगळले तर
In reply to कुठलंही ठरवा राव. by प्रचेतस
तीर्थ वगळले तर बरेच चांगले ऑप्शन आहेत
घरी असलो तर आम्ही येऊच.
In reply to कुठलंही ठरवा राव. by प्रचेतस
म्हणजे येणार नाही. :)