Skip to main content

काही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 22/02/2011 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल? उ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा. प्र.२) त्रास देणार्‍या सदस्यांची तक्रार कुठे करावी? उ. - मिपावर सदस्यांना तक्रार करायची असल्यास सरपंच किंवा संपादक मंडळ या आयडीला किंवा नीलकांत यांना व्यक्तिगत निरोप पाठवावा. प्र.३) प्रवेश करण्यासाठी जशी जागा आहे तसे आपल्या खात्यातुन बाहेर (logout)जाण्यासाठी काय करावे ? उ. - खात्यातून बाहेर जाण्यासाठी गमन नावाचा दूवा आपल्या उजव्या समासात दिलेला आहे त्याचा वापर करावा. प्र.४) काही पानांवर "प्रवेश प्रतिबंधीत " असा संदेश दिसतो. उ.- बरेचदा काही वादग्रस्त किंवा त्रासदायक लेखन उडवायच्या आधी मिसळपावचे संपादक ते लेखन अप्रकाशित करतात व त्यानंतर एकत्रीत चर्चा करून तो उडवावा किंवा काय असा निर्णय होतो. तोपर्यंत तुम्ही त्या पानावर गेलात तर असा संदेश दिसतो. प्र.५)खरडफळा आणि खरडवही - या दोन्हींत फरक काय? उ. - खरडफळा हा सार्वजनीक आहे. तेथे सर्वांशी गप्पा मारता येतील. येथील खरडी तुम्ही काढून टाकू शकत नाही. खरडवही ही तुमची आहे. तुमच्याशी संपर्क साधण्यासाठी त्याचा उपयोग लोक करतील. तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता.

वाचने 133992
प्रतिक्रिया 77

प्रतिक्रिया

>>>>तुम्ही तुमच्या खरडवहीतील खरडी तुम्ही काढून टाकू शकता. एक एक खरड उडवणे त्रासदायक असते. एकदम कशा उडवता येतील?

प्र.१ ) अर्धवट राहिलेले लेखन कसे आणि कुठे दिसेल? उ. - अर्धवट राहिलेले लेखन मिपावर साठवता येत नाही. यासाठी कृपया जीमेल किंवा अन्य सोईंचा वापर करावा.
यासाठी मला आवडलेली सोय - 'फायरफॉक्स'मध्ये Lazarus: Form Recovery म्हणून अ‍ॅड-ऑन आहे. तुम्ही मिपावर टंकत राहता ते आपोआप साठवलं जातं. संकेतस्थळ तात्पुरतं खपलं किंवा इतर काही कारणांनी लेखन अपुरं राहिलं तर फायरफॉक्समध्ये जाऊन ते मिळवता येतं.

In reply to by अद्द्या

सदस्य नावात (User name ) बदलायचं आहे ध्वनि कुठल्या क्रमांकावर करायचा ? कृपया क्रमांक दया.

In reply to by OnShree Graphicd

प्रशांत यांना व्यक्तिगत निरोप अथवा खरड़ करून किंवा इथे लिहिले तरी ते जेव्हा वेळ असेल तेव्हा ते करून देतील. -दिलीप बिरुटे

आयडी पुढे /authored लाउन एखाद्याचं लिखाण दिसायचं. आता दिसत नाही. ही सोय परत आणता येइल का? का याच्या जागी दुसरा काही मार्ग आहे?

In reply to by अनुप कुलकर्णी

'अमुक यांचे लेखन misalpav.com' असं गूगलवर शोधलं तर (सध्यातरी) असं लिखाण सापडतं. उदाहरणार्थ, पैसा यांचे लेखन misalpav.com असं शोधलं तर जो पहिलाच दुवा मिळतो त्यात पैसाताईंचं लिखाण दिसतं.

जर प्रतिसाद खुप असतील (एका पेक्षा जास्त पानावर) आणि नंतर काही नविन प्रतिसाद आले जे वेगवेगळ्या पानावर आहेत तर , पहील्या पानावरचे नविन प्रतिसाद "नविन" असे लाल अक्षरात दिसतात पण मग पुढल्या पानवरचे मात्र असे टॅग केलेले नसतात. मग त्या पानावरचे नविन कुठले आणि जुने कुठले ते कळत नाहीत.

In reply to by मराठी_माणूस

सद्यस्थितीत यात सुधारणा होइल अशी चिन्हे नाहीत.

मला येथे माझ्या कविता, चारोळ्या द्यावयाच्या आहे. कृपया प्रत्येक पायरी समजावून सांगावी. आपला नम्र, यलप्पा सटवाजी कोकणे ९८९२५६७२६४

In reply to by यल्लप्पा सट्वज…

कोण शिकवले रे ह्यांना? दंडवत रे भौ

In reply to by सदस्यनाम

ज्याने कोणी शिकवलं त्याने पायऱ्या न शिकवता डायरेक हाय स्पीड लिफ्ट शिकवलेली दिस्तीय.

@प्रति नीलकांत/ प्रशांत/ सं.मं. यल्लापाचे सर्व धागे एक करुन एक धागा त्यांच्या नावावर टाकता येईल का? चांगली प्रवासवर्णन ह्या स्पॅमिंगमुळे खाली जात आहेत. :/

आणि लेखनमर्यादा पण टाकता येईल का नव्या आयडींना? जसं की नव्या आयडीला एका दिवशी दोनपेक्षा जास्तं लेख टाकता येउ नयेत.

काही जण मिपा साइट कार्यालयातून वाचतात/पाहतात परंतू लॅागिन करून लगेच प्रतिसाद देऊ शकत नाहीत. इमेलवरून प्रतिसाद पाठवता येईल का?{ फोटोबकेट साइटवर इमेल करून फोटो योग्य त्या अॅल्बममध्ये पाठवता येतो तसा }

http://misalpav.com/user/लेखकाचा वा लेखिकेचा सभासद क्रमांक/authored उदाहरणार्थ, तुमचा क्रमांक आहे ११४९५, म्हणून तुमचं लेखन असं शोधू शकालः http://misalpav.com/user/11495/authored (Mouse चा cursor लेखकाच्या/लेखिकेच्या नावावर hover केला असता क्रमांक खाली डाव्या कोपर्‍यात दिसतो.)

मिसळपाव वर एखादा धागा, किंवा शब्द शोधायचा असेल (search facility) तर तशी शोय कुठे आहे , स्वगृह पेज वर सापडत नाही

मिसळपाव वर एखादा धागा, किंवा शब्द शोधायचा असेल (search facility) तर तशी शोय कुठे आहे , स्वगृह पेज वर सापडत नाही... मला पण दिसत नाही

मिसळ्पाव वर पाकक्रूती शोधायचि असल्यस कशी शोधायचि? सर्च कुठे आहे?

मला माझे नाव, जे mandarbsnl असे दिसत आहे की जे माझ्या ई-मेल आयडी mandarbsnl@gmail.com ची पहिली सहा अक्षरे आहेत... ते मी कसे बदलू?? कृपया मदत करावी..लिंक द्याल का??..

In reply to by बहुगुणी

राष्ट्रवादी च्या नेत्या सारखे नका वागू हो , उत्तरे न भेटल्या मुळे आमचा लै बॅक लॉग राहतो हो .

मिपावर लेख कसे शोधवेत? मला एखादी पाकॄ अथवा भटकंती अथवा अन्य कुठल्याही विषयावर कुठले धागे अस्तित्वात आहेत हे कसे शोधायचे? 'सर्च विंडो' दिसली नाही मिपावर.

मला प्रत्येक लॉग इन च्या वेळेस पासवर्ड चुकला असा संदेश दिसतो. मग नवीन लिंक मागवून पासवर्ड बदलावा लागतो. माझा पासवर्ड ब्राउजर (फायरफॉक्स) मधे साठवला असूनही समस्या कायम आहे. भाषा बदल करूनही समस्या कायम आहे. कृपाया मिपा संबंधित अधिकारी व्यक्ती मदत करू शकेल काय?

In reply to by Duishen

नीलकांत किंवा प्रशांत या आयडींना विनंती करा. वरील बहुगुणीजींच्या एका प्रतिसादात त्यांच्या प्रोफाइलच्या लिंका आहेत.

माझा प्रश्न सार्वजनिक झाला की काय? असे झाल्यास क्षमस्व. मी मिपा अधिकाऱ्यांना कुठल्या लिंकवर प्रश्न विचारू?

In reply to by एमी

आता नाही काढता येत स्वतःला. पूर्वी खरड डिलीट करता येत असे.

In reply to by चुकार

तेच लेखन चुकून दोनदा प्रसिद्ध केले गेल्यास संपादकांना त्यातील एक काढून टाकण्याची विनंती करता येते. हे व्यनीने किंवा लेखाला दिलेल्या एका प्रतिसादात केले तरी चालते.

Post var दिली जाणारी नवीन कमेंट ही सर्वात शेवटी दिसायला हवी म्हणजे जास्त शोध घ्यावा लागणार नाही

फोटो अपलोड करण्यासाठी फ्लिकर पेक्षा कोणती सोपी वेबसाइट आहे का? फ्लिकर वरून शेअर लिंक करून इकडे टाकताना प्रत्येक वेळी एडिट करावी लागते.

In reply to by रिकामटेकडा

पोस्ट इमेज आणि Imgbb हे पर्याय आहेत. तसंच एम्बेड फोटोज इथं तुमच्या फ्लिकर फोटोची लिंक दिल्यास त्या फोटोची एम्बेड लिंक आणि फोटोचा डायरेक्ट url मिळतो . उदा. फ्लिकरची ही शेयर लिंक https://flic.kr/p/hx4W8K आणि त्यावरुन घेतलेला हा फोटो. Idli

नमस्कार, मी मिपावर बऱ्यापैकी लिखाण केलेले आहे. माझे प्रोफाईल उघडल्यावर 'यांचे सर्व लेखन' ह्या शीर्षकाखाली मात्र माझे लेखन दिसत नाही, अन्य कुणी लिहिलेले ३ लेख दिसतात. हे कसे दुरुस्त करता येईल ?

In reply to by अनिंद्य

नीलकांत किंवा प्रशांत हेच करु शकतात.. मी एकही लेख लिहिला नसताना माझ्या प्रोफाईल मधे हे तीन लेख दिसताहेत. Screenshot-20191014-182018-Chrome तुमचं लेखन मात्र मला व्यवस्थीत बघता येतंय. Screenshot-20191014-182145-Chrome Screenshot-20191014-182238-Chrome

In reply to by सुमो

अगदी असेच माझ्या नावाखाली, गवी, मूवी, प्रचेतस, जव्हेरगन्ज , शिवकन्या, मृणालिनी, खिलजी यांचे काही लिखाण जोडता येईल का ;) बाकी मला माहित आहे काय टेक्निकल झोल असावा ते ;)

'माझे लेखन' आणि 'यांचे सर्व लेखन' वेगळे आहे. -------- याचे उत्तर मी तुम्हाला व्यक्तिगत संदेशात देईन. कारण तुमचा युजर आईडी नंबर मी सभासद नसलेल्यांसाठी उघड करू शकणार नाही. उघड करायला परवानगी नाही. ---------- माझा एखादा लेख कुणी सभासद नसलेल्याने वाचला आणि त्यास मी लिहिलेले इतर लेख वाचायचे असल्यास ते सापडणार नाहीत कारण माझा युजर आईडी त्यांना पाहता येत नाही. पण मी स्वत:च माझ्या लेखात मी लिहिलेल्या लेखाची लिंक देऊ शकतो. तशी काही लेखांत मी दिली आहे. ती सामान्य लिंक = http_misalpav_dot_com/user/युजरनंबर/authored या वरील लिंकमध्ये तुमचा यजरनंबर टाका.

In reply to by कंजूस

कारण तुमचा युजर आईडी नंबर मी सभासद नसलेल्यांसाठी उघड करू शकणार नाही. उघड करायला परवानगी नाही.
असे काही नाही. हवे तर माझा युजर नंबर जाहीर करून बघा जर तुम्ही लॉगिन नसाल तर तसेही त्या युआरएल वर acces denied असेच उत्तर येते. युजर नंबर माहीत असूनही :) कारण जर तसे घडत नसेल तर मी 0 पासून सुरू करून मिपाच्या सर्व युजर्सना crawl करू शकेन :).

माझा एखादा लेख कुणी सभासद नसलेल्याने वाचला आणि त्यास मी लिहिलेले इतर लेख वाचायचे असल्यास ते सापडणार नाहीत
इथे असहमत... लेखकाचे युजरनेम दिसतेच सभासद नसलेल्यांना. गूगलबाबाला असं विचारलं 20191016-124119 तर आलेल्या सर्च रिझल्ट मधील पहिली लिंक तात्या अभ्यंकरांचे सर्व लेखन दाखवते. 20191016-123724 गूगल सर्च मधे युजरनेम टाकले की सर्व लेखन दिसते सभासद नसलेल्यांना सुद्धा.

@जॉनविक्क, ब्राऊजरमध्ये तुम्ही लॉगाउट करून खालील लिंक्स चालतात का पाहा. तुमची लिंक उघडेल पण तुमचे लेखच नसावेत. कंजूस यांचे लेखन इथे पाहा ------------------------ जॉनविक्क यांचे लेखन इथे पाहा -------------------------- अनिंदंय यांचे लेखन इथे पाहा

In reply to by स्वस्तिक

उजव्या बाजूला मिसळपाववर स्वागत असे दिसत असेल. मग माऊली आणि संत तुकाराम दिसतात. मग त्याखाली मिपा दिवाली अंक २०२३ दिसेल. एक तरुण तरुणी हातात हात घेतलेले दिसती. मिसळपाव दिवाळी अंक २०२३ दिसेल. अनुक्रमणिका दिसेल. नंतर आवागमन दिसेल. नंतर, त्या खाली तुमचं लॉगीन केल्यामुळे नाव दिसेल. पुढे खरडवही, व्यक्तिगत संदेश, नवे लेखन, खरडायचा फळा आणि लेखन करा असे दिसेल. त्यावर क्लिक केलं की लेखनाचे पर्याय उघडतील. तिथे चौकटीत लेखन करुन लेखाचे शीर्षक टाकून सर्व टॅगचे पर्याय भरुन लेखन प्रकाशित करा. लेख कच्चे बच्चे प्रकाशित झाले तरी घाबरु नका. संपादक करतील अप्रकाशित. लेखन प्रकाशित करण्यापूर्वी पूर्वप्रकाशनाचीही सोय आहे. आपलं लेखन प्रकाशित होण्यापूर्वी कसे दिसते ते बघायचे आणि लेखन प्रकाशित करायचे. मदत लागली तर, नक्की सांगा आपण मिपावर कधी कधी पडिक असतो. -दिलीप बिरुटे