खर्या आयडीने बोलता येईना
मनातले गरळ ओकता येईना...
डुआयडीने आता सगळे....
"स्कोअर सेटल" करू.....!!
उपद्र्व हा अनंत काळचा...
मिपाबरोबर कायम रहायचा...
घरात चारच माणसे आणि...
दारात चारशे चपला सारू.....
नव्या आयडीच्या बाटलीत भरली
शिळ्या विचारांची जुनीच दारु....
त्यांना वाटतं आतातरी भपकारा येणार नाही...
मिपाकरांच्या नाकाचं किती कौतुक करू !!
आडून आडून सगळे करिती हल्ला...
भुरट्यांचा ठाऊक असे मोहल्ला....
एकटा दुकटा कोणी लागता हाती....
चला त्याला आडवे करू !!
येता जाता शरसंधान.....
मिपाकरांचे कार्य महान....
संस्थळ घेतले साफ कराया....
कोळी,झुरळांची लगबग सुरु !!
---(सगळ्या डुआयडींना चारोळी अर्पण)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4765
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो, ही चारोळी नाही वीसोळी
विसोळीतही चार येतात हो....
In reply to अहो, ही चारोळी नाही वीसोळी by डॉ सुहास म्हात्रे
मीपाकर खरोखरंच महान आहते.
ळोळ!!!
हाहाहा!
खिक्क मस्तय
त्वरा करा !त्वरा करा!त्वरा
याच कारणासाठी माझे हात जोडून
डिटेक्टीव्ह चा आयडी ना तुमचा
In reply to याच कारणासाठी माझे हात जोडून by द-बाहुबली
बाटली आणि दारू